मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २६ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या डिस्ट्रीक्ट तर्फे बी व्ही राव सभागृह, डेक्कन क्लब येथे मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ करण्यात आला. या समारंभा करता आपला क्लब सुद्धा होस्ट होता.
प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम साहित्यिक मिलिंद जोशी उपस्थित होते. त्याच बरोबर आपले डी. जी. रो. पंकज शहा, पी.डी.जी. रो. दीपक शिकारपूर, रो. सुधीर राशिंकर व श्री राजीव बर्वे संचालक दिलिपराज प्रकाशन हे उपस्थित होते.
आपल्या क्लबच्या पी.पी.रो. अभिजित जोग, ॳॅन डॉ. गीतांजली पुरोहित व ॳॅन मोहिनी नातू यांना पुरस्कार देण्यात आले. सर्वांचे खूप खूप अभिनंदन !!
नमस्कार मंडळी, आजच्या पूर्णांगिनी सदरात आपली भेट होणार आहे ॲन अंजली देवधर यांच्याशी. मनमोकळ्या स्वभावाच्या अंजली ताईंनी माझ्याशी ज्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या तशाच तुमच्या पुढे मी मांडत आहे.
माधवी: अंजली ताई तुमची आयुष्याच्या सुरुवातीची , पायाभरणीची वर्ष कशी होती ?
अंजलीताई: मी पूर्वाश्रमीची अंजली गोविंद वर्तक. माझे जन्मस्थान मुंबई (दादर).(रुपारेल काँलेज मध्ये फिलॉसॉफी घेऊन शिकत असतानाच माझे लग्न ठरले. लग्नानंतर मी परिक्षा दिली. गंमत म्हणजे फायनल परीक्षेच्या आदल्या दिवशी लग्न झाले. )
माझे मूळ गाव कोकणात केळशी.वडील धरून आठ भावंडे घरातील. परिस्थिती बेताचीच. परिस्थिती मुळे वडिलांना वयाच्या १२व्या वर्षीच घर सोडावे लागले व घर चलवण्या करता अतिशय हालपेष्टा सहन कराव्या लागल्या. घर सोडून चुलत काकांकडे राहून पडतील ती सर्व कामे त्यांनी केली व दूध घालण्याचा व्यवसाय केला. एकिकडे शिक्षण सुरू होते. बहिणींची लग्न, घरी पैसे पाठवणे, भावंडांची शिक्षणे करून त्यांना मार्गी लावून त्यांचा संसार उभा करून दिला. लहानपणापासून हे मी सर्व ऐकत, पहात होते. घरातील संस्कार मला भविष्यात खूप उपयोगी आले. आमची घरची परिस्थिती बेताचीच होती. एखाद दिवशी मी वडिलांना येताना खाऊ आणा म्हटले तर आई माझी समजूत घालायची म्हणायची, अप्पा (माझे वडील) आल्यावर खाऊ आणला का?असे विचारु नकोस. आणला असेल तर ते तुला नक्कीच देतील पण (पैश्यांअभावी) त्यांनी खाऊ आणला नसेल तर तू विचारलेस तर त्यांना वाईट वाटेल. तेव्हापासून समंजसपणा माझ्या अंगवळणी पडला.
घरातील बिकट परिस्थिती मुळे आईला नोकरी करावी लागली. आई उत्तम शिक्षिका होती. ३३ वर्ष तिने नोकरी केली. सायन्स, गणित व मराठी हे विषय ती शिकवत असे.
माधवी:: तुमच्या मृदू आणि समंजस स्वभावाचा उगम आता आम्हाला कळला. पण कठीण परिस्थितीमुळे तुम्ही स्वभावात कडवटपणा येऊ दिला नाही, याकरता तुमचे विशेष कौतुक! मग लग्नानंतरचे विश्व कसे होते?
अंजलिताई: रुपारेल कॉलेज मध्ये फिलॉसॉफी घेऊन शिकत असतानाच माझे लग्न ठरले. गंमत म्हणजे फायनल परीक्षेच्या आदल्या दिवशी लग्न झाले. माझे लग्न झाले तेंव्हा माहेरचे रुटीन व सासरचे रुटीन ह्यात खूपच तफावत होती. माहेरी आम्ही तिघेच. मोठा भाऊ पुण्यास टेल्को कंपनीत होता. आम्ही तिघेही भल्या पहाटे ऊठून आवरुन सकाळी ७ ला घराबाहेर पडत असू, रात्री लवकर जेवण करून साडेआठला गुडूप झोपेत असू. त्या उलट देवधरांकडे परिस्थिती होती. व्यवसायामुळे पाहुण्यांचा सतत राबता असे, ते पण रात्री जेवायला, अचानक तर बरेच वेळा येत असत. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक असायचा. रोज जेवायला ऊशीर. संध्याकाळी ७वाजले की मला भूक लागायची व झोप यायची. भिडस्त स्वभाव, नवीन लग्न झालेले, सांगायचे कसे ? पण हळूहळू हळूहळू तेही अंगवळणी पडले.
हे मला एकदा म्हणाले आपण आज फिरायला जाऊ. संध्याकाळी मी आवरुन तयार होऊन बसले तेव्हा हे म्हणाले, जाता जाता जनसेवेत (आमचे हॉटेल) डोकावून जाऊया व आम्ही जनसेवेत गेलो, गर्दी होती, १० मिनिटे झाली तरी हे बाहेर येईनात म्हणून मी आत गेले तेव्हा मला हे सुई वर (मोठी, पातळ लोखंडी काडी) फुलके पलटताना दिसले, मीही पदर खोचून फुलक्यांना तूप लावायला बसले. मला ह्यांचे तेंव्हा भारी कौतुक वाटले. आयुष्यात कुठल्याही कामाची लाज बाळगता कामा नये, व्यवसायात पूर्ण शिस्त व सचोटी हे किती महत्त्वाच्या आहे ते कळून चुकले. आम्ही त्या वेळी बाहेर जाऊ शकलो नाही पण मला आईकडून समंजसपणाचे घेतलेले धडे इथे कामी आले. आमच्या जाऊबाईंनीही मला हेच सांगितले होते की असे प्रसंग धंद्यात येतच असतात तर मन खट्टू होऊ द्यायचे नाही. मला देवधरांकडे येऊन खूप शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. आमच्या दिरांनी आम्हांला सांगितले होते, धंदा म्हटल्यावर घरातील सर्वांचा सहभाग असलाच पाहिजे. एखाद वेळेस नोकर वर्गाने संप केला किंवा आचारी आजारी पडला तर तिथे उभे राहून स्वयंपाक करता आला पाहिजे आणि मी व माझ्या जाऊबाईंनी वेळा वाटून घेऊन तो केला ही. त्या सकाळी व मी संध्याकाळी तेव्हा स्वयंपाक करण्यास जनसेवेत जात असू.
माधवी: म्हणजे तुमचे कामदेखील बरोबरीने सुरू होते असे म्हणता येईल. संसार जसा जसा मुरत जातो तशा तशा जबाबदऱ्या देखील बदलत जातात. तो मेळ तुम्ही कसा साधला?
अंजालीताई: आयुष्यातील पुढील काही वर्षे रोलर कोस्टर सारखी गेली. मुलांच्या शाळा, एकत्र रहात असल्यामुळे पुतण्यांची व मुलांची लग्ने, सर्व सुनांची व मुलीचे बाळंतपणे ह्यांत मी व्यग्र होते. तसेच ह्यांच्या कामाचा व्याप पण वाढत होता. जनसेवे बरोबरच Neel Paints चा व्याप देखील वाढत होता. गरवारे नायलॉन्स, गरवारे वॉल रोप्स, टाटा मोटर्स, फिनॉलेक्स, MES वगैरे कंपन्यांमध्ये वेगवेगळी काँट्रॅक्टस जोरात चालू होती .
यानंतर इष्टापत्ती ठरावी अशी करोनाची लाट आली व आम्हां दोघांना जास्त वेळ एकत्र घालवणे शक्य होऊ लागले.
माधवी: या तुमच्या कुटुंबात आपल्या रोटरी कुटुंबाची भर कधी पडली?
अंजालिताई: रोटरीत येऊन आम्हांला ३३वर्ष झाली. पहिली १५-२० वर्ष वर सांगितल्या प्रमाणे संसारात व डोळ्यांचे प्रॉब्लेम्स ह्या मुळे मी फारसा सहभाग घेऊ शकले नाही. पण आता मी मला शक्य होईल तितका सहभाग देते.
मधल्या काळात घरीच असल्यामुळे पेंटिंग, मूर्ती कलेचा छंद जोपासत होते पण आता तेही डोळ्यांच्यां प्रॉब्लेम्स मुळे बंद केला आहे .
रोटरी चे अव्याहत फिरणारे चक्र मी मानते. 'कामात बदल हीच विश्रांती'!
आता आमचे डोळे लागले आहेत नैसर्गिक शेती कडे! "जनसेवेतून जनसेवेकडेच जायचे" असे व्रत आम्ही घेतले आहे. लोकांना चांगलतेच द्यायचे, हे जणू आमचे ब्रीद झाले आहे. निसर्गशेतीचे हे उत्पादन थोडे महाग पडते पण धोकादायक प्राणघातक अन्न सेवन करण्या पेक्षा वेळीच सावध का होऊ नये?
त्या मुळे आमच्या शेतात येणाऱ्या गोष्टी वापरून मी काही घरगुती प्रॉडक्ट्सचे ऊत्पादन सुरु केले आहे. स्वांतसुखाय म्हणूनही मी हे उत्पादन सुरु केले आहे. त्यात मी खूपच रमते आणि सामाजिक कार्याचा एक भाग खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ह्यात होणारा नफा आम्ही खेडेगावात काम करणाऱ्या गरजू संस्थाना देतो. गावातील बचत गटाच्या बायकाही येऊन शिकून गेल्या. त्यांनाही त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. शेतावर राहून आमच्या फावल्या वेळात कामगारांच्या मुलांचे अभ्यास घेते, व्यायाम घेते मला जेवढ करता येईल तेवढी मदत मी आपलेपणाने करण्याचा प्रयत्न करते. रोटरीत स्वतः असे फार काही काम केले नसले तरी रोटरीचे तत्व अंगिकारायचा आणि जगायचा पूर्ण प्रयत्न मी करतेय...'सर्व्हिस अबव्ह सेल्फ्' !
'सर्व्हिस अबव्ह सेल्फ्'...मग आता मंडळी, तुम्हीच सांगा आहेत की नाही आपल्या अंजलीताई पुर्णांगिनी!
Each one of us has a Dental treatment story to share. Some pleasant, some comic and some horror! But like all other sciences a lot of advancements have occurred in the field of Dental treatment modalities. A lot of focus is on patient comfort and improving ergonomics, BioMimetics (i.e simulation and conservation of the natural tooth) and aesthetics. So let me share a few of the advances in our practice which you as a patient can avail the benefits of.
Well, first and foremost one need not fear the Dentist anymore. We use very fine needles for anaesthesia and a topical anaesthetic is applied before injecting, so the discomfort is minimum. A lot is happening on the digital front. The measurements or impressions are taken digitally many a times, if not always. The records sent to the lab are then analysed with special software and the restorations or caps as we call them are made with CAD/CAM TECHNOLOGY.
If a patient wants to change his/her smile there is a full array of treatments available. Right from Braces (Orthodontic), Bleaching, Botox Derma fillers, gum plasty, to digital smile design(DSD). A combination of treatments is also a possibility.
Dental fillings are done with Composite Resins. The fillings look aesthetic but require regular checkups. They are bonded to the teeth and require minimum tooth preparation unlike good old Silver amalgam.
Of all the recent advances one of them steals the cake, yes! IMPLANTS! Lost a strategic tooth at a young age? fikar not Implants are here! We have successfully given full mouth teeth replacements to anxious patients who didn’t want Dentures, with Implants. So basically patients need not lose hope of having beautiful smiles at any stage in life due to the advent of Implants, unless the patient has uncontrolled diabetes. Implants are Titanium screws inserted in place of the root of the tooth. The jawbone weaves tissue around it and holds it over a period of time, takes about 3 to 6 months after which the clinician loads the implant with crowns or Denture. So Implants are the best option for fixed replacement of single, multiple or all teeth.
Another advancement is the use of Microscope in Root Canal Treatment. With the use of Rotary instruments, we have shifted to one sitting Root Canal treatment and use of microscope for the same improves visibility for the clinician. Among different diagnostic aids CBCT gives a 3 dimensional picture of the tissues. It is like a virtual trip of the jaws within. Rubber Dam Dentistry is routine in the US .It is catching up here too.
All said and done PREVENTION IS BETTER THAN CURE. One should do what it takes to prevent Dental problems. Regular flossing, use of chlorhexidine mouthwash, massaging gums and regular dental checkups are the key to good oral health.
.
Some Rotary Firsts:
As an international organization, Rotary offers each member unique opportunities and responsibilities unlike those of other groups one might join. Although each Rotarian has first responsibility to uphold the obligations of citizenship of his or her own country, membership in Rotary enables Rotarians to take a somewhat different view of international affairs. In the early 1950s a Rotary philosophy was adopted to describe how a Rotarian may think on a global basis. Here is what it said: "A world-minded Rotarian:
- Looks beyond national patriotism and considers himself as sharing responsibility for the advancement of international understanding, goodwill and peace;
- Resists any tendency to act in terms of national or racial superiority;
- Seeks and develops common grounds for agreement with peoples of other lands;
- Defends the rule of law and order to preserve the liberty of the individual so that he may enjoy freedom of thought, speech and assembly, and freedom from persecution, aggression, want and fear;
- Supports action directed toward improving standards of living for all peoples, realizing that poverty anywhere endangers prosperity everywhere;
- Upholds the principles of justice for mankind;
- Strives always to promote peace between nations and prepares to make personal sacrifices for that ideal;
- Urges and practices a spirit of understanding of every other man's beliefs as a step toward international goodwill, recognizing that there are certain basic moral and spiritual standards which will ensure a richer, fuller life.
That is quite an assignment for any Rotarian to practice in thoughts and actions!
नमस्कार मंडळी धनंजय जोशी लिखित सहज पुस्तकातील एक लेख...
लेखाचं शीर्षक आहे.. "चहा नाही मिळणार"...
माझ्या एका जवळच्या मित्राची गोष्ट.. लॉसएंजेलिस मध्ये अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन झाले... या अधिवेशनात माझ्या मित्रांची दोन सेशन्स होती.. एक जरा गंभीर विषय होता...(मृत्यूशी मैत्री कशी करावी?)...
आणि एक सर्वांच्या आवडीचा विषय-- म्हणजे "योग-साधना आणि ध्यान-साधना"..यावरचा!!
माझ्या मित्राला खूप आनंद झाला होता,कारण अशा विषयांवर लोकांना फारसे बोलायचं नसतं ....पण अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांनी खूप धैर्य दाखवून दोन्ही कार्यक्रमांना वेळ दिली होती...
गंमत झाली ती अशी..!!
मित्राच्या पहिल्या कार्यक्रमाला जेमतेम पंधरा लोक आले, एकूण चार हजार लोकांपैकी..!!
आणि दुसऱ्या कार्यक्रमाला जेमतेम पंचवीस लोक आले, चार हजार लोकांपैकी...!
मित्र खूप निराश झाला होता.. कारण त्याचे कोणीही "जीवश्चकंठश्च" मित्र त्याच्या कार्यक्रमाला हजर नव्हते...
किंबहुना त्याला अनेकांनी विचारून देखील(अरे तुझं सेशन किती वाजता आहे रे..?) कोणीही त्याच्या कार्यक्रमाला आले नाही...
माझा तो मित्र मला नंतर भेटला..
माझ्याशी बोलला..! निराश झालेला होता..!
मला म्हणाला," डीजे,असं का..? मला वाटतं असं वागणं हा एक प्रकारचा निरादर नाही का ? की तू काय म्हणतोस त्याचे फारसं काही महत्त्व आम्हाला वाटत नाही..? आम्ही जरा चांगली नाट्यसंगीताची गाणी ऐकू... तुझं आहे ते आहे... जेव्हा तुझी भेट होईल तेव्हा बघू...!"
मी त्याला म्हणालो...," अरे, ठीक आहे रे..! मी तुला सान सा नीमची शिकवण सांगितली, आठवतंय..? डोन्ट चेक !! म्हणजे इतरांच्या क्रियेबद्दल आपण न्याय देऊ नये..! आता त्याहीपेक्षा आणखी एक शिकवण..! ती म्हणजे माणसाच्या मनामध्ये अनेक वेळा,अनेक विचार न सांगता, न विचारता, येत असतात... मग आपण काय करायचं..?? आपण आपल्या मनाचं दार उघडं ठेवायचं..!! बंद नाही करायचं..!! येऊ देत त्यांना..!! आणि जात असतील तर जाऊ देत त्यांना..! फक्त एक गोष्ट महत्त्वाची..! येऊ देत त्यांना, जाऊ देत त्यांना,.. तुझ्या घरामध्ये असताना फक्त त्यांना सांग..," मित्रहो, या आणि जा, इथं चहा नाही मिळणार...!!" त्यांना दुसरीकडे जाऊदे चहासाठी...
सध्या इतकंच...
अशा सुजलाम सुफलाम देशात तीन हजार वर्षे हिंदू संस्कृती फुलली फळली ,जरी तिच्यावर अनेक वेळेस आक्रमणं झाली.परन्तू त्याचबरोबर समाजाच्या स्थैर्याकरीता तयार केलीली वर्णांची प्रणाली सुद्धा विक्रृत दिशेने वाहू लागली.जरी हिंदू संस्कृती स्वतंत्र रीत्या वाढत होती,तरीही हिंदुस्थानाचे बाहेरील
इतर देशांशी व संस्कृतींशी देवाणघेवाणीचे संबंध होते.हिंदू संस्कृतीचे ईराण ग्रीक, चीन, मध्य अशीया,वगैरेशी संबंध होतेच,परन्तु ती संस्कृती पुर्वेकडील देशात सुद्धा पसरली होती.
अशा तीन चार हजार वर्षांपासून विकसीत होण्याऱ्या संस्कृतीत आंतरिक शक्ति असणारच.
उपनिषद ख्रिस्तपूर्व पाचशे सालापासून लिहीले गेले असावेत. आतापर्यंत चालत आलेल्या वैदीक विचारापेक्षा उपनिषदात वेगळे सांगीतलेआहे.तेव्हापर्यंतच्या वैदिक तत्त्वज्ञानात अनेक देव आणि कर्मकांड असत.जसा जसजसा हिंदू धर्म व समाज विकसीत होत गेला तसतशी हिंदू तत्त्वज्ञानात परिपक्वता आली व विश्व, आत्मा,प्राणिमात्र आणी मनुष्य यांचा परस्परांत खरोखरी काय काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला.आत्मा व परमात्मा एकच आहेत.बाह्यरूप व आंतरिक रूपात फरक नाही.माझ्यातच विश्व आहे आणी विश्वात मीच आहे.परमात्मा एकमेव आहे.असे तत्त्वज्ञान उपनिषदात मांडले गेले.उपनिषद प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात रचले आहे.कदाचित ती एखाद्या गुरूने दिलेल्या प्रवचनांची शिष्यानी नोंदवलेली टिपणे असावीत.सत्याच्या शोधात निघालेल्या गुरूशीष्यांकडून उपनिषदाची निर्मिती झाली असावी.आत्मा व परमात्मा कोणत्या नियमानुसार चालतात?वार्या प्रमाणे मन सतत का वाहत असते? वाहत्या पाण्याप्रमाणे मन कशाच्या शोधात असते? त्या शोधाण्याला अंत आहे का? कींवा तो प्रवास अखंडित आहे?अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न उपनिषदात केलाआहे.मानवी शरीर जरी नष्ट झाले तरी त्याचे मन व किर्ती चिरंतन असतात.सत्वांतील विश्वासामुळे सूर्यासकट सारे काही मीच आहे हा आत्मविश्वास उपनिषदात प्रगट झाला आहे.
आत्मा म्हणजे काय?याचा शोध घेण्याचा उपनिषदात प्रयत्न केला आहे.आत्म्यास आकार नाही.ज्या प्राणिमात्रात तो असतो त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म असतात.जसा अग्नि.अग्नीला स्वतःचा
आकार नसतो.त्याचा आकार तो काय जाळतो यावर अवलंबुन असतो.दिव्याची वात जळताना ज्योतीचा आकार व डोंगराला लागलेल्या वणव्याच्या ज्वालेचा आकार वेगवेगळा असतो.परन्तु अग्नि तोच असतो .म्हणून सर्वांचा आत्मा सरते शेवटी एकच असल्यामुळे ,सर्व प्राणिमात्र समान असतात ज्याला हे सत्य उमजले आहे,त्याला दुःख नसते,संभ्रम नसतो व त्याचे मन स्थिर असते.उपनिषदातील या तत्वामुळे भारतीय संस्कृतीत सहिष्णुता, समजूतदार पणा,वैचारिक स्वातंत्र्य व जगा आणि जगूद्या हे गुण रुजले असावेत.
विश्व म्हणजे काय आहे?याचे उत्तर, ते मुक्त आहे,बांधील नाही,ते मुक्तपणे उगम पावले,मुक्तपणे संचार करते आणि मुक्त तेत विलीन पावते ,असे दिले आहे.याचा अर्थ पं.नेहरूंना नीट कळला नाही.परन्तु ते स्वतः स्वातंत्र्य प्रेमी असल्याने ,उपनिषदांचे कर्ते सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्य व वैचारिक स्वातंत्र्याचे भोक्ते असावेत असे नेहरूंचे मत झाले.
उपनिषद त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे व भाषेमुळे समजण्यास कठीण. तरीपण उपनिषदांचा भारतीय मनावर, समाजावर, संस्कृतींवर खूप असर पडला आहे.इतकेच नव्हे तर इतर संस्कृतींवर सुद्धा उपनिषदांचा प्रभाव पडला आहे.ख्रिश्चन धर्म तत्त्वज्ञानावर ,ग्रीक तत्त्ववेत्ता प्लॉटीनस व त्याच्याकडून पुढे सेंट ऑगस्टाईन यांच्यामार्फत उपनिषदांचा प्रभाव पडला आहे.त्याप्रमाणेच युरोपीय तत्त्वज्ञानी व विचारवंतांना उपनिषदा बद्दल कुतूहल होते.उपनिषदांच्या तत्त्वज्ञानातून 'वेदांताच्या' तत्व प्रणालीचा जन्म झाला.उपनिषदात 'तपस्येला' महत्व आहे.तन आणि मन यांच्या सुदृढतेला प्राधान्य दिले आहे. साध्याकरीता संयम,त्याग, भोग,यांची आवश्यकता असते असे उपनिषदात सांगीतले आहे.उपनिषद समजण्यास कठीणच म्हणून त्याचा उगम व अर्थ फार थोड्या प्रतिभावंत विद्वानांकडे मर्यादित होता,तरी सुद्धा त्या अल्पसंख्य, प्रतिभावान व बुद्धिमान जणांचा, बहुसंख्य सामान्य लोकांशी दृढ संबंध असावा.त्यामूळे जरी समाजात वर्गीकरण असले तरी विविध वर्गात सुसंवाद होता.उपनिषदातील तत्त्वज्ञान थोड्याश्या लोकांपर्यंतच मर्यादित राहिल्या मुळे बुद्धिमान वर्ग आणि सामान्य नागरिक यांच्यात वैचारिक दरी निर्माण झाली.ह्यामुळेच पुढे अज्ञेयवाद,नास्तिकतेचा प्रसार झाला ज्यापासून बौध्द व जैन धर्माची उभारणी झाली.त्याबरोबरच ही वैचारिक दरी कमी करण्यासाठी ईहवादाचा पुरस्कार करण्याऱ्या रामायण व महाभारत ही महाकाव्ये निर्माण झाली.
अशा व्यक्तीनीष्ठ समाजात,जरी,श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्ति आणि नवनिर्मिती वेळोवेळी निर्माण झाल्या,तरी सामाजिक कर्तव्याकडे दूर्लक्ष झाल्यामुळे वर्णभेदाला प्रोत्साहन मिळाले.त्याचप्रमाणे इतर श्रद्धा व चालीरीती विषयीच्या सहीष्णूतेमुणणळे ,कर्मकांड व पौरोहित्याला महत्व प्राप्त झाले.
प्राचीन भारतीय साहित्य प्रथमतः भोजपत्र अथवा ताडपत्री वर लिहिले गेले.त्यामूळे कालांतराने मुळ साहित्य नष्ट झाले आहे.परन्तु त्यांनंतर कागदावर लिहिल्या गेल्या साहित्याच्या आधारे,त्याचबरोबर चिनी किंव्वा तिबेटी साहित्यातील संदर्भानुसार असे लक्षात येते की ,प्राचीन भारतीय वाङ्मय, तत्वज्ञान, नाट्य व इतर बाबतीत समृद्ध होते.
अशा नष्ट झालेल्या साहित्यात इहवादी वाङ्मयाचा पण समावेश होतो.कौटिल्याच्या 'अर्थशास्त्र 'ह्या पुस्तकात इहवाद हा उपनिषद काळातील एक महत्वाचे तत्वज्ञान होते असा उल्लेख आहे.इहवादाविषयी माहिती मुख्यत्वेकरून टीकाकारांकडून मिळते.इहवादी, वेद,पौरोहित्य, पारंपारिक रूढी, ईश्वर, ईश्वर भक्ती या विरुद्ध होते.स्वर्ग, नरक,आत्मा, यावर त्यांचा विश्वास नव्हता. जे समोर प्रत्यक्ष दिसते तेच सत्य असे इहवादी मानत असत.अशा इहवादातून जैन व बौद्ध धर्म उगम पावले असावेत.बुद्ध ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेला.उपनिषद ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या आसपास तयार झाली असावीत. त्याचसुमारास अलेक्झांडर चे आक्रमण झाले व चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली.जरी लहान लहान राज्ये मौर्य सम्राटांच्या अधिपत्याखाली होती,तरीही,त्या काळात त्या राज्यांना खुपच स्वायत्तता होती.पं.नेहरू जशी भारतीय संस्कृतीची तुलना चीन बरोबर करतात, त्याचप्रमाणे ग्रीस बरोबर सुद्धा तुलना करतात.ग्रीस मधील अथेन्स आणि स्पार्टा मधील पिलोनेशीयन युद्धाची तुलना(ख्रिस्तपूर्व चारशेएकतीस ते चारशे पाच साल)पं.नेहरू महाभारत युद्धाशी करतात.परन्तू ग्रीस, युद्धापासून सावरले नाही.भारत मात्र महाभारतानंतर सुद्धा शेकडो वर्षे समृद्ध राहीला.
रामायण व महाभारत हे हिंन्दू संस्कृतीतील दोन महान ग्रंथ आहेत, ज्यांचा हिंदू समाजावर अजूनही प्रभाव आहे.हे ग्रंथ अतिप्राचीन असून पहिल्यांदा अनेक वर्षांत तोंडी रचले गेले व मागाहून लिहीले गेले.त्यात आर्यांच्या सुरूवातीच्या काळातील परिस्थिती,त्यांचे युद्धातील विजय, त्यांचे यादवी युद्ध, याचे वर्णन आहे.पं.नेहरूंना लहानपणी या महाकाव्यातील गोष्टींचे त्याचबरोबर इतर परीकथांचे खूप आकर्षण होते,जरी,त्यांनी त्यांतील अतिशयोक्तीचे कधीच समर्थन केले नाही.परन्तु सर्वसाधारण समाजावर महाकाव्यातील गोष्टींचा होणाऱ्या चांगल्या परिणामांची त्यांना जाणीव होती.अशा पौराणिक कथा वेदांत सुद्धा लिहिल्या आहेत.ह्या दंत कथांमधून समाजाला सद्वर्तनाचे धडे दिले आहेत, व सद्वर्तनानी मिळणारी फळे चांगलीच असतात हे शिकविले आहे.
ग्रीक, चीनी अथवा अरब लोकाप्रमाणे भारतीय इतिहासकार नव्हते.बखर लिहिण्यात किंव्वा माहितीचे संकलन करण्यात त्याना स्वारस्य नव्हते. कल्पित विश्वात राहणे ते पसंत करीत असत.त्यामुळे इतिहास सुद्धा काल्पनिक व रंजक गोष्टी स्वरूपात लिहिला गेला.ह्याचा प्रभाव,पूर्व काळाचा खरा आणि कालक्रमानुसार इतिहास शोधण्यावर होत आहे.सर्वसाधारण समाजावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.कारण ह्या रंजक गोष्टी म्हणजेच खरा इतिहास असे गृहीत धरले गेले.हीच खरी हिंदू संस्कृती आहे असे मानले गेले.ज्याप्रमाणे भारतीय, तत्त्वज्ञाना बाबतित खोलवर सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत असत,त्याप्रमाणे इतिहासाचा खोलवर शोध घेतला गेला नाही.हल्लीच्या आधुनिक जगात हा पुराणांतील इतिहास शास्त्रोक्त व तर्कशुद्ध पद्धतीनुसार अभ्यासला जात आहे.पण तिथेही उलट्याबाजूने अतिरेक होत आहे.जुन्या रुढी, परंपरा ,श्रद्धा,निव्वळ पौराणिक असल्याने नाकारण्यात येत आहेत .तरीसुद्धा भारतीय ह्या पारंपारिक रूढींना घट्ट धरून आहेत
ह्याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे विक्रम समावत होय.विक्रम समावत ख्रिस्तपूर्व सत्तावन्न सालांत चालू झाली.आज विक्रम समावत प्रमाणे दोन हजार अठ्ठयातरावे वर्ष आहे.इतिहासातील राजा विक्रम हा उज्जैन चा राजा मानला जातो.अत्यंत पराक्रमी,दयाळू ,प्रजेच्या उद्धारासाठी झटणारा,दरबारात नवरत्ने(अमरसिंह, धनवन्त्री,कालीदास,क्षपणक,शंकू,बेताल भट्ट,घटखर्पर,वराहमिहीर,वरूची )असलेलाराजा विक्रम इ.स.चारशेच्या सुमारास अस्तित्वात होता.मग ख्रिस्तपूर्व सत्तावन्न सालचे पंचाग विक्रमादित्याच्या नावाने कसे असेल?कदाचित राजा विक्रमादित्याचे नाव ह्या पंचांगाशी मागाहून जोडले असेल व तेच आपण परंपरागत स्विकार करीत आलो आहोत.यामागे भारतीयांचा ,आपल्या देशावरील,धर्मावरील,व संस्कृतींवरील अभिमान कारणीभूत असू शकेल.
अशारितीने भूतकाळाला सोयिस्कर पणे मुलामा देऊन स्वतःचा फायदा करून घेण्याची वृत्ती सर्वत्र असते.ब्रिटिशांनी सुद्धा स्वतःच्या सोयीनुसार भारतीय इतिहासाचा विपर्यास केला.ही प्रवृत्ती सध्यापण दिसून येत आहे.भारतीय, पुराणांकडे इतिहास म्हणून बघतात. पुराणकाळी मानव,देव,स्वर्ग, विश्व, निसर्ग, सारे काही सुसंवादीत होते.त्यावेळेस प्रत्येकांच्या मानसिकतेला साजेसे देव होते.कविंकडून अशा देवांभोवती रंजक गोष्टी,काव्य,दिवास्वप्न,गुंफली जात होती.अशाच प्रकारे एका सुंदर काव्य गुंफण्यात आले आहे.
'जेंव्हा विश्व कर्माने स्त्री निर्माण करण्याचे ठरविले, तेव्हा त्याच्या लक्षात आले कि पुरुष तयार करण्यात त्याच्याकडील सर्व साहित्य संपले आहे.तेव्हा त्याने खूप विचारांती;चन्द्राचा गोलाकार, वेलींचा वक्राकार, ताणाचे चिपकणे,गवताचे थरथरणे,लव्हाळ्याची लवचिकता,फुलांचा फुलोरा,पानांचा हळूवार पणा,सोंडेची निमुळता,हरणाचा कटाक्ष, मधमाशांचे गुंजन, सुर्यकिरणांचा खेळकरपणा,ढगांच्या अश्रूधारा,वार्याची चंचलता,सशाचा बुजरेपणा,मोराचा डौल,राघूच्या वक्षस्थळाची कोमलता,हेकेखोराची खंबीरता,मधाचा गोडवा,व्याघ्राची कृरता,शेकोटीची ऊब,हीमाचा थंडपणा,नीलपंखाची किलबील, कोकिळेचा कंठ,करकोचाची दांभिकता, चक्रवाकची एकनिष्ठता,हे सर्व एकत्रित करून स्त्री निर्माण केली.
# *गोल्डन एरा विथ चंद्रशेखर*
# महंमद रफी , किशोरकुमार, मुकेश
# देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन
# आर.डी. बर्मन, ओ.पी.नय्यर, शंकर - जयकिशन
# साहिर, शैलेंद्र, मजरूह
# सुधीर फड़के, अरुण दाते, हृदयनाथ मंगेशकर
यांनी गायलेल्या, संगीतबद्ध केलेल्या, रचलेल्या व यांच्या वर चित्रित झालेल्या सदाबहार गीतांचा विशेष कार्यक्रम
Soya Milk Training Program 13
9th February 2022
Soya milk production training program number 13 was held in Sanghavi Budruk. The arrangements for the program were made by Rtn. Dattaji Doedhar and Ann Anjali Deodhar.
The program was conducted by P.P. Rtn. Dr. Sudhanshu Gore and attended by PDF Rtn. Bhausaheb Kudale, President Atul Atre, P.N. Rtn. Ravindra Prabhune, Ann Shibhatai Kudale, First Lady Nandinii Atre, Ann Sunita Prabhune.
The guests for the program were Shri Madhav Gokhale, Executive Editor of Saptahik Sakaal and Shri Ranjit Pal, Chairman Chetran Foods.
Shri Ranjit Pal graciously donated R. 60,000 and 3 mixers towards sponsorship for the program.
HIV Patients Grocery Distrubution
10th February 2022
दिनांक ३१ जानेवारी २०२२ला जानेवारी महिन्याची शेवटाची साप्ताहिक सभा ऑनलाईन पार पडली. सभेच्या सुरुवातीला मेंबरशीप डायरेक्टर रो. योगेश नांदुरकर यांनी Classification च्या याद्या तयार असल्याचे सांगून Service to Society आणि वैयक्तिक संपर्कासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रम होता "मुलाखतीतून माणसे जोडताना". आकाशवाणी व दूरदर्शन निवेदिका आरती पटवर्धन यांचा दृक्श्राव्य माध्यमातील प्रवास. आरती पटवर्धन या आपल्याच रोटरी परिवारातील. ज्येष्ठ रो. गोविंदराव व ॲन चारुशीला पटवर्धन यांच्या स्नुषा. त्यांची ओळख देखील रोटरी परिवारातीलच प्रज्ञा देवधर (रो. दत्ताजी व ॲन अंजली देवधर यांच्या स्नुषा) यांनी उत्तमरित्या करून दिली.
त्यानंतर रो. मृदुलाजींनी नेहमीच्या खास खुमासदार शैलीत आरती पटवर्धन यांची मुलाखत घेतली. आरती पटवर्धन यांनी आकाशवाणी निवेदिका, दूरदर्शन मुलाखतकार म्हणून आलेले अनुभव सांगितलेले तेंव्हा त्यांचे उत्साही आणि हसरे व्यक्तिमत्त्व प्रकर्षाने जाणवले. लहानपणापासूनच नवीन काही करण्याची संधी चालून आली तेंव्हा त्यांनी नवे कौशल्य शिकून उत्तम कामगिरी करून दाखवली. संगीताची आवड बालपणापासून होतीच, ७वी मध्ये वत्कृत्व क्षेत्रात देखील प्रवेश केला आणि माईकशी अरतीताईंच कायमचं नातं जुळले.
लहानपणी घरातलं वातावरण अध्यात्मिक होते. शिवाय अनेक थोरामोठ्यांच्या वागण्याचं अवलोकन करता आल्यामुळे प्रसिध्दी माध्यमात असूनही त्यांचा स्वभाव मृदू आणि नम्र आहे.
आकाशवाणी व दूरदर्शनवरचे कार्यक्रम आणि मुलाखती घेताना आलेल्या अत्यंत समाधानाच्या अनेक जागा त्यांनी सांगितल्या. अशा उत्तम कामगिरी साठी त्यांनी आवर्जून पाळलेली काही पथ्य देखील सांगितली जसे, कार्यक्रमापूर्वी त्या विषयाचा अभ्यास आणि पूर्व तयारी केलेली असावी, कामाच्या ठिकाणी इतर आयुष्यातले प्रश्न आणि ताण आणु नयेत, नवीन आलेल्या जबाबदारीला नाही म्हणू नये.
व्यावसायिक काम करारीपणे त्या करत असल्या तरी कोणत्याही इतर गृहिणी सारखच मुलींच्या अभ्यासाच्या मागे लागतात, घरातील सर्वच माणसांची प्रेमाने काळजी घेतात.
अश्या या आपल्याच रोटरी कुटुंबातील आरती पटवर्धन यांच्या या मुलाखतीने सर्वांचीच माने जिंकली.
प्रत्येक पिढीचे वेगवेगळे प्रश्न असतात. गेल्या ५० वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात इतका झपाट्याने बदल झाला की अनेक बाबतीत प्रचंड मानसिक गोंधळ निर्माण झाला.
शिक्षण झाले अथवा न झाले तरी पिढीजात व्यवसाय करायचा आहे ही परंपरा केव्हाच कालबाह्य झाली. १९६० ते ८० या काळात अनेक प्रथम पिढी उद्योजक उदयास आले. त्यांनी उद्योग, व्यवसाय स्थापित केला. आता थोडे थांबावे असे विचार येतात उत्तम घडी बसली आहे पण पुढील पिढी यात येईलच अशी खात्री नाही. काय करावे हा प्रश्न सूनजी घालत राहतो. उत्तर सापडत नाही. ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन “Succession Planning” या विषयावर नावाजलेले मार्गदर्शक श्री चकोर गांधी यांनी त्यांचे विचार मांडले.
सुरुवातीसच त्यांनी छोटी कुटुंबे, संतती नसणे, मुलांना वडिलांच्या व्यवसायात रस नसणे, मुलांची कुवत नसणे, तंत्रज्ञानातील बदल अश्या अनेक कारणाने हा विषय युरोप मध्ये गंभीर झाला आहे आणि भारतातही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे असे सांगून कोणताही निर्णय एकदम घेऊ नये त्यात नुकसान होते. वैचारिक पातळीवर अगोदर नक्की काय करायचे हे ठरविले पाहिजे. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. आपला व्यवसाय, कौटुंबिक पार्श्वभूमी, गरजा, वैचारिक बैठक, धोके घेण्याची तयारी असणे-नसणे असा सर्वांगी विचार करून निर्णय घ्यावा. सर्वाना लागू होईल असे एक सूत्र नाही आहे. अगोदर तत्व नक्की करा आणि त्यानुसार नियोजन करा असा संदेश चकोरजींनी दिला. होतकरू गरजू तरुण सहकारी शोधून त्याच्या कडे हळू हळू सूत्र सोपविता येतील. व्यवसायातील अन्य व्यक्ति बरोबर भागीदारी करता येईल. चीफ ऑफिसर नेमता येईल असे अनेक पर्याय आहेत. धंदा विकणे हा एक पर्याय आहे पण त्यासाठी अगोदर त्याचे मूल्य वाढविले पाहिजे. नाहीतर आर्थिक नुकसान होते. मूल्य ठरविणे हे एक शास्त्र असले तरी ते वाढविणे ही एक कला आहे, त्यासाठी पूर्वतयारी पाहिजे अश्या अनेक मौल्यवान सूचना विविध उदाहरणे देऊन वक्त्यानी केल्या. श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत पुढील २५ वर्षे भारतीय अर्थव्यवस्था गतीने वाढणार आहे. “Get the best people and give them free hand” “whole world is your market” असे आश्वासक विचार मांडले.
रो. राघवेंद्र पोंक्षे यांनी यथोचित शब्दात आभार मानले.
A program “Me Hee Ek Durga” was arranged by Rotary Club of Pune South on 14th Feb 2022 wherein “Daryawardi” (Master of the Sea) Rtn. Bhagyashree Ogale was interviewed by Rtn. Shweta Karandikar.Rtn. Madhuri Kirpekar gave a short introduction of Bhagyashree.
Bhagyshree works as Additional First Engineer on her ship. She chose this unusual profession as she was inspired by her father Rtn. Sanjeev Ogale who himself served in the Indian Navy. One day she aspires to be able to handle her father’s business of manufacturing marine equipment.
The transition from growing up in an All Girls school to an All Boys job with a ratio of 1000 boys to 10 girls, was not an easy one; but her grandfather and parents encouraged and motivated her. The training at Tolani Maritime Institute was rigorous. As physical fitness is of prime importance in their job they had to put in rigorous exercise from 5.30 AM to 7.30 AM everyday in addition to the academics. Speaking about her work, she said there was no gender bias with respect to work or renumeration. But she stressed that you have to prove yourself all the time. The ship is like a city where you have to generate your own electricity and fresh water, and there are about 500 types of machines which need to be constantly monitored and serviced. These machines are situated on different floors on the ship and the officers and staff on board are on call 24 X 7 as the engine room has to be manned. You need to be physically fit and on your toes all the time. Even though she is the only girl on the ship she has never faced any safety issues, her colleagues are in fact very supportive. Their contract is 4 months of duty onboard and 2 months off. She utilizes these off duty months to attend mandatory courses and also to prepare for promotional exams.
Rtn. Bhagyashree has also proved herself a true Rotarian and generously donated to Rotary projects. Rotary Club of Pune South is truly proud of Bhagyashree’s achievements. President Rtn.Atul Atre proposed the vote of thanks and on behalf of the Club, wished her great success in her future endeavors.
सोमवार दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी आपली साप्ताहिक सभा झाली. या दिवशी असिस्टंट गव्हर्नर पी. पी. रो. धनश्री जोग यांची क्लबला अधिकृत भेट झाली. असिस्टंट गव्हर्नर यांनी अशा भेटीदरम्यान आपण करत असलेल्या कामांची पाहणी करून त्यावर भाष्य करणे अपेक्षित असते. ही भेट म्हणजे नंतर होणार्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या भेटीची पूर्वतयारी असते.
पी. पी. रो. संदीप विळेकर यांनी पी. पी. रो. धनश्री जोग यांचा परिचय करून दिला. त्या ई-क्लब ऑफ पुणे डायमंडच्या पूर्वाध्यक्षा आहेत.
पी. पी. रो. धनश्री या स्वतः एक मेकॅनिकल अभियंत्या असून सिक्स सिग्मा या औद्योगिक दर्जा मानकाच्या लेखा-परीक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी सभेपूर्वीच सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेतली होती. अध्यक्ष रो. अतुल यांनी असिस्टंट गव्हर्नर यांना आपल्या खालील प्रकल्पांची माहिती तपशिलात दिली:-
- Aids Patients Grocery
- Cataract Surgeries 92 - Rs 28 lakhs
- Blood Donation Camp
- Diabetes Detection Camps 4 nos
- Soya Milk Workshops 13 nos
- Hydroponic Machines 2 nos and Study Tables 50 nos to Sarthak Seva Sangh
- रु.1,25,000 to Kokan Relief District Fund
- Science Laboratory at Ambavane School
- Refrigerators 4 nos to Tarachand Hospital
- 2 Laptops to Kiran Purandare
- Test Series for competitive exams
- Q Maps to Ambavane School
- Happy School at Gundalwadi
- Rs 85,000 Grocery to Blind School , Nagar Road
- Sanitary Napkins Rs 50,000 to Sex Workers
- Sticks to Pune Blind Men Association
Other achievements
- Two satellite clubs formed by RCPS.
- RCPS has already crossed the Rotary Foundation Target.
- On-going Projects have been continued.
Proposed projects:
- Dams 2 nos at Velha
- NICU at Tarachand Ramnath
- Medical Camp Kashmir
- E Learning Unit Kashmir
पी. पी. रो. धनश्री यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात क्लबने केलेल्या कामाचे आणि विशेषतः प्रोजेक्ट ऑडिट कमिटी व ग्रीव्हन्स कमिटी यांचे विशेष कौतुक केले. त्यांना आपले खालील प्रोजेक्ट विशेष उल्लेखनीय वाटल्याचे त्यांनी सांगितले:
- Soya Milk Project
- Kashmir Urdu Project
- Rotary Stickers Project.
क्लबच्या नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर भेटीचे स्वरूप कसे असेल त्याची रूपरेखा त्यांनी थोडक्यात सांगितली. त्यांनी अशी सूचना केली की क्लब ने धोरणात्मक नियोजना (स्ट्रॅटेजिक प्लांनिंग) अंतर्गत SWOT Analysis करावे, तसेच आपला क्लब ज्या गोष्टीत कमी असेल त्यात सुधारणा करण्याकरिता आपण केलेल्या किंवा करणार असलेल्या उपाययोजनांबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांना त्यांच्या भेटीदरम्यान माहिती द्यावी.
प्रत्यक्ष सभेत अध्यक्ष रो. अतुल यांनी आपण करत असलेल्या कामाचा एक गोषवारा सभेसमोर मांडला. त्यांनी ए. जी. पी. पी. रो. धनश्री जोग यांनी आपल्या क्लबला केलेल्या मार्दर्शनाबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.
पुढील वर्षीचे निर्वाचित अध्यक्ष रो. संजीव ओगले यांनी आभार प्रदर्शन केले.