Southern Star-April 2022






District Governor Rtn. Pankaj Shah visited our club on 7th March 2022. He interacted with the Board of Directors, Satellite Chairs, Rotaractors, Members and Anns. He was accompanied by District First Lady Ann Priya Shah. AG Rtn. Dhanashree Jog and AGA Rtn. Mukesh Soni were present during the visit.

Read a detailed report of the meeting here:

आपल्या क्‍लबचा सिग्नेचर प्रोजेक्ट सोया मिल्क याच्या बद्दलचा वृत्तान्त हा रोटरी न्यूज मध्ये छापून आला आहे.

पीडीजी रो. अरुणजी यांचा पुढाकार, पाल साहेब यांनी दिलेली सी.एस.आर., पी.पी. रो. गोरे सरांनी घेतलेले परिश्रम व पी.एन. रो. रविंद्रजी प्रभुणे यांनी केलेली मदत तसेच ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्य यामुळे आत्तापर्यंत १३ वर्कशॉप झालेली आहेत.

या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

District 3131 organised a program “Baghban” on 27th February 2022 to felicitate members who have served Rotary for 25+ years

Following members from our club were felicitated on this occasion:

P.P. Rtn. Abhijit Sharadchandra Joag

Rtn. Anil Gogte

P.P. Rtn. Anil Shridhar Supnekar

Rtn. Arun Joshi

PDG Rtn. Arun Laxman Kudale

Rtn. Dattatraya Dinkar Deodhar

P.P. Rtn. Govind Yeshwant Patwardhan

Rtn. Jagadish Rajaram Shah

Rtn. Purshottam S Sahasrabudhe

Rtn. Dr. Ramchandra Vishnu Paranjape

Rtn. Ramesh S. Prabhumirashi

P.P. Rtn. Sham Sadashiv Kulkarni

Rtn. Dr. Subhash Ramchandra Deshpande

P.P. Rtn. Dr. Sudhir Keshav Kale

P.P. Rtn. Sudhir Pandurang Waghmare S

P.P. Rtn. Sudarshan V. Natu

P.P. Rtn. Vinayak K. Deshpande

P.P. Rtn. Virendra A. Shah

दिनांक १५ मार्च रोजी आंतर रोटरी नाट्यवाचन स्पर्धेमध्ये आपल्या क्लब तर्फे योगेश सोमण लिखित "आगंतुक" हे नाटक सादर करण्यात आले.

रश्मी देव यांनी दिग्दर्शन केले व आपल्या क्लब मधील ॲन यामिनी पोंक्षे, रो. श्वेता करंदीकर, रो. अभिजित देशपांडे, रो. योगेश नांदुरकर यांनी नाट्यवाचन केले.

त्यात आपल्या रो. योगेश नांदुरकर याला वैयक्तिक - पुरुष गटात उत्तेजनार्थ पारितोषक मिळाले.

Our Club has been nominated for  'District Water Award 2022'. This nomination is based on the projects completed by the club in the last 10 years in this field. This honour is due to the relentless efforts of all the Presidents, BoD and members of the club over the years.

A hearty congratulations to all of us.

Our Club has been awarded a special appreciation certificate by the District for achieving a significant 25% membership of lady Rotarians in our club.

The certificate was received on behalf of the club by Rtn. Madhuri Kirpekar.

नमस्कार,

आपल्या या महिन्यातील पूर्णांगिनीचे नाव आहे रो. मनीषा बेळगावकर.

एक स्वतंत्र विचारांची, बिनधास्त, labor law practitioner आणि dashing व्यक्तिमत्व असलेली आणि त्याबरोबर च सुंदर नाजूक आणि चविष्ट असे उकडीचे मोदक संकष्टीला आवर्जून करणारी मनीषा ही चित्रकलेची आवड तसेच पाककलेची आवड कशी जोपासते, हे तिच्या कडूनच आपण जाणून घेणार आहोत.

Read More...

PAUL HARRIS FELLOWS

Undoubtedly the most important step to promote voluntary giving to The Rotary Foundation occurred in 1957, when the idea of Paul Harris Fellow recognition was first proposed. Although the concept of making $1,000 gifts to the Foundation was slow in developing, by the early 1970s the program began to gain popularity. The distinctive Paul Harris Fellow medallion, lapel pin and attractive certificate have become highly respected symbols of a substantial financial commitment to The Rotary Foundation by Rotarians and friends around the world. The companion to the Paul Harris Fellow is the Paul Harris Sustaining Member, which is the recognition presented to an individual who has given, or in whose honor a gift is made, a contribution of $100, with the stated intention of making additional contributions until $1,000 is reached. At that time the Paul Harris Sustaining Member becomes a Paul Harris Fellow. By early 1992, more than 350,000 Paul Harris Fellows and 150,000 Sustaining Members have been added to the rolls of The Rotary Foundation. A special recognition pin is given to Paul Harris Fellows who make additional gifts of $1,000 to the Foundation. The distinctive gold pin includes a blue stone to represent each $1,000 contribution up to a total of $5,000 in additional gifts. Paul Harris recognition provides a very important incentive for the continuing support needed to underwrite the many programs of The Rotary Foundation which build goodwill and understanding in the world.

धनंजय जोशी लिखित."सहज" या पुस्तकातील  एक लेख....लेखाचे शीर्षक आहे "थँक यू..थँक यू.."

 


Read More...

भारतीय महाकाव्ये रामायण व महाभारत केव्हा रचली गेली हे ठरविणे महाकठीण आहे.आर्य भारतात येऊन स्थिर होण्याच्या काळातील घटनांचे वर्णन ह्या दोन महाकाव्यात आहे.खगोलशास्त्रानुसार रामायण सात हजार वर्षांपूर्वी घडले असावे व महाभारत पाच हजार वर्षांपूर्वी घडले असणार. त्यावेळेस संस्कृत भाषेला लिपी नसल्याने ते मौखिक पद्धतीने प्रसारीत केले जात असावे.नंतर संस्कृत भाषेला लिपी प्राप्त झाल्यावर ,ऋग्वेदानंतर साधारणपणे  तीन हजार वर्षांपूर्वी,ही महाकाव्ये लिहीली गेली असावीत. ती अनेक लेखकांकडून लिहिली गेली व मूळ ग्रंथात भर टाकण्यात आली.रामायण अनुक्रमणिकेत लिहीले आहे.परन्तु एकतर महाभारत खूप मोठा ग्रंथ आहे व त्यांमध्ये गोष्टींची सरमिसळ केली आहे.ह्या महाकाव्यांचे कौतुक इतर संस्कृतींकडून सुद्धा होत असते.

Read More...

ब्रॅण्डिंग व मार्केटिंग मधील "प्रतिसाद" या प्रतिथयश कंपनीचे संस्थापक, अनेक यशस्वी चित्रपटाची "प्रतिसाद फिल्म्स" या कंपनी द्वारे निर्मिती करणारे, "अ-सत्यमेव जयते" या आपल्या पुस्तकाद्वारे भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाची कहाणी सांगणारे. भारताची प्राचीन वैभवशाली संस्कृती व दैदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकणारे आणि सत्याचा अभ्यासपूर्ण, संदर्भासहित शोध घेणारे पुणे साऊथ क्लबच्या गोल्डन वर्षातील प्रेसिडेंट असलेले पी.पी. रो. अभिजित जोग. त्यांच्याशी बातचीत करीत आहेत पी.पी. रो. गोविंदराव पटवर्धन.

यशोदा वाकणकर, ही डॉ अनिल व अनिता अवचट यांची धाकटी मुलगी. स्वतःला असलेल्या एपिलेप्सीच्या व्याधीतून प्रेरणा घेऊन यशोदाने २००४ मध्ये पुण्यात संवेदना फाऊंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. त्यासाठी तिने क्लिनिकल सायकॅालॅाजी मधे एम ए केले. गेली अठरा वर्ष अविरत कार्यरत असलेली संवेदना फाऊंडेशन ही संस्था एपिलेप्सी विवाह मंडळ, गरिबांसाठी एपिलेप्सी औषध मदत योजना, एपिलेप्सी जनजागृती असे अनेक एपिलेप्सीशी निगडित असलेल्या अनेक पैलूंवर अविरत काम करत आहे. आज हे काम नुसते महाराष्ट्रातच नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

मनीषा ज्ञानेश्वर शिंदे .. २०१६ पासून पुण्यात रिक्षा चालवतात.

ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची माहिती देण्याचा कार्यक्रम

३ मार्च २०२२

महागणेश अधिष्ठान यांचे विद्यमाने व रोटरी क्लब पुणे दक्षिण यांचे सहकार्याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवा निमित्ताने वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक  ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची माहिती देण्याचा कार्यक्रम आज वेल्हा पट्ट्यातील ४ शाळांमधे झाला व अजून २ शाळांमध्ये होणार आहे. कामाकरता पुढाकार आपल्याकडून रोटेरियन नितीन पाठक यांनी घेतला. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

ताराचंद रामनाथ इस्पितळ येथे रेफ्रिजरेटर डोनेशन

३ मार्च २०२२

दि. ३ मार्च रोजी आपण ताराचंद रामनाथ इस्पितळ येथे ४ रेफ्रिजरेटर करीत र. ४८,००० दिले.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमातील शस्त्रक्रियांची शताब्दी

३ मार्च २०२२

 

आपल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमातील शस्त्रक्रियांची शताब्दी ३ मार्च रोजी १०१ वी शस्त्रक्रिया पूर्ण करून आपण पार केली. रो. दत्त पाषाणकर व पब्लिक इमेज कमिटीचे विशेष कौतुक.

आता आनंदाची पाळी

१-८ मार्च २०२२

 

१ मार्च ते ८ मार्च या काळात महिलादिनानिमित्त मेन्स्ट्रुअल कप अवेअरनेससाठी हा प्रोजेक्ट आपण राबवला.

या प्रकल्पात आपण मुलींना आणि महिलांना मेन्स्ट्रुअल कपच्या वापराविषयी माहिती देण्यासाठी कॅम्प्स आयोजित केले.

२ तारखेला बुधवारी सेंट मायकेल गर्ल्स होस्टेलमधल्या मुलींसाठी एक कॅम्प रो. माधुरी किरपेकर आणि रो. मृदुला घोडके यांनी घेतला. होस्टेलमधल्या ४० मुली यात सहभागी झाल्या. डॉ. गीतांजली पुरोहित, डॉ. विजया गुजराथी, रो. तृप्ती कुलकर्णी आणि रो. उल्का पासलकर यांनी उपस्थिती लावली.

३ तारखेला रो. उल्का पासलकरनी दुपारी साडेचार वाजता 'शिक्षण विवेक' मासिकासाठी काम करणाऱ्या मुलींसाठी एक कॅम्प घेतला. ५ महिला यात सहभागी झाल्या.

४ तारखेला दुपारी ४ वाजता धनकवडीतल्या पुरोहित हॉस्पिटलमध्ये ॲन डॉ. गीतांजली पुरोहित यांनी कॅम्प घेतला. गीतांजली यांनी उत्तम नियोजन केलं होतं. उपस्थित २५ महिलांमध्ये लकी ड्रॉ काढून एका महिलेला त्यांनी कप बक्षीस दिला. फर्स्ट लेडी नंदिनी अत्रे, डॉ. विजया गुजराथी, ॲन ऋचा नांदुरकर, ॲन यामिनी पोंक्षे, ॲन सुनीता प्रभुणे, ॲन नेहा वाळिंबे आणि रो. उल्का पासलकर यांनी उपस्थिती लावली.

४ तारखेला रात्री ९ वाजता रो. प्रचिती तलाठी यांनी ऑनलाईन कॅम्प घेतला. यामध्ये बीडमधून आरोग्यसेविका मनकर्णा क्षीरसागर; खेड, रत्नागिरीमधून प्राध्यापिका अनघा तोडकर; भुसावळ इथून स्त्री-आरोग्यतज्ज्ञ डॉ. वृषाली चौधरी आणि रोटरी क्लब रोहा इथून रो. अलेफिया अब्बास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या महिला सहभागी झाल्या.

५ तारखेला संध्याकाळी ६ वाजता ॲन अपर्णा कुलकर्णी आणि ॲन माधवी देशपांडे यांनी बावधन इथे कॅम्प घेतला. यामध्ये ९ महिला सहभागी झाल्या.

५ तारखेला रात्री ९ वाजता रो. उल्का पासलकरनी ऑनलाईन कॅम्प घेतला. यामध्ये १३ शिक्षिका आणि २४ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. क्लबच्या ए.जी. रो. धनश्री जोग यांनीही या कॅम्पला हजेरी लावली.

६ तारखेला दुपारी १.३० वाजता रो. उल्का पासलकरनी महिला मंडळ, पर्वती इथे कॅम्प घेतला. यामध्ये १० महिला सहभागी झाल्या.

६ तारखेला दुपारी ३.१५ वाजता रो. उल्का पासलकरनी सेंट मायकेल गर्ल्स होस्टेलमधल्या मुलींच्या स्त्री-पालकांसाठी कॅम्प घेतला. यामध्ये ७० जणी सहभागी झाल्या.

७ तारखेला ॲन डॉ. गीतांजली पुरोहित यांनी महादजी शिंदे हायस्कूल, फातिमा नगर इथे कॅम्प घेऊन जवळपास १०० मुलींशी संवाद साधला.

७ तारखेला दुपारी १२.३० वाजता रो. उल्का पासलकरनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षिकांसाठी कॅम्प घेतला. यामध्ये ५ शिक्षिका सहभागी झाल्या.

७ तारखेला दुपारी ३.०० वाजता मॉडर्न कॉलेज, पाषाण रोड इथे ॲन स्नेहा ओगले यांनी महिला स्टाफसाठी कॅम्प घेतला. यामध्ये १२ शिक्षिका सहभागी झाल्या. रो. उल्का पासलकरनी त्यांच्याशी संवाद साधला.

८ तारखेला दुपारी ४.३० वाजता  महिलादिनानिमित्त अमानोरा पार्क इथल्या स्वच्छता कामगार महिलांसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या सेक्रेटरी रो. रूपाली बजाज यांनी कॅम्प आयोजित केला.

रो. उल्का पासलकरनी या महिलांशी संवाद साधला. यामध्ये ४५ महिला सहभागी झाल्या. कात्रज क्लबच्या ॲन नमिता आणि ॲन मुग्धा या वेळी हजर होत्या.

१४ मार्चला बालाजी नगर , धनकवडी येथे प्रेरणा महिला मंडळ आणि लोकमत सखी मंच बालाजी नगर यांच्या सहकार्याने आणि पुरोहित हॉस्पिटल मधील सिस्टर संध्या घुले हिच्या पुढाकाराने "आता आनंदाची पाळी " हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. ५० ते ६० महिला आणि मुली यावेळी उपस्थित होत्या. लकी ड्रॉ  मध्ये दोन महिलांना menstrual cup भेट दिला. शिवाय १० महिला व मुलींनी लगेच menstrual cup विकत घेतले.

आरोग्य आणि पर्यावरण या दोन गोष्टींचा विचार करता पाळीच्या काळात हा कप वापरणं सोयीचं, कमी खर्चाचं आणि आवश्यक आहे. केवळ माहिती नसल्यामुळे मुली आणि महिला या कपचा वापर करत नाहीत. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांचं आरोग्य तर चांगलं राहीलच... पर्यावरणाचं संरक्षण होऊन समाजाचंही आरोग्य अबाधित राहील.

ही मूळ संकल्पना रो. उल्का पासलकरने मांडली आणि पुढाकार घेऊन सर्व लेडी रोटेरिअन्स आणि ॲन्स यांच्या पर्यंत पोचवली.

या प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार...! 🌿

सोया उत्पादन विक्री केंद्र

८ मार्च २०२२

 

दिनांक ८ मार्च रोजी आपण करंजवणे येथे *सोया उत्पादने विक्रीसाठी* ज्ञान प्रबोधिनीच्या आवारात त्यांना एक स्टाॅल हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम केला.

कार्यक्रमाला आपल्याकडून रोटेरियन गोरे सर रोटेरियन दत्ताजी देवधर व पीई

संजीव ओगले,  रोटेरियन भाऊ सहस्त्रबुद्धे , रोटेरियन विलास आपटे उपस्थित होते.

RYLA

८ मार्च २०२२

 

दिनांक ८ मार्च रोजी आपण *"RYLA"* हा प्रोजेक्ट "सरस्वती मंदिर शाळा,आंबवणे येथे घेतला.९वी आणि ११वी च्या १००मुला मुलींसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

"चेअर पर्सन ॲन विनिता कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रेसिडेंट रोटेरियन अतुल अत्रे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व कार्यक्रम सुरू झाला.

सर्वप्रथम रोटेरियन आनंद कुलकर्णी यांनी गोष्टींमधून मुलांशी संवाद साधत यशाच्या पासवर्ड संबंधी माहिती सांगितली.

नंतर पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सुदर्शन नातू यांनी कॉम्प्युटर शिक्षणाचे महत्त्व तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी आपण आपला मोबाईल कसा वापरू शकतो याची माहिती दिली. तर प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन संजीव ओगले यांनी करिअरची वेगळी वाट या अंतर्गत मर्चंट नेव्ही मधील करिअर बद्दल माहिती दिली.

 यानंतर पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सुधांशू गोरे यांनी करियर गायडन्स विषयी मुलांशी संवाद साधला.

कार्यक्रमाची सांगता युथ डायरेक्टर रोटेरियन हेमंत वाळिंबे यांनी मुलांची प्रश्न-उत्तरांची स्पर्धा घेऊन केली व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

रोटेरिन  पास्ट प्रेसिडेंट श्याम कुलकर्णी व ॲन विनिता यांनी मुलांना खाऊचे वाटप केले व व नंतर सर्वांच्या भोजनाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला रोटेरियन विलास आपटे,रो भाऊ सहस्रबुद्धे,रो अरविंद शिराळकर,रो दत्ता देवधर  ॲन अंजलीताई ,ॲन स्वाती पाठक,ॲन नेहा वाळिंबे ,फर्स्ट लेडी नंदिनी अत्रे उपस्थित होते.

 *या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल व फेलोशिप बद्दल विनिता कुलकर्णी व पीपी रोटेरियन श्याम कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद !*

दिनांक २८/०२/२०२२  रोजी आपली साप्ताहिक सभा नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी म्हणजे गुप्ते मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर च्या प्रेसिडेंट, रोटरीयन डॉ. शोभा राव यांचे ‘आरोग्यदायी आहार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Read More...

आपल्या क्लबला नुकतीच म्हणजे सात मार्चला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन पंकज शहा आणि  डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी प्रिया शहा यांनी भेट दिली. प्रत्येक रोटरी वर्षात डिजी व्हिजीट हा एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट असतो आणि क्लब उत्साहाने वाट बघत असतो.  क्लबने ह्या रोटरी वर्षात कुठले प्रकल्प राबविले आहेत व डिस्ट्रिक्ट मध्ये काय काय कामे केली आहेत व पुढे कुठली कामे होणार आहेत याची माहिती आपण डीजींना देतो व त्यांचे कडून यथोचित मार्गदर्शन व कौतुकाची थाप मिळाली की केलेल्या श्रमाचे समाधान सर्व क्लब मेम्बर्सना मिळते.

Read More...

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या १४ मार्च २०२२ च्या साप्ताहिक सभेत "महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षा व खबरदारी" या विषयावर संवाद साधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव यांना आमंत्रण दिले होते. ॲन शुभदा अवधानी हिने पाहुण्यांची ओळख करून दिली.

Read More...

२१ मार्च २०२२ रोजी झालेल्या साप्ताहिक सभेची सुरुवात प्रेसिडेंट इलेक्ट रो. संजीव ओगले यांनी केली.  "माझी कन्या स्वयंसिद्धा" या अंतर्गत आपल्याच क्लबच्या ॲनेट्स ज्यांनी अनेक त्यांनी करिअरमध्ये वेगळेच मार्ग चोखाळले आहेत अशा चौघीजणी, सायली गुजराती, अनुगंधा बडवे, प्रिया पाषाणकर व ऐश्वर्या वाघमारे यांच्याशी रो. माधुरी किरपेकर यांनी हसत-खेळत मुलाखतीद्वारे संवाद साधला.

Read More...

दिनांक २८ मार्च २०२२ ची सभा ही "गोल्डन एरा विथ चंद्रशेखर" या संगीतमय कार्यक्रमाची होती.
सर्वप्रथम प्रेसिडेंशिअल अनाउन्समेंट झाल्या.  पी.पी.रो. अभिजित जोग यांच्या प्रतिसाद फिल्म्स तर्फे निर्मित "धुरळा" या चित्रपटाला नुकत्याच पार पडलेल्या "मटा अवॉर्ड्स" मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. मीटिंगच्या सुरुवातीला प्रेसिडेंट यांनी पी.पी.रो. अभिजित जोग व ॲन नंदिनी जोग यांचा याबद्दल सत्कार केला.
आपल्या क्लबतर्फे काश्मिर मधील शाळांना पी.पी.रो. डॉ. सुधांशु गोरे यांच्या पुढाकाराने इ-लर्निंग सॉफ्टवेअर देण्यात येणार आहे. त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. या सॉफ्टवेअर मध्ये उर्दू मधील भाषांतर करणारी गुलशन या सभेला उपस्थित होती. तिचा या सभेत क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.

या नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळात जाऊन काही अविस्मरणीय गीते ऐकण्याची संधी या कार्यक्रमाने आपल्या मेंबर्सना दिली. चंद्रशेखर महामुनी यांची ओळख रो. आनंद कुलकर्णी यांनी करून दिली. रफी, तलत, किशोर अशा गायकांची एकाहून एक सुंदर गाणी त्यांनी श्रोत्यांना ऐकवली आणि त्याचबरोबर त्यांनी चित्रपट सृष्टीचे त्या काळातील मनोरंजक किस्से पण ऐकवले. अतिशय श्रवणीय असा हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सुद्धा उत्तम होती. कार्यक्रमाच्या शेवटी रो. संदीप अवधानी यांनी सर्वांचे आभार मानले.