रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या ' ममता ' या सिनर्जी प्रोजेक्ट अंतर्गत (maternity and child avenue )रमाबाई आंबेडकर प्रसुतिगृह येथे आपल्या क्लब ने infant warmer भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला हॉस्पिटल कडून डॉ मेघा रॉय ,महापालिका अधिकारी डॉ. संदीप धेंडे व डॉ उजवणकर, प्रेमा सोनावणे सिस्टर उपस्थित होते.
आपल्या क्लब कडून डॉ किरण व डॉ गीतांजली पुरोहित तसेच हेरिटेज आणि टिळक रोड या रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते. नवजात,कमी दिवसांच्या, कमी वजनाच्या बाळांना या बेबी वॉर्मर चा खूपच उपयोग होईल असे आंबेडकर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आणि रोटरीला मनापासून धन्यवाद दिले. या प्रकल्पाला रो. फर्स्ट लेडी स्नेहा ओगले हीने संपूर्ण आर्थिक सहाय्य दिले आहे. तिचे अभिनंदन!
पी. पी. रो. सोनल आणि महेश पटवर्धन ह्यांचा मुलगा श्रीनिवास पटवर्धन ह्यांना जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी येथून पीएचडी मिळाली.
अभिनंदन डॉ. श्रीनिवास पटवर्धन!!
Donations
जागतिक तापमान वाढ-हिमयुगाची चाहूल
सध्या जागतिक तापमान वाढ हा बहुचर्चित विषय झाला आहेव जोविषय जितका जास्त चर्चिला जातो तितके त्या विषयाबद्दल जास्त मतप्रवाह असतात. त्यामुळे जागतिक तापमान वाढ हा विषय अत्यंत वादग्रस्त बनला आहे.याचे मुख्य कारण म्हणजे ही तापमान वाढ खरोखरच होत आहे का?त्याची मुख्य कारणे कोणती?आणि त्या कारणाना कोण जबाबदार आहेत? याबद्दल मतभेद आहेत.मागासलेली अथवा कमी प्रगत राष्ट्रे प्रगत राष्ट्रांच्या औद्योगिक प्रगतीला आणी त्या पासून होणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसना व प्रगत राष्ट्रांकडून पृथ्वीच्या साधन संपत्तीचा होणार्या अतिवापराला दोष देतात .त्या उलट प्रगत राष्ट्रे मागास अथवा प्रगतीशील राष्ट्रांच्या जुन्या आणि मागासलेल्या तंत्रज्ञानाला दोष देतात.
पृथ्वीच्या ईतिहासात तापमान वाढ कित्येक वेळेस झाली आहे व प्रत्येक वेळेस तापमान वाढी नंतर हिमयुग चालू झाले आहे. असा समज आहे की माहिती कधिही नाहिशी होत नाही.ती कुठल्या ना प्रकारे कोठेतरी साठवली जाते.उ.दा.एखाद झाड आडवे कापल्यानंतर त्यात वर्तुळाकार कडा दिसतात.त्या योगे जवळ जवळ ८००० वर्षांपूर्वीच्या हवामानाची माहिती मिळू शकते.दक्षिण ध्रुवावरील अंटार्टिका खंडावर असलेल्या बर्फाच्या थराला २ मैला पर्यंत भोक पाडून गोळा केलेल्या बर्फापासून जवळपास २५०००० वर्षांपूर्वीच्या हवामाना विषयी माहीती मिळू शकते.समुद्राच्या तळाशी थरावर थर साचलेल्या गाळापासून ३मिलीयन वर्षापूर्वीच्या हवामानाची माहीती मिळु शकते. या माहितीच्या आधारे असे अनुमान काढता येते की,आतापर्यंत पृथ्वीवर ५वेळा हिमयूग झाले आहे आणी प्रत्येक हिमयुग साधारण पणे १,००,०००,वर्ष टिकले आहे.दोन हिमयुगांच्या मध्ये प्रत्येक वेळेस जागतिक तापमान वाढ झाली आहे.याचा अर्थ असा की साधारण पणे पृथ्वीवर चार वेळा तापमान वाढ झाली आहे.
ही तापमान वाढ होण्यास अनेक कारणं आहेत.ग्रीन हाऊस गॅस हे त्यापैकी एक कारण आहे.त्याचप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावरील डाग(sunspots)येण्यामुळे पृथ्वीवर तापमान वाढू शकते.हे साधारण ११ ते२६० वर्षांनी होते.२१०० वर्षानी पृथ्वीचा आस आणी पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा बदलते व त्यामूळे पृथ्वी सूर्याच्या जवळ आली तर तापमानात वाढ होते.१००००० वर्षांनी पृथ्वीची कक्षा वर्तुळाकार पासून लंबवर्तुळाकार होते आणि त्यामुळे पृथ्वी काही वेळ सूर्याच्या अगदी जवळ असते व पृथ्वीवरील तापमान वाढते .त्याच प्रमाणे ग्रीन हाऊस गॅस उदा.कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हवेतील बाष्प यांचे प्रमाण वाढून त्यांचा एखाद्या आवरणा सारखा ,पृथ्वीवर परीणाम होतो व पृथ्वीवरील ऊष्णता वातावरणात विरून न जाता पृष्ठभागावर च राहते आणि जागतिक तापमान वाढ होते.सध्याची तापमान वाढ ग्रीन हाऊस गॅस मुळे झाली आहे.
यातील सर्वात मोठा अपराधी कार्बन डाय ऑक्साईड (CO2) आहे.CO2 श्वासोच्छ्वासातून तयार होतो.इतर प्राणिमात्र व वनस्पतीतून देखिल CO2 तयार होतो.साधारण पणे ११००० वर्षांपूर्वी शेतजमीन लागवडीस सुरवात झाली.शेत रापणीत खूप प्रमाणात CO2 तयार होतो. औद्योगिक क्रांती नंतर कारखाने आले,त्यांच्या धुरांड्यातून पडणारा धूर,कोळशाच्या शोधानंतर ऊर्जेकरीता सर्रास वापरला जाणाऱ्या दगडी कोळशाचा धूर,इंटर्नल कम्बशन इंजिनात पेट्रोल ईत्यादी ज्वालाग्राही पदार्थांचा वापर होतो,त्यामुळे खुप प्रमाणात CO2 तयार होऊन,वातावरणात सोडला जातो.साधारणपणे वर्षात १८६००० कोटी टन CO2 ह्या सर्व स्त्रोतातून वातावरणात सोडला जातो.त्यापैकी मानवाकडून फक्त ६०० कोटी टन CO2 हवेत सोडला जातो.९०००कोटी टन CO2 प्राणिमात्रांच्या आणि वनस्पतींच्या जीवनप्रणालीतून तयार होतो.इतर९००० कोटी टन CO2, ज्वालामुखी व पालापाचोळा,झाडे,वगैरेंच्या कुजण्यामुळे तयार होतो. यामुळे असे सिद्ध होते कि, मनुष्य प्राण्यामुळे CO2 अत्यल्प प्रमाणात तयार होत असतो.हवेतील CO2, १० वर्ष टिकतो, व नंतर वनस्पतीत आणि समुद्रात समावून जातो.
मिथेन वायु मुख्यत:जनावरांच्या पोटात तयार होतो,अथवा त्यांच्या शेणापासून होतो.जरी पृथ्वीवरील वन्यजीवन कमी होत असले तरी,पाळीव प्राण्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, ज्यांच्यामुळे पृथ्वीवर मिथेन गॅस भरपूर प्रमाणात तयार होतो.नायट्रस ऑक्साईड गॅस औद्योगिकीकरणा मुळे तयार होतो व वातावरण दूषित करतो.
वरील कारणांनी जरी पृथ्वीचे तापमान २° ते ५° से.ने वाढले तरी ,पृथ्वीवर त्या वाढीचे फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतील.काही ठिकाणी पर्जन्यवाढ होईल, तर काही ठिकाणी वाळवंट तयार होतील.पृथ्वीवरील शेवटचे हिमयूग संपून१०,०००. वर्ष झाली आहेत. त्यानंतर पृथ्वीवर सर्व साधारण तापमान ०.६° ते ०.२°से.नवाढलेआहे.६०००वर्षापूर्
सहारा वाळवंटात मुबलक प्रमाणात पाणी होते.आज सहारा जगातील सर्वांत मोठे वाळवंट आहे.उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी ३०० फुटाने वाढेल व समुद्राजवळील ३००फुट उंचीपर्यंत चा सर्व प्रदेश, तेथील शहरांसह, पाण्याखाली जाईल जशी द्वारका पाण्यात गेली. १०,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवरील खंडे सेतूने एकमेकास जोडली गेली होती.अफ्रीका अरेबियाला सोमालिया जवळ जोडले होते.अरेबिया आशिया खंडाला ईराण जवळ जोडले होते.दक्षिण पूर्व आशिया ईन्डोनेशियाला जोडले होते.त्याचप्रमाणे सैबेरीया ऊत्तर अमेरिकेला बेअरिंग सामुद्रधूनी जवळ जोडले होते.याच सेतूंवरून मानव सर्व जगात पसरला. आज हे सर्व सेतू,राम सेतु सकट ,पाण्याखाली गेले आहेत.
या सर्व पारायणा नंतर वाचकांच्या मनात प्रश्न उपस्थित राहणारच की,ह्या सगळ्यांचा व हिमयुगाचा संबंध कसा? पृथ्वीचे सर्व साधारण तापमान २२° सें. आहे.हे तापमान स्थिर ठेवण्यास समुद्रातील प्रवाह मदत करीत असतात. सर्व साधारण पणै हे प्रवाह ऊत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशातून विषुववृत्ताकडे वाहत असतात.ध्रुव प्रदेशात सूर्याचे किरण तिरके पडत असल्याने तेथील हवा थंड असते.त्यामुळे पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सुद्धा थंड असते.थंड पाणी जड असल्याने,ध्रुव प्रदेशातील थंड पाणी समुद्राच्या तळाशी जाते. समुद्राच्या पाण्याची पातळी सर्वत्र समान राहत असल्याने ध्रुव प्रदेशातील पाण्याची जागा पृष्ठभागावरून वाहत जाऊन, विषुववृत्तावरील गरम पाणी घेते.अशारीतीने ह्या क्रियेचा पंपासारखा ऊपयोग होऊन समुद्रात प्रवाह चालू होतो.ध्रुव प्रदेशातील थंड पाणी विषुववृत्तावर आल्यामुळे,विषुववृत्तावरील गरम पाणी थंड होण्यास मदत होते,त्याच प्रमाणे विषुववृत्तावरील गरम पाणी ध्रुव प्रदेशात गेल्याने ,तेथील पाणी अति थंड होत नाही.याप्रकारे पृथ्वीचे सर्व साधारण तापमान २२° सें.च्या आसपास ठेवले जाते.
जर जागतिक तापमान वाढले तर धृव प्रदेशातील हवेचे तापमान सुद्धा वाढते आणि त्यामुळे ना कैवळ धृव प्रदेशातील बर्फाचे थर वितळतात, पण समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सुद्धा वाढते. यामुळे हे पाणी समुद्राच्या तळाशी जात नाही व हा पंप बंद पडतो.त्यामुळे विषुववृत्तावरील गरम पाणी समुद्राच्या पृष्ठभागावरून धृव प्रदेशात येत नाही.त्याचबरोबर धृव प्रदेशातील थंड पाणी विषुववृत्तावर जात नाही.अशारितीने समुद्रातील पाण्याचा प्रवाह बंद पडतो आणि धृव प्रदेशातील पाणी धृव प्रदेशातच राहते.धृव प्रदेशातील पाणी विषुववृत्तावरील पाण्याने गरम न झाल्यामुळे हळूहळू थंड होत जाते.असे अनेक वर्ष होत राहून धृव प्रदेशातील पाण्यावर व जमीनीवर बर्फाचे थर साठू लागतात.बर्फ सूर्याचे किरण परावर्तित करीत असल्याने ,सुर्यकिरणांनी सुद्धा तेथील हवा गरम होत नाही व अशारीतीने एक दुष्टचक्र तयार होऊन बर्फाचा थर जास्त जास्त प्रदेशात पसरला जातो व हिमयुगाची सुरवात होते.
पृथ्वीवर अशारीतीने २४०ते २१० कोटी वर्षांपूर्वी पहिले हिमयुग चालू झाले.दूसरे ७१०० लाख ते ६४०० लाख वर्षांपूर्वी होते.तिसरे ४६०० लाख ते ४३००लाख वर्षांपूर्वी होते.चौथे ३५०० लाख ते २६०० लाख वर्षांपूर्वी होते.सध्याचे पाचवे ४०० लाख वर्षांपूर्वी चालू झाले.सध्याच्या हिमयुगात जवळपास ४१°अक्षांश पर्यंत, ऊत्तर गोलार्धात , बर्फ होते.न्यूयॉर्क च्या जागेवर २०००फुटा पर्यंत बर्फ असावे.याच काळात मानवाचा ईतिहास घडला.मानव ऊत्तर गोलार्धातील युरोप अथवा ऊत्तर आशिया प्रदेशात वसाहत न करता अफ्रीका आणि दक्षिण आशियात राहीला.
मानव बुद्धिमान व विचारवंत असल्याने, त्याला आपल्या प्रजाती कींवा वंश नष्ट होण्याची काळजी असते ,म्हणून तो जागतिक तापमान वाढी बद्दल चिंताग्रस्त आहे.परंतु निसर्गाला सर्व जीव सारखेच. पृथ्वीवरील जीवन अनेक वेळेस, अनेक कारणास्तव नष्ट झाले आहे व पुनरुज्जीवीत झालेले आहे.ह्या नैसर्गिक नियमानुसार केंव्हातरी मानवी वंश पृथ्वीवरून नष्ट होणार आहे.परंतु, मानव त्याची बुद्धी,ज्ञान व त्याच्याकडील तंत्रज्ञान वापरुन किती दिवस निसर्गाशी टक्कर देत टिकून राहतो हेच पहावयाचे.
समाप्त
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेखमाले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील एकादश स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात, तसेच अकरावी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच प्लुटो नंतर राहु या ग्रहाचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील दशम स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील एकादश स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
११)एकादश स्थान (लाभस्थान): सामाजिक संबंधाचे स्थान:
लाभस्थानेन लग्नात अखिल धनं संचय प्राप्ती इच्छन्ति सर्वे ।
स्वकष्टाने मिळविलेले धन ह्या स्थानावरून पाहतात. उद्योग, व्यवसाय वगैरे गोष्टींपासून सातत्याने मिळणारा पैसा ह्यावरुन पाहातात.
यावरून व्यक्तिला होणारे लाभ, त्यांचे स्वरूप पाहता येते. अगदी व्यक्तीला मिळणाऱ्या छोट्या मोठ्या Gifts पासून ते मोठमोठ्या अशा सर्व प्रकारच्या लाभांचा यात समावेश होतो. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, व्यवसायिक, वगैरे गोष्टीतील लाभ या स्थानावरून बघतात.
चांगल्या-वाईट अभिलाषा, इच्छा, काही मिळविण्याच्या अपेक्षा, सिद्धि ह्या स्थानावरुन पहातात.
ज्ञानलाभ, शिक्षण ह्या दृष्टीने पंचम स्थानाबरोबर याचाही विचार करतात.
तसेच व्यक्तिच्या संतती संबंधी काही बघताना सुद्धा एकादश स्थानाचा विचार करतात.
ह्या स्थानावरुन मित्राचा समूह, सामाजिक लहान गट, पहातात.
मोठ्या भावंडांचा अभ्यास ह्या स्थानावरून करता येतो.
आता आपण १२ राशींमधील अकरावी कुंभ रास पाहूया.
११)कुंभ: ही १२ ही राशींमधील सर्वात उच्च दर्जाची रास आहे. वायुतत्त्वाची ही शेवटची रास शनि (व काही प्रमाणात हर्षल) च्या अंमलाखालील रास आहे. राशीस्वामी शनि आहे, त्यामुळे चिकाटी / patience भरपूर आहे. वाचन, मनन, लेखन करतात. सखोल अभ्यास करतात. कीतीही ज्ञान असले तरी त्याचे प्रदर्शन कधीच करत नाहीत. अतिशय वरचा बौद्धिक दर्जा आहे. त्यामुळे Phd, कींवा संशोधनासाठी उपयुक्त अशी रास आहे. Logical व analytical mind आहे अत्यंत दुर्लभ असे ज्ञान, किंवा ज्यांची व्याप्ती खूप जास्ती आहे, अशा विषयांत रस घेणारी आणि प्राविण्य मिळवणारी रास आहे. आपल्या विचारांशी कींवा निणर्याशी अत्यंत firm असतात. कोणत्याही व्यक्ती कींवा situations चा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. राशी स्वामी शनि असल्याने विवाहाच्या दृष्टीने थोडीशी उदासिन रास आहे. ऐहीक गोष्टींमध्ये interested नसतात. money minded नसतात. work satisfaction ला महत्व देतात. काम करणे महत्वाचे, त्यातून मिळणारे returns महत्वाचे नसतात. बऱ्याच ज्योतिषांच्या मते ही रास हर्षलच्या अधिपत्याखाली येते. ह्या राशीतील बौद्धिक बाजू हर्षलला शोभेलशीच आहे.
या राशीचे स्वरूप म्हणजे उंच असतात, वर्ण काळसर, हाडे व शिरा दिसतात. आपल्या वयापेक्षा थोड्या मोठ्या दिसतात. सहसा शनिच्या राशींना दीर्घमुदतीचे आजार होतात. आजाराचे स्वरूप प्राणघातक नसते. ह्या राशीचा अंमल पोटऱ्यापासून पायापर्यंतच्या भागावर आहे. त्यामूळे त्यासंबंधातील आजारपण दिसते. ही रास वातप्रकृतीची आहे.
या लेखातील पुढील भागात आपण राहू या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
११) राहू: राहू व केतू हे ग्रह नाहीत. चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा ह्या ज्या दोन ठिकाणी छेदल्या जातात; त्या छेदन बिंदूंना "राहू व केतू" म्हणतात. Gravitational force मुळे पृथ्वीवर यांचा परीणाम होतच असतो. त्यामूळे राहू-केतू ना ग्रहांचे महत्व दिले गेले आहे. हे छेदन बिंदू असल्याने ते नेहमीच एकामेकांपासून 180° मध्ये असतात. त्यामुळेच ते पत्रिकेत समोरासमोरच्या घरात येतात. हे दूषित ग्रह समजले जातात राहूचा दूषितपणा म्हणजे जन्मतःच असणारे व्यंग होय.
राहू मध्ये उत्तम आत्मविश्वास व उत्तम तब्येत असते. जसे जन्मतःच असणारा दोष कींवा दूषितपणा हा राहुच्या कारकत्वात असतो, त्याच प्रमाणे जर राहू प्रथम स्थानात असेल तर तब्येत उत्तम असते, दगड खाऊन पचविण्याची क्षमता असते. तसेच प्रथम स्थाना- तील राहू हा उत्तम मार्गदर्शक असतो. कर्तृत्ववान असतो. परंतु अशा लोकांच्या चेहऱ्यावर वयाच्या 35-40 नंतर एकप्रकारची काळसर छाया येते. पुनर्जन्म हा राहूच्या कारकत्वात आहे. सर्पदंश, विषबाधा, भूत-पिशाच्च बाधा, वास्तु दोष, कुटुंब दोष, ह्या सर्व गोष्टी राहू-केतूच्या कारकत्वात येतात.
क्रमशः
मंडळी,
विचार आणि भावना यात फरक काय आहे ? विचार हे मनात असतात. विचार आणि शरीर एकत्र आले की भावना तयार होतात, आणि त्या आपल्याला कुठल्या ना कुठल्या अवयवात जाणवतात. जरा आठवा, ताण, संताप, दुःख, आनंद, भीती या भावना आपल्याला शरीरात कुठे ना कुठेतरी जाणवतात.
पोटात, छातीत, खांद्यात, मानेत, गुडघ्यात अशा अनेक ठिकाणी या भावना जाणवतात आणि कधीकधी तर त्या घर करून पण असतात. जेव्हा आपण आपले शरीर रिलॅक्स करतो तेव्हा या भावनांचा टेम्पररी निचरा होण्यास सुद्धा मदत होते. म्हणूनच व्यायाम, नृत्य, योगा, प्राणायाम यामुळे ताण कमी व्हायला निश्चितच मदत होते. मग महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही रेगुलरली यातल्या कुठल्या गोष्टी करता?
१६ एप्रिल २०२३
मोखाडा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सोलर वॉटर हिटर डिरेक्टर रो.माधुरी किरपेकर यांच्या पुढाकाराने बसविण्यात आला. रो. माधुरी, त्यांचे परिचित, रो.डॉ.विजयाताई आणि रो. प्रभुणे यांनी आर्थिक योगदान दिले. अनेक गरीब मुलांची खूप मोठी सोय झाली आहे.
२३ एप्रिल २०२३
रोटरी स्किल अँड स्टार्टअप एक्स्पो
भारत हा आता युवकांचा देश मानला जातो. देशातील ६५% लोकसंख्या ३५ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील आहे. या युवकांना योग्य कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनवलं तर स्वतः साठी आणि देशासाठी ते एक उज्ज्वल भवितव्य निर्माण करू शकतील. त्यातून नोकऱ्या शोधणारे नव्हे तर नोकऱ्या निर्माण करणारे युवक घडतील.
हेच ध्येय लक्षात ठेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "कुशल भारत आणि स्टार्ट अप इंडिया" पुढाकाराला उचलून धरण्यासाठी रोटरी क्लब पुणे साऊथने मोठ्या आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकत विविध कौशल्याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या"स्किल एक्स्पो"च आयोजन केलं.
या मेळाव्यात भरत दाभोळकर, डॉ भाजेकर, मुकेश मल्होत्रा, प्रफुल्ल तालेरा आणि प्रदीप लोखंडे इत्यादी सारख्या अनेक व्यावसायिक दिग्गजांच्या अनुभवाचा लाभ अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
मेळाव्यात ,विविध प्रसिद्ध संघटनांचे ५५ स्टॉल यशस्वी उद्योजक होण्याचा गुरूमंत्र युवकांना देत होते.
येत्या पाच वर्षांत हा पुढाकार आपला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनवण्याचा रोटरी क्लब पुणे साऊथचा मानस आहे.
Veterans at the Expo.
It was a pleasure and insightful listening to their expertise.
Appreciation from Rtn PDG Arun Kudale
Dear President Sanjeev ji and friends,
Skill & Start-up Expo is an amazing project of RC Pune South. The venue is excellent, the participants are very apt and the participation of Rotarians, Anns, Rotaractors is superb. Hats off to those who conceived and executed such a dream project. I was quite impressed by the layout and the products displayed, while visiting the stalls.
The mega project of this scale is done by RCPS, probably after a long gap of a decade or so. It is an unique project which will give RCPS a status of trendsetter in future. Such projects give opportunity to rotarians and the spouses to come together, work together, leading to the better friendship and the best assimilation. The participation of anns was always a matter of pride to us. You, President Sanjeev ji and Snehatai, are always seen leading from the front. The members work hand-in-gloves with the leaders for their love and affection, only when they are seen working with them shoulder to shoulder. This phenomenon was conspicuous in this project.
The efforts, put in by Sandeep, Abhijit, Milind, Raghavendra, Subhash, Ravindra, Nandinee, Yamini, Anjali and all the team members who actively participated, were seen everywhere.
The icing on the cake was the informative and motivating speeches by the eminent speakers.
This project should feature as our flagship project every year. I am sure, if informed to PM through proper channel, it will get a place in his "मन की बात"
I congratulate all those, who worked whole heartedly and tirelessly for this project.
Kindly excuse me, if I have missed out any name due to my ignorance.
Regards,
Rtn. PDG Arun Kudale
१० एप्रिल २०२३
"गप्पांगण" - "मेक्सिकायन" आपल्या नुकत्याच झालेल्या मेक्सिको प्रवासातील अनुभव सांगत आहेत - रो. विनायक जोशी आणि ॲन रेखा जोशी
- वक्त्यांचे नाव :अभिजीत केतकर
- पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या सदस्याचे नाव : सुहास ओक
- कार्यक्रमाचा सारांश
अभिजित केतकर यांचा संक्षिप्त परिचय :
- लहानपणापासूनच दुर्ग भ्रमंतीची आवड. भारतीय इतिहास संशोधक मंडळाचा आजीव सदस्य. महाराष्ट्रातील अनेक खासकरून पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील अनेक किल्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. गोवा, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू , काश्मीर,, इंग्लंड,औस्ट्रिया,कॅनडा आणि जर्मनी इत्यादि भारताबाहेरीलही काही दुर्गांंना भेट दिलेली आहे.- किल्ले बांधणी ह्याची आवड असल्यामुळे टु द स्केल मॉडेल बनवण्याची आवड . ते बनवण्यावर लहान मुलांसाठी कोविड काळात एक वर्क शॉप घेतले. आत्तापर्यंत राजगड रायगड सिंहगड आणि प्रतापगड ह्यांची मॉडेल बनवली आहेत. हिरोजी इंदुलकरांवर दुर्ग निर्मिती संबंधी कादंबरी प्रकाशनाच्या तयारीत .
- शिक्षण : एलेक्ट्रिकल इंजिनीअर . आय आय एम कोलकता मधून जनरल मॅनेजमेंट डिप्लोमा , बारक्लैज मधे व्हाईस प्रेसिडेंट - जर्मनी इंटरनेट आणि एजेंट बॅकिंग डिलीवरी हेड
व्याख्यानात समाविष्ट असलेले विषय :
1> किल्ला म्हणजे काय?
2> जगभरातील किल्ले
3> किल्ला का आणि कुठं बांधतात?
4> महाराष्ट्रातील किल्ले कोणी बांधले?
5> किल्यात काय बघायचं?
6> किल्याची दुरावस्था का झाली?
7> आपण काय काय करू शकतो?या कार्यक्रमाला सर्व उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अभिजितने समर्पक उत्तरे दिली.
- आभार प्रदर्शन करणाऱ्या सदस्याचे नाव : संदिप अवधानी
- उपस्थित असलेल्या रोटेरिअन्सची संख्या: 25
- उपस्थित असलेल्या ॲन्स/स्पाऊसची संख्या : 20
We all know the significance of the proper functioning of our heart and also what happens when the heart arrests suddenly.But do we know how we could save those who go into sudden cardiac arrest or heart attack around us? This can be done by learning and implementing CPR Cardio Pulmonary Resuscitation.The weekly meeting on 24/4/23 was all about learning CPR.And to guide us we had with us eminent Interventional Cardiologist Dr.Chandrakant .Chavan. Dr Chavan is a consultant at Ruby hall,Poona hosp and Bharti Hosp.he along with his assistant not only elaborated on the theory of CPR but also taught us practically on a dummy.
steps of CPR:
when a victim of sudden cardiac arrest collapses,check breathing and neck pulse immediately.thump the chest on both sides for response.Next begin CPR. kneel next to the patient upright .place hand on hand.keep it on the left side of the midline along the imaginary line joining nipples.Use part of the palm near the wrist.keep back stiff and chest of the victim should compress a good 2 inches.compression should be a 100 per minute..simultaneousy ask someone to call cardiac ambulance by dialing 108 informing them to bring AED machine.continue the CPR till ambulance arrives.
Demo about AED machine helped us learn about the same.
So now that we all are equipped with training in CPR ,am sure we will be able to extend a helping hand when we witness a cardiac emergency.As a Rotarian we believe in helping whosoever in whatsoever need. Stay Fit..Stay Happy.
Thank You.
Sangeeta Deshpande