Southern Star-August 2022 मराठी

RI President visit to Pune

डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स

रोटरी वर्ष २१-२२ ची वार्षिक डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स वितरण समारंभ काल पुना क्लब येथे पार पडला. यामध्ये आपल्या क्लबला ८ अवॉर्ड्स खालील प्रमाणे मिळाली.

Read More...

"सदर्न स्टार"च्या दुसऱ्या अंकात आपलं स्वागत आहे.

या वर्षाचा प्रारंभ अगदी दणक्यात झाला. "इमॅजिन रोटरी" हे आपलं या वर्षीचं ब्रीद वाक्य! तदनुसार आपले प्रेसिडेंट रो संजीव ओगले यांनी BPL कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना रोजगारा साठी सक्षम करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य विकासाचा एक अभिनव पुढाकार घेतला असून त्या अंतर्गत, टर्नर, वेल्डर आणि फिटरचं १५ दिवसाचं प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. अर्थात, आपल्या सर्वांचं सहकार्य या प्रकल्पाला लाभणार आहेच.

Read More...

नमस्कार मंडळी ....

सृष्टीतील ऋतुचक्र हा निसर्गाचा एक नयनरम्य आणि आश्चर्यजनक आविष्कारच म्हणायला हवा...नाही का....?? सूर्य स्थिर आहे आणि त्याभोवती सर्व ग्रहतारे आपापली कक्षा राखून, अंतर कायम ठेवीत.. भ्रमण करतात हे शास्त्रीय दृष्ट्या अगदी परखड सत्य असले.... तरी त्यामुळे सृष्टीत होणारे बदल आणि जीवनाला मिळणारी सुंदर, आगळी वेगळी आणि हरक्षणी विलक्षण थक्क करणारी दिशा.... रसिक मनाला साद घातल्याशिवाय राहत नाही....


Read More...

गुप्त काळातील राजकीय व आर्थिक घडामोडींमागे ,बौद्ध धर्माचा उदय व त्यामुळे जून्या धर्माशी  आणी धर्मातील हितसंबंधीयांशी होणाऱ्या कलहाचा परीणाम होता.भारतात धार्मिक वादविवाद जरी लोकप्रिय होते तरी,दैदीप्यमान व महान मानवाच्या व्यक्तिमत्त्वाने सर्व जण भारावून गेले होते.त्याचबरोबर त्या महामानवाच्या स्मृति सुद्धा ताज्या होत्या.बुद्धाचा संदेश जरी प्राचीन असला तरी,आध्यात्मिक बारकाव्यात रस असलेल्या बुद्धिजींवी ना तो नवा आणी वेगळा वाटला व त्यांच्या मनात ठसला.बुद्धाने आपल्या अनुयायांना सांगीतले की 'सगळीकडे जा व हे अंतिम सत्य सर्वांपर्यंत पोहोचवा.

Read More...

नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील दुसरे स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात तसेच दुसरी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव तसेच रवि नंतरचा प्रभावी ग्रह चंद्र आणि त्याचाही स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडली कशी तयार होते ते पाहिले. आणि त्यातील पहिल्या स्थानाचा विचार केला. आता आपण कुंडलीतील द्वितीय स्थनाबद्दल माहिती घेणार आहोत.

Read More...

मित्रहो, विचार करण्यामधली अजून एक  गंमतिशीर  चूक म्हणजे "अतिशयोक्ती". एखाद्या व्यक्तीला सिग्नलला रस्ता क्रॉस करताना कारचा हलकेच धक्का लागतो, नंतर ती व्यक्ती सर्वांना "मला रस्त्यामध्ये एका जोरात जाणाऱ्या कारने उडवलं" असं सांगत हिंडते.

Read More...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करू साजरा हर्षे
भारत देशा स्वतंत्र होऊन झाली 75 वर्षे !

काय गमवले काय मिळवले हिशेब प्राक्तनाचा
विचार करता असे वाटले हा खेळ विषामृताचा ! ---१

Read More...

शब्दकोडे क्र. २ आडवे शब्द

१)संस्कृत भाषेत उंदीर

३)* * * * * * तव पाऊलचि न दिसे । उभाचि स्वयंभू असे । समोर की पाठीमोरा न कळे

७) व्यासपीठावर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रथम म्हणण्याचे परमेश्वराचे स्तुतिपद्य

९) शंकर

११) क्रिकेटमधील धाव पण इंग्रजीत

१२) स्व.मीनाकुमारीचा एक गाजलेला चित्रपट

१४) मालवणी किंवा गोव्याच्या भाषेत मुलगा

१५)घोडयाचे ओरडणे

१७) रतीब

१८) अहमदनगर शहराजवळील एक गाव. येथील नारायण महाराज प्रसिद्ध होते.

१९) एखाद्यावर केलेला आरोप किंवा केलेले दोषरूपी वाक्बाण

२१) सदाशिवराव पेशवे व विश्वासराव पेशवे येथील युद्धात मारले गेले .

२३) पु.ल.देशपांडेंची एक प्रसिद्ध नाटयकृती , तोंडाची अखंड टकळी

२६) पेरू या देशाची राजधानी

२७) फक्त तोंडाळपणा करणारा गावकरी

२९) जपान देशाचे चलन

३०) जून ते ऑक्टोबर या काळातील पिकाच्या हंगामाला काय म्हणतात ?

३१) आद्य कीर्तनकार व पुराणकाळातील कळ लावणारा

३२)नखरा

.- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

शब्दकोडे क्र.२ उभे शब्द 

  1. )* * * * * * * * * *  दुरितांचे तिमिर जावो नाटकातील एका नाटयगीताची सुरुवातीची ओळ
  2. प्रसन्न, चांगल्या बातमीने आनंदी होण्याची क्रिया
  3. विशाळगडाजवळील बाजीप्रभू देशपांडे यांनी पवित्र केलेली खिंड
  4. पृथ्वीच्या बाह्य वातावरणात जाणारे वाहन
  5. बसल्या बसल्या पेंगण्याची क्रिया, वामकुक्षी
  6. लडाखजवळील एक भूभाग

८)थर

१०)चटणी वाटण्याचे दाक्षिणात्य दगडी साधन

१२) माणसाळवलेला प्राणी

१३) )* * * * * ** * नयनमनोहर पाहुनि परिसर भुलू नको रे जरा ।

अरविंद पिळगावकर यांनी गाजवलेले एक नाटयगीत

१६) तक्रार, चुगली

१८) कविवर्य मोरोपंत पराडकरांचा काव्यसंग्रह

२०) वस्त्र

२२) एक मसाल्यातील वस्तू

२४)टोमॅटोला हिंदीत काय म्हणतात ?

२५) दोन मुखे असलेला , उलट सुलट काहीही बोलणारा

२८) नितंब, पार्श्वभाग

.- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

रचना – शंभुनाथ दामोदर गानू निवृत्त उपमुख्य अभियंता

शब्द कोडे क्रमांक १ विजेत्यांची नावे

१. डॉ गीतांजली पुरोहित
२. ॲन. मोहिनी नातू

RCPS Vision:

Rotary Skill India Mission

 

Dear Friends,

Rotary Club of Pune South has initiated “Rotary Skill India Mission” project, under which the students from BPL/ under previleged families will be trained as Turners, Fitters and Welders.

Read More...

FEED THE NEED

 

Dear Rotarians,

"Rotaract Club of Pune Royal" under the patronage of our Rotary Club of Pune South, has organized a community service project “FEED THE NEED” where we collect donations and buy food grains for two small organizations who get benefited and in return see them smile for the rest of the year.

Read More...

AIDS Patients Grocery Distribution

 

23 July 2022

The campain of distribution of grocery items to AIDS affected patients has been kicked off at the hands of President Sanjeev Ogale and First Lady Sneha Ogale on 23 July 22 at Grahak Peth grocery depot Sadashiv Peth Pune 30 between 11 to 1130 hrs.

Chairman Rtn Subhash Chauthai, Secretary Rtn Abhijiit Deshpande and Rtn. Arvind Mawlankar were in attendance.

Read More...

Interact Club Orientation

२८ जुलै २०२२

दि. २८ जुलै रोजी नंदादीप हायस्कूल यथे इंटरॅक्ट क्लबचे orientation घेण्यात आले. या मध्ये पी.पी. रो. सुदर्शन नातू यांनी इ. ९ च्या विद्यार्थ्यांना रोटरी व इंटरॅक्ट क्लब या संकल्पना समजावून सांगितल्या.

Read More...

बीजारोपण

२९ जुलै २०२२

शुक्रवार दिनांक २९ रोजी आनंदवन येथे आंब्याच्या कोईचे बीजारोपण व मागील वर्षी लावलेल्या आंब्याचे झाडांची रोपे मोठ्या पिशव्यांमध्ये बदलणे असा कार्यक्रम केला.

Read More...

दर संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष फेलोशीप हे आपल्या क्लबचे वैशिष्ट्य! गेली २४ वर्षे आपण हा उपक्रम राबवित आहोत. आपले जेष्ठ रोटेरियन आणि पास्ट प्रेसिडेंट रो गोविंदराव यांच्या अध्यक्षीय वर्षात फेलोशीप सुरू झाली आणि ती अव्याहत सुरू आहे. संकष्टी चतुर्थीला एक रोटेरीयन ह्याचे यजमान पद स्विकारतो आणि त्या   रोटेरियनच्या घरी किंवा त्याला ज्या ठिकाणी सोयीचे असेल त्या ठिकाणी जमून एकत्र आवर्तन म्हणणे व त्यानंतर फेलोशिप चा आनंद घेणे असा हा सोहळा असतो. कोरोनामुळे आपण रो वर्ष २०-२१ ला अथर्वशीर्ष फेलोशीप ही ऑनलाईन पद्धतीने केली आणि डिस्ट्रिक्टला पण जॉईन झालो.

Read More...

Dear Friends,

It pains to have to say that Uddhav was a noble soul.To refer to him in past tense is sad but true.

A mechanical Engineer  in love with his tool room.A designer of moulds for cast iron ,plastic moulding,sheet metal and much more. At one time his design was rejected by a German company and the cause was that the translator ,as was not a technical person had made mistakes while translating.That set the ball rolling and he took it upon him to learn German.He graduated to pass B2 level German exam with very good marks

Read More...

रविवार दि. 17जुलै रोजी आपल्या क्लब मधील जेष्ठ रोटरियन मेंबर श्री अरुण जोशी कालवश झाले.अतिशय खेळकर ,हसतमुख  व् उत्साही व्यक्तिमत्वं होते. ह्या स्वभावामुळेच त्यांनी मोठा  मित्र परीवार  जोडला होता.कै.अरुण 1966 मध्ये स्टेट बँकेत जॉईन झाले व विविध पदांवर विशेष कामगिरी  करीत् ते Sr. मॅनेजर,व नंतर  S.B.I.mutual fund मध्ये विशेष पदावर नियुक्ती झाली.ह्यामुळे SBI Pune Investor service center जे आजतागयत जोरदार चालू आहे त्याचे श्रेय कै.अरुण  ह्यांच्या नावावर आहे.2005 मध्ये चीफ मॅनेजर म्हणून,व२०१० मध्ये निवृत्त झाले.

Read More...

Guests/District Officers Present
AG Rtn Amruta Deogaokar, Rtn. Pallavi Sable

Program Synopsis
Installation of Rtn. Sanjeev Ogale as President, Rtn Abhijit Deshpande as Secretary and BoD of RY 2022-23 was held on 4th July at Sevasadan hall.

Read More...

स्पीकरचे नाव: गायिका रश्मी मोघे आणि सहकलाकार

स्पीकरची ओळख: ॲन गौरी क्षीरसागर

प्रेसिडेंटचा नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम अत्यंत थाटात पार पडला. गायिका रश्मी मोघे यांनी जुनी – नवी मराठी आणि हिंदी गीते सादर केली.

Read More...

हे बुलेटिन PP रो. सुधीर वाघमारे यांनी प्रायोजित केलं आहे.