साप्ताहिक सभा
कलाकारी
सप्टेंबर २०२०

क्लबकारी

कोविड योद्ध्यांचा सन्मान

रो. उद्धव गोडबोले

Corona Warriors PI Pratibha Joshi
Corona Warriors Shri Kanade
Covid Warriors Sudhir Javalikar
Covid Warriors Shekhar Dhumal
Corona Warriors Adv Sayali Sadhale
Corona Warriors Ajay Gotkhindikar
Corona Warriors Dr. Sanjay Salunkhe_Kalpanatai Salunke of Gram Gourav Pratishthan
Covid Warriors Velhe

कोविडविरुद्धची आपली लढाई जारी आहे. अनेक व्यक्ती त्यात धाडसाने भाग घेऊन मोलाची समाजसेवा करत आहेत. मागील महिन्याप्रमाणेच ऑगस्ट महिन्यातही आपल्या क्लबने व्होकेशनल सर्व्हिस, फंक्शनल लिटरसी अ‍ॅन्ड स्किल डेव्हलपमेंट कमिटीतर्फे अशा काही व्यक्तींना एक मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरवले. अभिमानाची बाब म्हणजे आपल्याच क्लबचे अनेक सभासद या लढाईत मोलाचे कार्य करत आहेत. त्याचबरोबर आपले सभासद नसलेल्या व्यक्तींचाही त्यात समावेश आहे.  


दुसर्‍या टप्प्यात प्रेसिडेंट रो. सुदर्शन नातू यांच्या हस्ते पुढील व्यक्तींचा गौरव करण्यात आला... यावेळी सूचक रो. नितीन पाठक उपस्थित होते.


१. श्री. सुधीर जवळीकर (रा. स्व. संघ कार्यकर्ते)

२. श्री. शेखर धुमाळ (रा. स्व. संघ कार्यकर्ते)

३. ॲड. सायली साधले 

४. सौ. प्रतिभा जोशी (वरिष्ठ पो. नि. कोथरूड पोलीस ठाणे) 

५. श्री. देवकर (पो. नि. वेल्हा)

६. श्री. शिवाजी शिंदे, (तहसीलदार, वेल्हा)

७. श्री. कानडे 

८. श्री. अजय गोटखिंडीकर आणि सहकारी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती)  सूचक - रो. निरंजन 

९. डॉ. संजय साळुंखे 



याशिवाय पुढील व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे-

आपले सभासद: 

१. रो. संजीव ओगले 

२. रो. मृदुला घोडके

३. अ‍ॅन विशाखा वेलणकर


सभासदांनी सुचवलेली नावे: 

१. रो. चित्रसेन दिवाकर ख़िलारे – एरंडवणे, सूचक - रो. पी.पी. सोनल पटवर्धन

२. सर्वश्री सचिन देवधर व आनंद इंगळे, सूचक - रो. निरंजन

३. श्री. मंगेश गुप्ते, सूचक – रो. अरविंद शिराळकर

४. डॉ. भास्कर हर्षे, सूचक – रो. अरविंद शिराळकर

५. श्री. ॠत्विज गोखले, सूचक – रो. पी. पी. गोविंदराव पटवर्धन 

६. श्री. सारंग आनंद सराफ, सूचक – रो. दत्ता पाषाणकर

७. श्री. संतोष दतात्रेय फडतरे, सूचक – रो. दत्ता पाषाणकर

८. सर्वश्री दीपा आणि दिलीप परब, सूचक – डॉ. ग़ीतांजली पुरोहित

प्लाझ्मादान जनजागृती मोहीम

रो. श्वेता करंदीकर

Plasma Donation Mandar Ambike
Plasma Donation Datta Pashankar 1
Plasma Donation Datta Pashankar 2

प्लाझ्मादान जनजागृती मोहिमेअंतर्गत आपल्या क्लबने शहरातील काही प्रमुख ठिकाणी या मोहिमेची माहिती देणारे बॅनर लावले आहेत. यांपैकी मंडई गणपती येथील बॅनर रो. डॉ. मंदार अंबिके यांच्या पुढाकाराने तर दुसरा बॅनर रो. दत्ता पाषाणकर यांच्या बिल्डिंगवर लावला आहे. यासाठी त्यांनी आणि रो. सुभाष चौथाई यांनी खूप परिश्रम घेतले. नंतर तिथल्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी रोटरीचे मास्क वाटप केले गेले. 


रो. डॉ.  मंदार अंबिके, रो. दत्ता पाषाणकर, रो. सुभाष चौथाई, रो. भाऊ सहस्रबुद्धे आणि आय.पी. पी. रो. अभिजित जोग यांना धन्यवाद…!


अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष आण्णा थोरात आणि नगरसेवक सम्राट थोरात यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

लॉकडाऊनमधील मनोरंजन - सुडोकू स्पर्धा

रो. हृषीकेश बडवे,

स्पोर्ट्स कमिटी

आरसीपीएसच्या स्पोर्ट्स कमिटीतर्फे ऑनलाईन पद्धतीने सुडोकू स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. यामध्ये क्लबमधील दहापेक्षा जास्त रोटेरिअन्स आणि ॲन यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रोटरी वर्ष २०२०-२१मधील स्पोर्टस् कमिटीचा पहिलाच कार्यक्रम यावेळी लोकडाऊनच्या बंधनांमुळे ऑनलाईन केला गेला.


ठरलेल्या वेळेत सुडोकू सोडवून आयोजकांना पाठवण्यास स्पर्धांकांना सांगितले गेले. याप्रमाणे कमीत कमी वेळेत अचूक कोडे सोडवणारी व्यक्ती त्या दिवशीची विजेती ठरली. स्पर्धेतील चुरस आणि लोकप्रियता इतकी वाढली की, स्पर्धेचा कालावधी एक आठवड्याऐवजी दोन आठवडे करण्यात आला.


एकाच दिवशी दोन अवघड कोडी सोडवण्याची अंतिम फेरी रविवार २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. 

जास्तीत जास्त अचूक उत्तरे, कमीत कमी वेळ आणि अंतिम फेरीतला सहभाग या निकषांवर पुढीलप्रमाणे विजेते घोषित करण्यात आले.

प्रथम क्रमांक - ॲन मोहिनी नातू

द्वितीय क्रमांक - रो. डॉ. राजेंद्र गोसावी

उत्तेजनार्थ पारितोषिके - रो. रवींद्र प्रभुणे, ॲन अस्मिता आपटे, ॲन संगीता देशपांडे

रोटरी इंटरॅक्ट

रो. अभिजित देशपांडे

Interact_Sep2020

मित्रांनो,


तीन नवीन इंटरॅक्ट क्लब्जचे इंस्टॉलेशन करून कामाचा धडाका उडवून दिलेल्या आपल्या इंटरॅक्ट कमिटीने या महिन्यातदेखील चौथ्या इंटरॅक्ट क्लबचे व्हर्च्युअल  इंस्टॉलेशन श्री सरस्वती विद्यालय, आंबवणे या शाळेमध्ये पार पाडले. १५ ऑगस्ट २०२० रोजी म्हणजेच भारताच्या चौर्‍याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम झाला. 


प्रचंड पाऊस असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि फोन दोन्ही बंद असतानादेखील खूप मेहनत घेऊन, विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी कायम संपर्कात राहून इंटरॅक्ट कमिटी चेअरपर्सन रो. माधुरी किरपेकर यांनी या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले.


क्लब प्रे. रो. सुदर्शन नातू,  यूथ सर्व्हिसेस डायरेक्टर रो. रश्मी परुळकर, ॲन अस्मिता आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंटरॅक्ट कमिटी सदस्य आणि क्लबचे आय. टी. ऑफिसर रो. अभिजित देशपांडे यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमाची तांत्रिक बाजू उत्तमरीत्या सांभाळली. 


शाळेतल्या पाठक मॅडम तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी झूमद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच फर्स्ट लेडी ॲन सुगंध नातू, सेक्रेटरी रो. मनीषा बेळगावकर,  पी पी रो. डॉ. किरण पुरोहित, रो. दत्ताजी देवधर, रो.किरण वेलणकर, रो. सुभाष चौथाई, रो. विनायक जोशी, ॲन जयश्रीताई बेंद्रे, ॲन स्वाती वेलणकर, ॲन डॉ. विजया गुजराथी आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते. 


कामाचा आलेख असाच चढता ठेवण्याकरता आमच्या इंटरॅक्ट क्लबच्या टीमला अनेक शुभेच्छा!

दक्षिणकरांची साजरी सजावट


आपल्या मेंबर्सनी घरच्या गणपतींची आणि गौरींची केलेली सुंदर सजावट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वेळेस बुलेटीन कमिटीतर्फे ‘दक्षिणकरांची साजरी सजावट’ ही स्पर्धा घेण्यात आली. मेंबर्सनी आपल्या घरच्या गणपती आणि गौरीच्या सजावटींचे फोटो पाठवले. सगळ्याच सजावटी मनमोहक आहेत. विविध अंगांचा विचार करून जज्जेसनी दिलेला निकाल पुढीलप्रमाणे...


प्रथम क्रमांक - रो. मीनल माळवदकर

द्वितीय क्रमांक - ॲन अस्मिता आपटे

तृतीय क्रमांक - रो. जितेंद्र महाजन

उत्तेजनार्थ बक्षिसे

ॲन इंद्रायणी पूर्णपात्रे

ॲन डॉ. गीतांजली पुरोहित

स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांची सजावट येथे पाहा...

https://rotarypunesouth.in/bulletin-cover-sep2020/bulletin-ganpati/

आनंददायी वृक्षारोपण - ऑगस्ट २०२०

रो. रवींद्र प्रभुणे 

या वर्षी अनपेक्षितपणे आलेल्या बंधनांमुळे जनजीवनाची घडी अनेक ठिकाणी विसकटलेली असतानादेखील रोटरी क्लब पुणे साऊथमधील सभासदांचा उत्साह आणि कामांची रेलचेल उणावली नव्हती. याचे प्रत्यंतर आपल्या क्लबच्या एन्व्हायरमेंट कमिटीच्या कार्यक्रमांतही दिसून येते. 

 

नेहमीच्या प्रथेप्रमाणे रोटरीचे नवीन वर्ष सुरू होताच जुलै महिन्यामध्ये बीजारोपण आणि वृक्षारोपण हे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले. 

 

ऑगस्ट महिन्यामध्ये वृक्षारोपणाचे तीन कार्यक्रम साजरे झाले. तीनही कार्यक्रमांना स्वतःचे असे वैशिष्ट्य होते.


  १)  वृक्षारोपण – चांबळी ५ ऑगस्ट २०२०
 

हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा झाला. ज्यांचा चुकला ते एका आनंदाला मुकले.

 

पाणी पंचायतीतर्फे उत्तम नियोजन, पूर्व तयारी, त्यांचे कार्यकर्ते, चांबळीच्या सरपंचांचे सर्व कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे कार्यक्रम सफल झाला.

 

आपल्या क्लबच्या सदस्यांचा उत्साह आणि सहभाग वाखाणण्याजोगा होता, विशेषत: दत्ताजी देवधर आणि नवीन सदस्य.

या दिवशी चारशे झाडे लावण्यात आली.


  

२) वृक्षारोपण - कर्नलवाडी

 

पुण्यापासून साधारण साठ किलोमीटरवर साधारण दुष्काळी समजलेल्या नीरा गावाजवळील एका ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेने झाडे लावण्याविषयी काही दिवसांपासून आपली बोलणी चालू होती. त्याला गावच्या अत्यंत सुशिक्षित सरपंचांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ग्रामस्थांच्या भरघोस सहभागामधून रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले. 

 

‘आम्ही सगळी कामे करतो, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि  चांगली रोपे पुरवा’ अशी मागणी त्यांनी केली. त्याबरहुकूम आपण त्यांना रस्त्याच्या कडेला लावण्यायोग्य अशी दोनशे रोपे पुरवली. त्यांसाठी खड्डे खणणे, झाडे लावणे आणि संरक्षणासाठी पिंजरे बसवणे ही सर्व कामे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने केली. रोटरीसारखी संस्था ‘तुम्ही झाडे लावा. आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू’ असा प्रस्ताव घेऊन आपणहून येते आहे याचे त्यांना खूपच अप्रूप वाटले.  

 

त्यांनी याचे नम्रपणे स्वागत केले. त्याबरोबरच एक एकर जागेवर देवराई करण्याच्या आपल्या प्रस्तावास त्यांनी आनंदाने संमती दिली आणि त्या दृष्टीने एक एकर जागा राखीव करून सपाटीकरण करणे,  कुंपण घालणे,  पाण्याची व्यवस्था करणे ही कामे त्यांनी हाती घेतली असून तिथेही देवराईसाठीची लागवड होणार आहे. 

 

त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन बघून पूर्वाध्यक्ष डॉक्टर गोरे सर यांनी त्यांचे कौतुक करणारे एक पत्र त्यांना पाठवले. त्याविषयीही  कृतज्ञता व्यक्त करून रोटरीचे असेच मार्गदर्शन वारंवार मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 

स्थानिकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसाद याचे हे उत्तम उदाहरण आहे.


   

) चांबळी वृक्षारोपण – २     २३ ऑगस्ट  २०२०

 

या ठिकाणी अजूनही खूप झाडे लावण्यास वाव आहे आणि परिस्थिती पोषक असल्यामुळे तिथे जमेल तितकी झाडे लावण्याचा आपला मानस आहे... त्यामुळे दुसरा टप्पा सोळा ऑगस्ट रोजी करण्याचे ठरले होते परंतु काही अडचणींमुळे त्याला पुढच्या रविवारचा म्हणजे तेवीस तारखेचा मुहूर्त लागला. त्याही दिवशी अनेक जणांची गैरसोय  झालेली असतानादेखील लक्षणीय उपस्थिती होती. 

 

गोरे सरांकडचे तीन पाहुणे, नितीन पाठक यांच्याकडचे दोन पाहुणे (यामधील एक जण नवीन सभासद होऊ इछित आहे), रो.नितीन कुर्ले यांच्याबरोबर आलेले अजून तिघे जण, या वर्षीचे प्रेसिडेंट(सुदर्शन) आणि फर्स्ट लेडी (सुगंधा), आयपीपी अभिजित, माजी  प्रेसिडेंट्स (डॉ. गोरे सर, विनायकराव) आणि दोन भावी प्रेसिडेंट्स (अतुल, ओगले आणि कुटुंबीय)  यांची उपस्थिती होती... त्यामुळे पुढची दोन्ही वर्षें प्रकल्प चालू राहणार याची खात्री झाली. 

 

पाणी पंचायतीचा सहभाग नेहमीसारखा होताच... शिवाय त्याबरोबर एक विशेष बाब म्हणजे ग्रामस्थांपैकी अनेक तरुण (भावी कार्यकर्ते), बाल कार्यकर्ते असे अनेक जण उत्साहाने सहभागी झाले होते.

 

उत्तम  पूर्वतयारी असल्यामुळे आज सहाशे झाडांचे वृक्षारोपण अतिशय कमी वेळात झाले. खड्डे आहेत, वृक्षारोपण करण्यासाठी माणसे आहेत पण झाडे कमी पडली अशी आजची परिस्थिती झाली होती.

 

तासाभरात वृक्षारोपण झाल्यामुळे त्यानंतर मिळालेल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद आल्हाददायक वातावरणात प्रत्येकाने घेतला. 

 

वृक्षारोपणाबरोबरच याला एका आनंददायी सहलीचे स्वरूप आल्याचे अनेक जणांनी बोलून दाखवले.  

 

यादरम्यान अजून एक विशेष बाब लक्षात आली. विशी-तिशीतले जे ग्रामीण युवक आज सहभागी झाले होते त्यांना  वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्यांची जबाबदारी यांची जाणीव झाल्याचे जाणवले. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत योग्य रितीने पोहोचला आहे.

 

या तीनही कार्यक्रमांचे श्रेय श्री. रघुनाथ ढोले, पाणी पंचायतीच्या डॉक्टर सोनल शिंदे मॅडम,  प्रशांत बोरावके, त्यांची टीम, चांबळीची युवा टीम, सरपंच, कर्नलवाडीचे सरपंच श्री. सुधीर निगडे, परिचित श्री. कल्याण निगडे (ज्यांनी हा योग घडवून आणला), कर्नलवाडीचे ग्रामस्थ, डॉक्टर गोरे सर, नितीन पाठक आणि  उपस्थित असलेले सर्व ॲन्‍स-रोटेरिअन्स, पाहुणेमंडळी यांना जाते. 

 

याची पूर्वतयारी आणि जुळवाजुळव करण्यात आपले उत्साही रोटेरिअन श्री. नितीन पाठक, डॉक्टर गोरे सर आणि कायम बरोबर असणारे आपले अध्यक्ष सुदर्शन नातू यांच्याशिवाय हा प्रकल्प तडीस  गेलाच नसता…

 

एक  संस्मरणीय कार्यक्रम म्हणून याची नक्की नोंद होईल.

क्लबकारी

अध्यक्ष - सुदर्शन संवाद

विविध विभाग संचालक किंवा कमिटी मुख्य संवाद

क्लबमधील विविध प्रोजेक्ट्स, कार्यक्रम, फेलोशिप्स

जावे त्यांच्या क्षेत्रा… / मागील एखाद्या प्रोजेक्टची गोष्ट

तुमचा लेख आवर्जून द्या समन्वयक: आनंद / यामिनी
साप्ताहिक सभा
कलाकारी