डिसेंबर २०२० – रोटरी

December - Disease Prevention and Treatment Month

Rtn. Abhijit Deshpande(AB)

 

Friends, are you aware that amongst the world population, only one in six people can afford to pay for healthcare? Rotary believes that good healthcare is everyone's' right. Therefore, Rotary initiatives worldwide are focused on bringing healthcare to the farthest and remotest corners of the world. Rotary volunteers work with zeal and goodwill that helps to bring a smile back to millions of faces worldwide.

Although eradication of polio is a focus area for us, initiatives for preventing and fighting against diseases like Malaria and HIV have also been taken up in large numbers by clubs around the world. Rotary partners with government and private institutions and aims at building infrastructure, providing training to doctors, nurses and paramedical staff and also endeavours at education and awareness about health among the masses.

'Prevention is better than cure.' - Friends, the COVID-19 pandemic has proven this like nothing else. In the daily life of communities around the world, simple things like clean water and clean surroundings - things that we take for granted, go a long way in ensuring their survival. Donations to Rotary, CSR Projects and Global Grants go a long way in ensuring that these basic necessities are met so that the future is healthier.

$65 million grant was given by Rotary to fight disease.
99.9% reduction in polio cases since the program started in 1985

 

Rotary makes amazing things happen, like:

  • Providing clean water: Rotary has worked with partners to provide with clean water to more than 80% of Ghana’s people to fight against Guinea worm disease.
  • Reducing HIV Infection: In Liberia, Rotary members are helping women get tested for HIV early in their pregnancies. They used prenatal care to reduce new HIV infections in children by 95% over two years.
  • Ending Polio: Rotary members have played a key role in bringing the world to the brink of polio eradication. Their efforts have not only ended polio in 122 countries but also created a system for tackling myriad other health priorities, such as Ebola

Let us pledge to contribute to this important Rotary initiative and make the world a healthier place.

समृद्धीकरता सहकार शेती

रो. योगेंद्र नातू

 

रोटरी न्यूजचा नोव्हेंबर महिन्याचा अंक बघितला. पपयांनी लगडलेल्या झाडाच्या बुंध्याशी मयांक गांधी बसले आहेत असं चित्र असलेलं मुखपृष्ठ इतकं आकर्षक आहे की, त्याबद्दलची गोष्ट वाचल्याशिवाय अंक खाली ठेववतच नाही.

मयांक गांधी हे अण्णा हजारे यांच्याबरोबर भ्रष्टाचारविरोधी चळवळीत अग्रभागी होते... ते आम आदमी पार्टीतही होते. २०१५ साली राजकारणातला फोलपणा लक्षात आल्यामुळं ते राजकारणातून बाहेर पडले. २०१६च्या उन्हाळ्यात त्यांनी सामाजिक सेवेसाठी स्वतःला वाहून घ्यायचं ठरवलं. देशामध्ये जर काही बदल घडवून आणायचा असेल तर देशामधली खेडी समृद्ध करायला हवीत हे त्यांना जाणवलं.

याकरता कुठल्या खेड्यांमध्ये काम करावं असा प्रश्न त्यांना पडला... तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मराठवाडा प्रांतात खूप जास्त आहे... त्यातही दुष्काळग्रस्त असा बीड जिल्हा अग्रभागी आहे... म्हणूनच मग परळीजवळच्या पंधरा खेड्यांमध्ये काम करायचं त्यांनी ठरवलं. याबाबतीत त्यांचं म्हणणं असं ‘या खेड्यांमध्ये राहायचं तर ते इतकं कष्टाचं आणि इतकं कठीण आहे की, मी जर इथला शेतकरी असतो तर आत्तापर्यंत मला दहा हार्ट ॲटॅक येऊन गेले असते.’

तिथं काम करताना एक लक्षात येतं की, बाहेरून आलेला हा माणूस का आणि कशाकरता इथं आलाय अशाच शंका सर्वप्रथम स्थानिकांच्या मनात येतात... त्यामुळं कुठून आणि कशी सुरुवात करायची हाच मोठा प्रश्न असतो. त्याकरता त्या ठिकाणच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘पाणीप्रश्नालाच’ त्यांनी हात घातला. या भागातल्या पापनाशी नदीचा सखोल अभ्यास केला. खूप काटेकोर नियोजन, पैसे आणि श्रम यांचा वापर करून या नदीचा जवळजवळ सत्तर किलोमीटर लांबीचा भाग त्यांनी पुनरुज्जीवित केला. त्याचबरोबर श्रमदानातून एकशे बासष्ट तळी बांधली आणि पाच छोटी धरणंसुद्धा.

हळूहळू इथल्या उजाड माळरानांचं रंगरूप पालटायला लागलं. ती हिरवी दिसायला लागली... जमिनीतली पाण्याची पातळी तीनशे फुटांऐवजी पन्नास फुटांपर्यंत आली. पहिल्या वर्षी आंबा, सीताफळ, पपई, मोसंबी, शेवगा आणि केळी अशा झाडांची जवळजवळ बारा लाख रोपं त्यांनी वाटली आणि ती रोपं लावण्यासाठीही मदत केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न महिना पंधरा हजार रुपयांवरून महिना दोन लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत गेलं. पुढची सगळीच गोष्ट अत्यंत उत्कंठावर्धक आहे. globalparli.org या त्यांच्या वेबसाईटवर याबद्दलची अधिक माहिती मिळू शकते.