Congratulations Dr. Saurabh Jambhekar, Son-in-Law of Rtn. Shrikant and Ann Saee Paranjape for being officially absorbed in the Senate (governing body) of the The Royal Academy of Music, London and being conferred the title of “Lord”. Hereon he would be addressed as Lord Saurabh R. Jambhekar and his wife as Lady Shweta S. Jambhekar.
We are proud of Saurabh and wish him all the best for the future.
P.P. Rtn. Dr. Rajendra Gosavi participated in Cleft Lip and Palate Surgery Camp at Solapur, organised by The Rotary Club of Solapur North. A great gesture and example of service by vocation.
आपले मानद सभासद श्री. अधिक कदम यांच्या बॅार्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने बी एस् एफ् च्या जम्मु काश्मीर येथील जवानांना सहकार्य करण्यासाठी ३ जिवनदायिनी रुग्णवाहीका पुण्यातुन पाठवण्यात आल्या. बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी नांदेड सिटी येथील श्री स्वामी समर्थ महाराज व श्री महाअवतार बाबाजी मठ येथे उपस्थीत मान्यवर व माता भगिनींच्या हस्ते पुजन करुन या रुग्णवाहीका दिल्ली कडे रवाना करण्यात आल्या. या आधी संस्थेने 21 अँब्युलन्स दिल्या आहेत
नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मा. नितिनजी गडकरी यांच्या निवासस्थानी बी एस् एफ् च्या अधिकार्यांकडे या रुग्णवाहीकेंचे हस्तांतरण करण्यात येईल.
रोटरी काव्य स्पंदन स्पर्धा याच्यामध्ये आपल्या रोटेरियन श्वेता करंदीकर हीने भाग घेतला होता व त्यात तिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. श्वेताचे आपल्या क्लब तर्फे मनःपूर्वक अभिनंदन !
आपल्या या महिन्यातील पूर्णांगिनीचे नाव आहे Past President रोटेरियन सोनल पटवर्धन. पूर्वाश्रमीच्या स्नेहल गाडगीळ ते आताच्या पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सोनल पटवर्धन हा प्रवास कसा झाला हे या मुलाखतीद्वारे आपण जाणून घेणार आहोत.
एक स्वतंत्र विचारांच्या,स्पष्टवक्ता अशा, सोशल वर्कची आवड असणाऱ्या तसेच by प्रोफेशन बांधकाम साहित्य व्यावसायिक, उत्तम counsellor, एक संवेदनशील आई आणि dashing व्यक्तिमत्व असलेल्या सोनलताई. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांचे विचार, त्यांचे समाजकार्य या विषयी आपण जाणून घेणार आहोत.
मी जेव्हा या interview साठी त्यांना विचारलं, त्यावेळेस त्या खूप positively हो करूया की असे म्हणाल्या. मग एक दिवस ठरवून आम्ही इंटरव्ह्यूसाठी भेटलो. योगायोगाने त्या वेळी माझी त्यांच्या मुलीशी म्हणजे अमृताशी पण भेट झाली आणि थोडंसं तिच्याकडून तिच्या आईबद्दलच्या भावना काय आहेत याबद्दलही जाणून घेता आलं.
यामिनी: सोनलताई, सुरुवातीला तुमचं लहानपण कसं गेलं याबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे तुमच शिक्षण कसं आणि कुठे झालं याबद्दल थोडी माहिती द्या ना..
पी.पी.रो. सोनल: माझं लहानपण गोव्यात गेलं. माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही गोव्यात होतो. माझी आई त्यामानानं खूप लवकर गेली म्हणजे मी अकरा बारा वर्षाचे असताना माझी आई गेली. माझ्या वडिलांचा बिझनेस होता त्यामुळे मी, माझा भाऊ आणि वडील असे तिघे होतो. पुढे माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. बऱ्यापैकी सधन आयुष्य असलं तरी इमोशनली deprived आयुष्य होतं. कशाची कमतरता नव्हती. पण वडील खूप कडक होते, डॉमिनेटिंग होते आणि खूप हुशार ही होते. पण मला कायमचा फील राहीला की माझ्या आईला मी सपोर्ट करू शकले नाही. त्यामुळे तेव्हापासून माझ्या डोक्यात हे नक्की होतं की मी मोठी झाले की बायकांसाठी नक्की काहीतरी करेन. काय करेन? कुठे करेन? कसं करेन? हे माहित नव्हतं पण करायचं नक्की होत. आपण आपल्या आईला मदत करू शकलो नाही पण ज्या खरच गरजू बायका आहेत त्यांना मदत नक्की करायची त्यावेळेला मनाशी पक्क केलं होतं.
यामिनी: खूपच चांगले विचार आहेत हे. सोनल ताई, स्नेहल गाडगीळ ते सोनल पटवर्धन हा तुमचा प्रवास कसा झाला आणि तुम्ही पुण्यात कधी आलात?.
पी.पी.रो. सोनल: ग्रॅज्युएशन नंतर मी मुंबई मध्ये नोकरी करत होते. आमचा पार्ल्यामध्ये फ्लॅट होता आणि वडील तेव्हा बहारीन ला गेले होते. त्यामुळे मला आणि भावाला पार्ल्यात ठेवलं कारण शेजारीच मामा राहत होता. त्यामुळे मग सेफ्टी चा विचार करून आम्ही पार्ल्यात राहत होतो. सुरवातीला मी एका garment factory मध्ये नोकरी केली आणि नंतर एका आर्किटेक्ट कंपनीमध्ये एक्झिक्युटिव असिस्टंट म्हणून काम करत होते. तसं बघायला गेलं तर माझे शिक्षण इंजिनिअरिंग क्षेत्रातले नाही. I am a graduate of Philosophy and Psychology. परंतु माझे वडील गोव्यामध्ये प्रथितयश कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करून करून साईट कशा सांभाळायच्या, पेमेंट कशी द्यायची आणि एकूणच बांधकाम क्षेत्रामध्ये काम कसं चालतं याबद्दल ची सगळी माहिती मला चांगल्या पद्धतीने होती. कामाच्या निमित्ताने जेव्हा मी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत होते मुंबई-पुणे वगैरे, तेव्हा १९८२ साली मी आणि महेश आम्ही पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटलो. तो मुंबईला यायचा सेक्रेटरिएट मध्ये, त्याच्या वडिलांच्या कामासाठी. त्याचं ऑफिस तेव्हा V.T. ला होतं जे माझ्या ऑफिस पासून जवळच होतं. तो मुंबईला पोहोचायचा तोपर्यंत ऑफिस उघडलेलं नसे. त्यामुळे आम्ही कित्येक वेळेला तेव्हा भेटायचो. नंतर कधी जेवायला जायचो. अशा आमच्या भेटी वाढत गेल्या. त्यानंतर जवळजवळ दोन वर्ष आम्ही भेटत होतो. आम्ही जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही घरातून विरोध होता. त्याच्या घरातून अशासाठी की मी त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. आणि माझ्या घरातून अशासाठी की मी खूप स्वतंत्र विचारात वाढलेली आहे, नॉनव्हेज खाणारी आहे आणि “I came from a very modern family and he is from orthodox family”. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे दोन्ही घरातून आमच्या लग्नाला मान्यता दिली आणि मगच आम्ही १९८४ साली लग्न केले. आणि मी पुण्यात आले.
यामिनी: पुण्यात आल्यानंतर तुम्ही तुमचं करिअर कसं केलं?
पी.पी.रो. सोनल: माझं शिक्षण आणि तेव्हाचं कंस्ट्रक्शन लाईन मधील करियर हे कनेक्टेड नव्हतं. पण हिशोबाच्या बाबतीत मी फार पक्की होते. म्हणजे maths मध्ये मी खूप great नसले तरी हीशोबाच्या बाबतीत मी खूप चोख होते. खरंतर आम्ही आधी ठरवलं होतं की मी सोशल वर्क करेन आणि घर सांभाळेन. आणि महेश बिझनेस सांभाळेल. पण साधारण सहा महिन्यात असं लक्षात आलं की बिझनेस मध्ये घरचं कोणी तरी हिशोब बघणारे पाहिजे. आणि मी ऑफिसमध्ये बसायला सुरुवात केली आणि हळूहळू चुंबकासारखी मी ऑफिसच्या कामांमध्ये गुंतत गेले आणि जवळजवळ तीस वर्ष मी यामध्ये करिअर केलं. फॅक्टरी चालवली. एक नक्की माहीत होतं की आपला हुकमी एक्का काय आहे. कोणती अडचण आली तर कोणाला विचारायचं ह्याची पूर्ण कल्पना होती. समजा स्लॅब टाकायची आहे तर आरसीसी डिझायनरला कधी विचारायचं, कधी बोलवायचं किंवा काय घडलं तर कुणाशी बोललो तर आपलं काम होईल हे नक्की माहीत होतं. आपल्याकडे खूप लोक ही चूक करतात की एखादी अडचण आली की प्रेमाच्या माणसांना विचारतात पण त्यासाठी experts पण असतात, त्यांना विचारलं पाहिजे आणि तेच मार्ग काढून देऊ शकतात हे मला माहीत होतं. आणि I am very particular in that. कारण माझ्या आईला जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे नेले, त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की you are too late आणि तिथून माझ्या डोक्यात पक्क बसले की आपल्याला जर एखादी गोष्ट होत असेल तर इकडे तिकडे न विचारता त्यातल्या expert चा सल्ला घ्यायचा.
बरं एखादी गोष्ट समजा येत नसेल तर ती मला येत नाही हे सांगायची कधी लाज वाटली नाही किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी सुद्धा कधी लाज वाटली नाही. फॅक्टरीमध्ये गरज पडली तेव्हा मी ट्रक सुद्धा चालवलेला आहे. भले मी रस्त्यावर नाही घेऊन गेले. फॅक्टरी फॅक्टरीतच चालवला पण त्या वेळेला ती ट्रक ड्रायव्हरचे माज उतरविण्यासाठीची गरजेची गोष्ट होती. पण तीही मी केली. कारण माझ्या मध्ये तेवढे guts होते.
यामिनी: तुम्ही करिअर, तुमचं घर, संसार हे कसे मॅनेज केलं?
पी.पी.रो. सोनल: मला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी आणि तिच्या पेक्षा पाच वर्षांनी लहान मुलगा.
मी माझ्या तीस वर्षाच्या फॅक्टरी करियर मध्ये सहा सहा महिने फक्त मुलं झाल्यानंतर घरी राहिले. पण मी तेव्हा कौन्सिलिंग पण करत होते आणि नारी समता मंच चे कार्यक्रम पण करत होते. याच संस्थेचे Destitute Women's Home पण पाच वर्ष चालवले. पण त्या काळात कधी भिशी, नाटकाला जाणं, सिनेमाला जाणं हे काही करत नव्हते. मुलं लहान असताना माझ्या सासूबाई घरी असायच्या. त्या त्यांच्याकडे लक्ष द्यायच्या. आणि त्यांच्या मदतीसाठी घरी नोकर चाकर पण होते. माझ्या नवऱ्याने मुलांसाठी भरपूर वेळ दिलेला आहे. मुलं लहान असताना त्यांच्याकडे बघणं, त्यांच्यावर प्रेम कारण यासाठी मला कधी सांगायला लागले नाही. बर्याच जणांना तो प्रॉब्लेम असतो की नवरे लक्ष देत नाहीत. किंवा नवऱ्याला माहीतच नसतं. पण आमच्याकडं तो प्रॉब्लेम कधीच आला नाही. आमच्यात म्यूच्यूअल अंडरस्टँडिंग खूप चांगलं होतं. तो म्हणायचा की मला सोशल वर्क जमणार नाही. नारी समता मंच चे काम, जे तू करतेस ते मी करणार नाही. पण मी मुलांकडे बघेन आणि त्याचा मुलांच्या बरोबर खूप छान bond आहे.
यामिनी: तुम्ही counselling चे काम कधी चालू केले?
पी.पी.रो. सोनल: लग्न करून पुण्यात आल्यानंतर मी कोणालाच ओळखत नव्हते आणि नुसत घरात बसण्याचा माझा पिंड नाही. मग पुण्यात ओळखी कशा होतील? तर मी सगळ्या कार्यक्रमाला जायला लागले. मी खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करत होते, अटेंड करत होते. म्हणजे कुकिंग क्लासेस असतील गाण्याचे कार्यक्रम असतील. त्याला अस स्ट्रक्चर नव्हतं आणि अशाच एका कार्यक्रमात पुढे मला विद्या बाळ भेटल्या. त्यांना मी म्हंटलं विद्या ताई, मला काय करायचय, कसं करायचय माहीत नाही पण मला बायकांसाठी काहीतरी काम करायचं आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या या सेंटरवर आणि मी सेंटर वर जायला लागले. तिथल्या कौन्सिलर च्या हाताखाली काम करून करून मी कौन्सिलिंग पण शिकले. मी पण कौन्सिलिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्याबरोबर एक वकील पण असायचे आणि मग कधी पोलीस स्टेशन ला जाण कधी burn wards मध्ये जाणं हे चालू झालं. पण त्या वेळेला हे कळलं की फक्त atrocity against woman ह्याचा काही उपयोग होत नाही. त्या आधीच त्यांना सुधारायला पाहिजे. अशातूनच मग फॅमिली कौन्सिलिंग, प्री-मॅरिटल कौन्सिलिंग हे चालू केल. त्याच बरोबर इंडस्ट्रियल कौन्सिलिंग वाचन मी खूप केलं पण मी यामध्ये फार परीक्षा नाही दिल्या कधी. परीक्षा देऊन कौन्सिलिंग येतं यावर माझा विश्वास नाही. मी प्रॅक्टिकल कौन्सिलिंग वर भर दिला. व्यवसाय, घर, मुलं सांभाळून जेवढे करता येईल तेवढे कौन्सिलिंग केल. मी पोलीस सेल मध्ये पण होते. कित्येक वेळेला रात्री उशिरा पोलीस व्हॅन घरी यायच्या. करण बर्न वॉर्डमध्ये तिकडे जबाब नोंदवून घ्यायला महिला सोशल वर्कर लागायची. अशा वेळेस मला जावे लागे. त्या काळात लोकांना असे वाटत असे की अरे यांच्या घरी रात्री उशिरा वगैरे पोलिस vans येतात. याला माझ्या नवऱ्याने कधी रिएक्शन नाही दिली. त्यावेळी माझ्या नवऱ्याचा खूप strong support मला मिळाला. मला ज्या ज्या वेळेला लोकांनी विचारलं की तुझं सगळं चांगलं आहे तर तू हे काम का करतेस? त्या वेळेला मी हेच उत्तर दिलं की माझं सगळं चांगलं आहे, म्हणूनच मी हे काम करू शकते.
यामिनी: तुम्ही रोटरी कधी जॉईन केलत? आणि तुम्ही जे समाज कार्य करत होतात ते आणि रोटरी यामध्ये काय वेगळेपणा जाणवला?
पी.पी.रो. सोनल: मी रोटरी साधारण पणे २००४/५ मध्ये join केलं. मी आधी जे काम करत होते, ते खुप grassroot level चे समाजकार्य होत. आणि रोटरीचे काम हे सामाजिक कार्यात दर्जा वाढवणारे काम आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी रोटेरियन म्हणून गेलात, तुम्हाला काही funds हवे आहेत, काही मागायचे आहे अशावेळी तुम्हाला त्या नावाचे अधिष्ठान असते. माझ्या Presidentship मध्ये मी जे काही मोठे प्रोजेक्ट केले, ताराचंद हॉस्पिटल मधील प्रोजेक्ट असो किंवा मग मुलांचे लसीकरण असो.... त्यासाठी funds मागताना आधीही social work मध्येच असल्याने लाज वाटत नव्हती. उलट आता मागे रोटरीचे नाव असल्याने recognition मिळालं. जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता तेव्हा तुम्ही रोटेरियन असल्याने एक वेगळा status आपोआपच मिळतो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.
रोटरी मध्ये मजा आणि सोशल वर्क या दोन्ही गोष्टींची सांगड घातलेली आहे. पण आपला rule आहे तो की 30% मजा आणि 70% सोशल वर्क असलं पाहिजे. म्हणजे मज्जा पण केली पाहिजे पण social work सुद्धा झालं पाहिजे. रोटरीचा हा फायदाच आहे की रोटरी मध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असल्यामुळे त्यांच्याशी ओळखी होतात त्यांच्या बरोबर एक प्रकारचा संवाद या रोटरीच्या प्लॅटफॉर्मवर करता येतो.
यामिनी: जेव्हा तुम्ही रोटेरियन झालात त्या वेळेला आपल्या क्लब मध्ये किती लेडी रोटेरियन होत्या?
पी.पी.रो. सोनल: Countwise ५/६ असतील. पण actually काम करून profession करून आलेल्या कमी होत्या.
यामिनी: तिथे तुम्हाला लोकांच्या वागण्या बोलण्यातून gender difference जाणवला का?
पी.पी.रो. सोनल: नक्कीच जाणवला. म्हणजे माझ्याशी वाईट कोणीच वागले नाही. पण acceptance मिळायला वेळ लागला. पण हा लढा मी माझ्या आयुष्यात खूप वेळा दिलेला आहे. कारण मी ज्या क्षेत्रात काम करत होते त्या क्षेत्रामध्ये बायकांना काय कळतंय हा एक समज होता. त्यामुळे मी सगळं बघत असले, rate वगैरे ठरवला तरी जरा सरांना बोलायला सांगता का असं मला विचारलं जायचं. पण अशावेळी मी अगदी स्पष्ट सांगायची की जे deal करायचे ते तुम्हाला माझ्याबरोबर कराव लागेल otherwise तुम्ही जाऊ शकता.
असंच रोटरी मध्ये मी रोटेरियन होते. पण माझं नाव घेताना जर रोटेरियन म्हटलं गेलं नाही तर मी वाद घालत होते. सगळ्यांना एकसारखं म्हंटल गेलं पाहिजे असा माझा आग्रह होता. अशाप्रकारचा gender bias होता. पण तो समाजातच होता. त्याचेच रिफ्लेक्शन सगळीकडे होतं. पण नंतर सगळ्यांनी accept केलं.
यामिनी: तुम्ही जेव्हा प्रेसिडेंट झालात, तेव्हा आपल्या क्लबच्या तुम्ही फर्स्ट लेडी प्रेसिडेंट होतात तर त्या वेळेचा अनुभव कसा होता?
पी.पी.रो. सोनल: चांगला होता. कारण मी काम करते हे माहिती होतं. माझ्या Presidentship मध्ये there was a mishap. मला कॅन्सर डिटेक्ट झाला. I was operated on for breast cancer. त्यावेळी कदाचित लोकांना वाटलं असेल की आता ही continue करणार नाही किंवा ही सोडेल. पण माझा नवरा म्हणाला की तू जर आत्ता थांबलीस ना तर तू आडवी होशील. माझ्या ऑपरेशनच्या आठव्या दिवशी मी बोर्ड मीटिंग घेतली. पुढे पंचावन्न प्रोजेक्ट कम्प्लीट केले पण सोडल नाही मी. त्यावेळी माझ्या नवऱ्याने, मुलांनी मला खूप साथ दिली. एक काळ असा होता की आयुष्य सगळं रोटरीमय झालं होतं. मला वाटतं प्रत्येकाच्याच आयुष्यात एक असा period असतो की दहा बारा वर्षे खूप रोटरी रोटरी केलं जातं आणि मग नंतर थोडं शांत होतात लोक. काम कमी होते त्यांच्याकडून. मी dedicated worker आहे आणि मी methodical worker आहे. त्यामुळे माझ्या Presidentship मध्ये ११ महिन्याचे ऑडिट मी ११व्या महिन्यात करून घेतले होत. एक महिन्याचेच राहिले होते. मग ते मी शेवटच्या महिन्यात पहिल्या तीन दिवसातच करून घेतले. आणि त्याचे reports वगैरे submit केले. तेव्हाची एक गंमत मला आठवते आहे. माझ्या बरोबर Board of Directors मध्ये सगळेच पुरुष होते. आणि मला त्या वेळेला काही जणांनी विचारले सुद्धा की आम्हाला वाटलं की तू फक्त बायकांनाच घेशील बोर्डात. मी म्हणलं हा काही माझा चॉईस नव्हता पण तेव्हाच्या बायकांनीच बोर्डात यायला नाही म्हटलं. असो गमतीचा भाग सोडून देऊ. पण आमचं कौतुक करणारे seniors सुद्धा खूप होते. जे त्यांच्यासारखं मला व्हायचं आहे तुमच्यासाठी.
यामिनी: याच note वर आता रोटरी कडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचं मत हे जाणून घ्यायला आवडेल.
पी.पी.रो. सोनल: आता रोटरीची शिस्त खूप पातळ झाली आहे. रोटरीचे प्रोटोकॉल्स पाळणे खूप गरजेच असते. नवीन member होताना पूर्वी खूप चाळण्या असायच्या. तसेच मिटिंग साठ मिनिटं कंपल्सरी अटेंड करायची असते, नाहीतर अटेंडन्स मार्क करायचा नाही असा नियम होता. म्हणजे शिस्त थोडी कमी झाली असं वाटतं. ज्यांनी आम्हाला प्रोटोकॉल्स शिकवले आता ते लक्ष देत नाहीयेत याचंही वाईट वाटतं.
आमच्या गप्पा चालू असताना सोनल ताईंनी कन्या अमृता बाहेरून आली. आणि मला तिलाही तिच्या आई बद्दल प्रश्न विचारायचा मोह झाला. आणि ती ही खूप कौतुकाने आली आणि बोलली. अमृता ही French आणि Finnish language मध्ये काम करते. तसेच अमृता ही उत्तम horse riding सुद्धा करते. आणि या गोष्टीचे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा केले आहे. तिने पुणे-आलिबाग-पुणे असे horse riding केले आहे. तसेच आता ती half ironman ची तयारी सुद्धा करते आहे.
यामिनी: अमृता, मला तुझ्या कडून तुझ्या आईबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे आई as a Rotarian, आई as a Business woman आणि आई as a social worker... आणि तुमच्यासाठी आई. तुझ्या भावना आम्हाला सांग ना..
अमृता: Basically I was not a very intelligent and smart kid. मला बरीच मदत लागायची. She was very protective mother but in a practical way. Baba is very protective too. पण तो माझे लाड करतो. आणि आई थोडी strict होती. पण तिने लावलेल्या शिस्तीमुळेच आज मी काहीतरी करू शकलेय. मी अभ्यासात जरा weak होते पण तिने माझ्या कलाने घेऊन मला शिकवलं. माझ्यात आणि माझ्या भावामध्ये कधी comparision केली नाही. कारण तो अभ्यासात bright होता. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा ती मला सांगायची की तुला सराव पाच वेळा करावा लागतो ना तर तू दहा वेळा कर. आणि अशानेच she made me a stronger person. She made me a confident girl. आमच्यामध्ये bond खूप स्ट्रॉंग होता म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघही अगदी कोणत्याही विषयात तिच्याशी खूप मोकळेपणाने बोलू शकतो. तिच्याशी बोलताना आम्हाला कधी हे बोलू का नको असं वाटत नाही. एवढंच काय तर माझा नवरा सुद्धा खूप मोकळेपणाने बोलू शकतो.
तिने मला लग्नाची कधी घाई केली नाही. तीने मला एक अट घातली होती की मी financially independent झाल्याशिवाय लग्न करायच नाही. आणि आता मला त्या गोष्टीचे महत्त्व कळतं.
अजून एक गोष्ट मी तिच्याकडून शिकले ती म्हणजे हिशोब. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मला पॉकेटमनी मिळायचा. त्याचा अगदी डिटेल हिशोब मला तिला द्यायला लागायचा. आणि जेवढा हिशोब मी दिलेला असेल पुढच्या महिन्यात तेवढाच पॉकेटमनी मला मिळायचा. त्यामुळे हिशोब आणि त्याचं महत्त्व हे सगळं तेव्हापासून तिने शिकवल मला. अगदी बँकेत खात काढायला सुद्धा तिने मला एकटीला पाठवल होत. मी दहा वेळा परत आले काही ना काही विचारायला. पण शिकले. आता जॉब करत असताना तिच्या decipline ची खूप मदत होते. माझा भाऊ सध्या USA मध्ये Phd करत आहे. माझ्या भावात आणि तिच्या मध्ये नातं खुप strong आहे. ते दोघे रात्री उशिरा सुद्धा कोणत्याही विषयावर म्हणजे अगदी nuclear science ते भाज्यांचे भाव कशावरही बोलू शकतात.
मी आठव्या वर्षी horse riding चालू केलं. आणि जेव्हा मी 11, 12 वर्षाची होते तेव्हा मी ऐकलेल आहे लोकांना बोलताना की तिला हे करू देऊ नका... पुढे जाऊन प्रॉब्लेम येतील मुलं होणार नाहीत वगैरे. पण आईने त्यांना उलट उत्तरं दिली नाहीत. ती फक्त "बघु" एवढंच म्हणायची. पण तिने डॉक्टरांना भेटून काय काळजी घेतली पाहिजे वगैरे विचारून घेतलं होत.
ती रोटरी मध्ये president असताना तिचे ऑपरेशन झाले होते. तर त्यानंतर सहाव्या दिवशी तिने डॉक्टरांना विचारले की मी साडी कधी नेसू शकेन. आणि त्यावेळी तिच्या कडे बघून आम्ही अवाक झालो होतो.
तिच्या courage ला सलाम आहे. As a complete woman म्हणायचं झालं तर the way she dresses, the way she is, the way how she does her business, the way how she takes care of every relationships, यातून मला खूप शिकायला मिळतं. She amazes you.
यामिनी: Thank you अमृता, तू इतक्या छान गप्पा मारल्यास. तुला तुझ्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा. सोनल ताई, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि मला खात्री आहे की जे कोणी हे गप्पांचे सदर वाचतील त्यांना तुम्ही पुन्हा नव्याने समजणार आहात. तुमच्या कडून शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही रोटरी मध्ये येऊन आम्हाला नवीन पिढीला मार्गदर्शन नक्की करा. तुम्हाला सुद्धा तुमच्या समाजकार्यासाठी खूप शुभेच्छा.
अगदी जाता जाता सोनल ताईंचे एक वाक्य मनाला फार भावले. ते म्हणजे... रक्ताच्या नात्यांच्या परे खूप छान नाती असू शकतात असा माझा विश्वास आहे.
EVERY ROTARIAN AN EXAMPLE TO YOUTH
In much of the official literature of Rotary International relating to service to young people, a special slogan will be found--"Every Rotarian an Example to Youth." These words were adopted in 1949 by the Rotary International Board of Directors as an expression of commitment to children and youth in each community in which Rotary clubs exist. Serving young people has long been an important part of the Rotary program.
Youth service projects take many forms around the world. Rotarians sponsor Boy Scout and Girl Scout troops, athletic teams, handicapped children's centers, school safety patrols, summer camps, recreation areas, safe driving clinics, county fairs, child care centers and children's hospitals. Many clubs provide vocational counseling, establish youth employment programs and promote use of the 4-Way Test. Increasingly, drug and alcohol abuse prevention projects are being supported by Rotarians. In every instance, Rotarians have an opportunity to be role models for the young men and women of their community. One learns to serve by observing others. As our youth grow to become adult leaders, it is hoped each will achieve that same desire and spirit to serve future generations of children and youth. The slogan accepted over 40 years ago is just as vital today. It is a very thoughtful challenge--"Every Rotarian an Example to Youth."
ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS (RYLA)
Each summer thousands of young people are selected to attend Rotary-sponsored leadership camps or seminars in the United States, Australia, Canada, India, France, Argentina, Korea and numerous other countries. In an informal out-of-doors atmosphere, 50 to 75 outstanding young men and/or women spend a week in a challenging program of discussions, inspirational addresses, leadership training and social activities designed to enhance personal development, leadership skills and good citizenship.
The official name of this activity is the Rotary Youth Leadership Awards program (RYLA), although the event is occasionally referred to as Camp Royal, Camp Enterprise, Youth Leaders Seminars, Youth Conferences or other terms. The RYLA program began in Australia in 1959, when young people throughout the state of Queensland were selected to meet with Princess Alexandra, the young cousin of Queen Elizabeth II. The Rotarians of Brisbane, who hosted the participants, were impressed with the quality of the young leaders. It was decided to bring youth leaders together each year for a week of social, cultural and educational activities. The RYLA program gradually grew throughout all the Rotary districts of Australia and New Zealand. In 1971, the R.I. Board of Directors adopted RYLA as an official program of Rotary International.
सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी दिवाण्या स्वप्नधुंद वाटा
सुधीरजी मोघे यांच्या या ओळी... परवा 'व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार आणि मानद सभासदत्व सोहळा' पार पडल्यापासून राहून-राहून मनात रुंजी घालताहेत...
गेल्या जून महिन्यात रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचरची स्थापना करताना आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतोय या जाणिवेनी मनावर खरंतर थोडं दडपण आलं होतं... पण क्लब सुरू झाला आणि एकएक करत कार्यक्रम आणि प्रकल्प करण्याचं ठरत गेलं आणि त्याप्रमाणे सगळ्या सदस्यांच्या सहकार्यानी हे अगदी सहज पार पडत गेलं... मग ते पूरग्रस्त वाचनालयांना मदत करणं असो... पुस्तकाश्रम प्रकल्प असो... नाहीतर 'आता आनंदाची पाळी अर्थात मेन्स्ट्रुअल कप अवेअरनेसचा प्रकल्प असो...
पल्लवींनी त्यांच्या सूत्रसंचालनात म्हटल्याप्रमाणे 'कारवा बनता गया....'
पुस्तकांना चेहरा देणारा माणूस आर्टिस्ट चंद्रमोहन कुलकर्णींशी झालेल्या गप्पा, पुरात भिजलेल्या पुस्तकांच्या रिस्टोअरेशनसाठी लीना हाते यांनी केलेलं मार्गदर्शन, गुहा आणि लेणी यांच्याबद्दलचं कुतूहल जागवणाऱ्या भूपाली निसळच्या गोष्टी, पक्षिनिरीक्षक किरण पुरंदरेंशी झालेलं हितगूज, विवेक वैद्य यांच्यासारख्या सिंगापूरस्थित लेखकाला समजून घेणं, मृदुला घोडके यांनी उलगडून दाखवलेल्या आवाजाच्या दुनियेतल्या संधी असं काहीही असेल... नाहीतर 'यमक वगैरे...'सारखी शब्दसुरांची मैफील किंवा 'वाघाची गोष्ट'सारखं नाटक असेल... सारं काही साहित्यमय आणि साहित्ययुक्त...!
हे सारं अनुभवल्यानंतर रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार आणि क्लबचं मानद सभासदत्व या दोन्ही गोष्टी सॅटेलाईट क्लबसुद्धा देऊ शकतो याची जाणीव सातत्यानी सतावत राहिली आणि दोन महिन्यांपूर्वी मनात पडलेलं हे बीज रुजलं, अंकुरलं आणि या रोपट्याला आता नवऊर्जेनी रसरसलेली दोन पानं लागली आहेत.
ज्येष्ठ कवयित्री-लेखिका अरुणा ढेरे आणि लोकप्रिय निवेदक-सूत्रसंचालक, मुलाखतकार, लेखक सुधीर गाडगीळ या दोन्ही दिग्गजांनी लिटरेचर सॅटेलाईट क्लबचा व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार आणि क्लबचं मानद सभासदत्व स्वीकारण्यास होकार देणं ही आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
२३ तारखेला पुस्तकदिनाच्या निमित्तानी हा सोहळा आयोजित केला गेला. डिस्ट्रिक्ट ३१३१चे डीजी रो. पंकज शहा, लोकसत्ता माध्यमसमूहाचे डेप्युटी एडिटर मुकुंद संगोराम यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभली. सुधीरजींचे चिरंजीव आर्किटेक्ट केतन गाडगीळ यांनी 'साहित्याने घडतो समाज' या विषयावर सुधीरजींशी उत्तम संवाद साधला.
एवढा मोठा कार्यक्रम अनेकांचे हातभार लागल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, सहयोगी, बीएनसीएचे डॉ. अनुराग कश्यप आणि रो. शिरीष भागवत या स्पॉन्सर्सनी केलेल्या मदतीमुळे आणि इव्हेंटची पूर्ण जबाबदारी एकहाती सांभाळणारी रो. प्रचिती तलाठी; मानपत्रांचं लेखन, मांडणी आणि वाचन करणारी रो. तृप्ती कुलकर्णी; मास्टर ऑफ सेरेमनी रो. पल्लवी गोरे यांच्या गेल्या पंधरा दिवसांतल्या परिश्रमांमुळे तसंच मेंबरशीप डायरेक्टर रो. योगेश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम उत्तम झाला. राज पासलकरनी लाइव्हची तांत्रिक बाजू तर सांभाळलीच... शिवाय अनेक व्यवस्थापकीय कामांत मदत केली. अभिजित सहस्रबुद्धेंनी व्हेन्यू सुचवला. रो. कादंबरी सहस्रबुद्धे, अमोल कुलकर्णी आणि ॲन ऋचा नांदुरकर यांनी अनेक छोट्यामोठ्या कामांत प्रचितीला मदत केली.
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे सदस्यांनी आणि साहित्यक्षेत्रात काम करणार्या अनेकांनी कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट, रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डम, रोटरी क्लब ऑफ भिगवण या रोटरी क्लब्जना हॅपी स्कूल प्रोजेक्टअंतर्गत देण्यासाठीची पुस्तकं तसंच निवारा वृद्धाश्रमाच्या वाचनालयालाही 'पुस्तकाश्रम' या प्रकल्पाअंतर्गत पुस्तकं देण्यात आली.
रो. तृप्तीनी प्रपोज केलेल्या भक्तिप्रसाद देशमाने, नमिता नितीन आफळे आणि प्रशांत कुलकर्णी या तीन नवीन सदस्यांमुळं क्लबच्या सदस्यसंख्येत लक्षणीय आणि गुणात्मक वाढ झाली.
कार्यक्रम चांगला झाल्याची पावती सगळ्या प्रेक्षकांनी दिली तेव्हा भरून पावल्याची भावना मनात घर करून राहिली...
असेच काही द्यावे-घ्यावे
दिला एकदा ताजा मारवा
देता-घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा.
२३ एप्रिल ला क्लबच्या व्हॉटस्ॲप ग्रुप वर आपल्या प्रेसिडेंट अतुल यांनी हेरिटेज वॉक ची पोस्ट टाकली होती. २८ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या या हेरिटेज वॉक मध्ये पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर यांची माहिती मिळणार होती. ती पोस्ट वाचल्यावर मला पुण्याचा मंदिरांचा इतिहास जाणून घ्यायची संधीच मिळाली आणि ती संधी सोडायची नाही अस मी ठरवलं. पण आपल्या क्लब मधून कोणीच जाणार नव्हतं. पण मी जायचं ठरवलं. घरातून बाहेर पडायच्या आधी सहज विचार आला की श्वेताला विचारावं येतेय का म्हणून... कारण तिला पण अशा गोष्टींची आवड आहे. ती पण लगेचच तयार झाली.
आणि आम्ही दोघी संध्याकाळी वेळेत ओकरेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. तिथे आम्हाला कळलं की हा हेरिटेज वॉक रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांनी आयोजित केला आहे. त्यांना सुद्धा आपल्या क्लब मधून आम्ही तिथे गेल्याचा खूप आनंद झाला. Tour guide श्री आशुतोष पोतनीस यांनी अतिशय छान माहिती देत आम्हाला या मंदिरांचा इतिहास सांगितला. ओंकारेश्वर मंदिराची स्थापना १७३६ मध्ये पेशव्यांनी केली. ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे. या मांदिराला नक्षीकामाचे नऊ कळस आहेत. अंतर्गत भव्य प्रदक्षिणामार्ग आहे. नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र, कीर्तिमुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले होते. हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला. यामध्ये नंदीचे शिंग तुटले असून कालांतराने ते शिंग फायबरचे बसविण्यात आले आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. याची काल आम्ही तयारी बघितली. हे मंदिर २ जुलै २०२२ रोजी आपल्या स्थापनेची २८४ वर्षे पूर्ण करीत आहे.
१९७० पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याचे विधी पलीकडल्या बाजूला होतात. पण पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. अजूनही मंदिराच्या मागच्या बाजूला बऱ्याच समाध्या आहेत.
त्यानंतर आम्ही केळकर महाराज समाधीचे दर्शन घेतले.
पुढे आम्ही अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी गेलो. त्याचा इतिहास समजून घेतला. हे मंदिर शनिवार वाड्याच्या समोरच्या बाजूला मुठा नदीच्या तीरावर आहे. हे मंदिर थोरले बाजीराव यांच्या भगिनी आणि श्रीमंत अंबाजीपंत बारामतीकर यांच्या पत्नी भिऊबाई यांनी स्वतः बांधलेले आहे. मंदीराच्या बाहेरच्या बाजूला नंदी आहे. आणि हनुमानाचे मंदिरही आहे. स्त्रियांनी निर्माण केलेली शिवमंदिर फार क्वचित दिसतात. पण भिऊबाईंची शंकराची भक्ती खूप होती. त्यातूनच या मंदिराची उभारणी झाली.
पुढे भिऊबाईंच्या पश्चात त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तिथेच शेजारी सिद्धेश्वर मंदिर पेशव्यांनी बांधले आहे. तेही पाहिले. सहसा शिवमंदिरात गणपती, देवी, हनुमानाच्या मुर्त्या बघायला मिळतात. परंतु या सिद्धेश्वर मंदिरात सप्त अश्वारूढ सूर्यनारायण आहे. अतिशय सुबक कोरीवकाम असलेली सूर्यनारायणाची मूर्ती सुद्धा बघायला मिळणे थोडे दुर्लभ च आहे. या मंदिराच्या प्रवेश दाराने माझे लक्ष खेचून घेतले. अतिशय सुबक नक्षीकाम या दरवाज्यावर आहे. अर्थातच या ही मंदिराच्या बाहेर नंदीची मूर्ती आहे.
अशारीतीने आमचा heritage walk अतिशय माहिती पूर्ण झाला. आणि आम्ही यात सहभागी होऊ शकलो याचा आम्हाला खूप आनंद आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे Midtown चे प्रेसिडेंट श्री. पराग सुरा, सेक्रेटरी श्री पाषाणकर तसेच श्री गद्रे, आणि सगळे क्लब मेंबर्स यांचे खुप खुप आभार कारण त्यांनी इतका सुंदर हेरिटेज वॉक arrange केला.
आपले प्रेसिडेंट अतुल यांचेही खूप आभार. कारण त्यांनी ग्रुप वर या हेरिटेज वॉक बद्दल माहिती टाकली त्यामुळेच मी आणि श्वेता तिकडे जाऊ शकलो.
हेरिटेज वॉक चे इतर फोटोस आपण येथे पाहू शकता: Click Here
धनंजय जोशी लिखित सहज पुस्तकातील आणखी एक लेख.... लेखाचं शीर्षक आहे...काय समजलं?"...
एक गमतीदार झेन कथा ....!
हो सान म्हणून एक झेन गुरु होऊन गेले... ते तीन प्रकारच्या शिष्यांबद्दल बोलत असत...
ते म्हणायचे," शिष्य जर आंधळा असेल,.. तर मी उचललेली झेन काठी त्याला दिसणार नाही.. शिष्य जर बहिरा असेल तर मी सांगतो ती शिकवण त्याला ऐकू येणार नाही... आणि शिष्य जर मुका असेल तर तो इतरांना काही सांगू शकणार नाही..."
– मग प्रश्न असा की, ते लोकांना कसे शिकवतील??.. म्हणजे ते "आंधळेपण, बहिरेपण आणि मुकेपण" याच्या पलीकडे कसे जाऊ शकतील??? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमची साधना!!
ही गोष्ट एका साधकानं ऐकली आणि तो आपले गुरु
ऊन मून यांच्याकडे गेला....
त्यांना म्हणाला,"मास्तर,मला "हो सान"ची शिकवण समजली नाही...प्लीज एक्सप्लेन...!
"ऊन मून" त्याला म्हणाले,.." नमस्कार कर "
तो नमस्कार करायला गेला.. तेव्हा ऊन मूननं त्याच्यावर झेन काठी उगारली... ते पाहताच तो घाबरून मागे आला...
ऊन मून म्हणाले..," तू आंधळा तर नाहीस".
नंतर ऊन मून म्हणाले ,"जवळ ये.."
ते ऐकून तो जवळ आला....
ऊन मून म्हणाले...,"बहिरापण नाहीस.."!
शेवटी ऊन मून म्हणाले..,"डू यू अंडरस्टॅंड..??"
तो म्हणाला," नाही, मला नाही समजत...!"
ऊन मून म्हणाले...," मुका तर अजिबातच नाहीस..!!"
--- आणि साधकाला ज्ञान-साक्षात्कार झाला..!
काय समजलं असेल त्याला...?? काय उमगलं असेल...?? हे प्रश्न आपण स्वतःला विचारावेत..
त्या संवादामध्ये तो "आंधळेपण, बहिरेपण आणि मुकेपण".. याच्या पलीकडे गेला...
सान सा निम आम्हाला सांगायचे...," इन हिअरिंग.. देअर इज ओन्ली हिअरींग..."..मी ऐकतो असं म्हटलं की, त्यात मी उभा राहिला... नुसतं ऐकणं जर असेल,.. तर मी विरघळला....तसंच बहिरेपण आणि मुकेपण...!!" त्यांच्या पलीकडे जाणं म्हणजे मीपण विरघळणं...!!
किती सोपं आणि सुंदर सत्य आहे हे ...!
ध्यानशिबिराच्या मुलाखतीमध्ये सान सा नीम विचारायचे....," कुठून आलास..?"
आम्ही म्हणायचो..."ध्याननमंदिरामधून...!"
ते म्हणायचे..." युअर बॉडी - तुझे शरीर, तुझा देह आला तिथून... व्हॉट अबाऊट युवर ट्रू सेल्फ..?? तुझा खरा देह कुठून आला..?"
आम्ही म्हणायचो..." नाही समजलं..! डोन्ट नो..!
ते हसून म्हणायचे...,"वंडरफुल..! कीप दॅट डोन्ट नो माइंड...तू ध्यानमंदिरातून आलास आणि ध्यानमंदिरातच परत जाणार...बाकी कुठली जागा नाहीच मुळी...! तुझं मन हेच तुझं ध्यानमंदिर...!! डोळे अगदी भरून यायचे ते ऐकून...
सध्या इतकेच..
प्रराचीन काळात भारतातली सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर संशोधकांनी व पंडितांनी फारसे संशोधन केले नाही.महाभारत व चौथ्या शतकातील कौटिल्य आर्थशास्त्र ह्या ग्रंथावरून त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो. त्याचबरोबर 'जातक'कथांमधून बुद्ध काळाच्या अगोदरची परिस्थिती समजू शकते. 'जातक' कथा लोककथा असून बुद्धाचे प्राचीन अवतार त्यात सांगीतलेआहेत. त्यात द्रविड व आर्यांच्या संमीलनाच्या अंतिम काळातील स्थितीचे वर्णन आहे.
त्यावेळेस बहुरंगी, संभ्रमित समाज,वर्गीकरणाच्या विरुद्ध लढत होता .त्यावेळच्या राज्यांची कालक्रमणा व राजांच्या वंशावळीचा उल्लेख जातक कथांमधून आहे. प्रथम निवडून सिंव्हासनावर येणारे राजे, पुढे जन्मसिद्ध हक्कानी राज्य करू लागले. काही उदाहरणं सोडली तर सर्व साधारण पणे स्त्रियांना राज्य करण्याचा अधिकार नव्ह्ता. सगळ्या चांगल्या वाईटाची जबाबदारी राजावर असे. राजाला सल्ला देण्यास व मदतीकरीता मंत्रिमंडळ असे. तरीपण राजालाच सर्वाधिकार असत व ते सर्वसाधारण प्रथेनुसार राबविले जात. मुख्य पुरोहिताला मानाचे स्थान असे. त्यावेळेस सुद्धा जुलुमी राजा विरूद्ध बंडाळी होऊन राजाचा वध झाल्याची उदाहरणे आहेत. त्यावेळी गाव पंचायत असे व गावांना थोडेबहुत स्वातंत्र्य असे. जमीनीच्या उत्पन्नातील काही भाग कर रुपाने राजाला मिळत असे. देश शेतीप्रधान असून देशाचा सर्वात छोटा हिस्सा स्वयंशासीत गाव असे. ही गावे समूहाने वसलेली असत. देश समृद्ध होता. शिकार करणे हा त्यावेळचा आवडता छंद होता. मांसाहार निषिद्ध नसे. भात, भाकरी, दुध, साखर यांचा अन्नात वापर असावयाचा. मद्य आणि मद्यपान गृहे उपलब्ध असत. सोने, चांदी, मोती, हीरे, तांबे, लोखंड वगैरे धातू व त्यापासून बनवलेली भांडी, अवजारं, दागीने यांचा पण उल्लेख जातकांमध्ये आहे. व्यापारधंदा भागीदारीत चालत असे. सावकारी प्रचलित होती. अनेक प्रकाराची वस्त्रं, प्रावरणे,वगैरे उत्पादनं होत असत. घरबांधणी व तत्सम सामग्रीचे उत्पादन होत असे. सौंदर्य प्रसाधने, औषधे पण तयार केली जात. अनेक प्रकाराची हत्यारे तयार करीत असत. या सर्वाकरीता निरनिराळे कारागीर असत. वैद्य, शल्यचिकित्सक, ज्योतिषी, नट, नृत्यांगना, डोंबारी वगैरे अनेक व्यावसायिक त्यावेळेस असत. घरात दास, दासी असत. परन्तु शेतकाम, कष्टकामाकरीता, पगारी कामगार असत. कलेवर उचलण्यास अस्पृश्य असत, ज्यांना 'चांडाळ 'असे संबोधिले जात असे.
'जातका'मध्ये अठरा (अठरापगड) व्यावसायिक संघ असल्याचा उल्लेख आहे. परन्तु त्यातील सुतारकाम, बांधकाम, चर्मकार, रंगारी यांच्या संस्था महत्त्वपूर्ण होत्या. त्या संस्थांच्या मुख्याना राज्यात महत्त्वाचे स्थान असे. त्यांना 'श्रेष्ठी'असे म्हणत. शहरांच्या आसपास विविध कारागीरांच्या वसाहती असत. अशाप्रकारे कारागीरांच्या वेगळे राहण्यामुळे कदाचित जातीव्यवस्था तयार झाली असावी.
प्राचीन काळात निरनिराळ्या भागांना व शहरांना जोडणारे महामार्ग असत, ज्यावरून माणसांची व मालाची वाहतूक होत असे. इजिप्त, दक्षिणपूर्व अशीया पर्यंत भारतीय व्यापार चालत असे. त्या महामार्गावर विश्रांतीगृहे व रूग्णालय असत. सरिता व सागरी व्यापार होत असे. त्याकरिता जहाजबांधणि होत असे. सागरी मार्गाने रेशीम, तलम सुती वस्त्र, भरजरी वस्त्र, अत्तर, दागीने वगैरे माल निर्यात होत असे. उत्तर भारत उत्तम हत्यारांबद्दल प्रसिद्ध होता. पाचव्या शतकात अलेक्झांडरने भारतीय सैनिक व हत्यारे प्रशीयावरील चढाईत वापरली होती. प्राचीन काळात भारतात पोलादाचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्लीतील कुतुबमिनार जवळील लोखंडी खांब आहे. तो सातव्या शतकात कींवा त्यापेक्षाही खूप पूर्वी बांधला असावा. तसे म्हंटले तर अलेक्झांडरची भारतावरील स्वारी एक शुल्लक चढाई होती. त्याचा पुरू सारख्या एका छोट्या सरदाराने मुकाबला केला. त्यापुढील प्रदेशातील बलाढ्य सेनेला तोंड देण्यापेक्षा, अलेक्झांडर ने परत फिरणे पसंत केले. अलेक्झांडर नंतर भारतीय लष्करी ताकद खुपच वाढली.त्यावेळेस हत्तीदल हे सैन्याचे प्रमुख आयुध होते.हत्तीना व अश्वांना प्रशिक्षण देण्याविषयी पुस्तके असत.
अशा ग्रंथांना 'शास्त्र' असे संबोधीत असत. परन्तु पुढे हे नाव ज्ञान व विज्ञानाची माहिती देणाऱ्या सर्व ग्रंथांना लागू करण्यात आले .लेखी भाषा भारतात प्राचीन काळापासून रूजू आहे. नवाश्मयुगातील मडक्यांवर ब्राम्ही लिपीतील लेख कोरलेले आहेत. पाच हजार वर्षांपूर्वीच्या मोहंजदारो येथील लिपी अजून ओळखता आली नाही. ब्राम्ही लिपीतून ईतर लिपी उगम पावल्या. सम्राट अशोक ने ब्राम्ही व खरोष्ती लिपीत लेख लिहिले आहेत.
पंचविसशे ते सत्तावीसशे वर्षापूर्वी पाणिणि ने संस्कृत भाषेतील व्याकरण लिहिले. त्याअगोदरसुद्धा व्याकरण प्रचलित होते,असे पाणिणि ने नमूद केले आहे. पाणिणि ने ग्रीक लिपीचा सुद्धा उल्लेख केला आहे. याचा अर्थ, अलेक्झांडर पूर्वपासून भारताचा ग्रीस बरोबर संबंध होता. खगोलशास्त्र व ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला जात असे. वैद्यकीय शास्त्रावर पुस्तके लिहिली होती. 'धन्वंतरी 'वैद्य भारतीय वैद्यकीय शास्त्राचा जनक मानला जातो. इ.स.पुर्व काही शतके चरक व सुशृत यांनी अनुक्रमे वैद्यकीय शास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रावर ग्रंथ लिहिले आहेत. चरक, कनीष्क राजाच्या दरबारात वैद्य होता. त्याच्या ग्रंथात रोगनिदान, उपचारपद्धती, शस्त्रक्रिया, बाळंतपण, स्वच्छता, आहार, यांचा ऊहापोह केला आहे. तसेच शस्त्रक्रियेची हत्यारे, सिझेरीयन शस्त्रक्रिया, अवयव विच्छेदन, मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया वगैरेचा उल्लेख ह्या ग्रंथात आहे. त्यावेळेस जखमा धूर धूपाने निर्जंतुक केल्या जात. माणसाप्रमाणेच प्राणिमात्रांची इस्पितळे सुद्धा असत.
प्राचीन भारतात गणितात युगप्रवर्तक प्रगती झाली होती. शुन्याचा,पूर्णांकाचा शोध, दशांश, शतांश चे मुल्य, उणे
चिन्हाचा उपयोग, बीजगणितात 'क्ष' या चिन्हाचा वापर अशी अनेक उदाहरण आहेत. ऋग्वेदात दहा संखेचा आकडेमोडीत उपयोग केला आहे.काळ व अंतर मोजण्यास अल्प ते अनंतापर्यंत आकड्यांची व्यवस्था होती. बाहेरील प्रगत जगात हजार ते दहा हजार पर्यंत संख्या मर्यादित होती. भारतात एक, दहा, कोटी(100,00,000), अब्ज(100,00,00,000), खर्व (100,00,00,00,000), निखर्व (100,00,00,00,00,000), पद्म(100,00,00,00,00,00,000), शंख(100,00,00,00,00,00,00,000) तसेच, महाशंख, अंत्य, महाअंत्य, मध्य, महामध्य, अशोहिणि, महाअशोहिणि, ओम, महाओम, गण, महागण(100,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,00,000)पर्यंत संख्या होती. गौतम बुद्धाने त्याच्या विद्यार्थीदशेत 10/50म्हणजे समुद्र पर्यंत संखेचा अभ्यास केला होता.
मोजमापात पळ(24से.), अंगूल(16.746mm), धनुष्य (1.81051m) ,योजना(14.48km.), घट(24min.), निमीषा म्हणजे प्रकाश वेग यांचा उल्लेख आहे. त्यावेळेस, प्रकाश वेगाचे गणितीय उत्तर आधुनिक उत्तराच्या तंतोतंत बरोबर होते. जरी वरील अंक प्रत्यक्ष व्यवहारात वापरीत नसले, तरी भारतीयांना काळ व अंतराबद्दल खुपच ज्ञान होते. पूराण काळ तर करोडो वर्षांचा होता. त्यामुळे पश्चिम जगतात डार्विन वगैरेनी मांडलेल्या सिध्दान्ता मुळे जी खळबळ माजली ,तशी गडबड भारतात झाली नाही. 'अर्थशास्त्रात' वजन मापांबद्दल माहिती दिली आहे. गुंज (113.4मि.ग्रॅम), धरण(32.4ग्रॅम), होन(437.4ग्रॅम), माष माषक ,कर्ण ,पल, पूरण कींवा टंक वगैरे मापांचा उल्लेख आहे. बाजारात मापात फसवणूक होऊ नये म्हणुन काळजीपूर्वक लक्ष्य ठेवले जात असे.
महाकाव्य काळात वनातील गुरुकुलाचा उल्लेख खूप वेळा येतो. ही विद्यापीठे शहरापासून दूर असत व त्यांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून, राजपुत्रां पर्यंत सर्व स्तरातील मुले असत. त्याठिकाणी ख्यातनाम गुरु सैनिकी शिक्षणा बरोबर इतरही ज्ञानार्जन करीत असत.तिथे सर्व प्रलोभनां पासून दूर अशा ठिकाणी मन विचलित न होता शिक्षण दिले जाई. शिक्षण पुर्ण झाल्यावर शिष्यांनी गृहस्थाश्रम पत्करावाअशी अपेक्षा असे. श्री.राम गुरु वशीष्ठ व श्री कृष्ण गुरु सांदीपनी, तर पांडव गुरु द्रोण यांच्याकडे शिकले. त्याकाळात तक्षशीला व नालंदा विद्यापीठे खूप प्रसिद्ध होती. तक्षशीला तीन हजार वर्षांपूर्वी सुरू केले गेले व ते पंचविसशे वर्षांपर्यंत चालू होते.तक्षशीला वैद्यकीय व कलाशास्त्रा विषयी प्रसिद्ध होते. चाणक्य, पाणिणि, कुमारलत आदी शिक्षक तेथे शिकवीत असत. गौतम बुद्ध, चरक, चंद्रगुप्त मौर्य वगैरे तेथील विद्यार्थी होते. मगध राजवटीत, पाच ते बाराव्या शतका पर्यंत बिहार मधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठ वसले होते. तेथे दोन हजार शिक्षक व दहा हजार विद्यार्थी रहात असत. बाराव्या शतकाच्या अखेरीस खिलजी ने नालंदा विद्यापीठ नष्ट केले. तक्षशीला व नालंदा विद्यापीठात शिक्षण घेण्यास परदेशांतील विद्यार्थी येत असत. तक्षशीला विद्यापीठ बौद्ध पूर्व कालीन होते, तर नालंदा बौद्ध कालीन होते.
हिन्दू वैयक्तिक कायद्याचे जनक मनू यांच्यामते पूर्व काळात स्त्रियांची परिस्थिती ठीक नव्हती. त्या नेहमीच आईवडीलां पासून ते कुटुंबीय आणी पतीपर्यंत, कोणावर तरी अवलंबुन असत. त्यांना खाजगी मालमत्ता म्हणूनच वागविले जाई. परन्तू महाकाव्य काळ व नंतरच्या काळात सुद्धा स्वतंत्र व समर्थ स्त्रियांची वर्णनं आहेत, ज्यांना समाजात उच्च व मानाचे स्थान होते.गंगा, पार्वती, सरस्वती, द्रौपदी, गांधारी, सत्यवती, कुंती ,सीता वगैरे राजकारणात सक्रिय होत्या, तसेच लढाईत सुद्धा भाग घेत असत. गार्गी, मैत्रेयी ह्या विदुषी होत्या व प्राध्यापक होत्या. गुप्त काळात कित्येक स्त्रीया अध्यापीका होत्या. इ.स.पूर्व चारशेच्या काळात लिहिलेल्या आपस्तंभ सुत्रात स्त्रीयांचे ह्क्क सांगीतले आहेत. वैदीक आणि महाकाव्य काळात स्त्रीयांना आपला पती निवडण्याचा अधिकार होता, ईतकेच नव्हे तर बाह्यसंबंधातून पुत्र प्राप्ती करण्याचा पण ह्क्क होता. त्यावेळेच्या ग्रीक, रोमन, कींवा ख्रिश्चन देशातील स्त्रियांपेक्षा भारतीय स्त्रियांची परिस्थिती खुपच चांगली होती. परकीय आक्रमणानंतर स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले व स्त्रियांवर बंधनं आली .मनू, याज्ञवल्य, नारद वगैरे विद्वानांनी व्यापारी व्यवहारातली नियम घालून दिले होते. मनूस्मृती ई.स.तीनशे पर्यंत लिहिली असावी. त्या कालावधीत छोटी छोटी राज्ये असलेल्या भारतात मौर्य साम्राज्यासारखी राज्ये तयार झाली.
चवथ्या शतकातील ग्रीक राजदूताने नमूद केले आहे की, भारतात गुलामी नव्ह्ती. परन्तू पं.नेहरू या मताशी सहमत नव्ह्ते. जरी भारतात गुलामाची परिस्थिती चांगली असली तरी घरकामात गुलाम वापरले जात असत. ईतर शेती अगर श्रमीक कामावर गुलाम नसत. कदाचित दास अथवा दासी ह्या संज्ञांमुळे पं.नेहरूंचा गैरसमज झाला असावा. घरकाम करणारे दास अथवा दासी, सखा कींवा सखी समजले जात असत. कित्येकदा दासी यजमानांच्या सहचरी असत. युयूत्सु व विदूर दासी पुत्र होते. त्यांना गुलामाप्रमाणे वागणूक न देता, घरच्यासारखे वागवत असत. भारतात गुलामी परकीय आक्रमणानंतर आली असावी.
पूर्व काळातील भारतीय खरोखर कसे होते हे आता सांगणे कठीण आहे, कारण मध्ये खूप काळ लोटला आहे. परन्तू ते हलके फुलके, आनंदी,उत्साही, अभिमानी, परंपरेचा आदर असलेले, गुणवत्तेची तमा बाळगणारे, नैतिक मूल्यांना महत्व देणारे व मृत्यु अटळ असल्यामूळे त्याला आनंदने सामोरे जाणारे असावेत.
अलेक्झांडर बरोबर आलेला ग्रीक ईतिहासकार लिहितो की 'नृत्य आणि संगीताची इतकी आवड असलेला भारत देशासारखा दुसरा देश ह्या जगात नाही'.
समाप्त.
लिटरेचर सॅटॅलाइट क्लब
२३ एप्रिल २०२२
लिटरेचर सॅटॅलाइट क्लब - व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार व सन्माननीय सभासदत्व
२३ एप्रिल रोजी आपल्या लिटरेचर सॅटॅलाइट क्लब तर्फे सुधीर गाडगीळ व अरुणाताई ढेरे यांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार व सन्माननीय सभासदत्व देण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम व आपले डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज शहा हे स्वतः उपस्थित होते
कार्यक्रमानंतर सुधीर गाडगीळ यांची मुलाखत त्यांचा मुलगा केतन याने घेतली. मुलाखत फार सुरेख झाली. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा झाला.
आपले रोटेरियन योगेंद्रजी व मोहीनीजी नातू यांनी कर्वे शिक्षण संस्था यांना २५,००० रुपयांचा चेक सुपूर्त केला.
आपल्या लिटरेचर क्लबची चेअर रो. उल्का पासलकर तसेच रो. प्रचिती तलाठी, रो. पल्लवी गोरे व रो. तृप्ती कुलकर्णी यांनी भरपूर मेहनत घेतली. रो. योगेश नांदुरकर याने या कार्यक्रमाकरिता बरेच कष्ट घेतले होते. रो. शिरीष भागवत यांनी स्पॉन्सरशिप दिली होती. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
दि. ४ एप्रिल रोजी "तुझी माझी जोडी" हा क्लब मधील रोटेरिअन्स व ॲन्सचा धम्माल कार्यक्रम झाला. यात ६ जोड्यांनी भाग घेतला. प्रश्न मंजुषा, विविध खेळ यातून आपण आपल्या जोडीदाराला किती ओळखतो व आपापसात किती समन्वय आहे याची चाचणीचा जणू यावेळेस झाली.
पी.पी.रो. गोविंदराव व ॲन चारुशीला पटवर्धन, रो. विलास व ॲन अस्मिता आपटे, रो. श्रीकांत व ॲन सई परांजपे, रो. हेमंत व ॲन नेहा वाळिंबे, रो. योगेश व ॲन ऋचा नांदुरकर, रो. संदीप व ॲन शुभदा अवधानी या सहा जोड्यांनी यात भाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. श्वेता करंदीकर व ॲन गौरी क्षीरसागर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन रो. मृदुला घोडके व रो. माधुरी किरपेकर यांनी केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून ॲन सुनीता प्रभुणे, रो. अभिजित देशपांडे व रो. अदिती किरपेकर यांनी काम केले. रो. संदीप व ॲन शुभदा अवधानी हे या स्पर्धेचे विजेते ठरले. हा कार्यक्रम सर्वांना खूपच आवडला व सर्वांनी यात उत्स्फुर्तपणे भाग घेतला.
या सभेच्या सुरुवातीला रो. श्रीकृष्ण चितळे यांची महाराष्ट चित्पावन संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल प्रे. रो. अतुल अत्रे यांनी सत्कार केला.
शाळेतल्या पुस्तकात जो इतिहास आपल्याला शिकवला जातो तो इतिहास आपण एवढे वर्ष खरा असं धरत आलो, पण याच इतिहासातील कित्येक गोष्टी या खोट्या असून त्या अतिशय जाणीवपूर्वक आपल्या समाजाला अधू करण्याकरता ब्रिटिशांनी पेरल्या आणि नंतर स्वहित जपण्यासाठी त्या काही समाज घटकांनी तशाच ठेवल्या. ही दिशाभूल प्रत्येक वाक्याला ला संदर्भ देऊन अतिशय सुस्पष्टपणे आपल्या समोर मांडण्याचे धाडस रो. अभिजित जोग यांनी त्यांच्या 'असत्यमेव जयते' या पुस्तकात दाखवले आहे. आणि याच पुस्तकाच्या विषयावर आधारित हा कार्यक्रम झाला.
रो. गोविंदरावांनी अगदी समर्पक प्रश्न विचारत त्यांना बोलते केले. आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत कसा खोटा आहे, भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास नसून संघर्षाचा इतिहास कसा आहे, सूफी संत आपण जसे समजतो तसे नसून कसे धर्मांध आणि हिंसक होते, सरस्वती नदी चा इतिहास अशा अनेक गोष्टी जोगांनी प्रेक्षकांसमोर मांडल्या. यासाठी त्यांनी केलेला अभ्यास हा क्षणोक्षणी जाणवत होता.
अशा समाज जागृती करणाऱ्या पुस्तकांच्या निर्माणबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले आणि त्यांच्या या क्षेत्रातील पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम पी. वाय. सी. जिमखाना येथे झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.डी.जी. रो. अरुण कुदळे यांचा रॉयल कॅनॉट बोट क्लबच्या अध्यक्षपदी बिन विरोध निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. तसेच रो. श्रीकांत व सई परांजपे यांचे जावई श्री. सौरभ जांभेकर यांना इंग्लड मध्ये "लॉर्ड" ही पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ८० पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती. फेलोशिप रो. जितेंद्र व ॲन भाग्यश्री महाजन यांच्या तर्फे देण्यात आली तर पेयपानाची व्यवस्था प्रे. रो. अतुल अत्रे, पी.पी. रो. संदीप विळेकर, पी. पी. रो. डॉ. राजेंद्र गोसावी, रो. सुभाष चौथाई, रो. श्रीकांत परांजपे व रो. अजित शेलार यांच्या तर्फे करण्यात आली.
१८ एप्रिल २०२२च्या सोमवारी झालेल्या मिटिंगमध्ये 'संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप'च्या यशोदा अवचट-वाकणकर यांच्याशी रो. डॉ. विजया गुजराथी यांनी संवाद साधला.
प्रेसिडंट रो. अतुल अत्रे यांनी मागच्या सभेपासून या सभेपर्यंत घडलेल्या घडामोडी सांगत सभेला सुरुवात केली. पुढच्या सभेपर्यंत होऊ घातलेल्या कार्यक्रमांचीसुद्धा माहिती अतुलजींनी दिली. रो. अभिजित देशपांडे यांनी डिरेक्टरीच्या कामाबद्दलची माहिती दिली. सेक्रेटरी रो. किरण वेलणकर यांनी सेक्रेटरिअल अनाउन्समेंट्स केल्या.
सर्वात शेवटी रो. योगेश नांदुरकर यांनी आभार मानले.
अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
जरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कधी शांतता शून्य शब्दांत येते
कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?
अचानक कुणीतरी व्यक्ती फीट येऊन पडते आणि तिच्या आजूबाजूची माणसं त्या व्यक्तीला भानावर आणण्यासाठी माहीत असलेले-नसलेले, सगळे उपाय करताना स्वतःच भांबावून जातात. अशा वेळी त्या फीट आलेल्या व्यक्तीच्या मनात या गाण्यातल्या शब्दांशी नातं सांगणारे भाव उमटत असणार...!
कोणत्याही आजाराशी दोन हात करण्यासाठी आधी त्या आजाराशी मैत्री केली पाहिजे. त्याला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या आजाराशी गट्टी करत त्याच्या बरोबरचं काही काळचं जगणं अगदी मनापासून आनंदानी स्वीकारलं पाहिजे. मगच त्या आजाराला निरोप देण्यासाठी जे काही करायचं ते शांतपणे ठरवता येतं आणि तसं करणं जमतंही...
हे सांगणं आहे 'संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप'च्या यशोचं... यशोदा अवचट-वाकणकर यांचं....
सुजाण पालकत्व आणि त्यातून आलेला आजाराकडं बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या दोन गोष्टींमुळंच मी एपिलेप्सी या आजारातून पूर्ण बरी झाले आणि त्यानंतर इतर रुग्णांना या आजारातून बाहेर येण्यासाठी मदत करणाऱ्या 'एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप'ची स्थापना करू शकले असंही यशोदानी सांगितलं.
आपल्या मुलाला हा आजार असेल तर त्याच्या पालकांनी, विशेषतः आईनी त्याच्यासमोर रडू नये, उलट जेव्हा त्याला त्रास होत असेल तेव्हा त्याला जवळ घेऊन शांत करावं. मी आहे, घाबरू नकोस, तुला काही झालेलं नाही अशा शब्दांत त्याला धीर द्यावा.
फक्त फीट येऊन पडणं किंवा तोंडाला फेस येणं एवढीच या आजाराची लक्षणं नसून कधी चक्कर येणं, कधी रुग्ण अगदी ब्लँक होणं, कधी त्याचं शरीर किंवा शरीराचा काही भाग ताठ होणं तर कधी एखादी ठरावीक क्रिया रुग्णानी वारंवार करणं अशी वेगवेगळी लक्षणं या आजाराच्या बाबतीत दिसतात. जेव्हा रुग्णाला यांपैकी कोणताही त्रास होईल तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी काय करावं आणि काय करू नये हे तर यशोदानी सांगितलंच... शिवाय आजार असलेल्या व्यक्तीनी काय करावं, काय करू नये हेही सांगितलं.
आपण ज्या आजारातून बाहेर पडलो त्या आजाराशी अजूनही लढणाऱ्या रुग्णांसाठी काम केलं पाहिजे या भावनेतून यशोदानी या आजारासंबंधीचं रीतसर शिक्षण घेऊन काम सुरू केलं. ज्या रुग्णांना औषधोपचार घेणं परवडत नाही अशांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यापासून ते हा आजार असलेल्या रुग्णांसाठी वधूवर सूचक मंडळ चालवण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत संवेदना फाउंडेशनकडून केली जाते.
यशोचा हा जीवनप्रवास खरोखरीच इतका ऊर्जादायी आहे की, तो ऐकताना मनात शब्द फेर धरून नाचायला लागले...
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर...!
अन् वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर...!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची...
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर...!
२५ एप्रिल २०२२ रोजीच्या साप्ताहिक सभेत "मीही एक दुर्गा" या मालिकेत पुरुषप्रधान व्यवसायात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वत:ची खास ओळख निर्माण केलेल्या रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणाऱ्या सौ. मनीषा ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलाखत ॲन सुनीता प्रभूणे यांनी घेतली.
आज समाजात महिला प्रत्येक क्षेत्रात त्यांची क्षमता, इच्छाशक्ती व परिश्रमाच्या बळावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन स्वतःचे स्थान निर्माण करीत असल्या तरी काही क्षेत्रात अजूनही पुरूषांचे वर्चस्व आहेच.
अशा प्रवाहाविरुद्ध जाऊन नेहमीच्या वाटेने न जाता, घराची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय निवडणाऱ्या सौ. मनीषा शिंदे यांचा प्रवास अतिशय वाखणण्याजोगा व खूप काही शिकवणारा आहे.
अकलूज जवळच्या एका खेड्यातून लग्नानंतर पुण्यासारख्या अनोळखी शहरात आल्यावर त्यांना आलेल्या अनेक अडचणींवर त्यांनी स्वतच्या जिद्दीने आणि पतीच्या विश्वासाच्या व सहकार्याच्या बळावर कशी मात केली हे त्यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितले.
पुण्यात आल्या तेव्हा त्यांना एस टी आणि बस यांच्यातील फरकही कळत नव्हता आणि कोणतीही गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. परंतु त्यांचे पती श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या प्रोत्साहनामुळे त्या फक्त दोन चाकी गाडीच नाही तर रिक्षा पण चालवायला शिकल्या. त्याचे लायसन्स काढले, स्वत:ची रिक्षा घेतली, पुण्यातील रस्ते माहीत नव्हते त्या परिस्थितीत हळूहळू माहिती विचारत, सहकाऱ्यांची मदत घेत त्या अनेक गोष्टी शिकत गेल्या आणि आज त्यांचा व्यवसाय त्या अतिशय उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
घरातील सर्व जबाबदऱ्या अतिशय उत्तम रीतीने पार पाडून मनीषाताई रोज दुपारी व संध्याकाळी रिक्शा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांना त्यांचे सर्व कुटुंबीय, शेजारी, नातेवाईक यांचे अतिशय उत्तम सहकार्य मिळते आहे.
महिला रिक्षाचालक म्हणून समाजात वावरताना त्यांना प्रवासी, पोलिस, पुरुष सहकारी व इतरांकडून अतिशय उत्तम सहकार्य मिळते हे ऐकताना खरोखरच आपला समाज बदलतोय, स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने वाटचाल करतोय असे जाणवले.
मनीषा ताईंचे व त्यांच्या पतीचे सामाजिक भान, लोकांना अडचणीच्या काळात मदत करण्याची भावना, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना मुलांना त्यांच्या आवडीनुसार स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहण्यासाठी ते देत असलेले प्रोत्साहन हे सगळे अतिशय वाखणण्यासारखे व अनुकरणीय आहे.
पारंपरिक नोकरीच्या मागे न धावता सर्व जबाबदाऱ्या पार पाडून राहिलेल्या वेळात आपल्या कुटुंबासाठी मोलाची मदत करता येऊ शकते असा आदर्श मनीषा ताईंनी सर्व समाजापुढे ठेवला आहे.
असा एक वेगळा अनुभव देणारा कार्यक्रम सादर केल्याबद्दल प्रोग्राम कमिटीचे खूप आभार व अभिनंदन ..
या सभेच्या सुरुवातीला पी.एन.रो. रवींद्र प्रभुणे यांनी क्लबच्या नियोजित वृक्षारोपणाच्या प्रोजेक्ट विषयी माहिती दिली. या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ३० एकर पठारावर वृक्षारोपण करायचे आहे. या करीत पाणी पंचायत व टाटा CSR यांचे सहाय्य मिळणार आहे. या प्रोजेक्टचा खर्चही मोठा आहे व त्याकरिता सर्व सदस्यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याच सभेत सॅटेलाईट लिटरेचर क्लबच्या नुकत्याच पार पडलेल्या "व्होकेशनल एक्सालन्स अवॉर्ड" या कार्यक्रमाबद्दल रो. उल्का पासलकर, रो. तृप्ती कुलकर्णी व रो. प्रचिती तलाठी यांचे कौतुक करण्यात आले.