Southern Star-November 2022 मराठी

आपटे मोटार स्कूल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नुकत्याच झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या तपासणी मध्ये आपटे मोटार स्कूलला पुन्हा एकदा 'अ' दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले.
गेली 100 वर्ष वाहन प्रशिक्षण देऊन लोकांना वाहतुकीचे नियम समजावून देण्याचं काम करत आहे.
या वाटचालीमध्ये आमच्या सर्व प्रशिक्षकांचा खूप मोलाचा वाटा आहे.

भारतावरील एकापाठोपाठ होणार्‍या आक्रमणांमुळे व साम्राज्या पाठोपाठ साम्राज्ये बदलली गेल्या मुळे असा गैरसमज होऊ शकतो की पुरातन भारत फार अस्धिर होता.परन्तू तशी वस्तुस्थिती नव्हती,कारण हा सर्व काळ १००० वर्षाचा होता,व मधूनमधून शांततेची आणि सुव्यवस्थेची शेकडो वर्षे उपभोगली जात होती.ऊत्तरेस मौर्य, कुशान, गुप्त, तर दक्षिणेस आंध्र,चालुक्य, राष्ट्रकूट वगैरे साम्राज्ये २००~३०० वर्षे टिकून होती.हा काळ ब्रिटिश साम्राज्यापेक्षा जास्त होता.ही बहुतेक सर्व राजघराणि भारतीय होती.कुशान सारख्या परकीय राजसत्ता सुद्धा कालानंतराने भारतीय बनल्या.जरी सरहद्दीवर मधून मधून थोडीफार अशांतता असे,तरिही सर्व साधारणपणे राज्यात शांतता,सुख,कलाविष्कार, सुसंस्कृती,नांदत असे.ह्या सर्व उपक्रमांची देवाणघेवाण शेजारील राष्ट्रांशी सुद्धा होत असावी कारण सर्व भारतात सांस्कृतिक व वाङ्मयीन परंपरा सारखीच होती.कुठल्याही धार्मिक अथवा तात्विक मतभेदांची बातमी सर्व भारतात लगेच पसरत असे व त्यावरून वादविवाद होत असत.दोन राज्यातील रणधुमाळीचा अथवा राज्यातील अंतर्गत बंडाचा परिणाम सर्व साधारण जनतेवर होत नसे.युद्ध खोर राजे व स्वयंशासीत खेडेगावातल्या तहांचे,ज्यात शेतीभाती चे नुकसान केले जाणार नाही,व नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येईल, अशी कलमे असलेले कागदोपत्री पुरावे सापडले आहेत.अर्थात परकीय आक्रमणात अथवा आंतर्गत रणधुमाळीत परिस्थिती वेगळी असे.

Read More...

नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील पंचम स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात तसेच पाचवी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच बुधानंतर येणारा ग्रह गुरु आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील चतुर्थ स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील पंचम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.

Read More...

मंडळी, वर्तमानपत्र वाचून किंवा सोशल मीडिया पाहून बरेचदा आपल्याला असं वाटते की आपण खरंच खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. बाहेरील सर्व परिस्थिती निराशाजनक आहे, एवढ्या वाईट गोष्टी आपल्या आसपास घडत चाललेल्या आहेत वगैरे वगैरे.

Read More...

प्रे. रो. संजीव ओगले आणि रो. दत्ता पाषाणकर ह्यांच्या अविरत प्रयत्नामुळे आपले मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रकल्प उत्तम रितीने पार पडत आहे. त्यावर लाभार्थीची प्रतिक्रिया:

Respected sir,
आपल्या सहकार्याने आमच्या आईचे मोतीबिंदू ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे, खुप चांगला प्रतिसाद मिळाला,उपचार चांगले झाले, असेच सहकार्य लाभले, आपला शतशः ऋणी आहे, धन्यवाद.
आपला अशोक बनसोडे.🙏🏻🙏🏻

दिवाळी हा प्रकाशाचा सण. तेजाच्या ह्या किरणांनी दुसऱ्यांचेही जीवन उजळून टाकण्याचा आपल्या क्लबचा हा प्रयत्न.HIV/ AIDS बाधितांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करतानाची क्षणचित्रे.

मित्र हो,
रोटरीतर्फे दर महिन्याला आपण AIDS बाधितांना धान्य वाटपाचा कार्यक्रम करीत असतो. सामाजिक कार्यक्रम करणे हेच रोटरीचे कार्य आहे.आणि गेले १५ वर्षे सातत्याने आपण ते करत असलेले आहोत.गेले ३ महिने भरपूर पाऊस,गणपती यामुळे धान्य वाटपाचा कार्यक्रम आपण ग्राहक पेठ येथूनच करत होतो.परंतु या म्हणजे ऑक्टोबर २०२२ चा कार्यक्रम आपलेच सभासद श्री.रमेश गोंदकर यांच्या कलाप्रसाद कार्यालय येथे २१ तारखेला करण्यात आला .

Read More...

२५ ऑक्टोबर २०२२

मदतीचा हाथ

दिवाळीचा आनंद साजरा करत असतानाच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखून अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान सोसाव्या लागणाऱ्या लोकांना मदतीचा हाथ आपल्या क्लबने दिला.

Read More...

१० ऑक्टोबर २०२२

औरंगाबाद येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आणि माळवाडी येथील गोंड आदिवासी शाळेत मुलांना शिकविणाऱ्या शिक्षिका यांना सोया मिल्क आणि इतर पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

रोटरी क्लब तर्फे डॉ अनिता देशपांडे व पीपी पवार उपस्थित होते. माळवाडी येथील ३ महिला (शिक्षिका) आणि एक पुरुष यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

त्यांना आपल्या क्लब तर्फे मिक्सर आणि २ प्रेस भेट देण्यात आल्या. त्यांचा उपयोग करून उत्पादन सुरू करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
आपल्या क्लब तर्फे डॉ गोरे सर, डायरेक्टर माधुरी किरपेकर आणि रवींद्र प्रभुणे उपस्थित होते.

१५ - १६ ऑक्टोबर २०२२

ऑक्टोबर डाउनसिन्ड्रोम असलेल्या मुलांबाबत जनजागृती करण्याचा महिना

आपल्या क्लबचे प्रेसिडेंट रो. संजीव ओगले, डायरेक्टर ऑफ पब्लिक इमेज पी.पी .रो. अभिजित जोग, डायरेक्टर ऑफ सर्विस प्रोजेक्ट्स कम्युनिटी डेव्हलपमेंट रो. माधुरी किरपेकर, चेरपर्सन-एक्सटेर्नल पीआर -रो.मृदुला घोडके ह्यांच्या पुढाकाराने डाउनसिन्ड्रोम असलेल्या मुलांकरिता जलतरण, नृत्य, चित्रकला आणि वाद्यवादन स्पर्धांचे "उन्मेष" ह्या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच आपल्या क्लबमध्ये होत आहेत. ह्या स्पर्धांना पालक आणि क्लब सभासदांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवसाच्या स्पर्धाना क्लब सभासद आणि बाहेरील लोकांनी आर्थिक आणि प्रत्यक्ष मदत केली.

Read More...

पालकांच्या प्रतिक्रिया:

■आमचा कार्यक्रम खूपच छान झाला. जयंती मॅडम व रोटरी क्लब चे खूप आभार व कौतुक की आपल्या मुलांसाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिली. 👌🏻👌🏻👏👏👍 - Manasi Lanjekar.

■ I am new to this group. Attending programme first time. Very nice programme. It's very encouraging to our children. Thanks Rotary club 🙏🏻.Thanks Jayanti didi 🙏🏻❤️❤️- Mrs.Sancheti

Read More...

१५ ऑक्टोबर २०२२

Swimming Competition 

१६ ऑक्टोबर २०२२

Drawing, Dance & Musical Instrument playing competition

२१ ऑक्टोबर २०२२

सुदर्शन गोशाळेतील वसुबारस सोहळा कृतज्ञता

आपल्या गोशाळेला वेळोवेळी केलेल्या मदती साठी,या निमित्ताने मी, संजीवजी आपले आणि रोटरी क्लब पुणे दक्षिण यांचे मनापासून आभार मानतो 😊🙏. आपले सहकार्य सदैव आपल्या गोशाळेला लाभत राहो जेणे करून आपल्या हातून लोकांभिमुख आणि निसर्गाभिमुख कार्य सदैव होत राहील हीच प्रार्थना 🙏😊

२५ ऑक्टोबर २०२२

दिवाळीच्या आनंदापासून सरहद्दीवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांना वंचित का ठेवायचे? म्हणून त्यांच्यासाठी आपल्या स्पेशल पुणेरी चितळे बाकरवडी आणि दिवाळी फराळाची व्यवस्था

Handed Over on behalf of Rotary Club of Pune South, Chitale Bakarwadi as Diwali Pharal which will be carried to Indian Soldiers on the Jammu and Kashmir Border by Adhar Foundation Trust. This year 100 volunteers will be carrying more than 1 Ton of Pharal to the border. This was a request from Mr Santosh Chakankar who will also be traveling to Kashmir with the Aadhar Foundation Group. This group has been doing this for the Indian Soldiers for the last few years.

3 October 2022

शारदोत्सव आणि गरबा, रास दांडिया.

॥ श्री॥
या कुंदेंदू तृषार हार धवला
या शुभ्र वस्त्रावृता।
या वीणावर दंड मंडीत करा या श्वेतप‌द्मासना॥

या ब्रम्हाच्युत शंकर प्रभृतीभिर देवैसदा वंदीता।
सामांपातू सरस्वती भगवती निषेश: जाड्या पहा ।।

या देवीच्या स्तवनानी ॲन सौ राधिका वाघमारे यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची सुमधुर सुरावात केली.

Read More...

9 October 2022

कोजागिरी पौर्णिमे निमित्त  'कजरा मोहोब्बत्वाला'
रोटरी क्लब ऑफ पुणे सौथ तर्फे मेंबर्स साठी नवनवीन कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. ही शृंखला पुढे नेत यंदा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुरसखी संस्थे चा 'कजरा मोहब्बतवाला' ह्या सुवर्णकाळातील हिंदी सिनेगीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घेतला. सुरसखी हा महिला कलाकारांचा समूह असून त्यांनी जुन्या हिंदी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Read More...

On 17th October, as a part of the 'Gappangan' series Rtn Mridula Ghodke was interviewed by Rtn Sandip Awadhani. Both the interviewer and the interviewee were great in their presentations.This interview gave us an insight to how she transformed from a shy introvert to the dashing and dynamic personality.

Read More...

23 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता आपल्या सेवा सदनचा हॉल सजला होता. फुलांची उत्तम रांगोळी आणि शहनाईच्या सुरात न्हावून निघाला.सर्व रोटेरियन्स व अँन्स नटून थटून आले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. गायक कलाकार व त्यांचे सहकारी त्यांची कला सादर करण्यास उत्सुक होते. बरोबर सात वाजता कार्यक्रम सुरू झाला.

Read More...

31 October 2022

काश्मीर मधील कुपवारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. अब्दुल हमीद फानी यांच्याशी दृक-श्राव्य माध्यमातून चर्चा

हे बुलेटिन PP रो. सुधीर वाघमारे यांनी प्रायोजित केलं आहे.