Southern Star-August21







लर्न, अर्न अँड रिटर्न

आपण समाजाकडून शिकत असतो... त्याच्याकडून पैसे मिळवत असतो... तर मग त्याची काही अंशी परतफेड म्हणून आपण समाजाला देणं हे लागतोच.

आपल्या संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही आठवून बघा... कोणत्याही कार्यात दान हे सांगतातच. हे मला वाटतं त्या उद्देशानंच आहे की, आपण समाजाला दान केलं पाहिजे. अर्थात या दानाला महत्त्वाचं विशेषण जोडलेलं आहे ते म्हणजे यथाशक्ति.

कुणी किती दान दिलं, कुणी किती समाजसेवा केली यावर आपलं दान किंवा समाजसेवा ठरत नसते तर ती आपल्या इच्छेनुसार, शक्यतेनुसारच असते.

परत हे दान, हे समाजाचं देणं हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. ते आर्थिक स्वरूपातच असायलाच हवं असं काही बंधन नाही त्यामुळं एखादा सामाजिक उपक्रमाला आर्थिक मदत देऊ करेल किंवा एखादा त्याचे अनुभव, गुण, कौशल्य यांचं योगदान करेल. एखादा तो सामाजिक उपक्रम घडावा, प्रत्यक्षात यावा याकरता वेळ देईल. अशा एक ना अनेक मार्गांनी आपण समाजाचं हे जे देणं आहे ते देत असतो, देऊ शकतो.

रस्त्यानं जाताना आपण एखाद्या भिकाऱ्याला काही पैसे देतो किंवा आपल्या घरातले कपडे आपण होतकरूंना किंवा मोलकरणींना देतो. हेही एक प्रकारे दानच आहे म्हणजेच या-ना-त्या मार्गानं आपण यथाशक्ति दान करतच असतो, समाजाचं देणं देतच असतो.

या समाजाच्या देण्याचं वैश्विक, सुसूत्र आणि पारदर्शी रूप म्हणजे रोटरी.

रोटरी आपल्याला समाजसेवेचं, समाजाला देणं देण्याचं यथाशक्तिपलीकडलं देणं देण्याचं बळ देते. त्याचं मुख्य कारण हे समाजाचं देणं, समाजसेवा हे अनेक जण एकत्र येऊन करत असल्यामुळं त्या वैयक्तिक यथाशक्तित कैक पटींत वाढ होते त्यामुळं त्यातून मिळणारा आनंद, समाधान हेही कैक पटींत वाढतं. एखाद्या समाजसेवेत यथाशक्तिमुळं सहभागी होऊ शकलो नसतो किंवा ती समाजसेवा करू शकलो नसतो पण इथं रोटरीत सहभागी झाल्यामुळं ते शक्य होतं.

समाजसेवा, समाजाचं देणं देण्याकरता रोटरीच्या छत्राखाली एकत्र आल्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोक भेटतात, दिग्गज भेटतात. नवनवीन मित्रमैत्रिणी होतात. इतकंच काय तर आपण आपल्या अनुभवांचा, गुणांचा, कौशल्याचा जसा उपयोग समाजसेवेकरता, समाजाचं देणं देण्याकरता करतो तसा त्याचा उपयोग या आपल्या रोटरीतल्या मित्रमैत्रिणींकरताही करू शकतो. तसाच त्यांचाही आपल्याला उपयोग होतो.

थोडक्यात काय तर रोटरीत केवळ दान नाही तर आपापल्या अनुभव, कौशल्य, गुणांचं आदानप्रदान होतं.

हे समाजाचं देणं कुणी वैयक्तिक पातळीवरच ठेवू इच्छित असेल, कुणी कोणत्या विशिष्ट सामजिक संस्थेमार्फत पण ते रोटरीद्वारे असेल तर त्या दानाला ओळख निर्माण होते कारण रोटरी ही एक वैश्विक, सुसूत्र आणि पारदर्शी संस्था आहे.

तर मंडळीऽ तुम्ही तुमच्या संपर्कातल्या किमान एका व्यक्तीची भेट मेंबरशिप डेव्हलपमेंट कमिटी चेअर किंवा त्या कमिटीतल्या सदस्याशी घालून द्या.

हे तुम्ही केलेलं महत्दान सत्पात्री ठरो ही दृढ इच्छा!

These short articles about Rotary were first published in the weekly bulletin of the Rotary Club of North Stockton, California, U.S.A. That was well before their author, Cliff Dochterman, became president of Rotary International for the year 1992-93. Originally called "Did Ya Know?" the pieces were prepared to share interesting facts about Rotary International with members of the North Stockton club. Later, in response to requests from other Rotary clubs, the articles were reprinted in collected form.

In each of our bulletin issues we are going to learn about these interesting facts.

02 ROTARY'S WHEEL EMBLEM

A wheel has been the symbol of Rotary since our earliest days. The first design was made by Chicago Rotarian Montague Bear, an engraver who drew a simple wagon wheel, with a few lines to show dust and motion. The wheel was said to illustrate "Civilization and Movement." Most of the early clubs had some form of wagon wheel on their publications and letterheads. Finally, in 1922, it was decided that all Rotary clubs should adopt a single design as the exclusive emblem of Rotarians. Thus, in 1923, the present gear wheel, with 24 cogs and six spokes was adopted by the "Rotary International Association." A group of engineers advised that the geared wheel was mechanically unsound and would not work without a "keyway" in the center of the gear to attach it to a power shaft. So, in 1923 the keyway was added and the design which we now know was formally adopted as the official Rotary International emblem.

वृक्षारोपण

१ जुलै २०२१

आपल्या रोटरी नववर्षाचा प्रारंभ १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाने झाला. सकाळी सर्वजण दत्ताजी देवधर यांच्या फार्म हाऊस वर जमले. सकाळचा सुरेख नाष्टा घेऊन सरस्वती विद्यालय अंबवणे येथे वृक्षारोपण केले. माननीय तहसीलदार शिवाजीराव शिंदे साहेब व मुख्याध्यापक कुंभारे सर तेव्हा उपस्थित होते. त्यानंतर दत्ताजींच्या फार्म हाऊसवर अंजली ताईंनी सुरेख जेवणाची सोय केली होती. आपले रवींद्र प्रभुणे व नितीन पाठक यांनी रोपे आणण्याची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाला नितीन कुर्ले यांनी विशेष मदत केली. क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. मृदुला घोडके, माधुरी किरपेकर, अंजली पाषाणकर, स्वाती वेलणकर, किरण वेलणकर, सुनिता प्रभुणे, सुदर्शन व सुगंधा नातू , विनायक देशपांडे हे उपस्थित होते. वर्षाचा पहिला कार्यक्रम सुरेख पार पडला. या कार्यक्रमाकरिता दत्ताजी व अंजलीताई देवधर यांनी बरेच परिश्रम घेतले.

रुजवू पालकतत्त्व संवाद व ग्रामीण हिरकणी भेट

१० जुलै २०२१

पालकत्व निभावणं किती अवघड आहे याची जाणीव आपल्याला असतेच. ग्रामीण भागातील कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण आजही फार वेगळे आहे. त्यामुळे तेथील आईची पालकत्वाची जवाबदारी अधिकच आव्हानात्मक असते.
त्यांना पुढची पिढी आणि पर्यायाने समाज घडविण्यासाठी सक्षम करण्याचे मार्गदर्शन ज्ञानप्रबोधिनी गेली सात वर्षे करीत आहे.
नवीन वर्षाच्या प्रारंभी Child and Maternity Avenue च्या अंतर्गत आपण सर्वजण एका प्रकल्पात सहभागी झालो. ज्ञानप्रबोधिनी च्या हिरकणी प्रकल्पात 0 ते 6 वर्षाची मुले आणि त्यांच्या माता यांना प्रशिक्षित केले जाते . यासंबंधी सुजाण पालकत्व या विषयावर एक ऑनलाईन सभा १० जुलै २०२१ रोजी आयोजित केली होती.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेऊन आपण अनेक हिरकण्यांना त्यांची स्वप्नं साकार करण्यास हातभार लावला. एक प्रकारे सामाजिक पालकत्व निभावण्याचे समाधान मिळविले. दोन हिरकणींना ६ महीने सपोर्ट करू शकू एवढे योगदान आपण केले आहे. रो विजया गुजराथी यांनी याकरिता पुढाकार घेतला
आपल्या क्लब ने उत्तम प्रकारे मदत केली त्याबद्दल सुवर्णाताईंनी व उमा बापट यांनी पुणे साऊथ चे आभार व्यक्त केले आहेत.

स्वप्न त्यांचं, साहाय्य तुमचं ! बाल्यधून-आयोजित रुजवू पालकतत्त्व संवाद व ग्रामीण हिरकणी भेट!
असा अनोखा प्रयोग आपल्या मदतीने संपन्न झाला. मनापासून धन्यवाद.
या उपक्रमाची वैशिष्ट्ये
* वैयक्तिक सहभागातून, कृतिशील प्रतिसादातून निधी जमा
* ६० व्यक्तींपर्यंत बाल्यधून-प्रकाशित, उमा बापट लिखित रुजवू पालकतत्त्व या पुस्तकाच्या प्रती पोहोचल्या.
* पुणे रोटरी क्लब साऊथ विभागाच्या सदस्यांनी वैयक्तिकरित्या या उपक्रमात सहभागी होऊन या जनसहभागाला जोड दिली.
* एकूण ३० हजार रुपये इतकी रक्कम एकत्रित प्रयत्नातून या जन सहभागातून स्वयंप्रेरणेनी उभी राहिली. ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती ग्रामीण : हिरकणी प्रकल्पाच्या विनियोगासाठी ही रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली.
सहभागींची वैशिष्ट्ये : तरुण ते जेष्ठ नागरिक; पुणे, ठाणे, खोपोली, सोलापूर, केरळ, सिंगापूर, अमेरिका, बलगेरिया अशा विविध ठिकाणांहून सहभागी; गृहिणी, कलाकार, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, प्राध्यापक, संशोधक, भाषातज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातल्या मंडळींचा सहभाग; १ वर्ष वयाच्या मुलाच्या पालकापासून, आजी आजोबा झालेले पालकही सहभागी.
* दि. १० जुलै २०२१, शनिवारी संध्याकाळी ६ ते ७.३० या वेळात या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांसाठी ऑनलाईन माध्यमातून सत्र घेतले. उमा बापट यांनी त्यांच्या पुस्तकाच्या आधारे पालकतत्त्व उलगडून दाखवत, त्यात सामाजिक पालकत्वाची सहज गुंफण कशी करता येऊ शकते अशी मांडणी केली. सुवर्णा गोखले (प्रमुख, स्त्री शक्ती ग्रामीण) यांनी २०१४ पासून सुरू झालेल्या हिरकणी प्रकल्पाची माहिती देणारे अनुभव कथन केले.
* काही लोकांच्या वैयक्तिक अधिक देणगीतून ग्रामीण भागातून ९ हिरकणी प्रशिक्षका या सत्रात सहभागी होऊ शकल्या.
* या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून वेल्हे परिसरातील दोन गावात ६ महिने हिरकणी प्रकल्प पूर्ण राबवणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर २० हिरकणींचे प्रशिक्षणही या आर्थिक मदतीने प्रत्यक्षात उतरेल.

धन्यवाद,
उमा बापट, सुवर्णा गोखले

गरजू विद्यार्थ्यांना मोबाइल वाटप

१३ जुलै २०२१

गेली वर्षभर शाळा ऑनलाइन सुरू आहेत. वसंत दादा पाटील या शाळेमध्ये आपण इको क्लब अनेक वर्षे घेत आहोत. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्याकडे नव्या व जुन्या १० स्मार्टफोनची मागणी केली होती. त्यानुसार आपण ३० जून व १३ जुलैला त्यांना ११ स्मार्टफोन्स दिले. ॲन सुगंधा नातू व रो. माधुरी किरपेकर यांनी प्रत्येकी २ नवीन फोन्स दिले. रो. हेमंत वाळिंबे यांनी ४ , अविनाश शहाणे यांनी १ , फर्स्ट लेडी नंदिनी अत्रे यांनी १ व पल्लवी नातू यांनी १ असे जुने स्मार्टफोन्स दिले.

बीजारोपण

१६ जुलै २०२१

१६ जुलै रोजी आपल्या क्लब तर्फे बीजरोपणाचा कार्यक्रम श्री प्रभूणे यांच्या आनंदवन येथील जागेत करण्यात आला. आंब्याच्या कोयी या माती व खत या सकट प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवण्यात आल्या. पुढची ३ वर्षी त्यांना पाणी दिले व निगा राखली की मग त्यांची आंब्याची रोपे तयार होतील. सकाळी ८ वाजता सर्वजण पुण्यातून निघाले. रो. रवींद्र व ॲन सुनिता प्रभूणे यांनी गरम पोहे, शिरा, साबुदाणे वडे, ब्रेड ऑमलेट, चहा व कॉफी असा सुंदर नाष्टा ठेवला होता. नाष्टा झाल्यावर सर्वांनी सुमारे २ तास आंब्यांच्या कोयींचे बीज रोपण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये केले.एका तासात ४०० कोयींचे बीजरोपण करण्यात आले. पी पी डॉ राजेंद्र गोसावी, पी पी श्याम कुलकर्णी, पी पी विनायक देशपांडे, रो. अरविंद शिराळकर, रो. नितीन कुरले, ॲन अंजली पाषाणकर, रो. संगीता देशपांडे, ॲन सुगंधा व आय पी पी सुदर्शन नातू, रो. संजीव ओगले, पी पी डॉ गोरे, ॲन इंद्रायणी पूर्णपात्रे, रो. किरण वेलणकर, रो. मिलिंद क्षीरसागर, रो. भाऊ सहस्त्रबुद्धे हे उपस्थित होते. रो. दत्ताजी देवधर हे त्यांचे मित्र श्री जोशी यांच्या सहित उपस्थित होते. पी पी डॉ रो. गोरे सरांचे मित्र श्री सोमण सुद्धा उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे रो. रविंद्र व ॲन सुनिता प्रभूणे यांनी केले होते. अव्हेन्यू डायरेक्टर पी पी डॉ गोरे सर यांचे मार्गदर्शन होते. संपूर्ण कार्यक्रम सुंदर व नीटनेटका झाला.

एड्स बाधित रुग्णांना धान्य वाटप

१७ जुलै २०२१

१७ जुलै २०२१ रोजी आपल्या एड्स पेशंट रिहॅबिलिटेशन कमिटी तर्फे आपण एड्स ने बाधित रुग्णांच्या कुटुंबीयांना धान्य वाटप केले. प्रत्येक कुटुंबाला आपण दर महिन्याला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, ४ किलो साखर व १ लिटर तेल देतो. डायरेक्टर विनायक देशपांडे व कमिटी चेअर पर्सन अरविंद मावळणकर यांच्या पुढाकाराने आपण १५ कुटुंबांना धान्य वाटप केले. त्यावेळी प्रेसिडेंट रो. अतुल अत्रे,  फर्स्ट लेडी नंदिनी अत्रे, पी पी विनायक देशपांडे, रो. अरविंद मावळणकर, रो. किरण वेलणकर उपस्थित होते. शासकीय निर्बंधांमुळे मर्यादित उपस्थिती हा कार्यक्रम ग्राहक पेठ येथे पार पडला.  या उपक्रमाकरिता रो. अरविंद मावळणकर यांनी रुपये १०,००० आपल्या ट्रस्टला दिले.

District Felicitation for Satellite Club

20th July 2021

On 20th July our club got felicitated at the hands of Past District Governor Rtn. Ravi Dhotre in presence of Rotary International President Rtn. Shekhar Mehta at the ceremony of installation of District 3131 Governor Rtn. Pankaj Shah.

Rotary Club of Pune - South president Rtn. Atul Atre , Rotary Club of Pune South Membership Director Rtn. Yogesh Nandurkar and Rotary Satellite Club of Pune South Gold - Secretary Rtn. Aditi Kirpekar were felicitated for the formation of Satellite Club.

It's a vibrant club of youngsters from varied industries. Club extension committee led by Rtn. Abhijit Deshpande took great efforts to form this Satellite Club.

रोटरी रोटरॅक्ट क्रिकेट सामना

२५ जुलै २०२१

२५ जुलै रोजी दुपारी ४ ते ६ आपण व आपले रोट्रॅक्टर्स असे असे सर्वजण मिळून क्रिकेटचे सामने खेळलो. 

सुमारे २० रोट्रॅक्टर्स मुले व मुली उपस्थित होते. आपल्याकडून ऋषिकेश बडवे, योगेश नांदुरकर, राघवेंद्र पोंक्षे, संजीव व स्नेहा ओगले, निरंजन व आरव ठाणगावकर, सुभाष करंदीकर, मिलिंद क्षीरसागर, जितेंद्र व मिहीर महाजन,संदीप विळेकर तसेच मंदार अंबिके यांनी भाग घेतला. तसेच उदय किरपेकर व माधुरीचा जावई यांनीसुद्धा उत्साहाने भाग घेतला. सर्व सामने उत्कृष्ट व नियोजन बद्ध झाले. सर्वांना प्रोत्साहन देण्याकरता माधुरी व आदिती किरपेकर, फर्स्ट लेडी नंदिनी, गौरी क्षीरसागर तसेच प्राजक्ता बडवे उपस्थित होत्या. खेळ संपल्यावर सर्वांकरता चहा व कॉफीची सोय केली होती. आजच्या कार्यक्रमाकरिता आपल्या रोटरॅक्ट क्लबने पुढाकार घेतला होता. अध्यक्ष दिव्या गांधी हिने उत्तम नियोजन केले होते तसेच रोटरॅक्ट कमिटी चेअरपर्सन रो. राघवेंद्र पोंक्षे यांनी मार्गदर्शन केले.

अशा रीतीने एक उत्तम स्पोर्ट्स फेलोशिप आज पार पडली. अशीच फेलोशिप परत करावी अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली.

प्रेसिडेंट व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इंस्टॉलेशन

५ जुलै २०२१

५ जुलै सोमवार सकाळचे ११.३० वाजलेले.  पी वाय सी च्या हॉल मध्ये लगबग सुरू होती. नवनिर्वाचित अध्यक्ष रो. अतुल अत्रे आणि त्यांचे संचालक मंडळ यांच्या इन्स्टॉलेशन च्या कार्यक्रमाची धूमधाम सुरू होती. फर्स्ट लेडी नंदीनीने साऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आखून दिली होती आणि त्याच्या काटेकोर अंमलबजावणी कडे तिचे जातीने लक्ष होते. 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून DGN रो.मंजू फडके व विशेष अतिथी म्हणून PDG रो.भाऊसाहेब कुदळे आमंत्रित होते. ईतरही काही मान्यवर व मोजकेच रोटेरियन्स व ॲनस् उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत मास्टर ऑफ सेरिमोनी रो.मृदुला घोडके हिने केले व मावळते अध्यक्ष रो.सुदर्शन नातू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम RI प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्या मातोश्री यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दीप-प्रज्वलन व गणेशवंदना या नंतर मावळते अध्यक्ष रो.सुदर्शन नातू यांनी गतवर्षातील ठळक व महत्वाच्या प्रकल्प, उपक्रम व घटना यांची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर मावळते अध्यक्ष व सचिव तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव ह्यांच्यात रिबन व पीनची अदलाबदल झाली. परस्परांना भेटवस्तूंचे आदान प्रदान करण्यात आले आणी जागांची अदला बदल पण झाली. प्रेसिडेंट रो.अतुल अत्रे ह्यांनी नवीन थीमच्या बॅनरचे अनावरण केले. "Serve to Change Lives" ह्या नव्या थीमचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुण्या DGN रो.मंजू फडके ह्यांच्या हस्ते सर्व संचालकांना पीन प्रदान करण्यात आली. सर्व संचालक व ॲनस्स यांचा थोडक्यात परिचय करुन देण्यात आला. ॲन स्वाती वेलणकर ह्यांनी प्रेसिडेंट रो.अतुल अत्रे ह्यांचा विस्तृत परिचय करुन दिला.

आपल्या भाषणात सुरवातीला प्रेसिडेंट यांनी पूर्वसूरींची आठवण ठेवत ज्या ज्या रोटेरीयन्सनी त्यांना रोटरीत आणले, विविध भूमिकेत काम करण्याची संधी दिली त्या सर्वांचे आवर्जून आभार मानले. मावळत्या व तत्पूर्वीच्या अध्यक्षांच्या कामाचा गौरवपूर्वक उल्लेख करुन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढील वाटचाल सुरू राहिल ह्याची ग्वाही दिली. गतवर्षी क्लबच्या चार सदस्यांचा करोनाने बळी घेतला त्यांच्या स्मृतीस वंदन करुन त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला.

रो. वर्ष २१-२२ ह्या कार्यकालात मागिल वर्षातील Happy Home, सद्भावना कॅम्प काश्मीर, गोदान असे प्रकल्प पुढेही चालू राहतील हे त्यांनी सांगितले. नविन सॅटेलाईट क्लब्स स्थापिले जातील व त्यायोगे सदस्य वाढीसाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. एक सॅटेलाईट क्लब लगेचंच सुरु होत असल्याची सुवार्ताही दिली. एकंदरीत क्लबची उज्वल परंपरा त्याच उर्जेने पुढे नेण्यात येईल याची खात्री त्यांनी दिली.

त्या नंतर क्लबच्या रो. वर्ष २०२१-२२ रोस्टरचे प्रकाशन विशेष अतिथी PDG रो.भाऊसाहेब कुदळे ह्यांच्या हस्ते व  क्लब बुलेटिन "सदर्न स्टार" चे प्रकाशन प्रमुख पाहुण्या DGN रो.मंजू फडके ह्यांच्या हस्ते करण्यात आले. रोस्टरचे काम रो. भाऊ सहस्रबुद्धे यांनी पहिले तर रो. वर्ष २०२१-२२ क्लब बुलेटिनचे संपादक म्हणून रो.अभिजित देशपांडे काम पाहतील.  

विशेष अतिथी व आपल्या क्लबचे सन्माननीय सभासद PDG रो.भाऊसाहेब कुदळे ह्यांचा परिचय पी.पी.रो.डॉ राजेंद्र गोसावी ह्यांनी करुन दिला. 

आपल्या भाषणात भाऊसाहेबांनी IPP रो.सुदर्शन ह्यांच्या कामाची प्रशंसा करत प्रे.रो.अतुल अत्रे पण तितकीच सरस कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला. फाउंडेशनला गेल्या वर्षभरात जास्तीत जास्त देणग्या दिल्याबद्दल ही अभिनंदन केले. बोलता बोलता त्यांनी तीन प्रकारच्या माणसांचे उदाहरण दिले One who make things happen, second who watch things happen and the third who wonders what happened. त्यांनी प्रे.रो.अतुल हे पहिल्या वर्गवारीतील असल्याचे सांगितले. त्यांच्या कर्तबगार पूर्वसूरींचा वारसा ते नक्की पुढे चालवतील अशी खात्री दिली. शेवटी जाता जाता पुढील चार ओळी त्यांनी म्हणल्या

पाना है जो मुकाम, वो मुकाम पाना अभी बाकी है।

अभी तो आये है मैदानपर, अभी आस्मानकी उडान बाकी है।

लोगोंने चुना है आपका नाम, अब इस नाम की पहचान बनाना बाकी है।  

प्रे.रो.अतुल ह्यांना अशी ओळख निर्माण करण्याचे आवाहन करुन त्यांनी भाषणाची सांगता केली.

त्यानंतर प्रमुख अतिथी DGN रो.मंजू फडके ह्यांचा ई परिचय करुन देण्यात आला. आपल्या भाषणात DGN रो.मंजू फडके यांनीही मावळते अध्यक्ष रो.सुदर्शन यांचे कौतुक केले. सतत करोनाचे संकट डोक्यावर असून सर्व अडचणी पार पाडून त्यांनी केलेले काम कौतुकास्पद होते. पुणे साऊथ क्लब प्रमाणेच इतरही क्लब्सनी नवनविन क्षेत्रात असेच उल्लेखनीय काम केले आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. आजवर ज्या क्षेत्रात आपण कधीच काम केले नाही अशा अनेक क्षेत्रात ह्या निमित्ताने काम उभे राहिले हे ह्या वर्षाचे वैशिष्ट्य! जगभरातील लाखो रोटेरियन्सनी जगाला हे दाखवून दिले की आम्हीही बदलू शकतो व बदल घडवून आणू शकतो. आम्ही आमचे विचार बदलले, प्रकल्प बदलले इतकेच नाही तर घरी बसुन प्रकल्प कसे राबवायचे त्याची पध्दतही बदलली. आम्ही हे सिध्द करुन दाखविले की आमच्या कामात आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. अशा ह्या संस्थेचे सभासद असण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही एक प्रकारे ह्या बदलत्या काळाचे प्रेरक बनलो असे मला वाटते असेही त्या म्हणाल्या

त्या पुढे म्हणाल्या सद्भावना कँप, ग्लोबल ग्रांटस्, स्त्री सक्षमीकरण अशा सर्वच बाबतीत ह्या क्लबची कामगिरी सरस राहिली असं म्हणावं लागेल. प्रत्येक वर्षी मागिल अध्यक्षापेक्षा अधिक चांगली कामगारी करण्याची आपली प्रथाच आहे आणी IPP रो. सुदर्शन यांनी ती उत्तम रितीने पार पाडली या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. १००% डोनर्स क्लब म्हणून सुध्दा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करुयात.

ह्यावेळी त्यांना DGN म्हणून निवडून आणल्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. सरते शेवटी प्रमुख पाहुण्या ह्या नात्याने त्यांनी प्रे.रो.अतुल ह्यांना तीन सल्ले पण दिले. 

सर्व सहकारी व सभासद ह्यांना खूश ठेवून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेणे हे अध्यक्षांचे काम आहे. त्यानी फुटबाॅल कोच सारखे वागावे. प्रेक्षकांना खूश ठेवण्याकडे अजिबात लक्ष देवू नये. त्याने खेळाडू उत्तम खेळतील एवढेच बघावे.  प्रेक्षक आपोआप खूश होतील. अध्यक्षाने पण सहकार्‍यांना खूश ठेवावे व त्यांच्या सहभागाकडे लक्ष द्यावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या मार्फत प्रकल्प राबवल्याने समाजाचा फायदा आपोआप होईल.

एखादा सभासद कामात सहभागी होत नसेल तर त्याच्या अंतरंगात डोकावून त्याला कामाला उद्युक्त करावे. रोटरीच्या कामाची शिस्त व पध्दत वाखाणण्याजोगी आहे. त्याचे काटेकोर पालन करावे त्याच बरोबर कामात लवचिकता असावी व काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, हे चांगल्या नेत्याचे लक्षण आहे.

सर्व चांगले असूनही रोटरीची समाजातील प्रतिमा तितकीशी चांगली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सोशल मिडिया वरुन रोटरीच्या कार्यध्दती बद्दल लिहावे व त्याचा प्रचार करावा. सर्वांशी बोलताना रोटरीचा आवर्जुन उल्लेख करावा. रोटरीची प्रतिमा उंचावण्या साठी सर्वांनी एकत्र येवून  प्रयत्न करुयात एवढे बोलून त्या थांबल्या.

अध्यक्षांनी सर्व मान्यवरांचा व अतिथींचा सन्मान केला. सचिव रो.किरण वेलणकरांनी पहिल्या सप्ताहातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. PE रो.संजीव ओगले यांनी सर्वांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

या कार्यक्रमाला AG रो.धनश्री जोग तसेच AGA रो.मुकेश सोनी हे देखील उपस्थित होते.

ह्या सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रो. मृदुला घोडके ह्यांनी केले. व्यासपीठा मागिल पडद्यावरील प्रेझेंटेशनचे संचालन करुन रो.हेमंत वाळिंबे ह्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच खूप कष्ट घेतले. संख्येच्या मर्यादे मुळे सर्व सभासदांना आमंत्रित करता आले नाही पण रो.अभिजित देशपांडे ह्यांच्या सहकार्याने झूमवर सर्व कार्यक्रमाची प्रस्तुती सहज सुंदर व विना व्यत्यय करता आली.

ऋषी कुलकर्णी एक सांगीतिक प्रवास

१२ जुलै २०२१

रोटरी क्लब साऊथचे नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल अत्रे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर चा पहिलावहिला सांस्कृतिक कार्यक्रम खूपच अप्रतिम झाला.
प्रथम प्रे अतुल यांनी नवीन रोटरी वर्षात सर्वांचे स्वागत केले. तसेच नवीन वर्ष सुरु झाल्यावर १जुलै रोजी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम व ५ जुलै रोजी झालेल्या इंस्टॉलेशन कार्यक्रम बदल माहिती दिली. या वेळेस त्यांनी रो. दत्ताजी देवधर व देवधर कुटुंबीय यांचे वृक्षारोपण कार्यक्रम वेळेस केलेल्या आदरातिथ्याबद्दल क्लब सदस्यांतर्फे आभार मानले. तसेच IPP रो. सुदर्शन नातू व ॲन सुगंधा यांनी मागील वर्षी केलेल्या उत्तम कामाबद्दल त्यांचेही कौतुक केले व आभार मानले.
सेक्रेटरी रो. किरण वेलणकर यांनी मागील आठवड्यात वाढदिवस असलेल्या सदस्यांना क्लब तर्फे शुभेच्छा दिल्या तसेच १२ जुलै रोजीचा कार्यक्रमाची माहिती दिली.
यानंतर ऋषी कुलकर्णी एक सांगीतिक प्रवास या कार्यक्रमाने वर्षाची सुरुवात अप्रतिम झाली. ऋषी कुलकर्णी यांची मुलाखत रोटेरियन मृदुला घोडके यांनी घेतली . तो जी वेगवेगळी नऊ प्रकारची वाद्य वाजवतो त्याबद्दल त्याच्याकडून माहिती जाणून घेतली. ऋषी कुलकर्णी चे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पारंपारिक वाद्य तबला हे तर तो वाजवतोच शिवाय इतरही तालवाद्य तो वाजवतो. ऋषीराज हा उस्ताद झाकीर हुसेन यांचा लाडका वादक आहे. तसेच जी तालवाद्य भारतात मिळत नाहीत ती सर्व भारतात मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मागणी नुसार तो ती वाद्ये उपलब्ध करून देतो आणि शिकवतो. राववास्त हे एक रशियन वाद्य आहे. कालच्या कार्यक्रमात त्याने सर्व प्रेक्षकांना तबला हे भारतीय वाद्य, राववास्त हे रशियन वाद्य व मशिने हे जर्मन वाद्य यांचे फ्यूजन ऐकवले. ऋषी कुलकर्णी याने ए. आर .रहमान यांच्याकडे संगीतातील शिक्षण घेतले आहे. त्यांच्या K M म्युझिक काँझरव्हेटरीच्या बेस्ट हिंदुस्तानी म्युझिक परफॉर्मर पुरस्काराचा तो मानकरी आहे.
त्याच्याकडे असलेल्या वाद्यांचा खजिना खूपच अलौकिक आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व वाद्य हाताने बनवलेली आहेत कुठेही मशीनचा वापर नाही. कालच्या कार्यक्रमात त्याने तबला, राववास्त,मशिने ,कलिंबा ,झपीर विंड चाइम्स आणि नेटिव्ह अमेरिकन फ्लूट व रेझोनन्स बार याबद्दलही खूप माहिती सांगितली.
शेवटी रो. माधुरी किरपेकर यांनी या कार्यक्रमाकरिता ज्यांची मदत झाली त्या रो. हेमंत वाळिंबे व रो. अभिजित देशपांडे तसेच व्हिडिओ शूटिंग करीता राधेय व उत्तम सहभागाबद्दल क्लब सदस्यांचे व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
आपल्या नवीन सॅटेलाईट क्लबचे सदस्य ओंकार जोशी, अदिती किरपेकर व अनुश्री आठल्ये हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
संपूच नये असा कार्यक्रम होता परंतु वेळेच्या बंधनामुळे कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.

सुकृत खांडेकर-माझी पत्रकारिता आणि राजकारणाचे बदलते स्वरूप

१९ जुलै २०२१

५० वर्षाहून अधिक काळ आपल्या अभ्यासू वृत्तीने पत्रकारितेत नाव कमावलेले सुकृत खांडेकर आणि चर्चेसाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याने मोठी उत्सुकता होती.

सर्वसाधरणत: राजकारणी व्यक्ति म्हणजे धूर्त आणि कारस्थानी असा सकारण समज असतो. त्यावर निरर्थक वाद घालणे हा बहुतेकांचा फावल्या वेळेचा आवडता छंद असतो. परंतु राजकरणा सोडता नेत्यांची काही वैयक्तिक वेगळी बाजू असते काही गुण विशेष असतात त्यामुळे ते जनमानसात स्थान टिकवून असतात. सुकृत खांडेकर हे मागील पिढीचे सभ्य पत्रकार. संधि मिळाली म्हणून लोकरंजक गोष्टी न सांगता त्यांनी अनुभवलेली राजकारणी नेत्यांची सकारात्मक बाजू आज आपल्याला दाखविली.

यशवंतराव चव्हाण हे रसिक आणि गुणग्राही नेते होते. संघ हा एक तिरस्कारचा विषय होता, आज ही आहे. यशवंतराव भिन्न विचारसरणीचे. मात्र ही बाब संघाचे श्री लेले यांचेशी जुळलेल्या मैत्री आड आली नाही. हीच गोष्ट वसंतराव नाईक आणि शरद पवार यांचे बाबतीत लागू होती. मृणाल गोरे या सरकारवर घणाघाती टीका करणाऱ्या आक्रमक समाजवादी नेत्या होत्या. नागपूर अधिवेशनास त्या आल्या पण प्रकृती ठीक नव्हती.तेव्हा त्यांना घरगुती जेवण वत्सलाताई देत असत. वसंतरावांनी संघाच्या बाळासाहेब देवरस यांना न मागता मदत केली. सावरकर स्मारकाचे काम गतीने व्हावे या साठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन जयंतराव टिळक याना मदत केली आणि रखडलेले काम मार्गी लावले. सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, सुधाकर नाईक यांचे काही किस्से सांगितले. नारायण राणे हे कार्यकर्त्यांची कशी काळजी घेतात, कितीही कामात असले तरी “प्रहार” या वृत्तपत्रात बातमी कोणती, आणि  कशी आली पाहिजे यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते, त्यांनी बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वास संपादन केला आहे हे सांगून त्यांची वेगळी ओळख करून दिली. अजित पवार याचा कामाचा उरक आणि  निर्णयक्षमता, प्रमोद महाजन यांची अभ्यास वृत्ती, मोराराजींची महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबद्दलची मते अश्या अनेक गोष्टी सुकृत खांडेकर यांनी प्रवाही भाषेत सांगितल्या.

बाळासाहेब ठाकरे हे वेगळेच रसायन होते. संजय दत्त याला का आणि कसे सोडविले, माधव गडकरी यांच्या सत्कार समारंभ सुरळीत पाडण्यासाठी काय केले, पाकिस्तान बरोबर क्रिकेट कसे बंद पाडले, मुंबईचे त्यावेळचे दिग्गज नेते रजनी पटेल यांना कसे फटकारले. अश्या त्यांच्या अनेक आठवणी त्यांनी जागवल्या.

“महाराष्ट्र कलश” यशवंतराव चव्हाण यांनी आणला असे म्हटलेले संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आचार्य अत्रे यांना मान्य नव्हते. त्यामुळे उद्वेगाने “हा निपुत्रिक महाराष्ट्राचे काय कल्याण करणार” अशी जहरी टीका अत्रे त्यांनी केली. मुख्यमंत्री असूनही यशवंतराव चव्हाणयांनी अत्रे विरुद्ध अटक वगैरे कोणतीही कारवाई केली नाही. तर त्यांना घरी बोलविले आणि आपण निपुत्रिक का आहोत याची अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी सांगितली. आचार्य अत्रे यांनी वाकून माफी मागितली त्यावरसुसंस्कृत यशवंतराव म्हणाले “ज्ञानी आहात झुकू नका” या आठवणीने त्यांनी भाषणाचा शेवट केला. ही आठवण ऐकता ऐकता  सर्वच जण गंभीर झाले.

त्यांनंतर सभासदांनी विचारलेलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. सभ्य स्वभावामुळे राजकारणाचे  बदलते रूप यावर विस्तृत बोलण्याचे त्यांनी टाळले असावे. तरी लोकसभेतील गोंधळाचा दाखला देत बदलत्या स्वरूपाबद्दल वैषम्य व्यक्त केले.

रो. अभिजीत जोग यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अध्यक्ष रो.अतुल अत्रे यांनी वक्त्यांचे  आणि आयोजन केल्याबद्दल रो. मृदुला घोडके यांचे आभार मानले.

नवीन वर्षाची सुरुवात दमदार करण्याची आपली परंपरा आहे, ती या कार्यक्रमाने सिद्ध झाली. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम वर्षभर होतील अशी अपेक्षा व्यक्त करीत सभा समाप्त झाली.

क्लब असेम्ब्ली व बजेट मीटिंग

२६ जुलै २०२१

२६ जुलै रोजी संपन्न झालेल्या तिसऱ्या साप्ताहिक सभेत

१) रो प्रेसिडेंट अतुल अत्रे यांनी डिस्ट्रिक्टने केलेल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपल्या सदस्यांनी ट्रस्टमध्ये  ₹ १,१३,५०० जमा केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

२) रो योगेश नांदूरकर यांनी त्यांच्या Anniversary निमित्ताने क्लब बँक खात्याच्या QR code चा वापर करून Sunshine Box साठी योगदान दिले.

३)  रोटरी वर्ष २०२१-२२ चे वित्तीय अंदाजपत्रकाचे रो खजिनदार जितेंद्र महाजन यांनी सादरीकरण केले.

येत्या काळात संकलित होणाऱ्या निधीची सर्व कमिटीच्या मागणी प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. 

शक्य असेल त्या प्रोजेक्ट्स साठी आपले माननीय मेंबर्स, घरातील इतर सदस्य, मित्र परिवार तसेच शुभचिंतकांकडून निधी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सादरीकरणाच्या शेवटी, वाहन चालवताना चालकाने भ्रमणध्वनी (मोबाईल) पहाणे / वापरणे हे धोकादायक ठरू शकते असा संदेशवजा इशारा देण्यात आला.

४) रोटरी मेंबरशीप मंथ निमित्त ऑगस्ट महिन्यात मेंफरशीप कॅम्पेन राबवण्याचा मानस चेअर कॅम्पेन कमिटी, रो. डॉ. गीतांजली पुरोहितनं सांगितला.

या कॅम्पेनचा एक भाग म्हणून क्लबमधल्या पीडीजी, पीपीज, एफ एल्स आणि इतरांचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाद्वारे १ ऑगस्ट पासून प्रसारित केले जाणार आहेत. त्यापैकी प्रेसिडेंट अतुल याचा व्हिडिओ काल प्रकाशित करण्यात आला.

वुमेन इन रोटरी चेअर रो. डॉ. संगीता देशपांडे हिनं स्त्रियांचा सहभाग आणि स्त्री सभासद वाढवण्याचं आवाहन केलं तर मेंबरशीप अॅव्हेन्यू डायरेक्टर योगेश याने हे कॅम्पेन करण्यामागची भूमिका विषद केली. याशिवाय रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ गोल्ड आणि रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचर या नुकत्याच आपल्या क्लबद्वारे निर्माण झालेल्या सॅटेलाईट क्लब उत्साहानं कार्यरत असल्याची आनंददायी गोष्ट सांगितली

डॉ. श्रीराम वसंत गीत.

बी ए एमअँड एस.1970 पुणे विद्यापीठ.

एकूण30 वर्षे  फॅमिली फिजिशियन म्हणून व्यवसाय,

कसबा पेठ व टिळक रोड येथे.

1990 -1992  फाउंडर सेक्रेटरी ऑफ जनरल प्रॅक्टिशनरस असोसिएशन पुणे.

GPA व IMA पुणे यांचे संयुक्त विद्यमाने GPCON या परिषदेत विविध सेमिनार मध्ये सहभाग.

1993-2005 ज्ञानप्रबोधिनी संचालित संजीवन रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सहभाग

डॉक्टरच व्हायचे आहे हे पहिले पुस्तक. त्याची 11 वी आवृत्ती राजहंस प्रकाशन यांनी यंदा प्रसिद्ध केली.

1994 :आपल्या सर्वांसाठी ग्राहक संरक्षण कायदा या नावाने पुस्तक प्रसिद्ध झाले.

1995:अद्भुत शरीर, शाकाहारच का, ज्येष्ठांचा सोबती  अशी पुस्तके प्रसिद्ध.

2013 :वैद्यकाचा बाजार या पुस्तकाचे लेखन.याच विषयावर वसंत व्याख्यानमाला पुणे, पार्ले टिळक वाचनालय, सोलापूर जनता सहकारी बँक आयोजित व्याख्यानमाला, दिव्य मराठी नाशिक, रोटरी क्लब ऑफ शनिवार वाडा, रोहा रायगड जिल्हा,अशा अनेक ठिकाणी या विषयावर व्याख्याने दिली आहेत.

सर्व प्रमुख दैनिकांमध्ये वैद्यकीय विषयावर प्रासंगिक लेखांचे लिखाण केले आहे.

2000 ते 2021 मुख्यतः करिअर कौन्सिलर म्हणून काम करत आहेत.

अर्चना चंद्रशेखर साने.

1994 पासून आकाशवाणीत निवेदिका म्हणून कार्यरत. लहानपणापासूनच कलेच्या क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून (विशेषतः स्नेहसंमेलनातून ) सक्रीय सहभाग. पुढे महाविद्यालयात स्वतः एकांकिका दिग्दर्शित केल्या. 

साप्ताहिकी नावाचा एकपात्री प्रयोग तृतीय वर्षात असल्यापासून करत आहे. अजूनही त्याचे प्रयोग होतात. रंगमंचावर तसंच दूरदर्शन वर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे आणि करते.

रसिकहो नमस्कार हा अभिवाचनाचा कार्यक्रम दिग्दर्शित  करून त्याचे पुणे, मुंबई,  गुलबर्गा,  बंगळूरू इथे प्रयोग सादर केले.  

पुणे आकाशवाणीवर संगीत रंगभूमीचा 1843 पासूनचा प्रवास उलगडून दाखवणारा मर्मबंधातली ठेव हा कार्यक्रम (लेखन/निवेदन/सादरीकरण) 7 भागांची ही मालिका खूप रसिकप्रिय झाली.

(हाच कार्यक्रम आता पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला लवकरच येणार आहे)

सुविख्यात गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर 2020 मध्ये त्यांच्यावर तीन भागांची मालिका केली. यानिमित्ताने प्रत्यक्ष आशाताईंची फोनवरून मुलाखत घेतली आणि  रेडिओ वर प्रसारित केली.

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 एप्रिल 2021 ला त्यांच्यावर कार्यक्रम सादर केला.

सामान्य पार्श्वभूमी असूनही अनेक आव्हानं पेलत, असामान्य कामगिरी केलेल्या, आपल्या आजूबाजूलाच असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा वेगळा पैलू दाखवण्याचा प्रयत्न असलेल्या,               "मी ही एक दुर्गा"

या आपल्या नव्या मालिकेतली पहिली दुर्गा....

स्वाती शिंगाडे. 

Msc Agriculture ( Bio- Chemistry)

Agriculture Assistant म्हणून कारकिर्दीची सुरुवात.

२००६ मध्ये MPSC परीक्षेत सेकंड रँक मिळाली आणि २००७ मधे पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती.

मात्र शेतीकडे ओढा... २००८पासून शेतीमध्ये लक्ष घातलं.

ग्रीन हाऊस साठी बँकेकडून घेतलेलं १० लाखाच कर्ज एका वर्षात फेडले. त्यासाठी बँकेतर्फे गौरव.

डेअरी फारमिंग करतात.

अनेक सेंद्रिय पीक उत्पादने.

शेतीवर अनेक रिसर्च पेपर प्रकाशित.

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक कृषी पुरस्कार आणि गौरव प्राप्त.

उद्योग जननी कमल पुरस्कार

महाराष्ट्र उद्योगिनी

प्रयोगशील महिला शेतकरी

आदर्श महिला शेतकरी

कृषी क्रांती आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट महिला किसान सन्मान इत्यादी पुरस्कार प्राप्त.

सेंद्रिय शेतीवर देशातल्या विविध राज्यातल्या आणि परदेशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

दूरदर्शनच्या कृषी सल्लागार समितीच्या सदस्या.

एक आदर्श शेतकरी आणि यशस्वी उद्योजिका  आहेतच पण कर्तव्यनिष्ठ पत्नी आणि प्रेमळ माताही आहेत.

New Members Induction and Satellite Club Installation

२३ ऑगस्ट २०२१ 

पूर्णांगिनी ए. जी. रो. धनश्री जोग

ही गोष्ट अशा एका स्त्री ची आहे जिने रोटरी मध्ये प्रवेश केल्यापासून केवळ तिसऱ्या वर्षी President पद सांभाळले आणि आज सहा वर्ष पूर्ण व्हायच्या आत त्या Assistant Governor आहेत. त्यांचं नाव आहे रो. धनश्री जोग. 

त्याचं झालं असं की मुळातच सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे धनश्री या 'Life Tune Foundation' ही प्रामुख्याने अनाथ मुलांसाठी काम करणारी NGO चालवत होत्या. त्याचं काम करताना त्यांना जाणवलं की हेच सामाजिक कार्य करताना रोटरी सारखी संस्था आपल्या सोबतीला असेल तर अजून परिणामकारक काम करता येईल आणि त्यांच्या बोलण्यातून कळलं की त्यांची ही अपेक्षा रोटरिने 100% पूर्ण केली आहे.

अशा काम करण्याच्या इच्छेने प्रवेश केल्यामुळे घडणारी प्रत्येक घटना त्यांना सुवर्णसंधीच भासत होती. म्हणूनच जेंव्हा Rotary International ने e-club ची कल्पना मांडली तेंव्हा सुरू झालेल्या पाच e-club मध्ये त्यांचा क्लब होता आणि अजूनही कार्यरत असणारा एकमेव क्लब ठरला आहे.  या e-club चे President पद समर्थपणे सांभाळलं, ते त्यांचं रोटरी मधील केवळ तिसरं वर्ष होतं. या काळात अनेक लहान लहान प्रोजेक्ट्स बरोबर त्यांनी दोन मोठे प्रोजेक्ट्स केले , पहिला होता गुंडाळवाडी येथील Health Check Up Project. या प्रोजेक्टदरम्यान District मधल्या आणि इतर अनेक लोकांशी खूप छान ओळखी झाल्या असे त्यांनी आनंदाने सांगितले. त्यात आपल्या पी.पी. रो. डॉ.राजेंद्र गोसावी यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

दुसरा मोठा प्रोजेक्ट होता, औद्योगिक क्षेत्रातील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणं. त्यात २८० महिलांनी सहभाग घेतला . तेंव्हा रो. अभय गोडबोले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते.

अश्या प्रोजेक्ट्स मधून थोरामोठ्यांच्या ओळखी होत गेल्या आणि धनश्री रोटरी मध्ये रुळत गेल्या. आज त्या Assistant Governor आहेत.

रोटरी मधील घोडदौड सुरु असताना त्यांचं कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाडीवर देखील काम जोरात सुरु होतं. 

व्यावसायिक करिअरच्या सुरुवातीला किर्लोस्कर कंपनी मध्ये नोकरी करताना त्यांनी प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल ( PPC), इन्व्हेन्टरी कंट्रोल, या सर्व गोष्टींचा दांडगा अनुभव घेतला. पुढे जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी 'बिझनेस

लाईन क्वालिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' (बी. एल. क्यू. एस. प्रायव्हेट लिमिटेड)

ही त्यांची कंपनी उभी केली. आय. एस. ओ. आणि इतर अनेक महत्त्वाच्या सर्टिफिकेशन साठी कन्सल्टन्सी आणि ऑडिटर म्हणून त्यांची कंपनी कार्यरत आहे. या क्षेत्रातली आय. ए. टी. एफ. या संस्थेमार्फत घेण्यात येणारी लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या धनश्री या पहिल्या भारतीय महिला इंजिनीयर आहेत. 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर' मध्ये पॅनल कन्सल्टंट म्हणून त्या काम बघतात. तसेच 'Productivity Through Standardization' या विषयावर त्यांनी दक्षिण आफ्रिका सरकारला मार्गदर्शन केले आहे. सध्या त्या ऊर्जा व्यवस्थापन आणि संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या अविरत कामाचा दै.लोकमतने विशेष सत्कार केला असून सांगलीच्या 'श्री फाउंडेशन' ने त्यांना 'उद्योग सल्लागार पुरस्कार' हा अत्यंत मनाचा राज्यस्तरीय पुरस्कार 2015 साली बहाल केला. मागील वर्षी त्यांना ब्राह्मण महसंघाकडून "तेजस्विनी" पुरस्कार देण्यात आला.

त्यांनी दोन पुस्तकं देखील लिहिली आहेत. एक आहे "Horizon" नावाचे गोष्टींचे पुस्तक तर दुसरे आहे "Beyond the Box" हे त्यांच्या क्षेत्रातील तांत्रिक विषयावरचे पुस्तक.

त्यांच्या मुलाने अमेय जोग याने त्याच्या वयाच्या १९व्या वर्षी ५५ सदस्यांचा Rotaract Club स्थापन केला. आज तो Director Coumminity Service आहे. त्यांचे यजमान रो. निनाद जोग हे RCP Yuva चे सभासद आहेत. त्यांच्या 10वित शिकत असलेल्या लेकीला  अमृताला लहानपणापासूनच रोटरीच्या कामाचे बाळकडू मिळत आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब अगदी रोटरीमय आहे. 

ह्या एव्हढ्या सगळ्या आघाड्यांवर लढणं कसं जमते असे त्यांना विचारलं तेंव्हा त्यांनी तीन महत्वाचे मुद्दे सांगितले. पहिला मुद्दा आहे, कुटुंबाचा पाठिंबा! घरातल्या सर्व माणसांच्या सहकार्याशिवाय एव्हढा डोलारा उभारणं शक्य होत नाही. दुसरा मुद्दा आहे, कंपनी मध्ये त्यांच्या माणसांचा पाठिंबा! काही मंडळी तर कंपनी २००२मध्ये स्थापन झाली तेंव्हापासून म्हणजे २० वर्षापासून त्यांच्या सोबत आहेत. तिसरा मुद्दा आहे, स्वतःचा स्वतःला मिळणारा पाठिंबा. त्यांनी वैयक्तिक कितीतरी हौसेच्या गोष्टी सोडून दिल्या, विशेषतः बायकांच्या आवडीचे विषय जसे शॉपिंग, भिशी अशा गोष्टी त्यांनी आपल्या ध्येयासाठी पूर्णपणे बाजूला सरल्या आणि आज आपल्या कामाने त्यांनी एक ठसा उमटवला आहे. 

अशा या आपल्या मैत्रिणीला म्हणून पूर्णांगिनीच म्हटले पाहिजे.

पूर्णांगिनी --अपर्णा आनंद कुलकर्णी

अपर्णा पक्की सदाशिवपेठी पुणेकर. खूप उत्साही आनंदी हसरी. प्रथम ओळखीत थोडी मितभाषी वाटली पण गप्पा मारायला लागल्यावर भरभरून बोलली. बोलताना जाणवलेली ती वेगळी वाटली आणि तिच्या विषयी मला जे समजलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटलं. B. E. कम्प्युटर मधे शिक्षण घेऊन आयटी कंपनीमध्ये पुणे आणि मुंबईत नोकरी करत होती. आनंद बरोबर कांदे पोहे कार्यक्रमाने विवाहबद्ध झाली. शर्वरीच्या जन्मानंतर आनंदच्या नोकरीनिमित्ताने कॅनडात रवाना झाली. अर्थातच अपर्णाने भारतामधील जॉब सोडला. टोरंटो मध्ये गेल्यावर काही दिवसात जॉब करायचा विचार करू लागली. तिथली भाषा, आय. टी. क्षेत्रात झालेले बदल याचा अभ्यास करून लवकरच तिला जॉब मिळाला. त्यानंतर बँक ऑफ माँट्रीयल सारख्या प्रतिष्ठित बँकेत नोकरी मिळाली. नोकरी, मुलीची शाळा तिचे डे केअर तीन-चार वर्ष सगळं सुरळीत चालू होत. पण इकडे आनंदच्या मनात काही वेगळे विचार यायला लागले. नोकरीमध्ये कामाची जबाबदारी त्याबरोबर येणारा स्ट्रेस, तेच तेच काम या गोष्टींचा त्रास होऊ लागला. यापेक्षा आपण काहीतरी वेगळं सुरु करावं यासाठी त्याने अभ्यास करायला सुरुवात केली आणि आई-वडील कुटुंब स्वास्थ्य यासाठी आपल्या मायदेशी यावं असं त्याने पक्क ठरवलं. भारतामध्ये येऊन नोकरी करायची नाही असा आनंदने घेतलेला निर्णय अपर्णाला खूपच जड गेला. खूप मेहनतीने मिळविलेली नोकरी सोडून द्यायची जीवावर आलं पण तिचा मूळ स्वभाव करिअरिस्टिक नव्हता त्यामुळे तिने कुटुंबाला प्राधान्य देण्याचं ठरवलं. आनंदला सपोर्ट करणे हे तिच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. अपर्णा आणि आनंदने नोकरी सोडली आणि ते तिघेही पुण्यात स्वगृही परतले. अपर्णाने घेतलेला निर्णय खरंच खूप मोठा होता. उत्तम नोकरी सुख संपन्न आयुष्य जगत असताना परत मायदेशी येऊन आनंदची नव्या व्यवसायाची नव्याने सुरुवात करणे, घर आणि येणारा नवीन जीव म्हणजे आणखी एक वेगळी जबाबदारी हे सर्व सहजतेने स्विकारले. तितकेच समर्थपणे पेलले.

आनंदने 'समथिंग स्पेशल' करावे या दृष्टीने मेंटल हेल्थ कशी जोपासावी आणि यासाठी नक्की काय केले पाहिजे याचा अभ्यास करून स्वानुभव घेतला आणि स्वतःची सायकॉलॉजिस्ट अँड लाइफ कोच कन्सल्टन्सी सुरू केली. पुनश्च हरिओम या उक्तीप्रमाणे आनंद व अपर्णाने एकमेकांना सांभाळून घेत छान यश मिळवले. खऱ्या अर्थाने अपर्णा ने अर्धांगिनीचे कर्तव्य निभावले. आनंद साठी स्वतःचे करीयर थोड्या कालावधीसाठी बाजूला केले.

आनंद - अपर्णाला दोन अपत्ये. शर्वरी आता दहावीत असून साहिल पाचवीत आहे. रोटरी परिवारात आल्यानंतर सुरुवातीला ती फारशी मिक्स होऊ शकली नव्हती पण आता मिक्स होऊ लागली आहे. बॉलिवूड डान्सची तिला आवड असून ती खूप छान डान्स करते.

कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळून अपर्णा गेल्या सहा महिन्यांपासून परत आयटी कंपनी मध्ये जॉब करते. अशा या गुणी नवीन आव्हाने सहज पेलणाऱ्या "पूर्णांगिनी"चे कौतुक करावे तेवढे थोडेच..

समन्वयक: ॲन अस्मिता आपटे

रो. विलास आपटे आणि ॲन अस्मिता आपटे यांच्याशी रो. अभिजित देशपांडे यांनी अनौपचारिक गप्पागोष्टी केल्या. विलासराव आणि अस्मिताताई यांनी त्यांच्या व्यवसायातील अनुभव तसेच त्यांच्या आठवणीतील रोटरी क्लब याविषयी खूप भरभरून माहिती दिली. चला तर मग पाहूया या गप्पांचा विडिओ:

समन्वयक: रो. आनंद कुलकर्णी, रो. अभिजित देशपांडे

ज्येष्ठ कर सल्लागार पी पी रो. गोविंदराव पटवर्धन यांनी लिहिलेल्या "GST ई वे बिल मार्गदर्शिका" या मालवाहतूक करताना लागणाऱ्या "ई वे बिल" याविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या पुस्तकाचे "सकाळ" तर्फे प्रकाशन करण्यात आले. अभिनंदन गोविंदराव. आम्हा सर्व दक्षिणकरांना तुमचा सार्थ अभिमान आहे.

Saurabh Jambhekar, son-in-law of our Rtn. Shrikant Paranjape and also a member of our newly formed Rotary Satellite Club of Pune South Gold, is pursuing research at the University of West London. His research has received a grant of £1,00,000/-. from The Royal Academy of Music, London. This grant puts his research in the ivy league and has received the highest level of accreditation from the western classical music fraternity all around the globe.
Congratulations Saurabh, you really are a golden member !!!

Donations- July

Rotary Foundation

IPP Rtn. Sudarshan Natu $100

Rtn. Kiran Velankar $300

Ann Swati Velankar $300

 

RCPS Trust

PP Rtn. Govindrao Patwardhan  Rs.10,000

PP Rtn. Virendra Shah  Rs.5,000

Rtn. Vilas Apte Rs.10,000

Rtn. Arvind Mawlankar Rs. 10000 (for Aids Patients Rehabilitation)

जीएसटीची मूलभूत संकल्पना.

बुलेटीन कमिटीचे अभिनंदन

बहुतेक सामाजिक संस्थात कोण्या ना कोण्या व्यक्तीची मक्तेदारी असते. रोटरीत मात्र दर १ जुलैला “नवी विट्टी   नव राज्य”  सुरू होते. हे वैशिष्ट्य मला फार भावते. दर वर्षी काही ना काही नवीन विचार मांडले जातात. डिस्ट्रिक्टमध्ये वाचनीय बुलेटीन ही आपल्या क्लबची एक महत्वाची ओळख आहे. कोणत्याही उपक्रमात अनेक वर्षे गेली की तोच तोचपणाचा दोष निर्माण होऊ शकतो. बुलेटीन कमिटी म्हणजे जणू शिव धनुष्य. ठराविक ३/४ सभासदांकडे जबाबदारी येत होती.  त्यामुळे तसा दोष  सदर्न स्टारमध्ये येणार का? अशी भीती मला वाटत होती.  मात्र ५० व्या वर्षी अॅन. प्रिया आंबिके हिने त्याला देखणे रूप दिले तर मागील वर्षी नव्या दमाच्या रो. योगेशने आपल्या बुलेटीनला नवसंजीवनी दिली. माहितीपूर्ण, दर्जेदार, व्याकरण शुद्ध, आकर्षक असे सर्वांग परिपूर्ण बुलेटीन नियमितपणे प्रसिद्ध केले हे कौतुकास्पद आहेच. शिवाय नवीन सभासदांचा सक्रिय सहभाग ही मोठीच उपलब्धी झाली.

यावर्षी ही धुरा अष्टपैलू रो. अभिजीत देशपांडे यांनी स्वीकारली आहे. त्याला रो. राघवेंद्रची समर्थ साथ आहे. त्याने एक कल्पना मांडली की आपल्या क्लबात वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ आहेत त्यांनी त्या विषयी लेखमाला लिहावी. मला जीएसटीवर लिहिणार का अशी विचारणा केली. रोटरीत नाही म्हणण्याची शिकवण नाही.  म्हणून हा पहिला लेख लिहिला आहे. कायदा जरा किचकट आहे. तरी त्यातील सर्वाना जिव्हाळ्याचे असलेल्या विषयी जितके सोप्या भाषेत शक्य आहे तितके लिहिण्याचा मानस आहे. बुलेटीन कमिटीचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

अप्रत्यक्ष कर प्रणालीतील क्रांतिकारी निर्णय असे ज्याचे कौतुक केले जाते त्याची संकल्पना समजून घ्यायची तर हा निर्णय घेण्यामागील इतिहासाचा आणि कारणांचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. 

प्रत्येक नागरिक एकाच वेळी भारताचा, राज्याचा आणि गाव अथवा शहराचा नागरिक असतो हे आपल्या देशाचे  वेगळे वैशिष्ट्य आहे प्रशासकीय सोयी साठी भारताचे विभाग करणे आवश्यक आहेत, केले आहेत. त्यामुळे भारतीय शासन व्यवस्था तीन स्तरावर आहे - केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. राज्यघटनेने या प्रत्येक संस्थेला काही सार्वजनिक कामे सोपविली आहेत. ती कामे करण्यासाठी अर्थातच पैशाची गरज असते. . त्यासाठी स्वतंत्रपणे अर्थ सहाय्य मिळावे म्हणून प्रत्येक संस्थेला कोणकोणत्या व्यापार/व्यवहारांवर कर आकारता येईल हेही ठरविलेले आहे. राज्यघटनेने केंद्र शासनाचे अखत्यारीत आयात-निर्यात, वस्तूंचे उत्पादन, सेवा असे विषय दिले होते  तर राज्य शासनाला विक्रीकर, प्रवेशकर, मनोरंजनकर, ऐषारामकर, मुद्रांक, वीज, व्यवसाय इ. विषय निश्चित केले होते. स्थानिक संस्थांना मिळकतकर, पाणीपट्टी अश्या करांचा महसूल मिळेल अशी हि व्यवस्था आहे. 

त्याचा परिणाम असा होतो की उद्योग, व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना अनेक स्तरावर आणि अनेक ठिकाणी कर भरावा लागत होता, या प्रत्येक विषयाची माहिती करून घ्यावी लागायची. एक्साईज, व्हॅट, केंद्रिय विक्रीकर, सर्व्हिस टॅक्स, एलबिटी, प्रवेश कर, ऐषआराम कर  हे वेगवेगळ्या खात्यांचे विषय होते. त्या त्या कायद्याप्रमाणे नोंदणी करणे, वेळच्या वेळी रिटर्न भरणे, ( प्रत्येक कायद्यानुसार वेगवेगळ्या तारखा निश्चित केलेल्या असतात.) शासकीय तपासणीची तयारी, कर निर्धारणे साठी शासकीय कार्यालयात खेटे मारणे, अधिकाऱ्याने काढलेल्या मुद्यांचे समाधान करणे, समाधान न झाल्यास  अपिले करणे विविध  कागदपत्रांची पूर्तता याने जीव मेटकुटीला येत असे., व्यापार सांभाळून हे सगळे करणे शक्य नसते. शिवाय कायद्यात सारखे बदल करण्यात येतात. त्याचा मागोवा ठेवणे अवघड असते. विविध कायद्याचे अद्ययावत ज्ञान असावे लागते त्यासाठी सल्लागार नेमावे लागतात. व्यापारातील बराच वेळ यात खर्च व्हायचा. आपण नफा मिळविण्यासाठी व्यापार, व्यवसाय, उद्योग करितो, का विविध कर तरतुदींची पूर्तता करण्यासाठी व्यापार करितो असा संभ्रम निर्माण व्हायचा.  या कटकटीपेक्षा नोंदणी न घेता व्यापार करावा असे मनात यायचे. असे करणारे अनेक जण आसपास राजरोस दिसत असत. अश्या अवैध धंदा करणाऱ्यांशी स्पर्धा करता येत नाही, ते या त्रासापासून मुक्त असतात आणि माल स्वस्त विकतात. व्यापार करणाऱ्याला अनेकदा नैराश्य येत असे.  

शिवाय व्यापार करण्याचा खर्च वाढतो. वस्तु सेवेची किंमत वाढते. केंद्र शासनाने लावलेल्या कराची वजावट राज्य करासाठी वापरता येत नाही. तसेच राज्य शासनाने लावलेल्या कराची वजावट केंद्रीय करासाठी वापरता येत नाही. अश्यारितीने करावर कर आकारावा लागतो. त्यामुळे वस्तू सेवेची किंमत चक्रवाढ पद्धतीने वाढते. आन्तरराष्ट्रीय बाजारात गळेकापू स्पर्धा असते. वस्तू सेवेच्या किमती जास्त असतील तर निर्यातीवर परिणाम होत होता. 

शासनालाही या सर्व अडचणीची जाणीव होती. कर प्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी समिती नेमल्या. त्यामुळे  केंद्राने आणि राज्यांनी कायद्यात काही बदल केले  पण वरील दोष निवारण झाले नाही. भारतातील महत्वाचे सर्व अप्रत्यक्षकर एकत्र करणे हाच एक  उपाय आहे. यावर एकमत झाले.  असे एकत्रीकरण म्हणजेच  जीएसटी म्हणजे वस्तू-सेवा कर.. मात्र एकत्रीकरण करणे हे काम सोपे नव्हते. कर आकारणीचे अधिकारात बदल करण्यासाठी राज्य घटना बदलणे आवश्यक होते. व्यक्ती काय किंवा शासन काय एकदा प्राप्त झालेला अधिकार कोणी सहजासहजी सोडायला तयार होत नाही. भारतीय बाजारपेठ अनेक तुकड्यात विभागली  होती. प्रत्येक राज्यांचे कर स्त्रोत, शेती, कारखाने, व्यापार, सेवा पर्यटन अशी वेग वेगळी बलस्थान होती, गरजा वेगळ्या होत्या. वेगवेगळ्या दिशेला तोंडे असणाऱ्या राज्य शासनात एकवाक्यता आणणे मोठे जिकिरीचे काम होते. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ २००७ पासून सुरू झाले ते सहा/सात वर्षे चालू होते. महाराष्ट्रातील जीएसटी डिस्कशन ग्रुप मध्ये काम करण्याची संधि मला मिळाली. तेव्हा लक्षात आले की काम बिकट आहे आणि हा कायदा आवश्यक असला तरी सोपा असणार नाही. केद्रीय स्तरावर प्रत्येक राज्याच्या समस्यांचा एकत्रित विचार केला गेला. त्यावर साधक बाधक चर्चा झाली. अनेक अडचणींचा सामना करीत १० वर्षे अविरत प्रयत्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेमुळे आणि कै. अरुण जेटली यांच्या कौशल्य पूर्ण हाताळणीने सर्व राज्यांच्या सहमतीने १ जुलै २०१७ रोजी जीएसटी कायदा अमलात आला. 

Coordinator : Rtn. Raghavendra Ponkshe

Three cups of tea

भाग-1       

चहाचे तीन प्याले ( Three cups of tea)या पुस्तकाचा नायक आहे ग्रेग माॅर्टेसन जो एका ध्येयाने पछाडलेला आहे. ग्रेगला K2 हे जगातील दुसर्‍या नंबरचे उंच शिखर चढायचे होते.K2 ,पर्वत रोहणा करीता एव्हरेस्ट पेक्षा कठीण,उंची 28267फूट, काराकोरम पर्वत रांगेत, काश्मीर मधील, बाल्टीस्तान ह्या भागात, वसले आहे. शिखराच्याजवळ 600मिटर पर्यंत पोहोचल्यावर दमछाक झाल्यामुळे आणि हवामान खराब असल्याने ग्रेगला परत फिरावे लागले. खालच्या कॅम्पला आल्यावर शिखर चढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आजारी सहकाऱ्याला वाचविण्यातकरीता ग्रेगला परत शिखराजवळ जावे लागले. K2 पिरॅमिडच्या आकाराचा पर्वत आहे. सरळ सोट बाजु आणि धारदार कडा यांनी बनलेला आहे .एरव्ही सुद्धा चढायला कठीण पर्वत दमलेल्या ग्रेगला परत चढावा लागला आणि त्याच्या सहकाऱ्याला खालच्या कॅम्प वर आणावे लागले. ह्या प्रयत्नात ग्रेग इतका दमला की त्याला K2 पादाक्रांत करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. 

सप्टेंबर 1993रोजी ग्रेग K2 वरून पराभूत होऊन परत निघाला. वाटेत त्याची व त्याच्या हमालाची चुकामूक झाली. दोन दिवस, थंडी वाऱ्यात, उपाशीपोटी, तहानलेला ग्रेग बाल्टोरो हिमनदीतून वाट शोधत फिरत होता.शेवटी त्याच्या लक्षात आले की तो वाट चुकला आहेआणि तो माघारी फिरुन योग्य वाट शोधू लागला. अखेरीस त्याला त्याचा हमाल मुझफ्फर भेटला, जो त्याच्या शोधात होता.चहा पाणी झाल्यावर दोघे अस्कोल ह्या गावाकडे निघाले.तीन दिवस हिमनदीतून चालत चालत ते दोघे हिमनदीच्या गोमुखापाशी आले, जिथून ब्राल्डू नदी उगम पावते. ह्या तीन दिवसात मुझफ्फर ने एक क्षण सुद्धा ग्रेग ला आपल्या नजरेआड होऊ दिले नाही. नदीच्या उगमानंतर एक स्पष्ट पाऊलवाट अस्कोल गावाकडे जात होती,म्हणून मुझफ्फर पुढे निघाला. K2  सोडल्यानंतर सात दिवसांनी ग्रेग ला प्रथमच झाडांचे दर्शन झाले. निसर्गाच्या सान्निध्यात स्वमग्न असलेला ग्रेग परत वाट चुकला आणि अस्कोल च्या वाटे ऐवजी, दूसर्याच वाटेने पुढे निघाला.वाट चुकलो आहोत याची ग्रेग ला कल्पना सुद्धा नव्हती. योग्य वाटेवरच आहोत अशा समजूती मध्ये ग्रेग अस्कोल ऐवजी कोर्फे ह्या अगदी एकांतातील गावी पोहोचला. तेथे त्याचे हाजीअली नावाच्या गावप्रमुखाने स्वागत आणि पाहुणचार केला. गावातील लहान मुले,स्त्रिया, पुरुषांनी गोरा अमेरिकन पाहण्यास गर्दी केली. ग्रेग ने त्याच्या प्रवासाचा सर्व इतिवृत्तांत हाजीअली आणि जमलेल्या मंडळींना सांगीतला व अस्कोल ला त्याचा वाटाड्या मुझफ्फर आणि एक जीप त्याला नेण्यास येणार आहे अशी माहिती दिली. हाजीअलीला हासु आवरेना, हसता हसता त्याने ग्रेग ला सांगीतले की तो अस्कोल गावात नसुन कोर्फे नावाच्या खेडेगावात आहे.बालटोरो हिमनदीतून वाट चुकणे,परत वाट चुकून अस्कोल ऐवजी कोर्फेला जाणे, तेथे त्याला हाजीअली भेटणे, ही एक ईश्वरी योजनाच होती. त्यामुळे बाल्टीस्तानचा इतिहास बदलला, त्याचप्रमाणे ग्रेग च्या जीवनाला सुद्धा एक नवीन वळण मिळाले. ही एक ईश्वरी इच्छाच असावी. 

ग्रेग माॅर्टेनसन हा शिक्षणाने व व्यवसायाने परिचारक होता. कोर्फेमध्ये हाजीअली व त्याची पत्नी सकीना ने ग्रेग ची खूप सेवा केली. मुझफ्फर पण अस्कोल हून त्याला भेटायला आला.मुझफ्फर, सकीना,हाजीअली, हे त्रिकूट पुढे कित्येक वर्षे ग्रेग च्या नव्या जीवनाचा एक भाग बनले. जरी ग्रेग चे सर्व सहकारी परत आपापल्या घरी गेले तरी ग्रेग स्वत: कोर्फेला परत आला, जसे काही प्रारब्धच त्याला तिकडे खेचत होते. खाली स्वच्छ खळखळणारी नदी, वर कधी निळे किंवा ढगाच्छादीत आभाळ, स्वच्छ गार हवा,,आजूबाजूस उंच बर्फाच्छादित पर्वत राजी, धावपळ पळापळ नाही, कसलीच ओढाताण नाही. कुठल्याच प्रकारचे प्रदूषण नाही किंवा यांत्रिक आवाज नाही. कोर्फे सर्व जगापासून दूर असे शांग्रीलाच होते. परन्तू ग्रेग ला दुसरी बाजु पण दिसली. ती म्हणजे, गरिबी कुपोषण, मृत्यूचे प्रमाण, वैद्यकीय मदतीची कमतरता, शिक्षणाचा अभाव. ग्रेग स्वत: जरी डॉक्टर नसला तरी त्याला परिचारक चा अनुभव उपयोगात आला व जिथे वैद्यकीय मदत सात दिवसाच्या अंतरावर होती अशा कोर्फे मध्ये त्याने लोकांना औषधोपचार करण्यास सुरुवात केली. कोर्फे मध्ये असे कोणतेच घर नव्हते जिथे आजारपण वास करीत नव्हते. ग्रेग ने स्वत:च्या बरोबर  K2 मोहिमेकरिता आणलेल्या औषधांचा उपयोग कोर्फे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांकरीता केला. कोर्फे मधील शाळा म्हणजे एका कड्याच्या निमुळत्या सपाटीवर, उघड्यावर ,मुलांनी वाळूत किंवा क्वचित पाटीवर ,जमिनीवर बसून, अभ्यास करण्याची जागा होती.शिक्षक शेजारच्या खेड्यातून आठवड्यातून तीन वेळा येत असे. बाकीचे दिवस मुले वाळूत रेघोट्या ओढीत ऊजळणि करीत असत. शाळेकरीता

दिलेला पैसा रावळपिंडीहून बाल्टीस्तानातील कोर्फे खेड्यात पोहचेपर्यंत गळत गळत, शून्यावर येत असे. त्याचवेळेस ग्रेग ने ठरविले की कसेही करून कोर्फे मध्ये शाळा बांधायची. त्याप्रमाणे तसे वचन त्याने हाजीअलीला दिले.त्या वचना बरोबरच ग्रेग च्या आयुष्याचा मार्ग बदलला.

हाजीअलीला वचन देणे सोपे होते. परन्तु शाळा बांधण्यास पैसा गोळा करणे खूप कठिण होते.स्वतः ग्रेग कफल्लक होता.ग्रेग तीन महीन्याचा असताना त्याच्या मिशनरी वडिलांबरोबर टांझानियात गेला होता. चौदा वर्षानंतर ग्रेग परत वडिलांबरोबर अमेरिकेत सेंट पॉल येथे आला .काॅलेजची फी देणे शक्य नसल्यामुळे तो हायस्कूल नंतर सैन्यात भरती झाला. तेथे त्याने इतर कौशल्या बरोबर परिचारकेचे पण शिक्षण घेतले. सैन्यात दोन वर्षे काम केल्यावर ग्रेग परत काॅलेज मध्ये रुजू झाला,व रुग्णशुश्रुशा आणि रसायन शास्त्रात पदवी संपादन करून बाहेर पडला.नर्सिगची नोकरी करताना ग्रेग ने कॅलिफोर्नियात त्याचा पर्वतरोहणाचा छंद सुद्धा जोपासला. 

त्याने कोर्फे येथील शाळेकरीता पैसे गोळा करण्याचे कार्य त्याने नेटाने चालू ठेवले. जिथे जिथे धाडता येईल तिथे तिथे त्याने शेकडो पत्र धाडली. शाळेत व्याख्याने दिली. तरीदेखील अगदी कासवाच्या गतीने पैसा गोळा होत होता. सरतेशेवटी ग्रेग चे नशीब बदलले आणि डाॅ.जीन होर्नी नावाच्या एका श्रीमंत शास्त्रज्ञाने ग्रेग ला जरूर असलेले बारा हजार डॉलर्स एका चेक मध्ये दिले. ग्रेग ने त्याच्याकडील विकण्याजोग्या सर्व वस्तु विकल्या आणि एका बॅगेत त्याच्या वैयक्तिक वस्तु घालून तो कोर्फेच्या आणि स्वतःच्या नवीन आयुष्याच्या दिशेने निघाला. 

क्रमशः