Nomination Committee 2021-22 Election
Nomination Committee 2021-22 Election was held on 22nd November 2021.
A.G. P.P. Rtn. Sandeep Vilekar presided as Election Officer.
Results of the elections are as follows:
✅ IPP. Rtn. Natu Sudarshan - Convenor
✅ President Rtn. Atre Atul
✅ Rtn. Deshpande Abhijit
✅ Rtn. Ghodake Mridula
✅ Rtn. Gosavi Rajendra Dr.
✅ Rtn. Nandurkar Yogesh
✅ Rtn. Pashankar Dattatraya
✅ Rtn. Patwardhan Govind
✅ Rtn. Purohit Kiran Dr.
✅ Rtn. Vilekar Sandeep
✅ P.E. Rtn. Ogale Sanjeev - Ex Officio Member
इंटरॅक्ट क्लब च्या यशानंतर १९६८ साली १८-१९ वयोगटातील तरुण-तरुणींकरिता हा कार्यक्रम सुरू केला. रोटरी मधील “रोट” व ॲक्शन मधील “ॲक्ट” या शब्दांवरून रोटरॅक्ट हा शब्द तयार झाला व त्याचा अर्थ “रोटरी इन ॲक्शन” असा करण्यात आला. त्यावरून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कळून येते. नॉर्थ कॅरोलिना मधील रोटरी क्लब ऑफ शार्लोट नॉर्थ यांनी पहिला रोटरॅक्ट क्लब स्थापन केला. आज सुमारे १२५ देशात सहा हजाराच्या आसपास रोटरॅक्ट क्लबचे दीड लाख तरुण सभासद आहेत. व्यक्तिगत यश व समाजाचा सहभाग यात प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत जबाबदारी मोठी असते व सेवेतून स्नेह संगत (फेलोशिप टू सर्विस) या तत्वातून कार्य केले तर युवावर्ग बरेच काही करू शकेल, हे तत्व राबवले जाते. रोटरॅक्ट चे सदस्य विद्यार्थी अगर नुकतेच व्यवसाय-नोकरीत पडलेले तरुण असतात. अश्या वर्गात नीतिमत्तेचे बीज रोवण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. तसेच त्यांच्यातील नेतृत्व व उत्तम नागरकित्वाचे विकसित व्हावेत यासाठी खास शिबिरे, प्रकल्प राबवले जातात. रोटारॅक्ट तर्फे मंडळ सभा, मंडल परिषद, प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. क्लबची बैठक ठराविक कालावधीनंतर दर महिन्यात होते. असा रोटरॅक्ट क्लब हा रोटरी क्लबने पुरस्कृत करावा लागतो व तो व्यवस्थित कार्यरत आहे ना हे देखील पुरस्कर्त्या रोटरी क्लबला पाहावे लागते. रोटरॅक्ट क्लबचे प्रादेशिक व जागतिक अधिवेशन होते. रोटरी क्लब कडूनन कोणतेही अर्थसाहाय्य न घेता रोटरॅक्ट क्लब हा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण राहून कार्य करणे अपेक्षित असते.
Following members have achieved PHF status in response to the appeal made by Foundation Avenue. Heartiest congratulations and a big thank you:
🌟 Rtn. Datta Pashankar
🌟 Ann Nandini Atre
🌟 Ann Neha Walimbe
🌟 Ann Saee Paranjape
🌟 Ann Arati Chitale
🌟 Ann Bhagyashree Mahajan
🌟 Annette Soumitra Vilekar
🌟 Ann Bhavna Purohit
🌟 Rtn. Yogesh Nandurkar
🌟 Ann Rucha Nandurkar
🌟 Annette Sharva Parulkar
Other contributions:
🌟 PE Rtn. Sanjeev Ogale US$ 500
🌟 Ann Sneha Ogale US$ 500
Sponsorship to sports persons as per appeal during weekly meeting of 15th November
🌟 Rtn. Madhuri Kirpekar Rs. 25,500
🌟 Spouse Uday Kirpekar Rs. 25,500
🌟 Rtn. Mridula Ghodke Rs. 2500
Cow Donation:
🌟 Aniruddha Oke Rs. 15,000
आज आपण आपल्या रोटरी परिवारातील सुनीता प्रभुणे यांचा बँकेतील क्लार्क ते DGM पर्यंतचा प्रवास याविषयी जाणून घेऊया.
सुनीताला कधी भेटूया म्हणून फोन केला तर चक्क आम्हा दोघांना जेवायचं आमंत्रण दिले. घरीच भेटूया म्हणजे छान गप्पा मारुयात म्हणाली. मीही अग कशाला उगीच अस म्हणत आमंत्रण स्वीकारले.
सुनीताचे शालेय शिक्षण पुणे,अंदमान आणि सोलापूर येथे झाले. सोलापूर येथे केमिस्ट्री विषय घेऊन B.Sc केले. लगेचच लग्न ठरले. पण विवाह एक दीड वर्षांनी होणार होता. त्याच दरम्यान कॅनरा बँकेत अर्ज केला होता, तेथून मुंबई ला नोकरी मिळाली. पहिले सहा-सात महिने तिने मॅनेजर सांगतील त्याप्रमाणे काम केले. मुळातच हुशार असलेल्या सुनीताला कोणतेही काम सहज करता आले. तेव्हा तिचे एक सहकारी म्हणाले तू बँकेच्या परीक्षा दे म्हणजे तुला एखादी चांगली पोस्ट मिळेल. सुनिता बँकेची परीक्षा पास झाली. पुण्यात सारस्वत को ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी मिळत होती पण को ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी करू की नको अशी द्विधा मनस्थिती झाली. परंतु कॅनरा बँकेतील सहकाऱ्याने सांगितले की तेथे तुला आत्ता थोडा पगार कमी असला तरी लवकर प्रमोशन मिळेल. तू ही नोकरी सोड आणि पुण्याला जा. तिने सहकाऱ्यांचे ऐकून कॅनरा बँकेतील नोकरी सोडली आणि सारस्वत बँकेत जॉईन झाली. दरम्यान पुणे येथील रवींद्र प्रभुणे यांच्याशी विवाह झाला. नोकरी घर संसार सुरू झाला. एकत्र कुटुंब असल्याने सासू- सासरे, दीर- नणंदा यांचीही जबाबदारी हसतमुखाने पार पाडली.
नोकरीमध्ये सुनीताने उत्तम कामगिरी केली. भराभर प्रमोशन मिळून मॅनेजर म्हणून रुजू झाली.सारस्वत बँकेच्या चार शाखांवरून पंचवीस शाखा होण्याला सूनिताची जिद्द, खूप मेहनत कामी आली.
१९८० साली सुरेश प्रभू सारस्वत बँकेचे चेअरमन असताना, फॉरेन एक्सचेंज करीता सर्व बँकांची कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्याची सर्व जबाबदारी सुनीताकडे होती. अर्थातच ही सर्व जबाबदारी तिने समर्थपणे पेलली आणि सर्वांची कौतुकाची थाप मिळाली.
बँकेच्या मुंबई शाखेत Head of the Department of Foreign Exchange म्हणून नियुक्ती झाली. दोन्ही मुले शाळेत जाणारी होती. सुनिता पहाटे उठून स्वयंपाक करून डेक्कन क्वीन गाठत असे.दिवसभर बँकेत काम करून रात्री पुण्यात परत. असे तब्बल तीन वर्षे केले.खरच कमाल आहे.
काही काळानंतर structural changes झाल्यामुळे सुनीताला RBI मधे एक महिना ट्रेनिंग साठी पाठवले. त्यानंतर ती Chief Manager झाली. बँकेचे नाव कसे होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ती करत होती. Vice President म्हणून नियुक्ती झाल्यावर सुनीताची बदली पार्ले येथे झाली. तिचा धाकटा मुलगा तेव्हा दहावीत होता त्यामुळे त्याला सोलापूरला तिच्या आई वडिलांकडे पाठवले.
कार्पोरेट बिझनेस,मार्केटिंग डिपार्टमेंट सांभाळत असतानाच कला क्रीडा मंडळ उपक्रम तिने राबविले. Deputi General Manager या पदावर सुनिता विराजमान झाली. या पदावर असतानाच ती निवृत्त झाली. कॅनरा बँकेतील नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय योग्यच म्हणावा लागेल.
निवृत्ती नंतर सुनीता CISR Center for Integrated Studies and Reasearch: Working on Integral Humanism- एकात्म मानवदर्शन या ठिकाणी कार्यरत आहे. तसेच प्रबोधन मंच - राजकीय सामाजिक व आर्थिक विषयांवर तज्ञ वक्त्यांची व्याख्याना द्वारे समाज प्रबोधन करणे येथेही तिचा सक्रीय सहभाग आहे.
अशा ह्या कर्तृत्ववान, धाडसी,हुशार, सहकारी मित्र मंडळींना योग्य मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या पूर्णांगिनी चे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत.
सुनीताला रवींद्र सारखे उत्तम साथ देणारे पती लाभल्यामुळे ती यशस्वी झाली. या दोघांचा मोठा मुलगा राहुल MCM आहे. धाकटा हर्षवर्धन इंजिनियर असून त्याचे वास्तव्य जर्मनी मधे आहे. सुनिता - रवींद्र हे दोघे, मुलगा राहुल, सून सीमा आणि नातू मल्हार, नात अस्मी असे आनंदी उत्साही सुखी कुटुंब आहे.
दिवाळी म्हटली की सर्वत्र आनंदी आनंद! प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळी घरी, मित्रांबरोबर साजरी करत असतो आम्ही पण त्याला अपवाद नाही. गेले कित्येक वर्षे आम्ही दर दिवाळीच्या पाडव्याला जेवायला जायचे असे व्रत घेतले आहे. त्यादिवशी स्वयंपाकघराला आणि स्वयंपाकाला सुट्टी आणि पाडव्याचे स्पेशल डिनर किंवा लंच बाहेर असा परिपाक लग्न झाल्यापासून सुरू आहे.
गेल्यावर्षी कोरोना असतानासुद्धा आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. मला वाटते की लिटल इटली ह्या हॉटेलमध्ये. यावर्षी कोरोना चे नियम शिथिल केल्यामुळे सर्व हॉटेल्स उघडी होती त्यामुळे चॉईस भरपूर होता पण ह्यावेळी माझ्या मनात वेगळेच आले आणि ठरले की आपण रॉयल कनॉट बोट क्लब येथे संध्याकाळी जेवायला जायचे. दुसरीकडे कुठेही नाही आणि कोणाबरोबर पण नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे सात वाजता क्लब ला जाऊन पोहोचलो. दारावर आम्हाला तुमच्या मेंबरशिप नंबर काय असे विचारले. मी मेम्बर नाहीं पण आम्ही आज आम्ही तुमचे गेस्ट म्हणून आलो आहोत असे सांगितले. गार्ड ने आपाद मस्तक न्याहाळत आम्हाला काउंटरवर पाठविले. आम्हाला जनरल मॅनेजर श्री सलीम खान ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आमचे नाव विचारल्यावर आम्हाला नुकत्याच नवीन उघडलेल्या दुसऱ्या मजल्यावरील हॉटेलमध्ये आम्हाला जायला सांगितले. लवकर गेल्यामुळे सहाजिकच गर्दी नव्हती त्यामुळे बाहेरील बाजूला एक मनासारखे टेबल मिळाले. नदीचे पात्र आजूबाजूच्या लाइटिंग मुळे सुंदर दिसत होते. वेटरने मेनू कार्ड समोर ठेवले आणि विचारले, सर तुमचा मेंबर्शिप नंबर काय आहे? मी त्याला सांगितले मी क्लबचा मेंबर नाही त्यावर त्याने सांगितले सर मग इथे आपल्याला बसता येणार नाही आणि आम्ही तुमची ऑर्डर पण घेऊ शकणार नाही. कॉम्प्युटर मध्ये नंबर एंटर केल्याशिवाय ऑर्डर देऊ शकणार नाही. आम्ही त्याला सांगितले की आम्ही बोट क्लबचे गेस्ट म्हणून आलो आहोत आणि आम्हाला मॅनेजर ने इथे पाठविले आहे. आम्ही तो बिचारा ओके म्हणाला आणि आत गेला. थोड्या वेळाने परत येऊन सर तुमची काय ऑर्डर आहे तुम्हाला काय हवे आहे ते सांगा यु आर वेलकम असे सांगितले. आम्ही पण आमच्या मनाजोगे पदार्थ आणि तिथल्या स्पेशल डिश मागवल्या. बोट क्लब आणि ड्रिंक्स नाही असे शक्य आहे का! मग साधारणपणे तास दीड तास गप्पा, ड्रीम्स आणि उत्तम जेवण यामध्ये वेळ कसा गेला हे अजिबात कळले नाही. मध्येच त्या हॉटेलचा मॅनेजर आणि बोट क्लबचे जनरल मॅनेजर आमची चौकशी करून गेले आणि सर्व ओके आहे ना? काळजी करू नका तुम्हाला हवे ते सांगा आणि इंजॉय करा असे सांगून गेले. मंडळी' मी बोट क्लबला गेल्या तीस वर्षात अनेकदा गेलो पण प्रत्येक वेळी कोण्या मेंबरचा गेस्ट म्हणून पण आज मात्र आम्ही खास बोट क्लबचे गेस्ट होतो! एव्हरी थिंग ऑन द हाऊस! जस्ट चिल अँड एन्जॉय!!
उत्कृष्ट जेवण आणि शेवटी उत्तम डेझर्ट! अहाहा! आता आमचे झाले आहे आणि बिल द्या अशी विनंती केली. वेटर काउंटर वर गेला आणि साहेबांना सांगितले कि गेस्ट चे जेवण झाले आहे आणि ते निघणार आहेत. मॅनेजर ने पुन्हा आमची चौकशी करून जेवण आवडले ना? बिलाची चिंता करू नका अशी विचारणा केली. आम्ही पण मग गप्पा मारून आणि धन्यवाद देऊन खाली मेन काउंटरवर आलो आणि तेथे उभे असलेले जनरल मॅनेजर आणि त्यांचे सहकारी ह्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आठवण म्हणून एक छान फोटो पण काढला. बोट क्लबला ला त्यांचे गेस्ट म्हणून जायचे सौभाग्य परत थोडेच मिळणार होते ?? मग तो क्षण कॅमेरात बंद करायलाच पाहिजे ना राव! ही मंडळी बहुतेक मला कस्टम कमिशनर किंवा तत्सम बडा अधिकारी समजून आदरातिथ्य करीत नाहीत ना असे वाटायला लागले आणि पुढील अनर्थ घडण्याची वाट न पाहता सर्वांचे आभार मानून आम्ही घरची वाट धरली!
तर मंडळी आमची ही दिवाळी अशी आगळ्यावेगळ्या जेवणाने साजरी झाली त्यामुळे ही दिवाळी आम्ही पुढची कित्येक वर्षे विसरणे शक्य नाही. बोट क्लब, एवढेच उत्तम जेवण, ड्रिंक्स आणि बिल मात्र शून्य! तुम्हाला पण आमच्या दिवाळी डिनर ची गंमत वाटली की नाही? तुम्हाला बोट क्लबला अशी रॉयल ट्रिटमेंट मिळाली आहे का?
तुम्हाला खास म्हणून मी आमच्या डिनरचे गुपित सांगणार आहे. ह्या कानाचे त्या कानाला कळू देऊ नका! बघा तुम्हाला असे स्पेशल डिनर मिळू शकते का ते!
गेल्यावर्षी कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सर्व व्यवहार ठप्प. कडक लॉक डाऊन होता आणि सर्व गोष्टी फक्त ऑनलाइन पद्धतीने होत होत्या त्यामुळे ज्या लोकांना आज पर्यंत ऑनलाईन मीटिंग कशी घ्यायची, कशी चालवायची याची अजिबात कल्पना नसल्याने त्यांना खूपच त्रास व्हायचा. स्पेशल एजीएम, बोर्ड मीटिंग इत्यादी महत्त्वाच्या मिटींग्स घ्यायच्या म्हटले की सगळ्यांच्या अंगावर काटा यायचा आपण मात्र आपल्या क्लब च्या मीटिंग झूम प्लॅटफॉर्मवर अतिशय उत्तम प्रकारे घेत होतो एवढेच नव्हे तर डिस्ट्रिक्ट मधील कित्येक कार्यक्रम आपणच सुरुवातीला होस्ट म्हणून कंट्रोल करत होतो बोट क्लबला सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची स्पेशल ॲनिमल मिटींग घ्यायची होती आणि त्यांना ती झुमवर करायची होती आणि तिथल्या कोणाला ऑनलाईन मीटिंग कशी घ्यायची, काय प्रॉब्लेम येतात इत्यादी काहीच माहीत नव्हते. आपले पीडीजी भाऊसाहेब कुदळे हे बोट क्लबचे व्हाईस प्रेसिडेंट! त्यांनी मॅनेजमेंट कमिटीला सांगितले की रो सुदर्शन ची मदत घेऊ या आणि ते आपल्याला मीटिंग कशी सेट करायची, मॅनेज करायची याचे ट्रेनिंग देतील! त्यांनी मला विचारले आणि मी आनंदाने होकार दिला त्यांच्या एका मॅनेजरला आणि त्याच्या सहकाऱ्याना जवळपास दोन तास झूम प्लॅटफॉर्म कसा वापरायचा सेटिंग कसे करायचे याचे ट्रेनिंग दिले आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग मीटिंग करून घेतली. ज्या दिवशी ही विशेष सभा होणार होती त्यादिवशी सर्वांनाच टेन्शन होते पण मी मात्र निर्धास्त होतो कारण की ट्रेनिंग उत्तम झाले होते आणि त्याचे सेटिंग पण व्यवस्थित केल्यामुळे कुठलाही धोका नव्हता ही मिटिंग अर्थातच उत्तम पद्धतीने आणि कुठलेही विघ्न न येत पार पडली मला भाऊ साहेबांचा फोन आला त्यांनी धन्यवाद दिले आणि सांगितले की तुम्ही आमचे फार मोठे काम केले आहेत आणि आमची सर्व मंडळी खुश आहेत आणि आमच्या मॅनेजिंग कमिटीने तुम्हा दोघांना जेवणासाठी येण्याचे खुले आमंत्रण दिले आहे तुम्ही ठरवा ती तारीख.
ह्या सर्व गोष्टींची आपल्या भाऊसाहेबांच्या कौतुक कसे करावे लोकांना प्रोत्साहित कसे करावे त्यांच्या त्यांच्या त्यांच्या स्पेशल स्किलनेत झाले होते यात शंका नाही
तर मंडळी तुम्हाला कळले ना आमच्या स्पेशल दिनर चे राज? हे सगळे शक्य झाले ते आपल्या भाऊसाहेब यांच्यामुळे. दिवाळी 2021 एक अविस्मरणीय दिवाळी झाली.
दिवाळीची गंमत वेगळी असते
दिव्यांचे सजणे सुंदर दिसते
सोडुयात आपण फटाक्यांचा धुर
त्यातला प्रकाश त्याचे मुळ
लाळ टपकते लाडू पाहुन
पोट भरते बाकीचे खाऊन
पहाटे उठुन आंघोळ् घेऊ
तेलने होते आंग माऊ
आकाश कंदीलने घर उजेडात
एक पणती लाऊ देवघरात
दिवाळी जावो मजेत सर्वाना
अशीच अपेक्षा आसे देवाला
दिवाळीपूर्वी कामाच्या गडबडीत असताना क्लब मधला बुलेटिन कॉमिटीकडून फोन आला. त्यांच्या तर्फे दिवाळीच्या निमित्त फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. रोटेरिअन्स, ॲन्स आणि ॲनेट्स असे सगळेजण दिवाळीचे रंगीबेरंगी क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपणार होते व या स्पर्धेचं परीक्षण मी आणि माझी पत्नी शुभदा यांनी करावं अशी विनंती त्यांनी केली.
मला आठवलं की नुकताच तीन चार महिन्यापूर्वी मी रोटरी मध्ये माझा मित्र हेमंत वाळिंबे मुळे जॉईन झालो होतो. वेग वेगळे कार्यक्रम बघताना छान वाटत होतं. यामध्ये नवरात्र गरबा असो किंवा कोजागिरीचा गाण्याचा कार्यक्रम असो किंवा दिवाळी निमित्त झालेला मधुरा दातारचा गाण्याचा सुरेल कार्यक्रम आणि चितळे यांचे चविष्ट फराळ असो, असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात होते आणि मी त्याचा आनंद घेतो. यामध्ये या परीक्षणाची संधी क्लब कडून आम्हाला मिळणे हे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. म्हटल छान पंचवीस तीस वर्ष या क्षेत्रात आपण काम करत आहोत आणि हे एक वेगळं काम आपल्याला मिळतय आणि तेदेखील जिथे आपण नवीन जॉईन झालोय तिथें. ठरल्याप्रमाणे दिवाळी संपल्यावर बुलेटिन कमिटी कडून सगळ्या फोटोंचा एक मेल आला. उघडून बघितल्यावर आमच्या असं लक्षात आलं की फोटो खूपच वैविध्यपूर्ण आहे आणि खूपच छान आहेत. या सगळ्याचे परीक्षण करायचं विसरून आम्ही त्याचे रसग्रहण करायला लागलो. सर्व फोटो सुंदर पद्धतीने मांडले होते ते बघण्यात आम्हाला खुप आनंद होत होता ज्याच्या मध्ये वेगवेगळे रिलेशनशिप दिसत होते पणजोबा आणि पणतू मस्तपैकी दिवाळीच्या सुट्टीत कॅरम खेळताना दिसत होते तर वेगवेगळ्या पद्धतीच्या फुलांच्या रांगोळ्या घातलेल्या आणि त्याला छान दिव्याची सजावट केलेली खूपच छान वाटत होती. अशा अनेक पद्धतीच्या सुंदर सजावटी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये फराळ वेगवेगळ्या पद्धतीने मांडून त्याची अरेंजमेंट केली होती ती खूपच अप्रतिम वाटत होती. दिवाळी म्हटलं की किल्ला हा आलाच. दोन-तीन प्रकारच्या किल्ल्यांचे फोटो होते त्याच्यावर शिवाजी महाराज अत्यंत शांतपणे बसलेली दिसते त्याला छान पणत्या कडेला अळीव उगवलेला बघायला मस्त वाटत होतं की जेणेकरून मी माझ्या स्वतःच्याच बालपणात गेलो. त्याच्यानंतर हा सगळा अनुभव होता हा खूप समृद्ध करणारा होता. तीन पिढ्या छान पैकी एकत्रपणे फटाके उडवते हे बघताना ही खूप मस्त वाटलं. असे सगळे विविध वैशिष्ट्यपूर्ण फोटो पाहताना खूप समाधान वाटत होतं,
आता आम्हाला ज्याचे परीक्षण करायचं म्हणजे मी आणि पत्नीने आता यांच्याकडे पाहायचे आणि त्यातून नंबर काढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विचार सुरू केला तर त्याच्यात विचार करताना सौंदर्यदृष्टी काय पद्धतीने फोटो काढताना पाहिलेली आहे. त्याची मांडणी कशी आहे. त्याला सजावट काय पद्धतीने केलेली आहे आणि त्यातील तांत्रिक बाजू आहे ती काय पद्धतीने सांभाळली आहे. म्हणजे जो फोटो आहे तो फोकस मध्ये आहे की नाही किंवा त्याचे लाईट प्रॉपर त्याला मिळालेला आहे की नाही या सगळ्यांचा विचार केला आणि सगळ्यात महत्त्वाचं जो फोटो काढलेला आहे त्या फोटो मागील thought, त्यामागे काही विचार आहे का हा मुद्दा महत्वाचा होता व त्याचा विचार केला गेला. या सगळ्यात खूप छान फोटो बघायला तर मिळालेच आणि मग शेवटी नंबर काढताना थोडीशी पंचाईत झाली पण दोघांमध्ये एकमत झालं आणि पहिल्या नंबरला एक , दुसऱ्या नंबरला एक आणि तिसरा नंबर मात्र विभागून देण्यात आला,
त्यातला हा सगळा अनुभव आमच्यासाठी खूपच समृद्ध करणारा होता आणि असा वेगळा अनुभव दिल्याबद्दल आम्ही रोटरी क्लबचे पुणे साउथचे मनापासून आभार मानतो.
.
नूतन कर्णिक बेंगलोर येथील Center for Ecological Sciences, Indian Institute of Science मध्ये गेली २० वर्षे प्रोफेसर राघवेंद्र गदगकर यांच्या Social Insects Laboratory मध्ये मुंग्यांवर काम करत आहे. मुंग्यांची समाजव्यवस्था आणि त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास हे तिचे आवडीचे विषय आहेत.
आपला भारत हा जैवविविधतेने समृद्ध असा देश आहे. आपण जंगलांमधे असंख्य प्राणी, पक्षी, वनस्पती बघायला आवर्जून जातो पण आपल्या सततअवतीभोवती असणाऱ्या मुंग्यांकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. मुंग्यांचे अनेकविध प्रकार, त्यांची समाज व्यवस्था, वेगवेगळ्या पद्धतींनी बांधलेली घरं, त्यांची भाषा हे खूप चित्तवेधक आहे पण असं असूनही आपल्याला मात्र काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या एवढीच त्यांची ओळख असते. आज आपणमुंग्यांच्या अनोख्या विश्वाची छोटीशी सफर करूयात.
सगळ्या मुंग्या या सामाजिक कीटक प्रकारात येतात म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्यासारखीच एकत्र कुटुंब व्यवस्था असते. एकाच वसाहतीत दोन तीनपिढ्या एकत्र राहून एकमेकांची काळजी घेतात. कुठलीही मुंगी एकटी, स्वतंत्रपणे जगू शकत नाही. त्यांचं सगळं आयुष्य हे त्यांच्या वसाहतीबरोबरबांधलेलं असतं. मुंग्यांची सामाजिक व्यवस्था ही मादी मुंग्यांचं वर्चस्व असणारी आहे. यामधे एक किंवा अनेक राणी मुंग्या असतात ज्या अंडी घालतातआणि पुनरुत्पादनाचं काम करतात. थोड्या प्रमाणात नर मुंग्याही असतात ज्या काही दिवस वसाहतीत राहून नंतर उडून जातात. वसाहतीमधल्याकामांमध्ये त्यांचा फारसा सहभाग नसतो. वसाहतीमधल्या बाकी सर्व मुंग्या या कामकरी, मादी मुंग्या असतात ज्यांच्यामधे कामाची उत्तम प्रकारे विभागणीकेलेली असते. यातील ज्या मुंग्या वयाने लहान असतात त्या वसाहतीच्या आतील कामं करतात म्हणजे छोट्या पिल्लांची काळजी घेणं, डागडुजी करणं, स्वच्छता ठेवणं इत्यादी आणि ज्या मुंग्या वयानी मोठ्या आणि जास्त अनुभवी असतात त्या वसाहतीच्या बाहेर पडून खाणं शोधणं, वसाहतीचं इतरशत्रूंपासून रक्षण करणं अशी तुलनेने जास्त धोकादायक कामं करतात.
आता या मुंग्यांची वसाहत तयार कशी होते तर आपल्याला बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या सुरुवातीला पंख असलेल्या मुंग्या हवेत उडताना दिसतात(nuptial flight). यामध्ये नर आणि मादी मुंग्यांचं मिलन होतं, नर मुंग्या मरून जातात तर मादी मुंग्या जमिनीवर येतात, स्वतःचे पंख तोडून टाकतातआणि जमिनीमध्ये बीळ करून अंडी घालण्यासाठी वसाहत बनवायला सुरुवात करतात. जेव्हा राणी मुंगी पहिल्यांदा अंडी घालते तेव्हा त्या अंड्यांमधूनतिची पिल्लं बाहेर पडेपर्यंत ती बिळामधून बाहेर पडू शकत नाही कारण ते धोकादायक असतं अशा वेळेला तिच्या झडून गेलेल्या पंखांच्या ठिकाणीअसलेले स्नायू तिच्या शरीराला प्रथिनांचा पुरवठा करतात. जेव्हा अंड्यांमधून मुंग्यांची पुढची पिढी बाहेर पडते तेव्हा या मुंग्या, राणी मुंगीची आणि तिच्यापिल्लांची काळजी घेणं, बाहेर जाऊन खाणं गोळा करून आणणं अशी कामं सुरु करतात आणि हळूहळू त्यांची वसाहत वाढायला लागते.
मुंग्या या जशा खूप कष्टाळू आहेत तशाच त्या जमिनीखाली कुशलतेने घर बांधणाऱ्या अभियंता आहेत. त्या खूप चांगली शेती करणाऱ्या शेतकरी आहेत (काही प्रकारच्या मुंग्या बुरशीची शेती करतात), आपल्या वसाहतीला शत्रूंपासून वाचवण्यासाठी लढणाऱ्या सैनिक आहेत तसंच कल्पकतेने रेशीमवापरून, झाडांची पानं विणून घरटे बांधणाऱ्या विणकर आहेत. त्या त्यांच्या वसाहतीतल्या इतर मुंग्यांबरोबर सतत सहकार्याने रहातात, एकमेकांशीवेगवेगळी रसायने वापरून संवाद साधतात आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात टिकून राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते त्यामुळेच त्यानिसर्गामध्ये टिकून आहेत. मुंग्या इतर किड्यांना खाऊन नैसर्गिक कीटकनाशकांचं काम करतात, कुजलेले प्राणी खाऊन निसर्गाचे स्वच्छता कर्मचारीम्हणून काम करतात तसंच बरेच पक्षी आणि प्राणी मुंग्यांना खातात. मुंग्या आपल्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहेत.
मुंग्या पृथ्वीवर साधारण १० कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. जगभरात मुंग्यांच्या १५,००० पेक्षा जास्त जाती आहेत तर भारतात मुंग्यांच्या ८२८ जातीसापडतात. उत्क्रांतीच्या काळामध्ये असंख्य प्राणी जन्मले आणि नामशेष झाले पण मुंग्या मात्र अत्यंत यशस्वी पणाने पृथ्वीवर राज्य करत आलेल्याआहेत. अशा या मुंग्यांवर जगभरात चालू असलेल्या संशोधनामधून आजही खूप नवीन, आपल्याला उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी कळत आहेत आता फक्तआपण मुंग्यांकडे जिज्ञासू वृत्तीने बघण्याची गरज आहे.
.
The Family of Rotary Month
Although Rotary Theme for December is Disease Prevention and Treatment, it is also widely celebrated as The Family of Rotary Month. The idea of the family of Rotary is a simple one, and one that we celebrate every December during Family Month. Every Rotarian is part of the Rotary family – but our family is much larger than just our 1.2 million members. The family of Rotary includes every one of the men, women, and children who are involved in our work: the spouses and children of our members, our Rotary Foundation program participants and alumni, and all of those who are part of our programs, in the tens of thousands of Rotary communities around the world. You can see it in their faces. The joy that spills forth as Rotarians take part in service projects, locally or internationally, says volumes about why more than 1.2 million people around the globe belong to Rotary clubs and are committed to making the world a better place.
PolioPlus
As a founding partner of the Global Polio Eradication Initiative, PolioPlus is Rotary's massive effort to immunise the children of the world against poliomyelitis. It is part of a global effort to protect the children from five other deadly diseases as well--the "plus" in PolioPlus. The program was launched in 1985 with fundraising as a primary focus. The original goal was to raise $120 million
By 1988, Rotarians of the world had raised more than $219 million in cash and pledges. By l992, the cash total exceeded $240 million! These gifts have enabled The Rotary Foundation to make grants to provide a five-year supply of vaccine for any developing country requesting it to protect its children. Grants have been made to nearly 100 countries--a commitment, thus far, of $177 million to buy vaccine and to improve vaccine quality. In 1988, the World Health Organization adopted a goal of eradicating polio throughout the world by the year 2000, and Rotary has endorsed that goal, hoping to celebrate a polio-free world in its own 100th anniversary year, 2005. Achieving eradication will be difficult (only one other disease, small pox, has ever been eradicated) and expensive (estimated cost to the international community is nearly $2 billion). It will require continuing immunization of children worldwide, and it also must include systematic reporting of all suspected cases, community wide vaccination to contain outbreaks of the disease, and establishment of laboratory networks. Rotary will not be alone in all these efforts but in partnership with national governments, the World and Pan American Health Organizations, UNICEF and others. Rotary's "people power" gives us a special "hands on" role. Rotarians in developing countries have given thousands of hours and countless in-kind gifts to help eradication happen in their countries. No other nongovernmental organization ever has made a commitment of the scale of PolioPlus. Truly it may be considered the greatest humanitarian service the world has ever seen. Every Rotarian can share the pride of that achievement!
धनंजय जोशी लिखित "सहज" या पुस्तकातील लेख...शीर्षक आहे "ना-पसंत साधना"...
अमेरिकेमध्ये एक आईस्क्रीम चे दुकान आहे...थर्टी वन फ्लेवर्स म्हणून..! या दुकानात वेगवेगळ्या एकतीस प्रकारचं आईस्क्रीम मिळतं....बास्किन-रॉबिन्स नावाचं असंच आणखी एक दुकान आहे...! तिथेही वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम मिळतात..!( मला आत्ता पुण्यामधल्या बुवा आईस्क्रीम वाल्याची आठवण आली)...
अशाच एका दुकानांमध्ये गेलो होतो.. मला आपलं साधं सुधं व्हॅनिला आईस्क्रीम आवडतं... ते मागितलं..! त्यानं मला चुकून पीच आईस्क्रीम दिलं..!
आता आला की नाही प्रश्न...?
... ते परत करावा की नाही..??
नाही केलं परत....
ते पीच आईस्क्रीम खूप चांगलं लागलं...!
एक विचार मनामध्ये आला.. समजा मी ते परत केलं असतं आणि त्या दुकानदारानं ते परत घेऊन मला माझं आवडतं "व्हॅनिला" दिलं असतं.... तर मग काय चुकलं असतं..? पीच आइस्क्रीमचा अनुभव घेणं चुकलं असतं..! अगदी आपल्याला आवडणारं असलं तरीही....!
मला त्यातून एक फार सुंदर साधना सापडली..
"ना-पसंत साधना"...!!
विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये ही साधना प्रत्येक क्षणी आपल्याला शिकवून जाते...!
आपण सकाळी कामाला जातो... आपल्या कपड्यांकडे बघतो.. हा शर्ट घालावा की तो..?
ही पॅन्ट घालावी कि ती..? हा टाय वापरावा की तो..?? तेव्हा काय करावं...?
डोळे मिटावेत.. हात पुढे करावा.. आणि हाताला जो शर्ट लागेल तो घालावा... मिळेल ती पॅन्ट घालावी आणि जो टाय सापडेल तो वापरावा.... कोणताही प्रश्न न विचारता...!! ती खरी "ना-पसंत साधना"..!!
"हे हवं- ते नको" च्या कैदे मधून आपली सुटका करून देणारी ही साधना...!!
गेले तीन दिवस माझ्या घराजवळ एक मौन शिबिर चालू आहे... शिबिरामध्ये साधक आपापले कपडे घालून येतात... पण शिबिर सुरू झालं की सगळेजण "साधकाचा वस्त्र"--(झगा) वापरतात...मग कुणाला पसंत असो किंवा नसो...!
ही शिकवण फार सुंदर आहे ..
ध्यान करताना आपण सर्व सारखेच..!! मग आपल्या"आवडी-निवडी"चा त्यामध्ये अडथळा कशाला...??
सान सा नीम आणि मी एकदा "मॅक्डोनाल्ड"मध्ये आमच्या झेन झग्यामध्ये गेलो होतो.... "ना-पसंत" कपड्यांमध्ये....!!
--तुम्ही पाहिजे होता तिथं...गंमतच होती..!!
सध्या इतकेच
सर्व प्रथम अवकाशात एकअतिशूक्ष्म बिंदू होता. तो तेथे केव्हा तयार झाला कींवा का तयार झाला याची कल्पना नाही.तो ऊर्जेने भरला होता.त्याचा अकस्मात स्फोट झाला किंवा तो अकस्मात प्रसरण पावला,आणी आपल्या विश्वाची सुरुवात झाली. त्या बिंदूचे तापमान अनंतापर्यंत होते.आत कण व प्रतीकण एकमेकांना नष्ट करीत होते प्रथम त्या बिंदूत पदार्थ नव्ह्ते. पहिल्या काही मिनीटात हायड्रोजन तयार झाला,नंतर हेलियम, लिथीयम, डेट्रीयम, बेरिलीयम व बोरॉन हे पदार्थ तयार झाले. कार्बन सर्वात शेवटी तयार झाला. कार्बन मूलद्रव्य जड आहे.
त्यामूळे त्यात कार्बन नंतरची मूलद्रव्ये तयार झाली नाहीत. ह्याचा अर्थ असा की कार्बन मूलद्रव्य सगळ्याचा शेवट आहे.आज आपले विश्व, जे १३७० कोटी वर्षापूर्वी तयार झाले आहे, ते प्रसरण पावत असून त्यामधील आकाशगंगेतील उर्जा संपून, ते कधितरी कोळसा होऊन राहणार आहे. त्यामुळे कदाचित विश्वाचे प्रसरण थांबून विश्व परत जवळ येईल आणी एका बिंदूत समावेल. परत त्या बिंदूचा स्फोट होऊन नवे विश्व तयार होईल. हे कालचक्र असेच चालूच राहील, ज्याचा मुख्य घटक कार्बन असेल. ताऱ्यांमध्ये सुद्धा अणूगर्भीय प्रक्रिया चालू असते ज्यायोगे ताऱ्यांतून उर्जा बाहेर पडते. ही प्रक्रिया सुद्धा कार्बन पर्यंत चालते आणि नंतर त्या ताऱ्यांचा अतिप्रचंड स्फोट होऊन, त्या स्फोटातून इतर मूलद्रव्ये तयार होतात. म्हणजेच ताऱ्यांचा शेवट सुद्धा कार्बन हे मूलद्रव्यच असते. आपला तारा सूर्य साधारण अशाच प्रकारे ४५० कोटी वर्षानी नष्ट होणार आहे. म्हणजेच पृथ्वीचा शेवटास कार्बन मूलद्रव्य कारणीभूत असेल.
पृथ्वीवर हायड्रोजन व कार्बन भरपूर प्रमाणात आहेत. कार्बन मिळण्यास सोपा असल्याने कोळसा आदी भूगर्भातील ईंधनाच्या रूपाने त्याचा ऊर्जा तयार करण्यास उपयोग होतो. ही इंधने जाळण्याकरीता ऑक्सिजन चा वापर होतो व कर्बवायू ईत्यादी हरितगृह वायू तयार होऊन, पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. पृथ्वीवर आतापर्यंत पाच वेळा जीवन नष्ट झाले आहे व ही सहाव्या विलोपाची नांदी आहे असे शास्त्रज्ञ मानतात. त्यामूळे कर्बरहीत उर्जा तयार करण्याचे प्रयत्न चालु आहेत.
परन्तू खरोखरीची कर्बरहीत ऊर्जा तयार करता येईल का? आणी त्या करता लागणारी साधने कर्बरहीत वातावरणात तयार होऊ शकतील का? याबाबत शंका आहे. आतापर्यंत पृथ्वीवरील स्रृष्टी पाचवेळा विलोप पावली आहे त्या मागील मुख्य कारणे कार्बन व कर्बवायू(CO2)आहेत. कार्बनचा उर्जा तयार करण्यात वापर टाळण्याचा प्रयत्न सर्व जगात होत आहे. त्याकरता पर्यायी न आटणारी ऊर्जा तयार करण्याकडे लक्ष दिले जात आहे .
सर्वात मुबलक उपलब्ध असलेली उर्जा म्हणजे सोर उर्जा. पृथ्वीवर एक तासात जगाची एक वर्षांची भूक भागवू शकेल ईतकी सौर उर्जा सूर्यप्रकाशाच्या रुपाने येते. ती सोलर तक्त्यात अथवा सूर्यकिरणांच्या सहाय्याने पाण्याचे वाफेत रूपांतर करून विजचक्की चालवण्याकरता वापरली जाते. ही ऊर्जा एकाचवेळेस सर्वत्र सारख्या प्रमाणात मिळत नाही. पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे, पृथ्वीचा कल, ढगांचे आच्छादन वगैरे गोष्टींवर ही उर्जा अवलंबून असते. म्हणून सर्व भागात वीज पुरविण्यास विद्यूत तारांची(grid) यंत्रणा अथवा जाळी बांधावी लागेल. ही यंत्रणा बांधण्यास लागणार्या साधनसामुग्री करता किती कर्ब्ऊत्सर्जन होईल कोणजाणे? महणजे परत कार्बनवर परावलंबित्व आलेच. सौरऊर्जा वैयक्तिकरीत्या सुद्धा वापरता येते.
ऊर्जेचे दुसरे स्रोत म्हणजे वारा. वारा सर्वत्र सारखा नसतो. त्याचप्रमाणे तो मोसमी पण असु शकतो. त्यामुळे वाऱ्यावर चालणाऱ्या पवनचक्क्या एकमेकांना ताऱ्याच्या जाळ्यानी जोडण्याची यंत्रणा ऊभारावी लागेल. ह्या सर्व बांधकामात कर्बऊत्सर्जन होणारच. वायू उर्जा वैयक्तिक रित्या सुद्धा वापरता येते.
ऊर्जेचे तिसरे स्रोत म्हणजे समुद्र. ते समुद्राच्या भरती-ओहोटी अवलंबून असते. भरती-ओहोटी ठराविक वेळेला आणी सतत होणारी स्थिती आहे. त्यामूळे हे ऊर्जेचे स्तोत्र सर्वात लोकप्रिय आहे. भरती-ओहोटी चंद्राचा गुरूत्वाकर्षणावर अवलंबून असते व पृथ्वीच्या परिभ्रमणाचा त्यावर परिणाम होतो त्यामूळे भरती-ओहोटी सगळीकडे सारखी नसते. म्हणून तयार झालेली उर्जा सर्वत्र पोचविण्यास ग्रीड बांधावे लागणार. म्हणजे परत कर्बऊत्सर्जन आलेच.
चौथे स्रोत म्हणजे जीववस्तूमान. यात झाडपाला,पालापाचोळा उष्टे खरकटे वगैरे जाळून, त्यापासून उर्जा तयार करण्यात येते. नवीन तंत्रज्ञानामुळे उर्जा मिळविण्याचा हा प्रकार बराच पर्यावरण पुरक आहे. त्याचबरोबर कचऱ्याची पण विल्हेवाट लावता येते. तरीसुद्धा कचऱ्यावरील प्रक्रियेत आणि कचरा जाळताना थोडेतरी कर्बोत्सर्जन होतेच.
पाचवे स्रोत भूगर्भातील उष्णता होय. पृथ्वी सुरुवातीला एक तप्त गोळा होता. कालांतराने तो थंड झाला. परन्तु पृथ्वीच्या पोटात अजुनही उष्णता आहे. पृथ्वीच्या मध्यभागात चार हजार डिग्री सेलसियस एव्हढी ऊष्णता आहे. ही ऊष्णता गरम वाफेच्या स्वरूपात बाहेर येते जिचा घरे उबदार राखण्यास, त्याचप्रमाणे विज तयार करण्यास उपयोग होतो. ही उष्णता काही ठिकाणीच उपलब्ध आहे जिथे भुपट्टे एकत्र येतात. हा भाग मुख्यत:ज्वालामुखी अथवा भूकंपग्रस्त असतो.
सर्वात आशादायक स्रोत म्हणजे हायड्रोजन गॅसचा उपयोग विद्यूत जनित्रामध्ये करणे. हायड्रोजन वातावरणात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परन्तु हवेतून हायड्रोजन गोळा करण्याचे तंत्र अद्याप विकसीत झालेले नाही. त्यामूळे हायड्रोजन, तेल अथवा कोळसा यासारख्या भुअंतर्गत ईंधनापासून तयार केले जाते व त्यामधून कर्बऊत्सर्जन होते.
जलविद्युत स्रोत सर्वात वापरात असलेले स्तोत्र आहे. यात नदीचे पाणी धरणाच्या सहाय्याने अडवून विद्यूत जनित्रामध्ये उंचावरून सोडले जाते व ती जनित्रे वेगाने फिरवून विज निर्मिती होते. येथे मागणीनुसार कमीजास्त पाणी सोडून वीज निर्मिती नियंत्रित करता येते. ह्यामध्ये अडचण अशी की पाण्याचे स्रोत पावसावर अवलंबून असते. येथे सुद्धा धरण बांधणे, वीजपुरवठ्याचे जाळे तयार करणे इत्यादी कामात खूप कर्बोत्सर्जन होऊ शकते.
अणूशक्तीपासून विज निर्मिती ही एकेकाळी खूप लोकप्रिय अशी इंधन निर्मितीची पद्धत होती. या पद्धतीत शून्य कर्बऊत्सर्जन होते, त्याचप्रमाणे अणूइंघन आणि अणूप्रक्रिया शाश्वत असतात. परन्तू अणूकिरणोत्सर्जनाच्या समस्येमुळे ही पद्धत सध्या लोकप्रिय नाही .
इथेनॉलचा वापर इंधनात करणे ही सध्याची प्रचारात असलेली पध्दत आहे. इथेनॉल मुख्यत्वेकरून उसाच्या रसापासून तयार केला जातो. उसाचे शेत वातावरणातील कर्बवायू शोषून घेते. यामुळे इथेनॉल तयार करतांना उत्पन्न होणारा कर्बवायू हा शून्य समजला जातो.त्याचप्रमाणे कर्बवायू चा इतर उद्योगात वापर होतो, उदा.शीतपेय, पाण्याचे शुद्धीकरण ईत्यादी. पन्नास मिलियन गॅलन इथेनॉल तयार होताना दीडलाख मेट्रिक टन कर्बवायू तयार होतो. उसाच्या शेतीकरता रोजगार निर्मिती होतेच,परन्तु त्याचप्रमाणे जंगल तोड, खताचा अनावश्यक उपयोग, जमिनीची धूप, निरुपयोगी पाण्याचा निचरा, उसाचे शेत जाळताना होणारे कर्बऊत्सर्जन, वगैरे अनेक तोटे सुध्धा आहेत. सध्या भारतात पेट्रोलमध्ये आठ टक्के इथेनॉल वापरले जाते.
वरील लेखावरून लक्षात येईल की कितीही प्रयत्न केले तरी कुठे ना कुठे कार्बनशी संबंध येतोच. याचे कारण कार्बन सर्वत्र आहे. सर्व जीवन कार्बन पासुन बनलेले आहे. त्यामूळे सगळ्यांचा शेवटी कोळसा होतो.
जेंव्हा पाच विकोप झाले तेव्हा मानव अस्तित्वात नव्ह्ता. सहाव्या होणाऱ्या विकोपास मानव जबाबदार धरला जात आहे. मानव सुद्धा आपल्यापरीने पराकाष्ठा करून हा सहावा विलोप टाळायचा प्रयत्न करीत आहे. निदान त्याचा परिणाम कमी व्हावा ,कमीत कमी त्याचा मानवावरील आघात मृदू व्हावा असा मानवाचा प्रयत्न आहे. हे कार्बनचे कालचक्र मानव, जो त्या कालचक्रातील एक आरा आहे, थांबवू शकेल का?
सौ ऊर्मिला सुनील शेजवलकर
M.A. Philosophy Pune University 1981
भालचंद्र ज्योतिष विद्यालय येथुन हस्तसामुद्रीक विषारद, अंकज्योतिष विशारद, ज्योतिष विषारद आणि नंतर महाराष्ट्र ज्योतिष परिषद येथुन ज्योतिष शास्त्री.
सोमवार, १३ डिसेंबर २०२१ । सा. ७:३० वा.
राखीव
सोमवार, २० डिसेंबर २०२१ । सा. ७:३० वा.
राखीव
एड्सग्रस्तांना शिधा वाटप
३ नोव्हेंबर २०२१
एड्स ग्रस्त लोकांच्या कुटुंबीयांना महिन्याचा शिधा व दिवाळी फराळ वाटप
काल मंगळवारी आपण कलाप्रसाद येथे दर महिन्याप्रमाणे एड्सग्रस्त लोकांच्या कुटुंबीयांना महिन्याचा शिधा व दिवाळीचा फराळ याचे वाटप केले. आपण १५ कुटुंबीयांना हे वाटप केले.
*दिवाळीचा फराळ हा श्रीकृष्ण जी चितळे यांनी दिला. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !*
कार्यक्रमाचे नियोजन किरण वेलणकर यांनी केले. कार्यक्रमाला डायरेक्टर विनायक देशपांडे, हेमंत वाळिंबे, आनंद बदामीकर व किरण वेलणकर हे उपस्थित होते.
दिवाळी फराळ वाटप
३ नोव्हेंबर २०२१
३ नोव्हेंबर रोजी आपण पाऊलवाट फाउंडेशन, पासली येथे धान्य व मिठाई वाटप कार्यक्रम केला. आपण १०० गरजूंना महिन्याचा शिधा व मिठाई यांचे वाटप केले. रो. विनोद अगरवाल यांनी शिधा व मिठाई स्वस्त दरात उपलब्ध करून दिली. रो. सुदर्शन नातू, रो. नितीन पाठक व सेक्रेटरी रो. किरण वेलणकर यांनी बरीच मदत केली.
सकाळी ९ वाजता आपण पुण्यातून निघालो व पासली ला जाऊन शिधा व मिठाईचे वाटप केले. त्यानंतर दुपारी जेवण करून सर्वजण पुण्याला परत आले. कार्यक्रम सुरेख झाला.
आपल्याकडून प्रेसिडेंट रो. अतुल अत्रे, रो. सुदर्शन नातू, रो. नितीन पाठक, रो. सुभाष चौथाई, रो. माधुरी किरपेकर, रो. मृदुला घोडके, ॲन अंजली पाषाणकर, रो. श्वेता, सुभाष व श्रेया करंदीकर, फर्स्ट लेडी नंदिनी , रो. संजीव ओगले व रो. रवींद्र प्रभुणे हे उपस्थित होते.
पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन-काठी वाटप
१४ नोव्हेंबर २०२१
सोया मिल्क कार्यशाळा क्र ५
२० नोव्हेंबर २०२१
काल २० नोव्हेंबर रोजी साखर जवळ कोदवडी या गावामध्ये सोया मिल्कची कार्यशाळा घेतली.यामध्ये ११ महिलांनी भाग घेतला होता. कार्यशाळा अतिशय उत्तम झाली. त्या महिलांमध्ये अंगणवाडी चालवणाऱ्या महिलासुद्धा होत्या. त्या सोया मिल्कचा पुरवठा त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना करू शकतात . तसेच कार्यशाळेत भाग घेतलेल्या महिलांनी सोया मिल्क उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल उत्सुकता दाखवली. कार्यशाळेत नंतर आपण त्यांना मिक्सर व प्रेस दोन्ही गोष्टी दिल्या.
कार्यशाळेला मार्गदर्शन गोरे सर यांनी दिले तसेच त्याचे आयोजन आपले रविंद्रजी प्रभुणे यांनी केले. कार्यशाळेला आपल्याकडून पी पी गोविंदराव पटवर्धन तसेच सुभाष चौथाई हे आवर्जून उपस्थित होते.
पुढील कार्यशाळा ही तिथूनच जवळ असलेल्या गावामध्ये लवकरच घेण्यात येईल. या आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ज्ञान प्रबोधिनी ची खूप मदत होत आहे.
ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट - एच.व्ही. देसाई हॉस्पिटल
२३ नोव्हेंबर २०२१
मागच्या वर्षी आपण ३ क्लबनी मिळून एच व्ही देसाई रुग्णालय येथे ग्लोबल ग्रॅंट केली होती. ही ग्लोबल ग्रॅंट यावर्षी एक्झिक्युशन करता आली असून मार्च २२ पर्यंत ती पूर्ण करायची आहे. त्याअंतर्गत २२०० कॅटरॅक्ट सर्जरी या मोफत केल्या जातील. त्याचे उद्घाटन २३ नोव्हे रोजी झाले. त्यापैकी २०३ सर्जरी एका दिवसात करण्यात आल्या.
आपल्या क्लब तर्फे प्रे. रो. अतुल अत्रे, आय.पी.पी. रो. सुदर्शन नातू , पी.पी. रो. विनायक देशपांडे, रो. श्रीकांत परांजपे तेथे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ कॅंटोनमेंट बरोबर आपण हा प्रोजेक्ट करत आहोत.
आपल्या ओळखीत कोणत्याही गरीब व्यक्तीला जर कॅटरॅक्ट सर्जरी करायची असेल तर ती एच व्ही देसाई रुग्णालयात मोफत करून मिळेल. तसे असेल तर तशी नावे रो विनायक देशपांडे किंवा प्रेसिडेंट कडे द्यावीत.
वाचू आनंदे
२५ नोव्हेंबर २०२१
२५ नोव्हेंबर रोजी आपल्या क्लब ऑफिस मध्ये वाचू आनंदे ही फेलोशिप पार पडली.
रो. पल्लवी गोरे यांनी इंटरनॅशनल बेस्ट सेलर " IKIGAI " या पुस्तकाचे वाचन केले. रो. पल्लवी यांनी त्यांच्या अतिशय सुंदर शैलीत सर्वांशी संवाद साधला. कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. कार्यक्रमाला उपस्थिती उत्तम होती.
सोया मिल्क कार्यशाळा क्र. ६
२८ नोव्हेंबर २०२१
२८ नोव्हेंबर २०२१ रोजी आपण व यमुना सर्जेराव जगताप फाउंडेशन यांनी मिळून कोथळे या गावामध्ये सोया मिल्कची कार्यशाळा घेतली. यामध्ये १० महिलांनी भाग घेतला होता. कार्यशाळा अतिशय उत्तम झाली. कार्यशाळेनंतर आपण त्यांना मिक्सर व प्रेस दोन्ही गोष्टी दिल्या.
कार्यशाळेला मार्गदर्शन पी. पी. रो. गोरे सर यांनी केले. तसेच त्याचे आयोजन आपले पी.डी.जी. रो. अरुणजी कुदळे व प्रकाशजी जगताप यांनी केले. कार्यशाळेला आपल्याकडून प्रे. रो. अतुल अत्रे व रो. श्रीकांत परांजपे उपस्थित होते. तसेच रणजीत पाल सर हेसुद्धा स्वतः आवर्जून उपस्थित होते.
पुढील कार्यशाळा ही येत्या बुधवारी १ डिसेंबरला घेण्यात येईल. ज्यांची या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची इच्छा असेल अशांनी गोरे सरांशी संपर्क साधावा.
पुस्तकांना चेहेरा देणारा कलाकार - चंद्रमोहन कुलकर्णी - लिटरेचर सॅटेलाईट क्लब
३ नोव्हेंबर २०२१
Plastic Waste Collection-Satellite Gold Club
13 November 2021
Rotary Satellite Club of Pune South Gold conducted a plastic collection drive at Heritage Society, Wakad. We collected a lot of waste plastic from the society members and from our own homes. The simplest way to reduce plastic waste is to avoid unnecessary and single-use plastics, support businesses who are reducing plastic waste and re-use existing plastic. Hence we collected this and handed it over to Rudra Environmental Solutions Pvt Ltd. They are involved in research of converting waste plastic into fuel technology through TCD i.e. Thermo Catalytic Depolymerisation Process. We would like to thank Heritage society Chairman, Abhijit Parekh and secretary, Atul Dasharath for participating in this important initiative. Those present today were, Rtn Neha Deshpande, Rtn, Shilpa Pande, Rtn Sameer Sharma, Rtn, Aditi Kirpekar and Rtn Onkar Joshi along with his wife Deepti and 2 children.
फिटनेस फेलोशिप
कोविडमुळे पडलेल्या मोठ्या खंडानंतर आपली फिटनेस फेलोशिप परत एकदा सुरु झाली आहे. दर रविवारी सकाळी ७ वा. पू. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथे आपले अनेक सदस्य उत्साहाने यात भाग घेतात.
एकविसाव्या शतकातील एकविसाव्या दिवाळीची सुरुवात आपण “स्वरमधुरा” या कार्यक्रमाने केली. करोनाच्या दीर्घ काळ रात्री नंतर आजची पहाट उगवली होती. खूप दिवसांनी परस्परांना प्रत्यक्ष भेटण्याचा, नटण्या थटण्याचा योग सर्वांनाच आनंदित करत होता. रांगोळ्या, फुलांच्या माळा आकर्षक दिव्यांच्या मांडणीने प्रसन्न वातावरण निर्मिती केली होती . प्रोग्रॅम कमिटी व ॲन्स पार्टीसिपेशन कमिटी यांनी घेतलेली मेहनत पायरीपायरीवर शोभून दिसत होती. घरंदाज वेशातील रोटेरियन आणि ॲन्समुळे वातावरण आणखी भारदस्त झाले होते.
सुरुवातीला "southern star" या आपल्या क्लब बुलेटिनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. पीडीजी रो. भाऊसाहेब कुदळे, ए.जी. रो. धनश्री जोग, प्रे. रो. अतुल अत्रे, रो. श्रीकृष्ण व ॲन आरती चितळे व बुलेटिन संपादक रो. अभिजित देशपांडे यांनी हे प्रकाशन केले.
यानंतर स्वरमधुरा या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मधुरा दातार पुणे साऊथला तशी नवीन नाही तरी पण तिची सुमधुर ओळख ॲन डॉ. गीतांजली पुरोहित ने करून दिली आणि केतन गोडबोलेच्या निरागस स्वरांनी पहाट मांगल्याने भरून गेली.
यानंतर “जिवलगा कधी रे येशील तू” एका गाण्यात चार कडवी चार वेगवेगळया रागात बांधलेल्या या गाण्याने मधुरा सगळ्या सभागृहावर ' छा गयी 'म्हणा ना !
“जुदाई मे तेरे हुई” या गझलेने मधुरा चा नवीन पैलू आपल्याला दाखवून दिला उर्दू गझल नंतर “सुहास्य तुझे” हे नाट्यगीत आणि त्याला जोडूनच “मी मज हरपून” म्हणत तिने रसिकांना मंत्रमुग्ध करुन टाकले. त्यावर मुकुट चढवला “मी राधिका” या गाण्याने. तिची गाण्यातली तन्मयता, त्यातली भावना स्वरातून हृदयापर्यंत पोहोचत होती .
वीणा केळकर यांचे सूत्रसंचालन अगदी प्रवाही पणे कार्यक्रमाला पुढे नेत होते.
रसिकांच्या मनात खोलवर रुजलेली हिंदी मराठी अनेक गाणी मधुरा दातार ने उत्तम सादर केली . केतन गोडबोले याने “मधुबन मे राधिका नाचे रे” सारखे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची वेगळ्या वाटेने जाणारी गाणी तेवढ्याच ताकदीने सादर करत मैफिलीला चार चाँद लावले. लावणी, ऋतू हिरवा यासारख्या गाण्यात अपूर्व द्रविडचा तबला अभिजीत भदेचा रिदम भाव खाऊन गेला “पाहिले न मी तुला” सारख्या गाण्यात अनय गाडगीळ च्या जादुई साथीचा अनुभव घेतला. यावेळी टीव्ही सिरीयल टायटल सॉंग्स म्हणजे शीर्षक गीते मधुराने आपल्याला प्रत्यक्ष गाऊन दाखवली. सचिन जांभेकर विषयी काय लिहावे. त्याचे हार्मोनियम हा स्वतंत्र विषय होऊ शकतो. अजित सोमण यांच्या उत्तम साऊंड सिस्टीम मुळे सगळा कार्यक्रम रसिकांपर्यंत व्यवस्थित पोहचू शकला आणि कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. ॲन चारुशीला पटवर्धन यांनी कार्यक्रमाला साजेसे काव्यमय आभार प्रदर्शन केले
यांनी आभार प्रदर्शन केले. रो. श्रीकृष्ण चितळे व ॲन आरती चितळे यांच्या सुग्रास फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पर्यावरण, वसुंधरा बचाव, प्लास्टिकचा बेसुमार वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अघोरी आणि राक्षसी समस्या हे विषय आत्ताच्या काळातील अतिशय ज्वलंत असे विषय आहेत. विविध पातळ्यांवर त्यावर चर्चा घडत असतात. बऱ्याच चर्चा या केवळ उपदेशात्मक स्वरूपाच्या, " आपण स्वतः काहीही न करता" दुसऱ्याने काय करावे असे सांगणाऱ्या म्हणून निष्फळ अशा स्वरूपाच्या आढळून येतात.
नुसतीच भाषणबाजी न करता एक क्रियाशील उपक्रम स्वतः राबवून, " आधी केले मग सांगितले " या उक्तीनुसार वागणाऱ्या अमिताजी देशपांडे यांनी असाच एक ज्वलंत विषय आपल्या आजच्या साप्ताहिक सभेत मांडला.
सुरुवातीला रोटेरियन माधुरी किरपेकर यांनी अमिताजी यांची अतिशय समर्पक शब्दात ओळख करून दिली.
री चरखा द इको सोशल ट्राईब या त्यांच्या संस्थेमार्फत या क्षेत्रात करीत असलेल्या कामाविषयी अत्यंत हसत-खेळत आणि सहजपणे हा विषय त्यांनी उलगडला.
अमिता देशपांडे या अत्यंत उच्चविद्याविभूषित असून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट विद्याशाखांमधील अभ्यासक्रम त्यांनी केलेले आहेत. सुप्रसिद्ध अशा परड्यू युनिव्हर्सिटीमधून (ज्या विद्यापीठात शिकलेल्या अनेक जणांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले गेले आहे) त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.अनेक मोहमयी संधी चालून आलेल्या असून देखील आपण स्वतः आणि त्याबरोबर आपल्या पतीलाही अमेरिका सोडून भारतात परत येण्यास लाऊन हा उपक्रम त्या चालवित आहेत; केवळ सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून!!!
टाकाऊ प्लास्टिक पासून त्याला Up-cycling करून त्यापासून अत्यंत आकर्षक अशा नेहमीच्या वापरातील वस्तू कशा बनवता येतील याविषयीची माहिती त्यांनी दिली. आत्ता पर्यंतचा प्रवास कसा झाला याचा रंजक वृत्तांतही त्यांनी सांगितला.
प्लास्टिकच्या टाकाऊ पिशव्या गोळा करणे, त्या स्वच्छ करून उन्हातच वाळवणे,त्या विविध प्रकारच्या आणि विविध रंगांच्या असल्या तरी त्यावर कोणतीही औष्णिक वा रासायनिक प्रक्रिया न करता, मानवीश्रमां द्वारे त्यांचे विशिष्ट आकाराचे तुकडे करणे, चरख्यावर त्यावर त्यांचे धागे बनवणे, हातमागावर त्यांची वस्त्रे विणणे आणि शिलाई मशीन द्वारे त्यांच्या वैविध्यपूर्ण अशा वस्तू बनवणे, अशी ही प्रक्रिया आहे.
यात मानवी परिश्रमांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अन्य ऊर्जा (उदा. वीज, उष्णता, रसायन, यंत्रऊर्जा) वापरली जात नाही, हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. ते एक मोठे क्रांतिकारक असे Innovation म्हणावे लागेल.
पूर्वीच्या काळी समाजजीवनाचा एक भाग झालेल्या पण आता नामशेष होऊ पहात असणार्या एका जीवनशैलीचे पुनरुज्जीवन म्हणजे री -चरखा (Re-Charkha) . याद्वारे आदिवासी भागातील अनेकांना उपजीविकेचे साधन त्यांनी मिळवून दिले आहे.
पूर्वीच्या चरखा अभियानाचा उद्देश आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन असा होता. या री-चरखा अभियानाद्वारे अजून काही आयाम त्याला जोडले जात आहेत.
१)कोणत्याही प्रकारची ऊर्जा अथवा यांत्रिकीकरण न वापरता होणारी प्रक्रिया.
२) प्लास्टिक पासून पर्यावरणाची होणारी हानी कमी करणे.
३) सार्वजनिक स्वच्छतेला हातभार लावणे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
४) हा एक उद्योग म्हणून उभा राहू शकतो आणि त्यातून अर्थार्जन करता येते. त्यामुळे अनेकांचा जीवनस्तर उंचावला जातो.
अशा या क्रियाशील आणि नाविन्यपूर्ण (innovative) उपक्रमाची ओळख थोडक्यात होणे शक्य नाही. हा प्रवास जाणून घेण्यासाठी आपण "Re-Charkha Amita Deshpande" या नावाने गुगलवर शोध अवश्य घ्यावा.
थोडक्यात पण रंजक अशा प्रस्तुतीकरणानंतर अनेक श्रोत्यांनी खूप प्रश्न विचारले. एजी संदीप विळेकर, रो. अभिजीत देशपांडे, रो. मिलिंद क्षीरसागर, पीपी विनायक देशपांडे, रो. विलास आपटे, Ann गौरी क्षीरसागर, डॉक्टर संगीता देशपांडे, पी पी सुदर्शन नातू, Ann माधवी देशपांडे, पीइ. संजीव ओगले, रो. रवींद्र प्रभुणे- अशा अनेकांनी प्रश्न विचारून आपले शंकासमाधान करून घेतले.
श्रोत्यांमधून येणारा हा भरघोस प्रतिसादच, कार्यक्रम अतिशय परिणामकारक झाला याची पोचपावती होती.
रो. रवींद्र प्रभुणे यांनी आभार मानल्यानंतर उत्तम फेलोशिप होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
एका उत्तम कार्यक्रमाची मेजवानी दिल्याबद्दल प्रोग्रॅम कमिटी आणि रोटेरियन मृदुलजींचे व अमिताजी यांना क्लब मध्ये आणल्याबद्दल रो. अदिती किरपेकर यांचे हार्दिक आभार.
१५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ मराठी क्रीडा पत्रकार प्रा. संजय दुधाणे यांचा "भारत-क्रीडा व ऑलिम्पिक" असा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला प्रा. दुधाणे ह्यांनी मराठी क्रीडा पत्रकारितेला एक नवीन परिमाण घालून दिले आहे. तीन ऑलिम्पिक स्पर्धांचे वार्तांकन करणारे ते एकमेव मराठी क्रीडा पत्रकार आहेत. क्रीडा क्षेत्रावरील त्यांची तब्बल १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पाहुण्यांची ओळख रो. अभिजित देशपांडे यांनी करून दिली. हा कार्यक्रम मुलाखतीच्या स्वरूपात झाला व त्यांची मुलाखत रो. मृदुला घोडके यांनी घेतली. या कार्यक्रमात त्यांनी विविध खेळाडूंबरोबर त्यांना आलेले अनुभव सांगितले तसेच भारताला क्रीडा क्षेत्रात पुढे यायचे असेल तर काय करावे लागेल याचे विवेचनही केले.
पत्रकारितेबरोबरच गरीब पण खेळामध्ये गुणवान मुले/मुली शोधून त्यांना ऑलिम्पिक करीत तयार करण्याचे प्रयत्न देखील ते करतात. या कार्यक्रमाला त्यांनीच मदत केलेले दोन गुणवान खेळाडू, भालाफेक मधील चैतन्य ढोरे व आर्चरी मधील राष्ट्रीय खेळाडू निकिता ढुमणे हे देखील उपस्थित होते. या खेळाडूंना आपले सदस्य रो. माधुरी व उदय किरपेकर, रो. अजित शेलार व रो. मृदुला घोडके यांनीं तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे भारताला १९३६ सालच्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळालेले सुवर्ण पदक आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाले. त्या संघातील बाबू निमळ यांचे सुपुत्र श्री अशोक निमळ हे सुवर्ण पदक आपल्यासाठी घेऊन आले होते. अतिशय भारावलेल्या मनाने हा क्षण सर्वांनी अनुभवला.
सरतेशेवटी आभार प्रदर्शन रो. मिलिंद क्षीरसागर यांनी केले.
या सभेच्या सुरुवातीला TRF करिता देणगी दिल्याबद्दल रो. अभिजित देशपांडे व प्रे. अतुल अत्रे यांना फौंडेशन डायरेक्टर रो. श्रीकांत परांजपे व फौंडेशन कमिटी चेअर रो. माधुरी किरपेकर यांच्या हस्ते TRF पिन देण्यात आली.
दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी नॉमिनेशन कमिटी इलेक्शन ची मिटिंग आपला क्लबमध्ये सेवा सदन हॉल तसेच झूम वर झाली. एकूण नऊ सभासद आपणास निवडून द्यायचे होते या नऊ जणांनी मधून पुढील वर्षाचे BoD सभासद नवीन वर्षाच्या प्रेसिडेंट यांना सुचवले जातात. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही सभा असते. इतकी वर्षे आपण एक मतपत्रिका सर्व सभासद रोटेरियन यांना देत होतो. यावेळेस सर्व सभासदांचे नोंदवलेली मत ही प्रत्यक्ष मोजली जात असत आणि हे करताना भरपूर वेळ जात होता.
आपले रो. अभिजीत देशपांडे यांनी एक अत्यंत सुंदर ॲपलिकेशन मागील वर्षी यासाठी तयार केले आहे. या ॲप मुळे कोणताही त्रास न होता अत्यंत सुटसुटीत पद्धतीने आपल्याला मतदान करता येते व त्वरित निवडणुकीचे निकाल पाहायला मिळतात.
या प्रक्रियेचे निवडणुक अधिकारी म्हणून पी. पी. री. संदीप विळेकर यांनी काम पहिले. सुरुवातीला त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया व त्याचा उद्धेश या विषयी सांगितले व मतदान चालू झाले.
मतदान चालू असे पर्यंतच्या वेळात आपले इतर काही कार्यक्रम पार पडले. यामध्ये आपल्या पब्लिक इमेज कमिटी तर्फे तयार केलेल्या आपल्या क्लबच्या टी-शिर्ट्स चे अनावरण करण्यात आले तसेच ऑफिस व वाहनावर लावता येतील अश्या साळूबाच्या नावाच्या स्टिकर्सचे देखील अनावरण करण्यात आले. हे स्टिकर्स रो. अरविंद शिराळकर यांनी स्पॉन्सर केले आहेत. या दोन्हीही प्रोजेक्टचे काम पब्लिक इमेज डायरेक्टर रो. दत्ता पाषाणकर यांच्या पुढाकाराने पूर्ण झाले.
यानंतर आपल्या बुलेटिन कमिटीतर्फे घेण्यात आलेल्या "दीपावली फोटो स्पर्धा" याचे विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केलेल्या रो. संदीप व ॲन शुभदा अवधानी यांनी या स्पर्धेतील फोटोंचे उत्तम विश्लेषण केले. फोटो काढताना निवडलेला प्रसंग, प्रकाश योजना, मांडणी अश्या विविध अंगाने कसे परीक्षण केले जाते याची अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती त्यांनी दिली व सरतेशेवटी पहिल्या ३ विजेत्यांची नवे घोषित केली.
स्पर्धेतील सर्व फोटो आपल्याला डिसेंबरच्या बुलेटिन अंकात पाहायला मिळतीलच. या स्पर्धेत ॲनेट्सचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कौतुक.
यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान संपन्न झाल्याचे घोषित केले व निकाल जाहीर केले. आय. पी.पी. रो. सुदर्शन नातू यांची Convenor म्हणून निवड झाली. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अशा रीतीने रोटरी वर्षातील एक महत्वपूर्ण सभा पार पडली.