रोटरी
साप्ताहीक सभा
सप्टेंबर २०२०

डिस्ट्रिक्ट कनेक्ट

गुरुमंत्र - डिजिटल लिटरसी उपक्रम

रो. उद्धव गोडबोले  

Digital Gurumantra

गुरुमंत्र - आयटी स्किल्स फॉर स्मार्ट टिचिंग हा डिस्ट्रिक्ट ३१३१ आयोजित उपक्रम १० ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत पार पडला. या उपक्रमात प्रामुख्याने शिक्षकांना व इतरांनासुद्धा शिकवताना उपयुक्त ठरणारी पंधरा महत्त्वाची आयटी कौशल्ये व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्यात आली. (उदा. साउंड रेकॉर्डरचा वापर... इत्यादी) यासाठी प्रत्येक क्लबचे दोन व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले होते.


झूम मिटिंगऐवजी व्हिडिओ असल्यामुळे प्रत्येक सहभागीला आपल्या सोयीच्या वेळात रोज तीन व्हिडिओ बघून कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसाच्या व्हिडिओवर आधरित काही प्रश्न दुसर्‍या दिवशी विचारले जात होते आणि तिसर्‍या दिवशी त्यांची उत्तरे पाठवली जात होती... त्यामुळे सहभागींना आपल्याला कौशल्य व्यवस्थित प्राप्त झाले आहे का हे तपासता येणे शक्य झाले.


या अभ्यासक्रमाच्या शेवटी एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. किमान ४०% गुण प्राप्त केलेल्या सहभागींना इ-प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.


आपल्या सर्व सभासदांनी आणि विशेषतः रो. पी. पी. सुधांशू गोरे सर यांनी या उपक्रमाच्या माहितीचा प्रसार केल्यामुळे आपल्या दोन्ही गटांमध्ये मिळून महाराष्ट्रभरातून सुमारे तीनशे ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी उत्साहाने सहभागी झाली. यामध्ये आपल्या सभासदांचा विशेषतः अ‍ॅन्सचा सहभाग लक्षणीय होता. यातल्या बहुसंख्य सहभागींनी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र मिळवले. 

हा उपक्रम अतिशय लाभदायी ठरला असल्याबाबतचे उत्तम अभिप्राय या सहभागींकडून आले आहेत. हे व्हॉट्सअ‍ॅप समूह अजून अस्तित्वात असून यापुढे त्यांच्यासाठी असेच आणखी शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.


या उपक्रमाद्वारे रोटरीबद्दल बर्‍याच मंडळींना महिती मिळू शकली हा एक महत्वाचा पी-आर लाभ झाला. या उपक्रमात आपल्याला मौलिक मार्गदर्शन केल्याबद्दल डिस्ट्रिक्ट टीमच्या रो. पी. पी. शामला जोशी यांचे मनःपूर्वक आभार.        



Rotary 3131 Mobile App

Rtn. Abhijit Deshpande (AB)


Rotary District 3131 has revamped its official Android App and released updates on the Google Play Store. This app has a host of features. 

Some of the major ones are:

Club Rooster, Club Meetings, Club Projects, and Club Celebrations


You can attend club meetings directly via Zoom through this app. There is also a facility to register in advance if you plan to attend a meeting. If you attend the zoom meeting via the app, your attendance will be marked automatically. Once we start physical meetings, you can mark your attendance by simply scanning a QR code via the app. There are also mobile alerts about meetings and specific announcements. You can also read the club bulletin in a PDF using the app.


Apart from club-related information, the app also has a lot of information about the District such as  District Committees, Member Search, District Events, etc.


We strongly recommend that all members download this app on their Android phones. 

To download the app click on the link below: 

https://play.google.com/store/apps/details?id=com.dcpl.rotarydistrict


The iOS version of the app will soon be available. We will let everyone know once it is available. 


डिस्ट्रिक्ट कनेक्ट

आपला क्लब रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१मध्ये येतो.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी यांचा संवाद

या डिस्ट्रिक्टमधील विविध प्रोजेक्ट्स, कार्यक्रम

डिस्ट्रिक्टमधील क्लब्सचे महत्त्वाचे, दखलपात्र असे प्रोजेक्ट्स

तुमचा लेख आवर्जून द्या समन्वयक: योगेंद्र नातू / अभिजित देशपांडे
रोटरी
साप्ताहीक सभा