डिस्ट्रिक्ट कनेक्ट
क्लबकारी
डिस्ट्रिक्ट कनेक्ट
क्लबकारी
सप्टेंबर २०२०

साप्ताहिक सभा

भारत परिक्रमा - एक्सप्लोअर ‘स्वति’

रो. रश्मी परुळकर

वक्ते - प्रीती आणि स्वरूपा दामले

दिनांक - ३ ऑगस्ट २०२०


सौ. प्रीती दामले, पूर्वाश्रमीची सोमण ही माझी नागपूरची अकरावीत असतानाची मैत्रीण. गेली तीस वर्षे आम्ही ही मैत्री जपून ठेवली आहे. ती समवेदना या संस्थेची सीईओ आहे.

साहसी गोष्टी करायची आवड तिला पहिल्यापासूनच आहे. आम्ही मैत्रिणींनी मिळून घरी कळू न देता बरीच साहसे केली आहेत.

नोव्हेंबर २०१९मध्ये तिने तिच्या वीस वर्षांच्या मुलीसमवेत केलेले हे धाडस फार वेगळे आहे. सत्तावीस दिवसांत सतरा राज्यांतून वॅगन आर कार स्वतः चालवत केलेली आठ हजार नऊशे किलोमीटरची परिक्रमा हा एक साहसी अनुभव आहे.

प्रवास करायचा ठरले…

घरच्यांची परवानगी मिळाली आणि मग त्यांच्या तयारीला जोर आला.

मग प्रवासासाठी लागणारी तयारी - कारची, स्वतःची, खाण्यापिण्याची, अडीअडचणीची, पैशाची; रस्त्यांची माहिती आणि महत्वाचं म्हणजे स्वरक्षणाची तयारीसुद्धा दोघींनी केली.

फक्त एक रात्र हॉटेलला राहण्याचा अपवाद वगळता हा संपूर्ण प्रवास त्यांनी कुणा-न-कुणाच्या घरी मुक्काम करून केला. हे सर्व लोक ओळखीतून शोधणे आणि त्या सर्वांनीपण यांना आपल्या घरी सामावून घेणे, यांची व्यवस्था करणे हाही माणुसकीचा एक अनुभवच होता.

प्रवासात त्यांनी एक वेगळा भारत पाहिला, अनुभवला आणि सर्वत्र त्यांचे कौतुकच झाले.

वेशभूषा, खाद्यजत्रा, बोलण्याची-वागण्याची वेगळी पद्धत, निसर्ग, माणसे, जमीन, जैवविविधता अशा गोष्टींचे त्यांचे निरीक्षण, अनुभवकथन आणि त्यांतला खरेपणा हे सारे मनाला भिडणारे होते. मागासलेला भारत म्हणजे भारत किती मागे आहे हे ऐकून मन उदास झाले.

या सर्व प्रवासाने त्या दोघींना स्वतःतल्या ‘स्व’ आणि ‘ती’ची छान ओळख झाली. वेगळं काहीतरी स्वतः करायची कल्पनाही साकार झाली.

या जोडगोळीच्या मनात येणार्‍या वेगवेगळ्या कल्पना पूर्ण होवोत अशी देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना.

त्यांच्या साहसाबद्दलची अजून माहिती पुढील फेसबुक लिंकवर बघू शकता…

https://www.facebook.com/409395016155039/posts/998209423940259/?sfnsn=wiwspwa&extid=TjQk8akLGq3Rooor&d=w&vh=e


कार्यक्रमाचा रेकॉर्डेड व्हिडिओ येथे पाहा...

श्रावणरंग

ॲन अंजली देवधर

दिनांक - १० ऑगस्ट २०२०


सर्व जण दहा तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. महिनाभर आधी या कार्यक्रमाची चाहूल लागली होती. नेहमीप्रमाणे बऱ्याच ॲन्सनी या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे नाव होते 'श्रावण रंग'.

आज श्रावणी सोमवार अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात झाली ॲन राधिका वाघमारे यांच्या शिवस्तुतीने. आवाजात इतका गोडवा की, साक्षात शंकरही मंत्रमुग्ध झाले असतील तिचा आवाज ऐकून! श्रावणसरी जशा बरसत असतात नाऽ तशा आमच्या ॲन्सही आपल्यात असलेल्या कलागुणांची बरसात करत होत्या. फर्स्ट लेडी सुगंधाने कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगितले आणि पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ॲन्सनी हमभी कुछ कम नही याची प्रचिती दिली.

श्रावण महिना हा सणांचा आणि व्रतवैकल्यांचा महिना... आम्ही सर्व जणी या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. सणांच्या निमित्ताने बायका शालू, पैठण्या, दागदागिने घालून आपली हौसमौज पुरवून घेतात.

‘श्रावण आला...’ या गीतावर केलेल्या नृत्याने आमच्या ॲन्स किती हौशी आहेत ते दिसून आले.

यात भाग घेणाऱ्या हौशी ॲन्स होत्या फर्स्ट लेडी सुगंधा नातू, रो. मृदुला घोडके, ॲन अस्मिता आपटे, ॲन अंजली पाषाणकर, ॲन नंदिनी अत्रे, ॲन स्नेहा ओगले, ॲन राधिका वाघमारे, ॲन स्वाती वेलणकर, ॲन विनिता कुलकर्णी आणि ॲन मोहिनी नातू.

सर्व ॲन्स सुंदर दिसत होत्या.

श्रावण महिन्यातील सण आणि व्रतवैकल्ये यांवर कविता लिहिली ॲन अंजली देवधर यांनी आणि ती गायली त्यांची सून प्रज्ञा हिने. प्रज्ञानेही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि मधुर आवाजात कविता गायलीही!

श्रावण महिना म्हटला की कोकिळाला कंठ फुटतोच... मग आमच्या ॲन्सही त्याला अपवाद कशा ठरतील? आपल्या सुमधुर आवाजात ॲन चित्रदा प्रभुमिराशी यांनी कोकिळाला साद घातली.

निसर्गाऽ पाऊस आणि करोना यांची एकमेकांशी सकारात्मक सांगड घालून हे विश्वसंकट जाऊन सर्वांना उत्तम निरामय आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना देवीजवळ केली ॲन चारूशीला पटवर्धन यांनी.

करोनाने आपल्या सर्वांना घरात बसवले असले तरी मनुष्यप्राणी हार मानणारा नाही. काहीही झाले तरी आपले कार्य तो नेटानं पुढे नेतच असतो. आजची तरुण पिढीसुद्धा त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या पद्धतीनी जपायचा प्रयत्न करते आहे! यावर छोटी नाटिका सादर केली ॲन गौरी क्षीरसागर आणि ॲन प्रियदर्शनी अंबिके यांनी.

हसरा, नाचरा, जरासा लाजरा या गाण्यावर स्वतः गाऊन आणि नृत्याचे सादरीकरण करून गाण्याची लज्जत वाढवणाऱ्या होत्या ॲन विजया गुजराती.

या श्रावण महिन्यात उत्साही वातावरणात कवी, लेखक यांनाही लेखनाचा सूर गवसलेला असतो. कृष्णमेघ कुंटेलिखित 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकातील ऋतुचक्र यातील काही भागांचे वाचन ॲन विशाखा वेलणकर यांनी केले आणि बघता-बघता आपल्या नजरेसमोर ते वातावरण उभे केले. खरंच! ही एक मोठी कला आहे. आम्ही सर्वांनी बाहेर न जाता या रानफेरीचा अनुभव घेतला.

ॲन कांचन बदामीकर आणि अवनी यांनी या गरजत बरसत येणाऱ्या पावसाला आव्हान देत, आपल्या पदलालित्याने 'गरजत बरसत सावन आयो रे' या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले. ॲन माधवी देशपांडे आणि मुक्ता या मायलेकींनी श्रावणाबद्दलचे त्यांचे विचार मोठ्या खुबीने कवितेतून मांडले. ॲन संगीता देशपांडेंनी स्वतः गाऊन आणि स्वरचित नृत्य सादर करून कार्यक्रमाला बहार आणली. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्ये आणि सणवार. नववधूंना आणि बायकांना एक पर्वणीच नाही का? उखाण्यांचा एक गंमतशीर कार्यक्रम केला ॲन ऋचा नांदुरकर हिने.

ॲन श्वेता करंदीकर हिने मेडले गाण्याचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची रंगत तर वाढवलीच आणि अपर्णा कुलकर्णी हिने मेडले नृत्य सादर केले.

अशा तऱ्हेने ॲन्सच्या कलागुणांनी नटलेल्या आणि सर्वांच्या मनात ठसलेल्या 'श्रावण रंगा'ची समाप्ती झाली ती पुढल्या वर्षी परत बरसण्याकरता! रो. मृदुला घोडके यांचे ओघवते सूत्रसंचालन, प्रो. कमिटीचे चेअरमन रो. मंदार पूर्णपात्रे, ॲन नंदिनी अत्रे, रो. अभिजित देशपांडे, रो. आनंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या कष्टांमुळे आणि सर्व ॲन्सनी आणि खासकरून नवीन ॲन्सनीही कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच हा कार्यक्रम देखणा होऊ शकला अशी पावती फर्स्ट लेडी सुगंधा आणि प्रे. रो. सुदर्शन नातू यांनी दिली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


कार्यक्रमाचा रेकॉर्डेड व्हिडिओ येथे पाहा...

A story of research from Brain to Bedside

रो. मृदुला घोडके

वक्ते - श्रीनिवास पटवर्धन

दिनांक - १७ ऑगस्ट २०२०


सोमवारी, १७ ऑगस्टच्या साप्ताहिक बैठकीसाठी प्रेसिडेंट सुदर्शन यांनी टाकलेली पोस्ट वरवरच पाहिली... पण याच सभेसाठी आयपीपी सोनल पटवर्धन यांचाही मेसेज आला... तेव्हा वाटलं... काय आहे विषय...

'A story of research from Brain to Bedside'... विद्युत अभियांत्रिकीपासून जैव-अभियांत्रिकी ते मज्जातंतूशास्त्र असा प्रवास... कुतूहल वाटलं... म्हणून या सभेला आवर्जून उपस्थित राहिले.

सोनल पटवर्धन यांनी प्रास्ताविक केलं आणि माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर अतिशय देखणा, तेजस्वी असा तरुण चेहऱ्यावर प्रसन्न हास्य घेऊन उपस्थित झाला. ते म्हणतात ना... 'मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं.' अगदी तसंच झालं.

आयपीपी सोनल आणि महेश पटवर्धन यांचा सुपुत्र श्रीनिवास पटवर्धननं जैव-अभियांत्रिकी क्षेत्रातल्या आपल्या पीएच. डी.च्या कामाबद्दल माहिती दिली. विज्ञान, अभियांत्रिकी, गणित असे शब्द पुसटसे जरी कानांवर पडले तर जिथे असेल तिथून पोबारा करणारी मी श्रीनिवासचं बोलणं सुरू झाल्यावर तिथून दीड तास हालले नाही. शरीराचा विशिष्ट भाग किंवा अवयव गमावलेल्या लोकांकरताचं कृत्रिम अवयवनिर्मितीच्या क्षेत्रातलं श्रीनिवासचं संशोधन आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा आपल्या मेंदूशी असलेला संबंध, मेंदूमध्ये असलेलं संवेदना संजाल, मेंदूतून होत असलेलं अवयवनियंत्रण असली क्लिष्ट माहिती श्रीनिवासनं अगदी सोपी, मराठमोळी, आपली वाटणारी-पटणारी अशी उदाहरणं देऊन सहजपणे सांगितली. आपल्या कामाचा अनुभव, झपाटा, त्यातलं संशोधन आणि तंत्रशास्त्रीय प्रगती यांचा परिचय श्रीनिवासनं सर्वांना करून दिला. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या संशोधनाद्वारे मानवी जीवन सुधारण्याची त्याची जबरदस्त इच्छाशक्ती! त्यासाठी लागणारी संवेदनक्षमता श्रीनिवासच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होती. नियतीच्या लहरीमुळे आपले अवयव गमावलेले, निराश झालेले लोक आपल्या जीवनात अशा कृत्रिम अवयवांचा वापर सहजतेनं करू शकण्याकरता ते परवडणाऱ्या किमतीला उपलब्ध होऊन सामान्य माणसाच्या आवाक्यात यावेत यासाठी श्रीनिवास प्रयत्नशील आहे.

त्याच्या या प्रयत्नांना, संशोधनाला आमच्या अनेक शुभेच्छा!

काका सावंत - श्रद्धांजली

दिनांक - २४ ऑगस्ट २०२० 

आपल्या सर्वांचे प्रिय पी. पी. काका सावंत यांचे याच दिवशी आकस्मिक निधन झाले. काकांना श्रद्धांजली वाहून ही मिटिंग संपली. या दिवशीचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.

संगीत, गप्पा आणि बरंच काही…

Rtn. Sharad Dole, President, RCP Shivajinagar

Program Presenter (Host) - Gargi Purnapatre

In conversation with - Rucha Bondre and Tanmay Pawar

Date - 29 August 2020


RCP Shivajinagar (our club) had a joint meeting with RCP South and RCP Lakshmi Road. The program was ‘संगीत, गप्पा आणि बरंच काही…’ It was a novel concept to understand the passion of two highly qualified professionals Rucha Bondre and Tanmay Pawar (Engineer / MBA), towards music. Their passion resulted in a successful career in the field of music. Rucha’s training as a trained classical singer compliments Tanmay’s passion.

The musical journey of Tanmay and Rucha was nicely unraveled by equally qualified professional Gargi Purnapatre. She is a school and a college-mate of Rucha and is currently based in Germany. Gargi’s style of conversation put Rucha and Tanmay at ease in front of seniors.

Rucha works at Atlas Copco, Pune, and balances her profession and passion. Tanmay left a highly sought after career in a company like Tata Motors for pursuing his passion for music. Tanmay is a guitarist and is part of "आविष्कार" band. Gargi Purnapatre is a trained classical dancer and is the daughter of Rtn. Mandar Purnapatre. Conversation with Rucha and Tanmay was complemented by light classical music recitals by Rucha and guitar performance by Tanmay. Gargi also requested Rucha and Tanmay to share the story of their marriage. She also asked them to share their experiences about challenges faced by them while balancing their individual musical interests and sensitivities.

At the end of the program, a musical video of ‘सुनरी सखी’ was played. The music compositions and lyrics were done by Tanmay and Rucha.

Those who could not attend the meeting can view this music video on YouTube at https://youtu.be/V_A0co3C5Ds

It was a treat to watch professionally produced and directed musical video ’सुनरी सखी’. RCPS wishes Gargi, Rucha, and Tanmay success in pursuing their respective passions in classical dance and music.


कार्यक्रमाचा रेकॉर्डेड व्हिडिओ येथे पाहा...

https://www.facebook.com/watch/live/?extid=PJvDx4undcSFaU5N&v=390112421970329&ref=watch_permalink


साप्ताहिक सभा

क्लबच्या साप्ताहिक सभांचा सभेनुसार गोषवारा

तुमचा लेख आवर्जून द्या समन्वयक : एके / यामिनी पोंक्षे
डिस्ट्रिक्ट कनेक्ट
क्लबकारी