रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती तर्फे आयोजित नाट्यवाचन स्पर्धेत आपल्या क्लबने सूडनीती ह्या नाटकाचे नाटयवाचन केले. स्पर्धेत आपल्या क्लबला उत्तेजनार्थ १ चे पारितोषिक मिळाले. सूडनीती टीमचे हार्दिक अभिनंदन.
निकाल
1) सांघीक प्रथम "यज्ञाहुती"
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी
2) सांघीक द्वितिय
"खर्या खोट्याची काशी"
रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण
3) सांघीक तृतीय "माहेर"
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स
————————————————
उत्तेजनार्थ 1
"सुडनीती "
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ
उत्तेजनार्थ 2
"चिमणीचं घर
रोटरी क्लब ऑफ पुणे विज्डम
————————————————
सर्वोत्कृष्ट लेखक
रजनी स्वामी
चिमणीचं घर
रोटरी क्लब ऑफ पुणे विज्डम
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
मधुर डोलारे
माहेर
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स
स्री अभिवाचक
1) प्रथम: स्वाती पाठक
सुडनीती
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ
2) द्वितिय: मंजिरी शहाणे
यज्ञाहुती
रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी
3) तृतीय:अमरजा दिंडोरकर
माहेर
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स
२८ मार्च २०२३
महिला दिनानिमित्त दिनांक 28 मार्च मंगळवार, पत्रकार भवन, शास्त्री रोड,गांजवे चौक पुणे -30 येथे भाग्यश्री सखी फाउंडेशन संस्थेने कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ह्या कार्यक्रमात ॲनेट भाग्यश्री ओगलेला सन्मानित करण्यात आले.
Donation to TRF
ज्युलियन असांज, हा सत्याच्या पाठीमागे लागलेला माणूस होता,का, सत्याच्याआड दडून असत्याच्या सहाय्याने आपली तुंबडी भरणारा गुन्हेगार होता?
निरनिराळ्या व्यक्तींची त्यांच्याबद्दल वेगवेगळी समजूत होती.ते सर्व जगाला हादरवून सोडणाऱ्या विकीलिक्स ह्या व्हीसलब्लोअर(whistle blower) संस्थेचे संस्थापक व संपादक आहेत.
त्यांचा जन्म टाऊन्सव्हिला ऊत्तर क्विन्सलॅन्ड ,ऑस्ट्रेलियात दिनांक ३जूलै १९७१साली झाला.त्यांच्या आईचे नाव क्रिसटीन .
त्यावेळेस व्हिएतनाम युद्धाविरूद्ध निदर्शने होत असत.सिडनी शहरातील निदर्शनात क्रिसटीन ने भाग घेतला होता.त्याठिकाणी तिला एक तरूण निदर्शक भेटला.ह्या भेटीतून ज्युलियन चा जन्म झाला.क्रिसटीन चे ज्युलियन च्या वडिलांशी लग्न पण झाले नव्हते.जणू काही अन्यायाविरुद्ध झगडणे व प्रचलित नियमांविरुद्ध वागण्याचे बाळकडूच त्याला जन्मापासूनच मिळाले होते.
तो दोन वर्षांचा असताना त्याच्या आईचा संबंध ब्रेट असांज या फिरत्या नाटक कंपनीत काम करणाऱ्या संगीतकाराशी आला.हाच ज्युलियन चा सावत्र बाप व त्याचेच आडनाव ज्युलियन ला मिळाले.त्याचे जीवन सतत अस्थिर असे.त्याला एकंदरीत तीस शाळा बदल्याव्या लागल्या.तो नऊ वर्षांचा असताना आई वडील विभक्त झाले.त्याच्या आईने लिएफ मेनेल नावाच्या माणसाशी लग्न केले,पण त्यांचे कधीच पटले नाही.ज्युलियन व त्याच्या आईला लिएफ पासून दूर राहण्याकरिता सतत घरे व शहरे बदलावी लागत. सतत पलायन करावे लागे.सरतेशेवटी ज्युलियन व त्याच्या आईची लिएफ च्या तावडीतून सुटका झाली.ज्युलियन त्यावेळेस १६ वर्षांचा होता.ह्याच वेळी त्याचा पहिल्यांदा त्याच्या कॉम्प्युटर शी संबंध आला आणी कॉम्प्युटर त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला.
ज्युलियन त्या संगणकाशी खेळू लागला आणिक त्यात किती ताकद आहे याचा त्याला प्रत्यय येऊ लागला.तो संगणक कार्यक्रम करण्यास शिकला.त्याचप्रमाणे सांकेतिक लिपीत लिहीलेले संगणक कार्यक्रमाचे अर्थ शोधण्यास शिकला.त्या वेळेस ही माहिती संगणक पुस्तकांत असे,जी सहजासहजी मिळत नसत. विषेशतः आर्थिक पाठबळ नसलेल्या तरूणांना ही पुस्तके मिळविणे कठीण जात असे.म्हणून संगणक कार्यक्रम तयार करणाऱ्या कंपनीची गुप्त लिपी शोधून,त्या संगणक आज्ञावलीची माहिती मिळवून, ती माहिती ईतर तरुणांना पुरविणारी एक भूमिगत टोळी तयार झाली. सांकेतिक लिपी लिहिणारे कंपन्यांचे कर्मचारी व ती लिपी मोडणारे तरूण यांच्यात एक प्रकारे चढाओढच चालू झाली. एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या,संगणक शास्त्रातील,सर्व पद्धतींचा अवलंब केला गेला.ह्या मुळे संगणक कार्यक्रम तयार करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र प्रगती झाली.
सांकेतिक लिपी लिहिणारे व ती लिपी मोडणारे यांच्यात आंतरराष्ट्रीय माहितीची देवाणघेवाण चालू झाली.तीसुद्धा पोस्टाने व फुकट. कारण त्यांनी पोस्टाचे तिकीट परत परत वापरण्याची पद्धत सुद्धा शोधुन काढली.इंटरनेट येण्याच्या अगोदर ही मंडळी एकमेकांशी आंतर्देशीय फोन कॉल्सनी संगणकावर संबंध साधावयाची.आंतर्देशीय फोन कॉल्स महाग असल्याने,ह्या मंडळींनी दूरध्वनी यंत्रणेत फेरफार करून,आंतर्देशीय फोन कॉल्स फुकट करण्याचा मार्ग शोधला.मागाहून 'मोडेम ' आला व एकमेकांशी मोडेम द्वारा संकर्पहोऊ लागला.दूरच्या संगणकाचा मोडेम शोधुन काढण्याची आज्ञावली ज्युलियन ने लिहून काढली,आणी अशारीतीने हॅकिंग सुरू झाले.ज्युलियन व सहकाऱ्यांच्या लक्षात आले की इतर संगणकातील माहिती सहजा सहजीमिळत नाही.त्यात अनेक अडथळे ऊभे केलेले असतात.ते अडथळे एकतर व्यापारी तत्त्वावर नफा मिळवण्यासाठी, कींवा, सत्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य दडपण्याकरता असतात.तेव्हा अशा कंपन्यांच्या संगणकात शिरून त्यांतील माहीती बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.
ज्युलियन ने 'मेंडकस् ' हे नाव हँडल म्हणून धारण केले.त्या योगे ज्युलियन व त्याचे हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच साथीदार विवीध संगणक प्रणालीत शिरकाव करू लागले.अगदी अनेक देशांच्या लष्करी संगणक प्रणालीत अथवा पेंटागॉन किंवा बँकांच्या संगणक प्रणालीत सुद्धा त्यांनी प्रवेश केला.त्यामध्ये कुणाचेही नुकसान करणे,किंवा स्वतःचा फायदा करून घेणे हा हेतू नव्हता,तर,सत्य माहीती बाहेर काढून इतरांना ऊपलब्ध करून देणे असा होता.शेवटी ऑस्ट्रेलियन सरकारला ज्युलियन च्या उचापतींचा सुगावा लागला आणी त्याच्या आईच्या घरावर छापा पडला.त्यानंतर ज्युलियन चे पलायन परत सुरूञ झाले.तो आईचे घर सोडून मेल्रबोर्न शहरात लपून बसला.सुमारे १९९२साली 'सायफर पंक ' ही चळवळ चालू झाली.साऱ्या जगात त्याचे ९००० च्या वर सभासद नव्हते. सायफर पंक गुप्त भाषा तयार करून,त्याची माहिती एकमेकांना देतअसत,ज्यामूळे स्वतःच्या संगणकातील माहिती सुरक्षित ठेवता येत असे. ज्युलियन जसा माहीती स्वातंत्र्या करीता लढला,तसेच वैयक्तिक माहिती रक्षणार्थ सुद्धा त्याने काम केले.पूर्वी गुप्त भाषा फक्त सरकारी यंत्रणा किंवा मोठमोठय़ा व्यापारी संस्थां करताच वापरण्यात येत असे.सायफर पंक मुळे ही सोय सर्व साधारण इंटरनेट ऊपभोगीता करता सुद्धा उपलब्ध झाली.त्याचीच पुढील पायरी म्हणजे ' रबर होज ',जी प्रणाली ज्युलियन ने १९९७ साली तयार केली.त्या योगे आपली संवेदनशील माहिती इंटरनेट मध्ये अनेक खोट्या माहितींच्या स्तरांखाली लपवून ठेवता येते.
सन१९९१साली ज्युलियन ने ' सिंकोफन्ट 'नावाची आज्ञावली तयार केली.त्यामुळे तो कोठल्याही संगणकांतील परवलीचा शब्द शोधुन काढु शकत होता.ह्या आज्ञावली च्या सहाय्याने तो अमेरिकन लष्कर, नौदल पेंटॅगॉन ,मोटोरोला , पॅनासॉनीक आणि झेरॉक्स आदींच्या संगणक प्रणालीत प्रवेश करू शकला.
ज्युलियन च्या आतापर्यंत लक्षात आले होते की संगणक तस्करीने,जी माहीती सर्वसामान्य माणसापासून लपवून ठेवली जाते,ती माहिती वरील संगणक हत्यारांनी उघडी करता येईल व लबाड आणी भ्रष्टाचारींचे पीतळ उघडे करता येईल.
सन१९९० च्या सुमारास तो त्याच्या मैत्रीणी समवेत मेलबर्न येथील एका उपनगरांत घरधूशी करून राहीला होता.अश्या रिकाम्या घरांची किंवा जमिनीची माहिती देणारी प्रणाली त्याने चालू केली.त्याचप्रमाणे अशा रिकाम्या मालमत्तेत कसे घुसावे व रहावे याची माहिती तो,इतरांना देऊ लागला.शेवटी त्याला त्याच्या घुसखोरी केलेल्या घरातून हाकलून लावले.पण ह्या माहिती पुरविणाऱ्या संघणनेचा अनेक बेघर लोकांना खूप फायदा झाला.
ज्युलियन च्या पाठीमागे ऑस्ट्रेलियन सरकार लागले होते.शेवटी सन १९९२ च्या ऑक्टोबर महीन्यात त्यांना 'मेडेक्स '
चा सुगावा लागला,आणी ऑस्ट्रेलियन पोलीस त्याच्या दाराशी हजर झाले.ऑस्ट्रेलियाने सन १९९० साली संगणक गुन्ह्याबद्दल नवीन कायदा केला होता.कायदा नवीन असल्याने ज्युलियन वर गुन्हा नोंदविण्यात सन १९९६ साल उगवले. मधल्या काळात त्याने एका मित्राबरोबर संगणक सुरक्षा संस्था काढली.म्हणजे तो आतापर्यंत जे उपद्व्याप करीत होता त्याच्या बरोबर विरूद्ध काम करू लागला.मोठमोठ्या संस्थांची संगणक प्रणाली कीती सुरक्षित आहे,हे शोधण्याचे काम तो करीत होता.सन १९९३ साली इंटरनेट बालभोगींच्या कोंडाळ्याचा पर्दाफाश करण्यास त्याने पोलिसांना मदत केली. ह्याच काळात अंतर्मुख होऊन तो रानावनात हिंडू लागला.खटल्यात त्याच्यावर ३१ प्रकारचे आरोप लावण्यात आले.त्याला जबरदस्त दंडाची शिक्षा झाली.ह्याच काळात त्याने चर्चच्या शिकवणी विरूद्ध निदर्शने केली.त्याच्या मते,ख्रिश्चन धर्माची शिकवणूक सुद्धा धार्मिक व माहिती स्वातंत्र्याशी निगडीत असावयास पाहिजे होती.
ज्युलियन कॉलेज मध्ये शिक्षण घेऊ इच्छित होता.त्याला पुस्तक वाचनाची हौस होती.सन२००३साली त्याने मेल्रबोर्न विद्यापीठात गणित आणि पदार्थ विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. संगणकांची गुप्त भाषा तयार करण्यात गणिताची खूप गरज लागते.त्याला पुढे विकीलिक्स ही संस्था स्थापण्यात गणीताची खुपच मदत झाली.तो मेल्रबोर्न विद्यापीठात सन२००६ पर्यंत होता.ह्याच काळात त्याच्या मनात विकीलिक्स ची कल्पना रूजली.कारस्थानी व दडपशाही करणारी सरकारे ,सर्व साधारण जनतेपासून ,त्यांना नको असलेली व अडचणीत टाकणारी माहिती लपवून ठेवत असत. तसेच कित्येक संस्था,बँका वगैरे अशा प्रकारची माहीती दडवून ठेवीत असत.ही माहिती उघड करून,इतर प्रसार माध्यमांतून सर्वासमोर आणणे हे विकीलिक्स चे ध्येय असावे असे ज्युलियन ला वाटे. त्या माहितीवर मत प्रदर्शित करणे अथवा माहिती उघड करून, एखादी क्रान्ती घडवुन आणणे,हा ज्युलियन चा हेतु नव्हता. माहीती उघड केल्यानंतर झालेल्या परिणामांमध्ये त्याला रस नव्ह्ता. सत्य बाहेर आणणे एव्हढाच त्याचा हेतु होता.त्या हेतुने ज्युलियन ने 'विकीलिक्स 'ऑर्ग हे वाच्यता करणारे संकेतस्थळ इंटरनेट वर ४ ऑक्टोबर २००६साली नोंदणीकृत केले. विकीलिक्स जशी दडवलेली माहीती बाहेर काढते, तसेच ज्यांच्याकडून ही माहिती उपलब्ध होते,ते स्रोत लपवून अथवा गुप्त ठेवते.याकरिता सांकेतिक लिपी चा उपयोग केला जातो. ज्युलियन ने त्याकरिता एक संचालक मंडळ तयार केले,ज्यात समविचारी मंडळी समावेशीत होती.हा साहसी प्रकल्प काही हितसंबंधीयाना खुपेल व त्याला सर्व प्रकारे,विषेशतः कायदेशीर विरोध होईल याची ज्युलियन ला पूर्ण कल्पना होती.त्यामूळे हे संकेतस्थळ सॅनफ्रान्सिस्को येथे नोंदले गेले. त्या शहरात समविचारी व्यक्ती मुबलक प्रमाणात होत्या.
त्याने ई मेलच्या सहाय्याने ही बातमी सर्वत्र पसरवली आणी दि.२८ डिसेंबर २००६ मध्ये विकीलिक्स ने सर्व प्रथम सोमालिया च्या इस्लामिक कोर्टाची कागदपत्रे उघड केली.ह्या माहितीचा स्त्रोत चीनी होता व कदाचित ही माहिती चायना कडून मुद्दामहून स्वत च्या फायद्याकरता पेरली असावी.अशारितीने विकीलिक्स सारख्या प्रकल्पाचा दुरुपयोग पण करता येतो हे दिसून आले.ह्या वाच्यता संकेत स्थळाचा प्रसार व्हावा म्हणून ज्युलियन ठीकठीकाणी हिंडला. आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे त्याला कमी खर्चात सगळीकडे हिंडावे व रहावे लागे.त्याच्या जवळ कपडे व ईतर सामान अगदी तुटपूंजे असे.त्यामानाने कामाचा व्याप खूप होता.सन २००७मध्ये विकीलिक्स ला अमेरिकन लष्कराची कागदपत्रे मिळाली.त्यात ईराक युद्धात वापरण्यास खरेदी केलेल्या सामुग्रीची माहीती होती.जवळ जवळ १३बिलीयन डॉलर्स ची खरेदीकेली होती.ही माहीती विकीलिक्स ने सर्वांना उपलब्ध करून दिली.ही माहीती प्रचंड मोठी होती व लष्करी सामुग्री विषयी होती.ह्याचा फायदा ठेकेदारांना झाला.एखाद्या विशिष्ट सामुग्रीच्या ठावठिकाणा विषयी विचारणा पण विकीलिक्स कडे करण्यात आली होती.'ग्याँटनामो' येथील लष्करी तुरुंगातील ईराकी कैद्यांचा छळ,फलूजा येथील युद्धात अमेरिकेकडून वापरलेले रासायनिक बॉम्ब, वगैरे विषयी कागदपत्रे व इतर माहीती विकीलिक्स ने प्रसिद्ध केली.केनिया मध्ये त्यावेळेस चाललेल्या अराजकाचा समाचार विकीलिक्स ने घेतला.जानेवारी२००८मध्ये 'बीर' या स्विस बँकेने क्रेमेन बेटांमध्ये असलेल्या संस्थांच्या साहाय्याने केलेल्या ,पैशांची लपवाछपवी उघडकीस आणली.त्याबद्दल विकीलिक्स वर खटला भरण्यात आला,पण तो खटला विकीलिक्स ने जिंकला. असे अनेक घोटाळे विकीलिक्स ने उघडकीस आणले.
ह्या सुमारास ज्युलियन ला,वाचा स्वातंत्र्य व सेन्सॉरशिप विरूद्ध असणाऱ्या देशाचा आसरा घेउन, बिनधास्त पणे काम करण्याची आवश्यकता भासू लागली.त्याकरता त्याने आयलंड ह्या छोटया देशाची निवड केली.५ एप्रिल २०१० मध्ये विकीलिक्स ने 'कोलॅटरल मर्डर 'ह्या शीर्षकाचा व्हीडिओ प्रसिद्ध केला.त्यात ईराक मधील बगदाद शहरात एका अमेरिकन हेलिकॉप्टर मधुन काही लोकांवर गोळीबार होतांना दाखविले आहे.त्याचप्रमाणे एका मोटार व्हॅनवर पण गोळीबार झाला.त्या व्हॅनमध्ये दोन लहान मुले होती.हे सर्व जण निरपराध नागरिक होते.ह्या व्हीडीओ ला अमेरिकेतून खूप विरोध झाला.परन्तु हा व्हीडिओ सर्वत्र गाजला.अमेरिका व अमेरिकन लष्कराकडून बरीच सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.दि.२६ मे२०१० ला हा व्हीडिओ विकीलिक्स ला पुरवण्याच्या संशयावरून चेलसी ब्रॅडली मॅनींग नावाच्या अमेरिकन स्त्री सैनीकाला पकडण्यात आले.तिची २०१७ मध्ये सुटका झाली.२०१० सालीच विकीलिक्स ने अफगाण वॉर लॉगज् आणि ईराक वॉर डायरीज ह्या शीर्षकाखाली अफगाणिस्तान व ईराक मधील लढाईची कागदपत्रे उघड केली.त्यांमध्ये दोन ही युद्धात अमेरिकन शिपायांकडून झालेल्या जुलूमाची व निष्पाप नागरिकांच्या हत्येची माहिती आहे.हि माहिती उघड केल्याबद्दल ज्युलियन असांज वर अमेरिकन सरकारकडून बरीच टीका झाली.अमेरिकन सरकार व लष्करी कार्यालय 'पेंटागॉन ' ज्युलियन च्या पाठीमागे लागले.ज्युलियन ची हत्या करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली.
२०१० साली ऑगस्ट महिन्यात ज्युलियन स्वीडन ला कामानिमित्त गेला होता.तिकडे त्याचा दोन स्त्रियांशी शारिरीक संबंध आला.जरी ज्युलियन या संबंधाचे समर्थन करीत असला तरी ती त्याची घोडचूक होती.त्याला कल्पना होती की अमेरिकन सरकार त्याच्या पाठीमागे हात धुवून लागले आहे.तरिही तो मोह आवरू शकला नाही.ज्याला दुसर्यांवर शिंतोडे ऊडवायचे आहेत त्याने पैशाचा,प्रसिद्धीचा,अथवा विषयाचा मोह टाळला पाहीजे. तेंव्हा जे व्हायचे तेच झाले.त्या स्त्रियांनी ज्युलियन वर बलात्काराचा आरोप केला व त्याच्यावर स्विडीश पोलिसांनी पकड वॉरंट बजावले.ज्युलियन अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या जाळ्यात सापडला.एक महिन्याने ज्युलियन इंग्लंड ला गैला.तेथेही पकड वॉरंट त्याच्या मागे गेले.नोव्हेंबर २०११ मध्ये त्याला लंडन येथे पकडण्यात आले.पण तो जामीनावर सुटला. फेब्रुवारीत त्याला स्वीडनला परत पाठविण्याचा प्रयत्न झाला.सन २०११ च्या सुमारास विकीलिक्स ने अमेरिकन राजदूताच्या संदेशांच्या तारा ' केबलगेट ' ह्या शीर्षका खाली प्रसिद्ध केल्या आणि सर्व जगात खळबळ उडाली. त्यामध्ये, पैसे वाटून व अन्य सरकारांवर दबाव आणून, अमेरिकन कंपन्यांची ऊत्पादने विकण्याचा ऊद्योग अमेरिकन वकीलाती कडून करण्यात येत होता, याचा ऊल्लेख आहे.ह्यांतील काही भाग भारतातील हिंदू ह्या वर्तमानपत्राने छापला होता.त्यात भारतातील राजकारण्यांनाआणि लोकसभेच्या सभासदांना२५ मि.डॉलर्स ची लाच दिल्याचा उल्लेख आहे.
आतापर्यंत ज्युलियन ला पकडून जामीनावर सोडले होते, त्याचवेळेस त्याला ईलिंगहॅम हॉल ह्या नॉर्थफोक लंडन येथील घरात स्थानबद्ध करून ठेवले होते.विकीलिक्स ने प्रसिद्ध केलेल्या बातमी बद्दल अमेरिकन सरकारकडून एफ बी आय द्वारा चौकशी सुरू झाली होती.तसेच विकीलिक्स व ज्युलियन चे सहकारी यांच्यावर सर्व प्रकारे नजर ठेवली जात होती. त्याच्या सहकार्यांना अमेरिकन विमानतळावर अडकवून ठेवले जात होते.चेलसि मॅनींग,जिने ईराक अफगाण युद्धाची गुप्त माहीती विकीलिक्स ला पुरवली होती,तिला ३५वर्षाची सजा झाली होती,ती सजा प्रे.ओबामाने ७ वर्षांवर आणली.अमेरिकन राजकारण्यांनी,ज्युलियन ची ड्रोन च्या सहाय्याने हत्या करण्यास सहमती दर्शविली होती.विकीलिक्स च्या संगणकावर व नेटवर्क वर हल्ला करून त्यांचे प्रक्षेपण बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. परन्तु विकीलिक्स च्या ईतर समर्थकांनी त्यांच्या संगणकावरून विकीलिक्स चा वार्तालाप चालुच ठेवला. विकीलिक्स चे आर्थिक पाठबळ बंद करण्याचा प्रयत्न झाला.त्याना देणगी देणाऱ्यांची क्रेडिट कार्ड बंद करण्यात आली.परन्तू त्यातून सुद्धा वाट काढून वाकड्या वळणाने विकीलिक्स ला देणग्या मिळू लागल्या.विकीलिक्स च्या संगणकीय माहितीचा ताबा घेण्याचे समन्स पण काढण्यात आले.त्यावर अमेरिकेत गुन्हे दाखल करण्यात आले.अशा प्रकारे ज्युलियन वर सर्व बाजूने हल्ला चढविण्यात आला.
जून २०१२ मध्ये इंग्लंड मध्ये अटक होऊन त्याला स्वीडन मध्ये पाठवले जाऊ नये म्हणून ,ज्युलियन ने ' ईक्विडॉर ' ह्या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या राजदूतवासात आश्रय घेतला.ऑगस्ट मध्ये त्याला इक्वेडोर ने राजकिय आश्रय मंजूर केला.तेथे तो सात वर्ष राहीला.जरी त्याला राजदूतवासातून बाहेर पडता आले नाही ,तरीही विकीलिक्स च्या कारवाया थांबल्या नाहीत.अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन चे ई-मेल व रशियाच्या हस्तक्षेपाची कागदपत्रे उघड करण्यात विकीलिक्स चा हात होता.२०१९ साली स्वीडन च्या पोलीसांनी ज्युलियन वरील लैंगिक गुन्ह्याचे आरोप मागे घेतले.त्याचवेळी त्याला दिलेला राजकीय आश्रय मागे धेण्यात आला व त्याला लंडन येथील बेलमर्श तुरूंगात ठेवण्यात आले.तेथेच ज्युलियन ने त्याची प्रेयसी व त्याच्या दोन मुलांची आई स्टेलाशी२०२२साली लग्न केले.एप्रिल २०२२ मध्ये ज्युलियन असांज चा खटला ब्रिटिश न्यायाधीशाने त्याची अमेरिकेत पाठवणी करण्यास परत ब्रिटिश गृहखात्याकडे धाडला.जून २०२२ मध्ये गृह सचिवाने प्रत्यार्पणाच्या आदेशावर सही केली.ज्युलियन ने ह्या आदेशाविरुद्ध कोर्टात अपील केले आहे.
आजही ज्युलियन माहीती स्वातंत्र्या करीता झगडत आहे.प्रस्थापित सरकार,मोठमोठाल्या कंपन्या,इंटरनेट, माहिती तंत्रज्ञानातील संस्था,यांच्याविरुद्ध त्याचा लढा होता.असे असताना तो गुन्हेगार का ठरविला गेला?अशाच न्यायाने महात्मा गांधी,पं.जवाहरलाल नेहरू, नेल्सन मंडेला,सुद्धा गुन्हेगार ठरतात का?त्याला पलायन करावे लागले.नेताजी सुभाषचंद्र बोस, माओत्सेतुंग,दलाई लामा,ह्यांना सुद्धा पळून जावे लागले.म्हणून ते गुन्हेगार ठरतात का?ज्युलियन ला अनेक पुरस्कार मिळाले.२०११साली विकीलिक्स ची नोबल पुरस्कारा करता शिफारस झाली होती.
ज्युलियन माहिती स्वातंत्र्या करता झगडत होता.माहीती स्वातंत्र्य म्हणजे काय?माहिती स्वातंत्र्यात सर्वांना सर्व माहीती उघडपणे मिळाली पाहीजे.याचा अर्थ कोणालाच खाजगी आयुष्य नाही काय?खाजगी आयुष्यांतील माहीती सुद्धा उघड झाली पाहिजे?आणिक खाजगी माहीती म्हणजे तरी काय?एखाद्या संस्थेने अथवा व्यक्तीने आपला वेळ आणि पैसे खर्च करून काही तंत्रज्ञान तयार केले किंवा एखादे संशोधन केले अथवा संगणकाची एखादी आज्ञावली तयार केली,तर ती माहिती सुद्धा सर्वांना उपलब्ध झाली पाहीजे? त्या संस्थेला कींवा व्यक्तिला त्या शोधलेल्या माहीती पासून काहीच फायदा होऊ नये?ईयान रँन्ड च्या 'ॲटलास श्रग्ड.' ह्या कादंबरीत वरील प्रश्नांचा उहापोह केला आहे.
संगणक तस्करी करून एखाद्याची खाजगी माहीती मिळवणे व त्याच्या बँकेतील पैसे चोरणे,बँक लूटणे,ब्लॅकमेल करणे आदी गैरवर्तन माहिती स्वातंत्र्यात होऊ शकते.कोणतीही चांगली गोष्ट, योजना,जर वाईट हेतू असलेल्यांच्या हाती पडली,तर त्याची माती होते.माहीती स्वातंत्र्याचे असेच झाले.असांज ने त्याच्या कार्यातून कोणाचा असा गैरफायदा घेतल्याचे नमुद नाही.तरीसुद्धा असांज हा एक मनुष्यच आहे.त्याला एकदा स्वीडन मध्ये मोह आवरता आला नव्हता. संगणक तस्करी करण्याची त्याची क्षमता जाणता ,त्यापासून होणाऱ्या वैयक्तिक फायद्याचा मोह त्याच्याकडून आवरला गेला असेल किंवा नसेल,याची कल्पना मला नाही.तरीही तो ज्या प्रकारे माहिती स्वातंत्र्या करीता झगडत राहीला आहे,त्याबद्दल माझा त्याला 'त्रिवार सलाम '.
समाप्त
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेखमाले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील दशम स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच दहावी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच हर्षलनंतर येणारा ग्रह प्लुटो आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील नवम स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील दशम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
१०) दशमस्थान(कर्मस्थान): नोकरी / व्यवसायाचे स्थान: ह्या स्थानाला पितृस्थान कर्मस्थान असेही संबोधण्यात येते.
आज्ञा मान विभूषणानि वसनं व्यापार निद्रा कृषि- ।
प्रवज्या आगकर्म जीवनपशो विज्ञान विद्याः क्रमात् ॥
या स्थानावरून माणूस नोकरी करेल की व्यवसाय ते ठरते. तसेच नोकरी / व्यवसायातीय चढ-उतार समजतात. समाजात मिळणारा मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकार योग, हे या स्थानावरून स्पष्ट होतात.
व्यवसाय, उद्योगधंदा यात लाभणारे वातावरण, वातावरणातील अनुकूलता, सुसंगतपणा, प्रतिकूलता, कार्य करण्याची शक्ती, कार्याच्या उरक, कुवत, कर्तृत्व, यशापयश, सरकारी क्षेत्रात शासनसंस्थेकडून होणारा मानसन्मान प्राप्त होतील की नाही हे समजते. पितृसौख्य, पित्यामुळे लाभणारे वातावरण, पित्याच्या सुस्थिती/ दुःस्थितीमुळे फायदे तोटे, पित्याशी पटणे न पटणे, पित्याचा स्वभाव, झोपेसंबंधी विचार, निद्रासुख झोपेतील विकार, घोरण्याची सवय इत्यादी गोष्टी चतुर्थ व दशमस्थानावरुन पाहातात. निसर्गतः शुभस्थान आहे. राजयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाव.
तसेच हे 'झोपेचे स्थान' पण आहे या स्थानावरून झोपेसंदर्भातील सर्व गोष्टींचा विचार केला जातो. निद्रानाश, अतिझोप, झोपेच्या तक्रारी, झोपेच्या सवयी इत्यादी गोष्टी दशमस्थाना वरून पाहता येतात.
पाश्चात्य पद्धतीत दशमस्थानावरुन आईचा विचार व चतुर्थ स्थानावरुन पित्याचा विचार करतात.
आता आपण १२ राशींमधील दहावी मकर रास पाहूया.
१०) मकर रास : या राशीचा स्वामी शनि आहे. मकरेचा अर्धा भाग जलतत्त्वाचा व अर्धा भाग पृथ्वीतत्वाचा आहे' असे समजले जाते. (मगर जशी जलचर आहे पण जमीनीवरही शांत पडून असते, असा स्वभाव असतो.) पृथ्वीतत्त्वाच्या तीनही राशींमध्ये मकर राशीला पैशाचे महत्व जास्त समजलेले आहे. साधारणपणे उशीरा ( वयाच्या ३२ वर्षानंतर) Successful होतात. सतत कुरकुर करणे हा स्वभाव आहे. Perfection खूप असते. त्यामुळेच पहील्या पेक्षा दुसरी कृती छान असते. सतत better, perfect करण्याची धडपड असते. या राशीमध्ये खूप Patience पण दिसतो आणि चर रास असल्यामुळे काही बाबतीत impatience पण दिसतो. चिकाटी खूप असते. सहसा प्रयत्नवादावर विश्वास ठेवणारी रास आहे स्वतःचे ध्येय स्वतःच्याच प्रयत्नांनी गाठण्याची चिकाटी असते.
या राशीचे स्वरूप म्हणजे हे लोक थोडे काळे सावळे, कमी उंची असे असतात. राशीस्वामी शनि असल्याने हाडे व शिरा दिसतात. राशीचा अंमल गुढघ्यांवरती आहे. त्यामुळे गुढघे दुखीचा त्रास होतो तसेच संधीवाताचाही त्रास होतो. एकूणच हाडांशी संबंधीत त्रास होताना दिसतात. कींवा जे दीर्घ मुदतीचे पण प्राण घातक नसतात, असे आजार होताना दिसतात.
या लेखातील पुढील भागात आपण प्लुटो या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
१०) प्लुटो:- अजून दूरचा आणि अजून उशिरा शोधलेला ग्रह आहे. 1930 साली शोधलेला ग्रह आहे प्लुटोचे कारकत्व हे mass scale वर काम करणारे आहे. मोठ्या प्रमाणातील उत्पात, भूकंप, त्सुनामी, प्लेगची साथ, तसेच world trade center चा accident हे सर्व प्लुटोच्या कारकत्वात येतात/होतात. हानीकारकच फळे मिळतात. प्लुटो ज्या ग्रहांच्या युतीत येतो, त्या ग्रहांचे कारकत्व बिघडवून टाकतो. परंतु गुरु-प्लुटो, तसेच बुध-प्लुटो या युति मात्र बौद्धिक स्तरावरील प्रगती कींवा उत्तम फळे दाखवतात.
प्लुटोचा स्वभाव:
प्लुटो हा तमोगुणी ग्रह आहे. मंगळ व शनि ह्या दोन ग्रहांचे कांहीं गुणधर्म ह्या ग्रहांत पहावयास व कुंडलींत अनुभवास येतात. सामान्यतः हा ग्रह पापग्रह म्हणूनच समजावा लागतो. बारकाईने पाहिल्यास कुंडलींत प्लुटो ज्या स्थानांत असतो त्या स्थानावरून विचारांत ध्यावयाच्या एखाद्या गोष्टींत तरी व्यक्तींच्या आयुष्यांत हटकून एखादें अशुभ फल मिळालेले अनुभवास येतें.
अशुभ म्हणजे त्या व्यक्तीला अपघात होणें, कांहीं दीर्घ मुदतीचा आजार असणें, ती व्यक्ति अल्पायु असणें, असे काहीतरी फल अनुभवास येते. प्लुटोचं दुसरें एक फल बन्याच वेळां अनुवास येतें तें असें की, कुंडलीत हा ग्रह ज्या ग्रहाच्या अंशात्मक युतियोगांत असतो तो ग्रह ज्याचा कारक ग्रह म्हणून समजला जातो त्यासंबंधी व्यक्तीच्या आयुष्यांत कांहीं तरी अशुभ फल मिळतें वा वैचित्र्य घडते.
क्रमशः
मंडळी,
चला तुम्हाला एक प्रश्न विचारतो,आपल्याला ताण येतो का आपण ताण घेतो? याचे उत्तर आहे आपल्याला ताण येतो. एकाच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रमाणात ताण येऊ शकतो. ताण घेणे ही आपल्या कॉन्शस माईंडची प्रक्रिया आहे पण ताण येणे ही आपल्या सबकॉन्शिअस मनाची प्रक्रिया आहे आणि तिथूनच तो ताण तयार होतो.
ताण घालवायचा असेल तर चार ठिकाणी काम करावे लागते: आपल्या अपेक्षा, परिस्थिती, आपले विचार आणि आपले शरीर. ताण घालवणे ही एक कला आहे आणि ज्या व्यक्तीला आयुष्य आनंदात घालवायचे असते त्याला या कलेत पारंगत होणे गरजेचे असते. मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या कलेत पारंगत आहात का? नसाल तर होण्याच्या मार्गाला लागा.
सुमनताई राजहंस ह्यांचे निधन
सुमन ताईंच्या दुःखद निधनाची बातमी समजली व अत्यंत वाईट वाटले. काका व सुमनताई आमच्या रोटरी जीवनाचे अविभाज्य भाग होते. आज आमच्याच जीवनातील एक पर्व संपल्याची क्लेशदायक भावना मनामध्ये उमटून गेली.
रोटरीच्या वाटचालीत अनेक मित्र, मैत्रिणी गवसले. कालौघात, वयोमानपरत्वे काही सोडून ही गेले...कायमचे. पण त्यात काका - सुमनताई ही जोडी आमच्या आयुष्यात विशेष होती. "शोभा तुझ्याकडे फिश खायला अमक्या तमक्या दिवशी येणार आहे" असे आमच्या मातोश्री इतकेच अधिकार वाणीने काका माझ्या पत्नीस सांगायचे. आणी त्याच वेळी सुमनताई सांगायच्या, "शोभा, त्यांना फार आग्रह करू नकोस" आणी मला सांगायच्या की फेलोशिप चा आग्रह नको, नाहीतर दुसर्या दिवशी त्यांना त्रास होतो.
आजारपणात सुमनताईंना भेटावयास आम्ही उभयता 2/3 वेळा घरी गेलो होतो. मधून मधून त्यांचा फोन यायचा किंवा आम्ही फोन करायचो. काका गेल्यावर भरल्या घरातही त्यांना एकटे वाटायचे. शेवटी शेवटी कंटाळल्याचा सूर ही त्यांच्या बोलण्यात यायचा. आयुष्यातील जोडीदाराच्याविना शेवटी आयुष्य किती रित़ वाटतं, ते त्यांच्या बोलण्यातून उमगायचं. ह्या जोडीच्या प्रेमळ सहवासातील अनेक सुखद आठवणी त्या आमच्यासोबत सोडून गेल्या.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो !
राजहंस कुटुंबीयांस हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रभुचरणी प्रार्थना !
🕉 शांती
अरूण व शोभा कुदळे
४ मार्च २०२३
इंटरॅक्ट क्लब
१९ मार्च २०२३
रक्तदान शिबीर
२३ मार्च २०२३
RYLA कार्यक्रम : मॉडर्न कॉलेज, पुणे
Feedback from members:
Dear all, thank you very much 🙏🙏for your participation and wholehearted efforts which made today's RYLA program a grand success👍👍🙏🙏
Thank you to Chairperson Vinitatai for giving me this opportunity and to all those who came and supported us and missed all those who could not come 🙏🙏
Thank you Ann Vinitatai, Rtn PP Sham Sir, Ann Sunita, Rtn Prabhune ji, Rtn Dattaji and Ann Anjali Deodhar, Mr. Pushkar Kulkarni, PP Rtn Sudarshan, Rtn Milind, Rtn Madhuri, Ann Yamini for coming and supporting the RYLA program.
Annet Pushkar gave an excellent talk on How to establish your brand in the corporate world. Many hearty congratulations for the same🌹🌹🎊🎊We are proud of you!
We were very happy to welcome Lt. Gen. B.T. Pandit (Retd.) at our club on 6th March 22023, in our regular weekly meeting. He was accompanied by his wife Mrs. Pushpa, who has been his support system on home front. Mr. Pandit, age 88 years is very fit and young at heart. He is a brave veteran of 1971 war with Pakistan, in which he was on forefront as commander and won the battle on western border. He is decorated with most coveted Vir Chakra & P.V.S.M. for his bravery and successful leadership.
He retired from the post of Lt. General of Core of Engineer in 1982, after a long and meritorious service. His proud legacy of service to the nation is continued by his next generation. His elder son Mr. Ravindra is a PVSM & AVSM and currently serving as Vice Admiral in Indian Navy in New Delhi. His son-in-law Mr. Suneel Soman, is PVSM, AVSM & VM, who retired as Air Marshal in 2015, from Indian Air Force.
He delivered a lively lecture on his memories of 1971 war, coupled with a slide show and shared his thrilling experience. At the end of the lecture he was happy to answer the questions of our learned members.
He was introduced to our members by Rtn. Ajit Phadke & the vote of thanks was proposed by Rtn. Shweta Karandikar. The meeting was followed by a fellowship dinner.
दि. १३ मार्च रोजी आपल्या क्लबमधे एका वेगळ्याच विषयावर व्याख्यान झाले, स्पीकर होते श्री. श्रीराम सबनीस. ते ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक असून यामिनी पोंक्षेचे ज्योतिषातील गुरु आहेत. हर्षल ग्रहाचा वाढदिवस असल्यामुळे या ग्रहाच्या करामती असा विषय होता.
हर्षल ग्रह हा विचित्र, तापट, रूढीपरंपरांना छेद देणारा, अग्नी तत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे तीव्र परिणाम देणारा, स्फोटक व विचित्र ग्रह आहे. बुध हर्षल, गुरु हर्षल, मंगळ हर्षल, रवी हर्षल, चंद्र हर्षल, शुक्र-हर्षल, अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मुळे होणारे वेगवेगळे परिणाम त्यांनी दाखवून दिले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तिच्या पत्रिकांची चर्चा झाली, उदाहरणार्थ राजीव गांधी, अंबानी भावंडं, न्युटन, सावरकर, महर्षि कर्वे, राजा रवी वर्मा, लता मंगेशकर वगैरे वगैरे. खुद श्रीराम सबनीस यांची पत्रिका मांडून यामिनीने त्यांची ओळख करून दिली श्रीराम सबनीस यांनी DRDO, HEMRL येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. कार्यक्रम वेगळा व छान झाला.
आपण आपल्याच रोटेरियंसना किती कमी ओळखतो हे अधोरेखित करणारा टर्निंग पॉईंट्स हा रो.मिलिंद क्षीरसागर यांचा कार्यक्रम झाला. त्यांनी सुरुवातीच्या शिक्षणापासून ते आत्तापर्यंतचा आयुष्याचा प्रवास पूर्ण उलगडून दाखवला आणि त्या प्रवासात आलेले मोठे टर्निंग पॉईंट्स अधोरेखित केले.
सुरुवातीला दुबईत केलेली वेगवेगळी कामे, कठीण परिस्थितीत तिथे घेतलेले कष्ट, त्यानंतर रिलायन्स कंपनीमध्ये महत्त्वाच्या एरियामध्ये केलेली नोकरी आणि तिथे मिळवलेले यश, त्यानंतर एज्युकेशन सॉफ्टवेअर मध्ये केलेले अडवेंचर अशा अनेक गोष्टी आपल्या ट्रेडमार्क शैलीमध्ये मिलिंद यांनी सांगून सगळ्यांना गुंग करून करून टाकले. या प्रवासात गौरीने दिलेल्या साथीचं मिलिंद सकट सर्वांनीच कौतुक केले.
२६ मार्च २०२३
"झपूर्झा - कला व संस्कृती संग्रहालय" येथे भेट
Good turnout by our members too.
Thank you President for arranging the tasty lunch 🙏🏼.