या वर्षभरात आपण आपल्या क्लबरुपी कॅलिडोस्कोप मध्ये विविध रंगछटा पहिल्या. कितीतरी आनंदाचे, भावपूर्ण, धमाल असे क्षण आपण एकत्र अनुभवले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाजरूपी कॅलेडोस्कोप मध्ये आपण कितीतरी आयुष्यात रंग भरले. आता वेळ आली आहे निरोप घ्यायची. वर्षभरात क्लब मधील विविध घडामोडी बुलेटिन मध्ये कायमस्वरूपी संग्रहित झाल्या. बुलेटिनच्या निमित्ताने आपल्यातील लेखक, कवी, कलाकार हे देखील सर्वांसमोर आणता आले. आपल्या क्लब परिवारातील रोटेरिअन्स, ॲन्स, ॲनेट्स यांचे कौतुक आपल्याला करता आले. या अशा कॅलिडोस्कोप साठी काही करता आले याचा सर्व बुलेटिन कमिटी सदस्यांना सार्थ आनंद आणि अभिमान आहे.
चला तर मग आता सज्ज होऊया पुढच्या रोटरी वर्षातील कॅलिडोस्कोप पहायला.
"UTSAV" the District Conference for Rotary Year 2021-22 was held on the 7th and 8th May at JW Marriott Pune. This was a much awaited conference which was postponed due to the Covid-19 pandemic. DG Rtn. Pankaj Shah was committed to conducting this conference only in physical form and on a grand scale. The actual conference stood up to his words and was in reality a well planned and grand event. PDG Rtn. Sharmila Bhatt from The Rotary Club of Tanzania presided over the conference as RIPR and was accompanied by her partner PDG Harish Bhatt. The conference started with a procession by COPS 21-22 followed by Ganesh Vandana and the national anthem.
In his opening address "Mann Ki Baat" DG Rtn. Pankaj Saha shared the vision that he had for RY 21-22 and the realisation of that dream. He mentioned that most of the goals had been achieved as per his plan and in fact quite a few had been surpassed. District 3131 stood at number 4 globally in terms of the total contributions and at 1 in terms of membership growth with a whopping addition of 1076 new members. He also rightly commended and recognized all the contributors to this achievement. The opening address was followed by the first talk of the conference guest Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar PVSM, AVSM, VSM (Retd.)
Dr. Kanitkar has the honour of being the first lady to achieve the rank jungle in the Indian Army in fact her husband also served as electron general in the army and they are the first and only couple to reach 3 star general rank. She shared her journey from being an ordinary middle class girl to leading the medical corps of one of the largest armies in the world. She mentioned that perseverance, determination and a constant endeavour for challenges are her secrets.This was quite an inspiring talk and the audience to give he a standing ovation.
This session was followed by an interview of renowed film critic Padmashree Bhavana Somayya by RJ Sangram where she shaed many stores about her career as a film critic.
After this various district recognitions were given for the achievements in the year among them Service Above Self award was given to Rtn. Vivek Dikshit. Only about a hundred rotarians receive this prestigious award. He was honoured at the hands of Sharmila Bhatt. This was then followed by presentations of the various avenues and then address by RIPR.
Our club received awards for highest worm membership growth, highest membership growth, highest number of PHF members and for being a club with 100% giving.
After this a comic skit about the journey of being a President was presented by the various club presidents. This item was very well received by the audience and everyone enjoyed the show. This skit was choreographed by Annette Priya Pashankar, daughter of our own Rtn. Datta and Ann Anjali Pashankar.
The post lunch session started with a live online address by RIP Rtn Shekhar Mehta. He had quite warm words for the achievements of District 3131 and commended all the concerned and also appealed to the district to keep up this good work and always be among the top leading club districts. He also commended DG Pankaj Shah for the achievements and for being a true leader of the district. His address was followed by the address of RID Rtn. Mahesh Kotbagi. He himself is a part of District 3131 and was specially delighted about the achievements of the district.
These addresses were followed by a talk by Padmashree Girish Prabhune about his experiences while working with the tribals in India and particularly in South Maharashtra. He made us all aware of all the traditionals skills and knowledge that lies hidden with these tribes and how it should be brought into the mainstream. He runs a school cum training centre for the tribal kids in Chinchwad and invited all Rotarians to visit this centre.
His talk was followed by felicitations for achievements of TRF and the various other committees. Among the TRF District Committee members felicitated was also our Rtn. Madhuri Kirpekar.
The highlight of the evening was the address by showman director Subhash Ghai. He shared his journey from being a struggling actor in the industry in Mumbai to being recognised as a showman in the world's largest film industry. He highlighted the fact that to be successful one has to be very passionate about where you want to go and then to forget everything else and only focus on the goal. Although he had exceeded his allotted time, the audience was spellbound and requested him to continue further.
After this closing remarks of the day were given by Rtn. Vivek Dikshit and the proceedings of the day came to a conclusion and were followed by an entertainment show and cocktails and dinner.
The surprise event of the afternoon was a dance performance by first lady Priya Shah and other lady Rotarians and Anns.
The opening session of Day 2 of "Utsav" was by Rumadevi a traditional handicraft artisan from Barmer in Rajasthan who has been awarded with the “Nari Shakti Puraskar 2018”, the highest civilian honour for Women in India. She is associated with a network of over 30,000 rural women, trained them and linked them to the livelihood.
He narrated her story of starting a self-help group with about 10 women from her village in 2006 with a contribution of Rs 100 from each woman to holding fashion shows in Germany, Thailand, USA to being invited by Harvard University. Some of her handicraft work was also displayed at the venue which was grabbed within no time by the Lady Rotarians and Anns.
The next session was an interview of Dr. Anand Deshpande, Founder and Chairman of Persistent Systems, by PDG. Rtn. Deepak Shikarpur. Dr. Deshpande was very pragmatic about his approach to being successful. He also shared some of the work being done by his social cause foundation DeAsra.
This was followed by a beautiful dance performance by RYE and then presentations by the various avenues. The post lunch session saw an interview of DGE, DGN and DGND where they chalked out their vision for the District in their respective years as DG.
The last guest session of the conference was by Dr. Bhavesh Bhatia, a visually challenged entrepreneur cum motivator and mentor who as not only set up his multi crore business, but inspired, coached and supported other visually challenged persons to start ventures of their own.
The final day of the conference was concluded by closing remarks by RIPR PDG Rtn. Sharmila Bhatt, business session by PDG Dr. Deepak Purohit and then vote of thanks by DG Pankaj Shah and the host club.
Overall it was a very successful and grand event and everyone took back with them loads of learning and experience.
PDG Bhausaheb and Ann Shobhatai Kudale celebrated their 51st anniversary this month and on this occasion donated Rs. 51,000 to TRF. Best wishes to both of them and a big thank you for the generous gesture.
Our club was recognised during the District Conference “Utsav” for highest membership growth, highest women membership growth, highest PHF members as well as for being a 100% giving club. A big clap for all of us.
P.E. Rtn. Sanjeev Ogale has been invited as Guest of Honour at the Students Technical Meet at HIMT College, Kalpakkam, Tamil Nadu. Rtn. Sanjeev is Chairman of the Students Sub Committee of the Institute of Marine Engineers(India) and a true master of his trade. We are proud of you.
Annette Shreya Karandikar completed the Visharad Purna examination with First Class.
Heartiest congratulations Shreya and proud parents Rtn. Shweta and Spouse Subhash Karandikar.
छंदायन सेंटर फॉर इंडियन म्युसिक, न्यूयॉर्क यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या छंदायन कॉमपिटीशन ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या स्पर्धेमध्ये रो. अभिजित व ॲन माधवी देशपांडे यांचा मुलगा ॲनेट आदित्य याला सतार वादनात पुरस्कार मिळाला. आदित्यचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
रो. दत्ताजी व ॲन अंजली देवधर यांची नात, ॲनेट शर्वरी केदार देवधर हिला अखिल लोककला कल्चरल ऑरगनायझेशन यांच्या गाण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला पॅरिसला होणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. शर्वरीचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
लेख ९ वा
नमस्कार मंडळी...
धनंजय जोशी लिखित "सहज"या पुस्तकातील एक लेख...लेखाचं शीर्षक आहे.."लाँड्री"
मला लॉन्ड्रोमॅटमध्ये जायला खूप आवडतं.. एक पुस्तक घेऊन जातो आणि कपडे मशिनमध्ये घालून झाले की शांतपणे वाचत बसतो...
परवा गेलो होतो,तेव्हा पुस्तक घरी विसरलो... मग नुसतंच मशीन कडे बघत होतो... आणि विचार आला मनात की,आपण कितीतरी गोष्टी "वेळ" कसा वाचवायचा या दृष्टीनं करत असतो...
त्यापेक्षा आपण"वेळ"कसा जपून वापरायचा ते शिकलो तर...?? लॉन्ड्रोमॅट मधल्या लोकांची घाई बघून गंमत वाटली...मशीन वरती एक बटन आहे.."जेंटल वॉश" म्हणून.... लोक ते बटन दाबून धाडदिशी मशीन बंद करत होते... चार नाणी घालून ठणदिशी ती नाणी आतमध्ये सरकवत होते..... मी मनातल्या मनात म्हणत होतो,"अरे,हळू बाबांनो हळू..! "जेंटल वॉश"आहे ना..?? तुम्हाला मशीननं "जेंटल वॉश" करायला पाहिजे तर,.. तुम्ही त्याच्याशी का नाही "जेंटल"पणे वागत..??
माझी वेळ आल्यानंतर मी आपलं हळूच मशीनचं दार बंद केलं आणि म्हणालो,"सॉरी हं.! जपून धू रे बाबा कपडे...!"
मला वाटतं ते मशीन इतरांपेक्षा जरा जास्त जगेल म्हणून....
लॉन्ड्रोमॅटमध्ये किती तरी गोष्टी तुम्हाला विचार करायला लावतात... एका मशीनमध्ये"चेंज" मिळते..! अरे..! आपले आयुष्य तर "नथिंग बट चेंज"..! मग मशीन मधून चेंज घ्या किंवा आपोआप मिळणारा चेंज घ्या... चेंज मधून सुटका नाही, हे मात्र खरं..!!
आणखी एक बटन सांगतं.."परमनंट प्रेस.!" मनात विचार आला.. किती"परमनंट"?? म्हणजे इकडे चेंज घेऊन तिकडे"परमनंट प्रेस"ची विनंती करायची...??गंमत आहे की नाही ? मग त्यामुळे तुमचे कपडे जर"अनबॅलेन्स्ड लोड" म्हणून दाखवून मशीन थांबवत असतील...तर त्यात आश्चर्य मानायचं कारणच नाही..!! ही समतोल दृष्टी जर आपल्याला सापडली तर मग"ब्लीच" वापरून पांढरे कपडे आणखी पांढरे करण्याची जरूर भासणार नाही.. आपण सर्वस्वी "पांढरे"च आहोत हे सोपं तत्त्व समजून येईल आपल्याला...!!
कपडे वाळवायला घातले आणि बघत बसलो त्या ड्रायरकडे...!! संसाराचं चक्र कसे सुंदर फिरत होतं...!!
एकाएकी सेल फोन वाजला आणि जाग आली..
बन्सी म्हणत होती," तीन तास झाले, आहेस कुठे..??"
सध्या इतकेच
महाकाव्याच्या काळापासून ते सुरवातीचा बौध्द काळापर्यंतचा कालखंड राजकीय व आर्थिक बदलांचा होता.त्यावेळेस सामाजिक एकत्रीकरण व संम्मिलन होत होते.व्यवसायाचे वर्गीकरण , नवीन कल्पना व मते मांडली जात असत व त्यामुळे मतभेद सुद्धा होत असत.उपनिषदातील अद्वैत वाद पुढे चालत राहून, पुजारी,पूजाअर्चा, कर्मकांड याविरुद्ध प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या.
ह्या मंथनातून इहवाद, जैन धर्म, बौद्ध धर्म स्थापन झाले.त्याचबरोबर निरनिराळे तत्वज्ञान एकत्र करण्याचा प्रयत्न झाला.ह्या प्रयत्नांतून भारतीय तत्वज्ञानाच्या सहा प्रणालीचा जन्म झाला.त्या म्हणजे गौतमाची न्याय्य प्रणाली,कणादची वैशेषीक,कपीलची सांख्य,पतांजलीची योग,जैमिनीची धर्म अथवा कर्म, बदनारायणची ब्रम्ह कींवा वेदांत.ह्या मानसिक संघर्षाच्या व उठावाच्या काळातही एक तेजस्वी व विकसित जीवन भारतात प्रचलित होते.
जरी जैन व बौध धर्म, वैदिक धर्म व त्याच्या शाखांपासून वेगळे झालेले असले तरी मूलतः ते वैदिक धर्मापासूनच उगम पावले आहेत.ते दोन्ही धर्म वेद मानत नाहीत व परमात्म्याचे अस्तित्व नाकबूल करतात. दोन्हीही धर्म अहिंसेला महत्व देतात. दोन्हीत ब्रम्हचर्याश्रमाला महत्व दीले आहे.त्या धर्मांच्या तत्वात काहीप्रमाणात तर्कनिष्ठता व वास्तववाद आहे.परन्तू त्यांची शिकवण तर्कापलिकडील,अदृष्य, परलोकावर फारसा प्रकाश पाडत नाही.जैन धर्मातील एक मुलभूत सिद्धांत ,सत्य वैयक्तिक दृष्टिकोनाप्रमाणे बदलत असते,असा आहे.जैन धर्मात नैतिकता काटेकोर पणे पाळली जाते,त्याचबरोबर तो धर्म कडक नियमावलीत बंदिस्त आहे.जैन धर्मात विचार व आचारात विरक्तीला महत्व दिले आहे.
महावीर व बुद्ध समकालीन होते.दोघेही राजघराण्यातील होते.बौध्द काळ ,ख्रिस्तपूर्व पाचशे चव्वेचाळीस सालांत झालेल्या,बुद्धांच्या निर्वाणा नंतर सुरु झाला.त्यावेळेस वैशाखी पूर्णिमा होती,जिला बुद्ध पूर्णिमा म्हणतात.बुद्धाचे आगमन व निर्वाण वैशाखी पौर्णिमेस झाले असा समज आहे.बुद्धाला ज्ञान सुद्धा वैशाखी पौर्णिमेस प्राप्त झाले व पं.नेहरूंनी वरील लेखन सुद्धा बौध्द नववर्षांच्या दोन हजार चारशे अठ्ठ्यांशी सालांत (इ.स.एकोणीस शे पंचेचाळीस),वैशाखी पौर्णिमेस लिहले.
गौतम बुद्धाने निर्भीड पणे त्यावेळेचा लोकप्रिय धर्म, हिंदु धर्मावर टीका केली.अंधश्रद्धा,पूजाअर्चा, विधी,पौरोहित्य व त्या अनुषंगाने आलेले हितसंबंध या विरुद्ध बुद्धाने आवाज उठवला. बुद्ध, धार्मिकता ,आध्यात्म वाद, चमत्कार, साक्षात्कार व भूतपिशाश्च ,या विरुद्ध होते.त्यांचा अनुभवावर आधारित, सारासार व तर्कशुद्ध विचार सरणिवर विश्वास होता.ते नितीमत्तेवर भर देत असत. आत्माविरहीत मनोवैज्ञानिक विश्लेषण करण्याकडे त्यांचा कल होता.त्यांचे हे नवीन तत्त्वज्ञान त्यावेळच्या जुनाट आध्यात्मिक मतांपुढे एखाद्या थंड हवेच्या झुळकीसारखे वाटू लागले.जरी गौतम बुद्धाने जाती व्यवस्थेविरुद्ध टीका केली नाही,तरी,स्वतः जात पातीला मान्यता दिली नाही.हे मान्य केलेच पाहिजे की त्यांच्या ह्या दृष्टिकोनामुळे जातीव्यवस्था कमकुवत झाली.त्यावेळेस जातीव्यवस्था बदलती असावी.देशाबाहेरील निर्यातीचा व्यापार ताठर जातीव्यवस्थेत झाला नसता.कारण उच्च वर्णातील व्यापारी किव्वा खलाशी नेहमीच उपलब्ध होऊ शकले नसते.बुद्धकाळी व शेकडो वर्षे नंतर सुद्धा व्यापारासाठी परदेश गमन होत असे व वसाहती वसवण्यात येत होत्या.त्याचबरोबर परदेशी भारतात येऊन, येथील समाजात मिसळून जात असत.त्यांना जातीवर्णाच्या खालच्या पातळीवर सामावून घेतले जात असे.परन्तु विजयी आक्रमकांना क्षत्रियाचा मान देऊन राजघराण्याचा दर्जा प्राप्त होत असे व नंतरच्या दोन तीन पिढ्यात त्यांचे परकीय नाव अस्त पावून त्यांना संस्कृत अथवा प्राकृतिक नाव मिळत असे आणि पारंपारिक पद्धतीनुसार राज्याभिषेक होत असे.हे सर्व त्यावेळच्या नाण्यांवरील छापांमुळे समजते.कित्येक राजपूत क्षत्रिय कुळांचे मूळ शक किंवा हून वंशात आहे.शक ही ईराण मधील एक भटकी जमात होती जी काझगस्तान मधून चिनी जमातींनी हाकलून दिली होती.साधारण पणे ख्रिस्तपूर्व दोनशे ते बारा साला पर्यंत त्यांनी उत्तर पश्चिम भारतात राज्य केले.त्यांचा चंद्रगुप्ताने पराभव केला.हून ही सुद्धा कझगस्तान किंवा मध्य चीन मधून हाकलेली भटकी जमात होती व इ.स.पाचशे मध्ये भारतात आली.ह्या दोन्ही जमाती हळूहळू भारतीय संस्कृतीत मिसळल्या.त्या वेळेस क्षत्रियत्व ,वंशापेक्षा,किताब व्यवसायावर ठरत असे.
जरी वेळोवेळी भारतातील थोर व्यक्तींनी जात पात व पौरोहित्या विरुद्ध धोक्याची सूचना दिली होती व त्यानुसार प्रभावशाली आंदोलने पण झाली होती तरिही हळूहळू,नकळत,नियतीनुसार ,भारतात जातीव्यवस्था वाढून पसरू लागली व समाजाच्या सर्व अंगात तीने मगरमीठी घातली.जाती व्यवस्थेविरुद्ध उठाव करून जैन धर्माची स्थापना झाली.परन्तु कालांतराने तो धर्मच भारतातील एक जात म्हणून ओळखला जाऊ लागला.तीच तर्हा इस्लाम व ख्रिश्चन धर्माची झाली. बौध्द धर्म भारताबाहेर गेला,जरी त्याची भारतीय धर्मावर छाप उमटली आहे.मध्यम वर्गीयांकडून जातीव्यवस्थे विरुद्ध अनेक चळवळी झाल्या,परन्तु त्याचा जातीभेदावर व जनतेवर फारसा परिणाम झाला नाही,कारण त्या चळवळीत जातीभेदावर थेट चढाई झाली,व ती जनतेनी मान्य केली नाही.नंतर गांधीजींनी ह्या समस्येवर भारतीय पद्धतीनुसार तोडगा काढला.त्यांनी जातीभेदाची समस्या जनतेला विश्र्वासात घेउन अप्रत्यक्ष पणे हाताळली. पुरेशी आक्रमकता दाखवत गांधीजी सतत जातीव्यवस्थेच्या समस्येला सामोरी गेले,पण त्यांनी,ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या मूळ ढाच्याला धक्का लावला नाही.त्यानी संपूर्ण जातीव्यवस्थेवर हल्ला केला ज्यामूळे जातीसंरचना खिळखिळी झाली.आता जातीभेदाविरूद्ध, अधूनीक करणा सारखी, म.गांधींपेक्षा सुद्धा प्रभाव शाली शक्ती काम करत आहे व त्यामुळे जातीव्यवस्थेचा शेवट निश्चित आहे.परन्तू ह्याच वेळी जगात इतरत्र रंगभेद, वंश भेद,गरीब श्रीमंत अशा प्रकाराच्या जातीव्यवस्था तयार होत आहेत.
बुद्ध किंवा येशू ख्रिस्ताच्या कित्येक वर्ष अगोदर याज्ञवल्क ऋषींने सांगीतलेआहे की ' सदाचारी होण्यास विशिष्ठ धर्म अथवा रंगाची आवश्यकता नसते.सदाचार आचरणात आणावा लागतो.म्हणून जे जो स्वतःशी करीत नाही ते त्याने दुसर्याशीही करू नये.' भारतात हळूहळू बौध्द धर्माचा प्रसार झाला.सुरवातीला जरी बौद्ध धर्म क्षत्रिय राज्यकर्ते आणि पुरोहित यांच्या संघर्षातून निर्माण झाला होता ,तरी नंतर त्यातील लोकशाही तत्वे,पौरोहित्य व कर्मकांडाला विरोध, लोकांना भावला.बौध चळवळीत काही ब्राह्मणांनी सुद्धा भाग घेतला होता,परन्तू सर्व साधारण पणे बौध धर्माला ब्राह्मणांनी विरोध केला व बौद्ध धर्मीयांची पाखंडी व विद्रोही म्हणून अवहेलना केली.तरीही हिंन्दू धर्माचा र्हास होऊन ब्राह्मणांचा वरचष्मा बौध्द धर्मामूळे कमी झाला.अडीचशे वर्षानंतर सम्राट अशोक ने बौद्ध धर्माचा ,स्विकार करून,सर्वत्र प्रसार केला.ह्या दोनशे ते अडिचशे वर्षांत भारतात अनेक बदल झाले.निरनिराळया वंशाचे संम्मिलन, लहान लहान राज्यांचे एकत्रीकरण करून एक साम्राज्य उभारण्याचे भारतीय स्वप्न फळाला येत होते.अलेक्झांडर च्या आक्रमणाने त्या प्रयत्नांना वेग मिळाला.जसा काळ एखादी घटना घडविण्यास योग्य व्यक्ती घडवितो, तसाच चंद्रगुप्त व चाणक्य यांचा वेळेवर उदय झाला.एक क्षत्रिय तर दुसरा ब्राह्मण. दोघांनाही नंद राजाने हद्दपार केले होते.दोघेही मगध राज्य सोडून तक्षशीला येथे गेले.असे म्हणतात की तेथे चंद्रगुप्त व अलेक्झांडर ची भेट झाली.परन्तु याला काहीही प्रमाण नाही.असेही सांगीतले जाते की चंद्रगुप्त अलेक्झांडर च्या सैन्यात होता,जेथे त्याने लष्करी शिक्षण व अनुभव घेतला.काहिही असले तरी चंद्रगुप्त तक्षशीला येथील ग्रीक सैनिकांच्या सान्निध्यात नक्कीच आला होता.अलेक्झांडर च्या पराक्रमाने उस्फूल्लीत होऊन चंद्रगुप्त व चाणक्याने योग्य संधीची वाट पाहीली.
ख्रिस्तपूर्व तीनशे साली अलेक्झांडर बॅबिलॉन येथे मृत्यू पावला.लगेचच चंद्रगुप्त व चाणक्या ने राष्ट्रवादाची हाक देऊन जनतेला परकीय आक्रमका विरुद्ध जागृत केले व तक्षशीला येथील ग्रीक तुकडीला पलायन करावयास भाग पाडून, तक्षशीला आपल्या ताब्यात घेतली.राष्ट्रवादाच्या आवाहना मुळे चंद्रगुप्ताला अनेक सहयोगी मिळाले व त्यांच्यासोबत चंद्रगुप्त उत्तर भारत ओलांडून पाटलीपुत्रावर चालून गेला.पुढील दोन वर्षांत पाटलीपुत्र व मगध साम्राज्यावर कब्जा मिळविला. अशारितीने मौर्य साम्राज्याची स्थापना झाली.अलेक्झांडर चा एक सेनापती सेल्यूकस सिंधू नदी पार करून चंद्रगुप्ताचा बंदोबस्त करण्यास आला.त्याचा इ.स.पूर्व तीनशे पाच ते तीनशे तीन सालांत, चंद्रगुप्ताने पराभव केला.झालेल्या तहात सिंधू नदीचे खोरे,काबूल पर्यंत चा अफगाणिस्तान चा प्रदेश व ऊत्तर पश्चिमेचा हेराट प्रांत चंद्रगुप्ताला मिळाला.तसेच सेल्यूकस ची मुलगी 'बेरीनाईस' हिचा चंद्रगुप्ताशी विवाह झाला.ग्रीक ईतिहासात चंद्रगुप्ताचा उल्लेख 'सॅन्ड्रोकॉटस 'असा करण्यात आला आहे.बदली,सेल्युकसला चंद्रगुप्ताने पाचशे हत्ती प्रदान केले.अशाप्रकारे ,मौर्य साम्राज्य अरबी समुद्रापासून ते बंगाल च्या उपसागरा पर्यंत व सिंधु खोरे ते अफगाणिस्तानातील काबूल पर्यंत पसरले.पाटलीपुत्र त्या साम्राज्याची राजधानी होती.
मौर्य साम्राज्याचे वर्णन उपलब्ध आहे.राजा सेल्युकस चा राजदूत मेगास्थीनस् ने साम्राज्याबद्दल लिहिलेल्या इतिवृत्तातून,त्याचबरोबर 'कौटिल्य 'अथवा चाणक्य ने लिहिलेल्या 'अर्थशास्त्र 'ह्या ग्रंथावरून मौर्य साम्राज्याविषयी बरीचशी माहीती मिळते.चाणक्य चा मौर्य साम्राज्य स्थापण्यात, साम्राज्य वृद्धिंगत करण्यात व जतन करण्यात मोलाचा वाटा होता.त्यांना 'ईंडीयन मॅशीयावेल' असे संबोधीले जाते.निकोलस मॅशीयावेल हा एक इटलीतील मुत्सद्दी व ईतिहासकार होता.तो चौदाशे एकूण सत्तर ते पंधराशे सत्तावीस ह्या काळात होता.तो त्याच्या राजकिय ग्रंथ, तत्वज्ञान, लष्करी सिद्धांत, सुज्ञ बोल ,याबद्दल प्रसिद्ध होता.परन्तू ही तुलना योग्य नाही,कारण चाणक्य मॅशीयावेलपेक्षा पंधराशे वर्ष जास्त आधी अस्तित्वात होता व कितीतरी श्रेष्ठ होता.चाणक्य केवळ चंद्रगुप्ताचा चाहता नव्ह्ता तर त्याचा सल्लागार सुध्धा होता.'मुद्राराक्षस'ह्या नाट्य लेखात चाणक्याची व्यक्तिरेखा उघड होते.बैडर,कारस्थानी,अभिमानी,अपमान कधीही सहन न करणारा,सूडबुद्धीचा,ध्येयापासून कधिही न ढळणारा,शत्रुला चकवून पराभूत करण्याची एकहीसंधी न सोडणारा,चाणक्य होता.मौर्य साम्राज्याची सत्ता त्याच्या हातात होती.तो चंद्रगुप्ताला सम्राटा ऐवजी शिष्य मानत असे.वैयक्तिक जीवनात अत्यंत साधेपणा.कुठल्याही सुखासीन, थाटामाटाच्या व भपकेबाज जीवनाचा त्यानी त्याग केलेला होता.घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर व उद्देश सफल झाल्यावर, चाणक्यला निवृत्त व्हावयाचे होते व ध्यानसाधनेत जीवन व्यतीत करावयाचे होते.
चाणक्य त्याचे ध्येय गाठण्याकरता कशाचीच तमा न बाळगणारा होता,परन्तू त्याला जाणीव होती की शेवटी उद्देशा पर्यंत पोहोचण्यास अयोग्य मार्ग अवलंबील्यास त्या उद्देशाला अर्थ रहात नाही.'कॉवीज'ह्या रशीयन युद्धनीती तज्ञाच्या कितीतरी अगोदर चाणक्य ने लिहून ठेवलंय की' युद्ध हे राजनितिचा दुसरा समांतर मार्ग असतो.परन्तू तो शेवटचा मार्ग असू नये.युद्धातून राज्याचा उद्धार करण्याचा उद्देश असावा.निव्वळ शत्रूचा पराभव व विनाश करण्याचा हेतू नसावा.जर युद्धात दोन्ही पक्ष नामशेष झाले तर तो राजनितिचा पराभव समजावा.जरी युद्ध सैन्य करते,तरी शत्रूच्या मनोबलाचे खच्चीकरण करून ,त्याच्या सैन्यात गोंधळ निर्माण करून, शत्रुला नामोहरम केल्यावर,हल्ला करण्याचा डाव रचणे,महत्त्वाचे असते.' जरी चाणक्य नितीमत्तेची चाड न बाळगणारा व आपल्या मतांशी ठाम राहणारा असला तरी, बुद्धिमान व उच्च विचार सरणिच्या शत्रूला आपलासा करून घेण्याकडे त्याचा कल असे.शत्रूच्या कंपूत भेद करून त्यावर विजय मिळवण्याच्या क्षणाला,स्वतःचे पद शत्रुच्या प्रधानाला प्रदान करण्याची त्याची तयारी असे.शत्रूचा पराभव व नाचक्की करण्यापेक्षा,दिलजमाई ने राज्याचा पाया भक्कम व खोलवर रोवण्याची चाणक्य ची निती असे.मौर्य साम्राज्याचे संबंध सेल्यूकस, टोलोमी,फीलाडेल्फस, अशा शत्रूंबरोबर सलोख्याचे होते.मध्य एशीयाशी,ऑक्सस् नदीमधून, कॅप्सियन व ब्लॅक समुद्रमार्गे व्यापारी संबंध होते.अर्थशास्त्रात अरबी घोड्यांचा उल्लेख आहे इ.स.पूर्व तीनशे पर्यंत मध्य एशिया समृद्ध व श्रीमंत होता.नंतर हवामान बदला मुळे मध्य एशिया पुढील हजार वर्षात सुखा पडला.
समाप्त
आमचे मित्र सुबोध लीना यांचा फोन आला. नेहमी प्रमाणे बऱ्याच गप्पा झाल्या. मग बोलता बोलता सहज म्हणाले, "कान्हा ला येताय का ?" त्यांनी क्लब महेंद्रा मध्ये आधीच बुकिंग केलं होतं पण त्यांच्या दोन्ही मुलांचे येणे अचानक रद्द झाले आणि तिथे आमची वर्णी लागली. . आमच्या कडे देखील डिलिव्हरी पेशंट ची फारशी गडबड नव्हती. आम्ही खरतर डायरेक्ट केनिया ला जाऊन आलो होतो पण भारतातील मात्र एकही वाइल्डलाइफ सॅन्कच्युरी पाहिली नव्हती.
त्यामुळे भारतात एखादी तरी जंगल सफारी करण्याचे खूप दिवस आमच्या मनात होते आणि असा हा अचानक कान्हाला जाण्याचा योग जुळून आला. ती संधी आम्ही दवडली नाही.
नागपूर चे तापमान 44 डिग्री दाखवत होते. वाटले उन्हाचा त्रास नाही ना व्हायचा ? पण वाघ बघायला मिळण्याची संधी उन्हाळ्यातच अधिक असते आणि जंगल सफारी तर सकाळी 6 वाजता आणि दुपारी 4 नंतर असते. भर दुपारी हॉटेलवर आराम करू असा विचार केला आणि जाणे निश्चित केले. मग फुल्ल हाताचे, सूती, जंगलात कॅमोफ्लाज होतील असे कपडे, कॅप्स,गॉगल्स, स्कार्फ, बायनॅक, कॅमेरा अशी सगळी जमवाजमव केली.
पुण्याहून पहाटेच्या फ्लाईट ने साडे पाच वाजता नागपूर ला पोचलो .आधीच बुक केलेली इनोव्हा ड्रायव्हर मंगेश सह तयार होती.
चहा घेऊन प्रथम ताजेतवाने झालो.प्रवास सुरू झाला आणि थोड्याच वेळात सूर्योदयाच्या विलोभनीय दर्शनाने मन प्रसन्न झाले.गुळगुळीत रस्ता आणि रसभरीत गप्पा मारत प्रवास अगदी मस्त मजेत सुरू होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत पसरलेली गव्हाची सोनेरी शेती पाहून मन हरखून जात होते.
पाहता पाहता 5 तासाचा रस्ता संपून कान्हा कधी जवळ आले ते कळलेही नाही. दोन्ही बाजूंनी आता झाडी वाढू लागली.
रस्त्याच्या कडेला जागोजागी पिवळ्या फुलांचा सडा पडलेला दिसत होता. ही कोणती झाडे आहेत असे विचारताच मंगेश म्हणाला,"ही महुवा ची फुले आहेत ,त्याची इकडे दारू बनवतात." सकाळी सकाळीच बायका मुली ही फुले वेचायला सरसावल्या होत्या. फुलांनी भरलेले हारे मन आकर्षित करीत होते.इतक्यात क्षणभर गाडी कडेला थांबवून मंगेशने ओंझळभर फुले माझ्या हातात ठेवली.म्हणाला, "खाऊन पहा!" आम्ही प्रत्येकाने एक दोन फुले तोंडात टाकली. त्याचा गोड धुंद वास गाडीत भरून गेला. मग मात्र मन राहवले नाही.आम्ही गाडीतून खाली उतरून फुलांच्या पट्यांभोवती अगदी फेरच धरला.
मंगेश सांगत होता," प्राण्यांनाही ही फुले खूप आवडतात. माकडे तर ही फुले खावून खरोखर झिंगतात." कान्हाच्या प्रवेशा बरोबर कुतूहलपोटी आमच्या नाकात शिररेल्या त्या उग्र महूवा वासाने त्यानंतर 4 दिवस मात्र अहोरात्र आमचा पिच्छ्या काही सोडला नाही.
क्लब महेंद्रा च्या मस्त मनोहारी रिसॉर्ट मध्ये आमचे थंडगार (सरबत देऊन) स्वागत झाले.साग्रसंगीत भोजनाचा आस्वाद घेऊन मग आम्ही आमच्या "जामून" स्टुडिओत स्थानापन्न झालो.अर्थात मस्त पहुडलो.आम्ही 5 सफारी ऑनलाईन बुक केल्या होत्या. आता दुपारी 4 वाजता आमची पहिली सफारी होती. आम्ही 3 वाजताच तयार होऊन साडे तीन ला कान्हा जंगलाच्या गेटवर हजर होतो.आपण अगदी वेळेत आल्याचा आमचा अभिनिवेश तेथील गर्दी पाहून क्षणात गळून पडला.
50 ते 60 जिप्सीज सफारी साठी रांगेत उभ्या आणि प्रत्येक गाडीत अंदाजे 4 ते 6 जण म्हटले तरी 300 ते 400 लोक तिथे जमले होते. कोणी गाडीत बसलेले, कोणी तिकिटाच्या रांगेत उभे होते, कोणी फोटो काढण्यात दंग होते. कोणी चहा तर कोणी थंड उसाचा रस पिण्यात गर्क होते. जंगलात मिसळून जाऊ असे योग्य कपडे, डोक्यावर टोपी डोळ्यावर गॉगल,गळ्यात कॅमेरे, बायनॅक अडकवलेले असे पुऱ्या उत्साहाने सगळेजण कधी चार वाजतात आणि गाड्या सफरीला जंगलात शिरतात याची वाट पाहत होते.
सफरीला जंगलात शिरतात याची वाट पाहत होते.
सफारीच्या बुकिंग नुसार प्रत्येक गटाला व्हेरिफिकेशन करून क्रमाने एकेक गाडी नंबर आणि क्रमाने एकेक गाईड नेमून दिला जात होता. प्रत्येक गाडी जंगलात प्रवेश करण्यापूर्वी निर्जंतुक पाण्यातून जाण्याची व्यवस्था होती. एकाच ठिकाणी गाड्यांची गर्दी होऊन वन्यजीवन डिस्टर्ब होऊ नये म्हणून जंगलात वेगवेगळ्या रुटवरून कान्हा, किसली, सरी आणि मूक्की अशा 4 सफारी आखल्या आहेत. आम्ही आज कान्हा सफारी निवडली होती. सफारी सुरू झाली आणि स्पॉटेड डियर ने आमचे स्वागत केले. मग जंगली सुअर दिसले. सुरुवात तर छान झाली.पण आपल्याला टायगर दिसायचा असेल तर आपण आधी त्याच्या शोधात जाऊ.बाकीचे प्राणी तुम्हाला खूप दिसतील असे म्हणत गाईड ने आम्हाला जंगलाची शांतता राखत सतर्क राहायला सांगितले. जंगलात रेंज नव्हती आणि गाईड कडे वॉकिटॉकीही नव्हती. त्यामुळे आम्हाला वाघ दिसणे हे केवळ आमचे नशीब असणार होते हे आमच्या लक्षात आले.वाघ शोधायला मग आम्ही चौफेर सावध नजर फिरवू लागलो, नव्हे ती आपलीच जबाबदारी आहे असे वाटून मग पुढे तीन दिवस आम्हाला मानेचा उत्तम व्यायाम झाला हे सांगायला नको.
कान्हाचे जंगल आता उन्हाळ्यातही इतके हिरवे कंच होते की मन पाचुदार झाले.
या जंगलात 80 टक्के साल वृक्ष आहेत. सालाच्या वर्षभर हिरवाई ल्यालेल्या घनदाट झाडी चे वर्णन केवळ "अहाहा !" या एकाच शब्दात करता येईल. जंगलाचा हा हिरोळा (हिरवा आणि ओला) गंध फुप्पुसात कितीही भरून घेतला तरी मन भरत नव्हते. जाताजाता गाईड वेगवेगळ्या वृक्षांची पण माहिती देत होता. साल वृक्ष आता पांढऱ्या बारीक फुलांनी बहरले होते.जंगलात बांबू पण भरपूर दिसत होता. बांबूची फुले तर आम्ही प्रथमच पहिली.
गाईड म्हणाला बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात आणि नंतर त्याचे आयुष्य संपते. चांदण्या रात्री चमकणारी घोस्ट झाडे पण आम्हाला दिसली.सालाची झाडे हिरवी असली तरी खाली खोडाच्या भागातून लांब वरचे दिसत होते.खाली वाळलेल्या तपकिरी पिवळ्या रंगाच्या पाचोळ्याचा खच पडलेला होता.काही वाळक्या वृक्षांच्या फांद्यांतून नजर जणू अडथळ्याची स्पर्धा करत होती.
त्या मातकट रंगात कॅमोफ्लाज होणारे प्राणी शोधणे सोडा समोर असले तरी पटकन दिसणे काही सोपे काम नाही हे थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले.जिप्सी चा ड्रायव्हर आणि गाईड यांची नजर मात्र अगदी सरावलेली होती. ते दोघेही “तो गौर (गवा)पहा.
इकडे डावीकडे सांबर पहा. शिंगे असलेले नर आणि नसलेल्या माद्या बरं का!
उजवी कडे अंगावर डॉट्स असलेले स्पॉटेड डियर !"
किती सुंदर आणि देखणे दिसत होते. वाटले सीतेला त्याचा मोह पडला असेल तर काही नवल नाही.सुंदर पिवळी चकाकी असलेले ती वेलवेटी त्वचा आम्ही दुर्बिणीतून निरखली. डोळ्यांनीच जणू त्यांच्या पाठीवरून अलगद हात फिरवला आणि अगदी प्रेमात पडलो. "इकडे डावीकडे जंगली सुअर बघा. वाघांचे हे आवडते भक्ष बरा का ! शिवाय हा रॉबिन ,हा फाऊल, तिकडे मोर बघा !" असा त्यांचा अखंड पट्टा चालू होता. "थांबा ना जरा मोराचा फोटो काढायला !" असे म्हटले तर ड्रायव्हर म्हणाला," मोर मैदानात खूप दिसतील ,पिसारा फुलवून नाचताना पण दिसतील." मग काय गाडी पुढे जात राहिली. हळू हळू सूर्य अस्ताला झुकू लागला. इकडे तिकडे पाहून आमच्या माना दुखू लागल्या पण अजून वाघाचे दर्शन मात्र झाले नव्हते. वाघ दिसेलच याची खात्री नसते; नाराज व्हायचे नाही असे येण्यापूर्वीच मी मनाला समजावले होते पण तरी आपल्याला मात्र तो दिसेलच ही आशा कधी संपते का ? गाईड ड्रायव्हरला या अमुक रुटवर जाऊ,त्या वॉटर बॉडी वर पाहू असे काही बाही सांगत होता.वाटेत भेटणाऱ्या इतर गाड्यांना काही सायटिंग झाले का असे विचारत होता.पण आजच्या सफरीत अजून कोणालाच वाघ दिसला नव्हता.इतक्यात गाईड ने आम्हाला गप्प बसायला सांगितले आणि कानोसा घेतला. म्हणाला, “सांबर चा अलार्मिंग कॉल आहे. माकडांचा पण ऐकू येतोय. पानांत चालल्याचा आवाज पण येतोय ,याचा अर्थ वाघ निघाला आहे." आम्हालाही हरिणाचा ओराडण्याचा आवाज परत ऐकू आला. अर्थात डियर ,सांबर, बारशिंगा आम्हाला सगळ्यांचे आवाज सारखेच पण गाईड मात्र ते ओळखू शकत होता.तोपर्यंत त्या आलार्म च्या रोखाने आणखी 5-6 गाड्या तिथे पोचल्या होत्या.ड्रायव्हर ने गाडी थोडी पुढे घेतली आणि आमच्या गाईड ला वाघ दिसला. "ती बघा; ती दोन हिरवी झाडे दिसत आहेत ना त्याच्या पुढच्या झाडाच्या पायथ्याशी पहा.दिसला का ? खाली बसला आहे ,खाली बुंध्याशी पहा." मला तर काही केल्या काहीच दिसत नव्हते.इतक्यात वाघ उठला आणि आमच्या गड्यांकडे रस्त्याच्या दिशेने चालू लागला. आता मात्र मला वाघाचे प्रथम दर्शन झाले!
केनियात आम्ही लायन, चित्ता, लेपर्ड, झेब्रा, जिराफ, गेंडा पाहिले होते पण वाघ नाहीच तिथे. तो इथेच आहे आपल्या भारतात ! वाघाला वाट मोकळी करून देण्यासाठी मग सगळ्या गाड्या पटापट दोन्ही बाजूला झाल्या आणि आता तो झाडीतून बाहेर रस्त्यावर अगदी आमच्या समोर येईल म्हणून आम्ही सरसावून बसलो.तो आला ,त्याने दोन्ही बाजूला पाहिलं आणि दिमाखदार पावलं टाकीत शांतपणे तो रस्ता क्रॉस करु लागला.काय उमदे रुबाबदार जनावर होते.
आम्ही केवळ 10 फुटांवरून तो जंगलचा राजा पाहत होतो.चेहऱ्यावर विलक्षण जरब आणि तेज होते. अंगावरचे पिवळे काळे पट्टे मावळतीच्या उन्हात लकाकात होते. बेफिकीर आणि बिनधास्त चालत तो रस्त्यापलिकडे गेला.त्याने पुन्हा एकवार पाठीमागे वळून एक स्मार्ट लूक टाकला. सगळे चिडीचूप होते , होता तो फक्त कॅमेराचा क्लिकक्लिकाट ! आम्हाला दिव्य दर्शन देऊन पलिकडच्या झाडीत तो त्याच्या विश्वात दिसेनासा झाला. नजर पोचेल तिथवर आम्ही ते दृश्य डोळ्यात साठवून घेत राहिलो. त्यानं सर्वांना जिंकले होतं. आता तुम्हाला सांगतानाही मला तो रस्ता पार करताना डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे.नंतर गाईड ने सांगितले; "ती वाघीण आहे , तिचं नाव आहे मोहनी!" सूर्य क्षितिजा कडे कलला होता.झाडीतून दिसणारा तो केशरी गोळा आज नेत्रांना मोहवत नव्हता कारण मोहनीची आकृती अजून दृष्टिआड होत नव्हती .
रात्री प्राण्यांची मुव्हमेंट जास्त असते त्यामुळे पहाटे पहाटे टायगर सायटिंग ची शक्यता जास्त असते असे समजल्याने दुसऱ्यादिवशी आम्ही पहाटे सव्वा पाच ला सफारी गेटवर पोचलो.पावणे सहा ते पावणे आकरा अशी सफारीची वेळ होती. वेळ म्हणजे वेळ ! "वेळेत परत नाही आलात तर तुमचं सांबर होईल!" अशा मिल्ट्री शिस्तीत सफारीचा कारभार होता. शार्प पावणे सहा ला एकामागून एक जिप्सीज जंगलात प्रवेश करत होत्या.
आज आमची किसली सफारी होती. आपल्यासाठी जंगलाचे विभाग असले तरी प्राण्यांसाठी सर्व जंगल एकच असते. असे असले तरी वाघांनी मात्र त्यांची टेरीटरी मार्क केलेली असते. झाडांवर नखे मारून, लघवी, संडास करून ते त्यांचा एरिया नक्की करतात. मोनु नावाचा गाईड आज आमच्या बरोबर होता. "काल जिथे सायटिंग झाले तिकडेच आपण आधी जाऊ" असे म्हणून त्याने एक रुट पकडला. कालच्या वाघ दर्शनाने आम्ही ऊल्हसित झालोच होतो त्यामुळे अधिक उत्साहाने आम्ही जांगलजीवनात हरवून गेलो. इतक्यात ड्रायव्हर ने गाडी थांबवून नर वाघाचे ताजे पगमार्क्स दाखवले आणि कदाचित वाघ पुढे रस्त्यावरून चालत असावा या अंदाजाने त्याने गाडी पुढे घेतली.तर समोरून येणारे मादी वाघाचेही ताजे पगमार्कस दिसले. आता वाघ दर्शन होणारच म्हणून आमची उत्सुकता शिगेला पोचली. "ही डी बी टू वाघाची टेरीटरी आहे" इति गाईड.आम्ही सावध पणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबपर्यंत डोळे फाडून वाघ दिसतो का ते पाहत राहिलो.पण जंगल शांत होते ,कसलाही आलार्मिंग, अलर्ट कॉल नव्हता. पक्षांची सुमधुर किलबिल मात्र निरंतर आमचे मनोरंजन करीत होती.
हिरव्यागार जंगलातून कच्च्या रस्त्यातून वळणे घेत आम्ही तासनतास भ्रमंती करत होतो. मन आनंदी होतं ,स्वच्छंदी होतं,निवांत, उत्साही होतं.उन्हं वर आली तशी आता वाघ दर्शनाची शक्यता कमी असल्याचे गाईड ने वर्तवले.मग आमची गाडी दुसऱ्या रुटवर जाऊ लागली.थोड्या पुढे गेल्यावर ड्रायव्हरने गाडी थांबवून वर पाहायला सांगितले तर त्या झाडावर 1,2,3,4------ अबब ! 9 गिधाडे होती. त्यातल्या काहींनी त्यांचे लांब रुंद पंख उन्हात मस्त विस्तारले होते. ही व्हाईट रॅम्प व्हलचर्स ! वृक्षाच्या मधोमध त्यांचे घरटे देखील होते आणि त्यातून डोकावणारे गिधाडांचे पिलू सुद्धा आम्हाला दिसत होते. एक अनोखे दुर्मिळ नेत्रसुख! कान्हा मध्ये ही गिधाडे भरपूर दिसतात.पण रेड हेडेड व्हलचर मात्र कमी दिसतात.पण आम्ही थोडे पुढे गेलो आणि चक्क रेड हेडेड व्हलचर सुद्धा आम्हाला भक्ष खाताना दिसले.
इतक्यात पाणवठ्यावर जंगली सुअर दिसले म्हणून वाघ त्याच्या शिकारी साठी तिथे येईल या आशेवर आम्ही थोडावेळ तिथे थांबलो पण व्यर्थ !
दुपारी 4 वाजता पुढील सफारी सुरू झाली.पुनःश्च हरी ओम ! आता आमची सरी येथे सफारी होती.पुन्हा नव्या उमेदीने आम्ही टायगर मोहिमेवर निघालो.
आता आम्ही आर्मी ड्रेस सारखे कपडे घातले होते. जणू वाघ आम्हाला घाबरूनच दडून बसले होते की काय ? या सरी भागात युवराज ,बलवान ह्या नर वाघांची हुकूमत आहे असे गाईड ने सांगितले. या भागात सालाची झाडे फारशी नव्हती.आमची गाडी आज बऱ्याचदा वाळलेल्या निष्पर्ण जंगलातून चालली होती.इतक्यात रस्त्याच्या कडेला उमटलेले बिबट्याचे पंजे ड्रायव्हरने आम्हाला दाखवले. आमच्या मनात आता लेपर्ड दिसेल अशी आशा निर्माण झाली. पण उ हू ! पुढे अचानक गाडी थांबवून गाईड ने आम्हाला चितळाचा अलर्ट अलार्म ऐकवला. थोड्या थोड्या वेळाने 4-5 वेळा तो ऐकू आला. याचा अर्थ वाघ निघाला आहे. आम्ही बराच वेळ डोळे लावून बसलो होतो पण वाघाने काही दर्शन दिले नाही. बराच वेळ फिरून फिरून मग आम्ही सांबर डियर आणि हो कोल्हे पण दिसले आम्हाला. त्याचे फोटो काढण्याचा आनंद घेतला आणि परत फिरलो.
सूर्यास्ताला जाणारा केशरी सूर्य आणि त्याच्या थोड्या वर प्रतिपदेची चंद्रकोर मन शांतवून गेली.
तिसरी सफारी पुन्हा नवा दिवस नवा नवस बोलून सुरू झाली. आज तरी आता वाघ दिसू दे रे देवा! सकाळी सकाळी सायटींग होते हे एव्हाना आम्हाला पाठ होते.तसे दोन ठिकाणी वाघाचे पंजाचे ठसे पण दिसले. ते ठसे इतके मोठे होते की पाहून वाटले याचेच नाव बजरंग असावे.पण तो दिसला मात्र नाही.मग भटकता भटकता खूप मोर दिसले. सुंदर पिसाऱ्याने भारावलेले,लांडोरीना मोहवणारे. केका ऐकून मन तृप्त झाले. एक मोर तर खरोखर मिजास करीत सम्राटाप्रमाणे पिसांचा मखमली अंगरखा पांघरून एका पाषाणावर रुबाबात बसला होता.
त्याचे नखरे केवळ पाहण्यासारखे होते.तोच दुसरीकडे दुसऱ्या मोराने केका करीत पिसारा उचलला आणि तो मनसोक्त नृत्य करू लागला. त्याचं सौंदर्य मग कितीतरी वेळ निरखित राहिलो आम्ही ! एवढा मोठा भरजरी पिसारा झुलवत एक मोर उंच वृक्षावर जाऊन बसला होता.कसा उडाला असेल इतक्या उंच हा पिसारा घेऊन ? गवताळ मैदानातून इकडून तिकडे जाणारे मयूर नर्तकांचा डौल मात्र पाहण्यासारखा होता. पायघोळ इविनिंग गाऊन आणि पेन्सिल हाय हिल्स घालून मिरवणाऱ्या सुंदरींसारखे हे मोर त्यांची डौलदार चाल त्यांचे नेत्रदीपक पिसारे लोळवत सर्वांना आकर्षित करत होते. इतक्यात ब्लॅकबग जातीचे दोन हरीण बागडताना गाईड ने आम्हाला दाखवले. कान्हात आल्यापासून आम्हाला यांचे प्रथमच दर्शन झाले.गाडी थोडी पुढे गेली आणि एका तळ्याकाठी हरणांचा खूप मोठा कळप विहार करताना आम्हाला दिसला. गाईड ने सांगितले," हे बारशिंगे ! बारशिंगा हे कान्हाच वैशिट्य ! जगात ही स्पेसिज केवळ भारतात आणि निव्वळ कान्हा मध्येच सापडते." नराला मस्त झाडाच्या फाट्याप्रमाणे शिंगे असतात. काय डौलदार दिसतो हा प्राणी!
काही नर गवत पाला खात होते तर काही त्यांच्या शिंगानी एकमेकांना जोखत होते.त्यांच्या शिंगांच्या टणत्काराचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता.काही माद्या बराचवेळ पाण्यात पूर्ण डोके घालून पाणी पीत होत्या. मी गमतीने म्हटलं," सगळे खाली मुंड्या घालून चरत आहेत ,जरा वरती माझ्याकडे बघा ना ! मला फोटो काढायचा आहे." इतक्यात आमच्या ड्रायव्हरने एक विशिष्ट आवाज काढला .तो अलर्ट कॉल सारखा असल्याने क्षणार्धात सर्व बारशिंगांनी डोकी वर काढली आणि कान टवकारले.मला मात्र मस्त फोटो मिळाला ! उन्हं वर आली होती. अर्जुन गाईड म्हणाला," आता वाघ दिसण्याची शक्यता कमी आहे.तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या!" जंगलात मधोमध सुंदर कॅम्प साईट आहे.
कॅन्टीन, सोविनियर शॉप, मुझीयम खूप छान ठिकाण होते. स्वागताला कान्हा नॅशनल पार्क ची सुंदर कमान होती आणि शिंगधारी प्राण्यांच्या गळलेल्या शिंगांनी ती बनवली होती.
हो, तुम्हाला सांगायचे म्हणजे या शिंगे असणाऱ्या डियर प्रजातीत antler म्हणजे ज्यांची शिंगे गळून पडतात, जी फक्त मेटींग सिझन मध्ये आकर्षक दिसून मादीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याशी लढण्यापूर्तीच उगवतात आणि नंतर गळून पडतात. ती भरीव आणि खूप जड असतात. आयुष्यभर त्यांना पेलणे शक्यच नसते. म्हणून निसर्गाने केलेली ही व्यवस्था ! दुसरे antelopes म्हणजे ज्यांची शिंगे तारुण्यात उगवली की आयुष्यभर राहतात.ती पोकळ असतात,फारशी डोईजड नसतात.पहा निसर्गाची किमया ! या प्रकारचे antelop आम्ही केनियातील सफरीत पाहिले होते.भारतात मात्र सगळीकडे antlers च पाहायला मिळतात. आता मात्र ही शिंगे गोळा करण्याची कोणालाही परवानगी नाही.कॅल्शियम ची कमतरता असलेले प्राणी ही शिंगे आपणहून खातात.कारण ती त्यांच्यासाठी औषधे असतात.सरकार ने जंगलाच्या core भागातली सर्व आदिवासी वस्त्यांना स्थलांतरित केले आहे.फक्त बफर झोन मधील वन्य पदार्थ गोळा करण्याची त्यांना परवानगी आहे. तर आम्ही तिथे नाश्ता केला. वाघाचे प्रिंट असलेले सुंदर टी शर्ट कान्हाची आठवण म्हणून खरेदी केले. आता संग्रहालय काय आहे ते पाहू असे म्हणून निघालो. इतक्यात कुठेतरी सायटिंग झाल्याचे सांगत आमचा ड्रायव्हर धावत सांगत आला आणि आम्ही पटापट जिप्सीत चढलो. सुचने प्रमाणे पोचलो तर दोघांच्या भांडणात एक वाघ जखमी झाला असल्याचे कळले त्याला विश्रांती आणि ट्रीटमेंट करण्यासाठी तिकडे जाणारा रूट वनविभागाने बंद केला होता.मी म्हटले," पण मग दुसरा कुठे गेला ? आपण त्याला शोधूया ना !" इतक्यात जवळच्याच दुसऱ्या गाडीचा इशारा आला आणि पाणवठ्यावर बसलेल्या ओविन डोब्रा ने आम्हाला दर्शन दिले. पाहता पाहता 4-6 गाड्या तिथे जमल्या आणि वाघोबा त्वरित उठून तिथून चालते झाले. तो कसा कोठे जाणार,कोठून खाली उतरून रस्ता क्रॉस करणार याची बित्तंबातमी अनुभवी ड्रायव्हर गाईड यांना असल्याने 5-6 गाड्या पुढे जाऊन थांबल्या.त्यांचा कयास बरोबर होता.ओविंडोब्रा ने तसाच रस्ता क्रॉस केला आणि पलीकडे खाली उतरून सावलीत विश्रांती साठी बसला.मग काय आम्हाला निवांतपणे त्याला निरखण्याची ,फोटो,शूटिंग घेण्याची संधी मिळाली.
आम्ही कृतकृत्य झालो.खरेतर केवळ 15 फुटांवरून आम्ही त्या हिंस्त्र प्राण्याला उघड्या जीपमधून बिनधास्त पाहत होतो पण त्याक्षणी कोणत्याही प्रकारचे भय आम्हाला शिवले देखील नाही. याचे आम्हालाच नंतर खूप आश्चर्य वाटले.सफरीची वेळ संपून गेली होती.आम्ही परतीला लागलो. कान्हाला येणे सार्थकी लागल्याची भावना मनात घोळवत वाघाची भेदक नजर डोळ्यात साठवत होतो.इतक्यात जंगल अधिकाऱ्याच्या गाडीने आम्हाला हटकले. रागाने "इतका वेळ का झाला ?" असे म्हणाला आणि मिश्किल हसत पुढे म्हणाला ,"चला निघा पटकन आणि जाताना आता हा टायगर ही बघून जा!" त्याने हात केला त्या दिशेने आम्ही पाहिले तर रस्त्याच्या अगदी कडेला जाळीत डी बी 2 पहुडला होता. वर्षाचा तो यंग मेल असा आमच्या 10 फुटावर बसला होता.आता तर आमच्या आनंदाला पारावार उरला नाही.त्याची तगडी शरीरयष्टी आणि भेदक नजर आखबंद करीत आमची गाडी गेट कडे धावू लागली. आता आमच्या नजरेला हरणे,मोर,डुकरे काही काही दिसत नव्हते. मनःपटलावरून डीबी 2 ची ती जबरी नजर हलत नव्हती. आता दुपारच्या सफारीत वाघ दर्शनाची आशा मात्र पुनःश्च पल्लवित झाली.
आता दुपारीआम्हाला डीबी 2 चे सायटिंग जेथे झाले होते तिथेच आम्ही पोचलो.साहजिक बाकी गाड्या पण तिथेच जमल्या होत्या पण आता तो तिथे नव्हता.कोणी म्हणाले, " आताच इथे आत बांबू तुटल्याचा आवाज आला,वाघाच्या शिंका ऐकू आल्या." म्हणून थांबलो पण बराच वेळ वाट बघूनही काहीच हालचाल दिसेना .शेवटी आम्ही सफारीला वेगळ्या रुटवर पुढे निघालो.बरीच भटकंती केली. प्राणी पक्षी दुर्बीण फोटो चालूच होते. आज हरिश्चंद्र आमचा गाईड होता. एका पुलावर आमची गाडी थांबवून कानोसा घेत म्हणाला," नलिनी वाघीण तिच्या बछड्यांसह या भागात असते." मी मनात म्हटले मग आज नेमकी ती मुलांना घेऊन कुठे फिरायला गेली आहे कोण जाणे? मी हळहळले आज आमची ही शेवटची सफारी होती. उन्हं उतरली होती.परतण्याची वेळ जवळ आली होती. गाईड म्हणाला," पुन्हा एकदा पहिल्या ठिकाणी जाऊ.पाहू काही दिसतंय का ते. " आम्ही तिथे परतलो आणि उजव्या हाताला रस्त्यालगत पंजाचे ताजे ठसे दिसले. ते पुढे जंगलात उतरले होते. आम्ही थोडक्या साठी हुकलो होतो. कुठे जाळीत टायगर दिसतो का पाहत होतो. वेडी आशा ! आता परत निघावे असे ठरले.गाडी 10-20 फूट पुढे आली असेल नसेल आम्ही 5 मिनिटा पूर्वी ज्या रस्त्यावरून गेलो होतो तिथेच डाव्या हाताला जाळीत तो निवांत बसला होता. जणू तो म्हणत होता," कसे गंडवले!" पण आमच्या चाहुलीने तो लगेचच उठला आणि जाऊ लागला.
पाण्याशी पुन्हा थोडा वेळ बसला ,पुन्हा उठला,आता जंगलाकडे जाऊ लागला.हरणा चीतळांचे अलर्ट कॉल ऐकू येत होते,"राजाधिराज पधार रहे हैं !"
आम्ही बराच वेळ किती फोटो काढले, मूव्ही घेतले,नेत्रांनी अनिमिष प्यायले ते नजारे !
तो रुबाब ,ती मातब्बरी ,त्याच्या वावरण्यात दिसत होता तो अधिकार ! या कान्हा जंगलाचा मीच आहे अनभिषिक्त राजा !
सूर्याने क्षितिजावर शांतवत डोळे मिटून घेतले. आम्ही पण कान्हा च्या जांगलराज ची स्वप्नवत सफर करून डोळे मिटले.सकाळी डोळे उघडले तेंव्हा वाटले "नार्निया" सिनेमा तील गोष्टी प्रमाणे आपणही कोणा गुप्त दरवाजातून प्रवेश करून एका वेगळ्याच दुनियेत फेरफटका मारून आलो आहोत !
केळुरीतलं नाटक :
लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ता : शिवप्रणव आळवणी
'केळुरी' नावाच्या गावात तिथल्याच गावकऱ्यांनी बसवलेल्या एका नाटकाच्या प्रयोगादरम्यानच्या गमती-जमतींची ही गोष्ट. नाटकाच्या अनुषंगाने एकत्र आलेल्या बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिरेखा आणि त्यांचं अंतरंगी वागणं शिवप्रणव एकटा साकारतो आणि हसवता हसवता आपल्याला अंतर्मुख देखील करतो. साधारण शैली ही पु.लं.च्या 'बटाट्याची चाळ' किंवा 'म्हैस' या सादरीकरणाशी मिळती जुळती आहे.
मनातील नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती असलेल्या आणि होमिओपॅथी उपचारांची विशिष्ट पद्धत असलेल्या " Flower Therapy" बाबत सांगतील, पुष्पोषधी तज्ञ अरुंधती सोमण.
सौ. अरुन्धती सोमण
सायकॉकॉजी विषयात पदवी -
तेव्हापासून स्वतंत्र किंवा NGO बरोबर समुपदेशन.
आज ५० वर्षे सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी समुपदेशन.
गेली २० वर्षे पुष्पौषधीचे उपचार. समुपदेशना बरोबर
बारव रेमेडीचा प्रचार करण्यासाठी - दैनिक सकाळ, मासिके, दिवाळी अंक यात लिखाण केले,
तसेच रोटरीचे कार्यक्रम, किंवा वेगवेगळ्या संस्था
अशा ठिकाणी पुष्पौषधी बद्दल कार्यक्रम.
याचा प्रचार करण्यासाठी क्लास घेऊन आत्तापर्यंत ७५० व्यक्ति
शिकून गेल्या आहेत. गेली ३ वर्षे लॉक डाऊन मुळे online class व त्यामुळे परदेशातूनही बायका ही पॅथी शिकू शकतात. यासाठी अत्यल्प मोबदला,
तसेच समुपदेशन चार्जेस घेत नाहीत व औषधे - नफा ना तोटा पद्धतीने अत्यल्प पैसे घेऊन देते. प्रचारासाठी स्टडी ग्रुप चालू
केला आहे. अन त्यासाठी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिलांना आमंत्रित केले आहे.
हा ग्रुपही online चावतो. ग्रुपचे जवळ जवळ २५० सभासद आहेत. रोज या ग्रुपमधून स्टडी
केसेस मधून सभासद आपला अनुभव वृद्धिंगत करतात.
सोया मिल्क प्रशिक्षण कार्यशाळा
महर्षी विनोद सिद्धाश्रम, पेडांबे अलिबाग येथे आपली सोया मिल्क प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. पी.पी. रो. डॉ. सुधांशु गोरे व पी. एन. रवींद्र प्रभुणे यांच्या पुढाकाराने आपला सोयामिल्क प्रशिक्षण कार्य्रक्रम जोमाने सुरु आहे.
बारव - एक खोल अनुभव
बारव स्वच्छ व्हावी तशी उपस्थितांच्या डोक्याची, मनाची बारव स्वच्छ झाली प्रमोद श्रीरंग काळे यांचं अनुभवाधारित भाषण ऐकून...
विषय होता बारव पुनरुज्जीवन.
सभेपूर्वी चहाकॉफीऐवजी तजवीज केलेल्या पन्ह्याचा आस्वाद घेऊन उपस्थित मोकळ्या खुर्च्यांवर येऊन बसले होते.
अध्यक्ष रो. अतुल आणि सचिव रो. किरण यांनी सर्वांचं स्वागत करून एक्केचाळिसावी सभा अत्यंत वेळेत सुरू केली.
राष्ट्रगीत, त्यांनतर फोर वे टेस्ट आणि इमिजियट पास्ट फर्स्ट लेडी सुगंधा यांच्या मातुःश्रींना श्रद्धांजली वाहून अध्यक्ष अतुल यांनी अध्यक्षीय आढावा सर्वांसमोर मांडला.
मागील आणि आत्तापर्यंतचे कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल प्रोग्रॅम कमिटीचं कौतुक केलं. रो. श्वेता करंदीकर हिला काव्यस्पर्धेत पारितोषिक मिळाल्याबद्दल तिचंही कौतुक केलं. श्वेतानं तिची कविता सादर केली. अॅन डॉ. गीतांजली पुरोहित हिनंही या स्पर्धेत भाग घेतला होता हीही माहिती सभेला दिली.
रो. योगेंद्र आणि अॅन मोहिनी नातू यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भाऊबीज या उपक्रमांतर्गत देणगी दिल्याची माहिती दिली. रो. श्रीकांत परांजपे आणि रो. माधुरी किरपेकर यांच्या प्रयत्नांतून रोटरी फाउंडेशनला देणगी देण्याचं निश्चित केलेलं ध्येय आपण कधीच गाठलं आहे तरी सभासद अजून देणगी देत आहेत आपणही द्या असं आवाहन अध्यक्ष अतुल यांनी केलं
कार्यक्रमाचे वक्ते प्रमोद श्रीरंग काळे हे व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर रो. माधुरी किरपेकर यांनी त्यांची ओळख करून दिली.
वक्ते प्रमोद काळे यांचा तंत्रज्ञ म्हणून जलक्षेत्रातला अनुभव त्यांच्या भाषणात ठायी ठायी जाणवत होता. शासकीय नोकरीत असताना मोठमोठ्या प्रकल्पांचं केलेलं नियोजन आणि अंमलबजावणी यांचा उपयोग ते निवृत्तीनंतर समाजाकरता करत आहेत ही अनुकरणीय बाब सर्वांना जाणवून गेली.
बारवांबद्दल जनजागृती करताना आणि त्यांच्या स्वच्छतेबाबत पुढाकार घेताना त्यांना भारतीय विद्या शास्त्रातील शिक्षणाचा आणि 'महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपरिक जलव्यवस्थापन' या अरुणचंद्र पाठकांच्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला.
बारव बांधण्यापर्यंतचा माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास त्यांनी अगदी थोडक्यात सांगितला.
पाण्याचा शाश्वत स्रोत म्हणजे बारव हे समजावून सांगताना त्यांनी त्या शब्दाची फोडही सांगितली.
इसवीसनाच्या ३००-४०० वर्षांत बारवा निर्माण होऊ लागल्या. याबद्दल वराहमिहिर या ऋषींनी पाचव्या शतकात लिहून ठेवलेल्या नोंदी सापडतात.
पूर्वीच्या सर्व राजघराण्यांच्या काळात बारव बांधलेल्या सापडतात. उत्तरेकडच्या बारव अतिसुंदर आहेत तर दक्षिणेकडे अतिविशाल.
नंदा - एक प्रवेश
भद्रा - दोन प्रवेश
जया - तीन प्रवेश
विजया - चार प्रवेश
असे बारवांचे प्रकार आहेत हे त्यांनी फळ्यावर चित्र काढून दाखवलं. बारवा या गोल, आयताकृती किंवा चौरसाकृती असतात. पाच ते सात पायऱ्या मग लँडिंग मग परत पाचसात पायऱ्या यानुसार त्या-त्या बारवेच्या खोलीचा अंदाज येऊ शकतो. बारवांच्या जवळून हमखास ओढा वाहत असतो किंवा जवळपास तलाव असतो.
नंतरच्या काळात बारव बांधताना नक्षीकाम सुरू झालं आणि त्यात देवांची शिल्पं आकारास येऊ लागली... इतकंच नाही नंतरच्या काळात बारवांच्याजवळ हमखास मंदिर असलेलं आढळू लागलं.
असे असंख्य विशेष सांगत-सांगत त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की, बारव स्वच्छ कशी करायची.
शासकीय आणि सामाजिक प्रचंड अनास्था असल्यामुळे बारवा या हल्ली कचरा टाकण्याचं किंवा धुणं धुण्याचं ठिकाण झाल्या आहेत.
प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्रात अनेक जण लोकसहभागातून आपापल्या परिसरातल्या बारवा स्वच्छ करत आहेत हे एक आशादायी चित्र आहे. गुजरातमधली रानी की वावचं चित्र चलनातल्या नोटेवर आल्यानं भारत सरकारची बारवांप्रति असलेली आस्था अधोरेखित होते.
बारव स्वच्छ करण्यात रोटरीसारख्या संस्थांनी पुढकार घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं.
वानगीदाखल त्यांनी पुण्याजवळच्या आणि महाराष्ट्रातल्या बारवा कुठे कुठे आहेत तेही सांगितलं.
काही वर्षं जलसंशोधनाचं काम केलेल्या रो. सुभाष चौथाई यांनी आभार मानले.
त्यांनतर अॅन डॉ. गीतांजली पुरोहित हिनं स्पर्धेत सादर केलेल्या कवितेचं वाचन केलं.
अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला तसंच पुढच्या कार्यक्रमाची आठवण करून देत सभेची सांगता केली.
सुरुवातीलाच बिंदुमाधव यांनी स्वतःच्या आयुष्याची कथा सांगितली. स्वतः कोण आहे हे कळल्यावर स्वतःचीच वाटलेली किळस, आलेली निराशा, इतरांना कळल्यावर काय होईल याची सतत वाटणारी भीती आणि इतर अनेक अडचणींना सामोरे जात शेवटी त्यांचा प्रवास एक activist पर्यंत कसा झाला आहे त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी गे, ट्रान्सजेंडर आणि याच कॅटेगरीतील इतर लोक यातला फरक समजून सांगितला.
आणि त्यांचा ट्रस्ट करत असलेल्या कामाची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे अगदी तू मेलास तरी चालेल, जा आत्महत्या कर असे सांगत आई-वडिलांनी नाकारलेल्या, घरातून बाहेर काढलेल्या अनेक मुला मुलींच्या कथा त्यांनी सांगितल्या आणि त्यांच्या ट्रस्टने त्यांना कशी मदत केली हेही सांगितले. त्यानंतर मेंबरच्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली आणि हा एक खूप वेगळा कार्यक्रम संपला.
या सभेला ३ विशेष पाहुणे उपस्थित राहले. आपले पी.पी. रो. अनिलदा व ॲन अनुराधा सुपनेकर, जे तब्बल २ वर्षांच्या अमेरिका वास्तव्यानंतर प्रथमच सभेला उपस्थित राहिले, तसेच डिस्ट्रिक्ट कम्युनिटी अँड इकॉनामिक डेव्हलपमेंट कमिटीच्या को-चेअर रो. टीना रात्रा. प्रे.अतुल अत्रे यांनी या सर्वांचे विशेष स्वागत केले.
आजच्या पाहुण्यांचे स्वागत रो. मृदुला घोडके यांनी तर आभार प्रदर्शन रो. मिलिंद क्षीरसागर यांनी केले.
The Chief Guest for the weekly program on 16th May 2022 of Rotary Club of Pune South was Mrs. Rekha Daithankar. She is the only female officer in BSNL to have been honoured with the prestigious Bharat Sanchar Seva Medal.
She started her career in the Department of Telecommunications as a Telephone Operator.
But she soon accepted the challenging post of Welfare Officer which encompassed the whole of Pune District with a staff count of 6500. Her duties included giving immediate financial relief to the families in case of death of any staff (she has done 500+ such cases) or going on hospital visits to check and endorse the medical emergencies . She was the secretary for many years of All India Women's Welfare Organization which arranges "Melava" before Diwali wherein stalls are allotted to staff and their family members to sell products which they have made. She also had to organize Medical checkup camps for the staff. She arranged the " Alcoholic Anonymous " to wean the Line staff from alcohol. Her interview of Sindhutai Sapkal at Udyan Karyalay was a great success. When she saw the funeral and last rites of Lata Mangeshkar she was very much moved and she wrote as to how Lata didi must have felt and expressed herself, in an article on Facebook which has been endorsed by Mangeshkar family.
Ann. Leena Gogate conducted the program extremely well in the form of an interview by asking her leading questions. President Atul Atre gave the vote of thanks.
आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचा ५२वा वाढदिवस आपण २६ मे रोजी साजरा केला. या निमित्त NFAI येथे "सिंहासन" या चित्रपट सर्वांनी मिळून पाहिला. चित्रपटानंतर क्लबच्या वाढदिवसा निमित्त रो. श्रीकृष्ण व ॲन आरती चितळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
त्याच दिवशी पी.पी. रो. सोनल व स्पाऊस महेश पटवर्धन यांचा लग्नाचा वाढदिवस होता तो देखील दोघांनी केक कापून साजरा केला तसेच रो. दत्ता पाषाणकर यांचा देखील वाढदिवस होता. त्यांनी व ॲन अंजली पाषाणकर यांनी देखील केक कापला. यानंतर तेथील हिरवळीवर सर्वांनी स्वादिष्ट फेलोशिपचा आस्वाद घेतला. या संस्मरणीय कार्यक्रमाला उत्तम उपस्थिती होती.