पी. पी. रो. अभिजीत जोग यांचं पुस्तक अमेझॉनच्या बेस्टसेलर्स मध्ये!
श्रीनगरमध्ये, रो गोरे सर अधिक कदम संचालित "कन्या सहनिवास" मध्ये कथा कथन
अधिक कदम यांच्या बॉर्डर लेस संघटनेला प्रत्यक्ष हातभार लावताना गोरे सरांनी भाषा, प्रांत, संस्कृती यांच्या सर्व सीमा पुसल्या आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून या काश्मिरी विद्यार्थ्यांना नवीन क्षितिज दाखवले.
गोरे सरांचे मनोगत:
आता मी त्रयस्थ निरीक्षक म्हणून पाहू शकतो आणि त्यांचा आनंद समजू शकतो कारण आता "मी त्यांना सुधारायला आलो आहे" ही भावना नाही.
माझ्या तर बालपणीच्या रम्य आठवणी आहेतच, त्याबरोबर माझ्या कन्येचे पाहिलेले बालपण आणि गेली काही वर्षे रोटरीच्या कामासाठी शाळांमध्ये गेल्यावर दिसणारे बाल्य या सगळ्या स्मृतींवर धरलेल्या सायीसारखा इथला अनुभव मला वाटतो.
पाहुण्यांकडे वळून वळून पहाणे, त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे, त्यांचे काहीतरी काम करणे, बॅग घेऊन त्यांच्या पाठोपाठ चालणे, ते प्राचार्यांशी बोलत असताना खोलीबाहेर उभे राहून बाकीच्यांना अडवणे..... मध्येच एखादा हस्तांदोलनासाठी चिमुकला पंजा पुढे करतो, माझी फिरती नजर जाणवल्यावर डोक्यावरची ओढणी (उगाचच) नीट केल्यासारखे करणारी दुसऱ्या यत्तेतली लाजरी छकुली, आपल्या भांडणावर पाहुण्यांची नजर आहे हे जाणवल्यावर जीभ चावून दोघींनी एकमेकीचे हात हातात घेऊन पळून जाणे, लॅपटॉप किंवा प्रोजेक्टरच्या जोडाजोडीत सरांनी बोलावल्यावर आधी सगळ्यांकडे विजयी कटाक्ष टाकणे..... काय काय सांगू..?
यातच कुठेतरी 'मी' मला दिसतो...असाच पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पुढेपुढे करणारा, त्यांनी नाव, यत्ता, आवडता विषय असं काही विचारल्यावर 'सार्थक झाले जन्माचे' या भावनेने पुढचे पाहुणे शाळेत येईपर्यंत त्या आनंदकणांना मनात साठवणारा, घरात, मित्रांना ती आठवण पुन्हा पुन्हा सांगणारा, थोडं खरं आणि थोडं जे घडावं असं मनात वाटत होतं (पण घडलं नाही) ते घडलंच असं मानून स्वप्नरंजनात गुंगणारा मी, असा जेव्हा शाळांमध्ये काही कामानिमित्त जातो तेव्हा मी मला नव्याने दिसू लागतो.
मी चार पाच दिवस राहिल्यानंतर कुपवाडा होममधून परत निघालो.
तिथल्या जेमतेम सहा वर्षे वयाच्या एका मुलीने तिच्या मैत्रिणीकडून "स्वतःचे" म्हणून चित्र काढून घेतले, त्याच्यावर लिहून घेतले आणि मी निघणार त्यावेळी माझ्या हातात दिले.
मला काश्मिरी भाषा समजत नाही, तिला दुसरी भाषा बोलता येत नाही.परंतु तिची आठवण माझ्याकडे रहावी म्हणून हा खटाटोप.
लिहिणारी ही तिच्याचसारखी, गेले काही दिवस "happy teachers day" लिहित आहेत हे पाहून तिने तसेच लिहिले....
जिने दिले तिचे नाव त्या झग्यात एकेक अक्षर पद्धतीने लिहिले आहे जे कागद हातात धरल्यानंतरच वाचायला सापडते.
ASRA.
१९ सप्टेंबर....साप्ताहिक सभेत..शेफ कॉर्नर.... सुगरण कट्टा..... पी पी रो सुदर्शन नातू यांच्यातर्फे.... चटपटीत पाणीपुरीचा आस्वाद सर्वांनी मनसोक्त घेतला.
२६ सप्टेंबर....रो माधुरी किरपेकर यांनी बनवलेला राजस्थानी पदार्थ..... सुगरण कट्टामध्ये...... सर्वांनी मनसोक्त ताव मारला.
जसा मौर्य साम्राज्याचा अस्त व्हावयास लागला तसा तसा शुंग राजवंश मौर्यांच्या जागी आला.शुंग हिंदु होते व मगध मधून आले होते.दक्षिणेस सातवाहन, पांडीय,चोला राज्ये वसत होती.ऊत्तरेस बॅक्ट्रीयन जमात हिंदुकूश ओलांडून ख्रि.पू.एकशे ऐंशी साली काबूल मार्गे पंजाब मध्ये आली होती.एकेकाळी अलेक्झांडर ने त्यांच्यावर राज्य केले होते,त्यामुळे त्यांच्यात ग्रीक वंशज होते.त्यांचा राजा' मेनिनडर 'पाटलीपुत्र (पाटना)पर्यंत आला होता,पण त्याचा पराभव झाला.मेनिनडरने बुद्ध धर्म स्वीकारला. तो 'मिलींद' ह्या नावाने बुद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहे.ह्या ग्रीक व बौद्ध संस्कृतींच्या मिलाफातून 'गांधार 'कलेचा जन्म झाला.मध्य भारतात सांची येथे एक पत्थराचा स्तंभ आहेज्याला'हेलिओडोरस' स्तंभ म्हणतात तो एक साली उभारण्यात आला .त्यावर संस्कृत लेख कोरला आहे,ज्यायोगे ग्रीक वंशाचे भारतीय करण कसे झालेहे कळते.' हा विष्णुदेवाचा गरूड स्तंभ ' हेलिओडोरस ',जो विष्णुदेवाचा भक्त होता,डिऑन चा मुलगा होता,तक्षशीला चा रहिवासी होता,ग्रीक राजदूत होऊन राजा 'ॲनशीअलशीदास' कडून,राजा 'काशीपुत्र भगभद्र रक्षणकर्ता ',जो त्याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षात होता,त्याच्याकडे आला , व त्याने उभारला.आत्मसंयम स्वार्थत्याग, विवेकबुद्धी ,ह्या तीन तर्हांचे योग्य पालन केल्यास स्वर्ग प्राप्ती होईल. '
मध्य अशीयातील शक' जमातीने' ऑक्सस 'खोर्यात जम बसविला होता.ती ईरान मधील एक भटकी जमात होती,जी त्यांची गुरेढोरे घेऊन कुरण शोधीत फिरत असे.त्याना चीनी भटक्या जमातींनी त्यांच्या परिसरातून हाकलून दिले होते.सध्याच्या पाकिस्तानातील 'गंधार येथून ते सिंधु नदीच्या खोऱ्यात आले.चीनी जमातीचे नाव'युह चिह' असे होते,तर 'शक' जमातीचे मुळ नाव 'स्किथीयन' होते.'युह चिह' चे एक कूळ 'कुशान' यांनी शकांचा पराभव करून त्याना दक्षिणेत हाकलून दिले व ऊत्तर भारतात आपले वर्चस्व स्थापन केले.'शक' काठेवाड व दखःन पठार भागात आले.'शकांनी 'बौध्द व हिंदु धर्म स्वीकारला होता.'कुशाननी' ऊत्तर भारतात व मध्य अशीयात आपले साम्राज्य ऊभे केले होते.त्यांनी बौध्द व हिंदु धर्माचा स्वीकार केला.त्यांचा सम्राट 'कनीष्क 'बुद्ध आख्यायिकेतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.जरी कनीष्क बौध धर्मीय होता तरी त्याच्या राजधर्मात अनेक धर्मांचे मिश्रण होते.कुशान साम्राज्य भारताच्या सीमेवर असून ,त्याची राजधानी पेशावर व तक्षशीला जवळ होती.त्यामुळे आसपास चे स्किथीयन,युहचिह,इराणी, बॅक्ट्रीयन ग्रीक, तुर्की, चीनी,प्रवासी तेथे एकत्र येत असत,व त्यांच्यात सर्व प्रकाराची देवाणघेवाण चालत असे.गंधार शैली अशाच देवाणघेवाणीतून ऊगम पावली.ह्याच वेळेस चिनी व भारतीयांचा प्रथमच संबंध आला.चिनींनी भारतात पीच व पिअर ची झाडे आणली.गोबी वाळवंटाच्या सीमेवरील 'तूर्फान' आणि 'कूचा' येथे भारतीय,चीनी व ईराणी संस्कृतीचा एक सुरेख संगम झाला होता.
कुशान काळात बौध धर्मात महायान व हीनयान असे दोन पंथ तयार होऊन फूट पडली.महायान इ.स.पू.पाचशे सालापासून चालत आला होता. हीनयान इ.स.पू.दोनशे पन्नास मध्ये सुरू झाला.महायानात बुद्धाला दैवत्व मान्य करण्यात आले आहे व त्याच्या मूर्तीची पुजा होते.हीनयानात ,बुद्धाला दैवत मानले नाही,व कर्म,स्वयंशिस्त, आत्मसंयम, ध्यानाने मुक्ति मिळते, मुर्ती पुजेमुळे नाही असे विचार मांडले आहेत.हा वाद मिटविण्यासाठी अनेक परिषदा भरविण्यात आल्या.मुख्यतः काश्मीर त्यावेळेस कुशान साम्राज्याच्या मध्यभागात असल्याने,तेथेअनेक वेळेस चर्चा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.ह्या सर्व वादविवादात 'नागार्जून' यांचा मोठा सहभाग होता.नागार्जून हे एक ऊत्तूंग व्यक्तीमत्व होते.हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानात त्यांना फार मोठे स्थान आहे.त्यांच्यामुळे भारतात महायान तत्त्वज्ञानाचा विजय झाला.एकोणीस शे पन्नास साली जगात फक्त महायान पंथच अस्तित्वात आहे असे जाहीर झाले.महायान पंथ चीन,कोरिया, जपान,तिबेट येथे आहे.हीनयान पंथ श्रीलंका, मायनामार,कंबोडिया येथे आहे.
जरी कुशान भारतीय होते,तरी परकीय कुशान विरूद्ध देशप्रेमींचा विरोध चालूच होता.जेव्हा आणखी परकीय आक्रमणे व्हावयास लागली,तेव्हा चौथ्या शतकात हा विरोध ऊफाळून आला.त्याचवेळेस दूसरा चंद्रगुप्त राजा उदयास आला व त्याने परकीय घुसखोरांना हुसकावून लावले आणि गुप्त साम्राज्याची स्थापना केली.तीनशे विस सालांत गुप्त साम्राज्य स्थापण्यात आले व एकापाठोपाठ एक असे यशस्वी राजे त्यांत होऊन गेले.सततच्या परकीय आक्रमणांमुळे,परकीय विरूद्ध भावना जागृत झाल्या होत्या व पूर्वीप्रमाणे ब्राह्मण-क्षत्रिय वर्गाला आपली मातृभूमी व संस्कृती जपण्याची व रक्षण्याची जरुरी वाटू लागली.पूर्वीपासून आलेल्या परकीयांना आपले मानून,समाजात सामावून घेतले गेले,परन्तु नवीन आक्रमकाना जोरदार विरोध करण्यात आला.पूर्वीच्या 'ब्राह्मण ' तत्वाप्रमाणे एकसंध साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न झाला.किंतू, आत्मविश्वासाच्या अभावी त्यात ताठर पणा आला व भारत आंतरमुख बनला.
हे समाजाचे व देशाचे स्वकोशात जाणे सर्व थरात व सर्वत्र पसरले होते.पूर्वी जेव्हा आर्य भारतात आले,त्यावेळी नवीन जमात व त्यांची संस्कृती आणि जुनी जमात व त्यांची संस्कृतीत समन्वय साधण्याचा प्रश्न होता.त्यामधून आर्य भारतीय संस्कृतीचा जन्म झाला,जी आज भक्कम पायावर ऊभी आहे.बाकीचे परकीय आले गेले,त्यांचा ह्या संस्कृतींवर फारसा परिणाम झाला नाही.परकीयाना सामावून घेतले गेले. पूर्वी जरी भारताचे बाहेरील जगाशी संबंध होते,तरी भारत मुख्यत्वेकरून स्व व्यग्र होता व इतरांविषयी भारताला फारशी उत्सुकता नव्हती.परन्तु एकामागोमाग होणाऱ्या परकीय स्वाऱ्यांमुळे भारत खडबडून जागा झाला व भारतीय संस्कृती आणि रितीरिवाजांवरील धोक्याची भारतीयांना जाणीव झाली.राष्ट्राभिमान जागृत होऊन, ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववादाचे पुनरूज्जीवन झाले.बौद्ध धर्म जरी भारतीय असला तरी तो मुख्यत्वेकरून आंतरराष्ट्रीय झाला होता व त्याचा प्रभाव भारतापेक्षा भारताबाहेर जास्त होता.त्यामुळे ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववाद देशाभिमानाचे प्रतिक बनले होते.जरी धार्मिक आणि वैचारिक सहीष्णूता होती तरी सुद्धा परकीया विरूद्ध आक्रमकता वाढली होती. ह्या देशाभिना पोटी साम्राज्य शाही चा जन्म झाला.गुप्त साम्राज्य जे अतिशय प्रगत,रसरशीत, सुसंस्कृत होते,ते भरभराटीस आले.समुद्र गुप्ता ची तुलना नेपोलियन शी केली जाते.
चौथ्या शतकाच्या सुरूवातीच्या काळा पासून जवळ जवळ दीडशे वर्षे गुप्त साम्राज्य सुस्थितीत होते.त्यानंतर सुद्धा दीडशे वर्षे जरी गुप्त साम्राज्य अस्तित्वात होते,तरिही सततच्या परकीय आक्रमणांमुळे खिळखिळे होऊन लहान झाले होते'गोरे हून' मध्य अशीया मधुन भारतात आले व त्यांनी सर्वत्र विध्वंस सुरू केला.ह्या रानटी आणि कृर वृत्ती विरूद्ध, जनतेने यशोवर्धन गुप्त ह्याच्या नेतृत्वाखाली उठाव करून, हूनांचा पराभव केला व त्यांचा प्रमुख ' मिहीरगुला ' ह्याला बंदिवान केले.परन्तु भारतीय आणि गुप्त परंपरेनुसार 'बालदीत्य ' गुप्त याने मिहीरगुलास सन्मान पुर्वक वागविले व सोडुन दिले. ह्या सौजन्याची परतफेड मिहीरगुलाने ,परत येऊन विश्वास घाताने हल्ला करून,केली.हून साम्राज्य फक्त पन्नास वर्ष टिकले. काही लहान लहान हून राज्ये अस्तित्वात होती,पण बहुतेक करुन हून भारतीय समाजात मिसळले.सातव्या शतकात काही हून राज्यानी आक्रमकता दाखवली, परन्तू 'कनोज ' चा राजा हर्षवर्धन याने त्यांचा नायनाट केला व उत्तर आणि मध्य भारतात एका सबळ राज्याची स्थापना केली. हर्षवर्धन महायान बौद्ध पंथाचा होता,जो पंथ हिंदु संस्कृतीला जवळचा आहे.हर्षवर्धन ने बौद्ध व हिंदू या दोन्ही धर्मांना प्रोत्साहन दिले..त्याच्या काळात प्रसिद्ध चिनी वारकरी 'सुवान संग ' भारतात आला होता.हर्षवर्धन स्वतः कवी,नाटककार होता.त्याच्या दरबारात अनेक कलाकार होते.त्याची राजधानी 'ऊज्जैन ' ही एक प्रसिद्ध कलाकेन्द्र होती.हर्षवर्धन इ.स.सहाशे अठ्ठेचाळीस मध्ये मृत्यू पावला.त्याचसुमारास अरबस्तानात इस्लाम चा उदय होत होता.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर हजार वर्षात दक्षिण भारतात मोठमोठाली राज्ये उदयास आली. 'आन्ध्र ' ज्यांनी शकांचा पराभव केला.कुशान ,आन्ध्र चे समकालीन होते.'चालूक्य' ',राष्ट्र कूट',दक्षिणेस पल्लव,चोला,ज्यांनी श्रीलंका व दक्षिण ब्रम्हदेश जिंकला.पल्लवानी मुख्यत्वेकरून भारताबाहेर वसाहती स्थापन केल्या.दक्षिण भारतातली राज्ये, स साम्राज्ये,सागरी सत्ता होत्या. त्यांचा समुद्र मार्गे व्यापार चालत असे.ग्रीक वसाहती पण दक्षिणेत होत्या. रोमन नाणी सुद्धा उत्खननात सापडतात.चालूक्य साम्राज्याच्या वकिलांची ईराण मधील' सासनीड ' साम्राज्याच्या वकीलांशी देवाणघेवाण होत असे.उत्तरेकडील सततच्याआक्रमणांचा परिणाम दक्षिण भारतावर फारसा झाला नाही.परन्तु त्यामुळे उत्तरेकडून अनेक कलाकार, स्थापत्य कलाकार, कारागीर, दक्षिणेस पुरातन कलेचा वारसा घेऊन आले.उत्तरेस परकीय कलेचा पगडा होता.नंतरच्या काळात ह्या प्रक्रियेनेआणखी वेग घेतला व दक्षिण भारत सनातनी हिंदुत्वाचे केन्द्र बनले.
समाप्त.
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील चतुर्थ स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात तसेच चौथी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच मंगळानंतर येणारा ग्रह बुध आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील तृतीय स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील चतुर्थ स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
४) चतुर्थ स्थान (गृह स्थान, मातृ स्थान):
वदन्ति विद्या जननीसुखानि । सुगंधगोबंधु मनोगुणानि । महिपयान क्षितिमंदिराणि । चतुर्थ भाव प्रभवाणि तज्ञाः ।।
चतुर्थ स्थानावरून घराचे सुख ठरते. घर कसे असेल, घराच्या भिंतीपासून ते घरातील माणसे कशी असतील हे या स्थानावरून कळते. घरातील माणसांमध्ये आपसात संबंध कसे असतील ? तसेच जमीनीचे सुख कीती आहे हे कळते. हे मातृस्थान असल्याने, आईशी पटणे, न पटणे, आई कशी असेल, हे ही कळते. घर, दार, नोकर, चाकर, वाहन तसेच उत्तर आयुष्यातील सुख कसे असेल हे या स्थानावरून ठरते. घरातील पाळीव प्राणी, पशुधन, गाई, म्हशी, कुत्री, मांजरी, पोपट, वगैरे गोष्टी, त्याची व्यक्तीला आवड, त्यापासून होणारे तोटे किंवा लाभ याचाही विचार चतुर्थ स्थानावरून करतात.
चतुर्थ स्थानाचा अंमल हृदयावर (Heart) असतो. त्यामूळे Heart शी संबंधित रोग अथवा व्याधींसाठी यास्थानाचा विचार करावा लागतो.
आता आपण १२ राशींमधील चौथी कर्क रास पाहूया.
3) कर्क रास: कर्क, वृश्चिक व मीन या तीन जलतत्वाच्या राशी आहेत. जलतत्त्वाच्या राशी असल्यामूळे यात आर्द्रता खूप आहे. खूप प्रेमळ आणि थोड्या वाहवत जाणाऱ्या या राशी आहेत.
जलतत्वाच्या राशी असल्यामुळे स्किन खूप छान असते: कॉम्प्लेक्शन चांगले असते यांना कलेची आवड आहे. उत्स्फुर्त पणे येणारी कला आहे. एस्थेटिक व्यूह चांगला आहे. बारीक सारीक गोष्टींमधूनही काहीतरी कलाकृती करतात. तीनही राशींमध्ये सात्विक सौंदर्य दिसते.
राशीस्वामी चंद्र आहे. तो ही जलतत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे या व्यक्ती खूपच sensitive आणि खूपच emotional असतात. डोळ्यातून घळाघळा पाणी येते. घर, कुटुंब यात रमणाऱ्या व्यक्ती आहेत. अतिशय दयाळू आहेत. कोणालाही पटकन काहीही उचलून देतील अशा आहेत. ही मातेची रास असे म्हटलेले आहे. हे लोक स्वतःला हवी असलेली गोष्ट काही करून मिळवतातच. या राशीचा symbol हा खेकडा आहे. खेकड्याची पकड ज्या प्रकारे घट्ट असते त्याच प्रमाणे सगळ्या गुणांच्या विरुद्ध एक प्रकारचा हट्टीपणा या राशीकडे आहे. या लोकांचे विचार, त्यांच्या कल्पना बदलणे अवघड असते. स्वतःचे विचार आणि कल्पना या बाबतीत, या राशीमध्ये खूप हट्टीपणा, हेकेखोरपणा दिसतो. याचे कारण राशीस्वामी चंद्र आहे स्वतःच्या चुकाही दुसऱ्यावर ढकलून देतात. दुसऱ्याच्या प्रभावाखाली पटकन येतात. चंचलता खूप असते. चंद्राच्या कलां प्रमाणे अमावस्या व पौर्णिमा यांचाही या राशीवर प्रभाव पडताना दिसतो. इतकी चंद्राला पूरक रास आहे.
चंद्र जर शुभ असेल, तर वरचे हे सगळे गुण अतिशय चांगल्या प्रकारे दिसतात. मात्र जर चंद्र बिघडला असेल, तर मात्र या गुणांचे दुर्गुण होताना दिसतात. चंद्राच्या स्थितीवर अत्यंत अवलंबून असणारी रास आहे. या राशीचे स्वरूप मध्यम उंची मध्यम बांधा, गोल चेहरा असे आहे. यांचे complexion छान असते. चेहऱ्यावर शांत, शीतल भाव असतात. कर्क लग्नाच्या व्यक्तीच्या नाकाचा शेंडा थोडा पूढे तर नाकपुडया वक्राकार मागे असतात.
या राशीचा अंमल छातीवर, हृदयावर आहे. तसेच शरीरातील सर्व द्रवपदार्थावर आहे. त्यातही रक्ताभिसरणावर अतिशय strong अंमल आहे.
या लेखातील पुढील भागात आपण बुध या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
4) बुध: (मिथुन, कन्या) : बुध हा अंर्तग्रह आहे. आकाराने लहान त्यामुळे कुमार ग्रह म्हणतात. Teenage च्या आत असे बुधाचे वय मानले आहे. त्यामुळे त्याचा अंमलही त्या वयापर्यंत जास्त असतो. तसेच बलवान ग्रहांच्या युति मध्ये जर बुध असेल, तर त्या ग्रहांचा प्रभाव होताना दिसतो. बुध हा बुद्धिचा कारक ग्रह आहे, पण शिक्षणाच्या दृष्टीने १०/१२ वर्षापर्यंतच बुधाचा विचार करावा लागतो. नंतरच्या, उच्च शिक्षणासाठी मात्र गुरू आणि मंगळाचा विचार करतात.
व्यावहारीक बुद्धिमत्ता व त्यासाठी लागणारे गुण हे बुधाच्या अंमलात असतात आणि त्याचा प्रभाव मात्र आयुष्यभर राहतो. तो १०/१२ वर्षापर्यत संपत नाही. व्यवसायात बोलणे महत्वाचे आणि बोलणे/ वाणी ही बुधाच्या कारकत्वात येते. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने बुध हा महत्वाचा आहे.
Grasping, memory & Logic या तिन गोष्टी बुधाकडे उत्तम आहेत. त्यांचा योग्य वापर करणे पण त्यांना उत्तम जमते. Curiosity खूप असते. वाचन, मनन, लेखन या गोष्टींची मात्र तयारी नसते. Memory उत्तम असते. अगदी Photographic memory म्हणता येईल व त्याचा उपयोगही ते चांगल्या प्रकारे करू शकतात. Grasping चांगले असल्याने वक्तृत्व आणि लिखाण बुधाच्या कारकत्वात येतात. आता या सर्व चांगल्या गोष्टी झाल्या.
पण बिघडलेला बुध हा फसवेगिरी, खोटे बोलणे, खोट्या सह्या करणे, इत्यादी गोष्टी करू शकतो. Dirty Politics हे बिघडलेल्या बुधाच्या under येते. शाई आणि पेपर या गोष्टी बुधाच्या कारकत्वात येतात. त्यामुळे पुस्तकांशी संबंधीत व्यवसाय, पत्रकारीता गोष्टी बुधावरून आणि जोडीला गुरु वरून ठरतात. Typing, computers, Xerox या गोष्टीही बुधाच्या कारकत्वात येतात.
तसेच बुध हा त्वचेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे skin diseases बुधाच्या under येतात. बुध हा मामाचा कारक ग्रह आहे. मामाचे सुख बुधावर अवलंबून असते. 'ज्योतिषशास्त्र' हे बुधाच्या कारकत्वात येते.
स्वरूप :- कुमार ग्रह असल्यामुळे स्त्री कींवा पुरुष असे म्हंटलेले नाही. ऊंची कमी, किरकोळ शरीरयष्टी, काळसर रंग, पण चेहऱ्यावर बौद्धिक तेज आहे . तसेच मिश्किल भाव आहेत. बुधा जवळ उत्तम विनोदबुद्धी आहे. घरात एक जरी बुधाची व्यक्ति असेल तरी घर हसते खेळते राहते.
क्रमशः
नमस्कार मंडळी... "शांताराम आठवले"आपल्या सर्वांनाच माहिती आहेत.. "संत तुकाराम" या प्रभातच्या चित्रपटातील "आधी बीज एकले" या अभंगाचे ते रचनाकार आहेत... त्यांनी लिहिलेलं १९७२-७३ साली प्रकाशित झालेलं "सुखाची लिपी" नावाचं दुर्मिळ पुस्तक माझ्या संग्रही आहे... त्यात "संगीत"या विषयावर लिहिलेल्या एका चांगल्या लेखाचं मी आज वाचन करणार आहे...
ते म्हणतात...
संगीत ही विश्वभाषा आहे..भावनेची भाषा आहे.संगीतातील स्वर लहरींचे सामर्थ्य अमोघ आणि अमाप आहे...
संगीताचा परिणाम पशुपक्ष्यांवर आणि वनस्पती सृष्टी वरही होतो हे आता शास्त्रसिद्ध झाले आहे... संगीत हा ओंकार या दिव्य मूळ ध्वनीचा मधुर आविष्कार आहे... ओंकारातून आविष्कृत झालेल्या संगीताचा आणि नादब्रह्माचा परिणाम माणसाच्या मनावर -- मज्जातंतूवरच नव्हे तर अंतर्मनावरही होतो... या सामर्थ्याचा अनुभव घेऊन आणि अभ्यास करून भारतीय ऋषीमुनींनी त्याचे शास्त्रच बनविले आहे... भारतीय संगीतातील रागरागिण्यांची अभिजात, रेखीव आणि आल्हादक रचना हा या अभ्यासाचाच परिपाक आहे...
"वीणा" या भारतीय वाद्याचा आकार "ओम" या अक्षरावरून सुचलेला आहे. उपनिषदातील ऋषींनी ओमकार याला विश्वविणेची उपमा दिली आहे. या संदर्भात विनोबा म्हणतात..." हा ओंकार सर्वसहिष्णू असल्यामुळे याला बरे वाईट सर्वच ध्वनी सहन होऊ शकतात... कोणत्याही स्वराशी हा विसंवादी होत नाही... किंबहुना याच्या विश्वसंवादी नादामध्ये अनेक विसंवादी स्वर खपून जातात.... अशा सर्वसहिष्णू आणि विश्वसंवादी ओंकाराचा मंजुळ बोल बोलणारी ही वीणा कोणती असेल बरे...?? देवी सरस्वतीच्या हातातील या ओंकारवादिनी वीणेला ऋषी "शांती"या नावाने ओळखतात ....
भाषण, पठण इत्यादींच्या ठिकाणी जो रस, जी सौंदर्य निर्मिती होते ती या स्वरांची किमया..बरं का....!! वर्णमालेतील व्यंजनांना या स्वरांचा आश्रय केल्यावाचून उभे राहता येत नाही.... अशा या स्वरांच्या संयोजनाने झालेली संगीत निर्मिती हा ओंकाराचा मधुर आविष्कार आहे....
भारतीय संगीतातील राग यांची स्वररचना मंत्र मय आहे....अशा विशिष्ट रागिणीच्या गायनामुळे विशिष्ट आकृतिबंध निर्माण होतात... या सिद्धांतावर प्रकाश टाकणारी एक दंतकथा अत्यंत बोलकी आहे...
नारद म्हणजे मूर्तिमंत संगीत....नारदांचे वीणावादन आणि गायन श्रीहरीला अत्यंत प्रिय.... पण एकदा नारदांना आपल्या संगीत नैपुण्याचा अहंकार झाला.. त्याच भरात यांचे गायन वीणावादन भगवंता पुढे चालू होते.... पण भगवंताच्या मुद्रेवर मात्र प्रसन्नते ऐवजी उद्रेकाचे भाव उमटत असल्याचे त्यांना दिसून आले.... ते पाहून नारदांनी श्रीहरीला प्रणाम केला आणि नम्र भावाने विचारले...," प्रभु अप्रसन्नतेचे कारण कळेल का...??" भगवंतांनी स्मित केले आणि नारदांना काहीशा खोचक स्वरात म्हणाले...," खरे संगीत कशाला म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपण एक वेळ गंधमादन पर्वत त्याला भेट द्या...त्या एकांतस्थळी हनुमंत तप करीत आहे... त्यांची भेट घ्या म्हणजे सर्व उलगडा होईल..."
नारद निघाले गंधमादन पर्वतावर पोचले.. त्या प्रदेशातून जाताना एका वृक्ष वाटिकेत स्त्रियांच्या विलापाचे करुण स्वर ऐकू आले.. कुतूहलाने ते त्या वाटिकेत शिरले ....तेव्हा काही अप्सरातुल्य रमनींचा
समुदाय दिसला... त्यापैकी प्रत्येक सुंदरीच्या एखाद्या तरी अवयवात व्यंग किंवा विद्रुपता असल्याचे त्यांनी पाहिले.. कोणाच्या नासिकेची कळी छेदली गेली होती... तर कोणाचे हात विद्रूप झाले होते.. ते दृश्य पाहून नारद मुनी द्रवले..त्यांनी स्नेहभावाने रमणींची विचारपूस करून त्यांच्या या दारुण अवस्थेचे कारण विचारले... तेव्हा त्या म्हणाल्या...," आम्ही सर्व संगीतातील वेगवेगळ्या राग देवता आहोत...संगीततज्ञ असूनही नारद नावाच्या ऋषीने वैकुंठात असे काही सदोष गायन केले की त्याचा परिणाम म्हणून आमच्या ठिकाणी हे शरीर दोष निर्माण झाले.... नारदाने केलेला प्रमाद कोणीतरी जाणत्या संगीतकारांनी सुधारून शास्त्रशुद्ध आणि अचूक संगीता आळविल्याशिवाय या वैगुण्यातून आमची मुक्तता होणार नाही..." क्षणार्धात नारदांच्या अहंकाराचा निरास झाला.. आपल्या सदोष गायनामुळे या सुंदर देवतांना अशी विरुपता प्राप्त व्हावी याचे त्यांना अत्यन्त दुःख झाले... "आपणच ते अपराधी नारद आहोत.." असे सत्य सांगून त्यांनी त्यांची क्षमा मागितली... व्यथित मनाने नारद त्या देवतांना पुढे म्हणाले.." या पर्वतावर तप करीत असलेल्या हनुमंताच्या भेटीसाठी मी येथे आलो आहे... त्यांनी साधनेच्या द्वारे संगीत कलेत
पूर्णता प्राप्त करून घेतली आहे त्यांच्या पायाशी बसून मी संगीताचे पाठ घेऊन माझ्या गायनातील दोष आणि उणीवा दूर करून ते निर्दोष करीन आणि मग तुम्हा सर्वांना आपल्या मूळ स्वरुपाची प्राप्ती होईल..." असे म्हणून नारद मुनी पुढे निघाले...
पर्वताच्या एका रम्य शांत शिखरावर हनुमंताचा निवास होता.. नारायण नामाचा जयघोष करून नारदांनी हनुमंताच्या चरणी मस्तक ठेवले.. हनुमंत आश्चर्याने पाहतच राहिले.. नारदांनी आपल्या आगमनाचा हेतू उघड केला...," संगीत कलेत मी परिपूर्ण झालो आहे.. अशा भ्रममूलक अहंकाराने मी फुगून गेलो होतो.. पण भगवंतांनी माझ्या अहंगंडावर प्रहार केला आणि खऱ्या संगीताचे ज्ञान करून घेण्यासाठी त्यांनी मला आपणाकडे पाठवले आहे...तेव्हा आपण कृपावंत व्हावे आणि मला संगीतातील परमोच्च लाभ मिळवून द्यावा..."
हनुमंताने मंदस्मित केले... नारदांच्या हातातील वीणा आपल्या हाती घेऊन त्यांनी ती वाजवण्यास प्रारंभ केला..थोड्याच वेळात एका अपूर्व स्वरविश्व त्या ठिकाणी अवतीर्ण झाले.... हनुमंत आपले देहभान विसरले.. तल्लीन अवस्थेत त्यांचा स्वरविहार वातावरणात अमृतानंद निर्माण करीत होता... नादब्रम्हाच्या त्या साक्षात्काराने नारदांना स्वतःच्या थिटे पणाची जाणीव करून दिली. थोड्याच वेळात तो अमृतप्रवाह थांबला... हनुमंतांनी नारदांना काही तांत्रिक रहस्ये उलगडून सांगितली आणि तदनुसार वीणावादन करण्याची अनुज्ञा दिली..
हनुमंतांनी खाली ठेवलेली वीणा नारद आपल्या हाती उत्साहाने घेऊ लागले.. तो एक चमत्कार झाला.. हनुमंताचे वीणावादन चालू होते त्यामुळे त्यांच्या स्वरलहरिंच्या प्रभावाने भोवतालचा कण न कण द्रवला होता ,विरघळला होता... हनुमंतांनी वीणा खाली ठेवताच तेथील भूमीने पूर्ववत आपले काठीण्य धारण केले... परिणाम असा झाला की शिलाखंडात रुतून बसलेली वीणा काही केल्या उचलली जाईना ..नारदांना काय करावे ते सुचेना.. त्यावर हनुमंतांनी हसून उपाय सुचवला.. ते म्हणाले ,"या शिळा पुन्हा वितळतील, विरघळतील असे अमोघ रागगायन कर..." त्यांनी उत्कृष्ट राग आळवण्याची पराकाष्ठा केली... परंतु भूमी द्रवेना...तिच्या ठिकाणी सहृदयतेचा पाझर फुटेना... नारदाना आपला पराभव मान्य करावा लागला... ते हनुमंतांना विनम्र भावाने शरण गेले... त्यावर हनुमंतांनी गायनाला आरंभ केला... त्यांच्या स्वर प्रभावामुळे थोड्याच वेळात प्रचंड शिलाखंड आपली कठोरता विसरून स्नेहार्द्र झाले... भोवतालची सर्व भूमी लोण्यासारखी मऊ झाली.... त्यामुळे हात लावताच रुतून बसलेली नारदांची विना सहजपणे उचलली गेली... नारदांचा अहंकार त्या दिवसापासून निरंतरचा नाहीसा झाला..
या दंतकथेत फार मोठे सत्य सहजपणे विशद केले आहे .."खडकाला ही पाझर फोडण्याचे सामर्थ्य शास्त्रशुद्ध सुरेल संगीतात आहे".. असा बोध ही कथा सांगते..
भारतीय संगीत मुळातच शक्तीगर्भ आहे.. नव्या जीवनाच्या संदर्भात संगीत सामर्थ्याचा अभिनव प्रयोग आणि उपयोग करून जीवन अधिक समृद्ध आणि निरामय करणे आपल्या अधीन आहे ...हा उपाय जसा स्वाधीन तसाच सोपा आणि स्वस्तही आहे...
ईश्वराला आळवण्यासाठी... दुःखाला पळवण्यासाठी.. भावना चेतवण्यासाठी... विकारांना विझवण्यासाठी... संग्रामाला आव्हान देण्यासाठी. आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी. जिचा सारखा उपयोग होतो अशी संगीत ही एकच किमया आहे...
सध्या इतकेच..
कधी कधी नकळत योग्य काय आणि अयोग्य काय याच्या व्याख्या आपण आपल्या मनात बनवून ठेवलेल्या असतात. आसपासच्या लोकांची वागणूक, घडणाऱ्या गोष्टी, कुठेतरी आपण या व्याख्यानुसार तोलून त्याविषयी आपलं मत बनवत असतो. आता गंमत अशी आहे की एखाद्याला जे अगदी बरोबर वाटते ते दुसऱ्याला अगदी चुकीचे वाटू शकते. लहानपणी गरीबी बघितलेल्या एखाद्या व्यक्तीला सुबत्ता आल्यानंतर सुद्धा जुने कपडे अगदी फाटे पर्यंत वापरणे योग्य वाटू शकते तर एखाद्याला सुबत्ता येण्याच्या आधीच उत्तम कपडे घालून टापटीप राहणे योग्य वाटते.
जगाला स्वतःच्या नजरेतून तोलणारी लोक ही कायमच दुःखी असतात, कारण त्यांना आसपास सगळ्या न पटणाऱ्या गोष्टीच दिसतात.
चूक आणि बरोबर याची व्याख्या असणं काही गैर नाही, पण इथून पुढे हे मात्र लक्षात ठेवायचं की ही व्याख्या मी फक्त स्वतःलाच लावणार, सतत जगाला माझी फुटपट्टी लावून मोजत बसणार नाही.
रांगोळी या विषयावर बुलेटिनसाठी एक लेख लिही अस मृदुलाने सांगितल म्हणून हा लेखन प्रपंच . रांगोळी चा उल्लेख आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून आढळतो.रांगोळीला परंपरा नसून सुंदर इतिहास आहे .वनवास संपवून राम अयोध्येत परत आले तेव्हा मार्गावर रांगोळी काढून स्वागत केल्याचा उल्लेख रामायणात आहे.तसेच जनाबाईंच्या अभंगात -
*विठोबा चालला मंदिरात
रांगोळी घातली गुलालाची
राम कृष्ण आले ऐकूनिया
उतावीळ झाल्या गवळणी
रांगोळी नाना परी अंगणी
घालीताती सप्रेमे
असा उल्लेख सापडतो.
रांगोळी हा सौंदर्याचा आविष्कार,,मनातील भावना व्यक्त करणारी एक कला आणि मांगल्याचे प्रतिक आहे. साधारणपणे दारात, देवासमोर तुळशी समोर अंगणात रांगोळी काढली जाते. आता ह्या रांगोळी काढण्या मध्ये विविध प्रकार आढळतात.
तुम्हाला माहिती आहे का रांगोळी कशापासून करतात ते -- पांढऱ्या रंगाचा थोडा मऊ ठिसूळ दगड असतो त्या दगडाची पावडर म्हणजेच ही रांगोळी याला शिरगोळ्याची रांगोळी असेही म्हणतात . पूर्वी यामधे हळद,कुंकू,गुलाल मिसळून रंगीत रंगावली रेखाटली जात असे.रांगोळीत गोपद्म, स्वस्तिक, कमळ ,शंख,चक्र, गदा, पद्म इत्यादी शुभ चिन्ह देवासमोर काढली जातात. सुंदर ठीपके काढून ते एकमेकास जोडून सुरेख रंगावली तयार होते.चैत्र महिन्यात रांगोळीतून देव, देवता ,आयुधे,प्राणी,पक्षी,वस्तू इत्यादींची चित्रे काढली जातात त्याला चैत्रांगण म्हणतात.
घराच्या उंबरठयावर रांगोळी घालण्याचा प्रघात आहे. रांगोळीतून त्रिकोण, चौकोन ,आयत , गोल रेखाटल्या मुळे नकारात्मक ऊर्जेचा विनाश होतो असे म्हटले जाते.
मंगल प्रसंगी पाटाभोवती, ताटाभोवती,रांगोळी काढली जाते.अंगठा आणि बोटाच्या चिमटीत रांगोळी पकडून रांगोळी काढली जाते.अशी बोटांची पकड म्हणजे ज्ञानमुद्रा होते त्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कमी होते, मनःशांती मिळते असे काही विज्ञान निष्ठ मंडळी म्हणतात.
विविध रंगाच्या फुलांची रांगोळी, धान्याची रांगोळी अनेक समारंभात सुशोभीकरणासाठी काढतात.
अंदाजे पाच हजार वर्षांपासून कदाचित त्याआधी पासून रांगोळी काढण्याची परंपरा आपण आजही जपलेली दिसते. अनेक संस्था रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण देत आहेत.रांगोळीचा गालीचा ,निसर्ग देखावा,व्यक्तीचित्रे, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी इत्यादी अनेक प्रकार रांगोळी मधून साकारले जातात.
रांगोळी आपल्याला आरोग्य ,समृध्दी, शांतता देते.अशुभ शक्तींना थोपवून धरते.
वेगवेगळ्या प्रांतात ,राज्यात रांगोळीचे वैविध्यपूर्ण प्रकार आहेत.तो एक वेगळा लेख होऊ शकतो.
असे हे रांगोळी पुराण जरा जास्तच लांबले .आता इथेच थांबते.
नमस्कार मंडळी,
दिव्यांचा सण दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा सण.... तर या वर्षी या दिवाळीत टीपून घ्या आनंद क्षण..... आणि पाठवा ती आनंद चित्रे आमच्याकडे!
बघुया आपल्याला आनंदाने पुलकित करणारे ते क्षण, देखावे कसे आहेत ते.... तुमच्या नजरेतून.
आपल्या रोटेरीअन आणि ann साठी आनंद चित्रे स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
आपण स्वतः केलेला आकाशदिवा असो, रोषणाई असो, फराळाचे पदार्थअसो वा सुबक, सुंदर रांगोळी असो..... त्यांची छायाचित्रे (फोटो), ann अस्मिता आपटे यांच्याकडे मेलवर किंवा watsapp वर पाठवा.
दिवाळी विशेषांकामधे आपण काढलेली छायाचित्र आणि स्पर्धेचा निकाल प्रसिद्ध केला जाईल.
वाट बघतोय आपल्या आनंदचित्रांची.....
७ सप्टेंबर २०२२
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती आणि पूजा आपले प्रेसिडेंट रो संजीव ओगले यांनी केली. याबद्दल रो बाळ परांजपे आणि रो अरविंद शिराळकर यांचे विशेष आभार.
७ सप्टेंबर २०२२
वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, शुक्रवार पेठ, पुणे.. इको क्लब स्थापन.
प्रेसिडेंट रो. संजीव ओगले यांनी मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात रोटरी च्या माध्यमाशी जोडून कार्यक्रमाची सुरुवात केली. पास्ट प्रेसिडेंट रो. सुदर्शन नातू यांनी रोटरी विषयी माहिती देताना इको क्लब चे महत्व सोप्या शब्दात समजावून सांगितले. रो. राघवेंद्र- अव्हेन्यू डायरेक्टर याने आभार प्रदर्शन केले. 50 मुलांचा सहभाग असणारा हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. कार्यक्रमाला ऍन अस्मिता आपटे. को चेअर अँन माधवी देशपांडे, अँन यामिनी पोंक्षे याही उपस्थित होत्या.
रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी आपल्या क्लबने आंबवणे येथील सरस्वती विद्यालयात दिलेल्या केमिस्ट्री लॅब चे उद्घाटन आणि हस्तांतरण व इंटरॅक्ट क्लबचे इन्स्टॉलेशन आणि नंतर करंजवणे येथील शाळेला दिलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन, असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते.
ह्या कार्यक्रमाला सुप्रसिध्द बालसाहित्यिक व युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शिक्षण विषयक उपक्रमां मध्ये भरीव योगदान दिलेले श्री. राजीव तांबे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
आंबवणे येथील कार्यक्रम म्हटला की दत्ताजींच्या फॉर्म हाऊस वर जाणे आणि त्यांच्या खास पाहुणचाराचा आनंद घेणे हे आलेच. प्रेसिडेंट ने कार्यक्रमाचा मेसेज पाठवला आणि बघता बघता पंचवीस लोकांनी होकार कळवला सुध्दा!
सर्वांनी दत्ताजींच्या फॉर्म वर ब्रेकफास्टसाठी साडे नऊ वाजेपर्यंत पोहचावे असे कळविले होते. ब्रेकफास्टला दडपे पोहे, पापड, बटाटावडा-पाव व भाजलेले शेंगदाणे असा खास मेनू ठेवला होता. सौ अंजली वहिनींनी स्वतः केलेले दडपे पोहे तर केवळ अप्रतिम! सर्वांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. चहा,
गप्पागोष्टी झाल्यावर सर्व मंडळी शाळेकडे प्रस्थान करती झाली.
सर्वप्रथम शाळेमध्ये तयार केलेल्या रसायन प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले सर्वांनी त्या लॅबची पाहणी केली व नंतर खालच्या हॉलमध्ये सर्व मंडळी जमली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रमुख पाहुण्यांचा व रोटरी मंडळींचा शाल व नारळ देऊन सत्कार केला व प्रेसिडेंट रो संजीव ओगले यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली.
प्रेसिडेंट रो. संजीव ओगले यांनी थोडक्यात रोटरी व आपल्या क्लब करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि या शाळेत आपण केमिस्ट्री लॅब का दिली आणि इंटरॅक्ट क्लब का सुरू ठेवला हे विषद केले. त्यांनी याप्रसंगी बोलताना, विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. भविष्यात देखील या प्रयोगशाळेच्या संदर्भात जी काही मदत लागेल ती क्लब तर्फे पुरविण्याचे आश्वासन पण दिले.
ह्यावेळी ही प्रयोगशाळा कशी स्थापन झाली याची माहिती रो. सुदर्शन नातू यांनी दिली.
रोटरी वर्ष 20-21 हे कोरोना चे वर्ष होते त्यावर्षी जानेवारी 2021 मध्ये आपले जेष्ठ रो व माजी अध्यक्ष डॉ सुधांशु गोरे यांनी आंबवणे शाळेला भेट दिली असताना त्या वेळचे प्राचार्य श्री चोरगे सर व पाठारे सरांनी शाळेला रसायन प्रयोगशाळा हवी आहे असे सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना कित्येकदा फक्त थियरी वाचून प्रॅक्टिकल न करता केमिस्ट्री सारखा विषय पुरेसा आत्मसात होत नाही. स्वतः प्रयोग करून त्याचे रिझल्ट पाहिले किंवा एक वेगळाच अनुभव व आनंद मिळतो आणि त्यामुळे तो विषय त्यांच्या स्मृतीत दीर्घकाळ राहतो. वेल्ह्या सारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये आर्थिक व इतर बऱ्याच कारणामुळे प्रयोगशाळेची सोय होऊ शकत नाही त्यामुळे त्या भागातील विद्यार्थी सरस्वती शाळेत प्रयोग करण्यास येत असतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन डॉक्टर गोरे सरांनी एसपी महाविद्यालयातील रसायन विभागाच्या मुख्य, प्रो डॉ अवसरे यांची भेट घेतली व त्यांना सल्ला मागितला. त्यांनी स्वतः शाळेला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली व प्रयोगशाळेचा एक उत्तम आराखडा तयार करून दिला. शाळेकडे याची पूर्तता करण्यास साधन संपत्ती नसल्याने त्यांनी रोटरीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. गोरे सरांनी आपण हे काम नक्की करूया असे सांगून कामाची दिशा ठरविली व काम सुरू केले. बोर्डाने पण हा उपक्रम मंजुर केला. काम पूर्ण करण्यासाठी मदत कुठून मिळेल याची चाचपणी सुरू केली. ज्येष्ठ रो गोविंदराव ह्यांचा प्रयत्नांतून एका उदार देणगीदाराने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर या उपक्रमासाठी मोठी देणगी दिली. मागील रोटरी वर्षात म्हणजे 21-22 यावर्षी प्रयोगशाळेत लागणारे बेंचेस व इतर सोयी पूर्ण करण्यात आल्या. प्रयोग शाळेमध्ये लागणारे उपकरणे व केमिकल्स याची आवश्यकता होती आणि त्यासाठी आपल्या क्लबचे प्रेसिडेंट रो संजीव ओगले व फर्स्ट लेडी अँन स्नेहा ओगले हे पुढे आले व प्रयोग शाळेत लागणारी सर्व उपकरणे आणि केमिकल्स यासाठी देणगी दिली. या सर्व गोष्टी जुळून आल्याने आज आपण या शाळेत प्रयोगशाळेचे उद्घाटन करू शकलो. सध्याचे प्राचार्य धनवटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाची मदत व साथ दिली.
यानंतर नववीच्या विद्यार्थ्यांचा इंटरॅक्ट क्लबचे इन्स्टॉलेशन म्हणजेच अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची निवड व पदग्रहण करण्यात आले.
या वर्षाकरिता,
अध्यक्ष - विघ्नेश दत्ता मळेकर
सचिव - प्रणाली सुरेश शिंदे
खजिनदार - सिद्धार्थ सतीश लिमण
ह्यांची निवड झाली. त्यांना रोटरी ची पिन प्रदान करण्यात आली. इंट्रॅक्टच्या सर्व सदस्यांना शपथ देण्यात आली. इंट्रॅक्टच्या कार्यपद्धतीची व उपक्रमांची माहिती अँन अस्मिता आपटे यांनी दिली. प्रमुख पाहुण्यांची ओळख रो सुदर्शनने करून दिली व त्यानंतर श्री राजीव तांबे यांनी मुलांची संवाद साधला. साधारणपणे दीड तास चाललेल्या या संवादात सर्व मुले आणि इतर उपस्थित शिक्षक व रोटेरीयन्स गुंगून गेले होते. त्यांनी सहजतेने मुलांना आत्मविश्वास कसा वाढवावा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले. मुला मुलींनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमानंतर सर्वजण करंजवणे येथील प्राथमिक शाळेत पोहचले. या शाळेला एका ग्रंथालयाची जरुरत होती आणि त्याची माहिती कळतच आपल्या क्लबचे ज्येष्ठ रो श्री दत्ताजी व सौ अंजलीताई देवधर यांनी पुढे येऊन हे ग्रंथालय उभे करून दिले. या ग्रंथालयात मुलांसाठी कपाटे, टेबल, खुर्च्या व उत्तम पुस्तके देण्यात आली. छोटे पण अतिशय सुंदर व सुबकतेने रंगवलेले हे वाचनालय देखणे झाले आहे. मुलांना याचा खूप उपयोग होणार यात शंका नाही. श्री राजीव तांबे यांनी मुलांची संवाद साधला. ही मुले सातवीपर्यंतची असल्याने त्यांच्याशी त्यांनी अनोख्या पद्धतीने संवाद साधला. छोट्या छोट्या गोष्टी रंगवून सांगत त्यांनी विज्ञानातील काही गोष्टी मुलांच्या मनात इतक्या सहजतेने बिंबवल्या की आता ते कधीच विसरणार नाहीत. सर्व मुले त्यांच्या गोष्टीत रममाण झाली होती व उत्स्फूर्त प्रतिसाद देत होती.
या कार्यक्रमानंतर सर्वांनी श्री दत्ताजींच्या फार्महाऊस कडे प्रयाण केले दुपारचे दोन वाजून गेले होते त्यामुळे सर्वांना कडाडून भूक लागली होती. फिलोशीप ची तयारी पूर्ण होती त्यामुळे सर्व मंडळी निवांत होऊन फेलोशिपचा आस्वाद घेऊ लागली. अतिशय रुचकर भोजन आणि फेलोशिपचा आस्वाद घेतल्यानंतर मंडळीना परतीचे वेध लागले.
प्रे. ई. रो रवींद्र प्रभुणे यांनी आभारप्रदर्शन करतांना रो दत्ताजी व अँन अंजलीताई ह्यांनी करंजवणे शाळेला ग्रंथालय दिल्याबद्दल व आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करून यजमान पद स्विकारल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच सरस्वती शाळेत रसायन प्रयोगशाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मदत व महत्वाचा हातभार लावण्यासाठी पीपी रो डॉ सुधांशु गोरे, प्रे संजीव व फर्स्ट लेडी स्नेहा ओगले, देणगीदार आणि सहकारी टीम ह्यांचे अभिनंदन केले व आभार मानले. इंटरॲक्ट क्लबच्या इन्स्टॉलेशन चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या युथ टीमचे व अँन अस्मिता आपटे यांचे आभार मानले. तसेच ह्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढविली ह्याकरता उपस्थितांचे आभार मानले.
आजच्या कार्यक्रमाला आपल्या क्लबचे प्रेसिडेंट रो संजीव व फर्स्ट लेडी स्नेहा ओगले, पी पी रो सुदर्शन व सुगंधा नातू, रो विलास व अँन अस्मिता आपटे, रो माधुरी किरपेकर, रो मृदुला घोडके, रो सत्यव्रत व अँन यामिनी पोंक्षे, रो मिलिंद क्षीरसागर, पी पी रो संदीप व अंजली विळेकर, पी पी रो अभिजीत व अँन नंदिनी जोग, रो सुभाष चौथाई, पी पी रो विनायक देशपांडे ,प्रेसिडेंट इलेक्ट रो रवींद्र अँन सुनीता प्रभुणे, पी पी रो सोनल पटवर्धन, अँन नेहा वाळिंबे, रो जितेंद्र महाजन, पी पी रो विनोद व अँन सरिता अग्रवाल, रो डॉ सुभाष देशपांडे, रो दत्ताजी व अँन अंजली देवधर उपस्थित होते.
बऱ्याच महिन्यानंतर असा आगळावेगळा योग जुळून आल्याने हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला झाला.
९ सप्टेंबर २०२२
रोटरी अँब्युलन्स चे १९ व्या वर्षात पदार्पण झाले.
पुणे साऊथ तर्फे गेल्या १९ वर्ष, सलग सुरू असलेली रुग्णवाहिका सेवा नेहमी प्रमाणे या वर्षीही, सदाशिव पेठ नागनाथपार मंडळ जवळ दोन रुग्णवाहिका अनंत चतुर्दशी , गणेश विसर्जन या दिवशी सकाळी ठीक ८.00 पासुन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.00 पर्यंत अविरत उपलब्ध करुन देण्यात आली होती.
रेडिओ मिर्ची प्रतिनिधी सौ.स्मिता त्रिभुवन ह्यांचा सहकार्याने रेडिओ मिरचीवरही रुग्णवाहिनी सेवेची माहिती देण्यात आली. पुणे आकाशवाणी केंद्राच्या पुणे वृत्तांत ह्या बातमीपत्रात आपल्या रुग्णवाहिनीची माहिती आणि नंबर देण्यात आले होते.
१७ सप्टेंबर २०२२
आकर्षक भेटवस्तूंबद्दल नाविण्यपूर्ण कल्पना
आकर्षक भेटवस्तूंबद्दल नाविण्यपूर्ण कल्पना- ह्या वर सौ. अनुश्री आठल्ये यांनी १७ सप्टेंबरला एक कार्यशाळा घेतली. साध्या- साध्या घरगुती साहित्यातून आणि कमी खर्चात,आपण एखादी भेटवस्तू कशी सुंदर...कलात्मकतेने सादर करू शकतो हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. सुमारे १५ anns आणि रोटेरियन्स उपस्थित होते.
ही कार्यशाळा घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार 🙏🙏
18 सप्टेंबर २०२२
फिटनेस फेलोशिप
१८ सप्टेंबर रोजी सकाळी तळजाई येथे फिटनेस फेलोशिप आयोजित केली होती. मंडळी ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता हजर झाली. पावसाचा रंग दिसत असल्याने काही मंडळी तयारीनेच आली होती. सुरुवातीला प्री मॉर्निंग वॉक, चहा झाला व बऱ्यापैकी मंडळी जमली आहे असे बघितल्यानंतर गौरीने चला असे फर्मान काढले काढले. तेव्हढ्यात जितू ने सगळ्यांचा ग्रुप फोटो झालाच पाहिजे अशी टूम काढली आणि वनविभागाच्या दारापाशी एक सुंदर फोटोसेशन झाले.
नुकताच पाऊस पडून गेल्याने भरपूर चिखल झाला होता त्यामुळे न घसरता चालण्याची कसरत करत मंडळी वाट चालू लागली. पण थोडे फार घसरणे झालेच. सुंदर निसर्ग रम्य जागा असल्याने सर्वजण आनंद घेत होती. वाटेत काही जणांना मोर बघायला मिळाला. साधारणपणे दोन ते तीन किलोमीटरचा फेरफटका मारून सर्वजण ध्यान केंद्रामध्ये जमली. काही जण तिथे आधीच पोहचली होती. अस्मिताने व सुदर्शनने झोपाळ्यावर मस्तपैकी झोके घेत लहानपणीचा आनंद घेतला. तेवढ्यात प्रेसिडेंट संजीवला बाजूलाच असलेल्या घसरगुंडीवर बसण्याचा मोह आवरता आला नाही आणि मला त्याचा व्हिडिओ काढायचा! त्याची गाडी हळूहळू घसरत शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली पण उठताना थोडी गडबड झाली. काही वेळाने इतर सर्व मंडळी जमा झाली व गौरीने सर्वांकडून स्ट्रेचिंग एक्सरसाइज करून घेतल्या. दहा मिनिट ध्यान केले आणि मंडळी बाहेर परतली आणि महत्त्वाच्या म्हणजेच फेलोशिपच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजूबाजूला असलेले असंख्य स्टॉलस् आणि त्यावर विविध गोष्टींची रेलचेल असल्याने त्यामुळे मजा आली. साजूक तुपातला शिरा, अप्पे, दडपे पोहे, नेहमीचे पोहे, बटाटा रोल आणि नवीन पदार्थ म्हणजे गव्हाचा चीक! हे सर्व पदार्थ मंडळींनी ट्राय केले व मनसोक्त ब्रेकफास्ट करून मंडळी हळूहळू परतली. अशा रीतीने या रोटरी वर्षातील फिटनेस फेलोशिपच्या कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार झाली आहे. बघूया आता पुढील प्रत्येक रविवारी काय काय ठरते ते तुम्ही मात्र नक्की या आणि याचा आनंद घ्या.
रो सुदर्शन ने तो वापरीत असलेल्या इम्पॅक्ट ॲप्लिकेशनचा उपयोग सांगितला मोबाईलवरचे हे ॲप वापरून तुम्ही चालत असलेल्या प्रत्येक किलोमीटर मागे दहा रुपये प्रमाणे एका उत्तम प्रोजेक्टसाठी डोनेशन देऊ शकता. सीएसआर फंडा तर्फे मोठ्या मोठ्या कंपन्या अशा प्रोजेक्टला स्पॉन्सर करीत आहे यावर्षी आपण RCPS 22 -23 अशी एक टीम त्यावर फॉर्म केली आहे. सर्वांनी ही ॲप डाऊनलोड करा आणि वापरायला सुरुवात करा व या टीमला जॉईन व्हा म्हणजे या वर्षभरात आपण सर्वजण फिटनेसमार्फत कुठल्यातरी उत्तम प्रोजेक्ट ला सहकार्य करू शकतो. प्ले स्टोअरवर Impact ह्या नावाने हे ॲप आहे.
वसंतदादा पाटील माध्यमिक शाळेमध्ये इको क्लब चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुलांनी उचलून धरले. Ann अस्मिता आपटे च्या सहकार्याने श्री दिलीप कुलकर्णी लिखित दैनंदिन पर्यावरण यातील गोष्टीरूप पर्यावरणाचे शिक्षण देणारे लेख मुलांनी वाचले व त्यावर हिरीरीने चर्चा केली. मुलांना हा कार्यक्रम फारच आवडला.
२५ सप्टेंबर च्या फिटनेस फेलोशिप सगळेच उत्साहात निसर्ग पायवाट,भांबुर्डी येथे जमले, बरोबर ७. ३० चढाई सुरू.
पुढे काय वाढून ठेवलय, हे कोणालाच माहीत नाही. अर्धा चढ पार झाल्यावर मात्र आपण कठीण रस्त्या पकडलयाची जाणीव झाली. पण खाली उतरणे अजून कठीण, मग मनाचा हिय्या करून सगळेच माथ्यावर पोहचले.
अध्यक्ष स्वागताला हजर होते.
वर पोचल्यावर मात्र सर्वच स्वतःवर खुष होते, की आपण हे करू शकतो.
उतरताना इतका सोपा मार्ग बघून फेलोशिप ची आठवण जागरूत झाली. IMDR कॅन्टीन मधे उत्तम फेलोशिप झाली . त्या अवघड चढाईत पूर्ण वेळ किरण - गितांजली फोटोसेशन चालू होते. जितू नी ऊरलेली कसर वरती पूर्ण केली.
आजचे फिटनेस फेलोज - संजीव, स्नेहा, संदीप, अंजली, नंदिनी, डॉ. किरण, गितांजली, डॉ. सुभाष, डॉ. संगिता, डॉ.राजेंद्र, अनुश्री, माधुरी, सई, स्वाती, सुदर्शन, जितेंद्र, भाग्यश्री, प्रिया, मंदार , आणि चेरपर्सन गौरी.
अविस्मरणीय फिटनेस फेलोशिपसाठी सगळ्यांचे आभार.
'डिझिज प्रीवेंशन अँड ट्रीटमेंट' कमिटी आणि 'एक्सटरनल पब्लिक इमेज' कमिटीतर्फे,
२७ सप्टेंबर २०२२ रोजी, "एपिफनी स्कूल" पंच हौद, घोरपडे पेठ येथे एक मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला.
रो. डॉ. विजया गुजराथी, ॲन डॉ. गीतांजली पुरोहित , रो. डॉ. संगीता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली.
सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी ह्या वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. प्रे. रो. संजीव ओगले ह्यांनी ह्या वैद्यकीय कॅम्पची सुरुवात करून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहित केले. रो. माधुरी किरपेकर आणि रो. दत्ता पाषाणकर ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
ह्याबद्दल सगळ्यांचे आभार.
बुधवार 28 सप्टेंबरला इको क्लब क्लब चा वसंतदादा पाटील माध्यमिक शाळेत कार्यक्रम पार पडला. यावेळी सौ उर्मी निवर्गी यांनी मुलांना अत्यंत सोप्या शब्दात, charity begins at home, थोडक्यात पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे हे गप्पा गोष्टी करत समजावून सांगितले.
28th September 2022
"Password for Success" at Tolani Institute
The program at Tolani Institute on 28th September 2022 went very well. Our Mind Health Committee guided the students with the theme "Password for Success". All the sessions were highly interactive and were appreciated by the Students. Rtn. Mrudula talked on emotional intelligence, Rtn. Shrikant covered Graphalogy for success and I gave them a success system.
Our president Sanjeev is associated with this Institute for more than 25 years. Due to him, we got a royal treatment. We got an opportunity to visit ship engine room, deck, workshop, simulator room etc. All had fun experiencing it.
Thanks to speakers Mrudula and Shrikant, President Sanjeev, Secretary AB and all the supporters for making this project successful. Sudarshan, Sugandha, Prabhune, Madhuritai, Snehatai, Nitin, Sangeeta and Bhagyashri were there to support.
- वक्त्यांचे नाव : सेक्रेटरी रोटरियन अभिजित देशपांडे
- उपस्थित असलेले मान्यवर/ डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स
- पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या सदस्याचे नाव : पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सुदर्शन नातू
- कार्यक्रमाचा सारांश
"गप्पांगण" या मालिके अंतर्गत आपल्याच क्लब मधील एक सदस्य त्यांचे चाकोरी बाहेरील अनुभव सर्वांसमोर मांडतात. १९ तारखेच्या सोमवारी क्लबचे या वर्षीचे सेक्रेटरी रोटेरीयन अभिजित देशपांडे यांनी त्यांनी केलेले विविध चाकोरी बाहेरील व्यवसाय आणि ते करत असताना आलेले अनेक भले बुरे अनुभव सर्वांना सांगितले. कॉम्प्युटरशी निगडित जटिल प्रोग्रामिंग करण्या बरोबरच hand painted tie making, laundry चा व्यवसाय, संपूर्ण नैसर्गिक शेती अशा आपल्या अनेक प्रयोगांची त्यांनी सर्वांना अतिशय रंजक माहिती दिली.
त्याचप्रमाणे फेलोशिप कमिटीच्या 'Chef's Corner' अथवा 'सुगरण कट्टा' या उपक्रमाचा श्रीगणेशा PP Rtn सुदर्शन नातू यांनी केला. त्यांनी स्वतः पाणीपुरी करून सर्वांना अतिशय प्रेमाने खाऊ घातली. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
- आभार प्रदर्शन करणाऱ्या सदस्याचे नाव: रोटेरीयन विलास आपटे
- उपस्थित असलेल्या रोटेरिअन्सची संख्या : 25
- उपस्थित असलेल्या ॲन्स/स्पाऊसची संख्या : 25
सरिता लिमये आणि कलाकार गेले अनेक वर्ष आपल्या मराठी पारंपारिक लोककला जागृत ठेवून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. आपल्याकडे झालेला कार्यक्रम हा त्यांचा 744 वा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी भारुड, भजन, मंगळागौरीचे खेळ, जुनी / नवी लोकगीते अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे सादरीकरण केले. सर्व कलाकारांचा उत्साह व क्षमता वाखाणण्याजोगी होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रेक्षकांनी उभे राहून कार्यक्रमाला आपल्या पसंतीची पावती दिली. याच दिवशी सुगरण कट्टा या उपक्रमात माधुरीताई यांनी केलेली कणसाच्या दाण्यांची भाजी सगळ्यांची वाहवा मिळवून गेली.