Southern Star-January 2022


नवे वर्ष
नवे वर्ष अन् नवीन आशा
नव्या जाणिवा नवीन दिशा
नव चैतन्य अन् नव आचार
नवे तेज अन् नवीन करार

नव्या कल्पना नवीन दृष्टी
नवा साज ल्यालेली सृष्टी
आस मनाला नाविन्याची
आणिक नूतन सृजनतेची

नव विचारांचा पांघरून शेला
आला नूतन दिवस आला
नव विचारांचे स्वागत करूया
नाविन्याला अंगी रुजवूया

झाले गेले सरून गेले
सारेच ते आता विसरुया
नव्या क्षणा आपले म्हणुया
नव आव्हाना सामोरे जाऊया

रो. श्वेता करंदीकर

महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार

दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त पीपल्स आर्ट सेंटर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिना “महाराष्ट्राची गिरिशिखरे” हा पुरस्कार देण्यात आला. कर कायद्या संबंधी छोटे मध्यम व्यापारी याच्या समस्या सोडविणे आणि सामान्य कर दात्याला समजेल अश्या भाषेत मराठीतून कर कायद्या बद्दल प्रबोधन केल्याची नोंद घेत पुण्यातील कर सल्लागार आपले ज्येष्ठ सदस्य पीपी रो. गोविंद पटवर्धन यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

गोविंदरावांचे  यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

- रो. दत्ता पाषाणकर

पुस्तक भेट

पीपी रो. शामराव कुलकर्णी यांनी आपल्या क्लबच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल वाई येथे शालेय उपयोगी 51 पुस्त्त्कांचा संच दिला. ही सर्व पुस्तके रो.योगेंद्र नातू ह्यांनि दिलेली होती.

शामराव व योगेंद्र नातू यांचे आभार !

Congratulations Rtn. Mridula Ghodke

VOCATIONAL SERVICE

Vocational Service is the "Second Avenue of Service." No aspect of Rotary is more closely related to each member than a personal commitment to represent one's vocation or occupation to fellow Rotarians and to exemplify the characteristics of high ethical standards and the dignity of work. Programs of vocational service are those, which seek to improve business relations while improving the quality of trades, industry, commerce and the professions. Rotarians understand that each person makes a valuable contribution to a better society through daily activities in a business or profession. Vocational service is frequently demonstrated by offering young people career guidance, occupational information and assistance in making vocational choices. Some clubs sponsor high school career conferences. Many recognize the dignity of employment by honoring exemplary service of individuals working in their communities. The 4-Way Test and other ethical and laudable business philosophies are often promoted among young people entering the world of work. Vocational talks and discussion of business issues are also typical vocational service programs at most clubs. Regardless of the ways that vocational service is expressed, it is the banner by which Rotarians "recognize the worthiness of all useful occupations" and demonstrate a commitment to "high ethical standards in all businesses and professions." That's why the Second Avenue of Service is fundamental to every Rotary club.

For the past few years, several industries have leveraged the power of data science in marketing, risk management, fraud detection, business operations, supply chain, business model innovations, and many other such areas. By using statistics, predictive Modeling, and machine learning, data science helps enterprises resolve various challenges within the industrial sectors and for the economy at large.

Read More...

.

Dr. Prashant Pansare 

Founder & CEO - Inteliment Group & Rubiscape Pvt Ltd

D. Litt, Honorary (Honoris Causa) in Data Science & AI, from George Washington University, USA. A triple MBA and a Mechanical Engineer by qualification, Prashant is also pursuing Ph.D. in Innovation Incubation and Management.

Read More...

धनंजय जोशी लिखित 'सहज' या पुस्तकातील एक लेख...शीर्षक आहे "माकड मन"


ध्यानात मग्न असताना अचानक "घंटी"चा आवाज आला...दुपारच्या जेवणासाठी...!

ध्यानाच्या त्या अवस्थेमधून मी आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो.. माझं मन म्हणालं..,"काय विचित्र आहेस तू..! साक्षात्काराच्या जवळ होतास,पण जेवणासाठी उठलास लगेच.!!

मन कसं असतं, हे समजायला हवं..! अगदी माकडासारखं..!

माझ्या एका शिबिरातली आठवण--

Read More...

पं.जवाहरलाल नेहरूंनी अहमदनगर तुरूंगातल्या पाच महिन्यांच्या कालावधीत लिहिलेले पुस्तक डिस्कव्हरी ऑफ ईंडिया हेआहे.त्यावेळेस एकंदर परिस्थिती कशी होती हे प्रथम पाहूयात .

तुरूंगात त्यांच्या बरोबर अकरा कैदी होते.देशाच्या विभिन्न भागातून, निरनिराळया भाषीक प्रदेशातील, विभिन्न राजकीय विचारांचे, निरनिराळया विषयांवरील विद्वान तेथे एकत्र होते.मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत ,नरेंद्र देव,असफ अली,वगैरे मंडळींनी पं.नेहरूंना अनेक प्रकारे पुस्तक लिहिण्यास मदत केली.1944 सालांत एप्रिल ते डिसेंबर ह्या काळात हे पुस्तक लिहिले गेले.

Read More...

काही प्रश्नांची उत्तरं सहज आणि नेमकी सापडणं अवघड असतं. विशेषतः काही महत्त्वपूर्ण घटना सहजगत्या जुळून आलेल्या असतात तेव्हा... अपेक्षित घटना घडणं हे अशक्य कोटीतलं नसलं तरी त्या इतक्या सहजसाध्य होतील अशाही नसतात.

‘पुस्तकांना चेहरा देणारा माणूस’ या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी सरांशी अनौपचारिक गप्पा मारण्याचा जुळून आलेला भन्नाट योग हाही असाच विशेष. प्रबळ इच्छा होती तरीही हा योग असा इतक्या सहज जुळून येईल असं वाटलं नव्हतं.

Read More...

अरविंद माने

निवृत्त विक्रीकर उपायुक्त

रेकी ग्रँड मास्टर.

गायनाची आवड... गजाननराव वाटवे आणि यशवंत देव यांच्या कडून संगीताचे आणि सादरीकरणाचे धडे मिळाले.

मोहब्बत के तराने नावाने हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करतात. लिखाणाची आणि अभिनयाची  आवड

पत्नी रो अवलोकिता, सध्या फॅमिली प्लॅनिंग असोसिशनऑफ इंडियाच्या अध्यक्षा आहेत.

अनुराधा ढवळे

पूर्वाश्रमीच्या अनुराधा पगडी....

प्रसिद्ध इतिहासतज्ञ, पद्मभूषण सेतुमाधव पगडी आणि सौ उषाताई यांच्या कन्या.

१९७१च्या युद्धात त्यांचे पती विंग कमांडर अशोक ढवळे यांना वीरगती प्राप्त झाली.

अतिशय लहान वयात वीरपत्नी म्हणून आपल्या मुलाचं संगोपन करत त्यांनी आपलं शिक्षण Ph.d पर्यंत पूर्ण केलं.

आध्यात्माकडे कल असल्याने त्या विषयावर ४०पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली.

भगवत गीतेचं मराठी आणि इंग्रजी भाषेत ओवी रुपात भाषांतर.

ज्ञानेश्वरीचा इंग्रजी भाषेत अनुवाद.

चारही वेदांचा अनुवाद करण्याचा मानस... पैकी ऋग्वेदाच्या पहिल्या ९ मंडळांचे काम पूर्ण.

सोया मिल्क वर्कशॉप क्रमांक ८

१७ डिसेंबर २०२१

१७ डिसेंबर रोजी  आपण आपले सोया मिल्क वर्कशॉप आंबवणे जवळील आडवले या गावी घेतले. बचत गटाच्या सुमारे १५ महिला तेव्हा उपस्थित होत्या. कार्यशाळा अतिशय उत्तम झाली. सोयाबीन पासून दुध, दही,पनीर करण्याचे प्रशिक्षण त्यांना आपल्या गोरे सर यांनी दिले. कार्यक्रमानंतर आपण यांना मिक्सर व प्रेस विनामूल्य दिले.

कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र प्रभुणे यांनी केले होते. आपल्याकडून रो. मिलिंद क्षीरसागर व त्यांचे मित्र श्री पुरंदरे स्वतः जातीने उपस्थित होते. श्री.पुरंदरे यांची वेल्हा येथे जमीन असून तिथल्या आजूबाजूच्या बचत गटांमध्ये आपण हा कार्यक्रम राबवू असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सोया मिल्क वर्कशॉप क्रमांक ९

२० डिसेंबर २०२१

२० डिसेंबर रोजी आपली सोया दूध कार्यशाळा आस्कवाडी वेल्हा येथे पार पडली. गोरे सरांनी तिथल्या बचत गटातल्या महिलांना प्रशिक्षण दिले. सोया पासून दूध दही व पनीर कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक आज झाले. कार्यशाळेनंतर आपण त्यांना मिक्सर व प्रेस विना मूल्य दिला. कार्यक्रमाचे आयोजन रो. रविंद्रजी प्रभुणे यांनी केले.

रो. दत्ताजी देवधर आणि श्री. मोहन दड्डीकर (आपल्या क्लबच्या प्रकल्पात मदत करणारे अथश्रीवासी) पूर्ण वेळ सहभागी होते

पी. पी. रो. गोरे सर व रो. रविंद्रजी प्रभुणे यांच्या प्रयत्नांमुळे या आपल्या प्रकल्पाला आता उत्तम गती प्राप्त झाली आहे.त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !

सोया मिल्क वर्कशॉप क्रमांक १०

२१ डिसेंबर २०२१

२१ डिसेंबर रोजी आपली सोया दूध कार्यशाळा मेरावणे वेल्हा येथे पार पडली. गोरे सरांनी तिथल्या बचत गटातल्या महिलांना प्रशिक्षण दिले. सोया पासून दूध दही व पनीर कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक आज झाले. कार्यशाळेनंतर आपण त्यांना मिक्सर व प्रेस विना मूल्य दिला. कार्यक्रमाचे आयोजन रो. रविंद्रजी प्रभुणे यांनी केले.

या कार्यशाळेत करता आपले रो विनायक देशपांडे,  रो नितीन पाठक  व श्री पाटील हे उपस्थित होते.

अंतर रोटरी एकांकिका स्पर्धा

१३ डिसेंबर २०२१

अंतर रोटरी एकांकिका स्पर्धेमध्ये आपल्या क्लबची “सांत्वन” ही एकांकिका १३ डिसेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे सादर झाली.

एकांकिका खूपच सुंदर झाली. सर्व कलाकार ॲन रिया अंबिके, ॲन गौरी क्षीरसागर व रो.अभिजित देशपांडे यांनी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत होती. तिघांनीही काम सुरेख व समरसून केले. आशुतोष व प्रिया नेरलेकर यांनी दिग्दर्शन उत्तम केले. पडद्याच्या मागील कामात  रो. आनंद कुलकर्णी, रो. योगेश नांदुरकर, सुभाष करंदीकर, ॲन माधवी देशपांडे व रो. किरण वेलणकर यांनी बरीच धावपळ केली. नाटकाचे व्हिडिओ चित्रीकरण हे रो. संदीप अवधानी याने केले.

या एकांकिके करीता आपल्या क्लबच्या सभासदांची उपस्थिती उत्तम होती. सुमारे ३५ सदस्य जातीने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर कलाकारांचे आगमन झाल्यावर सर्व सदस्यांनी जोरदार जल्लोष केला.

पडद्या पुढील, पडद्यामागील सर्व कलाकारांचे तसेच त्यांना प्रोत्साहन द्यायला आलेल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

"सांत्वन" या नाटकाचे रेकॉर्डिंग आपण या लिंकवर पाहू शकता:
https://youtu.be/CCYb7qaVuYo

रोटरी युवा क्रिकेट स्पर्धा

१८ डिसेंबर २०२१

१८ व १९ डिसेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे युवा यांच्या तर्फे रोटरी युवा क्रिकेट स्पर्धा कमिन्स कॉलेज मागे डर्बी येथे आयोजित केली होती.

आपल्या क्लब तर्फे रो. ऋषिकेश बडवे, रो. निरंजन ठाणगावकर,  रो. मिलिंद व ॲन गौरी क्षीरसागर, रो. रश्मी परुळकर, रो. जितेंद्र महाजन, रोट्रॅक्टर आकाश व स्वतः प्रे. अतुल अत्रे यांनी भाग घेतला होता.

सकाळपासून आपल्या चार मॅचेस झाल्या.त्यातल्या पहिल्या दोन मॅचेस मध्ये आपल्याला निसटता पराभव पत्करावा लागला. मग सर्वजण पेटून उठले आणि उरलेल्या दोन्ही मॅचेस आपण जबरदस्त झुंजीने जिंकल्या. सेमी फायनलला आपली एंट्री निश्चित होती परंतु अत्यंत थोड्याशा फरकामुळे आपण सेमी फायनल ला जाण्याकरता पात्र झालो नाही. परंतु सकाळपासून संध्याकाळी ७ पर्यंत सर्वजण अक्षरश: उत्साहाने भारून मॅचेस खेळत होते. रश्मीचा मुलगा शर्व हा सुद्धा दिवसभर उपस्थित होता व त्याने खूप मदत केली. रोट्रॅक्टर आकाशने मैदानावर तर कमाल केलीच पण आपल्या वागणुकीमुळे सगळ्यांची मनं त्याने जिंकून घेतली.

 या स्पर्धेकरता ऋषिकेश बडवे याने खूप परिश्रम घेतले. स्पर्धेच्या आधी दोन दिवस त्याने डर्बी बुक करून सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतली. आपल्या संघाचे नेतृत्व सुद्धा त्यानेच केले.

या स्पर्धेत रो. रश्मी परुळकर हिने सुरुवातीलाच २ विकेट्स घेतल्या व दमदार सुरुवात केली.

रो. रश्मी परुळकर व ॲन गौरी क्षीरसागर यांना वूमन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.  दोघींचे अभिनंदन !!

लिटरेचर सॅटेलाईट क्लब-पुस्तकाश्रम

२० डिसेंबर २०२१

२० डिसेंबर २०२१ रोजी कर्वेनगर इथल्या जी आर पालकर प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय - या शाळेच्या ग्रंथालयाला लिटरेचर सॅटेलाईट क्लबतर्फे  'पुस्तकाश्रम' योजनेअंतर्गत मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी काही पुस्तकं दिली.

'पुस्तकाश्रम' योजनेअंतर्गत झालेल्या पहिल्याच पुस्तकदानाबद्दल तुम्ही जे कौतुक करताय... ते ऊर्जादायी आणि उत्साह वाढवणारं आहे.

तुमच्यातल्या काही दात्यांनी दिलेल्या पुस्तकांच्या रूपानं खाद्य पुरवल्यामुळं प्रकल्प बाळसं धरतोय.

तुमच्या माहितीतल्या एखाद्या ग्रंथालयाला आपण पुस्तकं देऊ या... असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला किंवा रो. प्राजक्ता कोळपकर यांना नक्की कळवा.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद! 🌿

लिटरेचर सॅटेलाईट क्लब-पुस्तकाश्रम

२४ डिसेंबर २०२१

२४ डिसेंबर २०२१ रोजी  लॉ कॉलेज रस्त्यावर असलेल्या रामचंद्र राठी विद्यालय - या शाळेच्या ग्रंथालयाला लिटरेचर सॅटेलाईट क्लबतर्फे  'पुस्तकाश्रम' योजनेअंतर्गत मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी काही पुस्तकं दिली.

या वेळी मेट्रो रोटरी क्लबचे पीपी रो. मुकुंद चिपळूणकर आणि पीपी रो. मिलिंद घैसास हजर होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा मोने आणि ग्रंथपाल सुजाता पेंढारकर यांच्याकडे पुस्तकं सुपुर्त करण्यात आली.

e-Waste Collection Drive-RSCP South Gold

19 Dec 2021

On 19th Dec Rotary Satellite Club Of Pune South Gold conducted its monthly E-Waste Collection Drive at Belvedere Society, Aundh. This is the 3rd drive conducted by the club.

This drive coincided with the Mega E-Waste Collection Drive organised by Team Environment RID 3131 in association with FICCI and Swach. Many collection points for the e-waste were set up all over Pune and PCMC area.

e-Waste collected during the drive was around 40 kg.

The e-waste collected in the drive was  handed the collection center at Friends Electronics, Aundh (Associated with RCP Baner)

Rtn. Shilpa Pande, Rtn. Bahar Tepan, Rtn. Bhagyashree Ogale, Rtn. Sapna Dabholkar, Rtn. Sonali Belhekar, Rtn. Gaurav Agarwal, Rtn. Neha Deshpande, Rtn. Akshay Kirpekar, Club Secretary Rtn. Aditi Kirpekar and Club Chair Rtn. Onkar Joshi were present.

Thanks to all dignitaries of society for participating in the noble cause.

Don't throw E-Waste in #garbage.

#Save #Environment by recycling it properly.

ReUse, ReCycle, Reduce and Refuse

ही साप्ताहिक सभा खास रोटरी फाउंडेशन महिन्यानिमित्त आयोजित केली होती.  प्रमुख पाहुणे होते पी.डी.जी. रो. मोहन पालेशा. सभेची सुरुवात औपचारिक उदघोषणांनी झाली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर या फाउंडेशन महिन्यात आपल्या क्लब मधील १६ सदस्यांनी रोटरी फाउंडेशनला भरघोस योगदान देऊन क्लबची प्रतिष्ठा उंचावण्यास मदत केली.

Read More...

तसे तर आपल्या रोटरी मध्ये अनेकविध कार्यक्रम होत असतात. असाच एक खूप चांगला विषय ०६/१२/२०२१ रोजी झालेल्या weekly meeting मधील कार्यक्रमात मांडला गेला.

विषय होता "ज्योतिषशास्त्र आणि रुढींमागचे विज्ञान" या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला सौ. उर्मिला शेजवलकर यांसारख्या वक्त्या लाभल्या होत्या.

Read More...

१३ डिसेंबरची सभा ही ख्रिसमस विशेष सभा होती. ज्येष्ठ सभासद दादासाहेब बेंद्रे आणि जयश्रीताई बेंद्रे तसंच अनिल लोखंडे आणि शुभदा लोखंडे यांचा पुणे साऊथ मधील त्यांच्या आजीवन योगदाना करीता विशेष सन्मान करण्यात आला. केक कापून हा क्षण साजरा केला गेला. क्लबमधल्या त्यांच्या योगदानाचा लेखाजोखा मांडणारं मनोगत पीडीजी रो. अरुण कुदळे यांनी व्यक्त केलं.

Read More...

२० डिसेंबर रोजी झालेल्या साप्ताहिक सभेत सुरुवातीला या वर्षी एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन “सांत्वन” नाटकात सहभागी झालेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. ॲन गौरी क्षीरसागर यांना उत्तम अभिनयाचं आणि ॲन माधवी देशपांडे यांना उत्तम पार्श्वसंगीताचं बक्षीस मिळाल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं आणि “सांत्वन” टीमचं कौतुक केलं. ॲन प्रियदर्शिनी अंबिके आणि रो. अभिजित देशपांडे यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली.

Read More...

२७ डिसेंबर रोजी आपल्या क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. क्लबचे ज्येष्ठ सदस्य पी. पी. रो. गोविंदराव पटवर्धन यांना नुकताच राज्यपालांच्या हस्ते  पुरस्कार देण्यात आला. सभेची सुरुवात गोविंदरावांचा सत्कार करून करण्यात आली.

Read More...