President-elect Jennifer Jones revealed the 2022-23 presidential theme, Imagine Rotary, asking #Rotary members to dream big and take action:
"Imagine a world that deserves our best, where we get up each day knowing that we can make a difference."
About the Theme
The circle represents Rotary and the dots represent the areas of focus in the logo and the theme Imagine Rotary represents how we imagine the world to be a better place to be in !
Membership Director Rtn. Yogesh Nandurkar, has taken a great initiative of forming a Classification Committee to compile a list of member classifications. The committee comprised of:
Rtn. Yogesh Nandurkar - Director, Membership
P.P. Rtn. Shamrao Kulkarni - Committee Chair
P.P. Rtn. Govindrao Patwardhan
P.P. Sandeep Vilekar
Rtn. Manisha Belgaonkar
The committee has not only done a great job of compiling existing classification of members but also drawn up a list of classifications which have been filled with existing members and importantly a list of unfilled classifications.
The list of member classifications will help us identify our internal expertise that can be used for various projects of the club.
All of us also need to target our efforts towards identifying new members that would cover the classifications under the unfilled list. This will help make our club wholesome and diversified.
If you need any further information or want to suggest any changes, please do get in touch with any member of the committee.
For ready referral of members, the list of filled and unfilled classifications is given here under:
कलासिफिकेशन कमिटीने गेली काही महिने काम करून या क्लासिफिकेशनच्या याद्या तयार केल्या आहेत.
आपल्या क्लबमध्ये कोणत्या क्षेत्रातले सभासद आहेत जेणेकरून त्यांच्या क्षेत्राचा उपयोग आपण क्लबच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून समाजाकरता करू शकू.
नवीन सभासद शोधण्याकरता अन्फिल्ड क्लासिफिकेशन यादीचा उपयोग होईल. त्याचा उपयोग करून त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना सभासद करून घेता येईल.
या याद्यांमध्ये काही बदल, सूचना अपेक्षित असतील तर क्लासिफिकेशन कमिटीपैकी कोणाशीही थेट संपर्क साधा.
- रो. योगेश नांदुरकर : संचालक
- पी. पी. रो. शामराव कुलकर्णी : कमिटी चेअर
- पी. पी. रो. गोविंदराव पटवर्धन
- पी. पी. रो. संदीप विळेकर
- रो. मनीषा बेळगावकर
We conferred the Honorary Membership of The Rotary Club of Pune South on Mr. Shrinivaas Sohoni, IAS (Retd.) and our own ex-Rotaractor Adhik Kadam.
The proceedings of the meeting have been penned by P.P. Rtn. Abhijit Joag and can be read here.
Our Rtn. Raghavendra Ponskhe who heads the very famous Intellectual Property Consulting firm Bhate & Ponkshe, has been invited to join the Incubation Seed Management Committee under the Startup India Seed Fund Scheme (SISFS). Science and Technology Park is the implementing incubator for this scheme by the Govt of India.
Under the scheme SciTech park can disburse grants and give seed capital to early stage startups.
This committee consists of stalwarts like
Shri Dilip Band (IAS, Retd.), Padma Shri Prataprao Pawar, Shri Deependra Singh Kushwah (IAS), CEO, Maharashtra State Innovation Society, Dr. L. S. Shashidhara, Professor, IISER, Dr. Rajendra Jagdale, Director General and CEO, Science and Technology Park. Shri Ajay Kumar Thakur, Heads Bombay Stock Exchange's SME & Startup initiatives, Shri Ajay Sharma, Executive Director Standard Chartered.
This is a very apt selection. Heartiest congratulations, we are very proud of you Raghavendra.
Our Rtn. Hrishikesh Badve has been elected to the Managing Committee of Pune Branch of ICAI for the term 2022-25.
Congratulations Hrishikesh and all the very best !
नमस्कार मंडळी, आज पूर्णागिनी मध्ये आपण आपली पुढच्या वर्षीची फर्स्ट लेडी स्नेहा ओगले हिला जाणून घेणार आहोत. पूर्वाश्रमीची निरुपमा खांडेकर प्रेसिडेंट ईलेक्ट संजीव ओगले यांच्याशी विवाहबद्ध झाली आणि ओगल्यांच्या घरात प्रवेश करती झाली. अतिशय मनमिळावू ऍडजेस्टेबल स्नेहाने सासु-सासर्यांना आपलेसे तर करून घेतलेच परंतु त्यांची शेवटपर्यंत अगदी मुली सारखी काळजी सुद्धा घेतली.
सध्या पी इ एस मॉडर्न कॉलेज ,गणेश खिंड येथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
वडील सैन्यात, त्यामुळे शिस्तबद्ध जीवन जगत,सततच्या बदल्यांना ती सरावत गेली. आईने, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मात्र पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून सूक्ष्म जीवशास्त्राची पदवी घेतली. एम एस सी च्या अंतिम वर्षातच CSIR - NET परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे MPhil साठी फेलोशिप मिळाली आणि पुणे विद्यापीठाच्या life science या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या आघाडीच्या प्राणीशास्त्र विभागात केली. त्याच दरम्यान सागरी अभियंता संजीव ओगले यांच्याशी विवाह केला. संजीव स्नेहाला अभिमान वाटावा अशी मुलगी भाग्यश्री, जी सध्या सागरी अभियंता आहे. गेल्या चोवीस वर्षांपासून तिने मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. स्नेहाच्या सक्षम प्रयत्नांमुळे FYBSc ते MSc पर्यंत मायक्रोबायोलॉजी विभागाची वाढ झाली. तिच्या व इतर विज्ञान विभागांच्या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे मायक्रोबायोलॉजी विभाग आणि महाविद्यालयासह विज्ञान विभागांना सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून STAR दर्जा प्राप्त झाला आहे. स्नेहा नुसतीच एक प्रोफेसर नाही तर वेळोवेळी आपण होऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन सुद्धा करते. स्नेहा एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि मार्गदर्शक असून माझी विद्यार्थ्यां शी चांगला संबंध ठेवून आहे. संस्थेने तिच्या सक्षम खांद्यांवर विविध जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. आणि ती त्या उत्तमरित्या पार पाडत आहे. सगळ्यांचा उल्लेख करणं इथं शक्य नाही. स्नेहाने अनेक परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःला अपडेट ठेवले आहे. तिने अनेक सेमिनार, कार्यशाळा आणि परिषदा आयोजित केल्या आहेत. स्नेहाने 2005 मध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी तर्फे आदर्श प्राध्यापिकेचा पुरस्कारही पटकावला आहे. यासारखे इतर अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार तिला प्राप्त आहेत.
हलके शास्त्रीय आणि बॉलिवुड संगीत ऐकणे, नृत्य करणे हे तिचे छंद आहेत .महिला सॉफ्टबॉल मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तिने केले आहे. समाजासाठी योगदान देण्यासाठी रोटरी हे एक चांगले आणि योग्य चॅनेल आहे असे तिला वाटते. तिने अनेक गरजू संस्थांना देणग्या दिल्या आहेत. पुढील अध्यक्षीय वर्षात अनेक लोकांना निरनिराळी प्रशिक्षण देऊन, स्वयम रोजगार मिळवून देऊन, स्वतःच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा मानस आहे . स्नेहाला प्रवासाची खूप आवड आहे.
अशी ही आपली आवडती ,हुशार ,शांत सगळ्यांना मदत करणारी , साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या स्नेहाला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!
The transport sector accounts for 18% of total energy (oil) consumption in India. Growing demand for fuel is increasing the import load on our national economy. Also this leads to more n more carbon emissions and it is a challenge to meet the international norms of climate change commitments. It is important to introduce alternative means in the transport sector which can be coupled with India’s rapid economic growth, rising urbanisation, travel demand and country’s energy security.
Electric mobility presents a viable alternative in addressing these challenges, when packaged with innovative pricing solutions, appropriate technology and support infrastructure and thus, has been on the radar of the Government of India for over 10 years or so.
E mobility comes with zero or ultra-low emissions of local air pollutants and much lower noise, and, by being one of the most innovative clusters for the automotive sector, can provide a major boost to the economic and industrial competitiveness, attracting investments, especially in our country .The E V industry in India is far behind, with less than 1% of the total vehicle sales. Currently, we have about 40 thousand electric two-wheelers and a few thousand electric cars only. The Indian EV industry has been on the back seat due to various challenges.
The government has undertaken multiple initiatives to promote manufacturing and adoption of electric vehicles in India & With its support electric vehicles have started penetrating in the Indian market. However, availability of adequate Charging Infrastructure & competitive price are the key requirements for accelerated adoption of electric vehicles in India. But the situation is changing fast and we are observing a good response earlier than expected.
Electric Vehicles (EVs) are run by electric motors which are powered by energy stored in batteries. EVs have an electric motor instead of an Internal Combustion Engine (ICE). As an EV runs on electricity, the vehicle emits no exhaust from a tailpipe i.e. it has zero tail pipe emission and does not contain components, such as a fuel pump, fuel line, or fuel tank. The batteries can be charged from our house electric socket !
The advantages of EVs are economical since less moving parts & components required, high efficiency, low fuel & maintenance cost than regular ICR vehicles, quiet operation,
About 28 new car models and numerous 2 Wheeler , 3 Wheeler models are to hit the Indian car market in the coming two years and they will create a sea change in market dynamics. This is a thing to watch & experience. In India MG Hector & Tata Motors have started offering their models and are in the market for more than 2 years now.
I have bought a Tata EV Car and I am enjoying it ! Soon I would like to see you driving one !!
.
Shrikant is the Founder-Director of Brushless Motors India Pvt. Ltd. and PMP Automation Pvt. Ltd. which are into PMDC and brushless DC motors for more than 20 years as well as control panels and complete industrial automation systems. They also make energy saving and environment friendly solar fans and BLDC fans. They are also one of the leading manufacturers of BLDC motors for EV applications.
ROTARY PEACE PROGRAMS
A special program of The Rotary Foundation was originally labeled the "Rotary Peace Forum." The concept of a center or educational program to promote greater understanding and peace in the world was originally dis-cussed in 1982 by the New Horizons Committee and the World Understanding and Peace Committee. In 1984 it was further explored by a New Programs Committee of The Rotary Foundation. The essence of the Rotary Peace Program is to utilize the non- governmental but worldwide resources of Rotary to develop educational programs around the issues that cause conflict among nations in the world as well as those influences and activities which promote peace, development and goodwill. The program includes seminars, publications, conferences and speakers services as a means to initiate a global dialogue to find new approaches to peace and world understanding. Specific Rotary Peace Programs are established annually by the Trustees of The Rotary Foundation. A committee of distinguished Rotary leaders create the programs and provide annual guidelines for responsible new pathways to peace.
INTERNATIONAL RESPONSIBILITIES OF A ROTARIAN
As an international organization, Rotary offers each member unique opportunities and responsibilities unlike those of other groups one might join. Although each Rotarian has first responsibility to uphold the obligations of citizenship of his or her own country, membership in Rotary enables Rotarians to take a somewhat different view of international affairs. In the early 1950s a Rotary philosophy was adopted to describe how a Rotarian may think on a global basis. Here is what it said: "A world-minded Rotarian:
- Looks beyond national patriotism and considers himself as sharing responsibility for the advancement of international understanding, goodwill and peace;
- Resists any tendency to act in terms of national or racial superiority;
- Seeks and develops common grounds for agreement with peoples of other lands;
- Defends the rule of law and order to preserve the liberty of the individual so that he may enjoy freedom of thought, speech and assembly, and freedom from persecution, aggression, want and fear;
- Supports action directed toward improving standards of living for all peoples, realizing that poverty anywhere endangers prosperity everywhere;
- Upholds the principles of justice for mankind;
- Strives always to promote peace between nations and prepares to make personal sacrifices for that ideal;
- Urges and practices a spirit of understanding of every other man's beliefs as a step toward international goodwill, recognizing that there are certain basic moral and spiritual standards which will ensure a richer, fuller life.
- " That is quite an assignment for any Rotarian to practice in thoughts and actions!
आकाशात निरखून पाहिले का कुणी
बघताच आनंद येतो मनी ।।
नुसते नव्हते पक्षी नुसते नव्हते ढग, विचार केला काय होते मग
मग कळाले होता तो आनंद व्यापून टाकले त्याने सारे जग ।।
नुसते नव्हते ढग, नुसता नव्हता आनंद
नभाच्या निळ्या पिवळ्या रंगाने दिला परमानंद ।।
विचार केला अजून काय इतके छान असते
मग स्वर्गाचे ठिकाण काय वेगळे असते ।।
आकाश म्हणा नभ म्हणा
ते सुंदरच असते ।।
नमस्कार मंडळी.. धनंजय जोशी लिखित"सहज" या पुस्तकातील एक लेख... लेखाचं शीर्षक आहे "सगळीकडे एकच"...
पुसोल नावाचा एक झेन गुरू होऊन गेला.. त्याची ही कथा.. पुसोल सन्यासी होता. तो आणि आणखी दोन संन्यासी प्रवास करताना एका वादळात अडकले.. एका शेतकऱ्याकडे त्यांनी आश्रय घेतला.. शेतकर्याच्या घरी पुसोलनं थोडंसं भाषण दिलं. शेतकऱ्याची मुलगी मुकी होती..पुसोलचं भाषण ऐकून ती अचानक बोलू लागली...!!
दुसऱ्या दिवशी पुसोल आणि त्याचे संन्यासी मित्र जेव्हा निघाले, तेव्हा शेतकरी म्हणाला,.." माफ करा, पण माझ्या कन्येला पुसोल गुरूंशी लग्न करायचं आहे... ते जर झालं नाही, तर ती आत्महत्या करेन म्हणते..! तसं जर झालं तर आमच्या आयुष्याला काय अर्थ राहणार..??"
आपण गेलो तर ह्या कुटुंबाला किती दुःख होईल.. पुसोलला वाईट वाटलं..! पुसोलचे मित्र म्हणाले... "वेडा आहेस का..? आपण संन्यासी... लग्न कसं करणार...??
पुसोल म्हणाला..." खर आहे ते... पण मी जर त्यांना सोडून गेलो, तर दुःखाला कारण होईन...! --शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न करून पुसोल मागे राहिला..!! पण त्याचं संन्यासी पण कुठे जाणार..?? पुसोलच्या नवीन घरी बुद्धाचे चित्र सुद्धा नव्हतं.... पुसोलन बागे मधून दोन मोठे दगड शोधून आणले... एकावर एक ठेवून त्यांना बुद्ध पुतळा तयार केला आणि आपल्या बेडरूम मध्ये ठेवला...
पत्नी झोपल्यानंतर पुसोल रात्री तीन वाजता उठून त्या बुद्धापुढे (त्याचं नाव दगड बुद्ध!)... तीनशे नमस्कार घालून ध्यान करत असे.. एका रात्री पुसोल ची पत्नी उठली, तर हा दोन दगडांसमोर ध्यान करत बसलेला ...!! उठून तिने ते दोन दगड उचलले आणि खिडकीबाहेर फेकुन दिले..!!
पुसोलनं तिची क्षमा मागितली पण तिनं त्याला घराबाहेर काढून दिलं...!!
बिचारा पुसोल...!!
तो म्हणाला.."मी तुझा नवरा आहे.. आपण लग्न केलं आहे...तू मला घराबाहेर कां काढतेस...??
ती म्हणाली.."तू अजून संन्यासीच आहेस.. पत्नीवर प्रेम कसं करावं हे तुला समजलेच नाही अजून ..!!पुसोल म्हणाला...," पण मी तर सगळ्यांवरच प्रेम करतो..!!"
ती म्हणाली...," तेच तर म्हणते मी..! तुला स्त्री म्हणजे काय ते अजून समजलं नाही .!!"
पुसोल म्हणाला." स्त्री काय किंवा पुरुष काय,.. त्या मधला फरक मी समजत नाही..!!"
एकदा पुसोलनं विचार केला..,"मी जर दगडांची उपासना करू शकतो, तर मग मला पत्नीमध्येच बुद्ध का न दिसावा...??"
तेव्हापासून पुसोल रात्री तीन वाजता उठून पत्नी झोपलेली असताना तिच्या पायाशी बसून ध्यान करू लागला....
एक दिवस पत्नीच्या तेही लक्षात आलं.. शेवटी तिने पुसोलची रवानगी गायीच्या गोठ्यात केली...!! पुसोलला आनंदच झाला... कारण आता त्याचा साधना-संघर्ष सहजच विरघळून गेला....
---मी वाचली ही पुसोलची कथा..!!
पहाटे तीन वाजता उठलो.. हळूच माझं आसन उचललं... बन्सीच्या (माझी पत्नी) बिछान्याच्या बाजूला आसन लावून बसलो... दिवा विझवायचा विसरलो....
बन्सी म्हणाली...," तुला मंदिरात जायचं असलं तर जा... दिवा बंद कर आणि पाहिजे तर माझा फोटो घेऊन जा पुढ्यात ठेवायला...."
ता.क.
शिकागोमध्ये मी गाईचा गोठा शोधतो आहे, अजून सापडत नाही ....
पण तिला मात्र मी म्हटलं..." थँक्यू फॉर युवर टिचिंग"
सध्या इतकंच...
पूर्वी भारतात गरिबी नव्ह्ती. देश विकसीत होता.मग देशाचे हे अधःपतन केव्हा चालू झाले? ह्या सर्व गोष्टींबद्दल माहीती करून घेण्याची ऊत्कंठा पं.नेहरूंनाहोती.तेव्हापासूनच हिंदुस्थानचे भविष्यातील आंतरराष्ट्रीय संबंधांवर ते विचार करित असत व त्याकरता भूतकाळाविषयी माहिती त्यांना घेणे जरुरीचे होते.त्यांचा द्रूष्टीकोन जरी पाश्चिमात्य होता,तरी,मोहोन्जोदारो ते आतापर्यंत, सर्व चांगल्या व वाईट परिस्थितीला सामोरं जाऊन, पाच सहा हजार वर्षे टिकणाऱ्या संस्कृतीबद्दल त्यांना जाणून घ्यावयाचे होते.त्यांना हिंदुस्तान व चीन यांतील साधर्म्याबद्दल नेहमीच कौतुक असे.
जी संस्कृती व देश इतकी वर्ष परकीय अधिपत्याखाली राहिले त्यामध्ये अजून ही जिवंतपणा आणि धमक आहे का नाही हे पं.नेहरूंना जाणून घ्यावयाचे होते व तसे नसल्यास कोणत्या मार्गानी देशाचे मनोबल वाढविता येईल हे सुद्धा जाणून घ्यावयाचे होते.असा जिवंतपणा व धमक असलेले तीन देश, रशिया, अमेरिका व चीन, त्यांच्या डोळ्यासमोर होते.हिंदुस्थानात नवचैतन्य निर्माण करण्यास त्यांनी म.गांधींचा अहिंसा व असहकाराचा मार्ग स्विकारला. कदाचित म.गांधीं व पं.नेहरूंना हिंसक लढ्याचा मार्ग ब्रिटिशांच्या ताकदीपुढे कुचकामी वाटला असावा.
आपला देश,देशाची परिस्थिती ,आणि माणसे समजून घेण्यास पं.नेहरू हिंदुस्तान पालथा घालण्यास निघाले.शहरे व त्यामधील मध्यमवर्ग, जो ब्रिटिशांविरुद्ध होता ,परन्तू त्यांना ब्रिटिश व्यवस्थेतच राहून बदल घडवुन आणावयाचा होता,व खेड्यातील जनता,जिथे देशाचा खरा आत्मा होता,यांना पं.नेहरू त्यांच्या भ्रमंतीत भेटत असत व भारत माता म्हणजे निव्वळ त्यांचे खेडे किंवा त्यांच्या आसपासची जमीन नसून संपूर्ण देश आहे व तो स्वतंत्र केला पाहीजे हे त्यांच्या मनावर ठसवत असत.जनता कुठल्याहि जाती जमातीची असली किंवा कुठल्याही धर्माची असली अथवा कुठल्याहि भागातील असली तरीही भारतीय म्हणून त्यांची सुखदुःखे, अडीअडचणी, राहणीमान सारखेच असते.म्हणून विविधतेत सुद्धा एकजूट असते याची पं.नेहरूंना कल्पना होती.
1937 साली सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले होते.त्याकरिता पं.नेहरू सर्वत्र फिरत असत.स्वातंत्र्यापुर्वी निरनिराळी राज्ये नसून प्राॅव्हींस असत. उ.दा.बॉम्बे प्राॅव्हीन्स जो गुजराथ,पाकिस्तानातील सिंध,येमेन मधील एडन ,कोकण ,पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, उत्तरपूर्व कर्नाटक व काही संस्थाने यांचा बनला होता.ह्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित नसुन फ़क्त बारा टक्केच लोकांकरिता होत्या.त्या काळात सुद्धा गुंडगिरी ,बळशाही,घुसखोरीच्या आधारावर निवडणुका जिंकणारे होते ,ज्या मुळे खरोखरीची चांगल्या,स्वच्छ वर्तनाची व लायकीची माणसं मागे पडत असत.याची पं.नेहरूंना जाणीव व घृणा होती.प्रचाराच्या वेळेस व्यक्तीगत उमेदवाराकरीता आवाहन न करता पं.नेहरू कॉँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळींच्या लढ्याकरीता मतांची मागणी करत असत.त्यांना फक्त गोर्या राजवटीला बाजुला सारावयाचे नसून खरोखरीचे प्रजासत्ताक राज्य आणावयाचे होते ,ज्या मुळे जनतेची गरिबी आणि हालअपेष्टा दूर होतील. निवडणुकीच्या निमित्याने पं.नेहरू करोडो जनतेला भेटले,त्यांच्या प्रेमाचा स्विकार केला ,त्याचप्रमाणे कॉंग्रेसच्या व स्वतःच्या तत्त्वांचा प्रचार केला.
हिंदुस्थानच्या ईतिहासाची सुरवात सिंधू खोरे संस्कृतीपासून होते.मग,आपली महाकाव्ये,रामायण, महाभारत, ऐतिहासिक नव्हेत काय?असा प्रश्न उपस्थित होतो.सिंधू खोरे संस्कृती त्याकाळातील एक प्रगत संस्कृती होती.ती साधारण पणे इ.स.पूर्व तीन हजार वर्षांपासून असावी.मोहोन्जोदारो साधारण इ.स.पूर्व दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी वसले असावे आणि इ.स.पूर्व एकोणीसशे वर्षांपूर्वी निर्जन झाले असावे.त्याकाळातील , ईजिप्त ,मेसोपोटेमिया वगैरे संस्कृती व शहरांपेक्षा,मोहोन्जोदारो अतिशय प्रगत होते.वास्तुशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशास्त्र,वगैरे सर्व दृष्टिने सिंधू खोरे संस्कृती व मोहोन्जोदारो शहर त्याकाळातील जगात सर्वात श्रेष्ठ होते.सिंधू खोरे संस्कृती ही आर्यन संस्कृती होतीअसे आतापर्यंत मानले जात होते.परन्तु नवीन संशोधनानुसार ही संस्कृती आर्य सिंधू खोर्यात येण्याच्या अगोदरपासूनच होती.आर्य साधारणपणे इ.स.पूर्व पंधराशे वर्षापूर्वी सिंधू खोर्यात आले असावेत. अशी प्रगत संस्कृती एकाएकी नाहिशी का झाली,अथवा नाहिशी होण्याऐवजी ती संस्कृती स्थलांतरित झाली,विषेशतः सर्वप्रथम उत्तर पूर्व दिशेला व नंतर गंगा खोर्यात?हे एक कोडेच आहे.सिंधु खोरे संस्कृती आणी मोहोन्जोदारो सारख्या शहराची अवनती कदाचित सिंधू नदीच्या परत परत येणाऱ्या पुरामुळे अथवा त्यावेळेस पडलेल्या दोनशे वर्षांच्या दुष्काळामुळे झाली असावी.सिंधू खोर्यासारखी सुपीक जमीन, वातावरण बदलांमुळे व अतीलागवडीमुळे नापीक झाली असावी.कदाचित द्रविड, जे सिंधू खोर्यातील मूळ रहिवाशी होते व आर्य, जे भटक्या जमातीमधील होते,यांच्या विलीनीकरणातून ,एक नवीन संस्कृती तयार झाली,जी आज भारतीय संस्कृती म्हणुन संबोधली जाते.अशाच प्रकारे भारतात आलेल्या इतर संस्कृतींचे पण भारतीय संस्कृतीत सामीलीकरण होऊन आताची हिंदु संस्कृती तयार झाली.
हिंदूधर्माला एकच संस्थापक नसून, अनेक विचार ,तत्व आणि चालीरीतने हिंदू धर्म बनला आहे.हिंदु नाव सिंधू ह्या नावावरून आले.सिंधू नावाचा मुळ इराणी भाषेतील अपभ्रंश म्हणजे हिंदु .पर्शियन भाषेतील 'दरायस'च्या कालावधीतील कोरीव लेखात हिंदु हा शब्द भौगोलिक भागाकरीता वापरला आहे.झोरेसट्रीयन धर्मातील 'अव्हेस्टा' या धार्मिक ग्रंथात हिंदु शब्दाचा उल्लेख आहे.पुर्वी हिंदुधर्माला आर्य धर्म व जिथे हिंदु राहतात त्या भुभागाला आर्य देश असे संबोधिले जात असे .वैदिक धर्म म्हणजे ज्या धर्मात वेद मानले जातात तो धर्म. सनातन धर्म म्हणजे प्राचीन धर्म. यात खरेतर जैन व बौद्ध धर्म सुद्धा येऊ शकतात,परन्तू आता कर्मठ हिंदुं कडून त्या शब्दावर मक्तेदारी स्थापित केली गेली आहे.पं.नेहरूंच्या मते भारतीय संस्कृती व हिंदु संस्कृती वेगवेगळी आहेत.भारतात अनेक धर्मानी प्रस्थान ठेवल्यामुळे हिंदु संस्कृती भारतीय संस्कृती पेक्षा वेगळी झाली आहे.हिंदु संस्कृती म्हणजे अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती.हिंदुस्तानीला योग्य शब्द म्हणजे हिंदी .हिंदी अथवा हिंद या शब्दाचा हिंदु धर्माशी संबंध नाही.हिंदुस्तानातील सर्व जण हिंदी आहेत.हिंदी संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशक व समन्वय साधणारी संस्कृती.
वेदांची रचना कदाचित ख्रिस्तपूर्व दोन हजार ते दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी झाली असावी.संपूर्ण वेद ख्रिस्तपूर्व पंधराशे ते बाराशे वर्षापर्यंत रचून पुर्ण झाले.पहिला वेद ऋग्वेद होय.प्रथमतःईरान मध्ये 'अव्हेस्टा' लिहीले गेले. दोन्ही महाकाव्यातील भाषाशैलीत खूपच साम्य आहे.अशा महाकाव्यावर,जी ऋषीमुनींनी साक्षात्कारी मानली आहेत,टीका तरी कशी करावी याबाबत पं.नेहरूंना शंका होती.ती मानवांनीच सांगितली आहेत हे गृहीत धरूनच,त्यावर भाष्य करणे त्यांना योग्य वाटले.जरी धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करण्यात पं.नेहरूंना फारशी रुची नव्ह्ती, तरी त्यांच्याविषयी अज्ञानी राहणे सुद्धा त्यांना उचित वाटत नव्हते.त्या पुस्तकातील संदेश एक देवाज्ञा मानण्याची त्यांची तयारी नव्हती.त्यातील संदेश मानवी मनातूनच प्रकट झाला आहे असे ते मानत असत,व स्वतःच्या सद्वीवेकबूद्धीनुसार त्यचे पालन करत. पुराणांतून सुद्धा कसले धडे शिकायला मिळतील ह्याचा पं.नेहरू विचार करित असत .
हिंदूंच्या मते वेद साक्षात्कारी धार्मिक ग्रंथ आहेत ,ह्याच्याशी पं.नेहरू सहमत नाहीत. त्यांच्या मते ते अत्यंत प्रगल्भ व सुंदर मनांचा एक अविष्कार आहे.प्रथमतः वेदांत मुर्ती पूजा सांगितली नव्हती.हळूहळू ईश्वर ही कल्पना वेदांमध्ये रुजू झाली.नंतर अद्वैत वाद आला.सर्वात शेवटी उपनिषदात वेदांताचा प्रसार झाला.वेद हा शब्द विद् अथवा ज्ञान ह्या शब्दापासून तयार झाला आहे.सुरवातीला एकच ग्रंथ असावा.नंतर सोयीनुसार त्याचे चार भाग पाडले.
ऋग्वेद जगातील सर्वांत प्राचीन लिखाण समजले जाते.त्यात पृथ्वीविषयी व देवतांच्या आवाहना विषयी मंत्र आहेत.
यजुर्वेदात यज्ञाचे विधी व मंत्र सांगीतलेआहेत. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान सांगीतले आहे.
सामवेदात संगीत, इतर कलांचे वर्णन व उपासना सांगितली आहे.
अथर्ववेदात जादू,चमत्कार व रहस्यमय विद्यांचे मंत्र आहेत,त्याचप्रमाणे आयुर्वेदाची माहीती आहे.
वरील उगमापासून भारतीय विचार, तत्वज्ञान, जीवनशैली संस्कृती ,साहीत्य यांची गंगा देशात पसरली.अनेक संकटातून आणि विलंबनातून सुद्धा ही गंगा वाहत राहीली.पं.नेहरू हे लिहीत असताना दुसरे महायुद्ध चालु होते आणि त्यातील विध्वंसामुळे कदाचीत जगातील संस्कृतींवर विपरीत परिणाम होईल याची कदर त्यांना होती.पूर्वी आपण किती उच्च होतो ,अशा स्वप्नात मश्गुल राहणे ,त्यांना पसंत नव्हते.त्याचप्रमाणे विकसीतपणात जरी आपण जगाच्या पाठीमागे असलो तरी अध्यात्मात उच्च आहोत,ह्या समजूतीवर समाधानी राहणे पण त्यांनाआवडत नसे.त्यामूळे भारतीय अव्यवहारी आहेत अशी इतरांची समजूत होत असे.
जशीजशी संस्कृती विकसीत होते तशी ती आत्मचिंतनाकडे वळत असते.त्या संस्कृतीला,बाह्यजीवना एव्हढीच आंतरिक जीवनाची पण ओढ असते.ह्या दोघांत वेदांमध्ये समन्वय साधला आहे.
सुरुवातीस बाह्यजीवना विषयी ,सौंदर्यावर, रसरशीतपणे, देवाचं गुणगान गात पुढे जाणारे वेदात ,नंतर ,जीवनाच्या पलीकडे काय आहे?याचे कुतुहल वाटून, ते बघण्याचा प्रयत्न केला आहे. एका स्थितप्रज्ञाप्रमाणे विरक्त राहून जीवन आणि जग काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला आहे.दृष्टीसमोरील व दृष्टीपलीकडील सृष्टीत समन्वय आणण्याचा प्रयत्न केला आहे.जरी बाहेरील जगाला भारतीय संस्कृती नकारात्मक वाटत असली तरी खरोखरीची ती सकारात्मक आहे.भारतीय इतिहासात काही काळ,जसे बौद्ध अथवा जैन काळात,नकारात्मक प्रवृत्तींचा पगडा होता,याचे कारण परकीयांकडून झालेले जुलूम व गरीबी असु शकेल .बौध्द धर्मात निर्वाण प्राप्तिकरीता सर्वस्वाचा त्याग करण्याची जरुरी नसते.भौतिक जगाच्या संपूर्ण आहारी न जाता ,आध्यात्मिक जगात विहार करण्याची भारतीय विचार धारा होती.भारतीय विचार धारेला सत्याची ओढ होती.आध्यात्म ,हा हिंदु संस्कृतीचा अविभाज्य भाग होता.आध्यात्म फक्त तत्वज्ञानींचा मक्ता नसून, जनमानसात प्रचलित होते.भौतिक जगात राहून, आध्यात्मिक जगात कसे वावरावे हे जनतेला माहीत होते,व ते भारतीय संस्कृतीचे एक गुणवैषिष्ठ होते
आर्यांच्या हिंदुस्थानात येण्यापासून जाती व्यवस्था सुरू झाली असे पं.नेहरूंचे मत होते.परन्तु आर्य येण्याच्या अगोदरपासून सिंध खोरे संस्कृती ही एक प्रगत संस्कृती अस्तित्वात होती व आर्यानी त्यावर आक्रमण करून त्यांना पादाक्रांत करण्याची शक्यता कमी होती.कदाचित आर्य आक्रमण न करता,स्थलांतर करून सिंधू खोर्यात आले असावेत,व तेथील संस्कृतीत मिसळून गेले असावेत. सिंधू खोरे संस्कृतींच्या भाषेचा अर्थ लावण्यात अजून यश न आल्यामुळे,त्या संस्कृतीविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे.
पं.नेहरूंच्या मते आर्य समाज जास्त प्रगत असल्याने त्यांनी सिंधू खोरे संस्कृतींवर विजय मिळवला आणि जेता व पराजित अशी समाजाची फाळणी झाली.त्याचबरोबर त्या दुभंगात मागासवर्गीय व वनवासी सुद्धा होते.जेत्यांनी, पराजिताचे उच्चाटन करण्याऐवजी, त्यांना जास्त जातीवर्णात बाजुला सारले.आर्य मूलतः मशागत करणारे होते.ते ब्राह्मण, वैश्य, व क्षत्रिय या वर्णात विभागले गेले.ईतर,शूद्र म्हणुन समजले गेले.हा जातीवर्ण सर्वसाधारणपणे व्यवसाय अथवा कामधंदा यावर अवलंबुन असे.एका जातीतून दुसर्या जातीत आपल्या पात्रातेनुसार प्रवेश करता येत असे.
हिंदू तत्त्वज्ञानात मानवी जीवन सुद्धा चार भागात विभागले गेले आहे.त्यांना आश्रम असे म्हणतात. आश्रम म्हणजे स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचे वसती अथवा आश्रयस्थान. हे चार आश्रम म्हणजे ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम असे आहेत.
ब्रम्हचर्याश्रम, मुंजीनंतर चालु होतो.यामध्ये ती व्यक्ती गुरुकुलात गूरूकडे शिक्षणाकरता जाते.त्यावेळेस कडक ब्रम्हचर्या पाळावयाची असते.बारा वर्षं या आश्रमात राहून व गुरूदक्षिणा देऊन ती व्यक्ति आश्रमाच्या बाहेर येते.
गृहस्थाश्रमात व्यक्तीने संसारसुख उपभोगायचे असते व संसारात राहून ,अर्थ गोळा करुन ,समाज व कुटुंबीयांविषयीची कर्तव्ये पार पाडावयाची असतात .
वयाच्या पन्नाशी पुढे संसार आपल्या मुलांवर सोपवून वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावयाचा असतो.वनात जाऊन सर्व सुखांचा त्याग करुन, ईश्वर चिंतनात संन्यासाश्रमाची तयारी करावयाची असते.
संन्यासाश्रमात ,वैराग्य प्राप्त करून मोक्षाकडे वाटचाल करावयाची असते.
हिंदूतत्वज्ञानात अशाप्रकारे ऐहिक व पारलौकिक जीवनाची सांगड घालण्यात आली आहे. यामध्येसुद्धा जाती धर्म आलाच. ब्राह्मण चारही आश्रम पाळू शकतात,क्षत्रिय पहिले तीन, वैश्य पहिले दोन, शूद्र व स्त्रीया फक्त गृहस्थाश्रमात रहात असत .स्मृतींपूर्वी स्त्रियांना ब्रम्हचर्याश्रम व वानप्रस्थाश्रमात जाण्याची मुभा असावी.भारतीय संस्कृतीत विद्यार्जनाला खूप महत्त्व होते. हे काम समाजांतील विचारवंताना व तत्वज्ञानींचा देण्यात आले होते.त्यांतून ब्राह्मण व ऋषिमुनी हा समाज निर्माण झाला.क्षत्रियांना समाजाचे रक्षण व राज्य करण्याचे काम दिले गेले. वैश्य,व्यापार व धनार्जन करीत असत.शूद्र त्यावेळची अकुशल कामे करीत असत.हा वर्णभेद थोड्याफार प्रमाणात व निराळ्या स्वरूपात इतर धर्मात सुद्धा होता.भारतीय संस्कृतीत, माणसांच्या कर्मानुसार आणि कर्तव्यपूर्तीने , त्याला समाजात अधिकार प्राप्त होत असत.
रो. भाग्यश्री ओगले
- ॲन स्नेहा आणि पी ई रो. संजीव ओगले यांची कन्या.
- मरीन इंजिनिअरिंगमध्ये बी एस.
- प्रारंभिक शिक्षण: St. Anne's हायस्कूल आणि गरवारे महाविद्यालय.
- अनेक शिष्यवृत्ती परीक्षा पास.
- २०१४ मध्ये एम ई ओ क्लास फोर पास झालेली सर्वात लहान महिला अधिकारी म्हणून डी जी शिपिंगतर्फे शिष्यवृत्ती.
- सध्या ॲडिशनल फर्स्ट इंजिनिअर म्हणून कार्यरत.
- संगीत, नाटक, वाचन, क्रीडा, पर्यटन, साहसी मोहीम यात रुची.
- ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन मधून स्पीच अँड ड्रामा परिक्षा उत्तीर्ण.
- आपल्या रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ गोल्डची सदस्य
सोया दूध कार्यशाळा क्रमांक १२
३० डिसेंबर २०२१
मार्गासनी, ता. वेल्हे याठिकाणी दि. ३० डिसेंबरला सोयादूध प्रशिक्षण देण्यात आले.
विशेष म्हणजे, यासाठी श्री. रणजीत पालसाहेब स्वतः आले होते. त्यांनी प्रशिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी तेथे जमलेल्या प्रशिक्षणार्थी थेट महिलांशी संवाद साधला.
त्याचवेळी ज्ञान प्रबोधिनीच्या सौ सुवर्णाताई गोखले सुद्धा तेथे आल्या होत्या. त्यांची व पालसाहेबांची चर्चा झाली आणि त्यानंतर असे ठरले की, कुपोषण लढा देण्याबरोबरच ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही उद्देश या प्रकल्पात समाविष्ट करावा.
.
त्यानुसार पुढील वाटचाल सुरू राहील.
या प्रशिक्षणाचे आयोजन रो. रवींद्र प्रभुणे यांनी केले होते आणि पी.पी. रो. सुधांशु गोरे यांच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशिक्षित महिला सौ. सविता वालगुडे यांनी शिकविले.
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे....
रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचर आयोजित पुस्तकदानाच्या कार्यक्रमांना रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे सदस्य आणि लिटरेचर सॅटेलाईट क्लबचे मेंटॉर रो. योगेंद्र नातू तसंच रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे पीपी रो. मुकुंद चिपळूणकर आणि पीपी रो. मिलिंद घैसास उपस्थित होते. लिटरेचर सॅटेलाईट क्लबच्या सदस्य रो. तृप्ती कुलकर्णी, रो. कादंबरी सहस्रबुद्धे आणि चेअर रो. उल्का पासलकर यांनी पुस्तकं ग्रंथालयांपर्यंत पोहोचवली. २० आणि २४ डिसेंबर २०२१ या दिवशी आणि १५ जानेवारी २०२२ या दिवशी पुस्तकदानाचे हे कार्यक्रम 'पुस्तकाश्रम' या प्रकल्पांतर्गत झाले.
'पुस्तकाश्रम' हा लिटरेचर सॅटेलाईट क्लबचा प्रकल्प पुस्तकांच्या जगण्याला खराखुरा अर्थ देतो.
आपल्याला कुणीतरी प्रेमानी स्पर्श करावा, आपल्याला हातात घ्यावं, चाळावं, न्याहाळावं, आपल्याशी हितगूज करत आपल्याला समजून घ्यावं ही कोणत्याही निर्मितीची सहज अपेक्षा असते... मग ती निर्मिती आभाळातल्या बापाची असू दे... नाहीतर जमिनीवरल्या त्याच्या लेकराची....
आपल्या पुस्तकांची काळजी आपल्या माणसांइतकीच घेणारी, करणारी मंडळी पुस्तकांच्या जगण्याचं इंगित ओळखून योग्य घटिकेला त्यांची पाठवणी करतात, त्यांची घटका भरण्याची वेळा येईपर्यंत हातावर हात ठेवून बसून राहत नाहीत याचा प्रत्यय सुदर्शन नातू, प्राजक्ता कोळपकर, योगेंद्र आणि मोहिनी नातू, अरविंद नातू, माधवी देशपांडे, विवेकानंद केंद्र या दात्यांकडून मिळालेल्या पुस्तकांनी दिला.
पुस्तकांचा खरा उपयोग ओळखून ती शाळेत मुलांच्या सहज हाताला लागतील, नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवण्याची कल्पना राबवणार्या... जी. आर.पालकर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी आणि हवं ते पुस्तक हवं त्या वेळी विद्यार्थिशिक्षकांना उपलब्ध झालं पाहिजे या हेतूनी काम करणार्या... रामचंद्र राठी विद्यालयाच्या ग्रंथपाल सुजाता पेंढारकर आणि मुख्याध्यापिका मधुरा मोने यांच्या हाती पुस्तकं देताना झालेला आनंद हा प्रकल्प किती गरजेचा आहे हे सांगून गेला तरी लिटरेचर क्लब हा फक्त दुवा आहे याची जाणीवही ठळक करून गेला.
पुस्तकं देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी आणि सर्व शिक्षकांशी झालेल्या गप्पा ऊर्जादायी होत्या.
पस्तीस वर्षांची परंपरा असलेलं विठ्ठल मंदिर वाचनालय, धनकवडी या वाचनालयाला काही पुस्तकं भेट दिली. या कार्यक्रमाला चित्तविहारी सोसायटीची जुनीजाणती मंडळी आवर्जून आली होती. मंदिराच्या आणि बागेच्या परिसरात असलेलं हे वाचनालय बघणं, वाचनालयाबद्दलचे आणि वाचनाविषयीचे कमिटी मेंबर्सचे अनुभव ऐकणं ही अनुभूती समृद्ध करणारी ठरली.
An Intellectual Feast
Our special weekly meeting was held on Sunday, 2nd January 2022 at IMA Hall, Tilak Road at 11.30 am.
We conferred the Honourary Membership of our club on Mr. Shriniwas Sohoni and our own ex-rotaractor Adhik Kadam. Shri Prataprao Pawar was the Chief Guest.
Mr. Shriniwas Sohoni can only be described as an epitome of refinement and grace. After getting educated from ivy league institutions like Doon School and St. Stephen's College, he had an outstanding career as a bureaucrat during which, he handled multiple important responsibilities, contributing to nation building. The pinnacle of his career was an appointment as an advisor to the President of Afganistan, at a crucial time when that nation was trying to rebuild itself after an extended period of anarchy, bloodshed and plunder.
With such hands on experience and unparalled insights into the Afgan problem, his speech on the same subject was a veritable feast for the discerning audience, curious to know more, in view of the recent developments.
Our understanding of international relations is generally preliminary and superficial, as commentators in the media also lack necessary insights to bring us up-to speed with the complex issues involved. International diplomacy is all about hard nosed pursuit of geo-political strategies that are solely driven by the self interest of players involved.
Afganistan has always been at the core of geo-strategic tug of war among the super powers, due to its unique geographical position on important trade routes like the Silk Route. Afganistan was the theatre where the 'great game' was played between Russia and the British Empire in the 19th century. In the 21st century, it has continuously been in the eye of storm since the twin towers were demolished by the Al-Quaida suicide planes.
It was pure joy to listen to Shri Sohoni peel layer after layer of this complex and envigorating story and lay threadbare for our understanding its many implications for the world and more particularly for India. It came as a shocking revelation when he explained how the British planned and engineered the creation of Pakistan because they wanted to use the west and east parts of that country to keep tabs on Soviet Union and China respectively !
His deep knowledge and understanding of the intricacies and nuances of the subject, coupled with his command over the language and brilliant delivery made listening to him, a truly memorable experience... like listening to a concert by Ravishankar or a symphony by Mozart ! His personality, intellect and charm cast such a spell on everyone present, that there was not a soul in the auditorium who didn't rue the fact that we couldn't give him more time. For me, the lasting impression was his love for Mother India that he wore so proudly on his sleeve and his genuine concern for the future of our country. Our club is indeed honored by inducting him as an honorary member.
Shri Adhik Kadam is our own and we are well aware of the humongous work he does in Kashmir, applying a healing touch to that strife-stricken state. He is already a part of Pune South family. By inducting him as an honorary member, we have merely formalized that relationship!
President Atul welcomed the guests in his customary style, PDG Arun Kudale spoke about the galaxy of our illustrious Honourary Members, PP Dr. Rajendra Gosavi anchored the programme with professional competence, PP Virendra Shah introduced Shri Sohoni, PP Abhijit Joag introduced Shri Pawar and PE Sanjeev proposed a vote of thanks. 'Manapatra' written and presented by PP Dr. Sudhanshu Gore aptly captured the rich, multifaceted personality and career of Shri Shrinivas Sohoni.
The meeting ended with a lovely lunch. It's a pity that due to Covid restrictions, only a limited number of our members could attend this marvelous programme, that was truly a feather in the cap of President Atul, PP Virendra and the entire team.
अरविंदाचे वेगळेच काही....हा एक आगळा वेगळा कार्यक्रम 10 जानेवारी रोजी क्लब मध्ये सादर झाला.
हरहुन्नरी कलाकार अरविंद माने यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आणि गोड गायनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले.
सुरवात 'पाणी ' या सुन्दर कवितेने झाली. 'ये शाम' गाणे , 'वेडेपणा' ही मराठी गझल , 'पाऊस ' कविता' यांनी रंगत आली. 'दिवाळी पदार्थ निवडणूक ' या सादरीकरणाने तर सर्वानाच हसू फुटले. कार्यक्रमाचा उच्च बिंदू हा 'माखनचोर' ही सूरदास यांची कथा होय.
पाहुण्यांचे स्वागत ॲन माधवी देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रो. सुभाष चौथाई यांनी केले
असा हा बहारदार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रोगॅम कमिटीचे आभार.
हा कार्यक्रम सर्वांच्या दीर्घ काळ लक्षात राहील.
दि. १७ जानेवारीची सभा ही पुणे साऊथ आणि सॅटेलाईट लिटरेचर क्लबची संयुक्त सभा होती. या सभेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम मार्फत "वाघाची गोष्ट" हे नाटक सादर करण्यात आले. शुभम साठे व विक्रांत धिवरे यांचा अभिनय व महेश खंदारे यांचे दिग्दर्शन होते.
या साप्ताहिक सभेत स्वागत सॅटेलाईट लिटरेचर क्लबच्या चेअर रो. उल्का पासलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲन ऋचा नांदुरकर यांनी केले.
कोविड परिस्थितीमुळे आपल्या सभासदांची काळजी घेत मर्यादित प्रत्यक्ष उपस्थिती व बाकी झूम मीटिंग वर असे या सभेचे स्वरूप ठेवण्यात आले.
युद्ध अगदी रंगात आलं आहे...
तोफांचे जोरदार आवाज, बंदुकांच्या एकामागे एक झडणाऱ्या फैरी, कुठे विव्हळण्याचा आर्त स्वर, कुठे उन्मादाचं हास्य... रणभूमी जणू पेटून उठली असावी असा कल्लोळ चालू आहे.
इतक्यातच बंदुकीतून सुटलेली गोळी एका सैनिकाचा वेध घेते. पाठोपाठ जोरजोराने विहळण्याचा, धाडकन जमिनीवर आपटल्याचा आवाज आज येतो.
क्षणार्धात अंधारून येतं. आणि आकाशाच्या अंगातही जणू युद्धाचा कैफ चढतो. जोरदार धुळीचे लोट उठतात, विजांचा गडगडाट चालू होतो, मुसळधार पाऊस... आणि पुढे...
पुढे काही नाही... केवळ अंधार... केवळ चाचपडणं... आणि जीव वाचवण्याची केविलवाणी धडपड...
रंगमंचावर खूप काही घडत असतं... आपण तनामनाने युद्धात प्रवेश केलेला असतो आणि अचानक सारं काही बदलतं आणि अनाहुतपणे आपण जखमी सैनिकाबरोबर पोहोत पोहोत एका गुहेच्या दाराशी येऊन थांबतो...
जीव वाचवण्यासाठी म्हणून तो जखमी सैनिक क्षणार्धात गुहेत प्रवेश करतो आणि मग सुरू होते एक अकल्पित गोष्ट... वाघाची गोष्ट
खरंतर वाघीणीची आणि तिच्या छाव्याची गोष्ट...
मंडळी, गोष्टीतलं जंगल हे भारतातलं नाही. या जंगलातला जखमी सैनिकही भारतीय नाही पण तरीही ही गोष्ट भाषा, प्रांत आणि देश याच्या पल्याड जाऊन आपल्याला विचार प्रवृत्त करते.
माणूस आणि वाघ, माणुसकी आणि पशुत्व या गोष्टींवर भाष्य करते. एक वेगळा सामाजिक लढा या नाटकातून आपल्याला पाहायला मिळतो. लोकशाही, हुकूमशाही जनतेची होणारी घुसमट, माणसांची संकुचित वृत्ती, स्वार्थीपणा अशा अनेक गोष्टी या नाटकातून समर्थपणे व्यक्त होतात.
देश- काल- सापेक्ष मानवी मनोवृत्तीचं अतिशय सुरेख दर्शन या नाटकातील केवळ तीन पात्रांच्या संवादातून घडत जातं. आणि एक गोष्ट लक्षात येते पशुंमधेही असे काही गुण असतात की ज्याचा मानवाने विचार करणे आवश्यक आहे. आता या गोष्टीतल्या वाघाबद्दलच बोलायचं झालं तर वाघ हा आपल्याकडे सामर्थ्याचं आणि शुरतेचं प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे चीनमध्येही वाघ हा शौर्य आणि स्वावलंबनाचं प्रतीक मानला जातो. त्यांच्यामते 'वाघ' आलेल्या संकटाला धीराने तोंड द्यायला शिकवतो तर 'वाघीण' स्वावलंबी व्हायला. ती आपल्याला काही नीतिमूल्यांचे धडे देते, परस्परांवरचा विश्वास, निरपेक्ष प्रेम यांची जाणीव करून देते.
अचानकपणे आपल्या गुहेत प्रगट झालेला माणूस, आपला शत्रू ठरेल हे माहित असूनसुद्धा ती संकटग्रस्त माणसाची कत्तल करत नाही. त्याचा गैरफायदा घेत नाही. उलट त्याला जगवते, वेदनामुक्त करते आणि नंतर त्याच्या सोबत त्याच्या लढ्यामध्ये त्याच्या बाजूने सहभागी होते.
अत्यंत हुकूमशाही, बेबंध अशा मानवी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाघासारखा शूरपणा, स्वावलंबीपणाच किती आवश्यक आहे, ते या नाट्यातून अधोरेखित होतं. क्रौर्य आणि नीतिमत्ता याबाबतीत वेळ पडली तर मनुष्य वाघासारख्या हिंसक पशूपेक्षाही किती नीचतम पातळी गाठू शकतो हे पाहून मान झुकते.
यातला एक प्रसंग अतिशय बोलका आहे. युद्धात स्वरक्षणासाठी वाघाचा वापर केल्यानंतर त्याच वाघाला कोंबड्यांच्या खुराड्यात कोंबड्याच्या जागी शोपीसासारखं ठेवतात तेव्हा वाघांच्या मनात चाललेली उलघाल, (मतलबी) मानवी हेतू नकळण्याची त्यांची अक्षमता मनाला स्पर्शून जाते.
हा वाघ आपल्याला मनुष्यत्वाची, स्वत्वाची जाणीव करून देतो म्हणूनच खूप महत्त्वाचा ठरतो. स्वार्थासाठी केला जाणारा लाळघोटेपणा, कृतघ्नपणा त्याला मान्य होत नाही. अखेरीस या सगळ्यातनं काय घडतं... वाघ बदलतो का माणूस बदलतो...सैनिक आणि वाघ यांच्यातलं मैत्र तुटत का... हे सारं जाणण्यासाठी हे नाटकच पाहायला हवं.
एक धीरगंभीर विषय हलक्याफुलक्या स्वरूपात मांडण्याचं दारियो फो या इटालियन नाटककाराचं कसब वाखाणण्याजोगं आहे. या नाटकामुळे दारियो फो यांनी त्यांच्या इतर नाटकातून सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यंगावर आपल्या उपहासात्मक शैलीतून बोट ठेवलं आहे तीदेखील नाटकं पाहण्याची इच्छा निर्माण होते.
तसंच विनोद लव्हेकर यासारख्या मालिकाविश्वात मातब्बर असणाऱ्या अनुवादकचा हा मराठी अनुवाद आपल्याला या नाटकाशी समरस व्हायला मदत करतो.
त्याचबरोबर महेश खंदारे यांसारख्या उत्साही दिग्दर्शकाने लॉकडाउनच्या काळात तयार केलेला नाटक दहाबायवीस हा नवीनफॉर्म आपल्याला नेपथ्याचीही एक वेगळीच उंची दाखवतो.
शुभम साठे, विक्रांत धिवरे आणि चिनाब यांसारखे कलाकार आपल्या अभिनयाद्वारे या नाटकाला जिवंतपण देतात. रंगमंचावर वावरणारी प्रत्यक्षातली दोन पात्रं आणि चिनाबनं काढलेली मुकाभिनय करणारी चित्रं ही या नाटकाची वैशिष्ट्यं म्हणावी लागतील. पडद्यावर जरी दोन पात्रं दिसत असली तरी ती दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व नसून एकाच माणसाची ती दोन रूपं आहेत आणि ती दोन स्वतंत्र कलाकारांनी उत्तमरित्या साकारली आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत हे नाटक सादर केलं गेलं. इतके वैविध्यपूर्ण विषय आणि कल्पना मांडण्याची संधी देणाऱ्या या विद्यालयाचं कौतुक करावं तेवढं थोडंच.
सर्वांनी आवर्जून पहावं असं नाटक...
आपल्या पुणे साउथ आणि सॅटॅलाइट लिटरेचर क्लबच्या सहाय्यानं हे नाटक पाहण्याची, त्याबद्दल व्यक्त होण्याची संधी मिळाली याबद्दल पुणे साउथ क्लबचे आवर्जून आभार.
२६ जानेवारीला साजरा होणारा आपला प्रजासत्ता दिन आणि बांगला देशाला १९७१ साली युद्ध करून स्वातंत्र्य मिळाले त्यांचे हे सुवर्ण जयंती वर्ष., ह्या घटनांना अनुसरुन, २४ जानेवारीला कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या वीरपत्नी श्रीमती अनुराधाताई ढवळे लाभल्या. त्यांच्याशी झालेल्या बातचिताचा कार्येक्रम अतिशय सुंदर, भावस्पर्शी झाला.
रो. मृदुला घोडकेनी त्यांच्याशी अगदी हळुवारपणे गप्पा मारत त्यांच्या अनोख्या जीवनाचा प्रवास उलगडत नेला. १९७१ च्या बांगलादेश - पाकिस्तान युद्धात अनुराधाताईंचे पती वैमानिक, विंगकमांडर ‘अशोक ढवळे’ ह्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी अनुराधाताई अवघ्या २३ वर्ष्याच्या होत्या. लग्न होऊन केवळ दोनच वर्ष झाली होती आणि त्यांना १ वर्षचा मुलगा होता. त्यांचे लहान वय व राजकारण, युद्ध ह्याची फारशी माहिती नव्हती. त्यात पतीच्या मृत्यूची आलेली बातमी वर त्यांचे मन सत्य मानायलाच तयार नव्हते. त्यांचे पती वरचे नितांत प्रेम आणि दुर्दम्य आशावाद ह्यामुळे आपले पती नक्की परत येतील ह्या आशेवर त्यांनी ३० वर्षे काढली. सतत सरकारकडे , पंतप्रधानांना कडे चीफ ऑफिसर्स कडे त्या त्यांचा शोध घेत होत्या. त्यावेळी त्यांना सरकार कडून मिळालेली मदत, मान खूप मोलाचा होता. केवळ २ वर्षच्या सहजीवनात, प्रत्येक दिवस कसा भरभरून जगायचा हे त्या पती कडून शिकल्या. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी अल्प आसल्या तरी त्यांच्यासाठी अनमोल होत्या. ३० वर्षा नंतर त्यांच्या घरात नातवाचे आगमन झाले. अगदी अशोकजींच्या जन्म तारखेच्या पुढच्याच दिवशी ! नातवाचे शब्द "Why Fear, I am here" हे त्यांना धीर देणारे होते.
अशोकजींच्या वीरगती नंतर त्यांनी खंबीरपणे मुलाला तर मोठे केलेच आणि त्याच बरोबर स्वतःचे शिक्षणही PhD पर्यंत पूर्ण केले. त्या प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ सेतू माधव पगडी ह्यांची कन्या असल्यामुळे त्यांना लहानपणा पासून साहित्य लेखन ह्याची माहिती होती. आणि पतिनिधनाचा झालेला दुर्देवी आघात ह्यामुळे ताईंचा कल अध्यात्म कडे वळला. त्यांना उत्कृष्ट गुरुही लाभले. त्यांची जीवनाची वाटचाल आता त्या दिशेनी चालू झाली. त्यांनी ४० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांनी भारतात आणि भारता बाहेर सुद्धा भगवद गीतेची लोकांना आवड लक्षात घेऊन भगवत गीतेचे मराठी आणि इंग्रजी भाषेत ओवी स्वरूपात भाषांतर केले. ज्ञानेश्वरीचा इंग्रजी भाषेत अनुवादही केला. आता त्यांचा चारही वेदांचा अनुवाद करण्याचा मानस आहे. त्यांचे 18 key sentences of 18 Bhagwat Geeta हा विषयही लोंकांपुढे सादर केला.
मनात सर्व कुटुंबाच्या प्रेमचा रंग, आणि पतीच्या अस्तित्वाचे वेगवेगळ्या रूपात अनुभव घेत व बुद्धीने ईश्वराचे रंग अनुभवत अजून बरेच काही करण्याचे त्यांच्या मनात आहे.
सांगता त्यांच्या हृदयस्पर्शी कवितेनी झाली. ही सगळी वाटचाल सांगताना त्या खूप भावुक होत होत्याच पण त्याच वेळी ऐकणारा श्रोतु वर्ग सुद्धा भावुक झाला.
स्व. विंग कमांडर अशोक ढवळे ह्यांना मानवंदना. तसेच अनुराधा ताईंनाही मानाचा मुजरा !!