Southern Star -July21







• Shekhar Mehta is only the 4th Indian in 115 years to be nominated as the President of Rotary International for the year 2021-22.
• Shekhar Mehta was born in 1959 in Kolkata India. A keen academician, he graduated from St. Xavier’s College, and has the unique combination of Masters in Commerce, a qualified Chartered Accountant, Cost Accountant and Company Secretary.
• He heads the Skyline Group engaged in Real Estate Development in different parts of India, including the largest group housing in the state of Rajasthan.
• He is member of many professional, cultural and charitable organizations.

• He is a serving trustee of
(i) Shelter Box (UK)
(ii) Operation Eyesight India, a Canada based organization.
• Shekhar Mehta joined Rotary in 1985 and has been Chairman of
(i) Strategic Planning Committee of Rotary International,
(ii) Rotary India Literacy Mission.
(iii) Rotary Foundation India.
(iv) Rotary India Centennial Celebrations.
(v) Rotary India Humanity Foundation
• He served as District Governor in 1999-2000 and was elevated to the Board of Directors of Rotary International for 2011-2013.
• While serving as Rotary International Director, he helped Rotary add 2 countries to its fold – Bhutan & Maldives.

• Keenly dedicated to service, Shekhar Mehta has led many major service initiatives in India. Some significant initiatives are:
(i) Constructing 500 homes for Tsunami survivors at Andaman & Nicobar Islands.
(ii) Starting the Shelter Kit program in India which has served about 20 disasters distributing more than 15,000 Shelter Kits helping about 75,000 disaster victims.
(iii) He started the Healing Little Hearts program – through this he has got done more than 2500 heart surgeries for children from across India, Pakistan, Bangladesh, Nepal & African Countries. He also facilitated for the program to now become a National Program.
(iv) Conceptualizing nationwide T-E-A-C-H a literacy program in India having reached out to more than 50,000 Schools and 15 million children. T-E-A-C-H is a holistic program on literacy. Rotary is working on the T-E-A-C-H Program with the Central Government and many State Governments.
(v) He has been Instrumental in setting up 15 Eye Hospitals across India serving nearly 50,000 eye operations each year.
(vi) He started a scholarship program called UDAAN for marginalized children over last 10 years. 1000 scholarships have been given.
(vii) Responding to the Prime Minister Narendra Modi’s national call – He has helped set up 6000 rural toilets benefitting 30,000 people.

• Shekhar Mehta is a motivational speaker. He has spoken at hundreds of events nationally and internationally.
• His motivation skills are par excellence which has helped raise millions of dollars for The Rotary Foundation.
• Shekhar.Mehta is recipient of the highest awards of Rotary International & The Rotary Foundation,
(i) “Service Above Self Award”
(ii) “The Meritorious Service Award”
(iii) “Distinguished Service Award” .
• He will serve as the world leader of 1.2 million Rotarians in 200 countries and geographical areas in the year 2021-2022.
• Texas is very close his heart as the annual convention of Rotary International in the year 2022 when he would be serving as Rotary International President is scheduled to be held at Houston.

• Shekhar Mehta is married to Rashi Mehta. She is a social worker and is a stage artist having performed in socially relevant plays across India.

His guiding mantra in life is “Service is the rent that we pay for the space we occupy on this earth”

Dear fellow Rotarians:
We have been through trying times together. We have helped the world cope with uncertainty and adapt to rapid change. Now is the time for us to dream big.
It is time for us to take on major challenges, to do more and grow more, and most of all, for us to care for and share with others.
This year, we note all the ways that we Serve to Change Lives. Service is the rent we pay for our time on earth and we will expand Rotary service as we “grow more and do more.” We will grow through “Each One, Bring One.” If every Rotary member could bring just one more person to Rotary, there is no limit to how much we can grow. We will do more by putting a special emphasis on empowering girls, so young women can have improved opportunities worldwide. We will also feature Rotary Days of Service, so that all members share in our good works around the globe and look for new ways to serve beyond their backyards.
It is our attitude that defines service. We all have a great opportunity to lead by example and to inspire each other to participate in projects that have a measured and sustained impact.
The District Board has assumed important responsibilities and I thank them for this hard work. They have made a commitment to help grow Rotary, adapt to the digital future and make Rotary more appealing to younger generations.
Your good work will help us serve our communities and help Rotary thrive so we can Serve to Change Lives.

Kindest regards,

Shekhar Mehta

Rotary International President, 2021-22

• In Rotary International District 3131,
• Who has earned the title as a Large-Hearted Rotarian?
• Who is Friend, philosopher, and guide?
• Who is the key member of a team which achieved Guinness World Record of maximum online pledges for Organ Donation?
• He is the Chartered Member of Rotary Club of Pune Sarasbaug- Rtn. Pankaj Shah He started his journey started in 2009 and in these glorious 10 years Rtn. Pankaj Shah has built his Rotary career by himself.
• He naturally forms a close bond with all within an eye blink.
• He has many awards to his credit such as
• Best President for the year 13-14
• Club Builder Award by RI President Ron Burton
• Citation for Meritorious Service Award for exemplary service in Rotary Foundation Best Director for the year 17-18
• Rtn. Pankaj Shah has performed at various District Levels as the
• Assistant Governor RY 14-15
• Director-Conference Promotion with the Record registrations of 2500+ In RY 14-15 Chairman- Club Extension (1100+ Net Growth) in the RY 14-15
• Director-Rotary Foundation with Historic collection of 6.20 lacs+ USD to APF in RY 17-18 During which 100% Clubs of RID 3131 Paid to Rotary Foundation Which is a Unique Record.
• Director Community Service Projects 18-19 and Co-director-CSR
• With this immense support of all Rotarians, he has been chosen as the District Governor for the year 2021-22, RID3131.
• He was featured in the special Coffee-Table Book released during Jaipur Institute as one of the most successful businessmen.
• He is the Director & Partner in 9 companies situated at Shirwal, Chakan and Nimrani-Indore.

• He has now strategically ventured into a booming healthcare industry with a complete healthcare solution Cresco Healthcare, which has received a path breaking response since the beginning.
• Let’s have a sneak peek in his personal life…
• Being in a closely-knit joint family, He is backed by his wife Rtn. Priya Shah. Both of them are Major Donors of Level 3.
• They are blessed with two lovely daughters, Twinkle & Cheryl.

Dear President,
Heartiest Congratulations on being chosen as Club Leader for the year 21-22. Pandemic has severely impacted our lives, but we have always risen to the occasion, adapted to the situation and given our best so we could “Serve to Change Lives” following the principle of “Service Above Self”.
We as a team would definitely do wonders in our respective roles as leaders as we work by following the principle “Keep it Simple!”
Lot is to be worked on to take Rotary Programs to each and every member of the Club. Equally Important is that they reach Non – Rotarians as well. We need to grow membership; our Rotary International President has given a wonderful formula of “Each One Bring One” which we have to sincerely implement. We expect that your club has a positive growth at the end of year.
Rotary Foundation through its various programs has worked for community at all times. May it be eradicating polio from the world, supporting world through COVID (Disaster) Grants, or various service projects under Six Areas of Focus where now “Supporting Environment” is added as 7th Area. We should also support our Own Rotary Foundation by contributing to Annual Program Fund, Polio Fund, Endowment Fund and various other options. Amount can be of your choice but contribute handsomely and ensure that you’re each and every member contributes. 100% contribution from each and every member of club is expected.
Our Rotary International President’s emphasis is on “Empowering Girls”. He also expects us to Celebrate “Rotary Days of Service” which will establish stronger Synergy amongst Rotary Clubs, Rotaract, Interact and Non – Rotary World. It’s a sincere request to include this in your yearly plan. Plan an Impact Making Project, ensuring proper Public Image, which will definitely help Rotary Grow - “Do More Grow More”.
Our Vision is “Rotary to be most preferred choice of all stakeholders”
At District Level we have adapted a new system of empowering enthusiastic Rotarians & Rotaractars to work in various committees of their choice thus developing new leadership with specific focus on women leadership working at various key positions. Request you to develop leadership accordingly in your club level as well by involving members in activity of their choice, understanding new ideas shared by them and acting upon the same.
When Rotary Work is done with Passion, Dedication, even while “Keeping It Simple!”, you will Realize that “Nothing is Impossible !!”
Always with you as your team member. So, we say “Action Speaks Better Than Words”.
Now the Action Begins…….

Rtn Pankaj Shah

District Governor 21-22, RID 3131

• He is a Mechanical Engineer and holds a Masters in Business Administration
• After a stint with Kirloskar Oil Engines, he started his own workshop in Manik Baug, Sinhagad Road, Pune as a supplier to well known companies
• He Joined Rotary Club of Pune South in 2012
• He was Secretary in 2014-15 and 2017-18
• He was Club Treasurer in 2015-16
• He served as Director Youth Services in 2018-19 and Director Administration in 2019-20
• Ann Nandinii has a Masters Degree in Commerce and helps Atul in his business.

• Atul and Nandinii have 2 daughters. Tanmaya and Devashree.
• Tanmaya is pursuing her PhD. in Biotechnology from Canada and Devashree is currently studying in Chicago.

Dear Pune South Family Members ,
This is a very special year for all of us because our RI President Rtn Shekhar Mehta is an Indian. Also this year installation of our Dist Governor Rtn Pankaj Shah was done by RI President Rtn Shekhar Mehta personally. It was a moment of pride for our entire district 3131.
This year Rotary theme is “ Serve to change lives “ with a special focus on addition of new members globally. We also want to become part of this movement . We will do our best to increase the membership with good retention & also will try to establish a Satellite Club. A special focus will be on making our Rotaract Club more vibrant so that we will be able to build future leaders for our club as well as for the society.
We will focus our energies and resources in doing service projects in various fields. All our current projects will be continued with vigour & enthusiasm. More efforts will be made to increase the magnitude & reach of these projects through Global Grants & CSR. Activities viz. members’ assimilation , woman in rotary will be done effectively.
From last two years we are living under the threat of pandemic. Hence dependence on virtual meetings is going to continue for some more time. As safety of our members is paramount to us norms of social distancing , masking etc will have to be adhered .
I have got tremendous trust and confidence in our team . Let’s work together and make this year 2021-22 memorable & successful.

Yours’ in Rotary
Rtn Atul Atre
President 2021-22
Rotary Club of Pune South , District 3131

मंडळी...

नवीन रोटरी वर्ष जोमात सुरू झालं प्रेसिडेंटनं वृक्षारोपण करून...👍

रोटरी, आपला क्लब आणि क्लबतर्फे केले जाणारे उपक्रम या सगळ्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल ज्यावेळी सभासदांकडून त्याला प्रतिसाद मिळेल, तन - मन - धन याद्वारे सहकार्य मिळेल.

मग प्रथम आम्ही करायचं? प्रथम तुम्ही नवनवीन सभासद मिळवायला मदत करायची...

लिड विथ लीड

मित्र, मैत्रीण, नातेवाईक, आप्त किंवा तुमच्या संपर्कातल्या कोणाही किमान एकाचा संदर्भ मेंबरशीप डेव्हलपमेंट कमिटी चेअर पीपी रो. अनिल गोगटे, विमेन इन रोटरी कमिटी चेअर डॉ. रो. संगीता देशपांडे यांच्याकडे किंवा त्या कमिटीपैकी कोणाही सदस्यांकडे द्या आणि त्या व्यक्तीला सभासद करून घेण्यात मदत करा.

नवीन क्लब किंवा सॅटेलाइट क्लबच्या संदर्भात क्लब एक्स्टेंशन कमिटी चेअर रो. अभिजीत देशपांडे याच्याशी किंवा कमिटी सदस्यांशी संपर्क साधा.

तिन्ही चेअर्स किंवा त्यांचे कमिटी सदस्य तुमच्या संपर्कात असतीलच.

क्लबच्या प्रत्येक सभासदानं किमान एक तरी लीड देऊन एक वेगळा पायंडा पाडू या.

तुम्हा सर्वांचा प्रतिसाद हीच क्लबची ऊर्जा...

योगेश नांदुरकर
मेंबरशीप अवेन्यु डायरेक्टर

लहान असताना कॅलिडोस्कोप या खेळण्याचे खूप आकर्षण होते. तुटलेल्या काचेच्या बांगड्यांचे तुकडे मिळाले की ते जपून ठेवायचे आणि पुरेसे जमले की त्यातून कॅलिडोस्कोप बनवायचा प्रयत्न करायचा हा प्रयोग बऱ्याच वेळा केला, तो यशस्वी कधीच झाला नाही. नक्की ते कसे जोडायचे हे काही समजत नव्हते आणी तेव्हा "How to make Kaleidoscope at home" असे गूगल करून youtube विडिओ पाहायची सोय देखील नव्हती. पण मग एखाद्या प्रदर्शनाला गेल्यावर तिथे हे खेळणं घायचे आणी उजेडाकडे तोंड करून गोल गोल फिरवत प्रत्येक वेळेस नवनवीन रेषा आणि रंग यातून तयार होणाऱ्या सुंदर रचना पहायच्या. फार मजेशीर खेळणे होते ते. त्यात "शास्त्र" असतं असे सांगायचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण त्या रचना पहाण्याची मजा घेण्यात शास्त्र बिस्त्र काही पाहायला गेलो नाही.

आत्ता बरेच वर्षांनी हे आठवायचे कारण म्हणजे आपले येणारे नवीन रोटरी वर्ष. विविध कमिटी तयार होत असताना क्लब मधीलच सदस्य अचानक चेअरपर्सन किंवा कमिटी मेंबर बनतात आणि वर्षभराचा कार्यक्रम ठरवतात. मागील वर्षी एका कमिटी मध्ये असलेले या वर्षी दुसऱ्या कमिटी मध्ये असतात आणि प्रत्येक वर्षी उत्साहाने विविध कार्यक्रम यशस्वी करतात. म्हणजे सदस्य तेच पण कॅलिडोस्कोप प्रमाणे वेगळ्या कोनात फिरवले की एक नवीनच आणि तरीही सुंदर अशी रचना तयार होणार. फरक एवढाच की कॅलिडोस्कोपमध्ये ही कोन फिरवणारी व्यक्ती बदलली तरी तयार होणाऱ्या रचना मर्यादितच असतात, रोटरी क्लब मध्ये मात्र व्यक्ती अनुरूप अमर्याद रचना नवनवीन तयार होतात. काही दिग्गज आणि महारथी हे परिश्रमाने आणि चिकाटीने यातले शास्त्र समजून घेऊन नवीन कॅलिडोस्कोप देखील तयार करतात. त्यांना तर माझ्या कडून २१ तोफांची सलामी किंवा खरे तर आपल्या दक्षिणकरांकडे २१ बाकरवड्या, २१ दिवसांचे कार ड्रायविंग, २१ पक्वान्नाची थाळी येथपासून ते २१ दातांची ट्रीटमेंट, २१ कॉउंसेलिंग सेशन्स, २१ पुस्तके, २१ फिनान्शिअल टिप्स अशी विविध प्रकारची सलामी देखील देता येईल. तो एक वेगळाच कॅलिडोस्कोप आपल्याकडे आहे.
आणि हो आपले बुलेटिन हा देखील एक कॅलिडोस्कोपच नाही का?

चला तर मग आता पाहूया आपल्याकडील विविध कॅलिडोस्कोप मध्ये वर्षभर कोणकोणत्या सुंदर रचना तयार होत आहेत ते...

These short articles about Rotary were first published in the weekly bulletin of the Rotary Club of North Stockton, California, U.S.A. That was well before their author, Cliff Dochterman, became president of Rotary International for the year 1992-93. Originally called "Did Ya Know?" the pieces were prepared to share interesting facts about Rotary International with members of the North Stockton club. Later, in response to requests from other Rotary clubs, the articles were reprinted in collected form.
In each of our bulletin issues we are going to learn about these interesting facts.

01 DEFINITION OF ROTARY

How do you describe the organization called "Rotary"? There are so many characteristics of a Rotary club as well as the activities of a million Rotarians. There are the features of service, internationality, fellowship, classifications of each vocation, development of goodwill and world understanding, the emphasis of high ethical standards, concern for other people and many more descriptive qualities.

In 1976 the Rotary International Board of Directors was interested in creating a concise definition of the fundamental aspects of Rotary. They turned to the three men who were then serving on Rotary's Public Relations Committee and requested that a one-sentence definition of Rotary be prepared. After numerous drafts, the committee presented this definition, which has been used ever since in various Rotary publications:

"Rotary is an organization of business and professional persons united worldwide who provide humanitarian service, encourage high ethical standards in all vocations and help build goodwill and peace in the world."

Those 31 words are worth remembering when someone asks, "What is a Rotary club?"

OxygenNext

12/06/2021

Rotary Pune South today conducted tree plantation at Pasali village in Velhe. After enjoying morning breakfast and cake cutting at Khanapur everyone headed for Pasali. Breakfast was sponsored by Ann Swati and Rtn Nitin Pathak on the occasion of their wedding anniversary!

As usual people took a Wada pav halt at Velhe and reached Pasali around 11.30pm. A visit was arranged to Skill Development. Center and people purchased Karvand, Jambhul juices and other products prepared by locals. Tree plantation was done at Pasali School and at Rtn Nitin Phatak's site. Weather was wonderful as it was drizzling. Everyone enjoyed thoroughly. After a delicious lunch people headed back to Pune around 4pm.

Today's tree plantation was attended by 30 members and was a splendid outing after a long time.

Thanks everyone for joining in large numbers and participating.

दिलखुलास मैफल गप्पांची ७ /०६ / २०२१

श्री. मिलिंद कुलकर्णी

सात जूनला साप्ताहिक सभेत प्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक, श्री. मिलिंद कुलकर्णी यांचा ‘दिलखुलास मैफल गप्पांची’ हा रंजक कार्यक्रम सादर झाला. रो.मंदार पूर्णपात्रे यांनी क्लबच्या सदस्यांचं आणि श्री. मिलिंद कुलकर्णी यांचं स्वागत केलं आणि श्री. मिलिंद कुलकर्णी यांची ओळख करून देताना सांगितलं की, ‘श्री. मिलिंद कुलकर्णी उत्तम निवेदक, सूत्रसंचालक, संशोधक, मुलाखतकार, निरुपणकार, स्टॅन्डअप कॉमेडी कलाकार आहेत. तेवीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी विविध कलाविष्कारांचं सादरीकरण केलं आहे. त्यांनी अनेक राजकीय सोहळ्यांचं, पुरस्कार वितरण सोहळ्यांचं सूत्रसंचालन, प्रख्यात गायक-गायिकांच्या मैफिलींचं निरूपण केलं आहे आणि प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. स्टॅन्डअप कॉमेडी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.’

कवीराज भूषण यांच्या काव्यानी शिवछत्रपतींना वंदन करून श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम एकपात्री आहे पण एकतर्फी नाही तसंच हा मोकळा संवाद आहे, समुपदेशन नाही या शब्दांत त्यांनी एकत्र बसून गप्पा मारणं ही कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. मराठी साहित्यातल्या, चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज लेखकांबद्दल, कवींबद्दल बोलताना त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, गदिमा, पुलं, ना.धो.महानोर, बा.भ.बोरकर, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, सोपानदेव चौधरी, रामदास फुटाणे, कवी ग्रेस यांचा उल्लेख केला. या प्रत्येकाबद्दलच्या आठवणी, किस्से, घटना सांगत, त्यांच्या कविता सादर करत कार्यक्रम रंगत गेला.

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी एक औत्सुक्याचा आणि आनंदाचा विषय आहे असं श्री. मिलिंद कुलकर्णी यांना वाटतं. दादासाहेब फाळक्यांनी रुजवलेली ही संस्कृती भालजी पेंढारकर, फत्तेलाल, बाबूराव पेंटर, व्ही.शांताराम यांनी दिमाखानं पुढं नेली आणि जीवघेण्या चढाओढविरहीत, शुद्ध वातावरणात फुलवली. याबद्दलच्या अनेक घटना, किस्से त्यांनी या वेळी रसिकांना सांगितले. चित्रपटसृष्टीतल्या कवी-गीतकारांबद्दल बोलताना त्यांनी उत्फुर्त काव्याचा बादशहा गीतकार शैलेंद्र आणि कवी, गीतकार, कथाकार, दिग्दर्शक गुलजार यांचा आवर्जुन उल्लेख केला. कवी ग्रेस यांचा मानसपुत्र आताच्या काळातला प्रतिथयश कवी वैभव जोशी यांच्या दोन कविता आणि गुलजार यांच्या दोन कविता श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमात सादर केल्या. प्रसिद्ध लोकप्रिय गायक मोहम्मद रफी, किशोर कुमार तसंच लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याशिवाय हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतलं पार्श्वगायन अपूर्ण होतं आणि असेल... हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा धावता तरीही रंजक आढावा घेण्यात श्री. मिलिंद कुलकर्णी कमालीचे यशस्वी झाले.

कार्यक्रमात शेवटी श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी गदिमांची जोगिया ही कविता आणि अशिक्षित बहिणाबाईंची शिक्षित बहीण शांताबाई शेळके यांची ‘हे एक झाड आहे,’ ‘त्याचे माझे नाते’ ही कविता सादर केली. कधीचा संपू नये असं वाटणार्‍या मैफिलीचं औपचारिक आभार प्रदर्शन ‘क्या बात है|’ या तीनच शब्दांत होऊ शकत असं सांगून पीडी रो.अतूल अत्रे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या सगळ्या सदस्यांतर्फे श्री. मिलिंद कुलकर्णी यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.

अपरिचित कोकणची सफर १४ /०६ / २०२१

श्री.धीरज वाटेकर 

चौदा जूनच्या साप्ताहिक सभेत श्री.धीरज वाटेकर यांनी ‘अपरिचित कोकणची सफर’ हा कोकण प्रांतावर आधारित कार्यक्रम सादर केला. वीसहून अधिक वर्षं सातत्यानं कोकणप्रांतात भ्रमंती केलेल्या श्री.धीरज वाटेकर यांचा मंदार पूर्णपात्रे यांनी परिचय करून दिला. श्री.धीरज वाटेकर यांनी कोकणातल्या अपरिचित ठिकाणांचा अभ्यास करून तिथली निरिक्षणं, अनुभव लेखनबद्ध केले आहेत. श्री.धीरज वाटेकर गेली बावीस वर्षं सामाजिक काम करत असून पंधरा वर्षं ग्रामीण पत्रकारिता करत आहेत. भूतान, हिमाचल, अंदमानसह त्यांनी भारतभर प्रवास केला आहे. तीस हजार डिजिटल फोटोंची संग्रह, पन्नासहून अधिक विशेषांक-पुस्तिकांचं संपादन, कात्रणसंग्रह, कोकण संबंधित नकाशाची निर्मिती ही त्यांची उल्लेखनीय कार्यं आहेत. त्यांची पर्यटन, जीवनकथा अशी एकूण आठ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या २००४सालच्या उत्कृष्ट युवा पुरस्कारानी तसंच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी श्री.धीरज वाटेकर यांना गौरवण्यात आलेलं आहे.

कोकणाची निर्मिती श्रावण कृष्ण त्रयोदशीला झाली अशी नोंद कवी विश्र्वनाथ यांनी १६३७मध्ये लिहिलेल्या ‘श्री व्याडेश्र्वर माहात्म्य’ या ग्रंथात आढळते. हाच कोकणचा निर्मिती दिन आहे. श्री.धीरज वाटेकर यांनी या कार्यक्रमात रेवस ते रेड्डी या पश्चिम किनाऱ्यावरच्या सागरी महामार्गावरच्या अपरिचित ठिकाणाबद्दलची विस्तृत माहिती दिली. ठाणे,मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या ठिकाणाचा यात समावेश आहे. कोकणातून चौसष्ट नद्या वाहतात आणि त्यांच्या बेचाळीस खाड्या आहेत. बहुतांश नद्यामध्ये मगरींचा मुक्त संचार असतो.

पक्षांच्या अंदाजे पाचशे जाती इथे आढळतात. ‘वाशिष्ठी - उगम ते संगम’ हा उपक्रम श्री.धीरज वाटेकर चालवतात. कोकणातले धबधबे, गरम पाण्याचे झरे आणि कुंडं, पायऱ्यांच्या विहिरी, कमळतळी, वेगवेगळी धरणं, केळशीला असलेली वाळूची टेकडी, लेणी, जांभा दगडातली गुंफा, भव्य वारूळ, विसापूर, पालशेत इथल्या गुहा अशी विविध अपरिचित ठिकाणं तसंच कोकणचे समुद्रकिनारे, समुद्री किल्ले, त्यांचे इतिहास, कोकणात नव्याने आढळलेली कातळशिल्पं, वेगवेगळ्या देवतांची मंदिरं, जलमंदिरं, देवतांचे मुखवटे, मंदिरांमधले पाळणे, घंटा, कोकणातले अष्टविनायक, केळशीचा प्रसिद्ध दर्गा, त्याची कहाणी या आणि अशा अनेक अपरिचित ठिकाणांची माहिती उपस्थितांना मिळाली. संक्रांतीपासून दिवाळीपर्यंत कोकणात वेगवेगळे उत्सव खूप आनंदात आणि उत्साहात साजरे होतात. प्राचीन इतिहासाचे संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या कृतज्ञतापूर्वक उल्लेखानं या माहितीपूर्ण कार्यक्रमाची श्री.धीरज वाटेकर यांनी सांगता केली.

आपण कोकणात अनेकवेळा जातो पण अशा आडवाटेवरच्या कोकणात एकदातरी जायलाच हवं असं सांगून अपरिचित कोकणची रंजक सफर घडवल्याबद्दल रो.संदीप विळेकर यांनी श्री.धीरज वाटेकर यांचं रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथतर्फे आभार मानले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

पारितोषिक वितरण समारंभ २१ /०६ / २०२१

ॲवॉर्ड समिती

एकवीस जूनला झालेल्या साप्ताहिक सभेत रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या रोटरी वर्ष २०२०-२०२१चा पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला. कोरोना महासंकटामुळे मर्यादा असूनही रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या सदस्यांनी जे काम केले, काही प्रकल्प राबवले, त्या प्रकल्पांत उत्साहानं सहभाग घेतला या सगळ्यांचं मुल्यमापन करून आगामी प्रकल्पांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी काही दार्शनिक पारितोषिकं देण्याचा आनंददायी समारंभ ऑनलाईन सादर झाला. आयपीपी रो.अभिजीत जोग यांनी सगळ्यांचं स्वागत केलं. रो. किरण पुरोहित, आयपीपी रो.अभिजीत जोग आणि रो. सुधांशू गोरे या तिघांच्या ॲवॉर्ड समितीनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली.

पीपी रो. कै. हरीभाऊ जोशी यांनी डोनेट केलेलं ‘बेस्ट कमिटी ऑफ द इअर’ हे पारितोषिक बुलेटीन कमिटीला मिळालं. कमिटीचे सभासद रो.आनंद कुलकर्णी यांनी हे पारितोषिक स्विकारलं. ‘सेकंड बेस्ट कमिटी ऑफ द इअर’ हे पारितोषिक प्रोग्रॅम कमिटीला घोषित झालं. रो. मंदार पूर्णपात्रे यांनी हे पारितोषिक स्विकारलं आणि हे पारितोषिक रो.माया जोशी यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट प्रोजेक्ट इन युथ सर्विस’ हे पारितोषिक ॲन विनिता कुलकर्णी यांना मिळालं. हे पारितोषिक पीडीजी अरूण कुदळे यांनी आपल्या वडलांच्या म्हणजे दादासाहेब कुदळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डोनेट केलं होतं. ‘ॲप्रिसिएशन ऑफ रोटेरिअन ऑर ॲन फॉर द बेस्ट प्रोजेक्ट’ हे पारितोषिक सद्भावना कॅम्प या प्रोजेक्टसाठी रो. विजया गुजराथी यांना मिळालं. ‘बेस्ट सर्विस फॉर व्होकेशन’ हे पारितोषिक डॉ.अविनाश भोंडवे आणि रो. राजेश बेळगांवकर यांना विभागून देण्यात आलं. हे पारितोषिक पीडीजी रो.चि.वि.जोग यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट रोटेरिअन ऑर ॲन फॉर पार्टिसिपेशन इन कम्युनिटी सर्विस’ हे पारितोषिक रो.नितीन पाठक यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो.कै.काका राजहंस यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट रोटेरिअन परफॉर्मन्स इन पास्ट टू इअर्स’ हे पारितोषिक रो.श्वेता करंदीकर यांना मिळालं आणि हे पारितोषिक पीपी रो.कै.नाना ताम्हनकर यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट रोटरी ॲन ऑफ द इअर’ हे पारितोषिक रो. माया जोशी यांनी डोनेट केलं होतं आणि या वर्षी हे पारितोषिक रोटरी ॲन स्वाती वेलणकर यांना मिळालं. ‘बेस्ट रोटेरिअन ऑफ द इअर’ हे पारितोषिक रो.अभिजित देशपांडे यांना मिळालं. हे पारितोषिक रो.कै.नागेश वैद्य यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट पार्टिसिपेशन ॲवॉर्ड ऑफ द इअर’ हे पारितोषिक रो. आनंद कुलकर्णी यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो.कै.अरूण ब्रम्हे यांनी डोनेट केलं होतं. ‘डायरेक्टर प्रोव्हाइडींग इफेक्टिव्ह मोटिव्हेशन टू इट्स कमिटी’ हे पारितोषिक रो.निरंजन ठाणगांवकर यांना मिळालं.

रो. डॉ. किरण पुरोहित यांनी पुढच्या पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली. ‘बेस्ट एनव्हायर्नमेंट अवेअरनेस ॲन्ड प्रोटेक्शन’ ॲवॉर्ड रो.रवींद्र प्रभुणे यांना मिळालं. हे पारितोषिक रो.स्मिता भोळे यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट कम्युनिटी सर्विस प्रोजेक्ट’ हे पारितोषिक सद्भावना मेडिकल कॅम्प या प्रोजेक्टसाठी पीपी रो.डॉ.राजेंद्र गोसावी आणि पीपी रो.विरेंद्र शहा यांना विभागून देण्यात आलं. पीपी रो.हिराचंद राठोड यांनी हे पारितोषिक डोनेट केलं होतं. ‘बेस्ट सर्विस अबाव्ह सेल्फ’ हे पारितोषिक पीपी रो.डॉ.सुधांशू गोरे यांना मिळालं. पीपी रो.मोहन आवटी यांनी हे पारितोषिक डोनेट केलं होतं. रो.स्वाती गोडखिंडीकर यांनी रो.कै.शरद गोडखिंडीकर यांच्या स्मरणार्थ ‘प्रेसिडेंट्स चॉइस’ ॲवॉर्ड डोनेट केलं होतं. हे ॲवॉर्ड रो.मनिषा बेळगांवकर यांना मिळालं. रोटेरिअन फॅमिली पुरस्कार रो.दत्तात्रय देवधर आणि परिवाराला मिळाला. पीपी. रो.डॉ.जी.के.करंदीकर यांनी हे पारितोषिक डोनेट केलं होतं. ‘बेस्ट अटेंडन्स ऑफ रोटेरिअन’ हे पारितोषिक रो.योगेंद्र आणि ॲन मोहिनी नातू यांनी डोनेट केलं होतं आणि ते रो.विनायक देशपांडे आणि रो.रमेश प्रभुमिराशी यांना विभागून देण्यात आलं. ‘बेस्ट अटेंडन्स ऑफ रोटेरिअन ॲन’ हे पारितोषिक ॲन चित्रा प्रभुमिराशी यांना देण्यात आलं. हे पारितोषिक रो.माधवराव आणि ॲन मोहिनी परांजपे यांनी डोनेट केलं होतं. ‘मॅक्स पार्टिसिपेशन इन डिस्ट्रिक्ट इव्हेंट’ हे पारितोषिक रो.किरण वेलणकर यांना मिळालं. हे पारितोषिक रो.दत्ता पाषाणकर यांनी त्यांच्या वडलांच्या कै.नानासाहेब पाषाणकर यांच्या स्मरणार्थ डोनेट केलं होतं. ‘बेस्ट व्होकेशनल सर्विस प्रोजेक्ट’ हे पारितोषिक रो.अरूण कुदळे यांना मिळालं. पीपी रो. आबा बदामीकर यांनी हे पारितोषिक डोनेट केलं होतं. ‘बेस्ट कॉन्ट्रिब्युशन टू बुलेटीन’ हे पारितोषिक डॉ.आर.व्ही आफळे यांनी कै.सौ.पुष्पा आफळे यांच्या स्मरणार्थ डोनेट केलं असून ते रो.डॉ.सुभाष देशपांडे आणि रो.योगेंद्र नातू यांना विभागून देण्यात आलं. पीपी रो. गोविंद पटवर्धन यांना ‘बेस्ट पास्ट प्रेसिडंट फॉर ॲक्टीव्ह इनव्हॉल्व्हमेंट’ पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक रो.अनिल सुपणेकर यांनी डोनेट केलं होतं. ‘रोटरी फाउंडेशन वर्क’ हे पारितोषिक रो.माधुरी किरपेकर यांना दिलं गेलं. हे पारितोषिक कै.विनायक बापट यांच्या स्मरणार्थ मीना बापट यांनी डोनेट केलं होतं. ‘बेस्ट पार्टिसिपेशन इन द क्लब’ हे पारितोषिक रो. जितेंद्र महाजन यांना मिळालं. फर्स्ट लेडी सुगंधा नातू यांना ‘बेस्ट सपोर्टींग ॲन टू द प्रेसिडंट’ हे पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक रो.सुधांशू गोरे यांनी कै.लीना गोरे यांच्या स्मरणार्थ डोनेट केलं होतं. ‘बेस्ट पब्लीक इमेज प्रोजेक्ट’ हे पारितोषिक रो.दत्ता पाषाणकर यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो. संदीप आणि ॲन अंजली विळेकर डोनेट केलं होतं. ‘बेस्ट कॉन्ट्रिब्युशन ऑफ रोटरीअन ऑर ॲन टू द एज्युकेशन फिल्ड’ हे पारितोषिक रो.हेमंत वाळिंबे यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो. विनायक देशपांडे यांनी कै.विनया देशपांडे यांच्या स्मरणार्थ डोनेट केलं होतं. ‘बेस्ट प्रोजेक्ट फॉर न्यू जनरेशन’ हे पारितोषिक पास्ट रोटरॅक्टरनी डोनेट केलं होतं आणि हे पारितोषिक रो.रश्मी परूळेकर यांना मिळालं. ‘ॲवॉर्ड कमिटीज स्पेशल ॲप्रिसिएशन’ हे पारितोषिक पीपी रो. विनोद अगरवाल यांना मिळालं. ‘मॅक्स फायनांन्शिअल कॉन्ट्रिब्युशन टू द रोटरी फाउंडेशन’ हे पारितोषिक रो.प्रे. सुदर्शन नातू यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो. विनायक बापट यांच्या स्मरणार्थ होतं. ‘लेडी रोटेरिअन ऑफ द इअर फॉर हर आउटस्टॅडींग कॉन्ट्रिब्युशन टू फुलफिल रोटरी ऑब्जेक्टीव्ह्ज’ हे पारितोषिक लेडी रो.मृदुला घोडके यांना मिळालं. हे पारितोषिक पीपी रो.कै.काका राजहंस यांनी डोनेट केलं होतं. या शेवटच्या पारितोषिकानंतर रो.प्रे. सुदर्शन नातू यांनी सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन केलं तसंच ॲवॉर्ड कमिटीचे आभार मानले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.

थँक्स गिव्हिंग सभा २८ /०६ / २०२१

रो. प्रेसिडेंट सुदर्शन नातू यांनी वर्षभरातल्या सर्व उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. वेगवेगळ्या कमिट्यांच्या कामांची तसंच सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवर केलेल्या कामांचाही लेखाजोखा त्यांनी मांडला.
ज्याच्या-त्याच्या कामाचं श्रेय ज्याला-त्याला देत वर्षभरातल्या उल्लेखनीय उपक्रमांची थोडक्यात माहिती रो. प्रेसिडेंट सुदर्शन यांनी दिली. तसंच ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वच सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही बरेच उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडता आले यासाठी सर्वच सदस्यांचे आभार मानले.
ॲ नेट्‌ससाठी केलेला कार्यक्रम हा सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला. गोदानसारख्या प्रकल्पांमधलं सातत्य अधोरेखित करत रो. एजी. अभय जबडे यांनी या प्रकल्पासाठी डोनेशन देणार असल्याचं जाहीर केलं.
सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ सदस्यांनी आपापली मनोगतं दोन-दोन शब्दांत व्यक्त केली.

Rishiraj Kulkarni is a multi-percussionist graduated with Honours in Music from Middlesex University, London (U.K.) specialising in Indian classical music, western classical music, and audio technology. He also holds a Diploma in Music from KM Music Conservatory, Chennai (T.N., India) founded by A.R. Rahman where he was awarded as the best Hindustani music performer of the year 2014 — 15. His major instrument being the tabla, which he has been playing for the last 16 years, he also plays the handpan, tongue drum, Maschine (hardware/software DAW), marimba, xylophone, and vibraphone to name a few.

Over the years he has collaborated with artists from various art forms such as illustrators, painters, poets, singers, ballet dancers, western classical orchestras and Indian classical musicians. Some of these ensembles and artists are Christian-Pierre La Marca (French cellist), Maya Youssef (Syrian kanun player), Laura Herman (British illustrator), Megha Thumbunkel (Painter), Hofesh Shechter theatre company (London, U.K.), 100ft Road (Experimental music ensemble of KM Music Conservatory) and Club Inégales (London U.K.), Aidan O’Rourke (Scottish fiddle player).

सुकृत खांडेकर

  • ज्येष्ठ पत्रकार, गेली ४५ वर्ष पत्रकारितेत.
  • सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, केसरी, लोकमत, नवशक्ती अश्या आघाडीच्या दैनिकाचे प्रतिनिधी आणि संपादक.
  • विविध दैनिकांमध्ये, अनेक वर्ष सातत्याने स्तंभ लेखन
  • राज्य विधिमंडळात १५ वर्ष तर संसदेमध्ये ६ वर्ष असा २१ वर्ष संसदीय कामकाजाच्या वृत्त संकलनाचा अनुभव.
  • बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी.
  • " झेलमच्या तीरावरून" आणि " वसंतदादा पाटील- एक महापुरुष" अशी दोन पुस्तके प्रकाशित.
  • आकाशवाणी, दूरदर्शन राजकीय समीक्षा कार्यक्रमांमध्ये सहभाग.
  • देशभर अनेक दौरे.
  • पत्रकारितेवर व्याख्याने.
  • अनेक नामांकित राजकीय नेत्यांकडून गौरव.

रोजचे घरातील काम, समाज कार्य, नोकरी किंवा व्यवसाय या सर्वांमध्ये आपल्या जोडीदाराची साथ असणे हे त्यातील यशापयशाकरिता अत्यंत महत्वाचे असते. नुसतेच "रथाची दोन चाके" इत्यादी पुस्तकी वाक्ये न फेकता प्रत्यक्षात कंबर कसून त्यात उतरावे लागते अगदी खऱ्या अर्थी तन, मन आणि काही वेळेला धन देखील अर्पण करून. त्यातदेखील पत्नीची साथ ही बऱ्याच वेळा गृहीतच धरली जाते. आणि ती देखील "आपल्या घरासाठी तर आहे.." असा विचार करून त्यात स्वतःला पूर्ण झोकून देते.  यामुळेच तिला खरे तर अर्धांगिनी न म्हणता "पूर्णांगिनी" असेच म्हणावे लागेल.   आपण अशा पूर्णांगिनी  रोटरी परिवारात नक्कीच पाहिल्या असतील . महिला रोटरियन आणि  ॲन असणारच आहेत,कदाचित  ॲनेट सुद्धा  !!मग त्यांना  तुम्ही तुमच्या लेखणीतून फोटोसहित आमच्या पर्यंत पोचवा -- त्यांचे कौतुक आपणच करायला हवे. आम्ही ते आपल्या बुलेटिन मधून सर्व रोटरी परिवारापर्यंत पोचवू.

समन्वयक: ॲन अस्मिता आपटे

प्रत्येकाकडे सांगण्यासारखं खूप काही असतं आणि प्रत्येकाकडून ऐकण्यासारखं पण खूप काही असतं. आपल्या क्लब मध्ये अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी एकत्र आली आहेत. स्पाउसेस पण काही कमी नाहीत. या सदरामध्ये आपण त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या विश्वात डोकावून बघणार आहोत. तसेच क्लब मध्ये त्यना आलेले अनुभव, त्यांच्या कल्पना आणि कुठल्या खटकणार्‍या गोष्टी असतील तर त्या सुद्धा इथे ते मांडू शकतील.

समन्वयक: ॲन अस्मिता आपटे, रो. आनंद कुलकर्णी, रो. अभिजित देशपांडे

आपल्या सगळ्यांना आपली कलाकारी मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी हे एक छोटे व्यासपीठ आहे. तसेच आपल्या मेंबर्स किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल विशेष यश,  कुणाला शाब्बासकी द्यायची असेल तर ती पण आपण इथे देऊया. आपल्या दिलदार देणगीदारांनी दिलेल्या देणग्या आणि काही विशेष वार्ता पण या सदरात येतील.
समन्वयक: ॲन अस्मिता आपटे , रो. योगेंद्र नातू

Awards & Recognitions RY 2020-21

Best Committee of the Year : Bulletin Committee (Rtn Yogesh Nandurkar)

Late Rtn. PP. Haribhau Joshi

Second Best Committee Award : Program Committee (Rtn Mandar Purnapatre)

Donated by : R/AnnMaya Joshi

Best Project in Youth Service : Environmental e-RYLA (Ann Vinita Kulkarni)

Donated by : Donated by PDG Arun Kudale in the honour of his father L. T. ( Dadasaheb) Kudale

Appreciation of Rtn./Ann For the Best Project : Ann Vijaya Gujarathi

Donated by : Rotary Club of Pune Tilak Road

Best Service through Vocation : Dr Avinash Bondwe & Mr Rajesh Belgaonkar

Donated by : Late Rtn. PDG. C. V. Joag

Best Rtn./ Ann having effective Participation in Community Service Project : Rtn Nitin Pathak

Donated by : Rtn. PP. Kaka Rajhans

Best Rotarian Inducted during the past two years : Rtn Shweta Karandikar

Donated by : Rtn. PP. V. A.(Nana)Tamhankar

Best Rotary Ann of the Year : Ann Swati Velankar

Donated by : R/Ann Maya Joshi

Best Rotarian of the Year : Rtn Abhijit Deshpande

Donated by : Late Rtn. Nagesh V. Vaidya

Best Participation Award of the Year : Rtn Anand Kulkarni

Donated by : Rtn. PP. Arun Brahma

Director Providing Effective Motivation to his Committees : Rtn Niranjan Thangaonkar

Donated by : Late Rtn. Sadubhau Kelkar

Environmental Awareness/ Protection : PND Rtn Ravindra Prabhune

Donated by : Rtn. Smita Bhole

Best Community Service Project : Sadbhavana Medical Camp at J&K

Donated by : Rtn. PP. Hirachand Rathod

Service Above Self : PP Rtn Dr Sudhanshu Gore

Donated by : Rtn. PP. Mohan Audhi

President’s Choice : Rtn Manisha Belgaonkar

Donated by : Rtn. Swati Gotkhindikar in Memory of Late Rtn. Sharad Gotkhindikar

Best Rotarian Family : Rtn Dattatraya Deodhar Family

Donated by : Rtn. PP. Dr. G. K. Karandikar

Best Attendance by Rotarian : Rtn Ramesh Prabhumirashi, PP Rtn Vinayak Deshpande

Donated by : Rtn. Yogendra and Ann Mohini Natu

Best Attendance by Rotary Ann : Ann Chitra Prabhumirashi

Donated by : Rtn. Madhavrao and Ann Mohini Paranjape

Maximum Participation in the District Event : Rtn Kiran Velankar

Donated by : Rtn. Datta Pashankar in memory of Late Shri. Nanasaheb Pashankar

Best Vocational Service Project : Soya Milk Product Training to Mahila Bachat Gat (PDG Rtn Arun Kudale)

Donated by : Rtn. PP. Aba Badamikar

Best Contribution to Bulletin : Rtn Dr Subhash Deshpande & Rtn Yogendra Natu

Donated by : Dr. R. V. Aphale in memory of Late Sou. Pushpa Aphale

Past President for Active Involvement : PP Rtn Govind Patwardhan

Donated by : Rtn. PP. Anil Supanekar

Rotary Foundation Work : Rtn Madhuri Kirpekar

Donated by : Meena Bapat in the memory of Vinayak Bapat

Maximum Financial Contribution to The Rotary Foundation during the Year: Rtn Sudarshan Natu

Donated by : Meena Bapat in the memory of Vinayak Bapat

Best Participation in Club : Rtn Jitendra Mahajan

Donated by : Rtn. PP Sudhir Waghmare

Best Supporting Ann with Independent Responsibility : Ann Sugandha Natu

Donated by : Rtn. PP Sudhanshu Gore in Memory of Late Ann Leena Gore

Best Public Image Project : Plasma Donation Drive and Rakshak Screens (Rtn Datta Pashankar)

Donated by : Rtn. Sandeep and Ann Anjali Vilekar

Award Commitee’s Special Appreciation : PP Rtn Vinod Agrawal

Donated by : Award Commitee from 2019-20

Lady Rtn of the Year for her Outstanding Contribution towards Achieving Rotary Objectives : Rtn Mridula Ghodke

Donated by : In Memory of Late Rtn PP Kaka Rajhans

Best Project for New Generation : e-RYLA-Reinvent Yourself (Rtn Rashmi Parulkar)

Donated by : Past Rotaractors

Best Contribution by Rtn/Ann in the Area of Education : Rtn Hemant Walimbe - Career Guidance & Online Tests for Students

Donated by : Rtn. PP Vinayak Deshpande in memory of Ann Vinaya Deshpande

The name by itself captures what we will be reading each month. Experts in different fields will put forth their views on the current and future in there respective fields. Through this column we aim to get information on a topic which is important, relevant, new and will help us explore as well.

Coordinator : Rtn. Raghavendra Ponkshe

Yes, we have an opinion on every matter and everyone's opinion matters. Our Southern Stars are especially a well read and knowledgeable lot. We are also open to opposing points of view and welcome a healthy debate. This section is especially dedicated to your opinion. It can be on any subject right from a book to a web series to a travelogue or even your experiences in your professional or personal life.As long as it passes the  Rotary 4 Way Test we whole heartedly encourage you to write on any matter you wish to express your opinion on.

Our bulletin is read far and wide so it can be in Marathi, Hindi or English. You can also write in any other language if you provide an English or Marathi translation of it.

We welcome all Rotarians, Anns, Annets and even our Rotaractors and Interactors to contribute and yes you can write it, type it or even send us an audio or video.

So what are you waiting for, fire up your pen, keyboard or camera and let us know "Whats the matter".

🤩 🤓 🧐 😱 🤬

या अशा विविध भावना आपल्या मनात येतात जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, नाटक किंवा चित्रपट पाहतो.. किंवा एखादी घटना पाहतो ऐकतो..आणि मग आपली तीव्र इच्छा असते की आणखी कोणाला तरी या बद्दल सांगावं.

"Southern Star" ही संधी उपलब्ध करून देत आहे आपल्या ई-बुलेटिन मध्ये.

चला तर मग टायपुया किंवा ऑडीओ/विडिओ रेकोर्ड करुन पाठवूया, म्हणजे आपल्या भावना अगदी पाहिजे तश्याच सर्वांपर्यंत पोहोचवता येतील

🎤🎥 ⌨️

समन्वयक: ॲन अस्मिता आपटे, रो. योगेंद्र नातू, रो. आनंद कुलकर्णी