आपटे मोटार स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
आपटे मोटार स्कूल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे तर्फे झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या तपासणी मध्ये आपटे मोटार स्कूल ला पुन्हा एकदा 'अ' दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले. गेली १०१ वर्ष वाहन प्रशिक्षण देऊन लोकांना वाहतुकीचे नियम समजावून देण्याचं काम करत आहे.
या वाटचालीमध्ये आमच्या सर्व प्रशिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे.
Annet Bhagyashree Ogale Completed Apollo Full Marathon of 42.2Km at Delhi under the coaching of Dr. Kaustubh Radkar.
Our club is in Top 10 for Rotary's APF(Annual Program Fund) giving clubs in 2022-2023.
Symbiosis Institute invited our PP Dr Sudhir Waghmare as a Key note speaker during the prestigious Dandekar Memorial Symposium today at Vishwa bhavan, Pune.
More happy to inform that his son Annet Sushrut Waghmare was also invited to speak on Youth leadership & mental health.
आज आपल्या इको क्लब मेंबर्सकडून आलेला अभिप्राय. ॲन स्वाती पाठकह्यांनी केलेल्या कामासाठी धन्यवाद!
जेव्हा युरोपियन च्या लक्षांत आले की भारतात पूर्वीपासूनच नाट्यशास्त्रा अस्तित्वात होते ,तेव्हा नेहेमीप्रमाणे, त्या शास्त्राचा उगम ग्रीक नाट्यशास्त्रा पासून झाला असावा असा दावा करण्यात आला.ह्याचे मुख्य कारण म्हणजे ,तोपर्यंत पश्चिम संस्कृतीला, ग्रीक नाट्यशास्त्रा खेरीज इतरत्र प्राचीन नाट्यसाहीत्य उपलब्ध आहे याची कल्पनाच नव्ह्ती. त्याचप्रमाणे अलेक्झांडर च्या मोहीमा नंतर भारताच्या सीमावर्ती भागात ग्रीक संस्कृतींशी निगडीत राज्ये वसवली होती.ही राज्ये शेकडो वर्षे टिकून होती व त्याचा परिणाम भारतीय नाट्यशास्त्रावर होण्याची शक्यता होती.हा विषयावर युरोप मध्ये एकोणीस शे शतकापर्यंत चर्चा होत होती व शेवटी असे लक्षात आले की भारतीय नाट्यशास्त्र व साहीत्य पूर्ण पणे स्वतंत्र आहे.भारतीय नाटकांची सुरवात ऋग्वेदातील मंत्रोच्चारण व संवादातून , ज्यामध्ये नाट्यमय पात्रे आहेत, झाली. रामायण व महाभारतात सुद्धा नाट्यकलेचा ऊल्लेख आहे. नाटकांत गीत संगीत कृष्ण कथेपासून सुरू झाले. सहाव्या सातव्या शतकातील व्याकरण कार पाणिणि ने नाट्यकलेचा ऊल्लेख केला आहे.
इ.स.च्या तिसर्या शतकात भरत मुनीं ने लिहिलेल्या 'नाट्यशास्त्र' या गंथ्रातील ३६ प्रकरणांतील ६००० श्लोकाद्वारे, नाटकांचा शास्त्रीय द्रूष्टीकोनातून उहापोह केला आहे. अशाप्रकारचा ग्रंथ अर्थातच पूर्वीच्या साहित्या वर आधारित असतो.त्याचबरोबर पूर्वीपासून नाट्यकला विकसित होऊन जनतेला सादर केली जात असणार. छोटा नागपूर येथील रामगड टेकड्यांच्या परिसरात दुसर्या शतकातील नाट्यगृह, ऊत्खननात सापडले आहे आणी हे नाट्यगृह 'नाट्यशास्त्रात' वर्णन केल्या प्रमाणे बांधले आहे.इ.स.पूर्वी ३०० ते ५०० वर्षांपूर्वीच नाट्यकलेने भारतात जम बसवला असावा.सध्या अस्तित्वात असलेल्या नाटकांत जुन्या नाटकांचे व लेखकांचे ऊल्लेख सापडतात.अशाच ऊल्लेखलेल्या नावांपैकी एक नाव 'भास' यांचे आहे,ज्यांचा ऊल्लेख आदरपूर्वक केला जातो.भासांची आतापर्यंत तेरा नाटके सापडली आहेत.भास तिसर्या शतकात जन्मले.त्यांचे सर्वोत्तम नाटक 'स्वप्न वासवदत्त' आहे.त्यांची नाटके रामायण महाभारता वर आधारित आहेत. त्यांनी नाटकांत लढाईचे व हत्येचे देखावे सर्व प्रथम सादर केले.अश्वघोष यांची सापडलेली नाटके कदाचीत सर्वात पूराण असावीत. अश्वघोश ८० व्या शतकात अयोध्येत जन्मले असावेत. त्यांना भारतीय नाट्यकलेचे पितामह असे संबोधिले जाते.कवी कालीदासां नंतर सर्वोत्तम नाटककार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांनी 'बुद्धचरीत ' ग्रंथ लिहला. ते सम्राट कनीष्काच्या दरबारात आध्यात्मिक सल्लागार होते.त्यांचे ताडपत्रीवर लिहिलेले लेख ' तूर्फान ' येथे ,जे, गोबी वाळवंटाच्या कडेला आहे, तेथे सापडले आहेत.त्यांचा मृत्यू पेशावर येथे झाला.
१७८९साली सर विल्यम जॉन्स् यांनी कालीदासाच्या शाकुंतलचे भाषांतर केले व युरोपला प्रथमच भारतीय नाट्यकलेची जाणीव झाली आणि युरोपियन पंडीतांमध्ये एकच खळबळ उडाली.त्या ग्रंथाच्या अनेक प्रति छापल्या गेल्या.त्याचप्रमाणे इतर युरोपियन भाषेत सुद्धा तो ग्रंथ छापला गेला.प्रसिध्द जर्मन कवी कादंबरीकार पंडीत गोथी याने शाकुंतल चे खूप कौतुक केले.'फॉस्ट' ह्या नाटकांत प्रस्तावना लिहिण्याची कल्पना कालिदासा कडून घेण्यात आली. संस्कृत नाटकांत प्रस्तावना लिहण्याची परंपरा पहिल्यापासूनच होती.कालीदास संस्कृत साहीत्यातील प्रथम श्रेणीचा कवी आणि नाटककार समजला जातो.कालीदास चौथ्या शतकाच्या शेवटी दुसर्या चंद्रगुप्ताच्या काळात ऊजैन येथे रहात असावा.तो चंद्रगुप्ताच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता.कालीदासाचा त्याच्या काळात मान सन्मान झाला असावा.तसेच त्याचे आयुष्य सुद्धा सुखी व संपन्न असावे ज्यामूळे त्याच्या लिखाणात आयुष्याची गोडी व निसर्ग सौंदर्याची ओढ दिसून येते.त्याने कुमार संभव,शाकुंतल, रघूवंश,मेघदूतम् ,विक्रमोवर्शीयम,ईत्यादी साहित्यीक रचना केल्या.कालीदासाच्या 'मेघदूत ' विषयी अमेरिकन पंडित 'रायडर' म्हणतो,' पुस्तकाच्या पहील्या भागात प्रकृतीच्या बाह्य अंगाचे वर्णन आहे,तरीही त्यात मानवी भावना गुंफलेल्या आहेत.दुसर्या भागात मानवी मन दर्शविले असले तरी ते नैसर्गिक सौंदर्याच्या चौकटीत वसविले आहे.हे इतक्या अप्रतिम रीत्या जमविले आहे की कोणता भाग ऊत्तम आहे हे सांगता येत नाही.कालीदासाला पाचव्या शतकात जी समज होती,की जग फक्त मानवा करता निर्माण झाले नसून, मानवा व्यतिरिक्त जीवनाची किंमत कळून जेव्हा मानव त्याचा आदर करण्यास शिकतो, तेव्हा तो परिपूर्ण होतो,ती समज अजूनही युरोपियन ना आलेली नाही.कालीदासाला जे समजले त्याबद्दल त्याच्या अचंबित बुद्धीचे कौतुकच करावयास हवे.अशा बौद्धिक सामर्थ्यानेच कविता पूर्णत्व पावते.ओघवत काव्य अथवा बौद्धीक क्षमता दुर्मीळ नसते.परन्तू दोन्ही गुणांचे एकत्रीकरण जगाच्या सुरवाती पासून फार थोड्या व्यक्तींमध्ये आढळून आले आहे.ह्या गुणांमुळे कालीदास जगातील ऊच्च कवींच्या श्रेणीत मानला जातो.'
कालीदास च्या अगोदर 'शुद्रका ' ने ' मृच्छकटीक ' हे नाटक लिहिले. शुद्रक हा एक राजा होता.त्याने' विणा वासवदत्त ' तसेच 'भान ' ही नाटके सुद्धा लिहली.४०० व्या शतकात,चंद्र गुप्त २ च्या काळात, विषाखा दत्त ने 'मुद्राराक्षस ' हे नाटक लिहले.हे नाटक चंद्र गुप्त मौर्य व त्याचा मुख्यमंत्री चाणक्य यांच्या राजकारणा विषयी आहे.'अर्थशास्त्रा ' चा निर्माता चाणक्य त्या नाटकाचा नायक आहे. विशाखा दत्त ने ' देवी चंद्रगुप्त ' हे नाटक सुद्धा लिहीले. राजा 'हर्षवर्धन 'हा सातव्या शतकातील राजा होता,ज्याने नवीन साम्राज्य ऊभे केले,त्याच्या नावावर रत्नावती,नागनंदा,प्रियदर्शीका अशी तीन नाटके आहेत.
'भवभूती ' हा संस्कृत साहीत्यातील एक झळकता तारा समजला जातो.त्याचा ऊल्लेख कालीदासा बरोबर केला जातो.तोआठव्या शतकात विदर्भातील पद्मपूर येथे जन्मला.त्याचे खरे नाव 'श्रीकांत नीलकंठ ' असे आहे.तो कनौज चा राजा यशोवर्धन याच्या दरबारात राजकवी होता.त्याच्या लिखाणाचे जरी फारसे भाषांतर झालेले नाही,तरी ही त्याच्या सुमधूर भाषेमुळे तो प्रसिद्ध आहे.त्याच्या 'मालती माधव ' ऊत्तर राम चरीत ह्या रचना प्रसिद्ध आहेत.कालीदास व भवभूती विषयी,विल्सन, जो ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृचा प्राध्यापक होता ,लिहतो,' इतक्या , सुंदर, संगीतमय, भव्यदिव्य, भाषे विषयी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे,जी कालीदास व भवभूतीच्या श्लोकात आहे.'
संस्कृत नाटकांची परंपरा कित्येक शतके चालू होती.परन्तु नव्व्या शतकातील कवी'मुरारी ' नंतर,नाटकांच्या दर्जात घसरण झाली. मुरारीने रामायणावरील 'अनर्घ राघव' नाटक लिहिले. त्या काळात अशी घसरण भारतीय संस्कृतीत इतरत्र सुद्धा होत होती.कदाचित अफगाण आणी मोगल काळातील इस्लाम धर्मातील भारतीय कले विषयी च्या नाराजी मुळे व राजाश्रय न मिळाल्यामुळे ,ही घसरण झाली असावी. वरील मताला फारसा आधार नाही,कारण ,ह्या राजकिय ऊलथा पालथीच्या कितीतरी अगोदर पासूनच संस्कृत नाटकाला अवनती लागली होती व ही उतरण ऊत्तर व दक्षिण भारतात सुद्धा होती.इस्लाम धर्माच्या राज्यकर्त्यांनी,काही अपवाद सोडून,भारतीय कलेला प्रोत्साहनच दिले होते.भारतीय संगीताचे मुस्लिम दरबारात स्वागत होत असे.इतकेच नव्हे तर,कित्येक संगीत सम्राट मुस्लिम होते,जरी त्यांतील काही जणांनी धर्मांतरण केले होते.काव्य आणि साहित्याला सुध्दा प्रोत्साहन मिळत असे.विजापूर चा सत्ताधारी इब्राहिम अदील शहा ने भारतीय संगीतावर ग्रंथ लिहला होता.त्याच्या कडे लश्कर-ए-नवरस नावाचा संगीतकारांचा जथा होता.नवरसपूर येथे त्याने एक महाल बांधला होता व तेथे संगीत संमेलन भरत असे.जरी भारतीय काव्यात आणि संगीतात हिंदू देव देविकांचा ऊल्लेख असे तरी मुस्लिम सत्ताधाऱ्यांकडून, काही अपवाद वगळता, भारतीय संगीत कला दडपण्याचा प्रयत्न झाला नाही.संस्कृत नाटकाचे पतन दिल्लीवर मुस्लिम सत्ता येण्याच्या अगोदरपासूनच सुरू झाले होते.थोडेफार रीत्या संस्कृत भाषेला प्रशीयन भाषेशी संघर्ष करावा लागला. परन्तू १०००इ.स.पर्यंत लोकभाषांचा प्रभाव वाढत होता व त्यामुळे संस्कृत भाषा मागे पडत चालली होती.तरीही संस्कृत नाटक मध्ययुगापासून आज पर्यंत चालू आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे.संस्कृत नाटकांचा शोध चालुच आहे,व आतापर्यंत ६५० नाटकांचा शोध लागला आहे.
पूर्वीच्या संस्कृत नाट्यातील भाषेत संस्कृत आणि प्रकृत भाषेचे मिश्रण असे.काव्यमय व लयबद्ध भाग संस्कृत भाषेत असत. हा बदल जनतेच्या आग्रहास्तव आणि लोकप्रियते करता केला असावा.तरीही जून्या काळातील नाटके खास करून एक खानदानी कला होती,जी सुसंस्कृत व राजघराण्यातील माणसांकरता होती.पौर्वात्य व भारतीय संस्कृती तज्ञ सिलव्हेन लेव्ही संस्कृत नाटकांचा फ्रेंच शोकांतिकाशी तुलना करतो,ज्या अवास्तव विषयांमुळे सर्व साधारण जनसमुदायाकडून दुर्लक्षित राहिल्या.ऊच्च श्रेणीच्या वाङ्मयीन नाटकां खेरीज लोकप्रिय नाट्यकला सुद्धा ,त्यावेळेस अस्तित्वात होती,जी भारतीय पुराण व महाकाव्यावर आधारित होती.हे विषय सर्वाना परिचयाचे होते,व नाटकांत नाट्यापेक्षा देखाव्यांवर जास्त भर असे.ही नाटके ज्या भागातील भाषेत होत असत,त्याच ठिकाणी दाखवत असत.त्याविरुद्ध ,संस्कृत राष्ट्रीय भाषा असल्याने संस्कृत नाटके सर्वत्र दाखवित असत.
संस्कृत नाटकांत अभिनयाला महत्व असे.त्याचप्रमाणे नाट्यप्रयोगा विषयी सविस्तर सूचना दिल्या जात.अगदी प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थे कडे सुद्धा लक्ष दिले जाई. स्त्रियांचा संस्कृत नाटकांतील सहभाग,प्राचीन ग्रीक नाटकांपेक्षा वेगळेपणा दर्शवीत असे.ग्रीक व संस्कृत नाटकांत निसर्गाशी जवळीक असे, काव्य गीतात गायले जायचे व ते अर्थपुर्ण असावयाचे.ग्रीक नाटक वाचताना,त्याचे संस्कृत नाटकाशी असलेले साम्य लक्षात येते. तरीही, मूलतः ग्रीक नाटक संस्कृत नाटकापेक्षा वेगळे आहे.ग्रीक नाटक मुखःत्वेकरून एक शोकांतिका आहे.अनैतिकता, सुखदुःख, दुष्टपणा,धर्म व ईश्वरी रहस्य,दैवापुढील मानवाचा हताशपणा,मानव नियतीच्या हातातली खेळणे असणे,प्रारब्धाशी मानवाचे झगडणे, भोग अपरिहार्य असणे,वगैरे विषय ग्रीक नाटकांत हाताळले जात.ग्रीक शोकांतिकेतील भव्यता व ऊर्जा संस्कृत नाट्यात नाही.खरोखरी संस्कृत नाटकांत शोकांतिकाच नाही.पुनर्जन्म, प्रारब्ध, कर्माचे फळ आदी ,धार्मिक व सामाजिक मुलभूत प्रश्न गृहीत धरल्यामुळे ,त्यांविषयी चर्चा संस्कृत नाटकांत होत नसे.जरी सर्व साधारण समाजाचा वरील सिद्धांतावर विश्वास होता तरिही विचारवंत व तत्त्वज्ञानी सतत या मुलभूत प्रश्नांवर विचार विनिमय करीत असत.
संस्कृत नाट्यशास्त्राचे नियम कडक असत.नायक नेहमीच धैर्याने दैवावर व शत्रूवर मात करीत असे.चाणक्य ने 'मुद्राराक्षस' मध्ये ऊद्गारले आहे ' मूर्ख दैवावर विश्वास ठैवतात. ते स्वतः वर अवलंबून राहण्या ऐवजी आपल्या ग्रहदशेवर नजर ठेवतात.' नायक नेहमीच बहादूर असे व खलनायक नेहमीच कपटी. भावनांच्या मधल्या छ्टा नसत.तरिही स्वप्नावत ,नाट्यमय,ह्रदय स्पर्शी प्रसंग,नाटककार कविने,आपल्या दिव्य भाषेतून त्या नाटकांत गुंफलेले असत. त्यामुळे असा समज होतो की भारतात त्यावेळी सर्वत्र शांती समाधान असे. भारतीय संस्कृतीला आपले मूल सापडले होते,सर्व समस्यांचे समाधान झाले होते. जीवन एखाद्या संथ नदी प्रमाणे वाहत होते. काही वादळे आली तरी त्यामुळे वरच्यावर लहरी उठल्या. ग्रीक शोकांतिके प्रमाणे घनघोर वावटळ नव्हती. जरी ग्रीक नाटक मानवी जीवनाशी निगडीत, तर्कशुद्ध, सुसंवादीत असले तरी ,भारतीय नाट्य ही भारतीय पंडितांची सुरम्य रचना आहे, असे 'लेव्ही ' म्हणतो.
प्रो,कीथ म्हणतो,'संस्कृत नाट्य,भारतीय काव्यातील अत्युच्च निर्मिती आहे,जी भारतीय पंडीतांनी साध्य केली व ज्यामुळे भारतीय बुद्धिमत्तेची वेगळी ओळख पटली. भारतीय तत्त्वज्ञाना बरोबर त्यांनी भारतीय नाट्यशास्त्राला सुध्दा जन्म दिला.' 'शुद्रक 'च्या 'मृच्छकटीकाचा' प्रयोग १९२४ साली न्यूयॉर्क येथे करण्यात आला व त्याचे मुक्तकंठाने स्वागत झाले.
समाप्त
अर्थसंकल्प
आर्टिकल ११२ नुसार आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प मांडणे बंधनकारक आहे. त्यात appropriation bill असते, शासकीय खंजिन्यातून खर्च करण्याचे हक्क त्यामुळे सरकारला मिळतात,
शासनावर विविध जबाबदऱ्या सोपविलेल्या आहेत. त्यासाठी विविध खाती आहेत.
त्याच्या आर्थिक गरजा असतात, त्याची मागणी अर्थ खात्याकडे केली जाते. सरकारी धोरणाप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविला जातो आणि त्यानुसार पुढील वर्षात कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा हे ठरविले जाते.
आर्थिक नियोजनचे मुख्य हेतु असे असतात.
- गरीबी कमी करणे आणि त्यासाठी रोजगार निर्मितीला चालना देणे.
- शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सामाजिक स्वास्थ्य योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध करणे
- राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ति वाढविणे.
- राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वाटप व्हावे.
- गरजेच्या वस्तु सेवा याच्या किमती सुसह्य आणि नियंत्रित ठेवणे.
दोन प्रकारचे खर्च असतात.
महसुली : पगार, देखभाल, दुरुस्ती, प्रशासकीय दैनदीन गरजा, व्याज
भांडवली : रस्ते, बंदरे, रेल्वे, विमानतळ, धरणे, अवजड उद्योग यावरील खर्च हा दीर्घकाळ उपयोगी होईल असा असतो.
Fiscal deficit तुटीचा अर्थ संकल्प
जमे पेक्षा खर्च जास्त असेल तर तुटीचा अर्थसंकल्प म्हटले जाते. विकसनशील अर्थ व्यवस्था नेहमी तुटीचा अर्थसंकल्प मांडत असते. त्यात गैर काही नाही. लोकशाही व्यवस्थेत मंतदाराना खुश करण्यासाठी भरमसाठ आश्वासने दिली जातात. त्यातील काहीची पूर्तता करावी लागते. काही अनावश्यक असतात. त्याने आर्थिक विकास साधत नसेल तर तूट नियंत्रणात राहत नाही. मग आर्थिक संकट उभे राहते. त्याची झळ सर्व नागरिकांना बसते. विशेषत: गरीब, मध्यमवर्गाला बसते. ब्राजील, नयाजेरिया, व्हेनेझूएला, श्रीलंका, पाकिस्तान अशी अनेक उदाहरणे आहेत.
तूट भरून काढण्यासाठी दोन मार्ग असतात. कर्ज काढणे किंवा नोटा छापणे. कर्जावरील व्याज हा पुढील अनेक वर्षे बोजा होतो. तर नोटा छापल्याने रुपयाचे मूल्य घटते आणि महागाई वाढते.
या पार्श्वभूमीवर या वर्षीचा अर्थसंकल्प कसं होता हे पाहू या
पुढील वर्षी निवडणुका असल्याने १ फेब्रुवारी २४ ला पूर्ण वर्षाचे अंदाजपत्रक मांडता येणार नाही. म्हणून या वर्षीच्या अर्थसंकल्पात मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन काही घोषणा असतील असा अंदाज व्यक्त केला होता.
ग्रामीण मतदाराला खुश करणारी कर्ज माफी सारखी कोणतीही घोषणा केली नाही. उलट रोजगार हमी योजनेवरील तरतूद कमी करण्यात आली आहे. राष्ट्र उभारणीतील मध्यम वर्गाचे योगदान या बद्दल दोन तीन वेळा उल्लेख केला पण त्यांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घोषणा केली गेली नाही.
भांडवली खर्चात ३५% वाढ केली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरे, विमान तळ, ग्रामीण गृह बांधणी इत्यादीवरील खर्चात मोठी वाढ सुचवली आहे. उद्योगांना आवश्यक कच्चा माल यावरील सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्यूटी कमी केली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम आर्थिक विकास गतीने होण्याकडे होईल मात्र त्याचा प्रत्यय यायला अनेक वर्षे लागतील.
कर विषयक तरतुदी हा अर्थ संकल्पातील एक छोटा भाग असतो पण त्यावरच सर्वात जास्त चर्चा असते.
अर्थसंकल्पाचे दोन भाग असतात. त्यातील पहिलं भाग खर्च कसे होणार याबाबत असतो. अर्थ तज्ञांचे लक्ष त्यावर असते. दूसरा भाग जमा कसे होणार असा असतो त्यातील एक भाग कर विषयक तरतुदी असतात. त्यातीलही प्राप्तीकर विषयक तरतुदी हाच चर्चेचा भाग असतो. माझा असा अनुभव आहे की जर एखादी सूट दिली असेल तर ती दुसऱ्या प्रकारे काढून घेतलेली असते. सूट दिली असेल त्याचा उल्लेख भाषणात होतो मात्र भार वाढविलेला प्रिंट मध्ये समजतो.
आयकर मर्यादा वाढविली, प्रत्येकाला दोन पर्याय दिले आहेत. कोणतीही वजावट न घेता कर भरायचा असेल तर ७ लाख उत्पन्नपर्यंत कर भरावा लागणार नाही. मात्र त्यात अनेक अटी व शर्ती आहेत त्या समजून घेतल्या शिवाय पर्याय निवडू नये. ७ लाखावर उत्पन्न झाले तर एकदम कर दायित्व वाढते. स्वतंत्र व्यावसायिक यांना एकदाच पर्याय निवडता येईल. पर्याय निवडला नाही तर नवीन पद्धत लागू होईल.
४५ दिवसात बिल पैसे दीले नाहीत तर खर्च मिळणार नाही आयकर भरावा लागेल अशी तरतूद केली आहे. याचा फार फायदा होईल असे वाटत नाही. मात्र ऑडिट किचकट होईल.
विमा प्रीमियम आणि परतावा दोन्ही कर माफ असल्याचा दुरुपयोग मोठे करदाते करीत आहेत असे दिसून आल्याने १ एप्रिल २०२३ नंतर घेतलेल्या पॉलिसींचा प्रीमियम दर साल ५ लाख पेक्षा जास्त असेल तर पॉलिसीचा परतावा बोनससह करपात्र होईल.
सर चार्ज धरुन उच्च उत्पन्न गटाला ४२% कर भरवा लागतो. सरचार्ज दर कमी करुन दर ३९% पर्यन्त आणला आहे. सीनियर सिटिजन डीपॉझिट स्कीम मध्ये ३० लाख पर्यन्त गुंतवणूक करता येईल व्याज दर थोडा जास्त असतो.
जीएसटी हा माझा आवडीचा विषय असला तरी अर्थसंकल्पात त्यात काही विशेष असत नाही कारण त्यांचे अधिकार जीएसटी कौन्सिलला दिलेले आहेत. वर्षभर बदल चालू असतात.
कमीत कमी कर दर असतील तर व्यापार सुलभता वाढते असे म्हणत कापड आणि शेतमाल सोडून अन्य वस्तूंवरील सीमा शुल्क २१% वरुन १३% वर आणले आहे. “मेक इन इंडिया” चा सध्या बोलबाला आहे. गेल्या ४/५ वर्षात मोबाइल निर्मिती क्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. दूरदर्शन संच निर्मिती या क्षेत्रात मोठी संधी आहे या क्षेत्राना लागणारे कॅमेरा, लीथीयम बॅटरी, पॅनल सेल्स् इ. वस्तु वरील सीमा शुल्क कमी केले आहे. तसेच या क्षेत्राला लागणाऱ्या भांडवली वस्तु यांना सीमा शुल्कात सूट दिली आहे. तयार वस्तूंवर जास्त दराने सीमा शुल्क तर कच्चा माल यावर सूट देऊन देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा उद्देश स्पष्ट दिसतो.
अभिप्राय
उज्वल भविष्याची आशा आणि आकांक्षा असणारा व खर्च करण्यास मागे पुढे न पाहणारा वाढता मध्यम वर्ग आणि त्याला सहाय्यभूत उद्योगक्षेत्र याला डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा मुहूर्त साधून व्यापार आणि मागणी वाढीस चालना देण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
आपले सरकार २०२४ मध्ये निवडून येणार याची खात्री आहे म्हणून अल्प मुदतीचा विचार न करता दीर्घ कालावर नजर ठेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षात नागरिकांना अमृतकुंभ दिला आहे असे म्हटले तर योग्य होईल.
मी 1956 साली पुण्यात आलो. त्याच्या अगोदर ठाण्यात रहात होतो. वडिलांची बदली झाल्यानंतर पुण्यात आलो.
ठाण्यात असताना पायी चालणे हेच प्रवासाचे मुख्य साधन होते. सायकल ही एक हौसेची गोष्ट असे, किव्वा ती एक सधनतेचे लक्षण असे.
पुण्यात आल्यावर सायकल हे एक गरजेचे वाहन आहे हे लक्षात आले. ठाण्यात असताना गावाच्या दुसर्या टोकापर्यंत झपाझप चालत जात असे, पण पुण्यात आल्यावर शंभर फुटावरील वाण्याच्या दुकानात सुद्धा सायकलीवरून जाणे होत असे.
पुण्यात असताना माझी शाळा सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूल ही होती. पुण्यात येण्यास उशीर झाला म्हणून मला बाकिच्या शाळेत प्रवेश मिळेना. माझे एक चुलते लक्ष्मण देशपांडे मास्तर गोपाळ हायस्कूल चे प्रमुख व संस्थापक असल्यामुळे दोन महिने उशीरानेसुद्धा मला शाळेत प्रवेश मिळाला. मी त्यावेळेस विजयानगर कॉलनीत रहात होतो. खरेतर गोपाळ हायस्कूल घरापासून फार दूर नव्हते. ठाण्यात माझी शाळा साधारण पणे एव्हढीच दूर होती. तिकडे मी चालत जात असे. परन्तु पुण्यात मात्र शाळेत सायकलीवरून जाणे होत असे.
पुणेरी कडक उन्हाळा मला नवाच होता. कधी पाऊस सुरू होणार असे व्हावयाचे. मे महिन्यातील वळवाच्या सरी कोसळल्यावर किंवा पावसाळ्यात जर कदाचित मुसळधार पाऊस पडला तर सायकलवर स्वार होऊन टिळक रोड वरून तुफान वेगात सगळा सदाशिव पेठ पालथा करीत ओलेचिंब भिजण्यास जी मजा यावयाची ती अपूर्व च होती.
त्यावेळेस पर्वती वर जाण्यास सरळ मार्ग नव्हता. कॅनॉल वर एक लोखंडी पूल होता. पेशवे पार्क वरून सिंहगड रोड ओलांडल्यावर एक लोखंडी जिना लागत असे. सायकल हातात घेऊन किंवा खांद्यावर चढवून तो जिना पायी चढून पर्वती गावातून सायकलीवरून जावे लागे. दुसरा मार्ग म्हणजे टिळक रोड वरून स्वार गेट गाठायचे व सातारा रोड वरून सघ्या च्या मित्र मंडळ रस्त्यावरून पर्वतीला जायचे. त्यावेळेस हा रस्ता कच्चा आणि खडबडीत व निर्मनुष्य असे. त्यामुळे हा रस्ता त्याचबरोबर सातारा रस्त्यावरील साईबाबाचे मंदीर कॉलेज आणि शाळांतील मुलामुलींचे अत्यंत आवडती ठिकाणे होती. त्यावेळेस मैत्रिणीबरोबर समांतर आणि कमी अंतर ठेवून सायकल चालवणे ही एक स्वतंत्र कलाच होती. अर्थात त्यावेळेस मैत्रीण असणे सुद्धा खूप दुर्लभ असे.
सायकलीवरून मैत्रीणीच्या घराभोवती फेऱ्या मारण्याचा आनंद आणि उत्कंठा वेगळीच असे. अनेक फेऱ्या नंतर मैत्रिणीने दारात उभी राहून किंवा खिडकीतून पोच पावती दील्यानंतरची धन्यता वेगळीच.
काहीजण समुहाने सायकल चालवत असता शिताफीने शेजारच्याला पुढील चाकाचा धक्का देऊन पाडण्यात निष्णात असत. तसे करण्यात त्यांना कसला कृर आनंद होत असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. माझ्यावर असे बरेच प्रयोग झाले. कदाचित त्यात असुया सुद्धा असु शकेल. वयाच्या 15-16 व्या वर्षी मित्रांबरोबर सिंहगड रोड वरून सायकलीवरून सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाऊन, पायी गड चढून जाण्यात आणि परतीच्या वाटेने पुण्याला येण्यात जे साहसी समाधान वाटत असे ते वेगळेच.
पुण्यातील तीन वर्षाचे शालेय व कॉलेज शिक्षण संपल्यावर पुढील शिक्षणाकरता मुंबईला जाणे झाले व माझा सायकलीशी संबंध संपला. पुढे यांत्रिक दुचाकी व मोटार गाडी वगैरेने प्रवास चालू राहीला. परन्तु पूर्वीचा सायकलवरील प्रवासाचा आनंद कधीच परत मिळाला नाही.
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील नवम स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच नववी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच नेप्च्यूननंतर येणारा ग्रह हर्षल आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील अष्टम स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील नवम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
९) नवमस्थान (भाग्यस्थान):
भाग्य प्रभाव गुरु धर्मतपः शुभानि
संचितयेत् नवमदेव पुरोहिताभ्यो ॥
धर्मक्रियायांहि भवेत्प्रवृत्तिभाग्योपपत्ति विमलंच शीलम्
तीर्थ प्रयाण प्रणयपुराणे: पुण्यालये सर्वमिद प्रदिष्टम् ॥
पत्रिकेतील सर्वात शुभ स्थान मानलेले आहे. शून्यातून काहीतरी निर्माण करण्याचे सामर्थ्य या स्थानावरून समजते. या स्थानात पापग्रह जरी असले, तरी ते चांगलेच वागताना दिसतात. या स्थानात पापग्रहांचा वाईट प्रभाव काम करत नाही.
नवम स्थान हे आशावादी स्थान आहे. ह्या स्थानावरुन पुण्यकर्म, तीर्थयात्रा, देवधर्माची आवड, अध्यात्मिक आवड, तत्त्वज्ञानाची आवड, दृष्टांत, साक्षात्कार, उपासना, आध्यात्मिक बल, सामाजिक संस्थेतील कार्य, परोपकार, या सर्व गोष्टींचे आकलन होते.
भाग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थानआहे. उच्च प्रकारचे सुख, राजदरबारी मिळणारे यश, होणारे सत्कार या स्थानावरून पाहतात.
वैचारिक, बौद्धिक सृजनशीलता ज्यात भव्यता आहे पांडित्य आहे असे लिखाण, तृतीय स्थानाचे विशाल मोठे स्वरूप असे म्हणता येईल. परदेशगमनयोग, तसेच दाक्षिणात्य पद्धती मध्ये वडिलांचे सौख्य सुद्धा नवम स्थानावरून अभ्यासतात.
आता आपण १२ राशींमधील नववी धनु रास पाहूया.
९) धनु रास:
राशीस्वामी गुरु आहे. द्वीस्वभावी रास आहे. अग्नितत्वाची आणि पुरुष रास आहे. अग्नितत्वातील चांगले गुण आहेत. निष्कारण भांडखोरपणा नाही. थोडी धरसोड वृत्ती असते. नैसर्गिक कुंडलीत ९व्या स्थानावर ही रास असते. त्यामुळे गुरुचे पूर्ण गुण या राशीत दिसतात. अग्नितत्वाची रास असूनही या राशीचे लोक अतिशय प्रेमळ असतात. दुसऱ्यांना मदत करणे हे या लोकांचे अतिशय आवडते काम असते. राशीस्वामी जरी गुरु असला तरी आयुष्य आनंदाने enjoy करतात. Sports ची आवड आहे. तसेच खिलाडू वृत्तीपण आहे. क्षमाशील आहेत.
(मेष राशीचे लोक दुसऱ्याच्या हातून चुकले तर त्याला उडवून लावतील. सिंह राशीचे लोक शिक्षा करतील तर धनु राशीचे लोक क्षमा करतील.) जेव्हा ग्रह बिघडलेले असतात, तेव्हा हे लोक काही वेळा जुगार, betting करतात. पण जर गुरु उत्तम असेल तर सदाचारी, सत्शील, व्यक्ती असते आणि जर गुरू बिघडले असेल तर (म्हणजे शत्रुराशीत कींवा नीच राशीत) easy money च्या मागे लागतात.
ही रास अर्धा माणूस व अर्धा घोडा (पशु) अशी आहे. या राशीच्या व्यक्ती सशक्त असतात. गौर वर्ण असतो. उंची मध्यम असते. यांच्या भुवया अतिशय कोरीव असतात. यांचे buck teeth मोठे असतात. राशीचा अंमल मांड्यांवर असतो. स्वामी गुरू असल्याने चरबीवर अंमल दिसतो. Fat होण्याची प्रवृत्ती असते. ही पित्त प्रकृतीची रास आहे. त्यामूळे पित्ताशयाचे आजार पण दिसतात.
या लेखातील पुढील भागात आपण हर्षल या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
९) हर्षल :- १३ मार्च १७८१ ला "विल्यम हर्षल" यांनी हर्षल चा शोध लावला.
हा उशिरा शोधलेला ग्रह आहे.
हा खूप मोठा ग्रह आहे. तसेच तो खूप दूर ही आहे. याचे कारकत्व किंवा intensity खूप असते. याच्या कारकत्वाचा काळ खूप कमी असतो. पण याच्यामुळे जो परीणाम होतो, तो मात्र खूप काळ पर्यंत जाणवतो. याच्यामध्ये suddenness आहे. After effect आयुष्यभर राहतात. शक्यतो त्रासदायकच गोष्टी असतात.
मंगळ व बुधाचे गुण एकत्र करून, त्याची intensity आठपट वाढवली तर हर्षल होईल असे म्हणता येईल. मंगळाप्रमाणेच हा स्फोटक आहे. प्रचंड कार्यशक्ती आहे. Impatient आहे. तसेच मंगळाप्रमाणेच सत्व आहे. न्याय आहे व लढवय्या वृत्ती पण आहे.
बुधा प्रमाणे अफाट बुद्धीमत्ता Extraordinary Brilliance, Grasping, memory, Logic व creativity या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या आहेत.
हर्षल कडे instant response आहेत. म्हणजेच राग, लोभ, दुःख,या सर्व गोष्टी पटकन दाखवतात.
संशोधनासाठी लागणारी बुद्धिमत्ता, त्यासाठी लागणारी चिकाटी, या गोष्टी हर्षल कडे आहेत. अत्यंत शिस्तीचा ग्रह आहे. systematically काम करणारा ग्रह आहे. Latest technology हर्षलच्या कारकत्वात येते. अत्यंत स्वतंत्र बुद्धीचा ग्रह आहे. कोणत्याही वस्तुचा /गोष्टीचा त्याच्यावर परीणाम होत नाही. उच्च दर्जाची कला ही हर्षलच्या कारकत्वात येते. हा नविन विचारांचा ग्रह आहे. Common गोष्टींपेक्षा १५-२० वर्षांपूढच्या culture चा विचार हर्षलच्या व्यक्ती आत्ता करत असतात. त्यामुळे त्याला 'वेडा महम्मद' पण म्हणतात.
हर्षल हा विचित्र / whimsical आहे. अफाट बुद्धीमत्तेची लोकं अशीच असतात. स्वतंत्र विचारांचे असल्यामुळे रूढी परंपरा Follow करतीलच असे नाही. प्रत्येक गोष्ट बौद्धिक निकषांवर तपासून बघणार आणि मगच पुढे जाणार अशी वृत्ती असते.
मंगळाबरोबरचा हर्षल हा स्फोटक योग मानला जातो. ज्या ग्रहांच्या बरोबर हर्षल येतो, तो त्या ग्रहांच्या फलांना boost up करतो. मग चांगल्या ग्रहांबरोबर चांगली फळे तर वाईट ग्रहांबरोबर वाईट फळे देतो. हर्षल म्हणजे total दादागिरी असते असे म्हणता येईल.
स्फोटके घडवणारा आहे, की त्यात suffer होणारा/ करणारा आहे,
हे कोणत्या स्थानात हर्षल आहे त्यावरून ठरते. चतुर्थात मंगळ- हर्षल युती ही घर / कुटुंब यातील mishap दाखवते.
स्वरूप :- हर्षल चे डोळे घारे आहेत. Piercing eyes म्हणता येतील. विरळ आणि पिंगट केस आहेत. हा गोरा ग्रह आहे. तसेच अग्नितत्वाचा आणि पुरुष ग्रह आहे यामुळेच याच्याकडे भडकणे / रागावणे या भावना खूप जास्त आहेत.
क्रमशः
मंडळी,
आपण जो कुठला पेहराव करतो त्याचा प्रभाव नकळत समोरच्या व्यक्तीच्या मनावरती पडत असतो, आणि त्या व्यक्तीच्या आपल्या बरोबरच्या इंटरॅक्शन वरती सुद्धा याचा परिणाम होत असतो. समजा आपण जूनकट गबाळे कपडे घालून एखाद्या दुकानात गेलो आणि त्याचवेळी तिथं टापटीप असलेली एखादी व्यक्ती आली तर नकळत दुकानदाराचे मन त्या व्यक्तीला अधिक महत्त्व देते आणि त्या व्यक्तीची ऑर्डर प्रथम पूर्ण केली जाते आणि आपल्याकडे दुर्लक्ष होते.
आता याचा थोडासा परिणाम आपल्या स्व-प्रतिमेवर पण होऊ शकतो कारण असे वारंवार घडले तर "या जगात मला कोणी किंमत देत नाही" असा विचार दृढ होऊ शकतो. याउलट सतत योग्य पेहराव केलेल्या व्यक्तीला जगाकडून तुलनेने उत्तम ट्रीटमेंट मिळते आणि त्या व्यक्तीची स्वप्रतिमा अजून चांगली होण्यास याची मदत होते. तेव्हा इथून पुढे कपाट उघडून हाताला लागतील ते कपडे न घालता उत्तम दिसतील तेच कपडे घालणं योग्य.
१९ फेब्रुवारी २०२३
तनभी तंदुरुस्त मनभी तंदुरुस्त
तळजाई येथे फिटनेस फेलोशिप
१९ फेब्रुवारी रोजी तळजाई येथे फिटनेस फेलोशिप आयोजित केल्याबद्दल गौरीचे खूप खूप आभार. चालणे आणि त्यानंतर स्ट्रेचिंग व्यायाम,मंत्रोच्चार...... खूप मजा आली
२६ फेब्रुवारी २०२३
हेरिटेज वॉक
Thank you Rtn. Gouri khirsagar for wonderful heritage walk.
Thank you President Sanjeev for delicious brunch. Enjoyed every moment of Sunday morning.
Looking forward to seeing many more heritage places.
🌹🙏🙏🌹
डोळ्याची मोफत शस्त्रक्रीया प्रकल्प
मी, प्रभाकर गणपत मांजरेकर, पत्ता:लेन नं. 43 गणेश मंडळ, जनता वसाहत,पर्वती,पुणे,411009 आपणास सांगू इच्छितो कि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या सहकार्यने दिनांक 11/02/2023 रोजी H.V. Desai EYE CARE CENTRE ,मोहम्मदवाडी पुणे येथे माझ्या डाव्या डोळ्याचे शस्त्रक्रीया मोफत आणि अतिशय सुरळीत झाली.हॉस्पिटल स्टाफने खूप छान प्रकारे सेवा दिली.त्याच प्रमाणे अम्हाला वेळावेळी मदत करणारे व मार्गदर्शन करणारे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे सदस्य माननीय हेमंत वाळिंबे सर आणि पाषाणकर सर यांचे खुप मोलाचे सहकार्य मिळाले, म्हणूनच हे आम्हाला शक्य झाले आहे.हेमंत वाळिंबे सरांचे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांचे माझ्याकडुन माझ्या मांजरेकर परिवाराकडून आभार व धन्यवाद असेच आपले काम मोठ्या शिखरावर जावे हिच अपेक्षा व खुप खुप शुभेच्छा.
१२ फेब्रुवारी २०२३
सुंदर घरकूल स्पर्धा
प्रत्येकाला वाटत आपल घर सुंदर असावे. गाव काही त्याला वेगळं नाही. गेले दोन वर्ष पाऊलवाट आणी रोटरी क्लब पुणे साऊथ च्या वतीने हा कार्यक्रम आमच्या अठरा गाव मावळ मधील शेवटच्या गावात घेत आहोत. संडास बाथरूम, सांडपाणी नियोजन. जाळ्या, स्वयंपाक घर आदी सगळे पाहिले जाते. रोटरी ची महिला वर्ग आवरजून सगळे येतात आणि पाहतात. ग्रामीण महिला चार चार दिवस घर रंग , सारवणे आवरजुन करतात. 140 घराणी सहभाग नोंदवला. दर्या खोऱ्यात राहणाऱ्या माझ्या बांधवांना एक आनंदी दिवस ह्या निमित्ताने मिळतो. अतिशय सुंदर. पाऊलवाट आशिष. रोटरी साऊथ चे विशेष आभार
बुधवार दिनांक २२ फेब्रुवारीला झालेल्या इको क्लबच्या साप्ताहिक सभेत मी स्वतः 'देशी झाडांचे महत्व' समजावून सांगताना विदेशी झाडांचे तोटे अधोरेखित केले. गुलमोहोर, सप्तपर्णी, निलगिरी यांसारखे वृक्ष विदेशी आहेत ह्याची अनेकांना कल्पना नव्हती. त्याचे तोटे लोकांना आता लक्षात येऊ लागले आहेत.
कार्यक्रमात मुलांचा सहभाग उत्साहवर्धक होता. त्यांना यातून निश्चितच उपयुक्त माहिती मिळाली.
मीही या निमित्ताने व्याख्यान देण्याचा आनंद अनुभवला.
Our group organized a special visit with Borderless world Foundation's Kashmiri girls tour of Pune METRO 🚇 STATION.
DG Dr. Anil Parmar & P.P.Rtn. Viren Shah were also joined kids during this visit.
१ मार्च २०२३
इको क्लब प्रोग्रॅम
13 February 2023
Assimilation Committee Meeting to welcome new and prospective members
Very well arranged orientation and assimilation program led by chairperson Ann Aparna Kulkarni. All our senior Rotarians have indeed explained very well to these prospective and new members. All these members later expressed that todays event made them feel at home in the club and they are quite inspired to be actively involved.
Well done Assimilation and Membership committee. Thank you to the PP Rtn Sham Kulkarni, PP Rtn Govind Patwardhan, PP Rtn Sandeep Vilekar and all the members.
- वक्त्यांचे नाव
ॲन प्रतिमा दुरुगकर - घोषणा, सत्कार, कौतुक ई.
- उपस्थित असलेले मान्यवर/ डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स
- - पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या सदस्याचे नाव
ॲन गौरी क्षीरसागर
- कार्यक्रमाचा सारांश
6 फेब्रुवारीला आपल्या क्लब मध्ये इंडोलॉजिस्ट प्रतिमा दु रूगकर आल्या होत्या. सिल्क रूट म्हटले की आपल्यासमोर चीन आणि रोम फार तर इजिप्त येथील व्यापार येतो. परंतु भारताचा त्यात असलेला सहभाग सांगणे हा महत्त्वाचा हेतू ह्या व्याख्यानाचा होता. या व्याख्यानाची तीन भागात विभागणी केली होती. पहिला भाग पर्शिया, दुसरा चीन आणि तिसरा इंडो रोमन ट्रेड असा होता. त्यापैकी पर्शियामध्ये इ.स पाचव्या आणि सहाव्या शतकात व्यापाराचे जाळे कसे निर्माण झाले होते याची माहिती मिळाली. त्यानंतर चीनने यात कशी उडी घेतली व चीनकडून रोम कडे जाणारा मार्ग कसा बांधला याची मनोरंजक व पुराव्याच्या आधारे माहिती मिळाली. हे सर्व ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे कार्यक्रमात रंगत भरली. इंडो रोमन ट्रेड मध्ये इ.स पहिल्या शतकात लुटारुंचा त्रास वाढल्यामुळे त्यानंतरच्या काळात भारताला या व्यापारात यायची संधी मिळाली आणि भारताने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. चीनने काश्मीर व सिंधू नदीच्या काठाने भारतात माल पाठवायला सुरुवात केली आणि भारतातून भडोच कल्याण सोपारा या बंदरातून माल रोम कडे जाऊ लागला. हे भारतीय इतिहासातील सुवर्णयोगच होते हे लक्षात आले. हे सुवर्णाचे पान आपल्यासमोर प्रतिमा दुरूगकर यांनी उलगडून दाखवले आणि त्याचा खरोखर सार्थ अभिमान वाटला. - आभार प्रदर्शन करणाऱ्या सदस्याचे नाव : ॲन गौरी क्षीरसागर
- उपस्थित असलेल्या रोटेरिअन्सची संख्या : 21
- उपस्थित असलेल्या ॲन्स/स्पाऊसची संख्या: 16
१३ फेब्रुवारी २०२३
रो. अमृता देवगावकर असिस्टन्ट गव्हर्नर यांची विझिट
- वक्त्यांचे नाव
पास्ट प्रेसिडेंट रो. गोविंदराव पटवर्धन - उपस्थित असलेले मान्यवर/ डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स
पास्ट् डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. भाऊसाहेब कुदळे आणि ॲन शोभाताई कुदळे - पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या सदस्याचे नाव
प्रेसिडेंट रो. संजीव ओगले
- कार्यक्रमाचा सारांश
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेक्रेटरी रो. अभिजित देशपांडे यांनी क्लब मधील ज्या सभासदांनी आजपर्यंत डिस्ट्रिक्ट ३१३१ चे ॲप डाऊनलोड केले नव्हते, त्यांना ते डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यानंतर नवीन सभासदांची ओळख करून देण्यात आली. त्यासाठी Membership Director रो. विरेनभाई शाह आणि chair person रो. हेमंत वाळिंबे यांनी विशेष मेहनत घेतली.
ह्या कार्यक्रमा नंतर पास्ट् प्रेसिडेंट रो. गोविंदराव पटवर्धन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ विषयी माहिती दिली. शासन व सरकार यामधील फरक सांगून यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये असलेल्या प्रमुख तरतुदी सांगून त्यावर आपले मत मांडले.
गोविंदरावांचे या विषयातील प्रभुत्व सर्वांनाच माहित असल्यामुळे सभासदांनी अनेक प्रश्न विचारले. 'अर्थ' असलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुफळ झाला. - आभार प्रदर्शन करणाऱ्या सदस्याचे नाव: पास्ट प्रेसिडेंट रो सुदर्शन नातू
- उपस्थित असलेल्या रोटेरिअन्सची संख्या: 25
- उपस्थित असलेल्या ॲन्स/स्पाऊसची संख्या: 20
27 February 2023
DG Rtn. Dr. Anil Parmar's visit to RCPS.
Board of Directors, Chairpersons, Rotarians, Ann's, spouses, and New Club Members, thank you for taking time out of your busy schedule to attend the DG Visit meeting. Throughout this year 22-23, all your guidance and support have really helped our club achieve the set targets. 🙏🙏 Your warmth, love and and enthusiastic participation have added to the volume of projects and programs completed, which are in the truest sense, Service Before Self. A Big thank you to PDG Bhausaheb Kudale and Ann Shobhatai who always support and guide our club members. In addition to our contribution to society, we all the members of rotary, must have fun and enjoy rotary. Thus the next few months we must get more friends, bring them to Rotary and let's target 100 Rotarians, if not in RY 22-23, then definitely in RY 23-24. We are truly inspired by you all🙏🙏Thank you once again. We look forward to seeing you every Monday😊🙏🙏.
Thank you for the love hospitality and care during our visit Congratulations and best wishes to you and your club 💐💐💐🙏