सातत्याने ९ वर्ष आपल्या क्लबने १००% EREY club सन्मान मिळवला आहे.
प्रेसिडेंट रो संजीव ओगले आणि फर्स्ट लेडी रो स्नेहा यांचं भरघोस योगदान आहे.
यशस्वी महिला म्हणून ॲनेट भाग्यश्री ओगले यांचा गौरव, पुणे सोलापूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
हार्दिक अभिनंदन भाग्यश्री.
पी पी रो सोनल आणि महेश पटवर्धन यांचे सुपुत्र, श्रीनिवास पटवर्धन यांना जॉर्ज मासोन युनिव्हर्सिटी तर्फे बायो इंजिनीअरिंगमध्ये पी एच डी प्रदान करण्यात आली.
हार्दिक अभिनंदन श्रीनिवास .
रो श्रीकृष्ण आणि सई परांजपे यांचे मँचेस्टरमध्ये शिकत असलेलले सुपुत्र सागर यांचा माहितीपट ' Wild Kersal' ची ' Student World Impact film festival साठी १३ हजार स्पर्धकांमधून निवड करण्यात आली आहे.
हार्दिक अभिनंदन सागर
रो रमेश आणि चित्रा प्रभुमिराशी यांची नात नंदिता अतुल प्रभुमिराशी हिने १०वीच्या बोर्ड परीक्षेत ९५.८% गुण मिळवून आपल्या शाळेत दुसरा क्रमांक पटकावला.
या घवघवीत यशाबद्दल नंदिताचे मनापासून अभिनंदन.
संस्कृत , तिच्या संपन्नतेने अचंबित करणारी; बहराला, भरभराटीला आलेली; तरीही अचूक, आणी दोन हजार सहाशे वर्षापूर्वी पाणिणि ने रचलेल्या व्याकरणातील साच्यात हुबेहूब बसणारी,भाषा आहे.संस्कृत भाषेच्या सर्वत्र झालेल्या प्रसारामुळे तिच्या संपन्नतेत भर पडली,व ती एक सर्व संपूर्ण, अलंकृत,भाषा बनलीआहे. तरीही ती तिच्या जडांपासून दूर गेली नाही.काळानुरूप संस्कृत भाषेचा र्हास झाला; तिचा प्रभाव कमी झाला;भाषेचा साधेपणा नष्ट झाला व संस्कृत भाषा गुंतागुंतीची बनली.सविस्तर, तुलनात्मक शब्द व रूपके यांचा अति वापर व जोडशब्दांचा अतिरेक, या बरोबर नकली विद्वानांकडून आपली विद्वत्ता दाखविण्याच्या प्रयत्नात, शब्दांच्या लांबलचक माळा गुंफल्या गेल्या.
१९८४ सालात सर.विल्यम जोन्स, जे एक भाषातज्ज्ञ होते व पौर्वात्य संस्कृतींशी प्रचलित होते व एशियाटिक सोसायटीचे एक संस्थापक होते,त्यांनी असे नमूद केले आहे की,'संस्कृत भाषा कितीही प्राचीन असली तरी,तिला एक अप्रतिम ढाचा आहे,जो ग्रीक भाषेपेक्षा वरचढ आहे; लॅटिन भाषेपेक्षा भरघोस आहे;दोन्ही भाषां पेक्षा अत्यंत सुसंस्कृत व सफाईदार आहे;तरिही शब्दबंध आणी व्याकरणात दोन्ही भाषांशी जवळीक आहे.इतकी जवळीक की,हे अपघाताने होणे शक्य नाही.कुठचाही भाषातज्ज्ञ, या भाषा अभ्यासत असताना,त्यांचा उगम एकाच भाषेतून झाला असावा ,जी आज ऊपलब्ध नाही, या निष्कर्षाप्रत येणे सहज शक्य आहे.'सर विल्यम जोन्स नंतर अनेक देशांतील भाषातज्ज्ञांनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला.त्यामूळे 'तुलनात्मक भाषाशास्त्र ' ही भाषाशास्त्रातील एक नवीन शाखा सुरू झाली.एकोणीसाव्या शतकातील जर्मन पंडितांनी या शाखेत विशेष रस घेतला व त्यामुळे संस्कृत भाषेवरील अभ्यासाचे श्रेय विषेश करुन त्यांना जाते.जवळ जवळ सर्व जर्मन विद्यापीठात संस्कृत भाषा शास्त्राची शाखा होती व त्या मध्ये एक दोन तरी प्राध्यापक असत.
भारतीय संस्कृत पंडित अनेक होते, जे जुन्या शैलीचे, असमीक्षक आणी अरेबिक व पर्शियन भाषेखेरीच इतर भाषेविषयी अनभिज्ञ होते. युरोपियन प्रभावाखाली भारतात नवीन संस्कृत पंडित तयार झाले,ज्यानी युरोप अथवा जर्मनीत जाऊन ह्या नवीन तुलनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास केला.जरी ह्या पंडितांना, संस्कृत अगोदर पासून परिचित असणे लाभदायक होते,तरीही पूर्वग्रहदूषित कल्पना,वंशपरंपरागत विचारसरणि व रितीरिवाज यामुळे स्वतंत्र, भावनाविरहीत, समीक्षा करण्यात अडचण येत होती.लिखीताचा आत्मा जाणवणे,त्यावेळची परिस्थिती डोळ्यासमोर असणे व त्यामुळे लिखीताशी समरस होणे,हा एक मोठा फायदा भारतीय पंडितांना होता.
भाषा, व्याकरण आणी भाषाशास्त्र च्या पलीकडील व्यवस्था आहे. भाषा,एखाद्या वंशांच्या अथवा संस्कृतींच्या मानसिक भरभराटीचे काव्यमय प्रतीक असते. भाषा,त्या वंशाच्या आणि संस्कृतीच्या,आवडी निवडी व विचारांच्या आविष्काराचे मूर्तिमंत व जिवंत उदाहरण असते.काळाच्या ओघात शब्दांचे अर्थ बदलतात, जुन्या कल्पना नव्या अवतारात अवतीर्ण होतात.त्यामुळे जुन्या शब्दांचा व शब्द बंधांचा आत्मा व भावना पकडणे कठिण जाते.ह्या पूर्व कालीन भाषेचा अर्थ समजण्यास व त्याकालीन लेखकाची मानसिकता समजण्यास, भावनीक आणी काव्यमय मार्ग शोधावा लागतो व भाषा जितकी विपूल आणि समृद्ध, तितक्या अडचणी जास्त. इतर प्राचीन भाषांप्रमाणे संस्कृत भाषा, काव्यात्मक, सखोल अर्थी शब्दाने व एकमेकांशी सांगड असलेल्या कल्पनांनी भरलेली असल्याने, इतर भाषांमध्ये, खरा भावार्थ जपून,संस्कृत भाषेचे भाषांतर करणे कठिण जाते.संस्कृत भाषेचे व्याकरण आणि नियम सुद्धा 'पाणिणि' ने काव्यात्मक भाषेत लिहले आहेत. जरी संस्कृत भाषेचा आत्मा तिच्या अभ्यासकांना सुद्धा समजण्यास कठीण आहे;जरी त्या प्राचीन विश्वात परत प्रवेश करणे दुष्कर आहे; तरिही, आपण सर्व त्या पूरातन चालीरीतीचे वारसदार व आशीक असल्याने, त्या विश्वात थोडाफार प्रवेश करणे आवश्यक आहे. हल्लीच्या भारतीय भाषा संस्कृत भाषेची अपत्य आहेत.अजुनही, कित्येक संस्कृत शब्द व शब्दाविष्कार भारतीय भाषेत वापरले जातात. जरी संस्कृत भाषा जनसामान्यांची भाषा म्हणून संपुष्टात आली असली तरी ती अजूनही रसरशीत आहे. परन्तू परकीय विद्वानांना संस्कृत भाषा कठीण वाटते.कारण काव्यमय संस्कृत भाषा समजण्यास कविमनाची गरज असते,जे मन परकीय विद्वानांकडे नसते.त्यामूळे जरी तुलनात्मक भाषाशास्त्रात प्रगती झाली असली आणि संस्कृत भाषेत विपुल संशोधन झाले असले तरी,ते निबंध ,काव्यमय व भावनिक भाषेच्या कमतरतेमुळे, अगदीच ओसाड आणी निष्फळ वाटतात. संस्कृत ग्रंथांचे,इंग्लिश अथवा इतर परकीय भाषेतील एकही भाषांतर, मुळ ग्रंथाला यथोचित न्याय देत नाही.भारतीय व परकीय,दोन्ही विद्वान यात अपयशी ठरले आहेत ही कीव करण्यायोग्य स्थिती आहे.यामुळे एक सुंदर, प्रतिभावान, गहन विचार युक्त ,अशा कल्पनाविलासाला जग मुकले आहे.हा आविष्कार ना केवळ भारताचा,परन्तू सर्व मानवतेचा वारसा होता.
भाषांतरकारांनी, शिस्तबध्ध ,नम्रतापूर्व अंगीकारलेला मार्ग आणी इंग्लिश भाषेचे मर्म जाणून ,बायबलचे केलेले मान्यताप्राप्त भाषांतर ,हे इंग्लिश भाषेतील एक ऊत्कृष्ट पुस्तक समजले जाते.त्यामुळे इंग्लिश भाषा सुदृढ व प्रतिष्ठित बनली.त्याचप्रमाणे युरोपियन लेखक आणी कवींच्या कित्येक पिढ्यांनी ग्रीक व लॅटिन भाषेतील प्राचीन पुस्तकांवर परिश्रम घेऊन युरोपियन भाषेतील अत्यंत सुंदर भाषांतरीत पुस्तके सादर केली आहेत ज्यामुळे सर्व सामान्य नागरिकाला सुद्धा त्यांच्या जून्या संस्कृतीमधील सौंदर्य व सत्याची अनुभुती होते. कमनशिबाने आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांबाबतीत अजून तरी असे घडलेले नाही आणि केव्हा घडेल याची कल्पना नाही.आपल्या कडे विद्वानांची संख्या वाढत आहे,त्याचप्रमाणे कवि सुद्धा बरेच आहेत.परन्तु त्या दोघांत बरीच मोठी दरी आहे.आपल्या प्रतिभेला वेगळेच वळण लागले आहे आणि आजच्या काळातील ताणातून, प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यास फुरसत पण मिळत नाही म्हणून आपल्याला आता नवीन मार्ग शोधून काढला पाहिजे व निसटलेली वेळ भरून काढली पाहीजे.जुन्या विचारात अडकून पडल्यामुळे, नवनिर्मितीची प्रेरणा र्हास पावली व त्यामुळे आपल्या हृदयस्थानी असलेले प्राचीन ग्रंथ सुद्धा आपल्याला स्फूर्तिदायक ठरले नाहीत. संस्कृत भाषेतील ग्रंथांची अचूक व योग्य भाषांतरे होतच राहतील,परन्तु त्या ग्रंथांतील आत्मा भाषांतरात उतरणार नाही. जी भाषा सजीव, अल्हाददाय,आकर्षक,नादमय,पुरोगा
संस्कृत भाषा केव्हापासून मृत भाषा अथवा वहिवाट बाहेरील भाषा बनली हे ज्ञात नाही. परन्तू कालीदास काळात सुद्धा संस्कृत भाषा सर्व सामन्यात रूढ नसून, फक्त शिकलेल्या लोकांत प्रचलित होती.तश्या स्थितीत सुद्धा संस्कृत भाषेचा भारता बाहेर प्रसार झाला. सातव्या शतकात कंबोडीयात संस्कृत चे वाचन व संस्कृत नाटके होत असत.थायलंड मध्ये आजही धार्मिक कार्यक्रमात संस्कृत चा वापर होतो. जेव्हा अफगाण हुकूमशहांनी दिल्लीवर तेराशे साली राज्य वसवले, तेव्हा पर्शियन ही राजभाषा बनली व हळुहळु जनतेने संस्कृत भाषेचा त्याग करून पर्शियन भाषा स्विकारली.त्याच बरोबर ईतर लोकप्रिय भाषांचा पण प्रसार झाला आणि लेखन झाले.एवढे असून सुद्धा भारतात संस्कृत भाषा टिकून राहिली, जरी तिची गुणवत्ता कमी झालीआहे.१९३७ साली त्रिवेंद्रम येथे भरलेल्या पौर्वात्य सांस्कृतिक संमेलनात डॉ.थॉमस, जे पौर्वात्य संस्कृती अभ्यासक होते, त्याचप्रमाणे चायना विकली चे संपादक होते, यांनी असे प्रतिपादन केले,की ' संस्कृत भाषा भारतात सर्वत्र समजली जाते,व ती भारतीयांना एकत्रित ठेवू शकते.तिला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला जावा व सोप्या रूपातील संस्कृतचे सर्वांना शिक्षण दीले जावे.' 'मध्ययुगीन इटालियन कवि 'दांते ' च्या काळात सुद्धा संस्कृत इतकी लॅटिन भाषा युरोप मध्ये प्रचलित नव्हती.' विषेश करून दक्षिण भारतात संस्कृत जास्त प्रचलीत आहे.ज्यांना सध्याच्या भारतीय भाषा समजतात,त्यांना सोपी संस्कृत भाषा समजण्यास अडचण पडू नये,कारण त्या भाषा मुलतः संस्कृत भाषेपासून उगम पावल्या आहेत,ज्या इंडो आर्यन भाषा म्हणून ओळखल्या जातात.पर्शियन भाषेतील काही शब्दांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असावा.दक्षिण भारतातील द्रविड भाषा संस्कृत शब्दांनी भरलेलीआहे.
मध्ययुगीन काळ ते आर्वाचीन काळा पर्यंत संस्कृत भाषेत अनेक पुस्तक व नाटक लिहिली गेली व पुढे सुद्धा लिहिली जातील,जरीत्या लेखांचा दर्जा ऊच्च नसतो. हल्ली पण संस्कृत मध्ये व्याख्याने दिली जातात पण त्या सभांना कमी गर्दी असते.संस्कृत भाषेच्या अविरत वापरामुळे व भारतीय मनावर संस्कृत च्या असलेल्या प्रभावामुळे आधूनीक भारतीय भाषांचा विकास त्या काळात पाहीजे तेवढा झाला नाही.तरिही पुढील काही शतकात हळुहळु क्षेत्रीय भाषांचा विकास जरूर झाला.थायलंड मध्ये तांत्रिक, शास्त्रीय व सरकारी भाषेत संस्कृत शब्दांचा बराच वापर केला आहे.
प्राचीन काळी शिक्षण मौखिक असल्यामुळे व पुस्तके तोंडपाठ करीत असल्यामुळे शब्दांत नादाला महत्व असे.त्यामुळे काव्य आणी कथा लयबद्ध व नादमय असत.स्पष्टोच्चारावर जास्त भर दिला जात असे व त्याकरिता सविस्तर नियमावली असे.शब्दात नादाला महत्व असल्याने साहीत्यात नाद व ज्ञानेंद्रिय यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कित्येक वेळेस अल्हाददाय संयोग जुळून आला तर काही वेळेस कृत्रिम, ओबडधोबड मिश्रण तयार झाले.आजही वेदांचे पठण पूर्वापार चालून आलेल्या काटेकोर नियमानुसार केले जाते.
आर्वाचीन भारतीय भाषा ,संस्कृत भाषेतून तयार झाल्या आहेत,म्हणुन त्यांना इंडो आर्यन भाषा असे संबोधतात. हिंदी-ऊर्दू ,बंगाली,मराठी,गुजराथी,ओरिया,
समाप्त.
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेखमाले अंतर्गत या शेवटच्या लेखात आपण कुंडलीतील द्वादश स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच बारावी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच राहू च्या जोडीने येणाऱ्या केतू या ग्रहाचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील एकादश स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील द्वादश स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
१२) द्वादशस्थान (व्ययस्थान):
लग्नादंत्य तदीशभानुतनये दुराटंन दुर्गति ।
दातृत्वं शयनादिसौख्य विभवं वित्तक्षयं चिन्तयेत् ।
हानिर्दानं व्ययश्चापि दण्डोबंध एव च ।।
पत्रिकेतील शेवटचे स्थान.
हे अशुभ स्थान आहे. या स्थानावरून माणसाचा व्यय, पैशाचा व्यय पाहतात. गुप्त गोष्टींसंदर्भातील हे गोष्टींसाठी हे अशुभ स्थान मानतात.
आर्थिक व्यय, खर्च, शिक्षा, दंड, स्थावराची हानी, जामीन, रहाण्यामुळे, फसवल्यामुळे, चोरी, दरोडे यामुळे होणारे नुकसान, आर्थिक हानी. कर्जबाजारीपणा, सर्व प्रकारची बंधने, कारागृहवास, बंधनयोग, सर्वसंगपरित्याग, मोक्ष, विरक्ती, संन्यास, मुक्ती, स्थानत्याग, आत्महत्या, परदेशगमन, चिंता, काळजी, व्यक्तीस लाभणारे शय्यासुख, विवाहामुळे होणारे तोटे हे सर्व या स्थानावरून पाहतात. एक प्रकारचे विरक्ती देणारे स्थान. त्यामुळे मुक्ती मोक्ष ह्या दृष्टीने महत्त्वाचे. सेवा दाखवणारे स्थान आहे.
आता आपण १२ राशींमधील शेवटची बारावी मीन रास पाहूया.
१२) मीन रास: राशीचक्रातील ही शेवटची रास आहे. जलतत्वाची, स्त्री रास आहे. द्वीस्वभावी रास आहे व स्वामी गुरु आहे. जलतत्वाच्या राशीचा स्वामी गुरु असल्याने intuition आहे. स्त्री रास व जलतत्व असल्याने आर्द्रता चांगली आहे. ही प्रेमळ रास आहे. या व्यक्ति पापभिरू असतात. काही वेळा अंधश्रध्दाही दिसते. अत्यंत सदाचारी, सरळमार्गी आणि adjusting nature चे असतात. या राशीच्या लोकांमध्ये एकप्रकारची शालीनता दिसते. स्वामी गुरु असल्यामूळे कीतीही कठीण परीस्थिती असली, तरी गैर वागणार नाहीत. पण गुरू जर बिघडलेला असेल, तर वाईट परीणाम दीसतात. जसे आळशीपणा, खादाडपणा, टोकाची अंधश्रद्धा, स्वतःची निर्णयक्षमता नाही. confidence नाही. तसेच कोणत्याही गोष्टीत वाहवत जातील.
या राशीचे स्वरूप म्हणजे उंची बेताची असते थोडेसे Plump असतात. Tendency थोडी स्थूल असते. या राशीचा अंमल पावलांवर असतो. चेहऱ्यावर अतिशय सात्वीक भाव असतात. overall सौंदर्य आहे. जलतत्वाची कफ प्रकृतीची रास आहे. त्यामुळे सर्दीची tendency आहे. पावलांचे त्रास असतात. डाव्या डोळ्यावर या राशीचा अंमल आहे. त्यामुळे डोळ्यांचे त्रास पण या राशीला होतात. या राशीचा अंमल excretory system वर आहे त्यातल्यात्यात घामावर आहे. द्वितीय किंवा षष्टम स्थानात मीन राशीचा चंद्र असेल तर खूप घाम येताना दिसतो.
या लेखातील पुढील भागात आपण केतू या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
१२) केतू : गेल्या भागात आपण बघितल्या प्रमाणे राहु आणि केतू हे ग्रह नाहीत. चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा हया ज्या दोन ठिकाणी छेदल्या जातात; त्या छेदन बिंदूंना 'राहू' व 'केतू' म्हणतात. Gravitational force मुळे पृथ्वीवर यांचा परीणाम होतच असतो त्यामुळे राहू-केतू ना ग्रहांचे महत्व आले आहे. हे छेदन बिंदू असल्याने ते नेहमीच एकामेकांपासून 180° मध्ये असतात. त्यामुळेच ते पत्रिकेतरी समोरासमोरच्या घरात येतात. हे दूषित ग्रह समजले जातात. केतूचा दूषितपणा म्हणजे जन्मानंतर आलेले व्यंग समजले जाते. पुनर्जन्म हा राहू-केतूच्या कारकत्वात आहे.
केतूला संन्यास, त्याग, उपासना, आईचे वडील, व्रण, कुष्टविकार, वीरता, वगैरे गोष्टींचा कारक मानतात.
केतूच्या कारकत्वात सन्यास, विरक्ती येते. तसेच केतूच्या कारकत्वात अशा surgeries येतात, ज्यात शरीरातील काही भाग काढून टाकावा लागतो जसे की पायाचा अंगठा ampute करणे, कींवा appendix काढावे लागणे कींवा Hysterectomy चे operation करावे लागणे, कोणत्याही ग्रहांच्या युति मध्ये जर राहू केतू असतील, तर त्यांच्या दुष्परीणामांचा विचार करावा लागतो. या उलट गुरू बरोबर जर असतील, तर मात्र त्यांची अध्यात्मिक प्रगती खूप होते.
केतूची फले मंगळाप्रमाणे असतात.
मंडळी, या बरोबरच ओळख कुंडलीची या लेखमालेची सांगता होत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या अभिप्रायाने मी खूप भारावून गेले आहे.
धन्यवाद🙏
मंडळी,
मी शंभर वेळा त्याला सांगितलं पण तो काही बदलत नाही, किंवा मला कळतंय रे असं करायला नको, पण ऐन वेळेस काय होतं समजत नाही, आणि मी ती चूक पुन्हा करून बसतो. अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. कळतंय पण वळत नाही अशी आपल्या सर्वांची अवस्था कधी ना कधी झालेली असते. असे का होते? कारण कळण्याची प्रक्रिया ही आपल्या कॉन्शियस माईंड मध्ये असते आणि आपल्या वागण्याचे पॅटर्न्स हे सबकॉन्शस माइंड मध्ये असतात. समजा एखाद्या इमारतीच्या आत मध्ये बसलेल्या साहेबांकडे आपलं काही काम आहे पण प्रत्येक वेळेस आपण येऊन फक्त चौकीदाराशी बोलून जातो आणि तो चौकीदार मात्र आत कधी जात नाही.
हा चौकीदार म्हणजेच आपलं कॉन्शियस माईंड. एखाद्याला शंभर वेळेस सांगताना आपण त्या चौकीदाराशीच बोलत असतो. कुठलाही व्यक्तीत खरा बदल घडवण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतर्मनात बदल घडवणे गरजेचे असते. अंतर्मनात बदल कसा घडवायचा? आपलं आयुष्य बदलणारा प्रश्न पण या प्रश्नाचे उत्तर आपण शोधलं नाही, बरेचदा गरज नसलेल्या गोष्टींची माहिती मिळवण्यात वेळ वाया घालवला. त्यामुळे आता फोकस जरा शिफ्ट करूया आणि योग्य प्रश्नांची उत्तरे शोधूया.
समईच्या शांत प्रकाशी तव मुख प्रक्षाळते,
शांत लोभस मोरयाची प्रतिमा मनोमन न्याहाळते।
प्रत्येक घरी रुप निराळे घेऊन प्रकटसी,
सगुण म्हणू की निर्गुण तुजसी न कळे मानसी।
तेजोमय आभा तुझी रे तिमीरास पळवून लावी,
तूझ्या आगमनाने प्रत्येक घर मंदिर होऊन जाई।
थोरवी तुझी किती गाऊ देवा मती कुंठित होई,
नजर मायेची दिसते तुझ्यात जशी लेकरांसी आई।
आसाम, मेघालय आणि अरुणाचलला आमचं जायचं झालं पक्क!
आणि आता आपल्याला ट्रिप मध्ये काय काय बघायला मिळणार याचे लागले औस्तुक्य.
16 तारखेला दुपारी गोहतीला आमची झाली सगळ्या ग्रुपशी भेट. तर आमचा हसतमुख शांत असा ग्रुप लीडर सुबोध भेटला रात्री जेवणाच्या वेळी थेट! कामाख्या देवीचा आशीर्वाद घेऊन ट्रीपची झाली सुरुवात.
नंतर काझीरंगाच्या दिशेने आमची बस पळू लागली जोरात.
काझीरंगाच्या जंगलात लुटला सगळ्यांनी हत्ती सफारीचा आनंद,
तर रात्री बिहू डान्समध्येे भाग घेऊन दिल्ली सगळ्यांनी दाद उत्स्फूर्त.
बुमला पास, सेला पास आणि जसवंत सिंह आणि जोगिंदर सिंग मेमोरियल बघून आदराने आपल्या जवानांप्रती उर आले भरून.
आम्हा सर्वांचा त्यांना प्रणाम नम्र वंदन करून.
नुरांग धबधबा नोवालिया धबधबा, माधुरी लेक बघून डोळ्याचे पारणे फिटले.
तर Mosmi Limestone Caves, Living Root Bridge, Balancing Rock, बघून निसर्गाचे आश्चर्य वाटले.
तवांग म्हणजे पांढरयाशुभ्र वस्त्रांनी लपेटलेल्या डोंगरांमधील वाट, तर मेघालय म्हणजे हिरव्यागार नटलेल्या डोंगरांचा थाट.
निसर्गाचे रोज वेगवेगळेअनोखे रूप बघून प्रवासाचा शीण आमचा जात होता पळून.
बघता बघता टूरच्या ग्रुपचाझाला तयार एक परिवार, सगळेच एकमेकांची काळजी घेऊ लागले वारंवार.
सगळ्यांच्या समावेत झाली आमची साजरी Anniversary.
आम्हा दोघांच्याही लक्षात राहतील सदैव ह्या Sweet Memories. 🙂
25 May 2023
Sunday fitness fellowship
१० मे २०२३
एड्स पेशंट्स ना धान्य वाटप
१५ मे २०२३
Hb estimation camp & medicines distribution
रो डॉ विजया गुजराती आणि रो डॉ संगीता देशपांडे यांनी माधवाश्रम सेवा ट्रस्ट इथे HB estimation वैद्यकीय तपासणी शिबिर घेऊन औषध वाटप केले. रोटरीच्या परंपरेला साजेशी सेवा.
रो डॉ विजया आणि रो डॉ संगीता मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
२० मे २०२३
interactive and information session with Symbiosis Medical College Students
रोटरीच्या सेवा कार्यात अनेकांना सहभागी करून घेण्यासाठी तसेच विशेषतः युवकांना उद्युक्त करण्यासाठी पी एन रो डॉ मंदार अंबिके, पी पी रो अभिजित जोग, पी पी रो संदीप विळेकर आणि रो राघवेंद्र पोंक्षे यांनी, सिंबायोसिस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याबरोबर एक माहितीपूर्ण चर्चा सत्र घेतलं. सुमारे ५० विद्यार्थी रोटरीच्या प्रवाहात सामील व्हायला तयार आहेत.
ब्रावो रो मंदार, रो संदीप, रो अभिजित आणि रो राघवेंद्र.
३१ मे २०२३
Dialysis center at Sparsh hospital RCPS contribution.
आपल्या क्लबचे एक भरीव योगदान म्हणजे स्पर्श हॉस्पिटलमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत डायलिसिस केंद्राची सोय उपलब्ध करून दिली .
या सेवेचं उद्घाटन ३१ मे २०२३ रोजी झालं.
'आगे बढो RCPS'
Read More...
President's gratitude :
Thank you to all the Rotarians and Ann of RCPS. Thank You for being there at the Inauguration of the Dialysis Centre
Sneha and Myself were really overwhelmed by the Participation of Rotarians and Ann's in the Thank you Again.
Special Thanks to PP Rtn Abhijit Joag , PP Rtn Dr Kiran Purohit, PP Rtn Viren Shah and PP Rtn Vinod Agarwal for the efforts taken in financing, supply and documentation arrangements of the Dialysis Centre.
Thanks Again
Pres. Rtn Sanjeev & FL Sneha Ogale.
८ मे २०२३
संकष्टी चतुर्थी फेलोशिप
सोमवार ता. ८ मे रोजी कलाप्रसाद कार्यालयात रो. दत्ता पाषाणकर व अँन.अंजली यांनी गणेश चतुर्थीला यजमान पद स्विकारुन सहकुटुंब सहपरिवार चतुर्थी साजरी केली.या वेळी बरेच रोटेरिअन्स, व रो. अँन्सनीही उपस्थिती लावलीहोती.प्रथे प्रमाणे गणतीची एकवीस आवर्तने, आरती , होऊन नंतर मोदकाचे सुग्रास भोजन असा बेत होता.
गणेश चतुर्थीचा हा उपक्रम .प्रे. रो. श्री. गोविंद पटवर्धन यांनी ११ जुलै ९८ रोजी सुरु केला तो आज तागायत सुरु आहे आणि ह्याउपक्रमाला सर्वांनी चांली दाद दिली आहे.
प्रे. रो.राजेंद्र गोसावी यांच्या काळात तो डिस्ट्रिक्ट लेव्हला पोहोचला होता. गेली २५ वर्षे अखंड हा उपक्रम रोटरी पुणे साउथ राबवतो आहे.या फेलोशिपचे सध्या पंचवीसवे वर्ष आहे. सहवास क्लब मध्ये 10/ 12 वर्ष चालू आहे. District fellowship 2/ 3 वेळा झाली. 2020-21 मध्ये वर्षभर District fellowship committee तर्फे दर चतुर्थीला घेतली होती
अँन.अंजली देवधर
१२ मे २०२३
रोटरी क्लब सिंहगडरोड यांच्या बरोबर Synergy कार्यक्रम श्री अनिल करमरकर यांचे “सोलो सैक्सोफोन वादन” तसेच खास उन्हाळ्यानिमित्त वेगवेगळ्या चाट प्रकारांची फेलोशिप.
१५ मे २०२३
"रमण रजनी" आपल्या क्लबमधील उत्साही पुरुष कलाकारांचा अविष्कार
आमची काकागिरी!!
Chefs at work!
२२ मे २०२३
गप्पांगण - "लडाख - निसर्गाचं अनोखं रूप" वक्ते - पी.पी. रो. डॉ. किरण पुरोहित आणि ॲन डॉ. गीतांजली पुरोहित
लेह - लडाखचा उत्तुंग, मनोहर हिमालय.... किरण- गीतांजलीच्या कॅमेरातून.....
एखादी गोष्ट समरसून सादर करायची कला पी पी रो किरण - गीतांजली जोडीकडूनच शिकावी. आपल्या क्लबच्या २२ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात ही हरहुन्नरी, चतुरस्त्र जोडी आपल्या लडाख भेटीचा अनुभव कथन करणार आहेत हे माहिती होतं पण तो कार्यक्रम त्यांनी इतक्या कलात्मकतेने सादर करून त्या संध्येची रंगत वाढवली.
लेह लडाखची स्थानिक वेशभूषा करून किरण - गीतांजली यांनी सर्वांना मनाली, रोहतांग पास, नुब्रा व्हॅली, खरतुंगला पास , थांग वीलेज इत्यादी जागांची सफर घडवून आणली. लेह लडाख मधील हिमालय पर्वताची वेगवेगळी विलोभनीय रूपं, त्याचे बदलते रंग, नितळ सरोवराची विमलता, विविध बौद्ध मठांची भव्यता, इतकच नाही तर तिथल्या ललनांची सुंदरता अनेक फोटोच्या माध्यमातून ओघवत्या वर्णन शैलीत सादर केली.
लडाख मधील हॉल ऑफ फेमला भेट देऊन तिथल्या भारतीय जवानांच्या बलिदानाला अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून किरण - गीतांजलीने आपला लेह लडाख दौरा आटोपता घेतला.
कार्यक्रमाची सांगता करताना गायलेल्या देशभक्तीपर गाण्याने सर्वांची मने भरून आली.
नक्कीच आम्हालाही प्रत्यक्ष जाऊन हा आगळवेगळा अनुभव घ्यायला आवडेल.
२८ मे २०२३
अवयव दान- वक्ते - पीएन रो डॉ. मंदार अंबिके, डॉ. समीर दातार आणि त्यांची टीम्यांची टीम
The Organ and Body Donation programme was well attended by RCPSOUTH members. PN Rtn Dr Mandar Ambike gave a Very resourceful lecture on Body Donation. Dr Samir Datr & his team ecplained the importance and procedure for Organ & Body donation.
रोटरी क्लब पुणे साउथ आणि रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साउथ लिटरेचर यांच्या संयुक्त विद्यमाने 'साहित्य आणि समाज, बिंब - प्रतिबिंब' हा व्याख्यानाचा कार्यक्रम सोमवार २९ मे च्या साप्ताहिक सभेत सादर झाला. सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी एक तास सर्व रोटेरियन्स मंडळींना आपल्या ओघवत्या वाणीनं मंत्रमुग्ध केलं.
आपल्या भारतीय जनमानसाची साहित्याशी असलेली नाळ ही किती पुरातन आहे हे सांगताना त्यांनी रामायण, महाभारत या दोन अजरामर साहित्यकृतींचा दाखला प्रामुख्याने दिला. भारतामध्ये आजही पिढ्यानुपिढ्या वेगवेगळे लेखक मग ते भिन्न भाषांतले असोत वा भिन्न प्रांतातले, या साहित्यकृतींवर आपापल्यापरीने लिहित आहेत; व्यक्त होत आहेत असे सांगितले. शिवाय या साहित्यकृती केवळ ग्रंथापुरत्याच सीमित न राहाता इतर दृक्श्राव्य माध्यमातही रुपांतरीत झाल्या आहेत, होत आहेत हे सांगितले. जनमानसावर त्याचा प्रभाव इतका का आहे हे सांगताना ते म्हणाले की, 'रामायण हे आपल्याला जीवन कसं असावं हे शिकवतं, तर महाभारत हे आपल्याला जीवन कसं आहे हे शिकवतं. आपल्या मनात कौरवांच्या रूपाने सगळे विकार असतात... काम, क्रोध, मद, मोह, मत्सर इ. तर पांडवांच्या रूपाने आपल्या मनातला विवेक, सद्भावना, सकारात्मकता, मानवतावादीदृष्टीकोन इ. चांगले विचार हे त्यांच्याशी संघर्ष करत असतात. आणि हा संघर्ष अनादी कालापासून अव्याहतपणे चालू आहे. साहित्याची निर्मिती हीच मुळात माणूस आणि मूल्य यांच्यामधल्या संघर्षातून झाली आहे आणि होते आहे. त्यामुळे साहित्य म्हणजे केवळ पांढऱ्या कागदावर छापलेला शब्द नसतो. तर माणसाची विचारधारा बदलवणारं, जगण्याला व्यापक दृष्टीकोन देणारं मूल्य असतं.'
हा दृष्टीकोन अधिक स्पष्टपणे उलगडून सांगताना त्यांनी साहित्य आणि समाज या दोहोंशी एकत्व पावलेल्या महान विभूतींचे, जसे विवेकानंद, योगी अरविंद, भगिनी निवेदिता इ. चे दाखले दिले. नरेंद्र नाथ दत्त यांचं विवेकानंदात परिवर्तन होण्यासाठी, विल्यम वर्डस्वर्थची The Excursion नावाची कविता अप्रत्यक्षरित्या कशी कारणीभूत ठरली; तो रोचक प्रसंग सरांनी सविस्तर कथन केला. त्याच बरोबर एका नर्तकीने सूरदासांचा अभंग आळवल्यामुळे विवेकानंदाच्या विचारांत मोठा बदल झाला; जणू त्यांना सामाजिक अद्वैताचा पाठ मिळाला; आणि त्यामुळे विवेकानंद अमेरिकेतल्या शिकागो इथल्या सर्वधर्म परिषदेत कसे भाषण करू शकले, तेही सांगितलं. साहित्यातल्या कथा, काव्य यांचा संवेदनशील मनावर होणारा परिणाम हा किती प्रभावी ठरू शकतो हे सांगणारे आणखीन काही आश्चर्यकारक दाखले त्यांनी दिले. हिंदू धर्माशी लहानपणापासून कोणताही संबंध नसलेल्या परदेशस्थ अरविंद घोष यांचं योगी अरविंदमध्ये झालेलं परिवर्तन, हे मॅक्समुलरच्या अनुवादातल्या केवळ एका 'सेल्फ (self)' या शब्दाच्या ओढीमुळे कसं झालं; तो उत्कंठावर्धक प्रसंगही रसाळपणे सांगितला. याचप्रमाणे विवेकानंदांच्या भाषणामुळे प्रभावित होऊन मार्गारेट नोबेल यांचं भगिनी निवेदिता यांच्यामध्ये झालेलं परिवर्तन आणि भगिनी निवेदिता यांनी भारतीय समाजातील स्त्रियांसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेलं सामाजिक आणि साहित्यिक योगदान यांबाबतही त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली.
समाज आणि साहित्य यांचा एकमेकांवर होणारा दीर्घकालीन आणि वैचारिक परिणाम सांगतानाच बदलत्या काळातल्या साहित्यिकांचाही त्यांनी समर्पक शब्दांत आढावा घेतला. यात प्रामुख्याने आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत, सुधा नरवणे यांचा उल्लेख केला. 'मृत्युंजय' या शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या कादंबरीचा परिणाम प्रसिद्ध बुद्धिबळ पटू यांच्यावर कसा झाला ते सांगितलं. तसंच शिवाजी सावंत यांना दुस्तूरखुद्द सुप्रसिद्ध नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणातल्या अडचणीच्या प्रसंगी मृत्युंजय कादंबरी मार्गदर्शक ठरते अशी कबुली दिली... अशी उदाहरणे देऊन साहित्य आणि समाज यांची नाळ आजही तितकीच घट्ट कशी आहे ते दर्शविलं. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या किरकोळ गोष्टी देखील साहित्यात किती मूल्य निर्मिती करू शकतात हे सांगताना त्यांनी सुधा नरवणे यांची जांभूळ ही कथा सांगितली. त्याचबरोबर त्यांच्या लहानपणी शाळेत सांगितल्या गेलेल्या बोधकथेचा उल्लेख केला. निःस्पृह रामशास्त्री प्रभुणे आणि पेशवीण बाई यांच्यातल्या सोन्याच्या बांगड्यांची गोष्ट मनाला स्पर्श करून गेली.
समाजाचा साहित्यावर होणारा परिणाम सांगताना आचार्य अत्रे एका गंभीर प्रसंगाने कसे विनोदी लेखक झाले हे सांगितलं. तसंच अत्र्यांच्या लेखनावर समाजाचा होणारा परिणामही सांगितला. सामाजिक ताणामुळे हताश झालेल्या माणसाला उमेद मिळावी, त्याच्या जीवनात हास्य फुलावं... म्हणून लिहिल्या जाणाऱ्या गंगाधर महाम्बरे, पाडगावकरांसारख्या कवींच्या कविता, पु. ल.च्या कथा, नाटकं यांचाही उल्लेख केला.
सरते शेवटी समाजात घडणारी कुठलीही क्रांती ही विचारांतून होते आणि या विचारांना दिशा देण्याचं काम हे साहित्य करतं. साहित्यामध्ये एकाच जीवनात अनेक जीवन जगण्याची अनुभूती देण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे हे आपण गांभीर्यान लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आपलं कार्यक्षेत्र कोणतंही असो, आपण सर्वकष साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा असं त्यांनी आवर्जुन सांगितलं.
या कार्यक्रमात रो. तृप्ती कुलकर्णी यांनी प्रा. मिलिंद जोशी यांची ओळख करून दिली तर रो. कादंबरी सहस्त्रबुद्धे हीने आभार मानले.