Gordon R. McInally of Scotland selected to be 2023-24 Rotary International President.
Gordon R. McInally, a member of the Rotary Club of South Queensferry, Lothian, Scotland, is the selection of the Nominating Committee for President of Rotary International for 2023-24.
He will be declared the president-nominee on 1 October if no challenging candidates have been suggested.
McInally lauded Rotary’s ability to adapt technologically during the COVID-19 pandemic, saying the approach should continue and be combined with the best of our past practices as Rotary seeks to grow and increase engagement.
“We have learned there is a willingness within communities to care for one another,” he says, “and we must ensure that we encourage people who have recently embraced the concept of volunteering to join us to allow them to continue giving service.”
McInally says that senior leaders’ ability to communicate directly with club members online will be one positive legacy of the changes Rotary has had to make. But, he adds, “face-to-face meetings remain important, as they encourage greater interaction.”
The best way to increase membership is engagement, according to McInally. To better support clubs, he says, Rotary International, regional leaders, and district teams all need to engage with them. Engagement through social media will reinforce Rotary’s brand and showcase the opportunities that come with it. And, he says, engagement with governments, corporations, and other organizations will lead to meaningful partnerships.
With better engagement, McInally says, “We will grow Rotary both by way of membership and in our ability to provide meaningful service.”
He adds, “Membership is the lifeblood of our organization. I would encourage the use of the flexibility now available to establish new-style clubs that would appeal to a different demographic.”
McInally, a graduate of dental surgery at the University of Dundee, owned and operated his own dental practice in Edinburgh. He was the chair of the East of Scotland branch of the British Paedodontic Society and has held various academic positions. He has also served as a Presbytery elder, chair of Queensferry Parish Congregational Board, and commissioner to the church’s general assembly.
A Rotary member since 1984, McInally has been president and vice president of Rotary International in Great Britain and Ireland. He has also served Rotary International as a director and as member or chair of several committees. He is currently an adviser to the 2022 Houston Convention Committee and chair of the Operations Review Committee.
McInally and his wife, Heather, are Major Donors and Benefactors of The Rotary Foundation. They are also members of the Bequest Society.
Rtn Shital Shah as DGND 24-25
Greetings from Rtn. Pankaj Shah
District Governor 21-22, Rotary International District 3131
Happy to Convey that the DGND Election Process was initiated on 2nd September 2021 & Nomination Forms we’re invited from Intrested Clubs.
The deadline was set to 5 pm October 3rd 2021.
Myself confirm that we received only ONE Application from RC Pune East of Rtn Shital Shah.
I hereby declare : Rtn Shital Shah as DGND 24-25.
Heartiest Congratulations 🎉
Rtn. Pankaj Shah
District Governor 21-22, Rotary International District 3131
रोटरी क्लब सदस्यत्व एखाद्या व्यक्तीला देण्याबाबतचे रोटरीचे नियम सुस्पष्ट आहेत. अर्ज करून कोणालाही रोटरीचे सदस्यत्व मिळत नाही. त्यास एखाद्या रोटेरियनने पुरस्कृत केल्याशिवाय सदस्यत्वाच्या दिशेने पुढे जाता येत नाही. त्यामुळे रोटरीच्या वाढीत अशा पुरस्कर्त्या रोटेरीयन्सची भूमिका महत्वाची व तितकीच आवश्यकही आहे.
अशा पुरस्कर्त्याची जबाबदारी केवळ संभाव्य सदस्याचे नाव क्लब कार्यवाह (सेक्रेटरी) किंवा सदस्यत्व समितीकडे (मेंबरशिप कमिटी) सुचवून संपत नाही. जरी रोटरीने अशा पुरस्कार्त्याच्या अधिकृत जबाबदारीविषयी आपल्या प्रमाणभूत घटना व नियमात काही उल्लेख केला नसला तरी पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धती व परंपरेनुसार खालील काही बाबींचा अंतर्भाव त्यांच्या 'जबाबदारीत' केला जातो:
१. एखाद्या व्यक्तीचे नाव संभाव्य सदस्य म्हणून सुचवण्यापूर्वी अशा व्यक्तीस साप्ताहिक बैठकीसाठी सातत्याने काही दिवस बोलावणे व त्याची देखभाल विचारपूस करणे,
२. अशा संभाव्य सदस्याला बरोबर घेऊन काही रोटरी विषयक माहितीच्या बैठकांना हजर राहणे.
३. आपल्या क्लबच्या अन्य सदस्यांबरोबर अशा व्यक्तीचा परिचय करून देणे.
४. अशा सदस्याला आपली साप्ताहिक बैठकीची उपस्थिती अन्य क्लबमध्ये हजर राहून भरून काढण्याच्या पद्धतीची माहिती व्हावी यासाठी अन्य क्लबात बरोबर घेऊन जाणे व त्याद्वारे अन्य क्लबात स्नेहसंगत वाढविण्याच्या पद्धतीची माहिती करून देणे.
५. क्लबच्या विविध समारंभात संभाव्य सदस्य सहकुटुंब हजर राहण्यासाठी उद्युक्त करणे.
६. अशा सदस्यास मंडल परिषदेला (डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला) उपस्थित राहण्यासाठी उद्युक्त करणे.
७. अशा रीतीने हा नवीन सदस्य आपल्या क्लबच्या वातावरणात पूर्णपणे रुळेस्तोवर त्याच्याशी सातत्याने संपर्क ठेवणे.
अशा या कार्यपद्धतीचा अवलंब प्रत्येक पुरस्कर्त्याने, रोटेरियनने केल्यानेच प्रत्येक नवीन सदस्यांबरोबर रोटरी अधिक सशक्त व कार्यक्षम सेवाभावी संघटना बनते.
आपला रो. सुनील अरुण जोशी म्हणजे ज्येष्ठ रो. अरुण आणि ॲन उषा जोशी यांचे सुपुत्र.
त्यांची सँडविक कोरोमोंट सेल्स, इंडिया ह्या कंपनीच्या प्रेसिडेंट पदी नियुक्ती झाली आहे. कंपनीच्या जगभरातील टॉप परफॉरमिंग अधिकाऱ्यांतून त्यांची निवड करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर कंपनीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
अभिनंदन सुनील! तरुण वयात इतक्या मोठ्या पदावर तुझी निवड झाल्याबद्दल खूप कौतुक व शुभेच्छा. आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
आपल्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य रो. विलास आपटे यांच्या " आपटे मोटार स्कूल " या नामांकित संस्थेला आज १०० वर्षे पूर्ण झाली. आपटे कुटुंबियांच्या करता ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्या प्रित्यर्थ आज त्यांनी आपटे मोटर स्कूल मध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर माननीय मुरलीधर जी मोहोळ स्वतः उपस्थित होते . आपल्या क्लब तर्फे मी स्वतः, भाऊ सहस्त्रबुद्धे, किरण वेलणकर, दत्ताजी पाषाणकर व श्याम कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या रो मृदुलाजी घोडके यांनी अतिशय सुंदर केले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय नीट नेटका व व्यवस्थित झाला.
रो विलासजी, अस्मिताजी, अमेय व आपटे मोटर स्कूल या सर्वांना पुढील वाटचाली करता आपल्या क्लब तर्फे शुभेच्छा !
Annet Amruta Patwardhan, daughter of PP Rtn. Sonal Patwardhan, completed a full marathon in 4 hrs 19 mins. Congratulations Amruta
"नमस्कार, मी मृदुला घोडके.आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रादेशिक बातम्या देत आहे."
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी रेडिओवर हा आवाज ऐकला असेल. अश्विनी कुमारांची अर्धांगिनी आणि स्वतः स्वयंसिद्धा पूर्णांगिनी असलेल्या आपल्या क्लबच्या रोटेरियन मृदुला घोडके हिच्या विषयी लिहिण्यासाठी मी जेव्हा तिच्याशी बोलत होते, तेव्हा तिचा विविध क्षेत्रातील वावर पाहून मी थक्क झाले.
१९८४ पासून ती आकाशवाणी दिल्ली केंद्रावर रुजू झाली. १९८४ ते २०१९ पर्यंत जवळजवळ ३५ वर्ष तिची कर्मभूमी असलेल्या दिल्लीमध्ये ती अविरत काम करत राहिली. दिल्लीने तिला काय दिले नाही? तिला पैसा, मान मरातब, अतिशय चांगले मित्र मैत्रिणी, शेजारी हे सगळे दिल्लीमुळेच मिळाले. तिच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत ठरण्यासाठी ती दिल्ली शहराची कायम ऋणी राहील. दिल्ली आकाशवाणी मध्ये काम करणे, हा मृदुला साठी एक विलक्षण अनुभव होता. आकाशवाणी म्हणजे अगदी "मिनी भारत" असे आपण म्हणू शकतो. तेथून एकूण २२ भाषांमध्ये बुलेटीन जात असे. "असा विश्वबंधुत्वाचा अनुभव आल्यामुळे माझा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल बनत गेला" असे मृदुला सांगते. आकाशवाणी मध्ये नोकरी करत असताना तिला महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा (युपीएससी) तयारी मंडळाची सदस्य होण्याचा मान मिळाला. तसेच राज्य सरकार साठी अधिकृत भाषांतरकार/ अनुवादक म्हणून काम करता आले. भारत सरकारच्या अनेक जाहिरातींसाठी तिने आवाज दिला. सकाळ, लोकप्रभा, केसरी इत्यादी वृत्तपत्रांसाठी नियमित लिखाण केले. त्याच बरोबर लघुपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून सामाजिक समस्यांवर अनेक महोत्सवात लघुपट प्रदर्शन केले.
"तुझ्या निवेदनाच्या कारकिर्दीमध्ये तुझ्या मनाला भिडलेले प्रसंग कोणते?" असे विचारल्यानंतर मृदुला म्हणाली, "राजीव गांधी हत्येनंतर ती बातमी वाचणे, तसेच स्मिता पाटील यांच्या निधनानंतर ती बातमी स्वतःच्या आवाजावर आणि भावनांवर काबू ठेवून वाचणे हे अतिशय अवघड होतं."
२००२ मध्ये भारतीय रेल्वेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मृदुलाच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारीच्या परेड साठी चित्ररथ बनवला गेला. त्यादिवशीसाठी तालमी करणे, ते राजपथावर चालणे, ती मानवंदना देणे आणि नंतर अटलजींच्या घरचे जेवणाचे निमंत्रण हे तिच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहेत असे ती आवर्जून सांगते.
आपल्या कामाच्या व्यापात व्यग्र असतानाही तिने सामाजिक भान अजिबात सोडले नाही. गेली अठरा वर्षे ती आत्महत्या प्रतिबंध आणि नशामुक्ती साठी कार्यरत आहे. निराधार महिलांसाठी तिचे कार्य चालूच आहे.
आताही सेवानिवृत्त झाल्यानंतर रोटरीच्या तसेच अनेक माध्यमांद्वारे समाज सेवा चालूच आहे. अजूनही कुठल्याही कार्यक्रमासाठी निवेदन करताना अभ्यास करून टिपणे काढल्याशिवाय ती स्टेजवर जात नाही. पण आता कुटुंबाला वेळ द्यायला खूप छान वाटते. तिची मोठी मुलगी रश्मी कॅनडा मध्ये आहे. ती जर्नालिस्ट असून ती पण लिखाण करते. धाकटी मुलगी अनुश्री स्वतःचा व्यवसाय चालवते. तिचे पती मर्चंट नेव्ही मध्ये असल्यामुळे मुलगा आरवची पूर्ण जबाबदारी अनुश्री वर आहे आणि मृदुलाची तिला भक्कम साथ आहे.
"नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा,
मेरी आवाज ही पहचान है ...."
अशी ही आपल्या आवाजाने आपला ठसा उमटवणारी रोटेरियन मृदुला घोडके.
नमस्कार सर्व ॲन्स व मित्र परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. गेली दोन वर्षे आपण करोना इफेक्टचा तणावाखाली काढली. या वर्षी ऐन दिवाळीत जरा ताण कमी होऊन सगळीकडे आनंदी व उत्साही वातावरण दिसत आहे. घरोघरी खरेदी व फराळाची लगबग सुरू आहे म्हणून आपल्या नानाविध व चवदार फराळावर एक छानशी गमतीदार कविता सादर करत आहे.
दिवाळीचा फराळ
आली आली दिवाळी आनंदे घेऊन सगळ्या फराळा संगे
प्रथम आली काटेरी चकली गोऱ्या करंजीचे नाकच वरती ।।
आली आली कडबोळीची वेटोळी आली
अनारस्याची जाळी फस्सकन हसली
चिवड्याचे पोहे चिरोट्याचे सुंदर पापुद्रे सुटती ।।
रवा बेसन लाडू ची शर्यतच लागली
शेव बोल बोल नाचू लागली ।।
सर्वांना विचारले मी आस्थेने
काय रे कसे बसता एकाच ताटात तिखट गोड चवीचे दाटीवाटीने
त्यांनी उत्तर दिले तत्परतेने
ताई भारतात नाही का नांदत अठरापगड जाती गुण्यागोविंदाने
आम्ही पण राहतो सर्वधर्म समभावनेने ।।
मी पण आनंद म्हटले या या लवकर जलद गतीने
तेव्हा फराळ उद्गारले लगबगीने
पुण्याच्या रस्त्यावरील खड्डे चुकून तुमच्यापर्यंत पोहोचतो त्वरेने ।।
मला आले खुदकन हसू दिवाळीच्या फराळाचे स्वागत करू
पाचेक वर्षांपूर्वी दिवाळी सण म्हणजे माझ्यादृष्टीने फक्त फराळ करणे, खाणे, आकाश कंदील करणे, पणत्या रंगविणे आणि शुभेच्छा पत्रं डिझाईन करून भेट देणे, खरेदी करणे, फिरायला जाणे इतक्याच चौकटीपुरता मर्यादित होता. तेव्हा या चौकटीपेक्षा फार काही वेगळं करता येईल अशी अपेक्षाही मी कधीच केली नव्हती. नाही म्हणायला लेखनाची, वाचनाची आवड होती म्हणून दिवाळी अंकांचं वाचन होत होतं तेवढंच. पण २०१६ नंतर मात्र माझ्या या चौकटीचा विस्तार झाला. कसा? त्याचीच ही गोष्ट...
ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची का ते समजण्यासाठीची ही पार्श्वभूमी... जवळपास बारावर्षं एका सर्जिकल पॉवर टूल्स बनवणाऱ्या पुण्यातल्याच कंपनीत मी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होते. सगळं काम ऑपरेशन संदर्भातलं. फोटोज, फिल्म आणि ड्रॉइंग्ज यांच्याशी संबंध जास्त... भाषेशी त्यातही मराठी भाषेशी संबंधच कमी. शिवाय पदवीचं शिक्षणही भाषाविरहित विषयाचं... फाईन आर्टमध्ये झालेलं. या पार्श्वभूमीवर एक सर्वसामान्य वाचक ते थेट दिवाळी अंकात लेखन हे अवचित पडलेल्या गोड स्वप्नासारखंच नाही का... अप्रूप वाटावं असं...
तर एप्रिल २०१६साली एक विलक्षण आश्चर्यकारक असा योग आला तो म्हणजे पुण्यातल्या साहित्यसूची या नामांकित मासिकाचे संपादक श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी घडलेली भेट. या भेटीनंतर साहित्याच्या आवडीमुळे आणि मुख्यतः योगेश सरांच्या प्रोत्साहनाने मी साहित्यसूची या मासिकात नियमितपणे लिहू लागले. साधारणपणे मे २०१६च्या अंकात मी पहिल्यांदा पुस्तक परिचय लिहिला. मग दर महिना एक-दोन पुस्तकांवर मी लिहू लागले. अर्थात त्यामागे सरांचं मार्गदर्शन होतंच. असं करता करता दिवाळी अंकाबाबत चर्चा सुरु झाली. मला उत्सुकता होती पण दिवाळी अंकात पुस्तक परिचय प्रकाशित करायचे नाहीत असं ठरलंय हे जेव्हा मला समजलं तेव्हा मात्र माझ्या मनात थोडी निराशा दाटून आली. आणि वाटलं सरांच्या मार्गदर्शनाने आताशी कुठे पुस्तक परिचय लिहू लागलोत आपण, तर दिवाळी अंकात काय लिहिणार ? मग तो विचार मी मनातून काढून टाकला.
पण अचानक एक दिवशी सरांचा मेसेज आला की या अंकात तू सहभागी व्हावंस अशी इच्छा आहे. मला आश्चर्य वाटलं. मी कळवलं की, 'सर, एखाद्या विषयावर साहित्यिकअंगाने लिहिता येईल असा काही माझा कुठ्ल्या विषयाचा अभ्यास नाही किंवा वाचन नाही.' यावर त्यांची प्रतिक्रिया आली, 'की तू लिहू शकशील असाच यंदाचा विषय आहे. स्वतंत्रपणे जरी तुला लिहिणं शक्य झालं नाही तरी तू मुलाखत घेऊन त्याचं शब्दांकन तर करू शकतेस. तू ये तर, मग आपण बोलू.' सरांच्या या आश्वासक बोलण्याने मला हुरूप आला.
मग प्रत्यक्ष भेटल्यावर तर त्यांनी मला आश्चर्याचा धक्काच दिला. ते म्हणाले, 'आपण यंदा व्यंगचित्र विशेषांक करणार आहोत. त्यात तू काही व्यंगचित्रकारांच्या मुलाखती घेऊन त्याचं शब्दांकन कर. ' मला पटकन काय बोलावं तेच कळेना. डॉक्टरांच्या मुलाखती घेणं हे जरी कंपनीतल्या माझ्या कामाचं एक स्वरूप होतं तरी ते खूपच वेगळं होतं. त्याचा साचा ठरलेला असायचा. ते पूर्णतः प्रॉडक्टशी निगडीत असायचं. इथं व्यंगचित्रकारांशी बोलणं, आणि नुसतं बोलणं नव्हे तर त्याचं सुयोग्य शब्दांकन करणं हे माझ्यासाठी जरा अवघड होतं. जरी चित्रकला हा माझा विषय होता तरीही... हो- नाही- हो करता करता मी प्रयत्न करते असं म्हणाले.
तर थेट दुसऱ्या दिवशी सकाळी मला सरांचा मेसेज... 'आज पाच वाजता चारुहास पंडित येतील. त्यांची मुलाखत तुला घ्यायची आहे.' मला एकदम दडपणच आलं. 'चिंटू व्यतिरिक्त त्यांची काहीच माहिती नाही तर मी कशी मुलाखत घेऊ?' असं विचारल्यावर ते म्हणाले, 'जरा लवकर ये, आपण बोलूयात.' मी लंचटाईममध्ये नेटवरून चारुहासजींची माहिती घेतली आणि काही प्रश्न काढून सरांना दाखवले. त्यात आम्ही काही बदल करून मग ते प्रश्न विचारायचे ठरवलं. त्याप्रमाणे मुलाखत चांगली झाली. मग त्या रेकॉर्ड केलेल्या मुलाखातीचं शब्दांकन करून ते चारुहास पंडित आणि योगेश सर यांना दाखवून मी ते काम पूर्ण केलं. या नंतर ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्याशीही त्यांच्या व्यंगचित्रांबाबत फोनवरून मुलाखत घेऊन त्याचंही शब्दांकन केलं. हे सगळं करताना मला वेगळाच अनुभव आणि आनंद मिळाला.
ज्या मान्यवरांची चित्रं पाहात आपण मोठे झालो. ज्यांना केवळ वर्तमानपत्रातच पाहण्यात समाधान मानलं, त्या कलाकारांना प्रत्यक्षात पाहणं, त्यांच्याशी थेट संवाद साधता येणं या परता दुसरा आनंद कोणता. दिवाळीतल्या इतर कुठल्याही गिफ्टपेक्षा ही गोष्ट जास्त आनंददायी नाही का... अतिशय उत्तम आणि वेगळ्या, आवडीच्या विषयाच्या अंकात तेही अनेक मान्यवरांच्या लेखनात आपलाही छोटासा खारीचा वाटा असलेला लेख पाहून ... त्यातल्या यादीतलं आपलं नाव वाचून... मला खूपच भारी वाटलं.
याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यंगचित्र या प्रकाराबद्दल जवळपास सर्वकष माहिती मिळाली. तेही थेट जाणकारांकडून. जी माहिती क्वचितच कुठल्या आर्टकोर्समध्ये किंवा त्यासंबंधीच्या पुस्तकात मिळत असेल. खरोखर याबाबत योगेश सरांना मानलं पाहिजे. आपल्या रोजच्या जीवनातल्या समस्या थेटपणाने मांडणं आणि तेही कुणा व्यक्तीला न दुखावता हे सहज साध्य होतं ते या व्यंगचित्रांमुळेच. अशा या व्यंगचित्रकारांची विचार करण्याची पद्धत... लोकांचा व्यंगचित्रांकडे बघण्याचा दृष्टीकोन... व्यंगचित्राची बलस्थानं... ते काढताना घ्यावी लागणारी काळजी... वैशिष्ट्य... सामाजिक व राजकीय दृष्टीकोन... असं सारं काही पाहायला, वाचायला मिळालं. चांगल्या कलाकारांशी कायमचे संबंध जोडले गेले. सर्जिकल टूल्समध्ये दडपलेला माझ्यातला आस्वादक कलाकार थोडा खुलून आला. त्या दिवाळीचा आनंद काही औरच होता. कारण मला माझी एक वेगळीच ओळख मिळाली होती. खरंच हा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. योगेश सरांचे मनापासून आभार मानायला शब्दही तोकडे आहेत.
इतकंच नव्हे तर सरांनी अतिशय आपुलकीनं मला दिवाळी अंकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतही सामावून घेतलं. आणि दिवाळी अंकाची निर्मिती किती नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे आखणीने केली जाते ते पाहायला, नव्हे तर अनुभवायला मिळालं. ही प्रक्रिया कशी टप्प्याटप्प्याने होते... त्या निर्मितीत किती जणांचा सहभाग महत्त्वाचा असतो हेही यामुळे अनुभवता आलं. दिवाळी अंकांचं बदलतं स्वरूप तर मला चकितच करणारं ठरलं. आणि एक वाचक म्हणूनसुद्धा दिवाळी अंकाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला.
मंडळी! स्वानुभवाने सांगते. दिवाळी अंक निर्मिती प्रक्रिया ही एखाद्या मंगल कार्यासारखी असते. अनेक लहानसहान गोष्टी त्यात घडत असतात. ज्याची आपल्याला गंधवार्ताही नसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय निवड ! मग त्यानुसार अतिथी संपादक निवडणं, विषयानुसार लेखकांची निवड करणं, मग त्यांच्याकडून लेखन लिहून घेणं, त्यावर चर्चा करून संपादकीय संस्कार करणं, मग आर्टिस्टकडून लेखांची मांडणी व अंकांच मुखपृष्ठ करवून घेणं... प्रकाशनाच्या सहाय्यासाठी जाहिराती मिळवणं, प्रकाशनासाठी उत्तम पाहुणे शोधणं, अंकाचे टीझर तयार करून त्याची जाहिरात करणं... प्रकाशानानंतर वितरणाची सोय करणं, आता तर ऑनलाइन विक्रीचीही भर पडली आहे. अशी एका ना अनेक व्यवधानं सांभाळावी लागतात. आणि अंकाचे संपादक-प्रकाशक ती आनंदाने सांभाळतात. तेव्हा कुठे आपल्या हातात विकतच्या आयत्या चविष्ट फराळासारखाच आयता दर्जेदार अंक विकत मिळतो.
यातून जाणवलेली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षांची परंपरा असलेला दिवाळी अंक आता दिवाळीतल्या इतर गोष्टींप्रमाणे कात टाकू लागलाय. आता तो वेगवेगळ्या विषयांना वाहिलेला आहे. केवळ पाककृती किंवा कथा, कविता, गृहसजावट, राशिभविष्य यांच्या पुरताच मर्यादित न राहता तो जगण्याच्या सगळ्या आयामांना सामावून घेत आहे. अर्थकारण, समाजकारण, पर्यावरण, शेतीविषयक, कायदेविषयक, आरोग्यविषयक, पर्यटनविषयक, गड किल्ले विषयक, योगविषयक, अध्यात्मिक, धार्मिक, मानसिक असे सगळेच विषय सामावणारा झाला आहे. जगण्यातल्या अनेक समस्यांवर विचार विनिमय करायला लावणारा दिवाळी अंक 'रंजन' आणि 'बोधन' या दोन्हींचा उत्तम मिलाफ आहे. इतकंच नाही तर केवळ विषय वैविध्यच नव्हे तर माध्यमातही वैविध्यता जपत आहे. छापील तर असतोच पण आता त्याचवेळी डिजिटल स्वरूपात, दृक्श्राव्य माध्यमात देखील काही अंक तयार होत आहेत. एका अंकाच्या निर्मिती प्रक्रियेत थोडासा सहभाग घेतला आणि खरंच एक वेगळंच विश्व पाहायला मिळालं.
यानंतरही पुढे काही अंकात काम करताना, लेखन करताना वेगवेगळे अनुभव आले, येतही आहेत पण शेवटी अनपेक्षितरित्या मिळालेल्या, आवडीच्या विषयाच्या अंकाची पहिल्यावहिल्या अनुभवाची बात काही औरच नाही का...
धन्यवाद ! रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ... तुमच्यामुळे आज पुन्हा ते क्षण काही काळ का होईना जगता आले. आठवणींना शब्दबद्ध करता आलं.
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या ----
अस मोठमोठ्याने हातात फुलबाजी घेऊन गोल गोल फिरवत भल्या पहाटे म्हणत असू.दिवाळी म्हणजे उत्साह आनंद .काय काय करायचे याची भली मोठी यादी. खरच माझे मन पन्नास वर्षे मागे गेले.
दिवाळीच्या आधी सहामाही परीक्षा असल्या तरी शाळेतून आल्यावर वाडीतील मुल एकत्र जमून किल्ला कसा करायचा, आकाश कंदील करण्यासाठी बांबूच्या कामट्या कोण आणणार अशी जोरदार चर्चा करत असू. परीक्षा संपताच दगड माती जमवाजमव सुरू .
दगड उचलताना मोकळ्या जागेतील दगड उचला अस आईबाबा ओरडून ओरडून सांगत त्याला कारणही तसेच.दगडाखाली विंचू साप असायची शक्यता .मस्त दंगा मस्ती करत किल्ला व्हायचा.रात्री जेवणानंतर आकाश कंदील करायचा .कागद चिकटवायला आई खळ करून द्यायची. किल्ला कंदील तयार झाल्यावर आम्हा मुलांचा आनंद गगनात मावत नसे.
नरकचुर्दशीच्या दिवशी पहाटे तीन - साडेतीन वाजता उठायच.आई त्या आधी उठून चुलीत विस्तव घालायची.चुलीवर आदल्या दिवशीच तपेले पाण्याने भरून ठेवलेले असायचे .आई नारळ खोवून नारळाचं दूध काढायची. आमच्याकडे कामाला येणारे विठोबा आणि लक्ष्मी लवकरच यायची.अंगण गोठा झाडून स्वच्छ होताच पणत्या, दिवे , आकाश कंदील लावायचे .त्या प्रकाशाने सर्व परिसर उजळून निघायचा.ओटीवर आणि माजघरात रांगोळी काढून पाट मांडायचा . आम्हा मुलींना आणि आईला लक्ष्मी व बाबांना आणि दादाला विठोबा सुगंधी तेल लावायचा मग त्यावर उटणे लावून झाले की नारळाच दूध आणि मग कडकडीत गरम पाण्याने स्नान -- या दिवशीच्या स्नानाला अभ्यंगस्नान म्हणतात किती छान अर्थपूर्ण नाव आहे. त्यानंतर देवपूजा .देवांनाही अभ्यंगस्नान . देवपूजा चालू असताना फटाके वाजवायचे.
सर्व जण आवरून नवीन कपडे घालून तयार झाले की आम्ही वाडीतील दहा बारा मुले काकड आरती ला जात होतो. साडेपाचला निघत असू प्रथम राम मंदीर,मग राधाकृष्ण त्यानंतर विठोबा मंदिरात जाऊन परत यायच. तीनही मंदिरातील काकड आरती घेऊन सात-साडेसातला घरी यायच. घरी आल्यावर पाट मांडायचे ताटाभोवती रांगोळी काढायची फराळाचे पदार्थ आणि त्याबरोबर नारळ आणि गूळ घालून केलेले गरमागरम पोहे. काय मस्त वाटायच .
सण दिवाळीचा मोठा
नाही आनंदाला तोटा
Big Business Houses have their succession plans and act upon it. It is the family-owned businesses which may lack the foresight. Small and medium size business, most of them miss thinking about it, and planning for it.
Let’s compare a family business to a relay race. A relay is hardcore team work and no individual runs the entire race. The beginner must run to be in the lead, and pass on the baton to the next runner on time and properly. The next member must collect the baton properly and run faster so as to win the race.
If we use this anecdote, it’s easy to see the gaps. To begin with, one must think, has our business grown enough to hand it over to the next generation? Have we done enough to stay in the lead? If yes, the next question is, whether the next generation is competent enough to take over and take it further?
In short, are we ready to pass the baton and are they ready to take it? If all of this is in place, the next question is, is there a set of values within which the next generation will run the business? Does the next generation have the merit to run the business or is likely to inherit it simply on the concept of ownership?
Ownership is one thing, but merit means the capacity to run the business and take it to the next level. In a family business there is a difference between fair and right. Some decisions may be fare but not right and vice versa, from the business perspective.
There is also a difference between control and management of business. So often, the senior generations want the next generation to run and manage the business, but are not ready to pass out the baton, or in simpler terms- the control. This may happen because of lack of confidence in the next generation, or feeling of insecurity of losing control.
In case of multiple stake holders both side the situation becomes more complex. The real conflict of right and fair comes into the picture. All members of the next generation may not be competent, and relations do not match competencies. In this situation more competent members may leave and start their own business. Sometimes out of frustration, and most of the times to prove a point and to prove their merit.
Coming to the people who choose to stay in business, to sustain in business, in the same place also you have to run. Invest, expand, adopt new technologies, explore different markets, open at new locations. Whether you like it or not, new energy, vision, efforts are required to be infused.
The older generation may be exhausted to do it and wish to retire. The next generation can do it and are expected to do it. It is important to decide what we get to the table and what the next generation gets to the table. Whether there is clarity and a match in each other’s expectations. In other words, do each of us qualify for this transition. Does the passion, interest, capacity, expectations match. Getting all these together, a proper journey through structured discussions will help for transition, succession passing the baton. Even better if decisions are taken by brain more than the heart, as eventually it’s all about business.
Important is also whether we are ready to share returns with the next generation, like if we win the relay all members get the medals
There are many cases where is no next generation to take the baton. For example, only son settled abroad, no one is interested to come in business, daughters married and relocated or not interested in business. In this situation there is a big question as to whom to pass the business to. There is a possibility to run the business professionally provided we get good professionals; we believe in them and are ready to delegate. Other possibility is to sell the business and encash the value. There the issue is what activity to do and how to keep oneself busy and what to do with that money.
These are a few cases and options. Every case may be different and needs lot of brainstorming and working with all the stake holders. In spite of this really big and global business houses have done it successfully and are growing even after more than 100 years. At the same time many businesses are for sale in developed countries where succession is a major problem.
This topic is for stimulation of thought process, and there is no one size fits all solution. Rather there are more questions raised than solutions given.
Are you ready to begin the relay in business?
.
THE ROTARY FOUNDATION'S BEGINNING
Some magnificent projects grow from very small seeds. The Rotary Foundation had that sort of modest beginning. In 1917 R.I. President Arch Klumph told the delegates to the Atlanta Convention that "it seems eminently proper that we should accept endowments for the purpose of doing good in the world."
The response was polite and favorable, but the fund was slow to materialize. A year later the "Rotary Endowment Fund," as it was first labeled, received its first contribution of $26.50 from the Rotary Club of Kansas City, which was the balance of the Kansas City Convention account following the 1918 annual meeting. Additional small amounts were annually contributed, but after six years it is reported that the endowment fund had only reached $700. A decade later, The Rotary Foundation was formally established at the 1928 Minneapolis Convention. In the next four years the Foundation fund grew to $50,000. In 1937 a $2 million goal was announced for The Rotary Foundation, but these plans were cut short and abandoned with the outbreak of World War II. In 1947, upon the death of Paul Harris, a new era opened for The Rotary Foundation as memorial gifts poured in to honor the founder of Rotary. From that time, The Rotary Foundation has been achieving its noble objective of furthering "understanding and friendly relations between peoples of different nations." By 1954 the Foundation received for the first time a half million dollars in contributions in a single year, and in 1965 a million dollars was received. It is staggering to imagine that from those humble beginnings, The Rotary Foundation is now receiving more than $300 million each year for educational and humanitarian work around the world.
जीन होर्नी ने आपल्या मृत्युपत्रात ग्रेग मोर्टेसन करता बावीस हजार डॉलर्स पेक्षा जास्त पैसे ठेवले होते ,जे होर्नीच्या मते ग्रेगने पाकिस्तानात आपल्या खिशातून खर्च केले होते. त्याचप्रमाणे सेन्ट्रल एशिया इन्स्टिटय़ूट (सि ए आय)करीता एक मिलियन डॉलर्स पण ठेवले होते.
ब्राल्डू खोऱ्यांतील चापको नावाच्या एका खेड्यातील लबाड मुल्लाने ग्रेग मोर्टेसन विरूद्ध फतवा काढला होता. हा फतवा ग्रेगने मुलींना शिक्षण देण्याच्या विरूद्ध होता.परन्तू प्रत्यक्षात त्या मुल्लाला ग्रेग कडून पैसे ऊकळावयाचे होते. त्यामुळे ग्रेगला आपली पत्नी तारा आणि नवजात बाळ अमीरा ह्यांना मागे ठेवून परत पाकिस्तानात जावे लागले. स्कार्डू मध्ये ग्रेग आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर फतव्याविषयी खलबते करू लागला. त्यांनी इराणच्या आयातुल्लांना पत्र लिहून फतवा परत घेण्याची विनंती करण्याचे ठरविले. दरम्यान ग्रेगने पाकिस्तानातील ब्राल्डू खोऱ्यात ठीक ठीकाणी शाळा बांधण्याचे ठरविले. 1997 च्या ऑगस्ट महिन्यात पत्नी तारा आणि नवजात मुलगी अमीरा ह्यांच्या ऊपस्थीतीत कॉर्फे येथील शाळेचे उद्ध्घाटन करण्यात आले.
दरम्यान च्या काळात आयातूल्लांच्या सर्वोच्च धार्मिक परिषदेने ग्रेगच्या वागणुकीची, त्याचप्रमाणे त्याच्या कामाची गुपचूप माहीती मिळविली व1998च्या एप्रिल महिन्यात ग्रेग वरील फतवा उठविण्यात आला. फतवा उठविण्याची बातमी वार्या सारखी सर्वत्र पसरली आणि सर्व बाजूने आपापल्या गावी शाळा बांधण्याची विनंतीवजा निवेदने ग्रेग कडे येऊ लागली. शाळांबरोबर गावांना पाणी पोहचविण्यासाठी जलप्रकल्प पण हाती घेण्यात आले.
1999च्या सुमारास ग्रेग जेथे कार्य करीत होता तेथे कारगील युध्द सुरू झाले. ग्रेगला आपण सुरू केलेल्या प्रकल्पांबद्दल काळजी वाटू लागली. चिंताग्रस्त ग्रेग परत पाकिस्तानात आला व स्कार्डू येथे गेला. कारगिल युद्धातील बेघर आणि स्थलांतरीत लोकांकरीता सि ए आय तर्फे पाण्याची आणि शिक्षणाची सोय करण्यात आली.
या सर्व कामाकरीता ग्रेग व्याख्याने देऊन निधी जमवीत असे. कित्येकदा त्याला रिकाम्या सभागृहात व्याख्यान द्यावे लागे.पुढे हळूहळू त्याला आणि त्याच्या कार्याला प्रसिद्धी मिळत गेली व त्याचबरोबर निधी सुद्धा जमा होऊ लागला. जसजसा सि ए आय चा पसारा वाढत चालला तसतसा येव्हढ्या मोठ्या उद्योगाचे व्यवस्थापन करण्याचे, उद्योगव्यवस्थापनेचे पद्धतशीर शिक्षण नसणाऱ्या ग्रेगला जमेना.त्याचबरोबर सि ए आय चा निधी सुद्धा कमी होऊ लागला होता.सि ए आय च्या तिजोरीत नव्याने पैशाची भरपाई होण्याची गरज होती.
2020 सालानंतर पाकिस्तानात मदरशांचे पेव फुटले होते, जे सौदी अरेबिया मधील तेलाच्या पैशातून बांधले होते. बहुतेक मदरशांमध्ये इस्लाम च्या शिक्षणाबरोबर अतिरेकी जेहादचे पण शिक्षण देण्यात येत असे. मदरशांतील कित्येक विद्यार्थी तालीबानला जाऊन मिळत असत. 11 सप्टेंबर 2001 मध्ये जेव्हा ग्रेगने पाकिस्तानातील उत्तरेकडील शेवटचे गाव झुडखानला भेट दिली तेव्हा त्याला वाटेतच पाकिस्तानात होणार्या ह्या बदलाबद्दल कल्पना आली. झूडखान गावाला सि ए आय ने पाणी पुरवठा करणारे विजेचे पंप, जनरेटर, दवाखाना,वगैरे सुविधा पुरविल्या होत्या. त्यांचे उद्घाटन त्या दिवशी झाले.दुसरे दिवशी सकाळीच ग्रेगला बातमी कळली की न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हवाई हल्ला होऊन जुळ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत आणि अफगाण युद्ध सुरू झाले. अमेरीकन विमानातून अफगाणिस्तानवर बॉम्ब हल्ले चालू झाले. ग्रेग अफगाण युद्धात नागरीक आणि बालकांच्या होणाऱ्या हत्ये विरुद्ध होता.तसे तो देत असलेल्या व्याख्यानात सांगत असे. 13 नोव्हेम्बर 2001 पर्यंत तालिबानचा पाडाव झाला. 2002च्या फेब्रुवारी महिन्यात ग्रेग ने काबूल ला भेट दिली आणि अफगाणिस्तानातील शाळांच्या अवस्थेचा आढावा घेतला .काही शाळा बॉम्ब पडल्यामुळे नेस्तनाबूत झाल्या होत्या. त्याचबरोबर शालेय साहित्याची सुद्धा शाळांना अतिशय गरज होती. काबूल मधील मेडिकल कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांत अनॉटॉमी फक्त दहा पुस्तके होती. डॉ.फ्रेड्रीक रिमल नावाच्या एका डॉक्टरची पुस्तके व इतर शालेय साहित्य बरोबर घेऊन ग्रेग 2002 च्या एप्रिल महिन्यात परत काबूलला आला. डॉ. फेड्रीक एका मेडिकल कॉन्फरन्स ला जाण्याकरीता विमानात बसले होते, जे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या दक्षिण मनोर्यावर आदळवले होते.
ग्रेग देत असलेली व्याख्याने आणि त्याचबरोबर त्याला वार्ता माध्यमातून मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे सि ए आय च्या तिजोरीत पैशाची भर पडत गेली आणि ग्रेग सकट त्याच्या पाकिस्तानातील सहकाऱ्यांचे पगार सुद्धा वाढविले गेले. मिळालेल्या पैशातून पाकिस्तानात नवीन शाळा बांधण्याचा घाट घातला गेला. ग्रेग विरूद्ध काही मुल्लांकडून इस्लाम विरोधी शैक्षणिक शाळा बांधतो म्हणून फतवा सुद्धा काढण्यात आला. हा त्याच्यावरील दुसरा फतवा होता. परन्तु सरतेशेवटी शरीयत कोर्टाने त्याच्यावरील फतवा मागे घेण्यास मुल्लांना भाग पाडले.
2003 च्या सप्टेंबर महिन्यात ग्रेग परत तिसऱ्यांदा अफगाणिस्तान गेला. त्यावेळेस अफगाणिस्तानचा पूर्वीचा राजा झकीर शाह त्याचबरोबर विमानात होता. ग्रेगने काही वर्षापूर्वी अफगाणिस्तानातील किरगीज घोडेस्वाराना त्यांच्या प्रदेशात शाळा बांधून देईन असे वचन दिले होते. त्या वचन पूर्ती करीता ग्रेगला फैझाबाद येथे जावयाचे होते. त्याकरता प्रथम त्याला सालंगच्या बोगद्यातून जावे लागणार होते. जाताना बोगद्यातच त्याची जीप बंद पडली. इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांपासून स्वतःला वाचवत ग्रेग एका ट्रक मध्ये चढला, जी स्मगलरांची होती. ग्रेगची जीप ट्रकने ढकलत कशीबशी बोगद्याबाहेर काढली. जीप दुरूस्त करून पुढे जात असताना ग्रेग दोन तस्करांच्या टोळी युद्धात सापडला व जीप तशीच मागे सोडून ग्रेगला बोकडांची कातडे वाहणाऱ्या एका ट्रक मध्ये बसुन फैझाबादला जावे लागले. फैझाबाद हून ग्रेग तेथील मुखीया सादरखान यास भेटण्यास बहराक येथे गेला. तेथे सादरखान यास त्याने किरगीज घोडेस्वारांना दिलेल्या वचनाची गोष्ट सांगितली. खानने ग्रेग विषयी बरेच ऐकले होते. त्याने सांगितले की येथील प्रत्येक दगडामागे एक एक योद्धा तालिबानशी लढताना शहीद झाला आहे.आपण दोघे मिळून त्या दगडांतून शाळा ऊभारू .
मदतीच्या याचनेची 580 पत्र, हाजीमेहदीला दिलेली 12 बोकडांची लाच, महीनो महीने आपल्या कुटुंबाशी होणारी ताटातूट आणि दहा वर्षांची मेहनत ग्रेगला आता दुसऱ्या क्षेत्रात घेऊन चालली होती. ते क्षेत्र म्हणजे अफगाणिस्तानातील मुला मुलींना शिक्षणाची संधी देणे.
समाप्त
या लेखाचे भाग १ आणि भाग २ आपण खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकता
भाग १: https://rotarypunesouth.in/ebulletin-august21/#opinion-matters
भाग २: https://rotarypunesouth.in/ebulletin-sept21/#opinion-matters
शिवजयंतीच्या दिवशी विचार करताना लक्षात आलं की, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व इतकं प्रचंड आणि बहुपैलू आहे की त्याच्या प्रत्येक पैलूचं आकलन करण्यास संपूर्ण जन्मही पुरणार नाही! माझी अवस्थाही काहीशी अशीच आहे.
शाळेत असताना बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेल्या शिवचरित्राच्या दहा भागांची पारायणं केली तेव्हा भावले ते अफझलखानाचा कोथळा काढणारे आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटणारे शिवाजी महाराज. महाराजांचं शौर्य आणि धैर्य यांची वर्णन वाचताना ‘शिवाजी’ या नावाची भूल पडली ती कायमचीच.
कॉलेजात पदार्पण करताना महाराजांनी आपल्या समाजाला स्वत्व आणि स्वाभिमान यांची जी ओळख करून दिली, ती विशेष महत्त्वाची वाटू लागली. ज्या महाशक्तिशाली आणि क्रूरकर्मा औरंगजेबाच्या दरबारात मोठमोठ्या पठाण, तुर्की, इराणी, राजपूत सूरमांची डोळे वर करून बघायची हिंमत होत नव्हती, तिथे झालेला अपमान सहन न होऊन कडाडणारे आणि तडक निघून जाणारे शिवाजी महाराज मनाला भावले. स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य यांची जाणीव अंधारात चाचपडणार्या समाजात निर्माण करणारे व त्यासाठी आयुष्य पणाला लावणारे शिवाजी महाराज खर्या अर्थाने ‘हिरो’ वाटू लागले.
एमबीए करताना व त्यानंतर उद्योगविश्वात करियर करताना शिवाजी महाराजांचा ‘मॅनेजमेंट गुरू’ हा पैलू आकर्षित करून गेला. मॅनेजमेंटमधलं ‘स्पॅन ऑफ कंट्रोल’चं तत्व अष्टप्रधान मंडळाच्या रुपात आमलात आणणारे, आपण स्वराज्याची निर्मिती करतो आहोत ती लोककल्याणासाठी याचं भान ठेवणारे, ‘रयतेला त्रास देऊ नका’, ‘त्यांच्या मालकीच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका’ अशा कडक सूचना देणारे, शेतसार्याच्या नव्या पद्धती घालून देणारे शिवाजी महाराज खर्या अर्थाने व्यवस्थापन शास्त्राचे गुरू होते हे जाणवू लागलं. आज सर्वमान्य झालेलं ‘वेल्फेअर स्टेट’चं तत्व प्रत्यक्षात आणणारे ते इतिहास काळातील पहिले राज्यकर्ते होते हे लक्षात येऊ लागलं.
ज्या देशात गेली हजार वर्ष समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानलं गेलं, त्या आपल्या भारताच्या भविष्यातील सुरक्षेसाठी समुद्रावर हुकूमत असणं गरजेचं आहे हे ओळखून, भारताच्या आरमाराची मुहूर्तमेढ करणार्या महाराजांचं अलौकिकत्व लक्षात येऊ लागलं.
मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या एकाहून एक मातब्बर शत्रूंशी एकाच वेळी लढताना त्यांनी जी अजोड मुत्सद्देगिरी दाखविली त्याने मन थक्क होऊ लागलं.
Playing to your strength हे मॅनेजमेंटचं एक महत्त्वाचं तत्व. शिवाजी महाराजांची युद्धनीती म्हणजे या तत्वाचा मूर्तिमंत वस्तुपाठच ! सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात यायला भाग पाडून गनिमी काव्यानी त्यांनी एकाहून एक मातब्बर शत्रूला जे पाणी पाजलं त्याची बरोबरी कुठेच आढळत नाही.
मॅनेजमेंटमध्ये ‘व्हिजन’ ला फार महत्त्व दिलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रात महाराजांनी जी व्हिजन दाखविली तिला तर तोडच नाही. सक्तीने मुसलमान धर्म स्वीकाराव्या लागलेल्या नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देऊन ‘घरवापसी’ ची सुरुवात त्यांनी चारशे वर्षांपूर्वीच केली होती ! तसंच राज्यकारभारावर बसलेला फारसी भाषेचा पगडा दूर करून मराठीचा वापर व्हावा यासाठी ‘राज्यव्यवहारकोष’ तयार करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हाती घेतलं ते महाराजांनीच.
स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर प्रकर्षाने जाणविलेला शिवाजी महाराजांचा पैलू म्हणजे त्यांचं नेतृत्व. इंजिनिअर, एमबीए, अकाऊंटंट अशा उच्चशिक्षित लोकांना एकत्र आणून त्यांच्यात संघभावना निर्माण करणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांचं धैर्य उच्च पातळीवर राखणं किती अवघड आहे, याचा अनुभव घेत असताना महाराजांनी दऱ्याखोऱ्यात लंगोटी लावून फिरणार्या मावळ्यांना एकत्र आणून, मोठमोठ्या सर्वशक्तिमान पातशह्यांना गुडघे टेकायला लावणारी टीम कशी तयार केली असेल;
आपल्या राजाखातर जीव ओवाळून टाकायला तयार असणारी तानाजी, येसाजी, बाजीप्रभू, शिवा न्हावी यासारखी हजारो माणसं कशी घडविली असतील शिवाजी महाराजांनी... हा विचार करून नतमस्तक झालो.
आपण छोट्या-छोट्या अडचणी आल्या तरी गांगरून जातो. मग शिवाजी राजांनी छाती दडपून टाकणार्या हिमालयाएवढ्या अडचणींवर धीरोदत्तपणे कशी मात केली असेल? आग्य्राहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे घेतलेली झेप, दीड लाख शत्रूसैन्याच्या तळावर अवघ्या शंभर मावळ्यांना सोबत घेऊन घातलेला छापा.... या प्रत्येक वेळी घेतलेली प्रचंड मोठी रिस्क आणि प्रत्येक वेळी मिळवलेलं लखलखतं यश... कुणीही थक्क होऊन तोंडात बोटं घालावी अशीच ही कामगिरी.
आता जसं वय वाढलंय तसा मनाला भिडणारा शिवाजी राजांचा पैलू म्हणजे ‘राजयोगी’ हे त्यांचं रुप. मध्ययुगीन काळातील बादशहांची विलासी जीवनशैली आणि नैतिक अधःपतनाच्या कहाण्या आपण नेहमीच ऐकतो. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचं चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि विरक्त वृत्ती यांच्याबद्दलचा आदर शतगुणित होतो. साधूसंतांचा सन्मान करणारे, तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींच्या पायाशी बसणारे शिवाजी महाराज हे खरोखर श्रीमंत योगी होते. चैनबाजी आणि विलासी राहणीपासून फटकून राहणारा, मदांध तख्त फोडणारा पण जिंकलेलं राज्य संतांच्या पायाशी ठेवणारा, लक्ष्मीच्या आधी सरस्वतीचा सन्मान करणारा, स्वाभिमानाशी कदापि तडजोड न करणारा जो मराठी बाणा आहे, त्याची मुहूर्तमेढ शिवाजी राजांनी केली आहे हे निःसंशय !
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणखी एक पैलू हल्ली मला खूप भिडतो. कितीही अलौकिक असले तरी शेवटी महाराज एक माणूसच होते. प्रचंड अडचणी आणि संकटं यांच्या दडपणासमोर कधीतरी त्यांच्या रागाचा स्फोट होत असे. पण, अशा प्रत्येक वेळी त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीने त्यांच्या रागावर मात केली आणि शेवटी जे योग्य तेच त्यांनी केलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या कोणावर ते रागावले त्या प्रत्येकाने ते कधीही मनात ठेवलं नाही. आपल्या राजाला त्यांनी नेहमी शुभेच्छा आणि आशीर्वादच दिले.
याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण मला नेहमी आठवतं. फिरंगोजी नरसाळा या सरदारानं चाकणची गढी शाईस्तेखानाच्या प्रचंड सैन्यासमोर दोन महिने लढविली होती. अशा या बहाद्दर योद्ध्यावर एकदा काही कारणानं महाराज खूप रागावले व त्यांनी फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देण्याचा हुकूम दिला.
शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु झाली. एकीकडे शिवाजी राजांच्या डोळ्यासमोर फिरंगोजींच्या आठवणी तरळू लागल्या. फिरंगोजींनी राजांना अंगाखांद्यावर खेळवलेलं. त्याचं प्रेम, स्वामिनिष्ठा, शौर्य हे आठवून राजांना आपली चूक उमगली. तशी त्यांनी धाव घेतली. फिरंगोजींना तोफेच्या तोंडी बांधलं होतं. तोफेला बत्ती देण्याचा अवकाश होता. नशीब म्हणून महाराज वेळेवर पोहोचले आणि फिरंगोजींना उतरवण्याचा हुकूम दिला.
महाराजांनी फिरंगोजींना मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. फिरंगोजी उद्गारले, ‘‘कशाला रं राजा धावत आलास. तुझ्या शब्दाखातर हसत तोफेच्या तोंडी गेलो असतो. आणि जातानाही तुला आशीर्वादच दिले असते.’’
जगाच्या इतिहासात खूप राजे, बादशाह, सम्राट होऊन गेले. पण प्रजेचं असं प्रेम लाभलेला; पराक्रम आणि वैराग्य; मुत्सद्देगिरी आणि चारित्र्य; देशाभिमान आणि प्रजेचं हित; तडफ आणि दूरदृष्टी यांचा अजोड मिलाफ असलेला राजा, शिवाजी राजाशिवाय दुसरा कोणीही नाही !
ज्याच्या महतीचं आकलन करण्यासाठी सगळा जन्म घालवावा लागतो आणि तरीही तो दशांगुळे वर उरतोच, असा शिवाजीराजा आपल्याला लाभला, हे आपलं आणि भारताचं परमभाग्यच !
धनंजय जोशी लिखित "सहज" या पुस्तकातील एक लेख व त्याचे वाचन
माझ्या एका मित्राची गोष्ट.. माझा साधक बंधू तो..!!
आम्ही एकमेकांबरोबर पुष्कळ ध्यान शिबिरांना गेलो होतो...
तो मला सांगत होता की, आमचा एक दुसरा साधक मित्र त्याला सारखा विचारत होता,"तू आपली साधना आणखी खोल का नाही जाऊ देत..?? तीस दिवसांचे शिबिर कर,किंवा नव्वद दिवसांचे शिबिर कर...पण एकशे आठ दिवस एकांत शिबीर का नाही करत तू...??
माझ्या मित्रानं हे एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं,सारखं ऐकून ऐकून कंटाळला बिचारा.... कंटाळून तो आपल्या गुरुंकडे गेला.. म्हणाला.."काय करू? मी त्याला काय सांगू..??"
झेन गुरू हसले आणि म्हणाले.."तीस दिवस?नव्वद दिवस?एकशे आठ दिवस..?? छे...छे.. त्यात काय अर्थ..?? त्याला सांग की, तू शंभर वर्षाच्या शिबिरामध्ये नाव घातले म्हणून...""
मला खूप आवडलं ते उत्तर..."शंभर वर्षांचं शिबीर" म्हणजे आपण कायमच शिबिरात आहोत,असंच समजून राहायचं....
- मग त्याचा खरा अर्थ काय..??
खरा अर्थ असा की किती दिवसांचे शिबीर आणि किती वर्षांची साधना याचा विचार न करता प्रत्येक क्षण "विलक्षण लक्ष" देऊन जगणं...!!
आपण"जिवंत"असतो पण आपली साधना "जिवंत" असते का..?? हा प्रश्न आपण प्रत्येक क्षणी विचारायला हवा....
एक झेन संवाद खूप सुंदर आहे..
एक संन्यासी आपल्या धर्मगुरुला विचारतो.. "ध्यान-साधना म्हणजे काय.??"
झेन गुरु म्हणतात.."त्याला ध्यान-साधना नाही म्हणायचं.."
संन्यासी विचारतात.."ध्यानसाधना का नाही म्हणायचं..??"
झेन गुरु म्हणतात.. "तू आधी हे विचारायला पाहिजे, की तुझी साधना "जिवंत" आहे का..?? इज इट अलाइव्ह...?? इज इट अलाईव्ह..??"
"जिवंत" साधना म्हणजे प्रत्येक क्षणाला लक्ष देणारी...!!
माझा मित्र नील हा नंतर झेन गुरु झाला.. त्याच्या एका भाषणामध्ये तो म्हणाला..."समहाउ वी हॅव टू मेक धिस थिंग अलाइव्ह...!!
या वाक्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे "समहाऊ"...!!
याचा अर्थ कसंही करून नव्हे,...
तर "काहीही झालं तरी" असा आहे..!!
इतकच
आयटी इंजीनियरिंग मध्ये पदवी व अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेऊन ही अमिताने त्या क्षेत्रात काम न करता समाजाभिमुख काही काम करावे या विचाराने गेल्या 14 वर्षांपासून शाश्वत विकास (सस्टेनेबल डेव्हलपमेंट )व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काम केले आहे.
मास्टर साठी तिने सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयात लक्ष केंद्रित केले .तिने युनायटेड स्टेट्स आणि भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सल्लागार तसेच ना-नफा आणि समुदाय आधारित संस्थांच्या सीएसआर संघटनांसोबत काम केले. आरोहण इको सोशल डेव्हलपमेंट संस्थेत सात वर्षे जबाबदारी ते पद भूषवल्यावर तिने स्वतःची री चरखा ही संस्था स्थापन केली आणि जे प्लास्टिक रिसायकल होत नाही ते निसर्गामध्येजाऊ नये याची काळजी घेते. “रि- चरखा इको सोशल “एक सामाजिक उपक्रम आहे यामध्ये पारंपारिक चरखा व हातमाग विणकाम तंत्राचा वापर करून पुनर्वापर न करता येणारा प्लास्टिक कचरा अपसायकलिंग करते. या उपक्रमामध्ये तिने आदिवासी आणि ग्रामीण महिला व तरुणांना आपल्याबरोबर घेतले आहे व त्यांना रोजगारही मिळवून दिला आहे. यामागे पृथ्वीला पर्यावरण पूरक करण्याचा तिचा संकल्प आहे.
संजय दुधाणे
-क्रीडा पत्रकार, लेखक, एक जिद्दी आणि ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व.
- क्रीडा विषयक १८ पुस्तकं आणि काही आध्यात्मिक पुस्तकं लिहिली.
- कुस्तीपटू खाशाबा जाधव, हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद, क्रिकेटचा ध्रुवतारा सचिन तेंडुलकर, फ्लाईंग सिख मिल्खा सिंगसह अनेक क्रीडापटूंवर पुस्तकं लिहिली आहेत.
- त्यातील काही भाग ७वी आणि ९ वीच्या वर्गांसाठी पाठ्य पुस्तकात धडे म्हणून समाविष्ट.
- गेल्या ३ ऑलिम्पिक स्पर्धा सोहोळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले एकमेव मराठी पत्रकार.
- क्रीडा लेखनाबरोबरच समाजभान जपतात. ग्रामीण आणि कुशल गरजू तसंच दिव्यांग खेळाडूंना उत्तेजन आणि आर्थिक मदत देतात.
- आत्ता पर्यंत ४० खेळाडूंना मदतीचा हात दिला आहे.
Mohan Hirachand Palesha
09/01/1958
B.E. Mettalurgy from College of Engineering Pune .
Stock and Finance Broker since 1982
Self styled poet ,author and motivator has great command over English, Hindi, Urdu ,Gujrathi and Marathi with unique flair for Sher-o-Shayri.
Regular guest speaker at various colleges in Maharashtra and other states .
Charter member of Rotary Club of Pune East of Rotary International District 3131 since 1988.
District Governor in 2011-2012
District Rotary Foundation Chairman 2013-2016 and instrumental in the collection of 3 million USD.
Generous donor for the cause of humanity, has donated more than 50,000 USD and attained Major Donor Level 3 of The Rotary Foundation.
Motivational speaker and trainer for Rotarians all around the country for training events like President Elect training seminar , District Assembly , workshops , installations and conferences.
Invited at TEDx event at Allahabad in August 2017 ,to speak on Inspiring Curiosity. Event hosted by United Group of Institutions.
Appointed ARRFC for Rotary Year 2018-19.
National Committee member for Child Development in Rotary India Literacy Mission 2019-20
District Trainer 2020-21
COL representative 2020-2023
Vice Governor 2022-23
Defeat Diabetes Campaign
30 September 2021
A nationwide Defeat Diabetes Campaign was held on 30th September to target 1 million Blodd Sugar Tests in 1 day. Rotary Club of Pune South participated in this campaign with full strength and our club members acted as volunteers at multiple locations.
More than 300 tests were conducted in a day and saw a good turnout by citizens.
Soyamilk Preparation Workshop
30th September 2021
In its series of workshops for "Domestic Soyamilk Preparation", Rotary Club of Pune South held its 3rd workshop at Sakhar, Tehsil Velha on 30th September. Mr. Ranjeet Pal, the sponsor of the project, himself explained and demonstrated how to prepare Soyamilk and other products from soyabean at home.
15 women of Sakhar village were present and enthusiastically tried to pick up the technique.
Mrs. Bharti Khasbage and Ms. Rasika organized a local level on behalf of Jnan Prabodhini Prashala.
PDG Rtn. Bhausahab, PN RTN. Ravindra Prabhune, Rtn. Dattaji and Ann Anjali Deodhar & Pres. Rtn. Atul Atre accompanied PP Rtn. Dr. Sudhanshu Gore to plan and execute the training.
Aids Patients Rehabilitation
12th October 2021
नकाशा भेट- सरस्वती विद्यालय, अंबवणे
१३ ऑक्टोबर २०२१
अंबवणेच्या सरस्वती विद्यालयाला १३ ऑक्टोबर रोजी रो. माधुरी किरपेकर, रो. मृदुला घोडके व मृदुलाची मैत्रीण सुरेखा आरोळे यांनी भेट दिली. त्यावेळी रोटरी क्लब पुणे साऊथच्यावतीने भेट देण्यात आलेल्या ४ नकाशांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नकाशे रो. माधुरी व रो. मृदुला यांनी दिले आहेत तर त्या नकाशांची फिटमेंट व इतर गोष्टी रो. जितेंद्र महाजन याने केले आहे.
सरस्वती विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना त्यावेळी रोटरीच्या सन्माननीय पिन्स देण्यात आल्या.
हा क्लब सक्रिय ठेवण्यात रो. माधुरी किरपेकर यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.
आज "गणितातून मनोरंजन" याबाबत, वाडिया महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या, डॉ.शैलजा शिरवैकर यांनी फारच उद्बोधक वर्ग घेतला. गणित आणि संगणक यांच्यासारखे क्लिष्ट वाटणारे विषय कसे मनोरंजक होऊ शकतात आणि त्यातून त्या बद्दलची भीती कमी होऊन स्वारस्य कसं वाढू शकते हे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दाखवून दिलं. तसेच कापरेकर्स कॉनस्टंट बद्दल माहिती व त्याच्या "अंकांची जादू" मुलांना खूप भावली.
त्यानंतर मृणाल राऊत यांनी काही मजेशीर ॲक्टिविटी घेऊन विद्यार्थ्यांमधील भीड कमी केली. अश्या ॲक्टिविटी मधून आपले छंद आपण कसे जोपासू शकतो आणि आत्मविश्वास वाढवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. डॉ. अनघाने त्या दोघींना सहाय्य केले.
रो. माधुरी व रो. मृदुला व रो. जितेंद्र महाजन यांना मनःपूर्वक धन्यवाद !
असाच कार्यक्रम १४ ऑक्टोबर रोजी पुण्यातील नंदादीप विद्यालय येथे घेण्यात आला.
स्टडी डेस्क वाटप
१५ ऑक्टोबर २०२१
सार्थक सेवा संघ आंबळी येथे आपण तेथील विद्यार्थ्यांकरता ६० डेस्क देणार आहोत. त्यापैकी पहिले ५ डेस्क आपण प्रायोगिक तत्त्वावर तयार केले व १५ ऑक्टोबर रोजी त्यांना दिले. प्रेसिडेंट अतुल अत्रे, पी.पी. रो. गोरे सर, रो रवींद्र प्रभुणे, रो संजीव ओगले, रो माधुरी किरपेकर, फर्स्ट लेडी नंदिनी व आपल्या गोल्ड क्लब ची सेक्रेटरी रो आदिती किरपेकर हे उपस्थित होते.
हे डेस्क कमीत कमी किमतीत पण उत्कृष्ट दर्जा असणारे आहेत. त्याकरता रो. रवींद्र प्रभूणे व रो. संजीव ओगले यांनी विशेष प्रयत्न केले.
सोया दूध प्रशिक्षण शिबिर क्रमांक ३
१६ ऑक्टोबर २०२१
आपल्या क्लब तर्फे १६ ऑक्टोबर रोजी "सुमती बालवन कात्रज" येथे हे सोया दूध प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. येथे मुलांचे अनाथ गृह व शाळा आहे.
हे शिबिर पी.पी. रो. डॉ. गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतले गेले व त्यांना रो रवींद्र प्रभुणे यांनी मदत केली. शिबिराकरता ४ प्रशिक्षणार्थी व मुले उपस्थित होती.
Induction of the new members of our Satellite Gold & Literature Clubs was conducted on 24th October 2021 as Sevasadan Hall.
A total of 12 new members were inducted.
Members inducted in the Gold Club on were, Rtn. Neha Deshpande, Rtn. Bahar Tepan, Rtn. Sapna Dabholkar, Rtn. Shilpa Pande, Rtn. Swapna Rane, Rtn. Bhageyshree Ogale, Rtn. Sonali Belhekar, Rtn. Ashish Agrawal & Rtn. Gaurav Agrawal. All the newly inducted members of Gold Club were introduced by Rtn. Aditi Kirpekar and Rtn. Anushree Athlaye.
Members inducted in the Literature Club were Rtn. Neha Limaye, Rtn. Pallavi Gore and Rtn. Trupti Kulkarni. They were introduced by Rtn. Ulka Pasaklar.
Rtn. Mridula Ghodake was MoC for the event. Welcome address was given by President Rtn. Atul Atre.
Some very interesting and engaging talks were given by senior Rotarians PP Rtn. Abhijit Joag, AG PP Rtn. Sandeep Vilekar and PP Rtn. Govindrao Patwardhan.
Vote of thanks was given by Membership Director Rtn. Yogesh Nandurkar. The program was planned and organised by Club Extension Committee Chairperson Rtn. Abhijit Deshpande.
Also present for the program were First Lady Ann Nandini Atre, Club Trainer Rtn. Dr. Rajendra Gosavi, IPP Rtn. Sudarshan and Ann Sugandha Natu, PE Rtn. Sanjeev Ogale, Rtn. Jitendra Gosavi, Rtn. Hemant Walimbe, Rtn. Datta Pashankar, Rtn. Yogendra Natu, Rtn. Shrikant Paranjape, Rtn. Raghavendra Ponkshe, Rtn. Anand Kulkarni, Rtn. Shweta Karandikar, Spouse Subhash Krandikar. The program was followed by fellowship.
We would like to thank the Parent Club, Rotary Club of Pune South for organizing this induction program for the Gold and Literature Satellite Clubs.
नमस्कार मंडळी.. दिनांक ४ऑक्टोबरच्या साप्ताहिक सभेत "कृष्णकिनारा" या अरुणा ढेरे लिखित कादंबरीतील कथेचे नाट्य रुपांतरीत अभिवाचन, असा कार्यक्रम होता. आधीच विदुषी अरुणा ढेरें सारख्या सिद्धहस्त लेखीकीची लेखणी, त्यात "राधाकृष्ण" यांच्या अनवट, गूढ आणि सहज न उमजणाऱ्या नात्यावर भाष्य...विषय खूपच उत्सुकता वाढवणारा होता.
अस्मिताने तु रिपोर्ट लिही, असं म्हटल्यावर तिला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
अभिवाचन सुरू झाले आणि राधा कृष्णाच्या गोड नात्यात, बहूपेडी भावविश्वात सगळे हरवून गेले. हे अभिवाचन सविता अच्युत-राधा, राहुल शिंदे-कृष्ण, मानसी आपटे-रूक्मिणी व दासी यांनी केले. ह्या व्यक्तीरेखा केवळ वाचनातून उभ्या करणं सोपं काम नव्हे. पण आपल्या शब्दोच्चाराने, त्यातील भावभावनांचे यथोचित दर्शन घडवत त्यांनी सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे केले. स्थित:प्रज्ञ कृष्ण, जरा वृध्दत्वाकडे झुकलेली भावविभोर राधा त्यांच्या स्वरातून व्यवस्थित पोचली, प्रतित झाली आणि त्यांना रुक्मिणी आणि दासी या भूमिकेत मानसी आपटे यांनी यथायोग्य साथ दिली. वर कडी म्हणजे पार्श्वसंगीताची साथ, समुद्राची गाज, कर्णमधुर बासरी वातावरण जिवंत करून गेली.
या सभेत आमंत्रितांची ओळख ॲन माधवी देशपांडे हिने करून दिली तर आभार प्रदर्शन ॲन शुभदा अवधानी हिने केले.
एकूणच स्मरणात रहावा असा हा अनुभव होता. त्याकरीता प्रेसिडेंट अतुल आणि प्रोग्राम कमिटीची मृदृला यांचे मनापासून आभार. मृदृला सर्वच कार्यक्रम छान सादर करतेय , तिचं खूप कौतुक.. धन्यवाद!
नवरात्री उत्सव सेलिब्रेशन आणि पुणे साउथ मागे, असं कधी होणे शक्य आहे का? यावर्षी सुद्धा नवरात्री उत्सव हा आपल्या क्लब मध्ये नृत्य, भोंडला आणि गरबा करून ११ ऑक्ट रोजी साजरा केला गेला.
ॲन यामिनी पोंक्षे व ॲन माधवी देशपांडे यांनी रांगोळी आणि सजावट करून उत्तम वातावरण निर्मिती केली होती. सुरुवातीला प्रेसिडेंट अतुल अत्रे यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिले.
नुकतेच रो. विलास आपटे यांच्या “आपटे मोटर ड्रायविंग स्कूल” या संस्थेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने रो. विलास व ॲन स्मिता आपटे यांचा प्रेसिडेंटने सत्कार केला.
आपल्या लिटरेचर सॅटेलाईट क्लब सदस्या रो. प्राजक्ता कोळपकर यांच्या प्रा फौंडेशन तर्फे नुकताच विशेष मुलांनी तयार केलेल्या पणत्यांचा मोठा उपक्रम पूर्ण करण्यात आला. त्याबद्दल प्राजक्ताचा देखील सत्कार करण्यात आला.
या नंतर नवरात्री विशेष कार्यक्रमाची सुरुवात इशा म्हसकर आणि वैष्णवी पुणतांबेकर यांच्या भरतनाट्यम नृत्याने झाली. लिटरेचर सॅटेलाईट क्लब चेअरपर्सन रो. उल्का पासलकर हिने इशा व वैष्णवी यांची ओळख करून दिले. अतिशय नेत्रदीपक अशा नृत्याविष्कारात या दोन नृत्यांगनांनी पुष्पांजली, महालक्ष्मी कीर्तनम् आणि अर्धनारीनटेश्वर स्तोत्र सादर केले. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा त्यांचा परफॉर्मन्स होता. कार्यक्रमाला उत्तम ध्वनी आणि प्रकाश योजनेची साथ मिळाल्यामुळे रंगत अजून वाढली होती.
त्यानंतर सर्व ॲन्सचा भोंडला रंगला. फेर धरून पारंपारिक गाणी म्हणत सर्व लेडी रोटेरियन आणि ॲन्स व ॲनेट्सनी तो खूप एन्जॉय केला. रो. मृदुला घोडके, रो. माधुरी किरपेकर व ॲन नेहा वाळिंबे यांनी खिरापत वाटली.
नंतर गरब्याची धमाल होती. रो. संगीता देशपांडे हिने पारंपरिक गुजराथी संगीताचे नियोजन केले होते. सर्वांनीच गरब्याचा मुक्त आनंद घेतला. यामध्ये एका वेळी अनेक नृत्यप्रकार बघायला मिळाले हे सांगायला नकोच.
आपल्या रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते व त्यांनी उत्साहाने गरबा नृत्यात सहभाग घेतला.
त्यानंतर कार्यक्रमाला सजेसी फेलोशिप रो. वीरेनभाई व आरती शाह, रो. विजयाताई गुजराथी यांनी आयोजित केली होती. कार्यक्रमानंतर तृप्त मनाने आणि पोटाने प्रोग्रॅम आणि फेलोशिप कमिटीला धन्यवाद देत मंडळी आपापल्या घरी गेली.
कोजागिरी चा दिवस .........
चंद्र माझा हळूच हसला
अन् कुजबुजे कानात ,
चषकामध्ये भरून घे मज
कोजागिरी ची ही रात ........
चंद्राचे आकर्षण सर्वांना लहानपणापासूनच असते.
लहानपणी जो मुलांचा मामा असतो , तोच चंद्र तरुणाईच्या प्रेमाचा साक्षीदार बनतो .
कोजागिरी चा चंद्र तर सर्वांच्याच फार आपुलकीचा.
मित्र मंडळ जमवून खाणे ,गप्पा, खेळ आणि मसाला दुधाचा आस्वाद घेण्याचा हा दिवस.
रोटरी साऊथकर या वर्षी कोजागिरी निमित्त झालेल्या कार्यक्रमात सूर गंगेत न्हाऊन निघाले. कार्यक्रमाचे नाव होते " एक मे ऑर एक तू ".
सुप्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर आणि स्वप्नजा लेले यांनी समस्त साऊथकरांना त्यांच्या स्वरांनी भिजवून टाकले.
प्रत्येकाच्या मनात असलेली अमर हिंदी गाणी त्यांनी सादर केली व सर्वांना भूत काळाची चंदेरी सफर घडवली.
कार्यक्रम सुरू झाला ' झूटी' या सिनेमातील "चंदा देखे चंदा" या गाण्याने. आणि पाठोपाठ उमराव जान,काश्मीर की कली,सुजाता... या आणि अशा प्रसिद्ध सिनेमातील एकाहून एक श्रवणीय गाणी सादर होत गेली.
स्वप्नजा हिचे" नीगाहे मिलाने को " आणि जितेंद्र याचे " लेना होता जनम " या गाण्यांचा once more गायकांना घ्यावाच लागला.
वास्तविक कार्यक्रम इतका रंगला की तो संपूच नये असे प्रत्येकाला वाटत होते..पण वेळेची मर्यादा सर्वांना पाळावी च लागते. त्यामुळे "तुम भी चलो....हम भी चले " या गाण्यांनी जितेंद्र आणि स्वप्नजा यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली.
स्नेहल दामले यांचे सुयोग्य निवेदन व अपूर्व ,अनय, अभय आणि प्रसन्न यांचा स्वर साज यांनी कोजागिरीच्या या कार्यक्रमाच्या स्वर दुग्धा मध्ये वेलची, बदाम आणि साखरेची गोडी आणली. या कार्यक्रमाच्या संयोजनात रो. नितीन व अन स्वराली कुरले यांनी पुढाकार घेतला तसेच त्यांनी व रो. विनायक व ॲन रेखा जोशी यांनी मसाला दूध व स्वादिष्ट भोजनाची फेलोशिप देखील आयोजित केले होते. ॲन यामिनी पोंक्षे व रो. मृदुला घोडके यांनी केलेली सभागृहाची सुंदर सजावट ही या कार्यक्रमाला साजेशीच होती.
Covid च्या सावटातून बाहेर येण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज होतीच. South च्या परिवारातील बहुसंख्य लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अशा या कोजागिरीच्या कार्यक्रमाची आठवण कित्येक दिवसापर्यंत
प्रत्येक Pune South करांना राहणार आहे.
अफ्रिका म्हणजे जंगल आणि त्यात वावरणारे हत्ती, सिंह, हिप्पो वगैरे लहान मोठे प्राणी एवढीच आपली साधारण कल्पना. पण सिंह चार प्रकारचे असू शकतात, झेब्रा, जिराफ यांच्या सुद्धा ३-४ जाती असू शकतात हे यांच्या भाषणामुळे कळले.
बोलताना त्यांनी या सगळ्या जातींमध्ये फरक फोटो दाखवून छान समजावून सांगितला. अफ्रिका म्हणजे फक्त पशु नाही तर पक्षी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात हे श्री जोशी यांनी आवर्जून सांगितले. पक्षीप्रेमी साठी सुद्धा केनिया हे अप्रतिम ठिकाण आहे. भारतात ज्याप्रमाणे गीर, ताडोबा, पेंच या वेगवेगळ्या ठिकाणी जंगले आहेत त्याचप्रमाणे केनीयातही आहेत व प्रत्येकाने आपल्या आवड लक्षात घेऊन कुठल्या ठिकाणी जायचे हे ठरवले पाहिजे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
त्यांची ट्रॅव्हल कंपनी ग्लोब अँड बियॉंड केनियाच्या टूर आयोजित करत असते. तसेच काश्मिरच्या सहली आयोजित करत असते. आपल्या क्लबची काश्मीर सहल जायची असल्याने त्या ठिकाणी काय पाहता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. माहिती देऊन झाल्यावर श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. केनियाला जाण्यासाठी नुसते प्रोत्साहनच देऊन ते थांबले नाहीत तर तिथे राहणे किती सुरक्षित आहे हेही समजावून सांगितले. सर्व कार्यक्रम खूप माहितीपूर्ण झाला. या कार्यक्रमात श्री जोशी यांच्या परिचय ॲन रेखा जोशी यांनी केला तर आभार प्रदर्शन स्पाऊस सुभाष करंदीकर यांनी केले.