श्री गिरीश गोखलेकडून आज रू 25000/- रोटरी पुणे साऊथ क्लबच्या हेमलकसा प्रोजेक्ट साठी कै. श्री. सुधीर आगाशे ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राप्त झाले. ह्या पैशाचा विनियोग डॉ प्रकाश आमटे ह्यांच्या हेमलकासा इथल्या हॉस्पीटलमधे उपकरणे देण्यासाठी होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत ही अनमोल मदत करण्यासाठी आमचा क्लब आपला ऋणी आहे.
पी. पी. रो. अभिजित जोग ह्यांचा "हरवलेल्या इतिहासाचा शोध" हा लेख १० जानेवारी २०२३ च्या सकाळमध्ये प्रकाशित.
Under project "Mamata" RID 3131 has donated 110 baby warmers to government hospitals in district. We are one of the participants. Donated warmer to Ramabai Ambedkar Hospital, Ambil odha. One good part is all the warmers are given by our PP Rtn. Sudhir Waghamare at a very concessional rate. Sushrut (his son) received the falicitation. Congratulations...
Annet Sushrut Waghmare being felicitated by Dr Ashish Bharati & Dr Ravindra Bilawde, Commissioner PMC for providing 110 warmers to Rotary at a very concessional rates & for timely delivery.
आपण इको क्लब च्या कार्यक्रमांचे आयोजन ज्या वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन मध्ये करीत असतो त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून एक व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी आर्थिक मदतीचे आपल्या क्लब कडे आवाहन केले होते. त्याला आपले रोटेरिअन PE श्री रवींद्रजी आणि ऍन सुनीताताई यांनी त्वरित प्रतिसाद देत आपल्या क्लब च्या माध्यमातून यासाठी मदत देऊ केली.
सदर व्याख्यानमाला शाळेत सुरू झाली आहे. त्याचे रिपोर्ट्स शाळेकडून रोजच्या रोज येत आहेत. शाळेने या साठी क्लब चे पुनः पुन्हा आभार मानले आहेत.
धन्यवाद प्रभुणे 🙏
Thank you P.P.Rtn. Sudhir Waghmare for your valuable contribution to Rotary foundation.
This will be used for our ambitious project at Gundalwadi dam.
Hearty congratulations to Rtn Santosh Marathe for being elected as the RI Dist.3131 Governor for the year 2025 -26.
On Saturday President Sanjeev Ogale & first lady Sneha Ogale received the Major Donor Level One Pins with Eitched Crystal Sovenior with their Names Etched On the Crystal Souvenir. Thank you Foundation Director Rtn Vinodbhai.
रो. सुहास ओक ह्यांनी टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन २ तास ३६ मि मध्ये पूर्ण केली
पुरातन ग्रीस हे युरोपियन संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. त्याच प्रमाणे पूर्व आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधील मुलभूत फरका बद्दल सुद्धा बरेच काही लिहीले गेले आहे.पं.नेहरूंना हे विश्लेषण मान्य नाही.त्यांच्यामते ही अगदी संदिग्घ ,अशास्त्रीय व निराधार टीका आहे.आतापर्यंत कित्येक युरोपियन विचारवंतांचे मत होते कि जगातील काहिही अर्थपुर्ण व महत्त्वाचे, ग्रीस अथवा रोम मध्येच उगम पावले आहे.सर,'हेनरी मेन '( ब्रिटिश न्यायाधीश व ईतिहासकार)म्हणतात कि' निसर्गातील विचारशुन्य शक्तिखेरीज जगात असे काहीही नाही जे ग्रीक नाही'. ग्रीक व लॅटिन वाङ्मयात पारंगत असलेले युरोपीयन रूढीप्रिय विद्वानांना भारत व चीन बद्दल फार थोडी माहीती होती.तरीही प्रो.ई.आर.डॉडस् ( आयरीश विद्वान ईतिहासकार व ऑक्सफर्ड मधील प्राध्यापक १८८२ते १८८८ )ठामपणे म्हणतात ' एक रूढीप्रिय विद्वानांचे मत सोडले तर ,पौर्वात्य पाश्र्वभूमीवरच ग्रीक संस्कृती वाढली व तिच्यापासून ग्रीक संस्कृती कधिही वेगळी झाली नाही .'
पूर्वी युरोप मधिल शिक्षण मुख्यत्वेकरून ग्रीक, हीब्रू कींवा लॅटिन भाषेतून असे.त्यामूळे जगाविषयी ज्ञान मेडिटेरीयन देशांभोवती मर्यादित होते.हे विचार मुलतः प्राचीन रोमन पेक्षा वेगळे नव्हते जरी काळानुसार त्यात बदल झाला होता. त्यामुळे निव्वळ, ईतिहास, भौतीकराजकारण ,संस्कृती व सांस्कृति वर परिणाम झाले नाहीत,तर शास्त्रीय प्रगतीत सुद्धा अडसर आला.विचारवंतांच्या मनावर सॉक्रेटिस व प्लॅटो चा पगडा होता,त्यामुळे अशीयात पूर्वी ज्ञानाचा विस्तार किती होता,याविषयी माहिती असून सुद्धा,त्याकडे दुर्लक्ष केले गेले.विद्वानांचे जर असे मत होते तर सर्व साधारण जनतेविषयी बोलायलाच नको.औद्योगिकीकरण आणि त्याबरोबर झालेली ऐहिक प्रगती मुळे लोकांच्या मनावर हा फरक जास्त ठसला व तर्कविसंगतीने प्राचीन ग्रीस, आधूनीक युरोप व अमेरिकेचे जन्मदाते ठरले. जगाचा प्राचीन इतिहास जसजसा अधीक माहीत होऊ लागला,तसतसा,काही विचारवंताच्या मनात वरील निष्कर्षाबद्दल चलबिचल सुरू झाली.परन्तु ईतर बुद्धिमान, व सर्वसामान्य जनतेच्या मनात, शेकडो वर्ष खोलवर रूजलेल्या समजूती तशाच चालू राहील्या.
पं.नेहरूंना पौर्वात्य व पाश्चिमात्य असा फरक मान्य नाही.फरक इतकाच की युरोप अमेरीका औद्योगिकीकरणात अशीयाच्या पुढे आहेत.तसे,औद्योगिकीकरण जगाच्या इतिहासात नवेच आहे व त्यामूळे जग बदलत चालले आहे आणि बदलत राहणार आहे.'हेलिनीक'संस्कृती(प्राचीन ग्रीक संस्कृती; इ.स.पूर्व ३३२,साली,जेव्हा अलेक्झांडर मृत्यू पावला आणि रोमन साम्राज्याच्या उदया मधिल काळ.) व आधुनिक युरोपियन आणि अमेरिकन संस्कृतीत प्रत्यक्ष काहिही संबंध नाही. आधूनीक विश्वातील ऐषारामाची कल्पना ग्रीक कींवा इतर प्राचीन वाङ्मयात आढळून येत नाही.ग्रीक, भारतीय, चिनी किंवा इराणी, धार्मिक व तात्विक जीवनाच्या शोधात असत,ज्यामूळे त्यांचे सर्व जीवन भरून गेलेले असे व जीवनात संतुलन आणि सुसंवाद प्राप्त होत असे.हा आदर्श सर्व जीवन व्यापून टाकत असे.वाङ्मय, कला,लोकपरंपरा वगैरेत हे तत्व असे.त्यामुळे प्रमाणशीर व परिपूर्ण जीवन जगता येत असे.अर्थात ही जीवनशैली सर्वत्र अस्तित्वात असेलच असे नाही.प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी असू शकेल. परन्तू हे लक्षात घेतले पाहिजे कि आधूनीक युरोप व अमेरिका ग्रीक तत्व प्रणाली पासून खूप दूर होते,जरी युरोप व अमेरिका त्यांच्या फुरसतीच्या वेळात ,ग्रीक संस्कृतीचा उदो उदो करीत असतात व ग्रीकांशी जवळीक दाखवत असतात.त्यामूळे त्यांना कदाचित मनःशांती मिळत असावी, किंवा खडतर व तापदायक,आधूनीक जीवनात दिलासा मिळत असावा.
प्रत्येक पौर्वात्य व पाश्चिमात्य देशात व त्यांतील समाजात वेगळेपणा आहे,व ज्यानी त्यानी आपआपल्या अडचणी स्वतंत्र पणे व कुवतीनुसार सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रीस, भारत, चीन,इराण,निश्चितच आपआपल्या परीने ऊत्कृष्ट आहेत.जरी,प्राचीन भारत,ग्रीस, चीन यांच्यात वेगळेपणा असला तरी,बौद्धिक जवळीक असे.वरील सर्व संस्कृतीना, व्यापक, सहीष्णू, सर्व समावेशक, मूर्तीपुजक,जगण्यात व नैसर्गिक सौंदर्य व विविधतेत आनंदित होणारा,कलेविषयी आस्था असणारा ,प्राचीन वंशाला वर्षांनुवर्षे मिळणार्या अनुभवातून शिकलेल्या सुज्ञपणाचा ,दृष्टिकोन होता.ह्या सर्व संस्कृती तेथील नैसर्गिक वातावरणानुसार व वांशिक क्षमतेनुसार विकसित झाल्या व त्यांच्यात ईतरांपेक्षा एक तरी वेगळा गुण ठळक पणे दिसून आला.ग्रीक वर्तमान काळात रमले व सभोवतालच्या सौंदर्याशी, जे त्यांनीच निर्माण केले होते, समरस झाले.भारतीय सुद्धा वर्तमान काळाशी समरस झाले,परन्तू त्याबरोबरच त्यांना अंतर्ज्ञान, अंतर्याम, व अंतःकरणा विषयी कुतुहल होते.चिनी लोकांना वरील सर्व गूढ कोड्यांची कल्पना होती पण शहाणपणे त्यांनी स्वतःला त्या प्रश्नांत अडकवून घेतले नाही व अलिप्त राहीले.प्रत्येक संस्कृतीने आपापल्यापरी जीवनातील सुंदरता भोगण्याचा व अर्थ पूर्ण आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला.इतिहास असे दाखवून देतो की,भारत व चीन यांचे पायाभूत तत्वज्ञान भक्कम होते ,तसेच,त्यांच्यात टिकून राहण्याची ताकद होती,म्हणुनच, जरी त्यांना काळाने हादरविले व त्यांची परिस्थिती खालावली, तरी ते, अजुनही टिकून आहेत, जरी त्यांचे भविष्य अंधारात आहे.प्राचीन ग्रीस, जरी तेजस्वी असले आणी त्याने बरेच काही साध्य केले असले, तरी लोकांच्या मना खेरीज बाहेर, ते प्रत्यक्ष, फार काळ टिकले नाही. ते वर्तमान काळात इतके गुंतले होते कि स्वतः भूतकाळात गेले.
जरी युरोपियन राष्ट्रे स्वतःला प्राचीन ग्रीस ची अपत्य मानीत असली तरी,भारत वैचारिक दृष्टिकोनातून ग्रीस ला जास्त जवळ आहे.हे आपण विसरून गेलो आहोत ,कारण आपली विचारपद्धती ठरावीक संकल्पनेत बांधली गेली आहे ,ज्यामूळे आपली सारासार विचारशक्ती काम करीत नाही.असे म्हंटले जाते की भारतीय, एक धार्मिक, तत्त्वज्ञानी, कल्पनाविलासात रमणारी ,अध्यात्मिक, विरक्त,भविष्यातील व जीवना पलीकडील स्वप्ने पाहणारी, संस्कृती आहे.निदान, हे सर्व आपल्या मनावर ठसविले जाते, जेणेकरून भारत आपल्याच विचारात व कल्पना विलासात गुरफटला जाईल व आपल्यावरील परकीयांचे अधिपत्य आपल्याला व आपल्यांतील बुद्धिवंतांच्या लक्षात पण येणार नाही, ज्या योगे परकीयांना भारतभूमी बळकावून भोगतायेईल. खरोखरी भारत वरील सर्व काही आहेच, परन्तू आणखीन सुद्धा आहे. भारताने , बालपणीची निरागसता, बेपर्वाई; तारुण्यातील भावनिकता,त्यागी वृत्ती;वयाचा सुज्ञपणा, परिपक्वता, जी सुख दू:खा च्या प्रदीर्घ अनुभवातून येते, परत परत जोपासली आहे.भारताला, त्याच्या प्राचीनते मुळे व प्रचंड आकारामुळे जडत्व प्राप्त झाले आहे,अप्रतिष्ठीत चालीरीतींने पोखरले आहे, कित्येक जवळांनी भारताचे रक्त शोषून घेतले आहे.तरीपण भारतीय संस्कृती, तिच्या युगानुयुगे टिकण्याची क्षमता व अंतर्ज्ञानामुळे आजही तग धरून आहे.कारण,आम्ही प्राचीन आहोत,आणि शेकडो वर्षांचा अनुभव आमच्या कानात अजुनही गुणगुणत आहे,ज्यामूळे आम्ही परत परत ताजेतवाने होतो,जरी आम्ही आमचा पूराण काळ कधिही विसरलो नाही.
भारतीयत्व इतके वर्षे टिकून आहे,ह्याची गुरुकिल्ली कूठच्याही गूढ सिद्धांतात अथवा गोपनीय ज्ञानात नसून, मृदू मानवता,वैविध्यपूर्ण व सहनशील संस्कृती आणि जीवनातील अतर्क्यचे सखोल ज्ञान, ह्यात आहे.भारताची सजीवता वर्षांनुवर्षे तिच्या साहित्यातून व कलेतून दिसून आली आहे,परन्तु त्याचा फार थोडा भागच ऊपलब्ध आहे.बाकीचा भाग एकतर अजून सापडलाच नाही कींवा नैसर्गिक कोपा मुळे आणी विध्वंसामुळे नाहीसा झाला आहे.एलिफंटा गुहेतील त्रिमूर्ती,( जी शीवाचे पाच चेहरे दाखवते;निर्मिती, अभय,विनाशासारखे तीन पैलू उलगडते; ,ब्रम्हा,विष्णु,महेश किंवा उमा,शीव,रूद्र यांचे प्रतिनिधित्व करते.)ही भारताचे विविध चेहरे आहेत.ती तिच्या प्रभावशाली विश्वसनीय, ज्ञानी,समजूतदार,डोळ्यांनी आपणा सर्वांवर नजर ठेवून असते.अजिंठा मधली शिल्प मृदुता, प्रेम,सौंदर्य व जिवंतपणाने भरलेली आहेत,परन्तु त्यांच्यात एक न समजणारा गूढार्थ आहे.
भारत आणि ग्रीस मध्ये भौगोलिक व हवामानात फरक आहे.तिथे मोठाल्या नद्या,जंगल अथवा झाडी नाही,जे भारतात मुबलक प्रमाणात आहे.ग्रीस भोवतालच्या विशाल आणी लहरी समुद्राचा ग्रीक समुदायावर भारतीयां पेक्षा जास्त प्रभाव पडला.कदाचित भारताच्या किनारपट्टीवरील जनता त्याला अपवाद असु शकेल.भारतीयांचे जीवन, विस्तीर्ण भूप्रदेश, विशाल पर्वत, मोठाल्या नद्या,घनदाट जंगल यांनी संपन्न झाले आहे.ग्रीस मध्ये सुद्धा थोडे डोंगर आहेत.ऑलिंपस् हा त्यांपैकी एक पवित्र पर्वत आहे,ज्यावर देवांचे वास्तव्य आहे असे मानले जाते.भारतीयांनी सुद्धा आपले देव,ऋषीमुनी हिमालयात वसवले आहेत.दोघांच्याही पुराण कथा ,त्यांच्या इतिहासाशी निगडित आहेत व त्यामूळे वास्तव आणी कल्पित अलग करता येत नाही.पुरातन ग्रीक जसे सुखासीन नव्हते,तसेच विरक्त सुद्धा नसत.ते मौजमजा करणे, हे अनैतिक समजून,टाळत नसत,परन्तु आधूनीक जगाप्रमाणे सुखांच्या पाठीमागे धावत नसत.कुठचीही तमा न बाळगता जीवनाचा आस्वाद घेत असत.कुठल्याही कार्यात स्वताला संपूर्ण पणे झोकून देत असत.त्यामुळे ते भारतीयांपेक्षा जास्त चैतन्यमय दिसत असत.भारतीय पौराणिक वाङ्मयापासून सुद्धा असे मत प्रदर्शित करता येते.भारतीय जीवनात एक विरक्तीचा भाग होता,जो नंतर ग्रीक जीवनात पण आला.परन्तू ही विरक्ती फार थोड्या भारतीयांपुरती मर्यादित होती व सर्वसाधारण जनता सामान्य जीवन जगत असे.हा विरक्ती चा पैलू नंतर जैन व बौध धर्मांच्या प्रभावाखाली वाढला तरिही त्याचा इतरांवर फारसा परिणाम झाला नाही. भारतीय व ग्रीक ,दोघेही, ज्या प्रकारचे जीवन नशीबात असेल ते स्वीकारत असत व परिपूर्ण पणे व परिपूर्ती ने जगत असत,तरीहीत्यांचा अंतरात्म्याच्या श्रेष्ठत्वावर विश्वास होता व त्या परमात्म्याचा ते कुतूहलाने शोध घेण्याचा प्रयत्न करीत असत.हा शोध वस्तुनिष्ठ अनुभावर आधारित नसून, काही मूलतत्त्वे, प्रमाणभूत व सत्य धरून तर्कशुद्ध पद्धतीनुसार केला जात असे.शोधार्थ, शास्त्रीय पद्धत अनुसरणाच्या अगोदर तार्किक पद्धत सर्वत्र अवलंबली जात असे.बहूतेक करून ही चौकशी काही बुद्धिवंता पर्यंतच मर्यादित असे,परन्तू सर्व साधारण जनतेला सुद्धा परमात्म्या बद्दल ऊत्सुकता असे ,व सार्वजनिक ठिकाणी त्याबद्दल इतर गोष्टींबरोबर चर्चा होत असे. आजच्या प्रमाणेच ,पूर्वी जनजीवन,विषेश करुन ग्रामीण भागात, सामाजिक असे. जनता, बाजार, देवालये,मशिदी, पाणवठ्यावर, पंचायत घरात, किंवा सभागृहात भेटत असे व बातचीत करीत असे किंवा एकमेकाच्या अडचणींवर उपाय शोधीत असे .अशा ठीकाणी जनमत तयार होत असे, व जनमताला वाचा फुटत असे.ह्या सर्व गोष्टींकरिता भरपूर रिकामा वेळ असे.
प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या(हेलिनिझम्) अनेक साध्यांपैकी एक म्हणजे,प्रायोगिक विज्ञानाची सुरवात होय.ही सुरवात प्रत्यक्ष ग्रीस मध्ये होण्या पेक्षा ग्रीस च्या अधिपत्याखालील इजिप्त मधील 'अलेक्झान्ड्रीया' येथे झाली.ख्रिस्तपूर्व ३३०ते १३०च्या दोनशे वर्षांत वैज्ञानिक विकास होण्यास आणि यंत्रांचा शोध लागण्यास झपाट्याने सुरवात झाली.(अलेक्झान्ड्रीया येथे वाचनालया,संग्रहालय, वैद्यकशास्त्र, यांची सुरुवात;पृथ्वी सुर्या भोवती फिरते हा शोध अरिसस्टारकस् ने लावला;पृथ्वी गोल असून तीचा परीघ मोजला इराटोथीनस् याने.भूमीती मधील प्रमेय युक्लीड ने मांडले;मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवतो हे हिरोफीलस् याने सांगितले;ख्रिस्तपूर्व ३.शतकात अलेक्झान्ड्रीया येथे वैद्यकीय शाळा;हिरोफीलस् ने फीजिओलॉजी व शरीरशास्त्र शिकवीले;पॅराक्सागोरस् व ईरासिस्ट्राटस् नी नाडी निदान, रक्त वाहिन्या, मज्जातंतू, यावर संशोधन केले;अलेक्झान्ड्रीया चा द्वीप स्तंभ जगातील त्या वेळचे सातवे आश्चर्य होते;)१७व्या शतकानंतर झालेल्या शास्त्रीय प्रगती पर्यंत, भारतात किंवा इतरत्र ही ग्रीस सारखी शास्त्रीय प्रगती झाली नव्हती.रोमन साम्राज्याची, जरी पुरातन ग्रीक संस्कृतीशी जवळीक होती,तरी सुद्धा ,शास्त्रीय, यांत्रीक, क्षेत्रात, फारशी प्रगती झाली नव्हती.युरोप मधिल पौराणिक संस्कृती ( ख्रिस्तपूर्व आठवे शतक ते इ.स.पाच. ग्रीक रोमन संस्कृतीशी निगडित) नष्ट झाल्यावर, मध्ययुगात,( ५००ते १५०० इ.स. ज्यावेळेस रोमन साम्राज्य नष्ट झाले)शास्त्रीय ज्ञानाची ज्योत मुख्यत्वे अरबांनी तेवत ठेवली.अलेक्झांड्रीया मधील शास्त्रीय प्रगतीतीचे कारण त्यावेळेच्या काळाची गरज होती.ज्यावेळेस सामाजिक वृद्धी होत होती तसेच समुद्र मार्गे प्रवास आणी व्यापार वृद्धिंगत होत होता.त्याचप्रमाणे भारतीय गणितातली सुधारणा व हिशोबात एकम,दशम,शतम,वापरण्यास सुरवात ही सुद्धा एक काळाचीच गरज होती जेव्हा भारतीय समाज आणि व्यापार वृद्धिंगत होत होता.सर्वसाधारण पुरातन ग्रीक जनतेला शास्त्रीय विषयात कीती रस होता याबद्दल शासंकता च आहे.बहूतेक करून सर्वसाधारण जनता नेहमीचेच आयुष्य जगत असावी ,जे पूर्वापार चालत आलेल्या तत्वज्ञानानुसार निसर्गाशी संन्नीध होते. ह्या बाबतीत ग्रीक व भारतीयांत समानता होती. ग्रीस व भारतात वर्ष सणानुसार विभागले जाते आणी ऋतु सणानुसार बदलतात ज्यामुळे माणसांचा बदलत्या निसर्गाशी सुसंवाद साधला जातो.भारतात, वसंत ऋतूत, सुगीच्या काळात, सराईच्या काळात दीपावली,होळी ग्रीष्म ऋतूच्या सुरवातीला,त्याच प्रमाणे आपल्या शूरवीर पूर्वजांची जयंती,पुण्यतिथी , साजरी केली जाते.आजही अशा सणासुदीच्या दिवशी नाच गाणी होतात,जसे होळीत,लोहरीत,जन्माष्टमीत रास लीला वगैरे.
पूर्वी सर्वसाधारण पणे स्त्रीयांना समानतेने वागवीले जात असे.कदाचित राजघराण्यातील स्त्रीया इतरांच्यात मिसळत नसतील.ग्रीस मध्ये कदाचित लिंगभेद अधिकअसावा.महत्त्वाच्या भारतीय स्त्रियांचा उल्लेख पुराणांतून आला आहे.सीता,द्रौपदी मैत्रेयी, भैरवी,ब्राह्मणी,उभया भारती,गार्गी,मिराबाई, लूपमुद्रा,घोशा, वगैरे थोर आणि विदुषी स्त्रीया,प्राचीन भारतात होऊन गेल्या.ग्रीस मध्ये विवाह एक करार असे,परन्तु भारतात विवाह एक पवित्र बंधन आहे,जरी गांधर्व विवाह प्रमाणीत धरला जात असे अथवा हल्ली नोंदणीकृत विवाहाचा पर्याय ऊपलब्ध आहे.ग्रीक महिला भारतात लोकप्रिय होत्या. जून्या भारतीय नाटकांत ऊल्लेखलेल्या दास्या बहूतेक करून ग्रीक असाव्यात. जुन्या काळी भरोच बंदरातील सर्वात लोकप्रिय आयात ग्रीक सुंदरी व तरूण गायक असत.ग्रीक ईतिहास कार मेगास्थीनस् ने मौर्य सम्राट चंद्रगुप्त बद्दल लिहिले आहे की,' सम्राटांचे जेवण स्वयंपाकीण करत असे व जेवणाबरोबर मद्य दिले जाई,जे सर्वत्र घेतले जात असे.' या पैकी काही मद्य ग्रीस किंवा ग्रीक वसाहतीतून येत असावे,कारण जुन्या काळचा तामीळ कवी लिहतो की ' गार व सुगंधी मद्य यवन(आयोनियन किंवा ग्रीक) आपल्या जहाजातून आणीत असत.' ग्रीक अधिपत्याखालील सिरीयाचा राजा ॲन्शीओकस् १, ला सम्राट अशोकचे वडील बिंदूसारने मद्य, सुकी अंजीरे,व एक सुजाण तत्वज्ञानी धाडण्याचे विनंतीवजा पत्र धाडले होते,असा ऊल्लेख आहे.ॲन्शीओकस् ने ऊत्तरा दाखल लिहले,' आम्ही आपणांस अंजीर व मद्य घाडू शकतो ,परन्तू ग्रीस मध्ये तत्वज्ञानी विकण्यास मज्जाव आहे.' ग्रीक साहीत्य वरून असे लक्षात येते की तेथे समलैंगिकता निषिद्ध नव्ह्ती. खरोखरी त्यांविषयाकडे नवलाईने पाहिले जायचे.ह्याचे मुख्य कारण म्हणजे स्त्री पुरुषांचे विलगीकरण व लिंगभेद आहे.असाच प्रकार ईराण व पर्शिया च्या साहीत्यात सापडतो.ते कदाचीत तेथील साहित्यातील सर्वमान्य रूपक असावे.संस्कृत साहीत्यात असे रूपक सापडत नाही.भारतात समलैंगिक संबंधांना मान्यता नव्हती व ते नित्याचे नव्हते.
ग्रीस आणि भारत अगदी ऐतिहासिक काळापासून एकमेकाच्या सान्निध्यात होते..नंतरच्या काळात भारताचे ग्रीक वर्चस्वाखालील पश्चिम अशीयाशी सुद्धा जवळचे संबंध होते.ऊज्यनी येथील वेधशाळा इजिप्त मधील अलेक्झान्ड्रीया ह्या शहराशी सलग्न होती.ह्या सर्व काळात भारत व ग्रीस ह्या पुरातन संस्कृतीत वैचारिक व सांस्कृतीक देवाणघेवाण चालूच असणार. काही पुरातन ग्रीक पुस्तकात उल्लेख आहे की काही भारतीय विद्वानांची सॉक्रेटिस शी( ग्रीक तत्ववेत्ता;जन्म ४७७ ख्रिस्तपूर्व; मृत्यू ३९९ ख्रिस्तपूर्व; तरूणांना विचलित करण्याच्या अरोपावरून मृत्यूदंड )मुलाखत झाली होती.पायथागोरस (ग्रीक तत्त्वज्ञानी व गणित तज्ञ;५७० ख्रिस्तपूर्व ते ४९५ ख्रिस्तपूर्व. )वर भारतीय तत्त्वज्ञानाचा बराच पगडा होता.प्रो.एच.जी.रॉलिसनने नोंदले (दक्षिण अशीया बद्दल विशेष ईतिहास कार) आहे की ' पायथागोरसने मांडलेले बहूतेक सिद्धांत, धार्मिक असोत कींवा तात्विक आणि गणिती असोत,ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारतात प्रचलित होते.' ग्रीक व रोमन विषयीचा परंपरागत ब्रिटिश विद्वान युरविक ने प्लाटोच्या रिपब्लिक ह्या ग्रंथाचा अर्थ भारतीय विचारांवर आधारीत आहे असे सांगितले आहे.( प्लाटो ख्रिस्तपूर्व ४२८ते ख्रिस्तपूर्व ३४८ ;सॉक्रेटिस चा चेला;त्याचे तत्व, निर्दोष आकाराचे अभौतीक जग ,जे भारतीय विचार सरणिवर आधारीत आहे.चर्चा करणे,शंकाघेणे ,चौकशी करणे,ही भारतीय विचार सरणि आहे.)नॉस्टीसीझम (स्वानुभवावर व स्वताच्या दृष्टिकोनातून, गुरूची अथवा धर्मोपदेशकाची मदत न घेता, धर्माचरण करणे.)हा भारतीय तत्त्वज्ञान व प्लाटोनिझम मध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न आहे.ग्रीक तत्वज्ञानी टायानाचा अपोलोनीयस (ख्रिस्तपूर्व ३ ते इ.स.९७ )याने तक्षशीला विद्यापीठाला इ.स.६४ मध्ये भेट दिली होती.प्रसिद्ध प्रवासी व विद्वान अलबरूनी (मध्य अशीयातील प्रशीयामधील खोरासन येथील;इ.स.९७३ते १०५०.)अकराव्या शतकात भारतात येऊन गेला. अल्बरूनी भारत शास्त्राचा जनक होता(इंडोलॉजी).त्याला ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता.ग्रीक तत्वज्ञान इस्लाम च्या सुरवातीला बगदाद मध्ये लोकप्रिय होते.भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यास करीता अल्बरूनी भारतात आल्यावर संस्कृत भाषा शिकला. भारतीय व ग्रीक तत्त्वज्ञानातील समानता त्याच्या लक्षात आली.त्याबद्दल त्याने त्याच्या दोन पुस्तकात तसे नमूद केले आहे.त्याचप्रमाणे संस्कृत भाषेतील ग्रीक व रोमन ज्योतिषशास्त्रातील ग्रंथाबद्दल सुद्धा उल्लेख केला आहे.
जरी ग्रीक आणि भारतीय संस्कृतींचा एकमेकांवर प्रभाव असला तरी, स्वतंत्र पणे तग धरून विकसीत होण्याची क्षमता दोन्ही संस्कृतीत होती.हल्ली ग्रीक व रोमन संस्कृतीना भारत आणि अशीया बाबतीत सर्व श्रेय देण्याची जुनी प्रवृत्ती वाढली आहे.प्रो.टार्न लिहतात,'सर्व सामान्य पणे अशीयातील लोकानी ग्रीक संस्कृती कडून वरवरचेच घेतले.त्यांतील सार उचलले नाही.त्यातील आत्मा तर नाहीच.नगर व्यवस्थापनाचा अपवाद असु शकेल.मनोबलात अशीया ग्रीस पेक्षा वरचढ होती,व ग्रीस संस्कृतीपेक्षा जास्त काळ टिकली. जरी भारतीय संस्कृती ग्रीस पेक्षा जास्त प्रभाव शाली होती,तरी धार्मिकतेत ती बॅबिलॉन इतकी ग्रीस ला प्रभावित करू शकली नाही( बॅबिलॉन हे हल्लीच्या इराक मधील जुन्या काळातील राज्य होते.ख्रिस्तपूर्व १८९० ते ख्रिस्तपूर्व ५३९.अलेक्झांडर द ग्रेट ने तेथे ग्रीक वसाहत स्थापली.)तरीसुद्धा भारत अनेक बाबतीत ग्रीसचा मोठा भाऊ होता.' गौतम बुद्धाची मूर्ती नसती व ग्रीक अस्तित्त्वात नसते तर भारतीय इतिहासात बदल झाला नसता.भारतात मुर्ती पुजा ग्रीकांकडून आली.वेदीक धर्मात मुर्तीपुजा निषिद्ध होती.(ईश्वर एक अस्तित्वातील आकारहीन परमशक्ती अथवा ब्राह्मण आहे. ही रचना वादग्रस्त आहे.)भारतात पुरातन काळात देवालये सुद्धा नव्हती.काही पंथात मुर्तीपुजा होत असावी.बौध्द धर्मात सुरवातीला मुर्तीपुजा निषिद्ध होती. बुद्धांच्या मुर्ती तयार करण्यास मनाई होती.परन्तु अफगाणिस्तान व सीमेभोवतालीच्या प्रदेशात ग्रीक कलेचा पगडा बराच होता व हळुहळु त्याचा परिणाम दिसू लागला.प्रथमतःजरी बुद्धाच्या मुर्ती घडविल्या नाहीत तरी,बोधीसत्वाच्या मूर्ती तयार होऊ लागल्या व पाठोपाठ प्रत्यक्ष बुद्धांच्या मूर्ती सुद्धा बनू लागल्या.त्यामुळे काही पंथात मुर्तीपुजा सुरू झाली,तरीही वैदिक धर्मात मूर्ती पूजा नव्हती.पर्शियन व हिंदी भाषेत बुत शब्दाचा अर्थ मुर्ती असा होतो,जो बुद्ध या शब्दावरून आला आहे.
मानवी मनाला जीवन,निसर्ग व विश्व यांची सांगड घालण्याची ओढ लागलेली असते.ती ओढ,समर्थनीय असो वा नसो,मानवी मनाची तहान भागवते. जुने तत्त्वज्ञानी तसेच आधूनीक शास्त्रज्ञ सुद्धा ह्या प्रेरणेला बळी पडतात.मानवाच्या सर्व योजना,कल्पना,शैक्षणिक उद्दिष्ट, सामाजिक व राजकीय संघटना,यांच्या पाठीमागे ,नैसर्गिक एकत्रीकरण व सहजीवनाचा उद्देश असतो.काही विचारवंत व तत्ववेत्तांच्या मते वरील समज चुकीचा आहे,व अपघाताने तयार झालेल्या विश्र्वात व्यवस्थित व संघटित असे काहिही नसते.हे खरंही असू शकेल ,तरीही ह्या चुकीच्या समजुती मुळे ,भारत, ग्रीस व इतरत्र सहजीवनाच्या शोधात सकारात्मक निष्पत्ती झाली आणि जीवनात सुसंवाद,तारतम्य व सम्रूद्ध ता आली.
नमस्कार मंडळी... प्राध्यापिका मोहिनी पिटके यांच्या कवडसे पश्चिमप्रभेचे या पुस्तकातील एक लेख आज ऐकू या हं... लेखाचं शीर्षक आहे. खुशी गमकी..
The dark threads were as needful
In the Weaver's skilful hands
As the threads of gold and silver
For the pattern which he planned..
एका अनामिक कवीच्या ह्या ओळी आहेत..बरं का
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे
कविवर्य गदिमांच्या लेखणीतून उतरलेल्या या अजरामर ओळींशी किती साधर्म्य आहे ना.... आयुष्याचे अगदी खरे खरे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभे करतात.. आयुष्य हे दुःखाने भरलेले आहे हे कोणी नव्याने का आपल्याला सांगायला हवे ??.... सुख जवापाडे..। दुःख पर्वताएवढे..! आयुष्य जगताना या दुःखाच्या क्षणांना तोंड देता देता जीवन टेकीला येते.... कुणालातरी सारखे विचारावेसे वाटते की "माझ्याच वाट्याला एवढे दुःख का...?? हा प्रश्न कोणाला विचारावा हे एवढे मात्र काही कळत नाही...आणि या प्रश्नाला खरोखर उत्तर तरी आहे का हो...?? दुखाला,वेदनेला तोंड देताना काही वेळेस वाटते की..,यातून काही कधी मी बाहेर नाही पडू शकणार.. संपलो मी आता इथेच...आणि तरीही तरीही त्यापुढेही आयुष्य चालूच राहते... आश्चर्य वाटत रहाते की ....,"अरेच्चा यातून आपण बाहेर पडलोच कसे.....???" काहीच कळेनासे होते.... वयानुसार परिपक्वता येते... मग समंजसपणाची झिलई चढते मनावर.... तडफड,चरफड, शिव्याशाप दोषारोपण... सारं कसं शांत शांत होत जातं....
खामोश खामोशी के साथ जिंदगी की शाम आये ये आहे और ये नाले कब तक मेरे काम आये
मग कळतं की..."अरे,.हे दुःख, या वेदना, माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत... यांना मी कुठे आणि कशी टाकून देणार..??"
आयुष्याच्या वस्त्रातले हे काळे धागे या वस्त्राला केवढा उठाव आणून देत आहेत... दुःख आहे म्हणून तर आनंदाला किंमत आहे... दुःख आहे म्हणून तर माणसाला कळतेय की त्याचे स्वत्व कशात दडले आहे..? त्याची अस्मिता कुठे आहे..? त्याची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे..? ...हे सारे कळायचे असेल तर त्या दाहक क्षणांना सामोरं जायलाच हवं.... या संघर्षाला तोंड द्यायलाच हवं....रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे सतत लक्षात ठेवायला हवं....
सोनेरी,चंदेरी धागे या आयुष्य रुपी वस्त्राला सौंदर्य प्राप्त करून देतात.... तर... वेदना आणि व्यथेचे धागे त्यांचं मूल्य अधिकच वाढवतात. मात्र आयुष्याचे वस्त्र विणणारे आपले हात सतत चालते हलते राहायला हवेत... आणि मग धागा दुःखाचा असो की सुखाचा जीवन जगण्याची कला ही अशी मनातून उमलून यायला हवी
सध्या इतकंच...
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील अष्टम स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच आठवी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच शनीनंतर येणारा ग्रह नेप्च्यून आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील सप्तम स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील अष्टम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
८) अष्टम स्थान: गुप्त धनलाभाचे स्थान :
आयुर्दायमनिष्ट हेतूम् ।
अष्टम स्थानाला मृत्युचे स्थान असे म्हणतात. या स्थानावरून
व्यक्तींचा मृत्यूसंबंधी, आयुर्दर्यासंबंधी विचार करतात. व्यक्तीला लाभणारे आयुष्य, मृत्यूकडे, त्याला ओढणारी शक्ती ह्या दृष्टीने षष्ठ स्थानाबरोबर ह्या स्थानाचा विचार करावा लागतो. व्यक्तीचा अंत, मृत्यूचे स्वरुप, कारण, स्थळ, काळ याचा विचार अष्टमावरून केला जातो. अपघाताच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागणारा भाव, व्यक्तीला सोसावे लागणारे नैराश्य, दास्यत्व, अडथळे, अशा अनेक गोष्टींना दर्शवणारा भाव आहे.
एक वेगळ्या प्रकारचे धनस्थान आहे. अचानक धनलाभाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान. कमी श्रमात मिळणारा पैसा, देणगीपत्र, बक्षिसपत्राने, दत्तक गेल्याने, वारसाहक्काने मिळालेली संपत्ती, सावकारी धंद्याने, व्याजाने मिळालेला पैसा. दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीचा, अज्ञानाचा फायदा घेऊन मिळविलेला पैसा, लाचलुचपत, पिळवणूक करुन दुसऱ्याचे तळतळाट घेऊन प्राप्त होणारे धन, कुमार्गाने मिळविलेली सर्व प्रकारची संपत्ती, स्त्रीकडून मिळणारे धन-हुंडा, विमा इत्यादी सर्व गोष्टी या स्थानावरून पाहतात. स्त्रीयांच्या पत्रिकेत संसारिक सुखाच्या दृष्टीने विचारात घ्यावा लागणारा भाव आहे.
गूढविद्येच्या दृष्टीने काही अंशी महत्त्वाचा भाव आहे.
अचानक धनलाभाचे स्थान या दृष्टीने, मिळालेले धन हे मृत्यूपूर्वी पूर्ण खर्च होऊन जाते. अशाप्रकारच्या मिळालेल्या धनामागे वाईट / नकारात्मक गोष्टी असतात. वाईट मार्गाने मिळालेला पैसा तशाच प्रकारे नष्ट पण होतो. अष्टम स्थान हे अशुभ स्थान मानलेले आहे.
आता आपण १२ राशींमधील आठवी वृश्चिक रास पाहूया.
८) वृश्चिक रास:
या राशीमध्ये अंतर्गत विरुद्ध गोष्टी खूप आहेत.
जलतत्वाची, स्त्रीतत्वाची रास व अग्नितत्वाचा, पुरुषतत्वाचा मंगळ हा राशीस्वामी आहे. म्हणूनच या राशीमध्ये बरेचदा विरोधाभास जाणवतो. या राशीत चंद्र नीचीचा होतो. त्यामुळे मनाचा मोकळेपणा नाही. त्यामुळे हे लोक पटकन कोणासमोर open होत नाहीत. म्हणून या राशीबद्दल गैरसमज खूप होतात. बरेचदा हे लोक स्वार्थी, लबाड वाटतात. स्वतःच्या कर्तृत्वावर यांचा विश्वास असतो. 1+1=2 यावर यांचा पूर्ण विश्वास असतो. म्हणजेच हे लोक अतिशय practically वागतात. अत्यंत कृतीशील रास आहे. या राशीकडे अतिशय उत्तम अशा प्रकारच्या management व administration skills असतात. ही Extra ordinary रास आहे. थोडे negative thinking आहे. पण त्यामुळे Planning करताना काय वाईट होवू शकते, याचा विचार आधी केला जातो. त्यामुळेच कोणतीही जबाबदारी अतिशय उत्तमपणे पार पाडली जाते. एकाच वेळी १० गोष्टी व १०० माणसे manage करण्याची, म्हणजेच multi tasking ची capacity आहे.
या राशीत चंद्र नीचीचा होत असल्याने सूड बुद्धीपण आहे. कोणी अपमान केला किंवा वाईट वागणूक दिली, तर ते कधीही विसरत नाहीत. आणि वेळ आल्यावर सुनावल्याशिवाय रहात नाहीत. आणि यांना तशी संधी पण मिळते. हे लोक थोडेसे स्वार्थीपण वाटतात. प्रथम स्वतःला importance देतात. मग त्यानंतरच्या अगदी जवळच्या व्यक्तींना, मग त्यानंतरच्या जवळच्या व्यक्तींना. अशी व्यक्तींची Category केलेली असते. न्यायप्रिय असे म्हणता येणार नाही. कारण या राशीमध्ये गुप्तता आहे. त्यामूळे यांना Political aspect पण चांगला आहे. गुप्त खलबते करतात व ती निभावतात.
अतिशय कर्तबगार रास आहे. एखादी गोष्ट करताना कीतीही अडथळे आले, तरी त्यावर overcome करून ती गोष्ट पूर्णत्वाला नेतात. अतिशय बुद्धीमान रास आहे. उत्तम निर्णयक्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सगळ्यात उच्चपदाला पोचणाऱ्या व्यक्ति असतात. एकच मोठा दुर्गुण आहे, तो म्हणजे एखादया व्यक्ति कींवा गोष्टीवर फुली मारली की मारली. त्यामुळे इतरांची पंचाईत होते. त्यांना या लोकांशी कसे वागायचे हेच कळत नाही.
स्वरूप: या राशीचे स्वरूप म्हणजे उंची थोडी कमी असते. वरचा भाग उंच व पाय जरा बुटके (तुळेच्या उलट) असतात. थोड्या plump कडे झुकणाऱ्या असतात. म्हणजे फार जाड नसतात. पण अगदी बारीकही नाहीत. चेहयावर confidence दिसतो. त्यामुळे 'माझ्यापासून दूर रहा' असा attitude असतो.
वृश्चिकेच्या स्त्रिया अतिशय उत्तम संसार करतात. complexion छान असते. सौंदर्य असते. पण चेहऱ्यावर थोडा तोरा असतो. अहंपणा असतो. मंगळ धातूवर अंमल करणारा ग्रह, तर राशी जलतत्वाची, यामुळे ही रास रसायनतज्ञांची रास आहे. दिसावयास ही सौंदर्यसंपन्न आहे. उत्तम व्यक्तिमत्व, आकर्षकता आहे. नाक तरतरीत आहे.
या राशीचा अंमल excretory system वर असतो. त्यामुळे बरेचदा मूळव्याध, तसेच स्त्रियांना menses चे problems दिसतात. Surgeries, cut येणे, stitch येणे, असे बरेचदा होताना दिसते. Medical related गोष्टींसाठी कींवा surgeon होण्या साठी वृश्चिक रास उत्तम रास आहे.
या लेखातील पुढील भागात आपण नेप्च्युन या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
८) नेप्च्युन (वरुण):
नेप्च्युन या ग्रहाचा शोध सन १८४६ मध्ये लागला. नेप्च्युनचा संबंध डोक्यापेक्षा हृदयाशी जास्त आहे असे म्हटल्यास चालेल.
नेप्च्युन जलतत्वाचा ग्रह आहे. वाहवत जाणारा आहे. याच्याकडे confusion आहे. घोळ घालणारा स्वभाव आहे. संदीग्धता आहे. clarity नाही. तरल स्तरावर काम करणारा ग्रह आहे. Practical approach नाही. स्वप्न रंजनात रमणारा आहे. नेप्च्युन हा भावनाशील व संवेदनक्षम ग्रह आहे. नेप्च्युन अर्धजागृत अप्रबुद्ध भावनांशी निगडीत आहे. भावना व विचार परिपक्व पूर्णावस्थेत येण्यापूर्वी त्याची जी अदृश्य, अव्यक्त स्थिती असते, ती नेप्च्युनच्या कारकत्वाखाली येते.
हा दूरचा ग्रह आहे. नेप्च्युन स्त्री तत्वाचा ग्रह आहे. observing capacity खूप जास्त आहे आणि त्याचा खोलवर परिणाम होतो. पटकन निराश होणे कींवा पटकन आनंदी होणे असा स्वभाव दिसतो Creativity खूप चांगली आहे शुक्राची जोड असेल तर यांच्या हातून सुंदर कलाकृती निर्माण होतात तरल स्तरावर काम करत असल्याने उपासना ही चांगली होते. अध्यात्मिक प्रगतीही याच्या कारकत्वात आहे. Intuitions हे पण नेप्च्युनच्या कारकत्वात आहेत. पंचमात नेप्च्युन असेल तर अशा व्यक्ती Spiritual communication करू शकतात. ज्या अनैसर्गिक गोष्टी आहेत, त्या नेप्च्युनच्या कारकत्वात येतात. Homos, lesbian या व्यक्तिंचा नेप्च्युन हा प्रभावी असतो. सातासमुद्रा पलीकडचे प्रवास हे पण नेप्च्युनच्या कारकत्वात येतात.
क्रमशः
मंडळी,
" सर्वमान्य असत्य" पुढचं वाचण्यापूर्वी दोन मिनिटे विचार करा आणि आठवून सांगा की अशा कुठल्या खोट्या गोष्टी आहेत ज्या आपण एकमेकांना खऱ्या असल्यासारख्या सांगतो ? घ्या हो, एका आईस्क्रीमनी काही वजन वाढत नाही. आजकालचे जग म्हणजे सगळं अवघड होत चाललं आहे.
दोन मिनिटात जाऊन आलो. कसे आहात? मी मजेत आहे. यातील वाक्य खोटी किंवा अर्धसत्य आहेत. त्यातील दुसरी दोन निरुपद्रवी पण पहिली दोन मात्र निश्चितच उपद्रवी आहेत. त्यामुळे जर नकळत अशा वाक्यांची सवय झाली असेल तर थांबून त्यांची सत्यता पडताळून पाहणे कधीही उत्तम. एका आईस्क्रीम ने सुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना बाधा येते आणि सध्या सगळेच काही अवघड नाही उलट टेक्नॉलॉजी मुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या सुद्धा होत चाललेल्या आहेत हे पूर्ण सत्य.
Dear Rotarians & Ann’s
Our Beloved Ann Vandana beloved spouse of our PDG Pramod Jejurikar Passed away unfortunately at Sahyadri hospital on 15th January 2023.
६ जानेवारी २०२३
हेमलकसा भेट नविनवर्षाची उल्लेखनीय सुरुवात
Medical project at लोक बिरादरी प्रकल्प, Hemalkasa:
Happy to inform you all that our club did a mega project of donating life saving medical devices like Neonatal & Paediatric Ventilator, Open care Incubators (Baby Warmers) Adult & Paediatric Ventilators, Slow suction machine etc to Lok Biradari Prakalp at Hemalkasa.
We had received a request from Dr Digant & Anagha Amte asking for the above equipment to save the lives of Adivasis who are deprived of this modern life saving facility.
The project was possible due to generous donation from PP Dr Sudhir and Ann Radhika Waghmare & Rtn Shribhau and Ann Aarthi Chitale
Also special thanks to the generousity of Rtn PN Dr Mandar, PP Dr Rajendra and Ann Dr Anushree Gosavi, Dr Satish Gosavi, PP Dr Kiran and Ann Dr Gitanjali Purohit, PP Sham and Ann Vinita Kulkarni, Rtn Bhau Sahasrabudhe, PP Sudarshan and Sugandha Natu, PE Rtn Ravindra and Ann Sunita Prabhune, Rtn Suhas Oka, Rtn Sameer Shah, Rtn Kiran and Ann Swati Velankar, Rtn Dr Subhash Deshpande , Rtn Niranjan and Rupali Thangoakar First lady Sneha & my daughter Bhagyashree my friends Mr Vinayak Dongre, Mr Adwait Tilak, Mr Milind Kulkarni and Capt Gokhale.
In total 15 Lakhs was donated for this project and 28 Rotarians and family members spending approx 5 Lakhs were present to donate these equipment this has been really an overwhelming experience for me for the team spirit shown by all the RCPS members.
I also take this opportunity to thank all those who contributed to this project financially & physically to make this project a grand success.
६ जानेवारी २०२३
एक सफर वाघांच्या दुनियेत
7 जानेवारी रोजी नूतन बालविकास शाळेतल्या आपल्या इंटरॅक्ट क्लबच्या विकली मिटिंग मधे, आपल्या क्लबचे पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन संदीप विळेकर हे वक्ते म्हणून आले होते. त्यांनी मुलांशी सहज संवाद साधत त्यांना व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुणांचा विकास, रोटरी चे स्वरूप या विषयावर अगदी सध्या सोप्या, मुलांना कळेल अशा भाषेत माहिती सांगितली. त्यांनी मुलांना छान बोलतं केल्यामुळे नक्कीच मुलांनी देखील आजची मीटिंग खूप एन्जॉय केली.
विळेकरांच्या आजच्या भाषणाने, नवीन शिकायला आणि दुसऱ्याला मदत करायला मुले प्रोत्साहित झाली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील .
धन्यवाद पी. पी. रो. संदीप विळेकर.
नूतन बालविकास शाळेमध्ये इंटरॅक्ट क्लबच्या वतीने १० जानेवारी म्हणजे काल विवेक वेलणकर यांचे "१० वी नंतरचे करिअर" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. आणि जसा विश्वास होता तसेच हे व्याख्यान मुलांकरिता अत्यंत उपयोगी असेच झाले . मुलांनी उस्फूर्तपणे त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले आणि त्यांच्या पुढील शंकांना उत्तरे देण्यासाठी त्यांच्या शिक्षकांनी टिपणे टिपून ठेवली .
या कार्यक्रमाला एकूण ३१ विद्यार्थी हजर होते.
आपल्या क्लबमधील ॲन यामिनी पोंक्षे या देखील मुलांना प्रोत्साहन द्यायला आवर्जून हजार होत्या.
आपले PE रोटेरिअन श्री रवींद्र प्रभुणेजी यांच्या फोटोग्राफी च्या छंदा विषयी आपण सगळे जाणताच. त्यातही निसर्गातील पशु पक्षी व इतर दृष्ये टिपण्यात तर त्यांचे कौशल्य विशेष करून जाणवते. ११ जानेवारी २०२३ वसंतदादा पाटील विद्यानिकेतन या शाळेतील इको क्लब मधे आपले PE रो.रवींद्र प्रभुणे यांचे फोटोग्राफी ,निसर्ग आणि पर्यावरण या विषयी व्याख्यान झाले. फोटो कसा काढायचा का काढायचा ,कॅमेरा त्याचे प्रकार,लेन्स, शटर याची स्लाइड शो मधून माहिती सांगितली. फोटोग्राफी ही एक कला आहे .एक फोटो हजार शब्दाचे काम करतो.अभ्यास, संशोधन,यासाठी फोटोचा कसा उपयोग होतो हे सांगितले. तसेच फोटोग्राफी हे उपजिविकेचे साधन आहे.
निसर्गात काहीही निरुपयोगी नाही.शिका शिकवा कमवा,निसर्ग वाचवा,हानी होईल असे काही करू नका,जागृती करा. पर्यावरण प्रेमी नको - स्नेही व्हा असा संदेश रवींद्रजीनी दिला. कार्यक्रम खूप छान झाला.
रो.रवींद्र प्रभुणे यांच्या बरोबर रो.हेमंत वाळिंबे आले होते.
ॲन सुनिता प्रभुणे,यामिनी पोंक्षे उपस्थित होत्या .
१९ जानेवारी २०२३
मातीविना बगीचा
आज वसंतदादा पाटील माध्यमिक शाळेत इको क्लब च्या साप्ताहिक सभेत श्रीमती अपर्णा सावंत यांनी मुलांना झाडांचे महत्व अनेक वेगवेगळ्या उदाहरणाने सांगितले. मातीविना बगीचा कसा फुलवावा हे अगदी सोप्या पद्धतीने समजवून सांगितले. मुलांनीही त्यात विशेष रस दाखवून सभा संपल्यावरही मार्गदर्शनासाठी अनेक प्रश्न विचारून शंका समाधान करून घेतले. आपले पास्ट प्रेसिडेंट रोटेरिअन वीरेंद्र शाह यांनीपण उपस्थिती लावली, आणि इको क्लब च्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना अधिक उत्साही बनवले.
दरवर्षी प्रमाणेच यंदाही रामचंद्र राठी प्रशाला, लॉ कॉलेज रोड पुणे येथे नववी आणि दहावी च्या विद्यार्थ्यांकरता RYLA चे आयोजन केले होते.
अतिशय चोख प्लँनिंग , आणि शिस्तबध्द अशा पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम पार पडला. त्यासाठी Ann विनिता कुलकर्णी आणि टीम यांचे खूप खुप अभिनंदन.
साधारण एक च्या सुमारास कार्यक्रमाला सुरवात झाली. ॲन विनिता कुलकर्णी यांनी सर्वांची ओळख तसेच कार्यक्रमाची नेमक्या शब्दात मांडणी करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पवार यांनी रोटरी क्लब मधून आलेल्या सर्वांचे स्वागत केले.
प्रेसिडेंट संजीव ओगले यांनी मुलांशी संवाद साधत लीडर या शब्दातील प्रत्येक लेटरची आपल्या व्यक्तिमत्वाच्या डेव्हलोपमेंट मध्ये असणारी भूमिका छान समजावून दिली.
रो. शाम कुलकर्णी यांनी रो. अभिजित देशपांडे यांची ओळख करून दिली. आणि रो. अभिजित देशपांडे यांनी फ्युचर इन कॉम्प्युटर्स या बद्दलची छान माहिती इंटरॅक्टिव्ह सेशनमधून मुलांना करून दिली. आपल्या दैनंदिन आयुष्यात कॉम्प्युटर्सचे, Artificial Intelligence चे महत्व खूप छान समजून सांगितले.
घरगुती उपकरणे, शेती, शिक्षण या सगळ्यांमध्ये कॉम्प्युटर चे काम कसे चालते, ज्या गोष्टी आपण easily वापरतो, त्यामागे कॉम्प्युटर कसा काम करतो? मोबाईल वरच्या Applications चा उपयोग आपण कसा करून घ्यायचा? याची छान माहिती मुलांनी रो.अभिजित यांच्या कडून घेतली. Computer जितके स्मार्ट होत आहेत, आपण त्यापेक्षा कसे जास्त स्मार्ट होऊ शकतो याचा विचार मुलांनी करावा असा संदेश रो. अभिजित देशपांडे यांनी दिला. पुढे प्रश्र्नोत्तरांचा कार्यक्रम झाला आणि मुलांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
दुसऱ्या सेशनमध्ये ॲन प्रियदर्शिनी अंबिके यांनी मुलांना शैक्षणिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. या सेशनच्या सुरवातीला ॲन यामिनी पोंक्षे यांनी प्रियदर्शिनी अंबिके यांची ओळख करून दिली.
शाळेत यावस वाटणं म्हणजे शैक्षणिक आरोग्य निरोगी आहे असे नाही... तर योग्य वेळेला योग्य ठिकाणी आणि योग्य शिक्षण घेण्याची इच्छा असणे म्हणजे शैक्षणिक आरोग्य चांगले असणे होय. महाराष्ट्र केसरी झालेल्या शिवराज राक्षे याचे उदाहरण देऊन एखाद्या achievement च्या मागे किती मेहनत असते हे त्यांनी उलगडून सांगितले. आपण एखादी गोष्ट कशी ठरवली पाहिजे, आणि त्याचा ध्यास घेतला पाहिजे याची जाणीव करून दिली. आपल्याला जे आवडतं ते जर करायला मिळाले तर याच्यासारखी सुसंधी नाही. Reverse calculation चे महत्त्व खुप छान आणि वेगवेगळी उदाहरणे देऊन प्रियदर्शिनी अंबिके यांनी मुलांना समजावले.
गौर गोपाल दास यांनी सांगितलेले Voice (जो आतून येतो) आणि Noise (जो बाहेरून डिस्टर्ब करतो) यातील फरक याचे चपखल उदाहरण यावेळी दिले.
नंतरच्या मध्यंतरात सगळ्या मुलांना क्रीम रोलचा खाऊ दिला. तसाच तो रोटरी मेंबर्सनी पण एन्जॉय केला. त्यासोबत पॅटीस सुद्धा आणि मस्त गरमागरम चहा आणि कॉफी आणि फ्रेश होऊन पुढील कार्यक्रमाला सुरवात झाली.
रो. अरविंद शिराळकर यांनी रो. आनंद कुलकर्णी यांची ओळख करून दिली आणि मध्यंतरानंतरच्या सेशनला सुरवात झाली. आनंद यांनी गोष्ट रुपात आपल्या भाषणाला सुरवात केली आणि डबा खाऊन आलेल्या मुलांना गोष्टीत छान खिळवून ठेवले. आयुष्यात जेव्हा माहिती नसते त्यावेळी आपण भटकत राहतो पण ज्यावेळी आपल्याला मार्गदर्शन मिळते, त्यावेळी आपण योग्य दिशेला जातो हा संदेश मुलांना गोष्टीतून नेपाळ ला नेऊन दिला.
Rich life आणि Ditch life यातला फरक वेगवेगळ्या उदाहरणांनी समजावून दिला.
आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी D- GAP system सांगितली.
D decipline
G goals
A attitude
P planning
दहावीच्या मुलांनी कसा अभ्यास केला पाहिजे, revision कशा केल्या पाहिजेत याचे planning कसे करायचे याची छान माहिती करून दिली. त्यानंतर मुलांना self analysis करून आपापला D- GAP चा score काढायला सांगितला. आणि त्याचे महत्त्व सांगितले. सेशनच्या शेवटी relaxation technique शिकवले.
या कार्यक्रमाला एकूण ७२विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील शिक्षिका सुद्धा या कार्यक्रमामुळे भारावून गेल्या होत्या. मुख्याध्यापिका बाईंनी सुद्धा रोटरी क्लबचे आभार मानून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर रो. राघवेंद्र पोंक्षे यांनी सर्वांचे आभार, तीनही वक्त्यांनी आपापल्या भाषणातून काय काय सांगितलं याचा थोडक्यात आढावा घेऊन मानले.
या कार्यक्रमाला आपल्या क्लब च्या First lady स्नेहा ओगले, RYLA Co-chair ॲन अंजली देवधर, रो. दत्ताजी देवधर,
ॲन सुनीता प्रभुणे, President Elect रो.रवींद्र प्रभुणे,
रो.मनिषा बेळगावकर, पीपी रो.सुदर्शन नातू, रो. संदीप अवधानी, रो.भाऊ सहस्त्रबुद्धे, रो.सुभाष करंदीकर, अनेट श्रेया करंदीकर यांनी उपस्थिती लावली.
२५ जानेवारी २०२३
एरोमॉडेलिंग शो
Dear Rotarian and Ann
Thank you for the splendid response and enthusiasm of all those who were at SP ground this morning.
Special thanks to PDG Rtn Arunji, PP Rtn Abhijit, Rtn Shrikrishnaji, Rtn Dattaji, Rtn Raghavendra, Rtn Bhau Sahasrabudhe and this was all possible because of the hard work put in by all the Members of RCPS.
It was a good program and had a fantastic PI.
Commendable and proud having members who took a lot of effort like Rtn. Datta Pashankar, PP Rtn. Abhijit Joag, Rtn. Raghavendra Ponkshe and members who go to schools to create a students pool ...👌👌
Hats off to all hands put support to this initiative.
NICE fellowship as usual by chair Ann Yamini Ponkshe at the right place made almost all members nostalgic also.
Huge media coverage...👍
२ जानेवारी २०२३
"मुंग्यांचे अद्भुत विश्व" वक्ते - नूतन कर्णिक
९ जानेवारी २०२३
“स्वरचित्र - भारतीय अभिजात संगीतातील कलाकारांच्या भावमुद्रा व त्यांच्या आठवणी” वक्ते - ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर
रविवार दिनांक 15 जानेवारी आपल्या क्लबने संक्रांती निमित्त धुंदुरमासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपले जेष्ठ रोटेरियन अनिलदा सुपनेकर यांनी एम्प्रेस गार्डनची परवानगी मिळवली आणि आपली उत्तम व्यवस्था होईल याचा पाठपुरावा केला .सकाळी नऊ वाजल्यापासून तेथील नाना नानी पार्क मध्ये एकेकांचे आगमन होऊ लागले.रो. नितीन पाठक आणि अध्यक्षांनी मोठ्या कष्टाने औरंगाबादहून आणलेल्या हुरड्याचा भाजण्याचा वास आसमंतात दरवळू लागला
मग काय विचारता गरमागरम पोहे . हुरडा .चटणी तिळगुळ या नाश्त्यावर मस्त ताव मारला. नंतर एम्प्रेस गार्डनच्या आवारात एक फेरी मारली. जुनी झाडे, वेली तसेच प्री वेडिंग शूट चे डेकोरेशन, गाड्या झोपाळे बघण्यात अकरा कसे वाजले कळले नाही. श्री पिंगळे आणि पंतप्रधानांचे सचिव विजय केळकर यांची भाऊसाहेबांनी भेट घडवून या मीटिंगमध्ये आणखी रंग भरला.
चक्कर मारून मंडळी परत नाना नानी पार्कमध्ये आली आणि जादूच झाली सर्वसाधारण 50 ते 60 वर्ष वयाचे आपले रोटेरियन आणि अँन एकदम पंधरा सोळा वर्षांचे झाले आणि सुनीता , श्वेता , अस्मिता अशा तिघी जणींनी रुमाल पाणी टीपी टिपी टिप टॉप व्हीच गॉड डू यु वॉन्ट असे वेगळे खेळ घेतले .आगळ्या वेगळ्या प्रकारची संगीत खुर्ची ही होती. खेळ आयोजित करताना छोट्या अस्मि प्रभुणे चा उत्साह वाखाणण्यासारखा होता . प्रिया आणि रो. संगीता यांनी खेळ खेळत गाण्याच्या आणि चित्रपटांच्या नवीनच विश्वात नेऊन ठेवले. एव्हाना पतंग उडवायला गेलेली छोटी मोठी कंपनी ही परत आली. फर्स्ट लेडी स्नेहाने विजेत्यांना आणि गेम घेणाऱ्यांना भेटवस्तू प्रदान केल्या. त्यानंतर गरमागरम खिचडी, कढी, लेकुरवाळी भाजी,भाकरी लोणी, गूळपोळीचा आस्वाद घेत डोळ्यांवर थोडी सुखाची सुस्ती घेत मंडळी घराकडे परतली .
ज्येष्ठ रोटेरियन अनिलदा सुपनेकर यांनी आपल्याला एम्प्रेस गार्डन या स्थळाची परवानगी मिळवून देण्यासाठी मदत केली. अस्मिताताई, प्रिया, सुनीता, श्वेता आणि संगीता यांनी खेळाचे उत्तम आयोजन केले.
श्री नितीन पाठकजी यांनी फेलोशिप कमिटी सोबत अतिशय स्वादिष्ट नाश्ता आणि जेवणाचे आयोजन केले होते. अनेक सदस्य सहभागी झाल्यामुळे खूप मजा आली. PDG अरुण कुदळेजी आणि ॲन शोभाताई नी कार्यक्रमाला येउन कार्यक्रमाची शोभा वाढवली!
इति धुंदुरमास संपूर्णम्.
१९ जानेवारी २०२३
"गप्पांगण" "आनंदाचा प्रवास" उलगडत आहेत ॲन नंदिनी जोग मुलाखतकार ॲन प्रियदर्शिनी अंबिके