Most of us missed hearing RI President Jennifer on DEI (Diversity, Equity and Inclusion).
The August issue of Rotary magazine covers it in detail.
Pl read...
It’s time for Rotary to take our next step in advancing diversity, equity, and inclusion (DEI) across our organization.
Embracing an experience where people feel included is more than just making our membership numbers more diverse. It’s about making our meetings and events places where we can speak openly and honestly with each other, where our members feel welcome and safe. This means removing barriers for entry and opening doors for inclusion. Our values remain our strength — and our commitment to excellence requires us to maintain high standards for our members as well.
I believe we are all determined to advance DEI across Rotary. This is rooted in the deepest traditions of our organization, and it will ensure that we remain vibrant and relevant for decades to come.
A few years ago, our Rotary Board set the ambitious goal of increasing the share of female members to 30 percent by 2023. We have less than a year to go, but I believe we can meet and exceed this target.
We need Rotary leaders to rise from every continent, culture, and creed. We need young members and young thinkers to take on larger roles and responsibilities.
We need to listen to new Rotary members just as keenly, and with as much respect, as those with many years of membership. During our recent convention in Houston, we heard from astronauts about their journeys into space. We reflected upon a time in the 1960s when U.S. President John F. Kennedy urged the world to dream, with his declaration that we would "go to the moon [and do] other things, not because they are easy but because they are hard."
Fully committing Rotary to DEI and meeting our ambitious membership targets may seem as unlikely as a moon shot. But I know that when people of action are committed to a big goal, we make it worth every ounce of our energy.
Jennifer Jones
RI President 2022-23
RAINY SEASON & EYE CARE.Rainy season is going on with full swing giving every one a relief from heat. As the air gets filled with bacteria & viruses, eye infections become a common occurrence.
Few of these:
1) STYE ( Ranjanwadi) is caused by bacteria. In this condition, there is swelling on eyelid, raidness & pain. Hot fomentation gives relief in early stage.
2) CONJUNCTIVITIS This could be due to bacteria & viruses.
Here you get raidness, watering, irritation & discharge from the eyes. Also there may be sticking of the eyelashes. This is highly contagious & use of artificial tears ,with frequent washing of eyes with water helps to some extent. Self medication should be avoided.
3) FUNGAL INFECTIONS.
This is commonly seen in patients with compromised Immune system. It's causes may be Uncontrolled Diabetes, HIV, & Post Covid state. We have seen many cases of Mucormycosis in post covid state. In this always consult Eye specialists.
All above conditions can be best avoided by ---
A) Ware protective glasses.
B)Avoid frequent touching of eyes.
C)Frequent washing of hands.
D)Avoid sharing of handkerchief or napkin with others.
F)Swimming should be avoided as far as possible.
G) Take utmost care of Contact lenses.
H) Keep contact lenses in proper hygienic conditions & never use it when there is eye infection.
So Prevention Is Better Than Cure.
mohini natu
नमस्कार मंडळी... "शांताराम आठवले"आपल्या सर्वांनाच माहिती आहेत.. "संत तुकाराम" या प्रभातच्या चित्रपटातील "आधी बीज एकले" या अभंगाचे ते रचनाकार आहेत... त्यांनी लिहिलेलं १९७२-७३ साली प्रकाशित झालेलं "सुखाची लिपी" नावाचं दुर्मिळ पुस्तक माझ्या संग्रही आहे... त्यात "संगीत"या विषयावर लिहिलेल्या एका चांगल्या लेखाचं मी आज वाचन करणार आहे...
ते म्हणतात...
संगीत ही विश्वभाषा आहे..भावनेची भाषा आहे.संगीतातील स्वर लहरींचे सामर्थ्य अमोघ आणि अमाप आहे...
संगीताचा परिणाम पशुपक्ष्यांवर आणि वनस्पती सृष्टी वरही होतो हे आता शास्त्रसिद्ध झाले आहे... संगीत हा ओंकार या दिव्य मूळ ध्वनीचा मधुर आविष्कार आहे... ओंकारातून आविष्कृत झालेल्या संगीताचा आणि नादब्रह्माचा परिणाम माणसाच्या मनावर -- मज्जातंतूवरच नव्हे तर अंतर्मनावरही होतो... या सामर्थ्याचा अनुभव घेऊन आणि अभ्यास करून भारतीय ऋषीमुनींनी त्याचे शास्त्रच बनविले आहे... भारतीय संगीतातील रागरागिण्यांची अभिजात, रेखीव आणि आल्हादक रचना हा या अभ्यासाचाच परिपाक आहे...
"वीणा" या भारतीय वाद्याचा आकार "ओम" या अक्षरावरून सुचलेला आहे. उपनिषदातील ऋषींनी ओमकार याला विश्वविणेची उपमा दिली आहे. या संदर्भात विनोबा म्हणतात..." हा ओंकार सर्वसहिष्णू असल्यामुळे याला बरे वाईट सर्वच ध्वनी सहन होऊ शकतात... कोणत्याही स्वराशी हा विसंवादी होत नाही... किंबहुना याच्या विश्वसंवादी नादामध्ये अनेक विसंवादी स्वर खपून जातात.... अशा सर्वसहिष्णू आणि विश्वसंवादी ओंकाराचा मंजुळ बोल बोलणारी ही वीणा कोणती असेल बरे...?? देवी सरस्वतीच्या हातातील या ओंकारवादिनी वीणेला ऋषी "शांती"या नावाने ओळखतात ....
भाषण, पठण इत्यादींच्या ठिकाणी जो रस, जी सौंदर्य निर्मिती होते ती या स्वरांची किमया..बरं का....!! वर्णमालेतील व्यंजनांना या स्वरांचा आश्रय केल्यावाचून उभे राहता येत नाही.... अशा या स्वरांच्या संयोजनाने झालेली संगीत निर्मिती हा ओंकाराचा मधुर आविष्कार आहे....
भारतीय संगीतातील राग यांची स्वररचना मंत्र मय आहे....अशा विशिष्ट रागिणीच्या गायनामुळे विशिष्ट आकृतिबंध निर्माण होतात... या सिद्धांतावर प्रकाश टाकणारी एक दंतकथा अत्यंत बोलकी आहे...
नारद म्हणजे मूर्तिमंत संगीत....नारदांचे वीणावादन आणि गायन श्रीहरीला अत्यंत प्रिय.... पण एकदा नारदांना आपल्या संगीत नैपुण्याचा अहंकार झाला.. त्याच भरात यांचे गायन वीणावादन भगवंता पुढे चालू होते.... पण भगवंताच्या मुद्रेवर मात्र प्रसन्नते ऐवजी उद्रेकाचे भाव उमटत असल्याचे त्यांना दिसून आले.... ते पाहून नारदांनी श्रीहरीला प्रणाम केला आणि नम्र भावाने विचारले...," प्रभु अप्रसन्नतेचे कारण कळेल का...??" भगवंतांनी स्मित केले आणि नारदांना काहीशा खोचक स्वरात म्हणाले...," खरे संगीत कशाला म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आपण एक वेळ गंधमादन पर्वत त्याला भेट द्या...त्या एकांतस्थळी हनुमंत तप करीत आहे... त्यांची भेट घ्या म्हणजे सर्व उलगडा होईल..."
नारद निघाले गंधमादन पर्वतावर पोचले.. त्या प्रदेशातून जाताना एका वृक्ष वाटिकेत स्त्रियांच्या विलापाचे करुण स्वर ऐकू आले.. कुतूहलाने ते त्या वाटिकेत शिरले ....तेव्हा काही अप्सरातुल्य रमनींचा
समुदाय दिसला... त्यापैकी प्रत्येक सुंदरीच्या एखाद्या तरी अवयवात व्यंग किंवा विद्रुपता असल्याचे त्यांनी पाहिले.. कोणाच्या नासिकेची कळी छेदली गेली होती... तर कोणाचे हात विद्रूप झाले होते.. ते दृश्य पाहून नारद मुनी द्रवले..त्यांनी स्नेहभावाने रमणींची विचारपूस करून त्यांच्या या दारुण अवस्थेचे कारण विचारले... तेव्हा त्या म्हणाल्या...," आम्ही सर्व संगीतातील वेगवेगळ्या राग देवता आहोत...संगीततज्ञ असूनही नारद नावाच्या ऋषीने वैकुंठात असे काही सदोष गायन केले की त्याचा परिणाम म्हणून आमच्या ठिकाणी हे शरीर दोष निर्माण झाले.... नारदाने केलेला प्रमाद कोणीतरी जाणत्या संगीतकारांनी सुधारून शास्त्रशुद्ध आणि अचूक संगीता आळविल्याशिवाय या वैगुण्यातून आमची मुक्तता होणार नाही..." क्षणार्धात नारदांच्या अहंकाराचा निरास झाला.. आपल्या सदोष गायनामुळे या सुंदर देवतांना अशी विरुपता प्राप्त व्हावी याचे त्यांना अत्यन्त दुःख झाले... "आपणच ते अपराधी नारद आहोत.." असे सत्य सांगून त्यांनी त्यांची क्षमा मागितली... व्यथित मनाने नारद त्या देवतांना पुढे म्हणाले.." या पर्वतावर तप करीत असलेल्या हनुमंताच्या भेटीसाठी मी येथे आलो आहे... त्यांनी साधनेच्या द्वारे संगीत कलेत पूर्णता प्राप्त करून घेतली आहे त्यांच्या पायाशी बसून मी संगीताचे पाठ घेऊन माझ्या गायनातील दोष आणि उणीवा दूर करून ते निर्दोष करीन आणि मग तुम्हा सर्वांना आपल्या मूळ स्वरुपाची प्राप्ती होईल..." असे म्हणून नारद मुनी पुढे निघाले...
पर्वताच्या एका रम्य शांत शिखरावर हनुमंताचा निवास होता.. नारायण नामाचा जयघोष करून नारदांनी हनुमंताच्या चरणी मस्तक ठेवले.. हनुमंत आश्चर्याने पाहतच राहिले.. नारदांनी आपल्या आगमनाचा हेतू उघड केला...," संगीत कलेत मी परिपूर्ण झालो आहे.. अशा भ्रममूलक अहंकाराने मी फुगून गेलो होतो.. पण भगवंतांनी माझ्या अहंगंडावर प्रहार केला आणि खऱ्या संगीताचे ज्ञान करून घेण्यासाठी त्यांनी मला आपणाकडे पाठवले आहे...तेव्हा आपण कृपावंत व्हावे आणि मला संगीतातील परमोच्च लाभ मिळवून द्यावा..."
हनुमंताने मंदस्मित केले... नारदांच्या हातातील वीणा आपल्या हाती घेऊन त्यांनी ती वाजवण्यास प्रारंभ केला..थोड्याच वेळात एका अपूर्व स्वरविश्व त्या ठिकाणी अवतीर्ण झाले.... हनुमंत आपले देहभान विसरले.. तल्लीन अवस्थेत त्यांचा स्वरविहार वातावरणात अमृतानंद निर्माण करीत होता... नादब्रम्हाच्या त्या साक्षात्काराने नारदांना स्वतःच्या थिटे पणाची जाणीव करून दिली. थोड्याच वेळात तो अमृतप्रवाह थांबला... हनुमंतांनी नारदांना काही तांत्रिक रहस्ये उलगडून सांगितली आणि तदनुसार वीणावादन करण्याची अनुज्ञा दिली..
हनुमंतांनी खाली ठेवलेली वीणा नारद आपल्या हाती उत्साहाने घेऊ लागले.. तो एक चमत्कार झाला.. हनुमंताचे वीणावादन चालू होते त्यामुळे त्यांच्या स्वरलहरिंच्या प्रभावाने भोवतालचा कण न कण द्रवला होता ,विरघळला होता... हनुमंतांनी वीणा खाली ठेवताच तेथील भूमीने पूर्ववत आपले काठीण्य धारण केले... परिणाम असा झाला की शिलाखंडात रुतून बसलेली वीणा काही केल्या उचलली जाईना ..नारदांना काय करावे ते सुचेना.. त्यावर हनुमंतांनी हसून उपाय सुचवला.. ते म्हणाले ,"या शिळा पुन्हा वितळतील, विरघळतील असे अमोघ रागगायन कर..." त्यांनी उत्कृष्ट राग आळवण्याची पराकाष्ठा केली... परंतु भूमी द्रवेना...तिच्या ठिकाणी सहृदयतेचा पाझर फुटेना... नारदाना आपला पराभव मान्य करावा लागला... ते हनुमंतांना विनम्र भावाने शरण गेले... त्यावर हनुमंतांनी गायनाला आरंभ केला... त्यांच्या स्वर प्रभावामुळे थोड्याच वेळात प्रचंड शिलाखंड आपली कठोरता विसरून स्नेहार्द्र झाले... भोवतालची सर्व भूमी लोण्यासारखी मऊ झाली.... त्यामुळे हात लावताच रुतून बसलेली नारदांची विना सहजपणे उचलली गेली... नारदांचा अहंकार त्या दिवसापासून निरंतरचा नाहीसा झाला..
या दंतकथेत फार मोठे सत्य सहजपणे विशद केले आहे .."खडकाला ही पाझर फोडण्याचे सामर्थ्य शास्त्रशुद्ध सुरेल संगीतात आहे".. असा बोध ही कथा सांगते..
भारतीय संगीत मुळातच शक्तीगर्भ आहे.. नव्या जीवनाच्या संदर्भात संगीत सामर्थ्याचा अभिनव प्रयोग आणि उपयोग करून जीवन अधिक समृद्ध आणि निरामय करणे आपल्या अधीन आहे ...हा उपाय जसा स्वाधीन तसाच सोपा आणि स्वस्तही आहे...
ईश्वराला आळवण्यासाठी... दुःखाला पळवण्यासाठी.. भावना चेतवण्यासाठी... विकारांना विझवण्यासाठी... संग्रामाला आव्हान देण्यासाठी. आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी. जिचा सारखा उपयोग होतो अशी संगीत ही एकच किमया आहे...
सध्या इतकेच..
एका देशाची खोज-भाग दहा
जसा मौर्य साम्राज्याचा अस्त व्हावयास लागला तसा तसा शुंग राजवंश मौर्यांच्या जागी आला.शुंग हिंदु होते व मगध मधून आले होते.दक्षिणेस सातवाहन, पांडीय,चोला राज्ये वसत होती.ऊत्तरेस बॅक्ट्रीयन जमात हिंदुकूश ओलांडून ख्रि.पू.एकशे ऐंशी साली काबूल मार्गे पंजाब मध्ये आली होती.एकेकाळी अलेक्झांडर ने त्यांच्यावर राज्य केले होते,त्यामुळे त्यांच्यात ग्रीक वंशज होते.त्यांचा राजा' मेनिनडर 'पाटलीपुत्र (पाटना)पर्यंत आला होता,पण त्याचा पराभव झाला.मेनिनडरने बुद्ध धर्म स्वीकारला. तो 'मिलींद' ह्या नावाने बुद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहे.ह्या ग्रीक व बौद्ध संस्कृतींच्या मिलाफातून 'गांधार 'कलेचा जन्म झाला.मध्य भारतात सांची येथे एक पत्थराचा स्तंभ आहेज्याला'हेलिओडोरस' स्तंभ म्हणतात तो एक साली उभारण्यात आला .त्यावर संस्कृत लेख कोरला आहे,ज्यायोगे ग्रीक वंशाचे भारतीय करण कसे झालेहे कळते.' हा विष्णुदेवाचा गरूड स्तंभ ' हेलिओडोरस ',जो विष्णुदेवाचा भक्त होता,डिऑन चा मुलगा होता,तक्षशीला चा रहिवासी होता,ग्रीक राजदूत होऊन राजा 'ॲनशीअलशीदास' कडून,राजा 'काशीपुत्र भगभद्र रक्षणकर्ता ',जो त्याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षात होता,त्याच्याकडे आला , व त्याने उभारला.आत्मसंयम स्वार्थत्याग, विवेकबुद्धी ,ह्या तीन तर्हांचे योग्य पालन केल्यास स्वर्ग प्राप्ती होईल. '
मध्य अशीयातील शक' जमातीने' ऑक्सस 'खोर्यात जम बसविला होता.ती ईरान मधील एक भटकी जमात होती,जी त्यांची गुरेढोरे घेऊन कुरण शोधीत फिरत असे.त्याना चीनी भटक्या जमातींनी त्यांच्या परिसरातून हाकलून दिले होते.सध्याच्या पाकिस्तानातील 'गंधार येथून ते सिंधु नदीच्या खोऱ्यात आले.चीनी जमातीचे नाव'युह चिह' असे होते,तर 'शक' जमातीचे मुळ नाव 'स्किथीयन' होते.'युह चिह' चे एक कूळ 'कुशान' यांनी शकांचा पराभव करून त्याना दक्षिणेत हाकलून दिले व ऊत्तर भारतात आपले वर्चस्व स्थापन केले.'शक' काठेवाड व दखःन पठार भागात आले.'शकांनी 'बौध्द व हिंदु धर्म स्वीकारला होता.'कुशाननी' ऊत्तर भारतात व मध्य अशीयात आपले साम्राज्य ऊभे केले होते.त्यांनी बौध्द व हिंदु धर्माचा स्वीकार केला.त्यांचा सम्राट 'कनीष्क 'बुद्ध आख्यायिकेतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.जरी कनीष्क बौध धर्मीय होता तरी त्याच्या राजधर्मात अनेक धर्मांचे मिश्रण होते.कुशान साम्राज्य भारताच्या सीमेवर असून ,त्याची राजधानी पेशावर व तक्षशीला जवळ होती.त्यामुळे आसपास चे स्किथीयन,युहचिह,इराणी, बॅक्ट्रीयन ग्रीक, तुर्की, चीनी,प्रवासी तेथे एकत्र येत असत,व त्यांच्यात सर्व प्रकाराची देवाणघेवाण चालत असे.गंधार शैली अशाच देवाणघेवाणीतून ऊगम पावली.ह्याच वेळेस चिनी व भारतीयांचा प्रथमच संबंध आला.चिनींनी भारतात पीच व पिअर ची झाडे आणली.गोबी वाळवंटाच्या सीमेवरील 'तूर्फान' आणि 'कूचा' येथे भारतीय,चीनी व ईराणी संस्कृतीचा एक सुरेख संगम झाला होता.
कुशान काळात बौध धर्मात महायान व हीनयान असे दोन पंथ तयार होऊन फूट पडली.महायान इ.स.पू.पाचशे सालापासून चालत आला होता. हीनयान इ.स.पू.दोनशे पन्नास मध्ये सुरू झाला.महायानात बुद्धाला दैवत्व मान्य करण्यात आले आहे व त्याच्या मूर्तीची पुजा होते.हीनयानात ,बुद्धाला दैवत मानले नाही,व कर्म,स्वयंशिस्त, आत्मसंयम, ध्यानाने मुक्ति मिळते, मुर्ती पुजेमुळे नाही असे विचार मांडले आहेत.हा वाद मिटविण्यासाठी अनेक परिषदा भरविण्यात आल्या.मुख्यतः काश्मीर त्यावेळेस कुशान साम्राज्याच्या मध्यभागात असल्याने,तेथेअनेक वेळेस चर्चा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.ह्या सर्व वादविवादात 'नागार्जून' यांचा मोठा सहभाग होता.नागार्जून हे एक ऊत्तूंग व्यक्तीमत्व होते.हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानात त्यांना फार मोठे स्थान आहे.त्यांच्यामुळे भारतात महायान तत्त्वज्ञानाचा विजय झाला.एकोणीस शे पन्नास साली जगात फक्त महायान पंथच अस्तित्वात आहे असे जाहीर झाले.महायान पंथ चीन,कोरिया, जपान,तिबेट येथे आहे.हीनयान पंथ श्रीलंका, मायनामार,कंबोडिया येथे आहे.
जरी कुशान भारतीय होते,तरी परकीय कुशान विरूद्ध देशप्रेमींचा विरोध चालूच होता.जेव्हा आणखी परकीय आक्रमणे व्हावयास लागली,तेव्हा चौथ्या शतकात हा विरोध ऊफाळून आला.त्याचवेळेस दूसरा चंद्रगुप्त राजा उदयास आला व त्याने परकीय घुसखोरांना हुसकावून लावले आणि गुप्त साम्राज्याची स्थापना केली.तीनशे विस सालांत गुप्त साम्राज्य स्थापण्यात आले व एकापाठोपाठ एक असे यशस्वी राजे त्यांत होऊन गेले.सततच्या परकीय आक्रमणांमुळे,परकीय विरूद्ध भावना जागृत झाल्या होत्या व पूर्वीप्रमाणे ब्राह्मण-क्षत्रिय वर्गाला आपली मातृभूमी व संस्कृती जपण्याची व रक्षण्याची जरुरी वाटू लागली.पूर्वीपासून आलेल्या परकीयांना आपले मानून,समाजात सामावून घेतले गेले,परन्तु नवीन आक्रमकाना जोरदार विरोध करण्यात आला.पूर्वीच्या 'ब्राह्मण ' तत्वाप्रमाणे एकसंध साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न झाला.किंतू, आत्मविश्वासाच्या अभावी त्यात ताठर पणा आला व भारत आंतरमुख बनला.
हे समाजाचे व देशाचे स्वकोशात जाणे सर्व थरात व सर्वत्र पसरले होते.पूर्वी जेव्हा आर्य भारतात आले,त्यावेळी नवीन जमात व त्यांची संस्कृती आणि जुनी जमात व त्यांची संस्कृतीत समन्वय साधण्याचा प्रश्न होता.त्यामधून आर्य भारतीय संस्कृतीचा जन्म झाला,जी आज भक्कम पायावर ऊभी आहे.बाकीचे परकीय आले गेले,त्यांचा ह्या संस्कृतींवर फारसा परिणाम झाला नाही.परकीयाना सामावून घेतले गेले. पूर्वी जरी भारताचे बाहेरील जगाशी संबंध होते,तरी भारत मुख्यत्वेकरून स्व व्यग्र होता व इतरांविषयी भारताला फारशी उत्सुकता नव्हती.परन्तु एकामागोमाग होणाऱ्या परकीय स्वाऱ्यांमुळे भारत खडबडून जागा झाला व भारतीय संस्कृती आणि रितीरिवाजांवरील धोक्याची भारतीयांना जाणीव झाली.राष्ट्राभिमान जागृत होऊन, ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववादाचे पुनरूज्जीवन झाले.बौद्ध धर्म जरी भारतीय असला तरी तो मुख्यत्वेकरून आंतरराष्ट्रीय झाला होता व त्याचा प्रभाव भारतापेक्षा भारताबाहेर जास्त होता.त्यामुळे ब्राह्मण वाद अथवा हिंदुत्ववाद देशाभिमानाचे प्रतिक बनले होते.जरी धार्मिक आणि वैचारिक सहीष्णूता होती तरी सुद्धा परकीया विरूद्ध आक्रमकता वाढली होती. ह्या देशाभिना पोटी साम्राज्य शाही चा जन्म झाला.गुप्त साम्राज्य जे अतिशय प्रगत,रसरशीत, सुसंस्कृत होते,ते भरभराटीस आले.समुद्र गुप्ता ची तुलना नेपोलियन शी केली जाते.
चौथ्या शतकाच्या सुरूवातीच्या काळा पासून जवळ जवळ दीडशे वर्षे गुप्त साम्राज्य सुस्थितीत होते.त्यानंतर सुद्धा दीडशे वर्षे जरी गुप्त साम्राज्य अस्तित्वात होते,तरिही सततच्या परकीय आक्रमणांमुळे खिळखिळे होऊन लहान झाले होते'गोरे हून' मध्य अशीया मधुन भारतात आले व त्यांनी सर्वत्र विध्वंस सुरू केला.ह्या रानटी आणि कृर वृत्ती विरूद्ध, जनतेने यशोवर्धन गुप्त ह्याच्या नेतृत्वाखाली उठाव करून, हूनांचा पराभव केला व त्यांचा प्रमुख ' मिहीरगुला ' ह्याला बंदिवान केले.परन्तु भारतीय आणि गुप्त परंपरेनुसार 'बालदीत्य ' गुप्त याने मिहीरगुलास सन्मान पुर्वक वागविले व सोडुन दिले. ह्या सौजन्याची परतफेड मिहीरगुलाने ,परत येऊन विश्वास घाताने हल्ला करून,केली.हून साम्राज्य फक्त पन्नास वर्ष टिकले. काही लहान लहान हून राज्ये अस्तित्वात होती,पण बहुतेक करुन हून भारतीय समाजात मिसळले.सातव्या शतकात काही हून राज्यानी आक्रमकता दाखवली, परन्तू 'कनोज ' चा राजा हर्षवर्धन याने त्यांचा नायनाट केला व उत्तर आणि मध्य भारतात एका सबळ राज्याची स्थापना केली. हर्षवर्धन महायान बौद्ध पंथाचा होता,जो पंथ हिंदु संस्कृतीला जवळचा आहे.हर्षवर्धन ने बौद्ध व हिंदू या दोन्ही धर्मांना प्रोत्साहन दिले..त्याच्या काळात प्रसिद्ध चिनी वारकरी 'सुवान संग ' भारतात आला होता.हर्षवर्धन स्वतः कवी,नाटककार होता.त्याच्या दरबारात अनेक कलाकार होते.त्याची राजधानी 'ऊज्जैन ' ही एक प्रसिद्ध कलाकेन्द्र होती.हर्षवर्धन इ.स.सहाशे अठ्ठेचाळीस मध्ये मृत्यू पावला.त्याचसुमारास अरबस्तानात इस्लाम चा उदय होत होता.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर हजार वर्षात दक्षिण भारतात मोठमोठाली राज्ये उदयास आली. 'आन्ध्र ' ज्यांनी शकांचा पराभव केला.कुशान ,आन्ध्र चे समकालीन होते.'चालूक्य' ',राष्ट्र कूट',दक्षिणेस पल्लव,चोला,ज्यांनी श्रीलंका व दक्षिण ब्रम्हदेश जिंकला.पल्लवानी मुख्यत्वेकरून भारताबाहेर वसाहती स्थापन केल्या.दक्षिण भारतातली राज्ये, स साम्राज्ये,सागरी सत्ता होत्या. त्यांचा समुद्र मार्गे व्यापार चालत असे.ग्रीक वसाहती पण दक्षिणेत होत्या. रोमन नाणी सुद्धा उत्खननात सापडतात.चालूक्य साम्राज्याच्या वकिलांची ईराण मधील' सासनीड ' साम्राज्याच्या वकीलांशी देवाणघेवाण होत असे.उत्तरेकडील सततच्याआक्रमणांचा परिणाम दक्षिण भारतावर फारसा झाला नाही.परन्तु त्यामुळे उत्तरेकडून अनेक कलाकार, स्थापत्य कलाकार, कारागीर, दक्षिणेस पुरातन कलेचा वारसा घेऊन आले.उत्तरेस परकीय कलेचा पगडा होता.नंतरच्या काळात ह्या प्रक्रियेनेआणखी वेग घेतला व दक्षिण भारत सनातनी हिंदुत्वाचे केन्द्र बनले.
समाप्त
डॉ.सुभाष देशपांडे.
कुंडली अभ्यास
नमस्कार मंडळी, ओळख कुंडलीशी या लेख माले अंतर्गत या लेखात आपण कुंडलीतील चतुर्थ स्थान आणि त्यावरून आपल्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी दर्शविल्या जातात तसेच चौथी राशी, तिचा थोडक्यात स्वभाव, तसेच मंगळानंतर येणारा ग्रह बुध आणि त्याचा स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या लेखात आपण कुंडलीतील तृतीय स्थानाबद्दल माहिती घेतली. आता आपण कुंडलीतील चतुर्थ स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत.
3) चतुर्थ स्थान (गृह स्थान, मातृ स्थान):
वदन्ति विद्या जननीसुखानि । सुगंधगोबंधु मनोगुणानि । महिपयान क्षितिमंदिराणि । चतुर्थ भाव प्रभवाणि तज्ञाः ।।
चतुर्थ स्थानावरून घराचे सुख ठरते. घर कसे असेल, घराच्या भिंतीपासून ते घरातील माणसे कशी असतील हे या स्थानावरून कळते. घरातील माणसांमध्ये आपसात संबंध कसे असतील ? तसेच जमीनीचे सुख कीती आहे हे कळते. हे मातृस्थान असल्याने, आईशी पटणे, न पटणे, आई कशी असेल, हे ही कळते. घर, दार, नोकर, चाकर, वाहन तसेच उत्तर आयुष्यातील सुख कसे असेल हे या स्थानावरून ठरते. घरातील पाळीव प्राणी, पशुधन, गाई, म्हशी, कुत्री, मांजरी, पोपट, वगैरे गोष्टी, त्याची व्यक्तीला आवड, त्यापासून होणारे तोटे किंवा लाभ याचाही विचार चतुर्थ स्थानावरून करतात.
चतुर्थ स्थानाचा अंमल हृदयावर (Heart) असतो. त्यामूळे Heart शी संबंधित रोग अथवा व्याधींसाठी यास्थानाचा विचार करावा लागतो.
आता आपण १२ राशींमधील चौथी कर्क रास पाहूया.
3) कर्क रास: कर्क, वृश्चिक व मीन या तीन जलतत्वाच्या राशी आहेत. जलतत्त्वाच्या राशी असल्यामूळे यात आर्द्रता खूप आहे. खूप प्रेमळ आणि थोड्या वाहवत जाणाऱ्या या राशी आहेत.
जलतत्वाच्या राशी असल्यामुळे • Skin खूप छान असते: complexion चांगले असते यांना कलेची आवड आहे. उत्स्फुर्त पणे येणारी कला आहे. Aesthetic view चांगला आहे. बारीक सारीक गोष्टींमधूनही काहीतरी कलाकृती करतात. तीनही राशींमध्ये सात्विक सौंदर्य दिसते.
राशीस्वामी चंद्र आहे. तो ही जलतत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे या व्यक्ती खूपच sencitive आणि खूपच emotional असतात. डोळ्यातून घळाघळा पाणी येते. घर, कुटुंब यात रमणाऱ्या व्यक्ती आहेत. अतिशय दयाळू आहेत. कोणालाही पटकन काहीही उचलून देतील अशा आहेत. ही मातेची रास असे म्हटलेले आहे. हे लोक स्वतःला हवी असलेली गोष्ट काही करून मिळवतातच. या राशीचा symbol हा खेकडा आहे. खेकड्याची पकड ज्या प्रकारे घट्ट असते त्याच प्रमाणे सगळ्या गुणांच्या विरुद्ध एक प्रकारचा हट्टीपणा या राशीकडे आहे. या लोकांचे विचार, त्यांच्या कल्पना बदलणे अवघड असते. स्वतःचे विचार आणि कल्पना या बाबतीत, या राशीमध्ये खूप हट्टीपणा, हेकेखोरपणा दिसतो. याचे कारण राशीस्वामी चंद्र आहे स्वतःच्या चुकाही दुसऱ्यावर ढकलून देतात. दुसऱ्याच्या प्रभावाखाली पटकन येतात. चंचलता खूप असते. चंद्राच्या कलां प्रमाणे अमावस्या व पौर्णिमा यांचाही या राशीवर प्रभाव पडताना दिसतो. इतकी चंद्राला पूरक रास आहे.
चंद्र जर शुभ असेल, तर वरचे हे सगळे गुण अतिशय चांगल्या प्रकारे दिसतात. मात्र जर चंद्र बिघडला असेल, तर मात्र या गुणांचे दुर्गुण होताना दिसतात. चंद्राच्या स्थितीवर अत्यंत अवलंबून असणारी रास आहे. या राशीचे स्वरूप मध्यम उंची मध्यम बांधा, गोल चेहरा असे आहे. यांचे complexion छान असते. चेहऱ्यावर शांत, शीतल भाव असतात. कर्क लग्नाच्या व्यक्तीच्या नाकाचा शेंडा थोडा पूढे तर नाकपुडया वक्राकार मागे असतात.
या राशीचा अंमल छातीवर, हृदयावर आहे. तसेच शरीरातील सर्व द्रवपदार्थावर आहे. त्यातही रक्ताभिसरणावर अतिशय strong अंमल आहे.
या लेखातील पुढील भागात आपण बुध या ग्रहाबद्दल माहिती बघणार आहोत.
ग्रहांचे स्वभाव आणि ग्रहांचे कारकत्व.
4) बुध: (मिथुन, कन्या) : बुध हा अंर्तग्रह आहे. आकाराने लहान त्यामुळे कुमार ग्रह म्हणतात. Teenage च्या आत असे बुधाचे वय मानले आहे. त्यामुळे त्याचा अंमलही त्या वयापर्यंत जास्त असतो. तसेच बलवान ग्रहांच्या युति मध्ये जर बुध असेल, तर त्या ग्रहांचा प्रभाव होताना दिसतो. बुध हा बुद्धिचा कारक ग्रह आहे, पण शिक्षणाच्या दृष्टीने १०/१२ वर्षापर्यंतच बुधाचा विचार करावा लागतो. नंतरच्या, उच्च शिक्षणासाठी मात्र गुरू आणि मंगळाचा विचार करतात.
व्यावहारीक बुद्धिमत्ता व त्यासाठी लागणारे गुण हे बुधाच्या अंमलात असतात आणि त्याचा प्रभाव मात्र आयुष्यभर राहतो. तो १०/१२ वर्षापर्यत संपत नाही. व्यवसायात बोलणे महत्वाचे आणि बोलणे/ वाणी ही बुधाच्या कारकत्वात येते. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने बुध हा महत्वाचा आहे.
Grasping, memory & Logic या तिन गोष्टी बुधाकडे उत्तम आहेत. त्यांचा योग्य वापर करणे पण त्यांना उत्तम जमते. Curiosity खूप असते. वाचन, मनन, लेखन या गोष्टींची मात्र तयारी नसते. Memory उत्तम असते. अगदी Photographic memory म्हणता येईल व त्याचा उपयोगही ते चांगल्या प्रकारे करू शकतात. Grasping चांगले असल्याने वक्तृत्व आणि लिखाण बुधाच्या कारकत्वात येतात. आता या सर्व चांगल्या गोष्टी झाल्या.
पण बिघडलेला बुध हा फसवेगिरी, खोटे बोलणे, खोट्या सह्या करणे, इत्यादी गोष्टी करू शकतो. Dirty Politics हे बिघडलेल्या बुधाच्या under येते. शाई आणि पेपर या गोष्टी बुधाच्या कारकत्वात येतात. त्यामुळे पुस्तकांशी संबंधीत व्यवसाय, पत्रकारीता गोष्टी बुधावरून आणि जोडीला गुरु वरून ठरतात. Typing, computers, Xerox या गोष्टीही बुधाच्या कारकत्वात येतात.
तसेच बुध हा त्वचेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे skin diseases बुधाच्या under येतात. बुध हा मामाचा कारक ग्रह आहे. मामाचे सुख बुधावर अवलंबून असते. 'ज्योतिषशास्त्र' हे बुधाच्या कारकत्वात येते.
स्वरूप :- कुमार ग्रह असल्यामुळे स्त्री कींवा पुरुष असे म्हंटलेले नाही. ऊंची कमी, किरकोळ शरीरयष्टी, काळसर रंग, पण चेहऱ्यावर बौद्धिक तेज आहे . तसेच मिश्किल भाव आहेत. बुधा जवळ उत्तम विनोदबुद्धी आहे. घरात एक जरी बुधाची व्यक्ति असेल तरी घर हसते खेळते राहते.
क्रमशः
कधी कधी नकळत योग्य काय आणि अयोग्य काय याच्या व्याख्या आपण आपल्या मनात बनवून ठेवलेल्या असतात. आसपासच्या लोकांची वागणूक, घडणाऱ्या गोष्टी, कुठेतरी आपण या व्याख्यानुसार तोलून त्याविषयी आपलं मत बनवत असतो.
आता गंमत अशी आहे की एखाद्याला जे अगदी बरोबर वाटते ते दुसऱ्याला अगदी चुकीचे वाटू शकते. लहानपणी गरीबी बघितलेल्या एखाद्या व्यक्तीला सुबत्ता आल्यानंतर सुद्धा जुने कपडे अगदी फाटे पर्यंत वापरणे योग्य वाटू शकते तर एखाद्याला सुबत्ता येण्याच्या आधीच उत्तम कपडे घालून टापटीप राहणे योग्य वाटते.
जगाला स्वतःच्या नजरेतून तोलणारी लोक ही कायमच दुःखी असतात, कारण त्यांना आसपास सगळ्या न पटणाऱ्या गोष्टीच दिसतात.
चूक आणि बरोबर याची व्याख्या असणं काही गैर नाही, पण इथून पुढे हे मात्र लक्षात ठेवायचं की ही व्याख्या मी फक्त स्वतःलाच लावणार, सतत जगाला माझी फुटपट्टी लावून मोजत बसणार नाही.
FEED THE NEED
By our Rotractor Club of Pune Royal. Where food grains were donated by the Rotractor Group and financed partly by Members of RC Pune South to GHAR. This GHAR is supported by all Retired Officers from the Army this has just started in the month of April 22.
GHAR has the capacity to look after 40 orphans, paralysis patients and Old Age persons . A Very unique concept and operated army style with respect to cleanliness and discipline with lot of love for the orphans. It's a must visit place if anyone intends to donate for a worthy cause. This GHAR was introduced to RCPS and Rotractor by Rtn Dr Vijaya Gujarathi.
Thankyou Vijayatai and all the Members who donated for the FEED THE NEED.
मदतीचा हात - मोतीबिंदू शस्त्रक्रिया
आपल्या क्लबच्या P.I. साठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम नेहेमी राबवणारे रो. दत्ता पाषाणकर यांनी गेल्या वर्षी केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मदत प्रकल्पाचा पुढील भाग आज अजून चार शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत देवून संपन्न झाला.
या प्रसंगी प्रे. रो. संजीव व माजी अध्यक्ष रो. राजेन्द्र गोसावी सुद्धा उपस्थित होते. क्लबच्या प्रतिमा संवर्धनातील या योगदानातील रो. दत्ता पाषाणकर, प्रे. संजीव तसेच संबंधित सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे. अभिनंदन! ग्रेट! वेल डन!!
आमच्या घरी काम करणाऱ्या वैशालीताई १९ ऑगस्टला आल्या आणि म्हणाल्या की आईचे मोतीबिंदूचे ऑपेरेशन करायचे आहे सुट्टी लागेल आणि थोडे पैसेही.
आईचे पाहणारे कोणीच नाही आम्ही दोन मुलीच करतो सगळे.
लगेच त्यांना आपल्या कॅटरॅक्ट ऑपेरेशन प्रोजेक्ट बद्दल सांगितले आणि आपले रो. दत्ता पाषाणकार यांना फोन केला. दत्ताभाऊंनी लगेच त्यांना कागदपत्र (आधार, रेशन कार्ड व बँक पासबुक) घेऊन येण्यास सांगितले. तासाभरात दत्ताभाऊंनी सर्व व्यवस्था केली व डॉ. एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मध्ये तपासणी होऊन दुसऱ्याच (ता. २०) दिवशी सकाळी ८ वा. ऑपेरेशन झाले.
वैशालीताई, त्यांचे पती व वडील यांच्या डोळ्यातील आनंद आणि कृतज्ञतेची भावना सर्व काही सांगून गेली. त्यांच्या आईने "तुमचे उपकार कसे फेडू. तुमच्या संस्थेच्या लोकांना खूप पुण्य लाभेल" असे आवर्जून सांगितले. रो. दत्ता पाषाणकर व रोटरी क्लब पुणे साऊथ चे खूप आभार 🙏🏽
रो. अभिजित देशपांडे
मी संतोष चंद्रकांत पाटणकर. आपल्या रोटरी क्लब ऑफ साऊथ, पुणे, यांचा खूप खूप आभारी आहे माझे दि:- २४ आॕगस्ट २०२२ रोजी डोळयाचे मोतीबिंदूचे आॕपरेशन झाले.
ते व्यवास्थीतपणे पार पडले. तसेच श्री वाळिंबे सर आणि श्री पाषाणकर सर यांच्या मदतीनेच मला एकही रूपया खर्च न होता. माझे आॕपरेशन व्यवास्थीत पार पडले. त्याबद्दल दोघांचेही मानावे तितके आभार कमीच आहेत. आणि एच.व्ही देसाई हाॕस्पीटल मधील डाॕकटर,स्टाॕफ यांचा मनपूर्वक आभारी आहे. आपण करत असलेल्या महान कार्याची माझ्यासारख्या गरजवंताना खूप मदत होते. त्यामुळे आपल्या रोटरी क्लब आॕफ साऊथ पूणे, यांचे खूप खूप आभार.
धन्यवाद!
संतोष चं. पाटणकर
मोदक मेकिंग वर्कशॉप
१४ ऑगस्ट २०२२
गुरुर्देवो भव!
माता- पित्या नंतर आपण फक्त आपल्या गुरूलाच "देव"स्थानी मानतो. देवत्वाचे स्थान म्हणजे परमोच्च स्थान. त्या पलिकडे काहीही नाही.
माता पित्यांनी या जगात आणल्या नंतर आपण मरेपर्यंत जे आयुष्य जगतो (म्हणजे आपण जे काही असतो) ते आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आपल्याला भेटलेल्या अनेकविध गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच. काही दृष्य स्वरुपात काही आपल्याला न कळत. म्हणून गुरुचा महिमा.
आपल्याला लहानपणी मिळालेले शिक्षण हा त्यातला महत्वाचा भाग.
हे सुभाषित आठवण्याचे कारण म्हणजे काल (१५ ऑ रोजी) पूना कॉलेज येथे झालेला कार्यक्रम.
काश्मीर येथील इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या मुलांसाठी बनविलेल्या E- Learning Edu-Projectors चा हस्तांतरण सोहळा. असे ३ सेट् स आपण BWF तर्फे काश्मीर येथील Army goodwill शाळांना दिले. हे उपकरण आपले रोटेरियन मिलिंद क्षीरसागर यांनी बनविलेले आहेत. पेटंटेड आहेत.
हा प्रकल्प अनेक अर्थाने नाविन्यपूर्ण आणि आपल्या क्लब चा मानबिंदू ठरावा असा आहे. ( Signature project) . म्हणून हा खास उल्लेख!
मानबिंदू का?
१) काश्मिरी आणि उर्दू या भाषांमध्ये असलेला हा एकमेव उपक्रम.
लहान वयात मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे या जगन्मान्य संकल्पनेला अनुसरून विशेष प्रयासाने बनविलेला.
२) काश्मीर मधील अति दुर्गम आणि अति संवेदनशील भागातील मुलांना शिक्षण मिळावे हे ध्येय.
३) या भागात वीज नाही
४) इंटरनेट नाही
५) अनेक पिढ्यांनी शिक्षणाचा विचारही केलेला नाही. अशिक्षित पालक वर्ग.
६) अनेक छोट्या छोट्या वाड्या-वस्त्यांत विखुरलेला विद्यार्थीवर्ग. शाळेत यायचं म्हटलं तरी रोजची ५-१० किलोमीटरची पायपीट. तीही दुर्गम अशा पहाडातून.
७) वर्षातील ५ते ६ महिने हिमवर्षावामुळे सगळं जनजीवनच ठप्प. जेमतेम ६ महिने शाळा भरणार.
८) रोजच्या जगण्याचीच हमी नाही तेथे शिक्षणाबद्दल आस्था कोठून येणार?
अशा मुलांसाठी हे Edu - Projectors!
वीज नको, इंटरनेट नको, वर्गावर शिक्षक नसतील तरी पहिलीतला लहान मुलगा हे उपकरण स्वतः आणून (इतके हलके आणि सुटसुटीत) वापरून शिकू शकतो. तेही काश्मिरी आणि उर्दू या त्यांच्या मातृभाषेत!
पुण्या-मुंबईच्या शाळेच्या तोडीचे!
अशी शिक्षणाची संधी मिळणे हेच मोठे अप्रूप आहे. हे त्यांच्या जीवनाला मिळालेले वरदानच आहे.
Change the Life या रोटरीच्या ब्रीदवाक्याला जागणारे.
या प्रकल्पाचा प्रवास मोठा मनोरंजक आणि स्पृहणीय असा आहे.
आपल्या क्लबच्या काही सदस्यांचा अतिशय मोलाचा असा सहभाग यात असून देखील , " पीपी डॉ गोरे सरांचा " हा प्रकल्प आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच्याशी इतर सहभागीही सहमत असतील अशी मला खात्री आहे.
एक शिक्षक म्हणून अचूक जाण, काय करायचे याचे पूर्ण भान असल्यामुळे असा अनोखा प्रकल्प करण्याचे त्यांनी ठरविले. कोणाकोणाला बरोबर घ्यावे लागेल याचा अंदाज असला तरीही पूर्ण काम एका हाती करावे लागेल याची जाण ठेवून, गेली दीड दोन वर्षे अविरत / अविश्रांत केलेल्या कामाचे हे फलित आहे.
समर्पणवृत्ती, कामावरची प्रगाढ निष्ठा, खूप कष्ट, अनेक संकटांवर मात, लोकांना बरोबर घेण्याची हातोटी आणि त्या बरोबरच उत्कृष्टतेचा ध्यास असे त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन करावे लागेल.
एक रोटेरियन काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
समारंभा दरम्यान ज्या कोणी व्यक्तींनी आपले विचार मांडले, त्यावेळी गोरे सरांचा उल्लेख ज्या आदराने केला जात होता, त्यामुळे आपल्या क्लबचा लौकिक निश्चितच दुणावला आहे.
ही सगळी हकिकत डॉ गोरे सरांच्या तोंडूनच ऐकण्यासारखी आहे. इतर क्लब्सना बरोबर घेऊन एका मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे वाटते.
रो. रवींद्र प्रभुणे
रानमळा येथील वृक्षारोपण
29 August 2022
गेले दोन वर्ष न होऊ शकलेल्या वर्षा सहलीची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते, आणि तो दिवस आला. सिंहगड पायथ्याच्या गप्पांगण येथे साडेनऊ पर्यंत मंडळी जमली. सुरुवात गरमागरम पोहे आणि इडली सांबार खाऊन झाली.
त्यानंतर गप्पांगणचा मॅनेजर पंकज याने सर्वांना फेरफटका मारायला नेले. त्यात त्याने आसपासची अनेक झाडे, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे उपयोग निसर्गातील त्यांची विविध रूपे अतिशय खुबीने उलगडून दाखवली. या फेरीचा शेवट एका खिंडीतल्या छोट्या ट्रेक ने झाला. परत आल्यावर श्रमपरिहारासाठी काही मंडळींनी फेलोशिपचा मार्ग पकडला आणि मग गप्पा आणि विनोदाचा जोरदार कार्यक्रम रंगला, तर काही मंडळींनी मात्र धबधब्यावर जाऊन खळखळत्या पाण्याची मजा लुटणे पसंत केले.
संपूर्ण हिरवागार आसमंत मध्येच हलकासा होणारा पावसाचा शिडकाव, ऐकू येणारे पक्षांचे, मोरांचे आवाज, त्याचबरोबर गरम गरम कांदा भजी आणि मित्रमंडळींची संगत. श्रावण एन्जॉय करायला अजून काय हवे ?
दुपारचे जेवण फक्कड महाराष्ट्रीयन जेवण होते. मेथीची भाजी, पिठलं, वांग्याची भाजी, शेवयाची खीर आणि झणझणीत चिकनचा रस्सा. सर्वांनी भरपेट ताव मारला. थोडी विश्रांती झाल्यावरती मग 'housie' चा कार्यक्रम रंगला आणि त्यानंतर रुमालपाणीचा चा खेळ झाला. मग बक्षीस वितरण झाले आणि चहा पिऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
श्वेता, यामिनी आणि टीमने केलेल्या उत्तम नियोजनाचे कौतुक करत मंडळी तृप्त मनाने आणि पोटाने आपापल्या घरी परतली.
अपर्णा कुलकर्णी
- Avenue Director Service Projects (Youth and Partners in Service) - Rtn. Raghavendra Ponkshe
- Committee Chairperson Interact - Ann Madhavi Deshpande
- Beneficiary Details
34 boy and girl students of Std 9 of Nandadeep High School
- Number of Beneficiaries:34
- Budgeted: YES
- Project Start Date: 04/08/2022
- Project End Date: 04/08/2022
- Number of Participating Rotarians: 3
- Number of Participating Anns: 3
- Project Duration (Hrs): 1
- Total Person Hours Spent: 6.00 Hrs.
- Project Partners (e.g. Other RCs, NGO): Teachers and Staff of Nandadeep High School
- Brief Project Description
Installation of President, Vice-President, Secretary and Treasurer of Interact Club at Nandadeep High School RY, Pune for 2022-23 was held on 4th August 2022.
34 students were present for the program along with School Principal Mrs. Kondekar and teacher Mrs. Mane.
President Rtn. Sanjeev Ogale, Secretary Rtn. Abhijit Deshpande, Avenue Director Rtn. Raghavendra Ponkshe, First Lady Ann Sneha Ogale, Ann Asmita Apte were present.
Program was organised by Interact Committee Chairperson Ann Madhavi Deshpande - Submitted By : Ann Madhavi Deshpande
- Avenue Director Service Projects (Youth and Partners in Service) - Rtn. Raghavendra Ponkshe
- Committee Chairperson Interact - Ann Madhavi Deshpande
- Beneficiary Details
Boys & Girls of std 9 of Nutan Balvikas Mandir School - Number of Beneficiaries: 30
- Total Project Cost (INR): 0
- Budgeted: YES
- Means of Funding: --
- Project Start Date: 06/08/2022
- Project End Date: 06/08/2022
- Number of Participating Rotarians: 4
- Number of Participating Anns: 2
- Project Duration (Hrs): 1
- Total Person Hours Spent: 6.00 Hrs.
- Project Partners (e.g. Other RCs, NGO)
Teacher & Staff of Nutan Balvikas Mandir - Brief Project Description
Installation of President, Vice-President, Secretary and Treasurer of Interact Club at Nutan Balvikas Mandir, Pune for RY 2022-23 was held on 6th August 2022.
19 students were present for the program along with School Principal Mrs. Sawe and teacher Mrs. Budage.
President Rtn. Sanjeev Ogale, Secretary Rtn. Abhijit Deshpande, Committee Member Rtn. Hemant Walimbe, Rtn Nadhuri Kirpekar and Ann Asmita Apte were present.
Program was organised by Interact Committee Chairperson Ann Madhavi Deshpande - Submitted By : Ann Madhavi Deshpande
Vihaan-District Interact Assembly
29 August 2022
Attending District Interact Assembly today with President Rtn. Sanjeev Ogale, Mane Madam and office bearers of the Nandadeep High School Interact Club.
The school was felicitated for its long term association and commitment to Interact.
Student's General Health and Dental Checkup
29 August 2022
120 students General Health and Dental Checkup.
Medical Checkup Camp at Rathi High School conducted by Rtn Dr Vijayatai and Rtn Dr Sangeeta.
- उपस्थित असलेले मान्यवर/ डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स: श्री शिंदे प्रशांत, सोनाली शिंदे
- पाहुण्यांची ओळख करून देणाऱ्या सदस्याचे नाव: डॉ . संगीता देशपांडे
- कार्यक्रमाचा सारांश:
मनुष्याच्या जीवनात पाण्याचे महत्व किती आहे हे आपण जाणतोच.हे पाणी साठविण्यासाठी आपण मोठं मोठी धरणे उभी करतो.महाराष्ट्रात अशी 2000 धरणे असून देशात जवळजवळ 5000 च्या वर धरणे आहेत.महाराष्ट्रात एव्हडा धरण साठा असूनहि आपल्याला उन्हाळ्यात पाणी समस्येला तोंड द्यावे लागते या सारखे दुसरे दुर्दैव नाही.कारण आपल्या कंदील धरणे ही अनेक कारणांनी भरून गेलेली आहेत.गाळाने भरली आहेत.धरणांच्या आसपास अनेक वस्त्या उभ्या राहिल्या आहेत,जागे वरचे अतिक्रमण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, पाण्याचा बे-सुमार वापर हा तर कमीच होत नाही.,शेतीला नवीन पद्धतीने कमी पाण्यात शेती करण्या ऐवजी जास्त पाणी लागणारी पिके घेण्यावर भर दिला जातो,हे सगळे कमी म्हणून धरणांची डागडुजी करण्याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे.या सगळ्याचा परिणाम आपण भोगतो आहोत.आणि म्हणूनच क. सुरेश पाटील यांनी आपल्या येथील खडकवासला धरणाच्या पुनरजीवनाचे प्रचंड मोठे काम हाती घेतले आहे.त्यांनी सामाजिक संस्था,शालेय विदयार्थी,रोटरी सारख्या संस्था यांना पाणी वाचविण्याचे महत्व पटवून देऊन त्यांच्या मदतीने हे शिव धनुष्य पेलण्याचं ठरविले आहे आणि या कामात त्यांना यशही मिळत आहे.सैन्यामध्ये असल्याने त्यांच्या कामाची शिस्त,त्या साठी लागणारी तळमळ,याची बिलकुल कमी नाही आणि म्हणूनच खडकवासला धरणातून आत्तापर्यंत 25 लाख ट्रक गाळ ,राडारोडा काढून तो पुण्यातील रहिवासी आणि शेतकरी यांना मोफत दिला आहे आणि एक ट्रक गाळ काढणे म्हणजे 1 ट्याकर पाणी असे धरणात पाणी वाढ होण्यास मदत केली आहे.तसेच 15 लाख झाडे लावली आहेत या झाडांमुळे पक्षी,प्राणी यांची चांगली वाढ झाली आहे.अशा प्रकारे चांगले उपक्रम राबवून फार मोठे समाजकार्य केलेले आहे.
- आभार प्रदर्शन करणाऱ्या सदस्याचे नाव: सुभाष चौथाई
- उपस्थित असलेल्या रोटेरिअन्सची संख्या: 25
- उपस्थित असलेल्या ॲन्स/स्पाऊसची संख्या: 15
भारताचा स्वतंत्रता दिन , संकष्टी चतुर्थी आणि श्रावणी सोमवार असा त्रिवेणी संगम घडलेला दिवस.
प्रोग्राम कमिटीने याचे औचित्य साधून सौ मानसी बडवे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
संध्याकाळी सहा वाजता सेवा सदन येथेच प्रथम अथर्वशीर्ष पठण आणि नंतर या सुमधुर कीर्तनाचा आनंद सभासदांना मिळाला.
मानसी ताईंनी चाफेकर बंधूंच्या पराक्रमाच्या कथेचे कथन त्यांच्या कीर्तनातून केले.त्यांचा खडा आवाज, अत्यंत सुश्राव्य गायन आणि रसाळ निवेदन यामुळे ऐकणाऱ्या नच्या डोळ्यासमोर अक्षरशः रँड वधाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. आणि त्यानंतर त्या तिघांच्या बलिदानाचा म्हणजे फाशीचा प्रसंग ऐकताना तर श्रोत्यांच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या.इतके सशक्त सादरीकरण त्यांनी केले .
त्यानंतर फेलोशिप कमिटी ने आयोजित केलेले सुग्रास आणि चविष्ट भोजन व त्यात प्रे.संजीव व स्नेहानी पुरस्कृत केलेले मोदक यामुळे या दिवसाची सांगता देखील तितकीच छान झाली
Guests / District Officers Present
District Membership Director Rtn. Pankaj Patel
Program Synopsis
Induction program of four new members in Rotary Club of Pune South was held on 22nd August, 2022 at Sevasadan Hall.
Celebrating the Rotary Membership Month, four new members joined the RCPS family. District Membership Director, Rtn. Pankaj Patel was the Chief Guest for the induction program of these four new members joining the Rotary Club of Pune South family.
Four new members Rtn. Amithabh Akolkar, Rtn. Kedar Bhave, Rtn. Subhash Karandikar, Rtn. Archana Wadeyar and Rtn. Suhas Oka were inducted in the program at the hands of District Membership Director Rtn. Pankaj Patel and Senior Members of RCPS PP Rtn. Anil Supnekar, PP Rtn. Govind Patwardhan, PP Rtn. Sham Kulkarni and PP Rtn. Dr. Rajendra Gosavi.
Rotary pin along with a specially designed gift from Rotary District Membership Committee and a kit containing Membership Certificate, Rotary Stickers, Directory of Members etc. were given to all the new members.
The proposers of these new members President Rtn. Sanjeev Ogale, Rtn. Shrikant Paranjape, Rtn. Shweta Karandikar and Rtn. Hemant Walimbe were felicitated by giving them the certificates for the same.
President Rtn. Sanjeev Ogale gave the Oath to all the new members.
Director of Membership Committee of RCPS, PP. Rtn. Virendra Shah gave the introduction of the Chief Guest.
In his speech, Chief Guest, District Membership Director Rtn. Pankaj Patel congratulated all the new members for joining Rotary and explained the functioning of Rotary and its advantages at local and International levels. He explained how one can contribute to very large projects for the welfare of the society by effectively using the platform of Rotary. He also guided them for their future journey.
Vote of thanks was given by Rtn. Sandeep Awadhani
The program was well attended by the members of the club and guests.
Compering by Ann. Priyadarshini Ambike was excellent added the special touch to the program.
The program was followed by an excellent fellowship as well.
Overall, it was a very well conducted event and marked a good start for the new members in the RCPS family.