पीडिजी रो. अरुण कुदळे ह्यांची आपल्या क्लबच्या पूर्व प्रेसिडेंट डॉ. बी. आर . साबडे ह्यांच्यासोबत सदिच्छा भेट.
पी. पी . सोनल पटवर्धन ह्यांची मुलगी ॲनेट अमृता पटवर्धन हिने गोवामध्ये झालेल्या हाफ आयर्न मॅन त्रैथोलोन स्पर्धेत २किमी जलतरण, ९०किमी सायकलिंग , २१किमी रनिंग ७ तास आणि ४४ मि मध्ये पूर्ण केले.
रो. सुहास ओक ह्यांनी २१ किमीची WNC NAVY MUMBAI हाफ मॅरेथॉन २ तास ३८ मि मध्ये पूर्ण केली.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' हा सिनमा येत्या १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटात नंदिनी ची महत्वाची भूमिका आहेच व अजून एक विशेष रो. नितीन व स्वाती पाठक यांची कन्या कल्याणी हीचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून योगदान आहे...
अभिनंदन 💐💐💐
आमचा अभिमान :
आज बघितलेल्या सनी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आमच्या लेकीचे नाव चित्रपटाच्या शेवटी जी श्रेय नामावली दाखवतात, त्यात बघितल्यावर स्वातीला आणि मला खूपच धन्य वाटले. गेली ४ /५ वर्षे मोठा ताण सहन करून तिने इंग्लंडमध्ये जे शिक्षण घेतले, त्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
भारतीयांशी सर्वात जूने सांस्कृतिक व सामाजिक संबंध असलेल्या जमातीत ईराणी वंशीय लोकांचा समावेश होतो.खरंतर हिंदू-आर्य संस्कृतीपेक्षा ही अगोदरपासूनचे हे संबंध आहेत. हिंदू-आर्य व ईराणी हे कोठल्यातरी सामायिक संचयातून उगम पावून अलग झालेल्या संस्कृती आहेत.वांशिक संबंधांमुळे त्यांच्या जुन्या संस्कृतीत व भाषेत खूप साम्य आहे.वैदिक धर्म व झोरासस्ट्रीयन धर्म, त्याचबरोबर वैदिक संस्कृत आणी जूनी पल्लवी भाषा,जी पुढे पारसी भाषा म्हणून ओळखली गेली व जी पारसी धर्मग्रंथाची भाषा आहे,यांमध्ये सुध्दा साम्य आहे.रूढ संस्कृत व पारसी भाषा जरी स्वतंत्रपणे विकसीत झाल्या,तरी त्यांतली कित्येक मूळ शब्द सारखे आहेत,जे ईतर आर्य भाषेमध्ये सुद्धा आहे.दोन्ही ,भाषा ,संस्कृती,कला,यावर आपआपल्या परिसरातील परिस्थितीचा प्रभाव पडला आहे.पारसी कला ईराण च्या मातीशी जोडली गेली आहे,तर भारतीय कलेवर बर्फाच्छादित पर्वत, घनदाट जंगले व उत्तर भारतातील विशाल नद्यांचा छाप पडला आहे.
भारताप्रमाणेच ईराण चा सांस्कृतिक पाया भक्कम असल्याने ,परकीय आक्रमकांवर ईराणी संस्कृतीचा प्रभाव पडला व ते त्या संस्कृतीत मिसळून गेले.अरबांनी ७व्या शतकात ईराण पादाक्रांत केला,परन्तू लवकरच ईराणी संस्कृतीला बळी पडून,त्यांनी रणांतील साधी सरळ जीवनशैली सोडून ,आधुनिक ईराणी जीवनशैली पत्करली.पर्शियन भाषा,फ्रेंच भाषेसारखी, सुसंस्कृत लोकांची भाषा बनली व ईराणी संस्कृती,कला,अशीया,इस्तंबूल, गोबिचे रण पर्यंत दूरवर पसरली.भारतावर सुद्धा सतत ईराणी संस्कृतीचा प्रभाव होता.अफगाण व मोगल काळात ,इंग्रज काळापर्यंत पर्शियन भाषा राजदरबारी भाषा म्हणून ओळखली जात असे.भारतीय भाषा व पर्शियन भाषा संस्कृत पासून तयार झाल्यामुळे, नैसर्गिक रीत्या भारतीय भाषेत, विषेशतः,हिन्दूस्तानी भाषेत,अनेक पर्शियन शब्द आहेत.परन्तु, दक्षिणेतील द्रविड भाषेवर सुद्धा पर्शियन भाषेचा प्रभाव पडला आहे.भारतात पर्शियन भाषेतील दर्जेदार कवी होऊन गेले आहेत.जसे रहीम,देहलवी, काकेती,जब्रेजी,बेदील,गुरू गोविंद सिंह, ईत्यादी.आजसुद्धा हिंदु मुस्लिमात पर्शियन विद्वान आहेत.
सिंधू खोरे संस्कृतीचे समकालीन ईराणी व मेसोपोटेमियातील संस्कृतीशी निश्चितच संबंध होते,कारण इमारतींचे आकृतीबंध व सापडलेले शिक्के वरील संस्कृतींशी मिळते जुळते आहेत.भारत व ईराण यांचे आर्केमिनियन काळाच्या (सायरस द ग्रेट-ई.स.पूर्व ५०० च्या आधी)आधीपासून संबंध होते.भारताचा व उत्तर भारताचा 'अवेस्ता ' ह्या झोरासस्ट्रीयन (पारसी) धर्म ग्रंथात उल्लेख आहे.ॠगवेदांत पर्शियन चा उल्लेख आहे.पर्शियन ना पर्शवा व नंतर पारसीका असे संबोधिले जावयाचे,ज्यापासून पारशी हा शब्द आला.पारथियनना ' पार्थव ' असे संबोधत असत.पार्थव हे ईराणी साम्राज्य होते.ई.स.पूर्व २४७ ते ई.स.२२४ पर्यंत अस्तित्वात होते.भारतीय-पार्थव साम्राज्य 'गोंदोफोरस ' ह्या नावाने प्रसिद्ध होते.ते १९व्या शतकापासून ई.स.२२६ पर्यंत अस्तित्वात होते.ह्याचा अर्थ असा की भारत आणि ईराण मध्ये पूर्वापार संबंध होते.सायरस द ग्रेट च्या काळात हे संबंध आणखीनच वाढले.सायरस काबूल, बलुचिस्तान पर्यंत आला होता.६व्या शतकातील भारतीय इतिहासातील झोरासस्ट्रीयन काळात दारियसचे साम्राज्य उत्तर भारतात, सिंध ते पश्चिम पंजाब पर्यंत पसरले होते.त्या काळात सुर्य पूजेला महत्त्व होते.त्या काळात सिंध सुजलाम सुफलाम असावे.हल्लीसारखे वाळवंट नसावे.'दायरसचे ' साम्राज्य समृद्ध व गजबलेले होते.'हीरोडोटस् ' लिहितो की,' भारतीयांची लोकसंख्या माझ्या माहीती प्रमाणे सर्वात जास्त आहे;त्यामुळे ते सर्वात जास्त खंडणी म्हणजे ३६०टॅलेंट(१टॅलेंट=एका माणसाचे वजन कींवा ५०कि) वजनाचे सोने,देतात ज्याची किंमत १०लाख पौंड पेक्षा जास्त आहे.'त्याचबरोबर हिरोडोटस् च्या सैन्यात भारतीय सैनीक,घोडेस्वार, रथ,व हत्तीदल असे.७व्या शतकाच्या आधीपासून व नंतरसुद्धा पर्शिया व भारत यात व्यापारचालू होता,विषेश करुन पर्शियन गल्फ मधून बॅबिलॉन (जे ईराक मध्ये आहे )शी व्यापार होत असे.६व्या शतकानंतर सायरस व दारियस यांच्या मोहीमांमुळे पर्शियन शी प्रत्यक्ष संपर्क होत होता.त्यानंतर अलेक्झांडरने ईराण पादाक्रांत केल्यानंतर कित्येक शतके ईराण ग्रीक अधिपत्याखाली होता.सम्राट अशोक ने बांधलेल्या कित्येक ईमारतींचा आराखडा परसेपोलीस (जे ईराक मध्ये आहे )मधील ईमारती वरुन घेतला आहे.ऊत्तर पश्चिम भारतातील ग्रीक-बौध कलेला ईराण संस्कृतीचा स्पर्श आहे.४थ्याव५व्या शतकातील गुप्त काळात सांस्कृतिक व कला क्षेत्रात ईराण शी संबंध चालुच होते.सीमेवरील काबूल,कंदाहार आणि सिस्टान भागात भारतीय व ईराणी भेटत असत.नंतर च्या पार्थियन काळात त्या भागास 'व्हाईट ईंडीया ' असे संबोधत असत. फ्रेंच विद्वान, 'जेम्स दारमेस्टेलर' म्हणतात की 'त्या भागात मुखःत्वेकरून हिंदू जनसंख्या जास्त होती.त्या भागाला ख्रिस्तपूर्व २शतके व नंतरची २शतके 'व्हाईट ईंडिया 'असे संबोधत असत. मुसलमान येईपर्यंत तो भाग जास्त करुन हिंदू होता.'
उत्तर भारतात परकीय प्रवासी खूष्किच्या मार्गाने येत असत,परन्तू दक्षिण भारताला व्यापार वगैरे करता समुद्र मार्गावर अवलंबुन राहावे लागे.दक्षिणेच्या राज्यामधे व पर्शियन राज्या मध्ये वकीलाच्या देवाणघेवाणीच्या नोंदी आहेत.तुर्क, अफगाण,व मोंगल,कारकिर्दीत मध्य व पश्चिम आशियाशी भारतीय संबंध आणखीन वाढले.१५व्या शतकात समरकंद,बोखारा येथे ईराणी प्रभावाखाली तिमूरीड प्रबोधन काळ बहरत होता(प्रबोधन काळ-Renaissance-१४, १५, १६व्या शतकात युरोपात प्राचीन ग्रीक, रोमन कलांमध्ये लोकांना रस वाटू लागला.)ह्या सर्व आसमंतातून बाबर बाहेर आला व दिल्ली च्या तख्तावर विराजमान झाला. बाबर स्वतः तैमूर वंशाचा होता.१६व्या शतकातील सफावी राज्यात पर्शियन कलेचा सुवर्ण काळ पुनरुज्जीवीत होत होता.ह्याच सफावी राजा शहा तमास कडे बाबर पुत्र हूमायून शरण आला होता व त्याच्या मदतीने दिल्लीत परत आला.याप्रकारे मोंगल राजांची ईराणशी जवळीक होती व मोगल दरबारात वर्णी लावण्यास सीमे पलीकडून विद्वान, कलाकार येत असत.भारतात नवीन स्थापत्यकला उदयास आली,ज्यात भारतीय कल्पना व पर्शियन स्फूर्ती चे मिश्रण होते.ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ताजमहाल. फ्रेंच विद्वान ग्रॉसेट लिहतो,'ताजमहाल मध्ये ईराण चा आत्मा व भारताचे शरीर सामावले आहे.'जरी नादीरशहाचे कृर आक्रमण आपण अजुनही विसरलो नसलो ,तरी ईराणी व भारतीयां सारख्या जवळीकेचे उदाहरण ईतिहासात क्वचितच सापडते.
ब्रिटीश आल्यानंतर, त्यांनी अशीयातील पडोशींच्या सर्व वाटा बंद केल्या व समुद्र मार्गे युरोप व इंग्लंड ला जोडणाऱ्या नवीन वाटा सुरू केल्या.त्यामुळे खुष्कीच्या मार्गाने भारताचा,ईराण, मध्य अशीया,चीन, यांच्याशी असलेला संबंध तुटला,जो आताच्या विमान युगात परत चालू झाला.हा अकस्मात आलेला एकाकीपणा ,ब्रिटिश हुकमतीचा भारतावरील एक दुर्दैवी परिणाम आहे.परन्तू, पूर्वीच्या ईराण शी भारताचा अजूनही एक धागा जोडलेला आहे.१३००शे वर्षापूर्वी जेव्हा इस्लाम ने ईराण मध्ये प्रवेश केला,तेव्हा शेकडो झोरासस्ट्रीयन धार्मिक भारतात स्थलांतरित झाले,ज्यांचे भारतात स्वागत केले गेले.ते भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ स्थायिक झाले.त्यांना त्यांचा धर्म व चालीरीती आचरण करण्यास मुभा देण्यात आली,तसेच त्यांनी सुद्धा इतरांमध्ये लुडबुड केली नाही.हे खरोखरच लक्षणीय आहे की पारशी, कुठलाही गाजावाजा न करता,भारतीय समाजात बेमालूम व चपखलपणे बसले व भारताला आपले घरच मानले,तरीही आपला समाज, चालीरीती,वेगळ्या ठेवल्या.समाजा बाहेर लग्न करणे निषिद्ध मानले.अर्थात आंतरजातीय विवाह हिंदू धर्मात सुद्धा मान्य नसल्याने इतरांना त्याचे आश्चर्य वाटले नाही.त्यामुळे पारसी समाज वृद्धिंगत झाला नाही व आजही लाख च्या वर (सध्या ५८,७६४.) पारसी भारतात नाहीत.पारशी उद्योगधंद्यात बरेच पुढारलेले आहेत (टाटा,भाभा,दादाभाई नौरोजी,सेठना, मिस्त्री, सर.दिनशा पेटीट,सायरस पुनावाला,वगैरे).जरी सध्या पारश्यांचा ईराण शी काहीही संबंध नसला तरी,अजूनही जुन्या चालीरीती व आठवणींना ते धरुन आहेत.
हल्ली ईराण मध्ये इस्लाम पूर्व संस्कृती विषयी आस्था वाढू लागली आहे.याचा संबंध धर्माशी नसून,संस्कृती व देशाभिमानाशी निगडित आहे.जागतीक घडामोडी आणि समान हितसंबंधांमुळे अशीयातील देश आता अधीक जवळ येत आहेत.युरोप चे वर्चस्व एखाद्या कटू स्वप्ना प्रमाणे सरून गेले आहे.जून्या आठवणी, जून्या मैत्रींचे व साहसांचे स्मरण करुन देत आहेत .पुढील काळात भारत, ईराण व चीन शी निश्चितच जवळीक साधेल(किती खोटे ठरले हे विधान. )दोन महिन्यांपूर्वी ईराणी सांस्कृतिक मंडळ भारतात अलाहाबादला आले होते.त्यावेळी त्यांचा नेता म्हणाला,' भारतीय व ईराणी ,भाऊ भाऊ आहेत, जे पर्शियन दंतकथेनुसार वेगळे झाले,एक पूर्वे कडे गेला तर दुसरा पश्चिमेकडे.पुढील वंशज ही कथा विसरले,पण त्यांच्यात एक संगीताचा दुवा राहीला,जो अजुनही बासुरी वर वाजवला जातो.शेकडो वर्षांनंतर सुद्धा ह्या दोन वंशजानी त्या धून मधुन एकमेकांना ओळखले व एकत्र आले.म्हणून आज आम्ही ती बासरी वरील धून वाजविण्यास भारतात आलो आहोत, जेणेकरून ती धून ऐकून आमचे भारतीय भाई आम्हास ओळखतील व आम्ही भाई भाई एकत्र येऊ.'
समाप्त
एकदा सकाळी उन्हात वृत्तपत्र वाचत बसलो होतो. नातू जवळच खेळत होता. एक बिस्किटाचा तुकडा पडला होता तो त्याने उचलला. तो खाईल असे वाटून मी पटकन तो तुकडा दूर फेकून दिला, आणि जमिनीवर पडलेले खाऊ नये असे सांगून परत पेपर वाचू लागलो. लहान मुलांना कुतूहल असते. माझे लक्ष्य नाही असे पाहून नातू त्या तुकड्याजवळ गेला. मला हाक मारू लागला “ आजोबा हे बघा मुंग्या खात आहेत.’
काही मुंग्यानी छोटे कण करुन त्या वारुळाकडे चालल्या होत्या. थोड्या वेळात 10/12 मुंग्यानी मिळून तो पूर्ण तुकडा ओढायला सुरुवात केली. नातवाने विचारले “ या कुठे चालल्या आहेत” मी त्याला सांगितले “पावसाचे दिवस जवळ आले आहेत त्यामुळे मुंग्या अन्न साठवून ठेवत आहेत.” मोठी नात जवळच होती ती म्हणाली “आजोबा या मुंग्याना कसे समजते की अन्न साठवून ठेवावे.” त्यावर मी तिला सांगितले की काही प्राण्याना उपजत ज्ञान असते. मानवाला मात्र बुद्धी दिली आहे. त्याला येणाऱ्या काळाचा वेध घेता येतो. शिवाय माणसाच्या गराजाही जास्त आहेत. शहाणी माणसे भविष्याची सोय आजच करुन ठेवतात. नात म्हणाली “आजोबा, कोणी बक्षीस देतात, वाढदिवस, भाऊबीजेला मिळालेले पैसे मी माझ्या पिग्गी बँकेत ठेवते. माझ्या कडे रु. २,००० साठले आहेत.” मला खूप बर वाटल. तुला हे कोणी शिकवल असं विचारलं तर ती म्हणाली माझी आई पण तिला मिळालेले पैसे एका वेगळ्या पर्स मध्ये जपून ठेवते तिचे पाहून मी पण करते. तिची आई म्हणजे माझी सून. हिने कोणाकडून हे संस्कार घेतले तर ते तिच्या आईकडून. असे हे परंपरेने आलेले बाळकडू आहे.
मात्र गेल्या काही वर्षात “जिंदगी मिलेगि न दुबारा” म्हणत आजचा दिवस साजरा करा, उद्या कोणी पाहिला आहे अशी वृत्ती बळावते आहे. अवाच्या सवा खर्च करण्याची वृत्ती वाढत आहे. क्रेडिट कार्डच्या सोयी मुळे आज पैसे नसले तरी खर्च करता येतात त्याचाही परिणाम झाला आहे. सतत स्पर्धा त्यामुळे दुसऱ्याशी तुलना केली जाते आहे, बाजारू अर्थव्यवस्थेने जाहिरातींचा सतत मारा करुन वस्तूची मागणी वाढविण्याच्या उद्देशाने अवाजवी गरजा निर्माण केल्या जात आहेत. सिनेमातून एक खर्चीक मानसिकता तयार झाली आहे. हे सर्व समजत असूनही एकूण सामाजिक माहोल भुरळ वा मोहात पाडणारा आहे. शहरात बहुतेक विभक्त कुटुंब असल्याने आई वडिलांचा वचक नाहीसा झाला आहे. एक किंवा दोनच अपत्ये असल्याने त्यांचे लाड पुरविले जातात. पालक जर बचत करीत नसतील तर मुलांवर संस्कार कसे होणार. चांगल्या सवयी शाळेत शिकवून लागत नाहीत तर पालकांचे अनुकरण करीत लागतात. चांगले संस्कार लहानपणीच होतात. मोठेपणी फार अवघड.
म्हणून ज्यांचे पाल्य १५ वर्षाचे आतील आहेत अश्या सर्व पालकांवर मोठी जबाबदारी आहे, की स्वत:;ला बचतीची सवय असावीच पण त्याबद्दल मुलांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. वाढदिवस, भाऊबीज, राखी अश्या विविध प्रसंगी मिळणारे पैसे लगेच खर्च न करता पिग्गी बँकेत साठवावे. हल्ली पॉकेट मनी द्यायची पद्धत रूढ झाली आहे. त्यातून दर महा काही रक्कम बाजूला ठेवली तर जेव्हा जास्त गरज असेल तेव्हा ती उपयोगी कशी होईल ते सांगावे. वायफळ खर्च कोणता व तो कसा टाळता येईल हे समजवावे. मुलांना बँक बचत खाते काढून देऊन त्यात पैसे कसे भरायचे/काढायचे तेही मुल अनुभवातून शिकतील. त्यावर व्याज मिळते हेही समजून येईल.
कधी सहलीला गेल्यास बंधाऱ्यात, धरणात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो तो साठविल्या मुळेच उन्हाळ्यात नळातून पाणी मिळते, जेथे कोरडी जमीन होती तेथेही पावसाचा एक एक थेंब जमा होतो आणि छोटी तळी होतात, अश्या गोष्टींचा दाखला देऊन बचतीचे महत्व पटवून देता येईल. नेहमी थोडे थोडे वाचविलेले पैसे यातूनच मोठी रक्कम तयार होते हे अनुभवाने समजले तर आयुष्यभर पुरेल अशी चांगली सवय मुलांना लागेल. आठवी पुढील विद्यार्थ्याना मुदत ठेवी, म्युचुअल फंड, विमा याची माहिती आणि जाणीव करुन द्यावी.
३०/४० वर्षांपूर्वी आयुर्मर्यादा ५५/६० होती. निवृत्त जीवनाचा काळ फार नव्हता. एकत्र कुटुंबात सोय होत होती. आता आयुर्मर्यादा ७५ वर्षे झाली आहे. निवृत्त जीवनाची वर्षे वाढत आहेत. पुढील पिढी कुठे जाईल याचा भरवसा नाही. त्यांच्या दैनंदिन गरजा वाढत आहेत. त्यामुळे बचतीची सवय लहानपणीच लागणे कधी नव्हे इतके महत्वाचे झाले आहे.
नमस्कार मंडळी....
प्राध्यापिका मोहिनी पिटके यांचा *कवडसे पश्चिमप्रभेचे हे पुस्तक मध्यंतरी वाचनात आलं... पाश्चिमात्य कवितांचा अभ्यास केलेल्या मोहिनीताईंचं त्या कवितांवर केलेलं मुक्तचिंतन आणि त्याचे लेख असं या पुस्तकाचे स्वरूप आहे.... अवघ्या विश्वातील सूज्ञ व जाणकार लोकांनी जीवनाचे गूढ रहस्य, गुंतागुंतीचे नातेसंबंध यावर खूप लिहिलेले आहे...वेगवेगळ्या भाषांमधून आणि निरनिराळ्या दिशांने येऊन सुद्धा एकाच टप्प्यावर हे चिंतन येऊन पोहोचलेले दिसतं.... या पुस्तकामध्ये हे जाणवतं... यातील एक लेख आज मी सादर करणार आहे.... लेखाचं नाव आहे आत्मरुपी पंख
When in the sun..
my wings can be displayed..
And in retirement..
I can bless the shade.
लेखिका म्हणते... सूर्य डोक्यावर आला.. की माध्यान्हीच्या उन्हात शरीर आणि मन होरपळून निघते.. तो कलण्याची वाट पाहण्याखेरीज गत्यंतर नसते.. पण हा क्षण मग जिंकायचा कसा..?? या क्षणाला तोंड देणे क्रमप्राप्त असते.. प्रतिकूलतेवर आरुढ व्हावे लागते... कसोटीच्या क्षणातून तावून-सुलाखून बाहेर पडावे लागते... अशा वेळी माणसाला फुटतात नवे पंख... साहसाचे... आशेचे... सहनशीलतेचे आणि अस्मानी महत्त्वाकांक्षेचे....हे पंख म्हणजे माणसाला मिळालेली दैवी देणगी आहे...हे पंख प्रत्येकालाच मिळालेले असतात.. फक्त आपल्यापैकी थोडीच माणसे या पंखांचा योग्य त्या क्षणी... योग्य तसा वापर करतात... हे पंख जणू सुप्तावस्थेत असतात आपल्याजवळ.... वेळ येताच त्यांचे बळ कळते... मनपक्षी हे पंख उघडतो आणि भविष्याच्या गगनात भरारी घेऊ लागतो.... अन या क्षणांवर विजय मिळाल्यावर लाभते... ती खरी विश्रांती..!!
थकलेल्या जीवावर चार ओले थेंब... सावलीची माया पाखर मिळते या तहानल्या जीवाला... आणि मन..ते विचार करते ईश्वरी कृपेचा....!! त्याचा कृपा प्रसाद मिळतो माणसाला या सावलीच्या रूपाने.... तप्त वातावरणातील एखादी वार्याची सुगंधी झुळूक मनाची तलखी शांत करते... ते देखील ईश्वराचेच एक रूप असते... डोळ्यांना निववणारे संध्यारंग, फुलाफुलांतून सांडणारा मोतिया सुगंध... पहाट-क्षणांना जिवंत करणारी पक्षांची आतुर किलबिल....!! ही सारी परमेश्वराच्या रुपाची पदचिन्हेच होत.... पण ही सावली अनुभवण्यासाठी पाय मात्र थोडे पोळावे लागतात... तरच त्या सावलीचा थंडावा अनुभवता येतो... या उन्हातून चालताना पावलांचे बळ अजमावून पाहता येते... उन्हाच्या झळा डोळ्यातून कसे आणि किती पाणी काढतात हेही पाहता येते... आपल्या मनाचे पंख कधी उघडणार आणि किती काळ तसे राहणार हेही पाहता येते.... प्रसिद्ध आंग्ल निबंधकार बेकन म्हणतो....
Virtues are like precious odours..
Most fragrant when they are crushed....
आपल्याला मिळालेले हे दैवी पंख या जगातील आपले अस्तित्व अर्थपूर्ण करतात.. आपलं माणूसपण अधिक उजळून टाकतात...
माणूस हा तसा सहजासहजी हार जाणारा प्राणी नाही... त्याच्या जवळ आहे दुर्दम्य आशा,उदंड इच्छाशक्ती आणि पराकोटीची सहनशीलता... आयुष्यात येणारी दुःख सहन करताना माणूस सहज उद्गार काढतो...," पुरे... आता मला नाही सहन होत..!!" आणि तरीही त्याहूनही तीव्रतर दुःखाचा सामना तो या पंखांच्या साह्याने करू शकतो...
माणूस बुद्धिमान आहे... महत्त्वाकांक्षी आहे माणूस हे आहे म्हणून ते आहे ...फक्त नाहीयं त्याच्याजवळ कृतज्ञता.... ईश्वरी कृपेचं चांदणं झेलताना ओठावर येणारा कृतज्ञतेचा हुंकार....!!
सध्या इतकंच...
डाउन सीन्ड्रोम म्हणजे मानसिक व शारिरीक वाढ खुंटणे. “उन्मेष” ही संस्था डाउन सीन्ड्रोमने बाधित मुलांच्या पालकांची संघटना आहे. रोटरी क्लब पुणे दक्षिणच्या सहयोगाने त्यांनी एक स्पर्धा काही दिवसांपूर्वी आयोजित केली होती. त्याला उपस्थित राहायची संधि मिळाली. “यलो” हा चित्रपट बघितला होता म्हणून अश्या मुलांची समस्या काय असते याची थोडी फार कल्पना होती.
बोट क्लब येथे पोहण्याची स्पर्धा होती- वयोगटानुसार स्पर्धा होत्या. पहिली शर्यत संपली. सर्वानी टाळ्या वाजवून पहिला नंबर आलेल्या मुलाचे कौतुक केले. तर त्याला त्याचे काही देणे घेणे नव्हते. दुसरी शर्यत लगेच होती, मात्र हा मुलगा पाण्यातून बाहेर यायलाच तयार नव्हता. त्याला अजून पोहायचे होते.
वादन स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा झाल्या. मुलांचा जोश आणि उत्साह पाहून सर्वजण अचंबित झाले. कोणालाच जिंकण्याची ईर्षा नव्हती, तर वादन नृत्य करण्याचा मनसोक्त निर्मळ आनंद स्पर्धक घेत होते. प्रेक्षकानीही मनमुराद आनंद लुटला. इतर कुठलीही स्पर्धा असेल तर परीक्षक नेहमीच म्हणतात “स्पर्धा अगदी चुरशीची झाली, नंबर ठरविणे अवघड होते” मात्र या स्पर्धेत तयारीत कमी जास्त स्पष्ट दिसत असूनही परीक्षक मनापासून म्हणत होते की सर्वच स्पर्धक विजयी आहेत. पहिला, दूसरा नंबर आलेल्याला पारितोषिक दिले, तरी सर्वच स्पर्धकाना प्रोत्साहन म्हणून सर्टिफिकेट व बक्षीस दिले. माजी नगरसेविका मेधा कुलकर्णी यांचे हस्ते त्याचे वितरण केले. बक्षीस असो वा सर्टिफिकेट असो ते घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद सारखाच होता. शिशुशाळेतील मुलांचे वेडे वाकडे नाचणे, बोबडे बोल देखिल जसे मोहक असतात. तसेच वाटले. सर्व पालकही समंजस होते. त्यांच्या पाल्याने भाग घेतला याचाच आनंद होता. स्पर्धेत नेहमी आढळणारे मानसिक ताण-तणाव कुठेच नव्हते. कोणाचा हेवा नाही, परीक्षकांनी पक्षपात केल्याची तक्रार नाही. वादावादी नाही, रूसवे-फुगवे नाहीत, नाराजी नाही, एकमेकांचे प्रामाणिक कौतुक करीत कार्यक्रमाची सांगता झाली.
“कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातील “सुर निरागस हो” याचा अर्थ समजला, त्याची प्रचिती या स्पर्धेत पाहायला मिळाली. स्पर्धा कसली ती, मुक्त, निर्भेळ आनंद उपभोगणे. अशी ही “निरागस स्पर्धा”, एक अविस्मरणीय अनुभव.
“उन्मेष” संस्थेच्या संचालिका सौ. जयंती गाडगीळ (९८२२३२२७३८) व त्यांच्या सहकारी महिला ज्या तळमळीने कार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे.
कुंडली अभ्यास
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील षष्ठ स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच सहावी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच गुरुनंतर येणारा ग्रह शुक्र आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील पंचम स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील षष्ठ स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
6)षष्ठ स्थान (रिपुस्थान, रोग स्थान, शत्रुस्थान):
रोगारि व्यसनक्षतानि।
रोगासंबंधी, शरीराला मनाला तापदायक होणाऱ्या गोष्टीसंबंधी अभ्यास ह्या स्थानावरुन करतात.
या स्थानावरून कोणते आजार होतील? Surgeries कराव्या लागतील का ? लागल्या तर कशाप्रकारच्या कराव्या लागतील ते ठरते. तसेच आजारांचे स्वरूप, ते दीर्घ आजार असतील की तात्पुरते ? ते सांगता येते. तसेच आजाराचा काळ पण सांगता येतो. या स्थानाला शत्रु स्थान पण म्हणतात. त्यामुळे या स्थानावरून माणसाला आयुष्यात अनुभवास येणारे शत्रुत्व कसे असेल ? त्याची व्याप्ती, तीव्रता कीती असेल? तसेच जर कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार असतील, तर त्याचे स्वरूप सांगता येते.
दशामाचे भाग्य स्थान असल्याने नोकरी-व्यवसायातील चढउतारही या स्थानावरून ठरतात.
षष्ठ स्थानाला मामाचे स्थान पण म्हणतात. मामाचे स्थान असल्यामुळे, आईच्या माहेरच्या संबंधातील (मामा/मावश्या यांच्या संबंधीच्या) गोष्टी यावरून पाहतात. हे शत्रुस्थान असल्यामुळे हे स्थान अशुभ मानले जाते.
आता आपण १२ राशींमधील सहावी कन्या रास पाहूया.
6) कन्या रास:- ही स्त्रीतत्वाची रास आहे. स्वामी बुध आहे व द्विस्वभावी रास आहे. कन्याराशीवर पूर्णपणे बुधाचा अंमल दिसतो. हा कुमार ग्रह आहे. त्यामुळे कन्याराशीचे लोक वयाने थोडेसे लहान दीसतात. थोडा बालीशपणा जाणवतो. थोडा खोडकर पणा दिसतो. या राशीवर बुधाचा अंमल इतका आहे की बुधाचे बरेवाईट सर्व गुण या राशीत आहेत.
Equally grasping, memory & Logic हे तीनही गुण या राशीत दिसतात. व याचा वापरही ते उत्तमप्रकारे करतात. हजरजबाबी असतात. नैसर्गिक कुंडलीत ही रास षष्ठात येते. ते अशुभ स्थान आहे. त्यामुळे या राशीत काहीसा अबोलपणा आहे stage fear असते. ( कन्यारास व मीनेचा बुध असल्यास खूप बडबडा स्वभाव असतो. त्या लोकांना कुठे काय बोलावे हे समजत नाही). कन्या राशीच्या व्यक्ती good listener असतात. समोरची व्यक्ती या राशीच्या लोकांसमोर पटकन Open होते. या राशीकडे बोलण्याची कला आहे वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी ही रास आहे. उत्तम विनोदबुद्धी आहे. स्वतःवर पण विनोद करण्याची कला या राशीत आहे. पण जर बुध बिघडलेला कींवा शत्रुराशीत असेल तर हे सगळे गुण वाईट होतात. अशा व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा कीस पाडतात. थोडासा अविश्वास असतो चिडकेपणा असतो. 'मला राग आग आहे' असे express करत नाहीत. पण समोरच्यांनी ते ओळखावे अशी अपेक्षा नक्कीच असते Maturity नसते.
या राशीचे स्वरूप म्हणजे मध्यम गौर रंग, मध्यम बांधा, मध्यम उंची असते. थोडेसे बारीकच म्हणता येईल. या राशीचा अंमल पूर्णपणे digestive System वर असतो त्यामुळे पोटाचे / पचनाचे विकार असतात. प्रकृती कधीच ठणठणीत नसते प्रतिकार शक्ती उत्तम नसते Physical आणि mental स्तरांवर हेच दिसते पटकन कोणाला नाही म्हणू शकत नाहीत.
या लेखातील पुढील भागात आपण गुरु या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
6) शुक्र: (वृषभ, तुळ) :
संपद्वाहनं वस्त्रभूषणनिधिद्रव्याणि तौर्यत्रिकं॥
भार्यासौख्यं सुगंध पुष्पमदनव्यापार शय्यालयान्॥
श्रीमत्वं कवितासुखं बहुसंग विलासं मदं॥
साचिव्य सरसोतिमाह भृगुजान् विवाह कर्मोत्सवम् ॥
पत्नीवाहनभूषणानि मदन व्यापार सौख्यं भृगोः॥
विवाहाचा कारक ग्रह आहे. विवाहाच्या दृष्टीने जे प्रेम असते, त्याचा कारक ग्रह आहे. विवाहाच्या बाबतीत, विवाह कसा होईल, arrange होईल की Love marriage होईल, तसेच वैवाहीक सुख कसे असेल? हे ठरते. तसेच घटस्फोट, वैधव्य / विधुर योग किंवा व्यभिचार हे ही शुक्राच्या कारकत्वात येते.
शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे. अशा व्यक्ति स्वतः सुंदर असतात किंवा त्यांना सौंदर्याची आवड असते. अशा लोकांचे डोळे व केस विशेषत: सुंदर असतात. तसेच शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे. कला, कलेची आवड, सौंदर्य दृष्टी ही शुक्राच्या कारकत्वात येते. दागदागिने कपडेलत्ते यांचे सुख हे शुक्रावर अवलंबून असते. या बरोबरच ऐहीक गोष्टीचा आनंद ज्या गोष्टीतून मिळतो, त्या सर्वांचा कारक ग्रह शुक्र आहे. नातेसंबंधातील सुख, खाण्यापिण्यातील रसिकता, मैत्रीसंबंध हे शुक्राच्या अंमलात येतात. त्यामुळेच व्यसन हे सुद्धा शुक्राच्याच अंमलात येते. Mannerism, पोषाखा बाबतच्या कल्पना, यामधली जी कला आहे, ती ही शुक्राच्या अंमलात येते. हौस मौज, enjoyment, नाटक-सिनेमा, हे सर्व शुक्राच्या कारकत्वात येतात.
शुक्राला, असुर गुरू म्हंटले आहे. शुक्र मांत्रिक लोकांच्या विद्येचा कारक आहे. वशीकरण तंत्रमंत्र, गारुडीविद्या, जादूविद्या, अनेक सिद्धी ह्या गोष्टींच्या दृष्टीने काही वेळा अभ्यासावा लागतो.
कलेच्या दृष्टीने शुक्र महत्वाचा आहे. कलांचा कारक आहे. कलेचा व कलात्मक दृष्टीचा आविष्कार जेथे जेथे होतो, तेथे शुक्राचा अंमल आहे.
स्वरूप :- स्त्री ग्रह, सावळा, मोहक, मध्यम बांधा, व अतिशय प्रमाणबद्ध शरीरयष्टी, काळे कुरळे केस व सुंदर डोळे, सावळा रंग असला तरी healthy skin आहे वात आणि कफ प्रकृती आहे. Gynac Problem तसेच खाण्यापिण्यामुळे होणारे त्रास (अति खाण्यापिण्यामुळे) हे शुक्राच्या कारकत्वात येतात. शुक्राचा गुह्येंद्रियावर व स्पर्शोद्रियांवर अंमल आहे.
क्रमशः
मंडळी, बालपणी आपण सगळेच जण थोडेफार खोडकर आणि उद्योगी होतो आणि त्यावेळेस जेव्हा आपण आई बाबांचे ऐकत नसू तेव्हा निश्चितच आई बाबा आपल्याला मोठ्या आवाजात दटावत असणार. कुठेतरी आपण या आवाजाकडे लक्ष द्यायचं प्रोग्रामिंग आपल्या मनात फिट करून टाकलं कारण जर त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं तर नंतरचे परिणाम आपण काही वेळा भोगून मग हे शहाणपण आलं असणार.
याच आपल्या प्रोग्रामिंगचा वापर हे टीव्ही चॅनल वाले अँकर, न्यूज रीडर करतात. त्यांना कोणतीही गोष्ट सांगताना असा मोठा " पेरंटल व्हॉइस" वापरण्याचे खास ट्रेनिंग दिले जाते, आणि आपल्या नकळत आपण या आवाजाकडे लक्ष देतो आणि त्याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो.
तर इथून पुढे शहाणपण याच्यातच आहे की अशी आरडाओरड सुरू झाल्या क्षणी चॅनल बदलून टाकायचा.
जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या वर मी पूर्वीच लिहीलेल्या लेख परत देतेय ... बघता बघता माझ्या करीयरला ३९ वर्ष झाली. खूप मोठा पल्ला.या माझ्या प्रवासात मला अनेक अनुभव आले, अनेक प्रसंग, व्यक्ती मला समृध्द करुन गेल्या.या प्रत्येक गोष्टतून आपण शिकत गेलो, "वाढत" (grow) गेलो का ? असा प्रश्न मला पडला,पण एक मात्र नक्की..
या अनुभवांनी, प्रसंगांनी, व्यक्तींनी , कष्टांनी मला समृध्द नक्कीच केलं.यातल्या काही गोष्टी विसरण्या सारख्या नाहीतच.मोठमोठ्या व्यक्तीं बरोबर मला काम करायला मिळाले, शिकायला मिळाले. त्यापैकी एक म्हणजेच विक्रमजी. अर्थातच हा पूर्णपणे माझा वैयक्तिक अनुभव आहे. . एक अत्यंत देखणं , मनस्वी,प्रेमळ असं व्यक्तिमत्त्व म्हणजे विक्रम गोखले. " नटसम्राट" प्रमाणेच " बॅरिस्टर" या नाटकाच्या सीडी निर्मितीचं भाग्य मला लाभलं. भाग्य अशासाठी की दोन्हीही नाटकं मैलाचा दगड ठरलेली. त्यांचं जतन मी करू शकले ,हे खूपच मोठं काम माझ्या हातून झालं. असो. विक्रम गोखले आणि माझा परिचय तसा जुनाच.."कळत नकळत " सिनेमाच्या वेळेचा. त्यात माझा आणि त्यांचा एकही सीन एकत्र नव्हता. सेटवर ओळख झाली. मी आधीपासूनच त्यांची फॅन होते. पण खऱ्या अर्थाने त्यांचं मोठेपण मला त्यांच्या सहवासात आल्यावर कळले. " बॅरिस्टर " ची सीडी करायची ठरवली तेव्हा विक्रमजीं शिवाय दुसरं कुठलंही नाव डोळ्यासमोर येणं शक्यच नव्हतं. राजेश दामले यांच्या मुळे नव्याने ओळख झाली आणि आमच्या मैत्रीला सुरूवात झाली. काय बोलावं या माणसा बद्दल...! स्वच्छ, पारदर्शक आणि extremely passionate ( हो..मला हाच शब्द त्यांच्या साठी योग्य वाटतो ,दुसरा कुठलाच पर्यायी शब्द सापडत नाही. ) बॅरिस्टर ची व्यक्तीरेखा त्यांनी जीवंत केली आहे , किंवा ही भूमिका अक्षरशः ते जगले आहेत. हे सर्व मला under statement वाटतात. इतकी ती प्रभावीपणे त्यांनी ती उभी केली आहे. अर्थातच माझा आणि अभिजीत् चा त्यांनीच ती व्यक्तीरेखा करावी असा आग्रह होता, पण वय आणि वजन या दोन्हीही कारणांमुळे त्यांनी ठाम नकार दिला. पण सीडीचे दिग्दर्शन करण्याचे आनंदाने कबूल केले. या सर्व प्रवासात तयारी सुरू असताना त्यांना जवळून बघता आले.आणि त्यांच्या विषयीचा आदर अजून वाढला. तसं बॅरिस्टर हे नाटक खूपच कठीण. जयवंत दळवींच्या सिध्द लेखणीतून उतरलेलं.त्याच्या तयारी बाबत ,नटमंडळींच्या निवडी बाबत जातीने लक्ष घालत होते. "बॅरिस्टर" ची भूमिका सचिन खेडेकर या मातब्बर नटाला देण्याचे ठरले आणि तालमींना सुरूवात झाली. सचिनच्या अभिनय क्षमतेबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही.पण तालीम सुरू असताना विक्रमजी त्याला सीन समजायचे आणि करूनही दाखवायचे..बापरेऽऽ.. माझ्याकडे शब्दच नाहीत त्यांचं वर्णन करायला.अक्षरश: गारूड होत ते. इतकी प्रचंड अभिनय क्षमता कुठून येते..?? मंडळी अशी मेजवानी मला मात्र पुरेपूर मिळाली. यातून माणूस समृद्ध नाही झाला तर नवलच. हो ना..? मला त्यांच्या बरोबर फार काम करायला नाही मिळालं. नाही म्हणायला त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "आघात " मध्ये मी छोटीशी भूमिका केली. पण आजही त्यांच्या बरोबर काम करण्याची उर्मी माझ्या मनात ताजी आहे. डाॅक्टरां प्रमाणे माझीच नव्हे तर अभिजितचीही अत्यंत घनिष्ठ मैत्री जमली. त्यांनी अभिजित बरोबर अनेक जाहिराती केल्या. इतका साधा, निगर्वी, मोठेपणाचा कुठलाही आव न मिरविणारा माणूस दुर्मिळच. खऱ्या अर्थाने ते आमचे "dear friend" होते. अभिजित प्रेसिडेंट झाला तेंव्हा ते चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते. केवळ आमच्या प्रेमापोटी. काय लिहू आणि किती लिहू... आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आमच्या वर, हे काही केल्या पटतच नाहीये. परमेश्वराची इच्छा. तर असे हे आमचे विक्रमजी. Love you ,miss you. 🙏
ग्राहक पेठ येथे १० नोव्हेंबर रोजी १५ एड्स रुग्णांना धान्य वाटप करण्यात आले.
डॉ. विजयाताई गुजराथी ह्यांनी रुग्णांना चावनप्राश बरण्या दिल्या.
13 November 2022
NICU Equipments donated by our club
डॉ. दिगंत आमटे ह्यांना आपल्या क्लबने १०० NICU उपकरणे दिली. ह्या उपकरणाचा वापर आदिवासी वसाहतीसाठी मोलाची ठरली. आपण दिलेल्या उपकरणामुळे आजपर्यंत १००० बाळांना जिवनदान मिळाले आहे
१६ नोव्हेंबर २०२२
इको क्लब
दिवाळीच्या सुट्टीनंतर इको क्लब च्या उपक्रमांना सुरुवात झाली. बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर ला आपले रो विनायक जोशी यांचे ' आर्क्टिक व अंटार्क्टिक मधील भिन्न जीवसृष्टी ' या विषयावरील व्याख्यान व slide show वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, शुक्रवार पेठ येथे झाला. इको क्लबच्या या कार्यक्रमाला मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. रो. विनायक जोशी यांचे स्लाईड शो आणि व्याख्यान खूपच रंगले.
१८ नोव्हेंबर रोजी पंकज अंबेडे, life coach certified by ICF(USA) ह्यांचे 'माईंड कंडिशनिंग' वरती व्याख्यान जाले
२३ नोव्हेंबर २०२२
इको क्लब मिटिंग
20th November 2022
Fitness walk at ARAI
३१ ऑक्टोबर २०२२
काश्मीर मधील कुपवारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. अब्दुल हमीद फानी यांच्याशी दृक-श्राव्य माध्यमातून चर्चा
कालचा प्रो. फानी यांच्याशी झालेला संवाद अनोखा असाच म्हणावा लागेल.
तेथे चाललेले काम, आपला सहभाग आणि अजूनही खूप काही करण्यासारखे आहे याची जाणीव झाली.
आगामी काळात चला पुढे सरसावूया डॉ गोरे सर, अधिक कदम आणि इतर सर्व यांचे कार्य पुढे नेण्यासाठी!
उत्तम कार्यक्रमासाठी झटलेल्या , प्रोग्राम कमिटी, श्वेता, सुदर्शन, अभिजित आणि हेमंत यांचे हार्दिक अभिनंदन
दिनांक ७ नोव्हेंबर ची सभा ही RCP south च्या सभासदांसाठी विशेष आनंदाची आणि उत्सुकतेची होती.
कारण सभेच्या वक्त्या होत्या विदुषी शेफाली वैद्य....
शेफाली वैद्य हे नाव गेली काही वर्ष सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणाऱ्यांसाठी सुपरिचित होतेच. त्यांचे निर्भिड आणि अभ्यासपूर्ण सामाजिक घडामोडींबद्दल च्या लिखाणाचा चाहता वर्ग मोठा आहे.
तसेच त्यांचे पुरातन मंदिरांच्या विषयीचे लिखाण ,टेक्सटाइल industry संबंधीचे विवेचन यामुळे त्या वाचकांच्या आवडत्या लेखिका तर होत्याच पण गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात त्यांनी चालवलेल्या No bindi No business या hashtag मुळे ती एक चळवळ बनली. त्या मुळे अनेक मोठमोठ्या ब्रँड्स नी आपल्या जाहिरातीतील मॉडेल्स ना हिंदू सणांच्या जाहिरातीत कुंकू लावून सादर करण्यास सुरुवात केली.
अशा या शेफाली यांची दोन पुस्तके " नित्य नूतन हिंडावे " आणि " चीतरंगी रे " नुकतीच प्रसिद्ध झाली.त्या पुस्तकांच्या व त्याच्याच अनुषंगाने शेफाली यांचा परिचय करून घेण्याची सुसंधी आम्हा south वासियांना मिळाली. अभिजित जोग यांनी त्यांच्या नेहमीच्या शांत आणि संयत शैली मध्ये त्यांना बोलते केले. शेफालीची लढाऊ वृत्ती त्यांच्या रक्तातच आहे असे त्यांनी सांगितले.
कारण त्यांचे आजोबा ,वडील ,काका हे सर्वच लढवय्ये होते. तसेच घरातच पुस्तकांचा मोठा संग्रह असल्याने वाचनाची आवड त्यांना लहानपणा पासूनच लागली.
लग्न झाल्यावर यजमानांची फिरती नोकरी आणि तिळी मुले यां मुळे त्या नोकरी करू शकत नव्हत्या.त्या दरम्यान त्यांनी सोशल मीडिया वर लिखाणाला सुरुवात केली.हळूहळू त्यांना या मीडिया ची ताकद लक्षात आली .
त्यांच्या चीतरंगी रे या पुस्तकातील एका उताऱ्याचे देखील त्यांनी वाचन केले.
अशा या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर रुचकर फेलोशीप नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
- रो. सुदर्शन नातू - convenor
- रो. विनोद अगरवाल
- रो. डॉ. मंदार अंबिके
- रो.अभिजीत देशपांडे
- रो.अभिजीत जोग रो.सुभाष करंदीकर रो.माधुरी किरपेकर रो.डॉ.किरण पुरोहित
- रो.संदीप विळेकर
- रो.रवींद्र प्रभुणे
काम करत असताना मनात काय विचार असला पाहिजे, कोणाच्या बोलण्याचा नक्कीच विचार झाला पाहिजे याची थोडीफार स्पष्टता आली.
मुळात रोटरी मध्ये किती वेगवेगळ्या एवेन्यूस मध्ये काम केले जाते, ते करत असताना अजून आपले काही वेगळे प्रोजेक्ट्स आपण कसे केले पाहिजेत? या बद्दलची माहिती खूप विचार करण्या सारखी होती.
वैयक्तिकरित्या मला या वर्षी फेलोशिप कमिटी मध्ये तुमच्या कडून मिळालेल्या टिप्स नक्कीच उपयोगी पडणार आहेत.
गोविंदराव, तुम्ही नंतर इन्फॉर्मल गप्पांमध्ये जे म्हणालात ना ते अगदी पटलं. एकच घरात राहणारी माणसं बदलली, तर सोशल प्लॅटफॉर्मवर पण तसेच चित्र दिसणार. अगदी खर आहे.
तुमच्या अनुभवातून एक नक्की जाणवलं की काळ कितीही बदलला तरी पॅटर्न साधारण सारखाच राहतो. आणि त्यातच आपल्याला ऍडजस्ट करून पुढे जायचं असतं.
मंदार, तुम्ही छान मुद्देसूद मुलाखत घेतली जेणेकरून आम्हाला गोविंदराव आणि संदीप यांचा रोटरी मधील प्रवास, सहभाग अजून तपशीलात समजला.
रो. श्वेता करंदीकर-प्रोग्रॅम कमिटी चे खूप आभार आणि त्यांना विनंती की याचे सिक्वेल नक्कीच ऐकायला आवडेल. आणि त्यावेळी गोविंदराव जसे म्हणाले तशी वेगळ्या प्रकारची फेलोशिप ठेवता येईल.
अद्वैत, कर्मयोग या आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख होत होती... व्याख्या समजत होती... कारण पीपी रो. गोविंदराव पटवर्धन आणि पीपी रो. संदीप विळेकर त्यांचे रोटरीतले अनुभव सांगत होते.
या दोघांनी क्लबमधल्या सर्व विभागांत चेअर आणि डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. या दोघांना रोटरी डिस्ट्रिक्टमधल्या कामाचा गाढा अनुभव आहे. दोघांनाही क्लबमधल्या आणि डिस्ट्रिक्टमधल्या कामाबद्दल पारितोषिकं मिळालेली आहेत.
रोटरीची नस ओळखलेली माणसं जेव्हा बोलतात तेव्हा वेगवेगळे पैलू आपल्यासमोर उलगडले जातात. तो अनुभव या सभेला, मुलाखतीला उपस्थित असलेल्यांनी घेतला.
रोटरी २००० पूर्वीची आणि आत्ताची यांत जमीनआसमनचा फरक पडला आहे जे जाणवलं त्यांच्या बोलण्यातून, त्यांनी दिलेल्या उदाहरणांतून…!
पूर्वी रोटरीत उपस्थिती ही अनिवार्य होती. आता ती चांगलीच किंवा पूर्ण शिथिल झाली आहे आणि त्यामुळे एक शिथिलता आली आहे.
पूर्वी फेलोशिप म्हणजे मिटिंगनंतरचा खाऊ किंवा जेवण हे घरून करून आणलं जायचं… आणि आता केटरर्सकडून...
पूर्वी संचालक मंडळाच्या मासिक बैठकी या एकेका संचलकाच्या घरी व्हायच्या आता हॉटेल्समध्ये…
पूर्वी चांगल्यात चागलं काम करण्यात एक चढाओढ, चुरस असायची आता रोटरी एन्जॉय करण्यात…
पूर्वी मतभेद असायचे आता मनभेद होतात…
अशा एक ना अनेक तुलनांना स्पर्श करत परंतु कोणत्याही बदलला ठोस चूक किंवा बरोबर असं न म्हणत चेंज इज काॅन्स्टन्ट आपल्यासमोर मांडला.
शिवाय रोटरी साऊथच्या शिरपेचात तुरा म्हणून मिरवणाऱ्या हेल्थ एक्स्पो, हार्ट ब्रिगेड अॅम्ब्युलन्स, परिचारिकांचं प्रशिक्षण असे अनेक सर्व्हिस प्रोजेक्ट्स सर्वांसमोर उलगडले….
दादा करंदीकर, मुकुंद बापट, ताम्हणकर, ब्रह्म ते अगदी अनिल सुपणेकर, भाऊसाहेब कुदळे या दिग्गजांच्या नामोल्लेखाशिवाय, त्यांच्या योगदानाला नमन केल्याशिवाय रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचं कोणतंच कथन पूर्ण होऊ शकणार नाही आणि ते या मुलाखतीतही झालं.
पीएन रो. मंदार अंबिके यानं उत्कृष्टपणे या दोघांना बोलतं केलं त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी नव्यानं समजू शकल्या. मुरलेला मुलाखतकार जसे काही खास प्रश्न विचारतो तसे या दोघांनाही विचारले आणि त्यांना निःशब्दही केलं.
वानगीदाखल…
तुम्ही हे सर्व काम करताना विशेषतः प्रेसिडेंट असताना सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला का आणि जमला का?
इतकं सगळं काम केल्यावर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पद स्वीकारून तुम्ही अजून काम का नाही केलं…
इत्यादी….
उपस्थितांनी प्रश्नही विचारले तर काहींनी आपले अनुभव सांगितले.